पानिपत... एक सल...

Submitted by सेनापती... on 10 February, 2012 - 00:38

बुधवार, १४ जानेवारी १७६१. पौष शु. अष्टमी.

गोविंद्रग्रजांच्या शब्दात सांगायचे तर,

"कौरव पांडव संगर तांडव द्वापरकाली होय अती, तसे मराठे गिलचे साचे कलीत लढले पानिपती !!"

त्या भयंकर रणसंग्रामाला अडीचशेहून अधिक वर्षे होऊन गेली तरी पानिपतची जखम आजही मराठी मनावर कायम आहे. शिवछत्रपतींचा राज्याभिषेक आणि अटकेपार फडकवलेले भगवे झेंडे हा मराठी इतिहासाचा मानबिंदू असेल तर पानिपत हा एक सल आहे. तो कधीच पुसला जाणार नाही. आजही कुठल्याही गोष्टीत आपला पराजय झाला की त्याला पानिपतची उपमा दिली जाते तर विजयाला अटकेपार झेंडे रोवणे असेच म्हटले जाते ह्यातच सर्व काही आले. पण मुळात ही परिस्थिती त्याकाळी मराठ्यांवर का आली हे देखील जाणून घेणे गरजेचे ठरेल. संपूर्ण भारतभर आपल्या घोड्यांच्या टापांनी आणि तलवारीच्या जोरानी मराठी साम्राज्याचा विस्तार(?) करता करता असे काय घडले की मराठ्यांचे अध:पतन झाले? मुळातच हे अचानक झाले नाही.

ह्यासाठी पानिपत समजून घेताना त्याआधीच्या काही वर्षांचा इतिहास समजून घेणे क्रमप्राप्त आहे. मराठी किंवा हिंदू साम्राज्य स्थापण्यामागची शिवछत्रपतींची इतिकर्तव्यता नेमकी काय होती? त्यांना नेमका कुठला महाराष्ट्र धर्म अभिप्रेत होता? त्यांच्या पाश्च्यात त्यांच्या नीतीमूल्यांची किती जपणूक मराठ्यांच्या राज्यकर्त्यांना करता आली? खरेतर कितपत झेपली किंवा पेलली असेच म्हणावे लागेल. एका १६ वर्षाच्या पोट-मोकासेदाराने मुघल आणि आदिलशाहीविरुद्ध उभा केलेला हा महाराष्ट्र धर्म होता. त्यांची इतिकर्तव्यता हीच होती की मुसलमानी साम्राज्य उखडून फेकायचे. हा देश, ही भूमी पारतंत्र्यातून मुक्त करायची. फक्त महाराष्ट्र नाही तर सिंधू नदी ते कावेरी पावेतो... त्यासाठी त्यांनी अखंड श्रम सोसले. संपूर्ण दक्षिण भारत जवळ-जवळ ताब्यात आणला. आदिलशाही जवळ जवळ नामशेष झालेलीच होती. उरली सुरली कुतुबशाही मराठ्यांच्या जीवावर जगत होती. पण मग पुढे असे काय झाले की दिल्लीपतीला दख्खनेत दफन करणारे मराठे खुद्द दिल्ली राखू लागले? पेशवे काळात नेमके असे काय बदलले की पातशाही नामशेष करायची सोडून मराठे स्वतः: चक्क तिचे रक्षणकर्ते बनले?

सदर धाग्यावर पानीपत संदर्भातून मराठी साम्राज्यावर चर्चा अपेक्षित आहे. इथल्या अनेक जाणकारांकडून मला त्यांची मते जाणून घ्यायला आवडतील. मी देखील माझी मते वेळोवेळी मांडीन.. Happy

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अश्विनी के, सहमत आहे.

(परवानगी असल्यास यावर काही म्हणायचे आहे)

जातपातीचे मुद्दे काढणारे आय डी जसे असतात तसेच ते मुद्दे काउंटर करणारे आय डी सुद्धा असतात व काही वेळा अशा आय डींना अभ्यासू समजले जाते. संकेतस्थळाच्या (एखाद्या संकेतस्थळाच्या) पॉलिसीप्रमाणे मुळात जातपात अथवा धार्मिक भावना दुखावतील अशा पोस्ट्स असताच कामा नयेत, मग त्या कोणाच्याच.

येथे तर हा धागा 'पानिपतात आपली हार का झाली' असा आहे. यात हे विषय निघणार व काही प्रमाणात ते अपरिहार्य आहे. ज्यांचे लेखन आपण वाचनीय समजता त्यांचे लेखन एका विशिष्ट जातीला धिक्कारास्पद वाटत असते हे लक्षात घ्यायला हवे. इतिहास नाजूक विषय आहे याचे भान दोन्ही पक्षांनी ठेवायला हवे ना? Happy

-'बेफिकीर'!

