पानिपत... एक सल...

Submitted by सेनापती... on 10 February, 2012 - 00:38

बुधवार, १४ जानेवारी १७६१. पौष शु. अष्टमी.

गोविंद्रग्रजांच्या शब्दात सांगायचे तर,

"कौरव पांडव संगर तांडव द्वापरकाली होय अती, तसे मराठे गिलचे साचे कलीत लढले पानिपती !!"

त्या भयंकर रणसंग्रामाला अडीचशेहून अधिक वर्षे होऊन गेली तरी पानिपतची जखम आजही मराठी मनावर कायम आहे. शिवछत्रपतींचा राज्याभिषेक आणि अटकेपार फडकवलेले भगवे झेंडे हा मराठी इतिहासाचा मानबिंदू असेल तर पानिपत हा एक सल आहे. तो कधीच पुसला जाणार नाही. आजही कुठल्याही गोष्टीत आपला पराजय झाला की त्याला पानिपतची उपमा दिली जाते तर विजयाला अटकेपार झेंडे रोवणे असेच म्हटले जाते ह्यातच सर्व काही आले. पण मुळात ही परिस्थिती त्याकाळी मराठ्यांवर का आली हे देखील जाणून घेणे गरजेचे ठरेल. संपूर्ण भारतभर आपल्या घोड्यांच्या टापांनी आणि तलवारीच्या जोरानी मराठी साम्राज्याचा विस्तार(?) करता करता असे काय घडले की मराठ्यांचे अध:पतन झाले? मुळातच हे अचानक झाले नाही.

ह्यासाठी पानिपत समजून घेताना त्याआधीच्या काही वर्षांचा इतिहास समजून घेणे क्रमप्राप्त आहे. मराठी किंवा हिंदू साम्राज्य स्थापण्यामागची शिवछत्रपतींची इतिकर्तव्यता नेमकी काय होती? त्यांना नेमका कुठला महाराष्ट्र धर्म अभिप्रेत होता? त्यांच्या पाश्च्यात त्यांच्या नीतीमूल्यांची किती जपणूक मराठ्यांच्या राज्यकर्त्यांना करता आली? खरेतर कितपत झेपली किंवा पेलली असेच म्हणावे लागेल. एका १६ वर्षाच्या पोट-मोकासेदाराने मुघल आणि आदिलशाहीविरुद्ध उभा केलेला हा महाराष्ट्र धर्म होता. त्यांची इतिकर्तव्यता हीच होती की मुसलमानी साम्राज्य उखडून फेकायचे. हा देश, ही भूमी पारतंत्र्यातून मुक्त करायची. फक्त महाराष्ट्र नाही तर सिंधू नदी ते कावेरी पावेतो... त्यासाठी त्यांनी अखंड श्रम सोसले. संपूर्ण दक्षिण भारत जवळ-जवळ ताब्यात आणला. आदिलशाही जवळ जवळ नामशेष झालेलीच होती. उरली सुरली कुतुबशाही मराठ्यांच्या जीवावर जगत होती. पण मग पुढे असे काय झाले की दिल्लीपतीला दख्खनेत दफन करणारे मराठे खुद्द दिल्ली राखू लागले? पेशवे काळात नेमके असे काय बदलले की पातशाही नामशेष करायची सोडून मराठे स्वतः: चक्क तिचे रक्षणकर्ते बनले?

सदर धाग्यावर पानीपत संदर्भातून मराठी साम्राज्यावर चर्चा अपेक्षित आहे. इथल्या अनेक जाणकारांकडून मला त्यांची मते जाणून घ्यायला आवडतील. मी देखील माझी मते वेळोवेळी मांडीन.. Happy

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दत्ताजीचा मृत्यू हा अपघात होता >>> Angry

बामणांना शिव्या घालतात ते समजण्यासराखं आहे ...आजकाल तो पश्चिम महाराष्ट्राच्या "संस्क्रुतीचा" भाग झालाय ....दत्ताजी शिंदेवर ह्याचा राग का ? शिंदेच्या अपार कर्तृत्वाचा अन शौर्याचा अनादर करण्याचे कारण समजले नाही Uhoh

बाकी हा धागा जातिवादी केव्हाच झालाय .
.
अब्दाली अफगाणिस्तानचा राष्ट्रपिता आहे ...त्याचात आणि इतर २ राष्ट्रपित्यात असलेल्या समानतेचा उल्लेख करणारी माझी पोस्ट मागेच उडवली गेली आहे .
.
बाह्मणान्वर वाट्टेल तशी टीका करा ....चालेले ...पळेल....
राष्ट्रपित्यांविषयी बोलाल तर खबरदार ...( इथे राष्ट्रपिता अब्दाली अपेक्षित आहे ...दुसरा अर्थ लावुन पोस्ट उदवली जाण्या आधी क्लीयर करतो)

अहमद शहा अब्दालीला अफगाणात अहमद शाह बाबा असे म्हणतात.. म्हणजे अहम्द शहा '(राष्ट्र्)पिता' . तो एक चांगला कवी होता....( यालाच इतिहास म्हणतात.. आपण त्याला लुटारु म्हणतो, ते फादर ऑफ नेशन म्हणतात ..आपण मराठ्याना पराक्रमी म्हणतो..पण उत्तरेत त्यांची ओळख चौथाई वसूल करणारे लुटारु अशीच आहे.. Proud आपल्या पुस्तकात अटकेपार झेंडे.. तसं अफगाणी पुस्तकात पानिपत्पार झेंडे असे लिहिलेले असणार... Proud )

ही अहमद शहा अब्दालीने लिहिलेली कविता.. लव ऑफ ए नेशन.. Proud

By blood, we are immersed in love of you.
The youth lose their heads for your sake.
I come to you and my heart finds rest.
Away from you, grief clings to my heart like a snake.
I forget the throne of Delhi
when I remember the mountain tops of my Afghan land.
If I must choose between the world and you,
I shall not hesitate to claim your barren deserts as my own.

http://www.afghan-web.com/culture/poetry/poems.html#

रामानं लंका जिंकली तेंव्हा असेच उद्गार काढले होते.. सोन्याची असली तरी लंका मला नको.. जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरियसी... अब्दाली म्हणजे अफगाण्यांचा प्रभू रामचंद्र दिसतोय.

( अब्दाल्या, तुला एवढी अक्कल होती तर अफगाण सोडून पानिपतला आलासच कशाला? Proud )

पाकिस्तानने आपल्या एका मिसाइलला अब्दालीचे नाव दिले आहे.

आणि हे ही विसरता कामा नये की जिथे जिथे मराठ्यांनी आपले घोडे दौडवले तो आणि तोच भाग हिंदू भारत म्हणून शाबूत राहिला.

