बाबागनोश आणि हम्मस (फोटोसहीत)

Submitted by मामी on 24 February, 2012 - 10:43

हा एक मेडिटरेनियन प्रकार आहे. भारी सोपा आणि चविष्ट. घरच्या लोकांकरता मुख्य जेवण म्हणून चालू शकेलच. पण न्याहरीला, हाय टी आयटेम, स्टार्टर, डिप किंवा साईड-डिश म्हणूनही हा बाबा नक्कीच उपयोगी पडेल. हे एका प्रकारचे भरीतच.

वेष बावळा परी अंतरी नाना कळा असं आहे बाबाचं. रूप काही देखणं नाही. ओटा पुसायचं फडकं साधारण महिन्याभरानं जसं दिसतं तसा मळखाऊ रंग. त्यामुळे पाहुण्यांना सर्व करताना दिलो जानसे नटवायला लागेल. पण पिटा ब्रेड, लवाश, क्रुटॉन्स, ब्रेडस्टिक्स बरोबर एकदम झक्कास जोडी जमते आणि खाणारे बाबागनोश मध्ये विरघळून जातात.

बहिणीच्या कृपेनं हा प्रकार मी पहिल्यांदा एका ग्रीक डेलीत खाल्ला आणि तेव्हापासून या बाबाच्या नादी लागलेय.

साहित्य :

भरताची मोठी काळी वांगी (२)
ताहिनी * (एक किंवा दोन चमचे. जास्त घातली तर जास्त क्रीमी लागतं.)
लसूण - ४-५ पाकळ्या
लाल तिखट, मीठ, ऑलिव्ह ऑईल

कृती :

वांगी भरता करता भाजून घेतो तशी मंद गॅसवर खरपूस भाजून घ्यावीत. सालं काढून टाकून वांगी मिक्सरमध्ये घालावीत. त्यातच वरील सर्व साहित्य घालून बारीक करावे. बोलमध्ये काढून सर्व्ह करावे. बरोबर भाजलेला पिटा ब्रेड द्यावा.

बाबागनोशचा जुळा भाऊ म्हणजे हम्मस. बाकी सर्व कृती तीच. फक्त वांग्याच्या ऐवजी, रात्रभर भिजवलेले आणि मग थोडे पाणी घालून उकडलेले, काबुली चणे घ्यावेत.

* ताहिनी म्हणजे तीळाची पेस्ट. ही बाजारात तयार मिळते अथवा घरी करता येते. सोप्पी आहे. बिनपॉलिशचे तीळ आणून, निवडून, पाचेक मिनिटे कढईत मध्यम आचेवर परतायचे. रंग बदलता कामा नये. मग थंड झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक होऊन तेल सुटेपर्यंत वाटावी. काचेच्या डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवावी. बाहेरही चालेल. पाण्याचा संपर्क अजिबात नको.

टिपा :
१. वरून थोडी चिरलेली कोथिंबीर, लाल तिखट भुरभुरवून टाका.
२. मध्ये थोडा खळगा करून ऑलिव्ह ऑईल घाला.
३. डिप म्हणून वापरताना प्लेटमध्ये मधोमध बोलमध्ये ठेऊन बाजूने पिटा ब्रेडचे तुकडे, ब्रेडस्टिक्स, लवाश इ. रचावे.
४. साध्या ब्रेड बरोबर अथवा चपात्यांबरोबरही मस्त लागतं.

****************************************************

भाजलेली वांगी, लसूण आणि बोलमध्ये आहे ती घरी केलेली ताहिनी

baba1.jpg

लाल तिखट आणि ऑलिव्ह ऑईल घालून सजवलेला बाबागनोश. हे खास दिनेशदांकरता. Happy

baba2.jpg

हा ओरीजिनल रंग

baba3.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हम्मस एकदम तोंपासु असतं. करायला सोप्पं दिसतंय. वेळ मिळेल तशा या रेस्प्या करण्यात येतील Happy
इथे लिहिल्याबद्दल धन्यवाद Happy

वरदा, (वांगी आवडत असतील तर) हम्मसपेक्षाही बाबागनोश जास्त चविष्ट लागतं.

बावळट, वाक्य बदललं आहे. धन्यवाद. Happy

मस्त मामी. हमस तर मला आवडतच आता ह्या बाबाला पण करुन बघेन.
आपल्याकडे पिटाब्रेड कुठे मिळेल? भारतात आल्यावर अश्या गोष्टी केल्या गेल्याच नाहियेत. Sad

मामी खरच छान लागतो हा प्रकार. मी एकदा माझ्या मैत्रीणी कडे खाल्ला होता आणि तेंव्हापासुन मी घरी करते बर्याचदा. पिट्टा सोबत तर मस्त लागतो..! फक्त त्याला हे जे काही बाबा न म्हणता मी वांग्याच हमस च म्हणते Happy
हे करताना ताहिनी मात्र विकत आणते.

बाबागनोश/गनूज मागे एकदा कोरियातल्या अरेबिक रेस्टॉ.मध्ये खाल्ला होता, फार नव्हता आवडला. हम्मस खायची अजून हिम्मत नाही केलीये. इथे खरंतर मुबलक मिळतं. लेबनिज रेस्टॉ. मध्येच परत एकदा खाऊन बघेन दोन्ही.