मंदार तसे आपण करणे सोप्पे आहे पण हे एखाद्या नवीन माणसाला कसे सांगावे. माबोकर संख्येने कितीही जास्त असले आणि माबोचा चाहतावर्ग (ज्यात मीही आहे) कितीही मोठा असला, तरी तो पुरेसा नाही हे सर्वांना मान्य असले पाहिजे. आपल्यातल्या प्रत्येकाने तो कसा वाढेल याकडे लक्ष दिले पाहिजे आणि अशा पोस्टी विनाकारण negative publicity वाढवतात. कोणाही नवीन व्यक्तीला मी जर माबो रेफर केले आणि त्याने इथे येऊन जर या विषयावरील चर्चा पाहिली तर त्याचे माबोबद्दल काय मत बनेल!!!!
हे पहिल्यांदाच होत नाही......... धागाच बिनडोक असला तर इग्नोर करता येईल पण एक्-दोन बिन्डोक रिप्लायमुळे चांगले धागे सुद्धा बिघडतात त्याचे काय............

बेफिकीर,
ज्यांचे लेखन आपण वाचनीय समजता त्यांचे लेखन एका विशिष्ट जातीला धिक्कारास्पद वाटत असते हे लक्षात घ्यायला हवे>>
बकासुर इथे येण्याआधी चर्चा "पेशवे", "होळकर", "शिंदे", "अब्दाली" वगैरे विषयीच सुरु होती.
"ब्राम्हण", "धनगर", "मराठा" असा चर्चेचा सुर नव्हता अन दोषारोपणही त्या त्या व्यक्ती/राज्याविषयी होते, संपुर्ण जातीविषयी नाही. त्याला जातीय रंग देण्याचे कारणच नव्हते.
अजिबात उल्लेख न करुनही जर कुणाला असं वाटतंय की त्यांच्या जातीला मुद्दाम टारगेट केल्या जातंय, तर तो त्या व्यक्तीच्या आकलनशक्तीचा/कंडिशनिंग चा प्रश्न आहे. त्या त्या जातीला "वाईट वाटु नये" म्हणून इतिहासाबद्द्ल बोलुच नये असे काही नाही.

धागाच बिनडोक असला तर इग्नोर करता येईल पण एक्-दोन बिन्डोक रिप्लायमुळे चांगले धागे सुद्धा बिघडतात त्याचे काय.>>>

धागा बिघडणे ही टर्म सापेक्ष आहे असे मला वाटते. बकासूर यांनीही त्यांना असलेली माहितीच दिलेली आहे ना? ती त्यांनी सिद्ध केलेली नाही तरीही त्यांना असलेली माहिती देणे हे संकेतस्थळाच्या पॉलिसीत बसणारच ना? ज्यांनी स्वतःच्या माहितीसाठी आधार पुरवले त्यांची माहिती त्या आधारांवरच अवलंबून आहे ना की जे काही गटांना मुळातच मान्य नसतील? Happy

धागा जातपातीकडे भरकटला असे (मला तरी) वाटत नाही. ते या विषयानुसार अपरिहार्यच होते. अर्थात त्याबाबत जे धोरण असेल त्याप्रमाणे प्रशासक काय ते ठरवतीलच, पण जो तो आपले म्हणणे मांडणारच ना?

बकासुर इथे येण्याआधी चर्चा "पेशवे", "होळकर", "शिंदे", "अब्दाली" वगैरे विषयीच सुरु होती.
"ब्राम्हण", "धनगर", "मराठा" असा चर्चेचा सुर नव्हता अन दोषारोपणही त्या त्या व्यक्ती/राज्याविषयी होते, संपुर्ण जातीविषयी नाही. त्याला जातीय रंग देण्याचे कारणच नव्हते.>>>>>

नताशा,

चर्चेचा सूर पेशवे, होळकर, शिंदे, अब्दाली असाच असावा असा मूळ धागाकर्त्याचा कोणताही हेतू त्यांच्या लेखात दिसत नाही. चर्चेचा सूर ब्राह्मण, मराठा, धनगर इकडे वळू नये अशी अपेक्षाही दिसत नाही आणि मुळात तशी अपेक्षा असूही शकत नाही. मुक्त व्यासपीठावर ज्याला जे बोलायचे आहे ते (स्वीकारार्ह पद्धतीने) तो बोलणारच. जातीय रंग देणे हे आपल्याला व मला वाटू शकते पण एखाद्या विशिष्ट जातीला ते जातीय रंग देणे न वाटता वास्तव कथन करणे वाटू शकते.