अब्दाली नि:संशय त्यांचा राष्ट्पिता आहे. खुद्द शेजवलकर त्याला 'अफगाण शिवाजी' असे संबोधतात. अर्थात अब्दाली नैतिकदृष्ट्या शिवाजीशी तुलना करता येणे शक्य नाही पण एक राष्ट निर्माता म्हणून नक्कीच.

आजच्या पुरते इथेच थांबतो.. अब्दाली लढाईनंतर मराठ्यांबद्दल काय म्हणाला आहे, नानासाहेबला त्याने पाठवलेले पत्र ह्यावर उद्या लिहेन... Happy

I forget the throne of Delhi
when I remember the mountain tops of my Afghan land.

हे बाकी खरे.. दिल्लीवर चालून आलेल्या सर्वच पराकीयांपैकी हा एकच असा जो परत गेला आणि दिल्ली विसरला.
अर्थात त्यात मराठ्यांनी त्याला दिलेला तडाखा देखील महत्वाची भूमिका बजावतो. पानीपतमध्ये अब्दालीला देखील प्रचंड मनुष्यहानी सहन करावी लागली. त्याच्या सैनातही बंडाळी होऊ लागली होती... Happy मल्हार राव ला भेटणार असताना अचानक तो अफगाणिस्थानला निघून गेला. आणि गंमत म्हणजे... ज्या पंजाब, सिंधसाठी तो युद्ध करून बसला होता ते लवकरच त्याला शिखांना द्यावे लागले.

मस्त धागा.. निवडक प्रतिसादांतून ज्ञानात बरीच भर झाली आहे.. अशोक पाटीलच्या तर सर्वच पोस्ट आवडल्या.
सेनापती.. चालू राहू दे.. !

"बामणांना शिव्या घालतात ते समजण्यासराखं आहे ...आजकाल तो पश्चिम महाराष्ट्राच्या "संस्क्रुतीचा" भाग झालाय"

~ प्रसाद जी, असे कृपया म्हणू नका. मी खुद्द कोल्हापूरचा म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील आहे पण चुकूनही माझ्या तोंडून वा लिखाणातून ब्राह्मणच नव्हे तर अन्य जातीलाही वक्र शब्द जाणार नाही, गेलेला नाही. 'इतिहास' हा माझा विषय नसतानाही त्याची गोडी लावणारे गृहस्थ ब्राह्मणच होते तर ज्या महाविद्यालयातून मी इंग्रजी विषयाची पदवी घेतली त्या विभागाचे प्रमुख एक दलित होते. त्यांच्या हाताखाली जे पाच प्राध्यापक होते त्यातील तिघे ब्राह्मण, एक मराठा व एक लिंगायत. असे असूनही त्या दलित एचओडीच्या विद्वतेबद्दल एकाही ब्राह्मण प्राध्यापकाने कधी शंका घेतलेली आम्हा विद्यार्थ्यांना आढळले नाही, कारण इंग्रजी विषयातील त्यांचा दबदबा सर्वांनीच मानला होता. अशा अनुकूल आणि हार्दिक वातावरणात आमची जडणघडण झाली असल्याने कुठल्या तरी कारणास्तव कुणाची जात काढून त्याला शिव्या हासडणे आम्हाला कधीच उमजले नाही. तो या राज्यातील काही मूठभर नालायक आणि संधीसाधू राजकारण्यांची 'मोडस ऑपरेन्डी' आहे आणि तिला बळी पडतात ते देखील गल्लीबोळातील 'अर्चिन्स'.

'पानिपत' हे इतिहासातील एक असे पान आहे की त्यापासून आजही शिकण्यासारखे भरपूर आहे. ते शिकताना आपण जर जातिभेदाचीच चूड घेऊन त्या जंगलात शिरलो तर मग झालेल्या चुकांपासून आपण आजही काही शिकायला तयार नाही हेच सार शेवटी निघेल. तेव्हा श्री.सेनापती यांच्या लेखावर वा आलेल्या प्रतिसादावर मते मांडण्याचे कुणाला कितीही स्वातंत्र्य असले तरी वैचारिक गाडी 'स्लीप' होऊ देऊ नये एवढीच अपेक्षा.

अशोक पाटील

साधू साधू !!!
अशोकराव तुमच्या लिखाणाचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे,
आजकाल माबोवर भलतेसलते संदर्भ देऊन अभ्यासू असल्याचे दाखविणारे लेख येऊ लागले आहेत,
त्याला सडेतोड उत्तर देणारे तुमचे लेख नेहेमीच वाचनीय असतात. धन्यवाद !

दीड तास लागला वाचायला! हुश्श!! पण अखेर पोचलो शेवटच्या प्रतिसादापर्यंत! Happy

अशोकजी, सुंदर पोस्ट!

सेनापती, अशोकजी आणि भान ठेवून लिखाण करणारे सगळेच -

लिहित रहा. आता प्रतिसादांमधल्या अवांतर बाबींना उत्तर देऊ नका. इथून पुढच्या चर्चेत केवळ अस्सल कागदपत्रांच्या आधारे काही मांडता आलं तर बघा. पानिपत हा मराठी जनतेसाठी भले दारूण अपयशाचा विषय असेलही, पण त्यातल्या चुकांतून बोध घेऊन पुढे जाण्याचा दृष्टिकोन असणारे आमच्यासारखे सामान्य वाचक इथे आहेत. प्रतिसादांमध्ये आरोप झाले, प्रत्यारोप झाले, हेतूपूर्वक धागा भरकटवण्याचे प्रकार झाले, त्यातून तुमच्यासारख्या निग्रही आणि मूळ विषयाचे भान असलेल्या लोकांमुळे धागा पुढे सरकतोय आणि तो योग्य दिशेनेच जाईल याची आशा आहे. इतकं मंथन झालंच आहे तर आता मूळ धाग्याचा हेतू साध्य झालाच पाहिजे..
Happy

हा प्रतिसाद मी संपादीत करत आहे याचे कारण काही सदस्यांतर्फे अतिशय उपयुक्त व गंभीर चर्चा चालू आहे याची मला जाणीव आहे. आधी तसा प्रतिसाद देण्याचे कारण वर झालेल्या काही वादावादी इतकेच होत्या.

धन्यवाद

अशोक पाटिल आणि सेनापती, अभ्यासपूर्ण आणि अत्यंत संयमित असल्यामुळे सगळे प्रतिसाद आवडले. लगे रहो ! Happy

शेवटी काय झालं? भांडणं आणि मारामार्‍याच ना?
कोणती मोठी माहिती कळाली आणि समजा कळाली तर तिचा काय उपयोग झाला?
>>
बेफ़िकीर जी ... प्लिज असे म्हणू नका . . .