बाबागनोशला येथे दुबईत मुतब्बल सुद्धा म्हणतात. हम्मसला हामुस !!

येथे सर्व हायपर मार्केटमध्ये बाबागनोश व हामुस ताजे तयार मिळते. काही ठीकाणी बाबागनुश याच नावाने
सुद्धा मिळते.

ओटा पुसायचं फडकं साधारण महिन्याभरानं जसं दिसतं>>> हे भगवान!!

कुठेतरी वाचलं होतं (बहुतेक इकडेच) की वांग्यात लसणी भोसकून ते सगळं एकत्र भाजायचं. पण मी तर बुवा हम्मसच खाणार. कधी येऊ गं खायला?

हम्म्स अन पिटा ब्रेड कळल नाही. वर्णनावरून हम्म्स सुध्दा ब्रेड, पिज्झा बेस सदृष्य काही असावेसे वाटते.
वरून तेल घातलेले भरीत बरे लागेल का? बिनबियाळ ताजी ताजी वांगी आणायला हवीत. करून पाहुत. Happy
मंजूडी, दुधीला पण लवंगाने भोसकले होते उकडायच्या आधी वाट्ट एका सुपसेरेपीत Happy

कसली? सांगो प्लीज Happy ओहो, वांग्याच्या जागी म्हणजे ऐवजी अस समजले. दुसर्‍या पध्दतीच्या बाबासाठी वांग्याच्या जागी काबुली घेतेत असे वाटले. Uhoh धन्यवाद आडो Happy

मामी, पहिल्यांदा हा प्रकार गल्फमधे खाल्ला होता त्यावेळी अजिबात आवडला नव्हता.
(त्यात कांदा, मिरची, दही, फोडणी घालून भरीतच केले. तिथे हे टिनमधे मिळते. )
मग नंतर आवडू लागला.

फोटो मात्र सजवलेला पाहिजे !!

हम्मस्/हामूस.... छोले बॉईल करून पेस्ट बनवतात.. बाकीची रेसिपी मामी टाकेल .. फोटो सकट
इथे ही अरेबिक्/लेबनीज रेस्टॉरेंट्स मधे खूप टेस्टी मिळतं बाबा गनोश आणी हम्मस.. पिटा ब्रेड खूप मस्त काँबीनेशन आहे..
मुतब्बल पण सेम बाबा गनोश Happy

हमस... अहाहाहाहा!
हमस-पिटा ब्रेड-ज्यूस असंच डिनर असायचं कित्येकदा एकेकाळी. Happy
कधीचं करून बघायचं होतं. आता नक्की करेन.

मंजू, तू खाल्लंयस हमस. आपण फोर्टला फलाफल मधे जे खाल्लं सगळ्यांनी त्यात काय भरलेलं होतं असं वाटतं तुला? Happy

मामी फोटो टाकेपर्यंत या नेटावरच्या फोटोंवर समाधान माना.
हा हमस. यात मधे ऑऑ आहे. Happy
http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/5/5c/Hummus_from_The_Nile.jpg

@ अमृता,
आपल्याकडे पिटाब्रेड कुठे मिळेल? >>>> अग, हल्ली नमकीन स्नॅक्स मिळतात त्या छेडा टाईप दुकानांत असतात. नाहीतर बेकरीत मिळतात. साध्या ब्रेड बरोबर अथवा चपात्यांबरोबरही मस्त लागतं. (हे वाक्य टिपांमध्येही घालते.)

@ स्वाती२,
हमस बरोबर गाजराच्या ऊभ्या सळ्या पण छान लागतात. >>>> हो हो.

@ आडो,
बाबागनोश/गनूज मागे एकदा कोरियातल्या अरेबिक रेस्टॉ.मध्ये खाल्ला होता, फार नव्हता आवडला. हम्मस खायची अजून हिम्मत नाही केलीये. इथे खरंतर मुबलक मिळतं. लेबनिज रेस्टॉ. मध्येच परत एकदा खाऊन बघेन दोन्ही. >>>> आडो, घरी करून बघ एकदा. नक्कीच आवडेल.

मामी घरी करून बघेन किंवा लेबनीज/अरेबिक रेस्टॉ. मध्ये खाईन परत एकदा. पण त्या तिळाला इतकं तेल सुटतं??? ताहिनी इथे रेडिमेड मिळेल कदाचित, सर्च मारायला हवा. हम्मस मात्र आणून बघेन आता.

आडो, तीळापासूनही तेल काढतात की. तीळही तेलबियांपैकीच आहे. त्यामुळे जसं पीनटबटर करताना त्यातून तेल निघतं तसंच ताहिनीमध्येही दिसतं.

मामी, कधीतरी टेस्ट करायला हरकत नाही, तुझ्या हातचं Wink
(चला, बाबा-गटगचे २ मेंबर्स तर जमले. मी आणि मंजू :फिदी:)

माझं अतिशय आवडतं Happy
टर्कीश हमुस पण मिळतं इथे. त्यात अगदी बारीक चिरलेले कांदे आणि टोमॅटो असतात.

Pages