(अवांतर - एका विशिष्ट जातीचे सभासद संख्येने जास्त असल्यामुळे दुसरी बाजू अजिबातच ऐकून न घेणे हे व्यक्तीशः पटत नाही. अर्थातच, सेनापती व केदार यांनी ती ऐकून तर घेतलीच आहे व संयत चर्चाही केली आहे, मात्र नंतरच्या प्रतिसादांचा सूर 'दिसला की उपटून टाक' स्वरुपाचा होत चालला आहे)

<<चर्चा करणार्‍यांच्या ज्ञानाची ऑथेंटिसिटी तपासायला मापक नाही>> असं कोण म्हणतं? आपल्याला भौतिक आणि इतर शास्त्रीय संशोधनाची ऑथेन्टिसिटी तपासणारी मापकं कळतात का? नाही कळत. कारण ती मापकं म्हणजे काय हे कळण्यासाठी सुद्धा पदव्युत्तर शिक्षणानंतर काही वर्षं प्रशिक्षण घ्यावं लागतं. ते आपल्या विषयाबाहेरच्या लोकांकडे नसतं म्हणून आपल्याला ते मापदंड माहीत नसतात. तसंच इतिहास, पुरातत्व व इतर सामाजिक शास्त्रांचही आहे. त्यांचा वर्ण्यविषय हा मनुष्यसमाज असतो जो आपल्या सगळ्यांना आकलन होणारा असतो आणि भौतिक शास्त्रांचा वर्ण्यविषय हा तांत्रिक असतो जो सहसा आपल्याला वाचून कळत नाही त्यामुळे सामाजिक शास्त्रांचा अभ्यास हा काही फारसा अवघड नसतो, कुणालाही ४ पुस्तकं वाचून करता येतो असा गैरसमज बर्‍याच वेळा आढळतो.

इतिहासात चार कागद वाचले आणि पुस्तकं खरडली अशी कार्यपद्धती असते असा समज कुणीही करून घेऊ नका. कुठल्याही ऐतिहासिक संशोधनात पुढील टप्पे असतातः
१. विषयाची/ प्रॉब्लेमची निवड (ही करण्यासाठीच आधी अनेक वर्षांचा अभ्यास असावा लागतो)
२. त्यावर उपलब्ध असलेल्या पुराव्यांचा शोध, संकलन (कागदपत्रं, बखरी, पुराभिलेख, नाणी, स्थापत्य, इ.)
३. या पुराव्यांची पडताळणी, सत्यासत्यता पहाणे, त्यांचे वर्गीकरण करणे
४. ऐतिहासिक कार्यपद्धतीचे सिद्धांत लावून विश्लेषण
५. इतर उपलब्ध ऐतिहासिक माहितीबरोबर तौलनिक अभ्यास
६. निष्कर्ष.

हे अत्यंत ढोबळ टप्पे आहेत. ही पूर्ण प्रक्रिया अत्यंत किचकट, गुंतागुंतीची व वेळखाऊ असते. एक अतिशय सामान्य व अपुरं उदाहरण घेऊयात. एक मराठाकालीन पत्र मिळालं

१. हे पत्र वाचण्यासाठी मुळात तत्कालीन भाषा व लिपी याचं यथार्थ ज्ञान पाहिजे. मोडी म्हटलं तरी त्यात प्रत्येक शतकात फरक पडत गेलाय. तत्कालीन शब्दांचे नेमके अर्थ काय काय होते. कुठल्या संदर्भात काय शब्द कधी वापरले जायचे हे मुळात माहित पाहिजे. म्हणजेच नवं पत्र वाचायच्या आधी शेकडो उपलब्ध कागदपत्र वाचायचा सराव पाहिजे.
२. आता हे पत्र खरं आहे का फोर्जरी आहे ते कळेल. शिवाय लिखाणातही अनेक वेळा चुका राहून गेलेल्या असतात त्या दृष्टोत्पत्तीस येऊ शकतात.
३. मग या पत्राचा विषय काय आहे त्यावरून त्यात काय माहिती असेल त्याची व त्याच्या छाननीची धाटणी ठरेल. वैयक्तिक पत्र आहे का अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव डॉक्युमेन्ट आहे का दानपत्र आहे (मग ते खाजगी आहे/ धार्मिक आहे, इ. इ.)
४. मग कुठल्या हेतूने हे पत्र लिहिलं असेल त्यावर त्यातील माहितीची सत्यासत्यता किती असेल ते बर्‍यापैकी कळतं. जसं इतिहास बरेच वेळा जेत्यांच्या बाजूने लिहिलेला असतो तेव्हा अशी कागदपत्रं वाचताना त्यात किती 'सत्यापलाप' असू शकतो याची शक्यता गृहित धरली जाते. तसंच आत्तापर्यंत उपलब्ध असलेल्या माहितीशी ती पडताळून पाहिली जाते.
५. या सगळ्यातून मग काही नवी माहिती हाती लागत आहे का हे पहायचं. बहुतेक वेळा माहितीचे छोटे कणच मिळतात. महान शोध वगैरे क्वचित लागतात. अशी शेकडो हजारो पत्रं अभ्यासली की मग एक दोन पानं लिहिता येतील अशी माहिती हाती लागते. असं संशोधन याच क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तीसमूहासमोर लेखी सादर केलं जातं आणि जेव्हा अनेक प्रशिक्षित इतिहासकार तुमची कार्यपद्धती स्वीकारून तुमचं मत मान्य करतात तेव्हाच त्याला ऐतिहासिक माहितीचा/ स्रोताचा दर्जा मिळतो आणि पुढच्या पिढ्यांसाठी अभ्यासाचा पक्का संदर्भ बनतो.