श्री.बेफिकीर ~

इतिहासातील 'भांडण व मार्‍यामार्‍या' एक प्रकारची परंपरा सिद्ध करीत असते. विजयातून प्रगती साधणे आणि पराजयातून चुकांचा शोध घेणे ही मानवीस्वभावाची अखंड अशी वाटचाल आहे. ही भांडणे एकप्रकारे पुढील पिढीसाठी दिशादिग्दर्शनाचे कार्य करीत असतात. 'इतिहास' म्हणजे केवळ सनावळ्या घोकणे इतपत कुणालाच अभिप्रेत नसते. तसेच त्या दरम्यान घडणार्‍या घटनांना दोघांतील 'वाद' असाही रंग देता येत नाही. तसे झाले असते तर मग 'महाभारत' म्हणजे चुलतबंधूमधील जमिनीच्या वाटपावरून झालेल्या मारामार्‍या असे सोईस्कररित्या म्हटले गेले असते; आणि अवघ्या अर्धाएक पानात सार्‍या महाभारताचे सार साठविले गेले असते.

तुम्ही म्हणता कोणती माहिती कळाली आणि कळाली तर तिचा काय उपयोग ? हे सापेक्ष असते. "नीरक्षीरविवेक" हे एक प्रभावी साधन आहे इतिहासाच्या अभ्यासक्रमातील. दोन्ही बाजूंचे विश्लेषण वाचून तसेच अभ्यासून झाले तर त्या सो-कॉल्ड भांडणांतून काहीतरी गोष्टी आपल्या वाटचालीसाठी उपयोगी ठरतील.

आचार्य विनोबा भावे यानीदेखील इतिहासाच्या अभ्यासक्रमाबद्दल एकदा उदगार काढले होते की, "इतिहास शिकून करायचे काय ? मृत झालेल्या व्यक्तीतील वैर्‍यांच्या स्मृती शिल्लक ठेवून आपण काय मिळविणार ?" - ठीक आहे, उदात्त हेतू वाटतो. पण स्वतः भूदान चळवळीचे कार्य करीत असताना इतिहासाच्या विविध काळातील दाखले ते आपल्या भाषणातून अव्याहतपणे देत असत. म्हणजे याचा अर्थ मुलांनी रावणाला वगळून रामायण अभ्यासायचे, कौरव कारवायांकडे दुर्लक्ष करून पांडवांचे गुणगान गायचे. ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथांची भजने गात राहायचे आणि गझनीने लुटून नेलेल्या सोमनाथाचा मंदिराकडे पाठ फिरवायची अशी शिकवण आपल्या मुलांना द्यायची का ? असा प्रश्न आचार्यांना विचारला तर त्याचे उत्तर देताना ते आकाशाकडे पाहतील आणि मौन बाळगतील. म्हणजेच इतिहासातील भांडणे आणि मारामार्‍या ह्या बिलकुल टाकावू नसून त्या बोधप्रद आहेत.

ज्या गझनीचा मी वर उल्लेख केला आहे, तो महंमद गझनी गुजराथमध्ये सोमनाथ लुटीसाठी येण्यापूर्वी सुमारे ५०० मैलाच्या टापूत पसरलेल्या डझनावारी हिंदू राजवटीतून चालत आला होता. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याला एकाही हिंदू राजाने थोपविण्याचा प्रयत्न केला नव्हता असे इतिहास सांगतो. देशाची सीमा बिनदिक्कत ओलांडून परकीय शत्रू सोमनाथ मंदिरापर्यंत येतो आणि त्याला एकत्रित प्रतिकार होत नाही, अशी गाफील राज्यरचना या देशात त्या काळात होती याला कारण म्हणजे एकमेकातील 'तू मोठा कसा ? तुझ्यापेक्षा माझे ९६ कुळीचे घराणे मोठे !" असे थिल्लर वाटणारे वाद घालत भांडणे व मारामार्‍या करण्यात धन्यता मानणारी दर पन्नास मैलावर राजवट बदलणारी इथली संस्थाने असल्याने गझनीसारख्या लुटीसाठीच इथे येणार्‍यांचे फावत होते यात आश्चर्य नाही.

त्या परंपरेची [म्हणजेच भांडणांची] चिकित्सा करणे हे इतिहासाचे कार्य असते. कोणत्याही काळातील समाजाच्या जडणघडणीसाठी 'इतिहासा'चा अभ्यास हा जितका अनिवार्य तितकाच तो उपयोगी असल्याने त्या पठारावर घडलेल्या घटनांतून नेमके काय शिकायचे याचा विवेक त्या त्या व्यक्तीने केला पाहिजे, कारण तेवढे स्वातंत्र्य त्याला असते.

अशोक पाटील

<<त्या परंपरेची [म्हणजेच भांडणांची] चिकित्सा करणे हे इतिहासाचे कार्य असते. कोणत्याही काळातील समाजाच्या जडणघडणीसाठी 'इतिहासा'चा अभ्यास हा जितका अनिवार्य तितकाच तो उपयोगी असल्याने त्या पठारावर घडलेल्या घटनांतून नेमके काय शिकायचे याचा विवेक त्या त्या व्यक्तीने केला पाहिजे, कारण तेवढे स्वातंत्र्य त्याला असते.>>>

जियो अशोककाका Happy

बकासुररावांची झेप प्रचंड आहे हां.. मला फक्त वाटायचे की हे ब्राम्हणांना पकडतात आणि मग हिंदूंवर येतात. पण इथेतर भाऊसाहेब पेशव्यांवरून ते स्वामी समर्थांपर्यंत जाऊन आले! Proud

बेफिकीर, काय तेच तेच प्रश्न विचारता. मागे कोणीतरी 'इतिहासाच्या वादाची गरज काय?' असा धागा काढला होता. त्यावर चर्चा झालेली आहे. आणि तरीही तुम्हाला उत्तर हवे असेल तर असे समजा की इथे वाद घालणारे हे स्वतःची ऐतिहासिक प्रतिभा दाखवू इच्छित आहेत आणि वाचणारे 'युद्धस्य कथा रम्या' असं समजून वाचत आहेत. प्रत्येक गोष्टीचा उपयोग कशाला झाला पाहिजे? तुम्ही एवढ्या भारंभार कथा, कविता, गजला, कादंबर्‍या लिहिता. त्याचा कोणाला काही उपयोग आहे का? तरीही तुम्ही लिहिताच. तसंच इथं आहे.. Proud Light 1

सेनापती, केदार, अशोकराव, तुम्ही चांगले लिहिले आहे. पोस्टी आवडल्या. Happy

फचिन, बकासुररावांच्या स्वामी समर्थांबद्दलच्या बाता तर मास्तुरेंनी आधीच चुकीच्या सिद्ध केल्या आहेत. आता शिर्डी साईबाबांबद्दल उत्सुकता लागली आहे Wink
फक्त एकच शंका मनात येते ती म्हणजे नानासाहेबांचा जन्म १८२४ चा आहे, तर श्री साईंचा प्रकट काळ १८३५ हा मानला जातो. हे जर सत्य धरले तर ११ व्या वर्षी नानासाहेब श्री साई म्हणून प्रसिद्ध / प्रकट झाले असे म्हणावे लागेल. एकीकडे १८५७ च्या समरात नानासाहेबांचा प्रत्यक्ष सहभाग होता असेही म्हटले जाते. काय खरे काय खोटे?