या विश्लेषणासाठी फक्त भाषा, लिपी, उपलब्ध माहिती व कागदपत्रांचं ज्ञान असून चालत नाही तर इतिहासाचं तत्वज्ञान, सैद्धांतिक प्रणाली आणि विविध कार्यपद्धतींचे तर्कशास्त्र यांचा निदान काही वर्षं अभ्यास लागतो.

हे फक्त एका अत्यंत 'मायनर' पुराव्याच्या अभ्यासाचे अगदी ढोबळ वर्णन आहे. इतर तपशील कळण्यासाठी सुद्धा काही प्रशिक्षण घेणं आवश्यक असतं

तेव्हा बेफिकीर इतिहासावर चर्चा जरूर करा किंवा करू नका, पण उगाच त्याच्या सत्यासत्यतेचे मापदंड नसतात, पुस्तकं वाचून इतिहास लिहितात वगैरे विधानं करू नयेत. आपल्याला माहित नसलं म्हणजे ते अस्तित्वातच कशावरून वगैरे प्रश्न करणं फार धार्ष्ट्याचं वाटतं!!
(कुणीही तुम्हाला इथे याच असं म्हणलेलं नाही आणि तुम्हाला इतिहासात रस नसेल, तो निरुपयोगी वाटत असेल तर यात पडूच नका ना. वैयक्तिक टीका करायचा उद्देश नाही पण मला स्वतःला गझलमधलं कळत नाही म्हणून तुमच्या लेखांवर, गझलांवर जाऊन हे निरर्थक आहे, याचा काय उपयोग? कवितेचं रसग्रहण कुठल्या मापकांनी करणार? असे फुकट प्रश्न मी विचारणं जसं योग्य होणार नाही तसंच इथेही लागू पडतं हे लक्षात घ्या!)

इति लेखनसीमा.

बेफिकीर,
"दुसरी बाजु अजिबातच ऐकुन न घेणे" याचे कारण हे नाही की ती बाजू विरोधी आहे. कारण हे आहे की, बकासुर ठाम विधाने (ती ही चिथावणीखोर भाषा वापरुन) करताहेत पण त्याला आधार्/पुरावे/संदर्भ द्यायला तयार नाहीत.
मुद्दा समजला असेल अशी अपेक्षा करते.
माझ्याकडून या चर्चेला पुर्णविराम.

इति लेखनसीमा.>>>

माफ करा, आपला प्रतिसाद पहिले दोन उतारे सोडल्यास मी वाचलेला नाही. कारणे:

१. तो प्रतिसाद इतिहास कसा अभ्यासला जातो व तो कसा ठोक पुराव्यांनिशी असू शकतो याबाबतची माहिती अधिक आहे असे वाटत आहे, ज्यावर आधीच म्हणालो आहे की इतिहासाचाही फायदा आहेच, पण अशा धाग्यांमुळे मिळणार्‍या माहितीचा आजच्या जीवनात फायदा होत नाही.

२. आपले हे विधानः

<<<<भौतिक आणि इतर शास्त्रीय संशोधनाची ऑथेन्टिसिटी तपासणारी मापकं कळतात का? नाही कळत. कारण ती मापकं म्हणजे काय हे कळण्यासाठी सुद्धा पदव्युत्तर शिक्षणानंतर काही वर्षं प्रशिक्षण घ्यावं लागतं.>>>>

पदव्या आणि कॉलेजेस नव्हती तेव्हा खगोल शास्त्रज्ञ गणिताद्वारे आपले संशोधन सिद्ध करून जाहीर करायचे. भास्कराचार्य हे सर्वात पहिले उदाहरण. अशी अनेक उदाहरणे आहेत. साधेच मांडतो. पृथ्वीभोवती सर्व अवकाश फिरते हा समज खोटा ठरवणार्‍याला हाल सहन करावे लागले, पण त्याने तो समज कोणत्याही साधनाविना, पदवीविना, महाविद्यालयाविना सिद्ध केला व तो सिद्ध करण्याची पद्धत व प्रत्यक्ष पुरावा प्रत्येक माणसाला पटला. हे त्याचे मापक झाले. तेव्हा केवळ पदव्या, पदव्युत्तर शिक्षण व प्रशिक्षणामुळेच संशोधन करता येते हा समज निखालस खोटा आहे.

अवांतर प्रतिसादाबद्दल क्षमस्व

-'बेफिकीर'!

अरे??? हे वाचलंच नव्हतं

=======================

<<<<तेव्हा बेफिकीर इतिहासावर चर्चा जरूर करा किंवा करू नका, पण उगाच त्याच्या सत्यासत्यतेचे मापदंड नसतात, पुस्तकं वाचून इतिहास लिहितात वगैरे विधानं करू नयेत. आपल्याला माहित नसलं म्हणजे ते अस्तित्वातच कशावरून वगैरे प्रश्न करणं फार धार्ष्ट्याचं वाटतं!!
(कुणीही तुम्हाला इथे याच असं म्हणलेलं नाही आणि तुम्हाला इतिहासात रस नसेल, तो निरुपयोगी वाटत असेल तर यात पडूच नका ना. वैयक्तिक टीका करायचा उद्देश नाही पण मला स्वतःला गझलमधलं कळत नाही म्हणून तुमच्या लेखांवर, गझलांवर जाऊन हे निरर्थक आहे, याचा काय उपयोग? कवितेचं रसग्रहण कुठल्या मापकांनी करणार? असे फुकट प्रश्न मी विचारणं जसं योग्य होणार नाही तसंच इथेही लागू पडतं हे लक्षात घ्या!)>>>>

========================

आपण माझे प्रतिसाद नीट न वाचता आपला इतिहास व इतिहास संशोधनाचा अभ्यास नोंदवता यावा या हेतूने व कदाचित पूर्वग्रहाने (ज्याबाबत मला खात्री नाही) हे सर्व लिहिलेले दिसते. मी उत्खनन, डिकोडिंग या सर्वांचे उल्लेख केलेल असून केवळ पुस्तके वाचून इतिहास ठरतो असे म्हंटलेले नाही. मला माहीत नाही ते अस्तित्वात नाही असे जर माझे मत असते (जे मुळीच नाही आहे व ते तसे आहे असे दर्शवून आपण आणखी हास्यास्पद ओळी लिहिलेल्या आहेत) तर नील आर्मस्ट्राँगप्रमाणे मी स्वतः चंद्रावर जात नाही तोवर मला चंद्र ही एक काव्यवस्तूच वाटली असती.

मला इथे कुणी या म्हणणे अथवा येऊ नका म्हणणे असे प्रशासकांशिवाय कोणाला शक्य नसावे. तेव्हा त्यावर आपण उगीचच लिहिलेत. मी इतिहास निरुपयोगी म्हणालेलो नाही. मी आज पानिपतात मराठे का हारले यावरून मारामार्‍या होणार असतील तर असे धागे कशाला हवेत म्हणालो आहे.

तुम्हाला गझलमधलं कळत नाही हे खरंच बरं झालं असे नोंदवून थांबतो.

-'बेफिकीर'!

<<पदव्या आणि कॉलेजेस नव्हती तेव्हा खगोल शास्त्रज्ञ गणिताद्वारे आपले संशोधन सिद्ध करून जाहीर करायचे. भास्कराचार्य हे सर्वात पहिले उदाहरण. अशी अनेक उदाहरणे आहेत. साधेच मांडतो. पृथ्वीभोवती सर्व अवकाश फिरते हा समज खोटा ठरवणार्‍याला हाल सहन करावे लागले, पण त्याने तो समज कोणत्याही साधनाविना, पदवीविना, महाविद्यालयाविना सिद्ध केला व तो सिद्ध करण्याची पद्धत व प्रत्यक्ष पुरावा प्रत्येक माणसाला पटला>>
भास्कराचार्यांनी लिहिलेला ग्रंथ किती लोकांपर्यंत गेला? आणि तो सिद्ध करण्याची पद्धत आणि पुरावा प्रत्येकाला पटला हे कशावरून??

मुळातच प्राचीन काळात आणि रनेसां (Renaissance) नंतरच्या काळात सर्व जगाच्या ज्ञान आणि विज्ञान संकल्पना मूलभूत रूपात बदलल्या आहेत. तेव्हा आजच्यासारख्या पदव्या व कॉलेजेस नव्हती अशी बिनबुडाची विधानं करण्यात अर्थ नाही.

हेमाशेपो.

मगाशी मी येऊन गेलो त्यानंतर पुलाखालून बरेच पाणी गेलेले दिसतंय... असो..

बेफिकीर...
चर्चेचा सूर पेशवे, होळकर, शिंदे, अब्दाली असाच असावा असा मूळ धागाकर्त्याचा कोणताही हेतू त्यांच्या लेखात दिसत नाही. चर्चेचा सूर ब्राह्मण, मराठा, धनगर इकडे वळू नये अशी अपेक्षाही दिसत नाही
>>> हे आपण कशावरून ठरवले हे मला कळेल का? ह्या विधानामुळे मला खरच वाईट वाटले.
असो... बकासुर यांनी संदर्भ द्यावेत ही विनंती मी त्यांना केलेली आहेच.