तुम्ही एवढ्या भारंभार कथा, कविता, गजला, कादंबर्‍या लिहिता. त्याचा कोणाला काही उपयोग आहे का? तरीही तुम्ही लिहिताच.>>>

त्याचा मनोरंजन म्हणून उपयोग होतो. इथे मनोरंजन हा एकमेव हेतू असता तर मी काहीच बोललो नसतो. (मी बोललो काय आणि नाही काय म्हणा). पण येथील हेतू जातीयवाद, आपलेच म्हणणे खरे करणे याही क्षेत्रात गेलेला दिसत आहे. त्यानंतर मला प्रश्न पडला होता की ह्या भांडणांचा आज काय उपयोग.

फचिन,

आपल्याला माहीत नसेल असे वाटून सांगतो आहे ह्याचे कारण ते सांगितल्यामुळे कदाचित मी वर जे प्रतिसाद दिले ते का दिले ह्याबद्दल उलगडा होऊ शकेल.

मी एकदा पुण्यातील गांधीभवनमध्ये गेलेलो असताना एका कॉलेजच्या मुलामुलींनी हॉल भाड्याने घेतलेला दिसला. त्यांचे कसलेतरी फंक्शन होते तेथे. प्रत्यक्षात तेथे जे चालले होते ते अतिशय हिडीस नाच व अश्लील हावभाव. हे पाहून मी मनोगत या स्थळावर त्याबद्दल लिहिले. आश्चर्य म्हणजे ते वाचून आणि गांधींच्या अहिंसा धोरणाचे पालन करणारे असूनही काही जणांनी मला चक्क दम दिलेला होता.

वरील लेखाला जे प्रतिसाद आले आहेत त्यांचाही असाच परिणाम होऊ शकतो व तो खरे तर संकेतस्थळावरही होऊ शकतो म्हणून मी म्हणत आलो की या वादांचा फायदा काय. पण काही प्रतिसाद तटस्थपणे लिहिलेले आढळत आहेत. (जसे सेनापई, केदार व अशोक पाटील) व ज्यातून ज्ञानवर्धन होत आहे असे अनेकांना वाटत आहे म्हणून मी माझा प्रतिसाद संपादीत केला.

रच्याकने, माझ्या सर्व लेखनाचा एक मोठा उपयोग होतो. तो उपयोग 'मला' होतो, इतरांना नव्हे. तो म्हणजे लोक म्हणतात की हा माणुस भरपूर व अष्टपैलू लेखन करतो. प्रसिद्ध होणे या एकाच कारणाने मी लिहीत असतो. आणि हे विधान प्रामाणिक आहे. त्यामुळे माझे लेखन व येथील प्रतिसाद यांची तुलना गैर. Happy

-'बेफिकीर'!

बेफिकीर, तुम्ही जे लिहिले तेच मी लिहिले आहे. तुमच्याच चष्म्यातून पहायचे झाले तर वाद घालणारे प्रसिद्धीसाठी वाद घालत आहेत, आणि वाचणारे अधल्यामधल्या चांगल्या पोष्टी मनोरंजनात्मक रम्य कथा समजून वाचत आहेत असे समजूयात. त्यामुळे ह्याचा उपयोग काय हा मुद्दा तसा निकालात निघतो.

गांधीभवनाच्या उदाहरणाचा इथे प्रत्यक्ष काही संबंध वाटत नाही. आणि असलाच तर त्या नाचणार्‍या मुलांनी आणि तो हॉल अशा कार्यक्रमासाठी भाड्याने देणार्‍यांनी इतिहास वाचलेला नाही, किंवा असे कुठे वाद घातलेले नाहीत/ वाचलेले नाहीत. त्यामुळे त्यांना त्या गोष्टीचे गांभीर्य नाही असे म्हणता येईल. घ्या, अजून एक उपयोग झाला इतिहासाचा. घटनांचे, स्थळांचे, ऐतिहासिक व्यक्तींच्या योगदानाचे गांभीर्य कळणे. Happy

गांधीभवनातील प्रसंगाचे उदाहरण देण्याचे कारण असे होते की येथील एखाद्या कंटक आय डी ने जर बाहेर एखाद्या जातीयवादी संघटनेला येथे डोकवून संबंधितांना उपदेशाचे डोस पाजायला सांगितले तर काय होईल हे बघा म्हणून

Happy

ज्या गझनीचा मी वर उल्लेख केला आहे, तो महंमद गझनी गुजराथमध्ये सोमनाथ लुटीसाठी येण्यापूर्वी सुमारे ५०० मैलाच्या टापूत पसरलेल्या डझनावारी हिंदू राजवटीतून चालत आला होता. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याला एकाही हिंदू राजाने थोपविण्याचा प्रयत्न केला नव्हता असे इतिहास सांगतो.

मला इतिहासातील हाच मुद्दा महत्वाचा वाटतो.. आज भारताचा संघराष्ट्र नकाशा आपल्या डोळ्यासमोर आहे, म्हणून आपल्याला सिंधु पार आलेला 'परकीय' शत्रू वाटतो. पण त्या काळात भारत हे एक राष्ट्र नव्हतेच.. सगळी छोटी मोठी राज्यं, संस्थानं, वतनं म्हणजे राष्ट्रच होते... शत्रूची ओळख ही शत्रू एवढीच असायची... मग वेळ पडली तर शेजारचा आपल्याच जाती धर्माचा राजा आपला शत्रू.. आणि त्याच्या विरोधात मदत करणारा तो , भले अब्दाली, सिकंदर, कनिष्क... कुणीही अफगाण, चीन मधनं आलेला , तो आपला मित्र.. अशी साधी ओळख होती... हा ;परकीय' , हा 'परधर्मातला' हे सगळं आज आपण आपल्या रेफ्रन्स नुसार, आपल्या आजच्या नकाशातल्या रेषेनुसार आपण बोलत असतो... पूर्वीच्या काळी राष्ट्र, नेशन, संघराज्य असली संकल्पनाच नव्हती.. कुणीही सैन्य घेऊन कुठंही फिरावं, जिंकावं, आपल्या नावानं नाणी पाडावीत की ते त्याचं राज्य.. भारतातले राजे जरी सैन्य घेऊन आफ्रिकेपर्यंत जिंकत गेले असते तरी त्यानाही कुणी पास पोर्ट विसा मागणार नव्हतं.. लढाई करा.. जिंकला तर तुमचं, नाही तर आमचं.. जिसकी लाठी उसकी भैस.. हाच प्रकार होता. त्यामुळं आज आपण आपल्या राष्ट्र्प्रेम' या फुटपट्टीने सगळा इतिहास आपण मोजतो, तेंव्हा मला गंमत वाटते.