वरदा.... सुंदर पोस्ट. अगदी ठरवूनही असे लिहिता आले नसते.. Happy

भास्कराचार्यांनी लिहिलेला ग्रंथ किती लोकांपर्यंत गेला? आणि तो सिद्ध करण्याची पद्धत आणि पुरावा प्रत्येकाला पटला हे कशावरून??

मुळातच प्राचीन काळात आणि रनेसां (Renaissance) नंतरच्या काळात सर्व जगाच्या ज्ञान आणि विज्ञान संकल्पना मूलभूत रूपात बदलल्या आहेत. तेव्हा आजच्यासारख्या पदव्या व कॉलेजेस नव्हती अशा बिनबुडाच्या विधानं करण्यात अर्थ नाही.>>>>>

आपण तुटपुंज्या माहितीआधारे विधाने करत आहात. हा घ्या संदर्भः (पुस्तक किमयागार)

इसवीसन १६५८ मध्ये पिअरे नावाच्या फ्रेंच गणितज्ञाने बर्नार्ड नावाच्या त्याच्या मित्राला एक प्रश्न पाठवला होता.

६१ क्ष वर्ग + १ = य वर्ग

हे गणित कसे सोडवायचे असा तो प्रश्न होता. हा प्रश्न नंतर बरीच दशके कोणाला सोडवता आला नाही.

१७३२ मध्ये यूलर नावाच्या गणितज्ञाने तो सोडवला व त्याचे खूप कौतुक झाले. नंतर लोकांना समजले की भास्कराचार्यांनी तो प्रश्न इसवीसन ११५० मध्ये सोडवला होता व त्यांच्यामते य १७६६३११९९ तर क्ष २२६१५३९८० अशा व्हॅल्यूज येत होत्या. हे गणित सोडवण्यासाठी त्यांनी चक्रावला ही पद्धत वापरली होती. ही पद्धती त्यांनी आपल्या सिद्धांत शिरोमणी या ग्रंथात समजावून सांगितली होती. अल्पवयात विधवा झालेल्या आपल्या लीलावती या मुलीसाठी त्यांनी लीलावती याच नावाचे एक गणिताचे पुस्तकही पसिद्ध केले. ते इतके लोकप्रिय ठरले की लोक मजेने म्हणू लागले की या पुस्तकाच्या सहाय्याने कोणत्याही झाडावर पाने किती हेही सांगता येईल.

आता मला तुम्ही भास्कराचार्यांची पदवी, पदव्युत्तर पदवी व महाविद्यालयाचे नांव कृपया सांगा

-'बेफिकीर'!

पुढे:

खगोलशास्त्रातही गणिताचा वापर भास्कराचार्यंनी केला. गणिताध्याय व गोलाध्याय हे त्यांचे ग्रंथ खूपच ग्रेट होते. कॅल्क्यूलस ही गणिताची शाखा मांडण्याच्या ते खूप जवळ पोचले होते हे सिद्ध होते.

( अतीअवांतरः त्या क्ष आणि य नं ते गणित सुटत नाही.. काहीतरी चुक्लय.. गणित तरी नाहीतर ते क्ष य तरी. )

बेफिकीर वरच्या तुमच्याच उदातून काय सिद्ध होते आहे?
१. कोणीतरी भास्कराचार्य होता -- इतिहास
२. त्याने दोन तीन ग्रंथ लिहिले - इतिहास
३. त्याचे ग्रंथ आजही त्याच्या नावेच मिळतात - इतिहास जतन

आय होप तुमचा मुळ मुद्दा तुम्हाला क्लिअर झाला असावा. किंवा तुम्हाला नेमके कश्याबद्दल काय म्हणायचे आहे ते आम्हाला कळत नाही. (त्याची शक्यता जास्त असेल, कारण मुद्यांची सरमिसळ दिसते आहे)

अमेरिकेचा इतिहास अत्यंत खराब होता. पण आज २०१२ मध्ये तोच खराब इतिहास शिकवला जातो व त्याचे गोर्‍यांना, काळ्यांना व रेड इंडियन्सना काही वाटत नाही. " हे असे होते" हे त्यांनी मान्य केले, हे असेच राहायला नको हे ते शिकले, त्यामुळे गोर्‍यांनी काळ्यंवर अत्याचार केले असे लिहिले तर ना गोर्‍याला काही वाटते ना काळ्यांना, आज त्यावरून भांडणे होत नाहीत. आपल्याकडे मात्र प्रत्येक गोष्टीत जातीयरंग दिला जातो.

ही चर्चा आता खर्‍या अर्थाने निरर्थक वगैरे झाली आहे असे आता मला वाटत आहे.

तसे मला हे नवीन नाही पण आता काय बोलू असेच झाले आहे..