त्यामुळं सोमनाथच कशाला, गजनी पार अगदी रामेश्वरपर्यंत जरी देवळं पाडत गेला असता तरी त्याला 'राष्ट्र्भावनेनं' कुणीही अडवणारं नव्हतं.. त्याने आपल्या राज्यावर आक्रमण केलं तर तो आपला शत्रू, याउअल्ट शेजारच्यावर आक्रमण करुन त्याला गजनीनं मारलं, तर गजनी आपला मित्र.. असा साधा व्यवहार होता. मुसलमान राजानी स्वतःच्या आस्तित्वासाठी फक्त आणखी एक जास्तीची चाल खेळली ती म्हणजे धर्म परिवर्तनाची.. ( पण यातही काही नवीन नाही.. बौद्ध धर्मीय राजानीही ही चाल खेळलीहोतीच.) संघराज्यीय भावना निर्माण व्हायला कारण ठरले इंग्रज.. ते हिंदु आणि मुसलमान राजे/प्रजा सर्वांचे कॉमन शत्रू ठरले.

>>> स्वामी समर्थ नेमके १७६०/६१ च्या दरम्यानच मंगळवेढ्याला आलेत. स्वामी समर्थांच्या प्रकटीकरणाशी लढ्याचा घटनाक्रम जुळतो.
>>> >>> इ.स. १८०० मधे स्वामींचा अंत झाले ते सत्तरी ओलांडले होते. अक्कलकोटला स्वामी एकुण २३ वर्षे राहिले.

बकासूररावांचा गोंधळ माझ्या लक्षात आलाय. वर त्यांनी जे आकडे दिले आहेत ते इसवीसनाचे नसून "शके" आहेत. इसवीसनाचे वर्ष "शके"पेक्षा ७८ वर्षे पुढे आहे. सध्या २०१२ इसवीसन सुरू आहे, पण पंचांगात "शके" १९३४ असे लिहिलेले आढळेल.

त्या हिशेबाने शके १७६०/६१ म्हणजे इसवीसन १८३९/४० येते. तसेच शके १८०० म्हणजे इसवीसन १८७८ येते. त्यामुळे श्री स्वामी समर्थ शके १८०० मध्ये म्हणजेच इसवीसन १८७८ मध्ये समाधीस्थ झाले हा हिशेब लागतो.

>>> आता शिर्डी साईबाबांबद्दल उत्सुकता लागली आहे. फक्त एकच शंका मनात येते ती म्हणजे नानासाहेबांचा जन्म १८२४ चा आहे, तर श्री साईंचा प्रकट काळ १८३५ हा मानला जातो. हे जर सत्य धरले तर ११ व्या वर्षी नानासाहेब श्री साई म्हणून प्रसिद्ध / प्रकट झाले असे म्हणावे लागेल. एकीकडे १८५७ च्या समरात नानासाहेबांचा प्रत्यक्ष सहभाग होता असेही म्हटले जाते. काय खरे काय खोटे?

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रात नानासाहेब पेशव्यांचा उल्लेख आहे. १८५७ चे स्वातंत्रयुद्ध इंग्रजांनी मोडून काढल्यावर नानासाहेब पेशवे अयोध्येजवळील नैमिषारण्यात जाऊन लपून राहिले होते. तिथे त्यांची व श्री महाराजांची भेट झाली होती. पुन्हा एकदा उठाव करण्याची नानासाहेबांची इच्छा होती. पण ते जमले नाही. नानासाहेब पेशव्यांचा मृत्यु त्याच अरण्यात १९०५ मध्ये झाला. त्यांच्या मृत्युसमयी श्री महाराज त्यांच्याजवळ उपस्थित होते.

श्री साईबाबा १९१८ मध्ये शिर्डी येथे समाधीस्थ झाले. त्यांचा आणि नानासाहेब पेशव्यांचा काहीच संबंध नाही.

आचार्य विनोबा भावे यानीदेखील इतिहासाच्या अभ्यासक्रमाबद्दल एकदा उदगार काढले होते की, "इतिहास शिकून करायचे काय ? मृत झालेल्या व्यक्तीतील वैर्‍यांच्या स्मृती शिल्लक ठेवून आपण काय मिळविणार ?" -

>>>:हहगलो: विनोबा भावे हा ही एक मोठ्ठा जोक आहे असे ऐकुन होतो ...आता वाचायला पाहिजे

>>> पश्या :राग:, काय बोलतोस " रीस्पेक्ट द थॉट्स ऑफ अदर पीपल " Biggrin

>>> बाकासुर यांची विनोबा भावेंविषयी मते जाणुन घ्यायला आवडतील ...विनोबा सत्यसाईबाबा तर नाहीत ना Light 1 Rofl

अवांतर प्रतिसाद काढून टाकले तर बहुधा येथे फक्त सेनापती, केदार, अशोक पाटील व जामोप्या यांचे प्रतिसाद राहतील

नानासाहेब पेशव्यांचा मृत्यु त्याच अरण्यात १९०५ मध्ये झाला. त्यांच्या मृत्युसमयी श्री महाराज त्यांच्याजवळ उपस्थित होते.>>>> माझ्याकडची माहिती देखील हेच सांगते मास्तुरे.

काही ठिकाणी नानासाहेब आणि त्यांच्या कुटुंबाने नंतर नेपाळमध्ये आश्रय घेतल्याचे देखील वाचायला मिळाले. विकी*वर तर त्यांना नंतर इस्तंबुल (काँन्स्टँटिनोपल) येथे पाहीले गेल्याचे सुद्धा उल्लेख आहेत :;)

विषयांतराबद्दल क्षमस्व सेनापती. या विषयावरील (स्वामी आणि साई) हेमाशेपो Happy

अवांतर ची व्याख्या काय बेफी ??

विनोबा म्हणतात ..."इतिहासातील वैर्‍याच्या आठवणी ठेवणेच अवांतर आहे "

मग धागाच अवांतर ठरतो .:खोखो:

जामोप्या,

तुम्ही म्हणता तशी भारतात राज्यभावना जर इंग्रजांनी रुजवली, तशी ती इंग्रजांच्या ताब्यातील इतर प्रदेशांत ती का रुजली नाही? उदा: सायप्रससारख्या छोट्याश्या द्वीपदेशाची फाळणी झाली आहे. तसेच मलेशिया आणि बोर्नियो वेगळे का आहेत? तसंही इंग्रजांच्या ताब्यात सगळा भारत नव्हताच. ज्याला ब्रिटीश इंडिया म्हणतात तेव्हढाच होता. उर्वरित भाग संस्थांनी प्रदेश होता. त्यात तत्कालीन भारताची १/४ जनता आणि १/३ भूमी होती. मग भारतीय राज्यभावना रुजण्यास संस्थानिकांचा हातभार लागला असं का म्हणत नाहीत?

इंग्रजांच्या आधीही स्वकीय आणि परकीय भेद भारतीय राज्यकर्त्यांना ठाऊक होता. मगधातल्या स्कंदगुप्ताने हूणांवर केलेली स्वारी अ.भा. राज्यभावनेची निर्देशक आहे. तसेच ओडिसी राजा खारवेलने केलेला शकांचा पाडावही भारतीय राज्यभावानेचं प्रतीक मानायला हवा.

आ.न.,
-गा.पै.

संस्थानिक वेगळे असले तरी वेळ्प्रसंगी इंग्रजांचं सैन्य भाडोत्री वापरायचं कामही ते करत होतेच... संस्थानिक लोक आधुनिक शस्त्रं इंग्रजांकदून घेत होते... त्याबदल्यात ते इंग्रजाना मोबदलाही देत होते.. बाकी देश इंग्रजान्नी जिंकला तो हाच फॉर्म्युला वापरुन ना?. हळू हळू उरलेला १/३ ही त्यान्नी जिंकला असता की.

आणि माझं वाक्य आहे... संघराज्यीय भावना निर्माण व्हायला कारण ठरले इंग्रज. इंग्रजानी संघभावना निर्माण केली असे मला म्हणायचे नाही.. इंग्रज हे सर्वांवरचं कॉमन संकट आहे, हे लक्षात आल्याने देश एकत्र आला... त्याला कारण दळणवळणाची आधुनिक साधने हीही ठरले. नाहीतर गझनी खईबर खिंडीतन आत आलेला आहे, हे केरळमधल्या राजाला कुठं लवकर समजत होते आणि त्यातलं गांभीर्य कुठं लवकर समजत होतं?

धार्मिक वेगळेपण हाही एक फॅक्टर अ‍ॅड झाला.

Proud

जामोप्या.... +१ वरील दोन्ही प्रतिसादां ना.

अशोकजी आपण लिहित रहा. खरोखर उत्तम माहिती मिळते आहे. खुपच संयत प्रतिक्रिया आहेत आपल्या.

संघराज्यीय भावना निर्माण व्हायला कारण ठरले इंग्रज. >>>

हे नेहमी ज्यांना इतिहास अजिबातच माहिती नसतो तसे अन इंग्रज साम्राज्याकडेच देव म्हणून पाहणारे लोक म्हणत असतात. ह्या वाक्यावर इतर बाफवर पण अनेकदा लिहिले आहे.

अलक्शेद्रचे आगमन भारता होताना "गण" राज्य पद्धती भारतात अस्तित्वात होती. ती असल्यामुळेच चाणक्य (त्याचा दुर्दैवाने तो शेंडीवाला ब्राह्मण होता) मगध सम्राटाकडे मदत मागायला गेला होता.

कृपया सम्राट व चक्रवर्ती ह्या दोन शब्दांकडे आपले लक्ष मी वेधू इच्छितो. शिवाजी हे "महाराज" होते सम्राट नाही, पण औरंगजेब सम्राट होता. आला का भेद लक्षात? सम्राट म्हणजे ज्याला मांडलिक राजे असत ते. त्याचे रक्षण देखील सम्राट करत. उदा पेशवे सम्राट नव्हते पण चौथाई घेतल्यामुळे रक्षनाला गेले.
तसेच आपणास राजसुय व अश्वमेध हे यज्ञ माहिती असतीलच. हे यज्ञ केवळ सम्राट लोक करत. आणि सम्राट म्हणजे संघांचा राजा.

दुसरा प्रतिशब्द म्हणजे जनपद आणि महाजनपद. प्राचिन भारतात एकुन १६ महाजनपद होते. आपणास गुगलवर ते कोणते आहेत हे लगेच मिळू शकेल.

वारंवार तेच ते लिहून प्रतिउत्तर दिल्यावर खरच मुद्दा मान्य करायला काय हरकत आहे.

आपणास प्राचिन "भारताचा" ( अगदी शालेय पुस्तकात पण हाच उल्लेख आहे.) ग्रिक, अफ्रिका व अन्य देशांशी व्यवहार होता हे माहिती असावे. ते रेटस घाऊक रित्या हे सम्राट ठरवत. कारण जनसंघ एकच त्यामुळे तोच रेट त्या सर्व संघांना लागू होत होता.

आज नवीन भारतात अनेक राज्य आहेत व त्यांच्या गण म्हणून आपण गणराज्यदिन साजरा करतो. ही व्युत्पत्ती जुनीच आहे हो.

युद्धात मदत ही लेन-देन व्यवहाराचा भाग म्हणून.. त्याचा अर्थ दोन्ही राज्यांमध्ये भारत नावाच्या एका राष्ट्राबाबत प्रेम होते असा थोडेच होतो? वेळ पडली तर हेच लोक आपापसात भांडत आणि लढत होतेच की... ( आणि आज तरी काय वेगळं आहे? उद्या शिवसेना आणि मनसे एक्त्र आले, तर त्याचा अर्थ मनसे शिवसेनेची मांडलिक झाली.. किंवा शिवसेना आणि मनसे यांचे संयुक्त गणराज्य झाले, असे म्हणायचे काय? Proud )

http://hi.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%... महाजनपदं ही वेगळी वेगळी राज्यं होती, त्यांचे वेगळे राजे आणि राजधान्या होत्या.. कदाचित त्यांचे चलनही वेगळेवेगळे असणार... या सर्वांचं एकत्र भारत राष्ट्र अशी संकल्पना तेंव्हा होती का?

राजसूय आणि अश्वमेध हे पौराणिक दाखले झाले. इतिहासात असले यद्न खरोखरच कुणी केलेत ते फार तुरळक आहेत. . आणि मुळात राजसूय आणि अश्वमेध यद्न करायचे कशाला? कुणीतरी राजे आपल्या अधिपत्यात नाहीत, त्याना हरवून किंवा तह करुन स्वतःच्या अधिपत्याखाली आणण्यासाठीच ना? त्यामुळे या यज्ञांमूळे भारत हे 'एक राष्ट्र' नव्हते हेच सिद्ध होते.. जर राष्ट्र एकच असते, तर कशाला कुणी कुणाला यज्ञ करुन 'तुझे' राज्य आता 'माझेच' झाले म्हणायचे?

अश्वमेध राजसूय असली गोंडस नावं जरी वापरली, तरी त्यांचं अंतिम स्वरुप हे तू मांडलिक होऊन तुझं राज्य मला दे नाही तर मी लढाई करतो, हेच होते ना? ( मांडलिकत्व नाहीतर लढाई, हिसाब नाहीतर कसाब! Proud ) त्यामुळं ही यज्ञं मह्णजे लढायाच .