मगाशी म्हणालो खरे की पुढे देखील लिहेन पण त्यातील प्रत्येक मुद्द्यात जातीविषयक उल्लेख उकरून काढून जर प्रतिक्रिया पडणार असतील तर लिहून फायदा नाही असे वाटते...

बकासुरानी असं काय फार मोठं जातीयवदी विधान केलं आहे? एक लख सैनिक आणि दोन लाख यात्रेकरु असं असल्याने युद्ध फसले. हाच तर त्यांचा मुख्य मुद्दा आहे ना? तो तर सगळ्या पुस्तकात तसाच आहे.

यातलं ज्ञान शष्प.. ऐकून, वाचून थोडंसंच ! मत काय देणार ?

कुठेतरी भारतिय दंड विधानाचा बाफ निघाला म्हणून डोकावून पाहीलं ..इथं दंगल माजलीये का ते. सगळं शांततेत चालू आहेसं दिसतंय. सहभागी कलाकार तगडे ( पक्षी निर्ढावलेले ) दिसतात. अशा धाग्यांवर काय मतं येतात हे सर्व कोळून प्यालेले असावेत. चालू द्या !

ह्या पुढेही पानिपतावर असे अनेक धागे निघतील आणि अश्याच अर्थ-निरर्थक चर्चा घडत राहतील पण आजही तुम्ही हरियाणात गेलात आणि एखाद्या जोग्याला भेटलात तर तो तुम्हाला भाऊचा पोवाडा ऐकून दाखवेल... कोण्या अब्दाली किंवा नजीबचा नाही..

तो पुण्याचा वीर 'मराठा' होता अशी त्याची कीर्ती तिथे पसरली होती/आहे. पराभूत होऊनही तोच या युद्धातला वीर ठरला. त्याच्या हातून अनेक चुका काल-स्थळपरत्वे झाल्या असतील. त्या-त्या वेळी परिस्थितीशी अनुरूप निर्णय त्याला घ्यावे लागले असतील पण म्हणून तो कोणी चुकार ठरत नाही. आपल्या चुकांचे प्रायश्चित्त म्हणून त्याने आपले सर्व काही पणाला लावले. ह्याबाबत दुमत असायचे काहीच कारण नाही...

हलकारा कुंवर विश्वासराके आये भाऊ पास|
बेटा नानाराव का मरगया विश्वास|
सुनकर भाऊ पेशवा ले उभे सास|
अब मेरा दखन आवनजानका छूटा भैवास|
नाना पुचे पेशवा कहां है विश्वास|
क्या मुह लेकर जाऊंगा नाना के पास||

अजूनही ह्या धाग्यावर विश्वासराव, समशेर किंवां सुजाउदोल्ला यांच्याबद्दल काहीच लिहिले गेलेले नाहीये.. जमल्यास ते पण लिहेन.. Happy

सहभागी कलाकार तगडे ( पक्षी निर्ढावलेले ) दिसतात. >>

मी प्रथमपुरषी लावून घेत नाही पण हया चर्चेत सहभागी असल्यामुळे मी ही निर्ढावलेला वगैरे असे म्हणन्याचा आपणास खरचं अधिकार नाही. आपण गैरसमज करू नये पण प्रतिक्रिया असहिष्णू आहे. वाटल्यास ज्याला निर्ढावलेला म्हणायचे आहे त्यांचे नाव घेऊन लिहा पण सरसकट कशाला तोलता?

केदार

व्यवस्थित आहे ना सगळं ?
निर्ढावलेले या शब्दाचा काय अर्थ काढला महाराजा ? आणि या पोस्टच्या संदर्भात काय निघू शकतो असं वाटतंय ? खून बिन केलाय असं तर नाही ना म्हटलं..

तगडे याचा अर्थ कळतो आणि निर्ढावलेले म्हटलं कि दुखावताय ? अहो विनोदनिर्मितीत इतकी किमान रिस्क तर घावीच लागते. ज्याला नाही समजला त्याला सोडूनच द्यायला हवे.. याउप्पर आपली मर्जी ! आणि तरी असहिष्णु वगैरे दुसरेच...

पोस्ट नीट वाचा.. समजून घ्या. संदर्भ पहा. तीन ओळीत दुखावला जाताय.. तुमचं माझं गणित काही जमत नाही, जमणार नाही तेव्हा इथून पुढे सर्वच धाग्यांवर माझ्या पोस्टस तुमच्यासाठी नाहीत असं धरून चला.

मला प्रत्येक वेळी येऊन तुमच्या गैरसमजांचं निराकरण करणं शक्य नाही, तितका वेळ नाही आणि रस तर नाहीच नाही. नाहीतर सहभाग नसता का घेतला इथ ? कामं आहेत बरीच पोटापाण्याची.. तेव्हा माफच करा.