प्रश्न अन उत्तर तुम्हीच दिले. आहे. पण तुमचे उदाहरण चुकले आहे. ते पक्ष आहेत. त्यांचा जमीनीवर हक्क नाही. खाली वाचा ..

लोकशाही मध्ये गणात भांडण ही होणरच की. उदा आजच्या भारतातही महाराष्ट्र- कर्नाटक, कर्नाटक- तामिळनाडू असे भांडणं आहेतच की. फक्त ती सांसदिय पद्धतीने सोडविली जातात, तेंव्हाही सम्राटलोक सांसदिय पद्धतीने भांडणे सोडवितच की. तसेच काहीसे. प्रश्न हाताबाहेर गेल्यावर वा कोणी बळजबरीकेल्यावर युद्ध होत असे. ते काय आजही होते. व्हिएतनाम वि अमेरिका, इराक वि अमेरिका. (अफगाणचे उदा दिले नाही). आणि त्या काळी तसेही तलवार हे अनेक प्रश्नांचे उत्तर होते. मग कोणी युद्ध केले (आपसात) तर ते बाहेर देशाविरूद्ध युद्ध करत नसत असे नाही.

शिंदे अन होळकर आपसात युद्ध करत. पेशवे व भोसल्यांनी आपसात युद्ध केले पण ते सगळे " ग्रेट मराठा" मध्येच मोडतात.

असो आपणास गणसंघ पद्धती नव्हतीच हे मत ठेवता येईल पण त्यामुळे ते खरेच आहे असे मात्र नाही. Happy

"पण त्या काळात भारत हे एक राष्ट्र नव्हतेच.. सगळी छोटी मोठी राज्यं, संस्थानं, वतनं म्हणजे राष्ट्रच होते... शत्रूची ओळख ही शत्रू एवढीच असायची... मग वेळ पडली तर शेजारचा आपल्याच जाती धर्माचा राजा आपला शत्रू.. आणि त्याच्या विरोधात मदत करणारा तो "

~ श्री.जागोमोहनप्यारे यानी हा एक महत्वाचा मुद्दा या चर्चेदरम्यान मांडला आहे त्याची दखल घेणे गरजेचे आहे. जरी यावरील भाष्य 'पानिपत' गाभ्याशी फटकून असले तरी ते इतिहासाची वाटचाल याच्याशी निगडीत असल्याने अस्थानी होणार नाही याची खात्री आहे.

'भारत' हे आजच्या सीमाबद्धतेच्या व्याख्येनुसार त्या कालखंडात 'अखंड भूमी' नव्हती; पण सोन्याचा धूर निघणारा 'हिंदुस्थान' या नावाने ग्रीकांना, मोघलांना, अफगाणांना [नंतर इंग्रजांना] माहीत होता यात अमान्य करण्यासारखे काही नसावे. भारतीय इतिहासाचा पन्ना तीन कालखंडाच्या विस्ताराचा आहे असे ढोबळमानाने म्हटले जाते. तुम्हीआम्ही ज्याला 'प्राचीन भारत' म्हणतो तो द्रविडांपासून सुरू होऊन 'यादव' घराण्याचा शेवट इथे येऊन थांबतो. साधारणतः १३ व्या शतकापर्यंत तरी 'भारता'ची अशीच ओळख होती व सर्वत्र निश्चितच भरभराट होती जी परकीयांच्या नजरेतून लपून राहणे शक्यच नव्हती. याचा अर्थ असा बिलकुल नाही की तेराव्या शतकापर्यंत इथे फक्त हिंदूच राज्य करीत होते. अशोक आणि कनिष्क तर बौद्धधर्मीय होते वा झाले. दुसरीकडे अमोघवर्ष सारखा पराक्रमी राजा होऊन गेला जो जैन होता.

पण प्रजा प्रामुख्याने 'हिंदू' होती. तर दुसरीकडे या प्रजेचे "बाप" डझनभर असल्याने संपत्तीच्या लोभापाई अगदी अलेक्झांडरसारखा ग्रीक सम्राट चाल करून येऊ दे, अथवा हूण, अफगाणी फुटकळ टोळ्या येऊन इथल्या जनतेला लुटू दे, 'ती जबाबदारी माझी नाही' अशीच प्रतिक्रिया शेजारील राज्यातील राजाची असायची. ही नको इतकी अलिप्तता दाखविणे म्हणजे सुपातील दाण्याने जात्यातील दाण्याला हसण्यासारखे होते, हे पुढे इतिहासाने त्या सुपालाही भक्ष्य बनविल्यावर सिद्ध केलेच.

अशा छोट्यामोठ्या 'मानापमाना'च्या आणि 'मी त्या गावचाच नव्हे' प्रवृत्तीमुळे १३ व्या शतकानंतर स्वतःला 'हिंदू' समजणार्‍या त्या काळातील प्रजेला इतिहासच उरला नाही. कारण चौदाव्या शतकापासून तर मुस्लिमांनी इथे तंबू ठोकले ते काढले गेलेच नाहीत. मुस्लिम समाज 'पैगंबरा'ला प्रेषित समजतो, पण त्यांचा हा प्रेषित भारतात जन्माला आला नव्हता. तरीपण इथल्या पाण्याची चटक त्यावेळेच्या या परकियाला लागल्याने त्याच्यासाठी 'भारत' हीच 'अल्लाघरची देणगी' झाली. एरव्ही शांततेचा ढोल बडविणारा हा समाज महंमदाने इस्लामचा प्रसार व प्रचार मात्र तलवारीच्या जोरावर केला हेही मग सोयिस्कररित्या विसरतो, त्याला कारण ? परत तेच, आमच्या हिंदू राजांचे "माझ्या शेजारचे घर जळत्येय ना; मग मी कशाला तिकडे पखाल घेऊन जाऊ ?" ही आत्मकेन्द्रीत वृत्ती ना केवळ त्या राज्याला कायमची खड्ड्यात घालणारी ठरली नाही तर एकूणच 'हिंदू' वृत्ती भेंडीसारखी टिचकीत कोलमडणारी क्षुद्र वस्तू झाली.

वर केदार यानी योग्यच म्हटले आहे की, 'शिवाजी' हा राजा होता तर अकबर औरंगजेब हे खर्‍या अर्थाने सम्राट. त्यामुळे अगदी शिवाजीच्या भरभराटीच्या काळातही महाराष्ट्राच्या सीमा कर्नाटकालाही पार करून गेल्या नाहीत. मध्यप्रदेशातील काही घराणी आपण मराठा आहोत असे जरूर अभिमानाने म्हणत असतील पण जिथे नागपूरकर भोसले पुणे-सातारकराना मानत नव्हते तिथे इंदूर-ग्वाल्हेरचे होळकर-शिंदे पुण्यातील बल्लाळ बोकिलांना मानतील हे शक्यच नव्हते. असा हा केव्हाही उद्ध्वस्त होऊ शकणारा सारिपाटाचा सरंजाम. मग मुस्लिमांनी थेट १८५७ पर्यंत आमच्यावर राज्य केले नसते तर ते नवलच. त्याना बाजूला सारणारे कुणी हिंदू नव्हते तर ते होते इंग्रज, ज्यानी अगदी पुढील दीडशे वर्षे इथल्याच लोकांना पदरी ठेवून सुखनैव राज्य केले.

झालो १९४७ मध्ये आम्ही 'स्वतंत्र', पण म्हणून 'एक' झालो का हा गहन प्रश्न होता, आहे, आणि राहील, हे नि:संशय.

अशोक पाटील

झालो १९४७ मध्ये आम्ही 'स्वतंत्र', पण म्हणून 'एक' झालो का हा गहन प्रश्न होता, आहे, आणि राहील, हे नि:संशय

अगदी योग्य... हेच मला म्हणायचे होते.

स्वतंत्र', पण म्हणून 'एक' झालो का हा गहन प्रश्न होता, आहे, आणि राहील, हे नि:संशय
अगदी योग्य... हेच मला म्हणायचे होते. >>

पण ह्याचे उत्तर आपण आधीच ठरविले आहे ना एका स्लोगन मध्ये. " युनिटी इन डायव्हर्सिटी"

नाही केदार ~ 'युनिटी इन डायव्हर्सिटी' ही संकल्पना स्वप्न असून त्यामुळे ती "नॅशनल स्लोगन" असली तरी एक अपेक्षा आहे, वस्तुस्थिती नाही. ईप्सित आहे, जे अंमलात येईल याची आपण फक्त आशा करू शकतो. अठरापगड जातिधर्माची माणसे सुखनैव इथे नांदण्यासाठी ज्या 'युनिटी' ची इथे नितांत आवश्यकता आहे ती कशी येऊ नये याच्याच चिंतनात काही समाजविघातक घटक मग्न असतात. मग त्या हमखास यशस्वी ठरणार्‍या प्रयत्नात धर्माधर्मातील तेढ कमी होण्याऐवजी कशी वाढत जाईल हे पाहणे, दोन भिन्न धर्म कमी पडतील की काय म्हणून मग परत तोच तो एका धर्मातील हाऊसफुल्ल जाणारा ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद, शियासुन्नींच्या थपडा, खोट्या उच्चनीचतेच्या रोपट्यांना बेमालूमपणे झारीने पाणी ओतून ती रोपटी कशी फोफावतील हे पाहणे आदी कळतनकळत घडविले जाणारे संस्कार 'युनिटी' हे स्वप्नच राहील की काय असेच वातावरण निर्माण करीत आहेत.

त्यामुळे झाले आहे अशा घोषणांची व्युत्पत्ती ती केवळ परदेशस्थांना दाखविण्यासाठी की, आम्ही विविध भाषा बोलतोय, वेगवेगळ्या परंपरा जोपासत आहोत, धर्मनिरपेक्षततेच्या गोष्टी करतो आहोत, असे असूनही प्रथम आम्ही भारतीय आहोत, सबब जरी असेल आमच्यात कल्चरल डायव्हर्सिटी तरीही ती एक युनिटीच आहे. अगदी काव्यमय वाटते ही सरकारी घोषणा, पण त्या घोषणेला मूर्त स्वरूपात साकार करण्यासाठी जी धमक केन्द्रस्थानी विराजमान झालेल्या सरकारकडे हवी आहे तीच मुळात या डायव्हर्सिटीच्या कर्काने गिळंकृत केली आहे.

स्वप्न निश्चितच चांगले आहे, पण ते प्रत्यक्षात उतरणार असेल तरच ते पाहण्यात अर्थ.

अशोक पाटील

मुस्लिम समाज 'पैगंबरा'ला प्रेषित समजतो, पण त्यांचा हा प्रेषित भारतात जन्माला आला नव्हता

नसेना का.. जगात १५० देश आहेत प्रत्येक देशात प्रत्येक धर्माचा प्रेषित कसा असणार? आता मायबोलीवरचे हिंदुही न्यु, जर्शी, नॉर्वे.. कुठं कुठं जाऊन बस्लेत... त्या देशात कुठं आपल्या धर्माचे प्रेषित जन्माला आलेत? Happy

कारण चौदाव्या शतकापासून तर मुस्लिमांनी इथे तंबू ठोकले ते काढले गेलेच नाहीत.

२००० पूर्वीच्या झोपड्या सरकारनं अधिकृत ठरवल्या आहेत... ८०० वर्षापूर्वीचे तंबू आता कोण काढणार ? त्यामुळं तेही आता सरकारमान्यच आहेत. Proud

"जगात १५० देश आहेत प्रत्येक देशात प्रत्येक धर्माचा प्रेषित कसा असणार? "

~ अगदी मान्य. पण इथे जे 'परकीय' आले ते काही कामाधंद्यासाठी आले नव्हते तर त्यांच्यासमोर असलेला 'अजेंडा' एकच होता - लुटा आणि परत या. तेच तर ते करीत राहिले. पुढेपुढे तर वर सांगितल्यानुसार पाचपाचशे मैलाच्या परिघात येऊनही कुणी रामराव शामराव साध्या लगोरीतून खडाही मारत नाही हे पाहिल्यावर एवढ्या मोठ्या मेंढराच्या खांडावर राज्य करायला लांडग्यांनी जंगल सोडून आता गावातच आलो तर काही बिघडणार नाही असाच विचार केला.

बिघडले नाहीच हे इतिहास सांगतोच. राहता राहिली 'पैगंबराची" आराधना, ती मग मक्का मदिनेतच जाऊन केली पाहिजे असे खुद्द प्रेषित तरी कुठे सांगतो? त्याच्या नावाला मग सिंधूच्या अलिकडे आणले आणि दर शुक्रवारी त्याचे स्मरण केले की काम झाले. हिंदूचे जाजम त्यावेळीही ऐसपैस आणि "को-ऑपरेटिव्ह" होतेच.

आता तुम्ही म्हणता तसे मायबोलीकर हिंदू अंकल सॅमच्या गावात मुक्कामाला आहेत, पण त्यांच्यासमोर नोकरी आणि संसार हेच दोन विकल्प असल्याने साम्राज्यतृष्णा त्याना कधी लागणारच नाही. त्यामुळे त्यांची ना तिथल्या अ‍ॅबओरिजिनना भीती ना वसाहतवाद्यांना. त्याना तरी प्रेषिताचीही कशाला गरज भासेल ?

अशोक पाटील

Pages