अहो किरण्यके ते पोस्ट मी प्रथमपुरूषी घेतले नाही पण एकुण रूप तसेच आहे.

अहो विनोदनिर्मितीत इतकी किमान रिस्क तर घावीच लागते. ज्याला नाही समजला त्याला सोडूनच द्यायला हवे.. याउप्पर आपली मर्जी >>> हे वाक्य विनोदनिर्मितीसाठी तुम्ही वापरले ? मला आपला विनोद नाही कळाला.

निर्ढावलेले या शब्दाचा काय अर्थ काढला महाराजा >>> जो तुम्हाला अभिप्रेत आहेत तोच काढला आहे किरण्यके.

इथून पुढे सर्वच धाग्यांवर माझ्या पोस्टस तुमच्यासाठी नाहीत असं धरून चला >> अहो तुम्ही जनरल लिहिता आहात तर दुर्लक्ष कशी करता येईल. परत तुम्ही इतर बाफचे गणित खरचं इथे आणू नका. माझ्यासाठी प्रत्येक बाफ वेगळा. तुम्ही ती गणित इथे सोडवू नकाच प्लिजच.

अग्ग्ग्गंगंगं... विकिपेडियावर मराठ्यांची फौज ७०००० होती आणि इतर यात्रेकरु मंडळी तीन लाख होती असे दिले आहे...

७० हजार आकडा बरोबर धरला तरी खुद्द १४ जानेवारी पर्यंत मराठ्यांचे १० हजार सैन्य कामी आलेले होते. खुद्द लढाईच्या दिवशी मराठ्यांचे सैन्य ६० हजारच्या वर नसावे असे अनुमान करता येते.

वरदा, केदार, सेनापती..
विषयाशी संबंधित नसलेल्या पोस्ट ओलांडा आणि पुढे चला प्लीज..
यु मस्ट अव्हॉइड यु नो हु Happy

नताशा | 14 February, 2012 - 01:14 नवीन
0
Vote up!
वरदा, केदार, सेनापती..
विषयाशी संबंधित नसलेल्या पोस्ट ओलांडा आणि पुढे चला प्लीज..
यु मस्ट अव्हॉइड यु नो हु >>>

व्वा, अहो विषयाशी संबंधित नसलेल्या पोस्ट सुरूच वरदांनी केल्या आहेत, त्यांना काय सांगताय

<<<<आय होप तुमचा मुळ मुद्दा तुम्हाला क्लिअर झाला असावा. किंवा तुम्हाला नेमके कश्याबद्दल काय म्हणायचे आहे ते आम्हाला कळत नाही. (त्याची शक्यता जास्त असेल, कारण मुद्यांची सरमिसळ दिसते आहे)
>>>>>>

बेधडक विधाने करू नका केदार, मी पहिल्यापासून हेच म्हणत आहे की पानीपताचे विषय आज काढून केवळ वाद होत आहेत व कोणाचीच माहिती अचूक असल्याचे कोणीच छातीठोकपणे सांगू शकत नसताना हे वाद कशाला? आपण माझ्या ज्या उतार्‍यांबाबत'यातून काय सिद्ध झाले, मुळ मुद्दा क्लीअर झाला का, मुद्यांची सरमिसळ आहे' वगैरे म्हणत आहात ते सर्व उतारे वरदा यांच्या पोस्ट्सना दिलेली उत्तरे असून ती आपण आपल्या स्वतःच्या प्रतिसादांशी अलाईन करण्याचा उगाचच प्रयत्न करत आहात.

-'बेफिकीर'!

अजूनही ह्या धाग्यावर विश्वासराव, समशेर किंवां सुजाउदोल्ला यांच्याबद्दल काहीच लिहिले गेलेले नाहीये.. जमल्यास ते पण लिहेन >>>>>>>>>> वाचायला नक्कीच आवडेल.

ज्या बकासुरावरुन इतके दुसरे पानिपत सुरु झाले तो आहे कुठे..............

की हा सुध्दा डु आय आहे ? मुद्दामुन निर्माण केलेला ?

वरदा, केदार, सेनापती..
विषयाशी संबंधित नसलेल्या पोस्ट ओलांडा आणि पुढे चला प्लीज..>> सहमत

यु मस्ट अव्हॉइड यु नो हु >>> म्हणजे काय? ही भाषा भांडणाला सुर लावणारी नाही काय?

आपल्याला सर्वांनाच पुढच्याचर्चेत रस आहे, त्यामुळे किमान परत वाद सुरु होईल अशी भाषा न वापराल तर बरच होईल.
सेनापती, पानिपत बद्दल अजुन माहिती वाचायला आवडेल. प्लिज धागा मुळ मार्गाने चालुच ठेवा.

बाप रे ३ दिवस वाचले नाही... बरीच उलथापालथ झाली आहे. उगाचच एका चांगल्या धाग्याला द्रुष्ट लागते आहे.

मुळात इतिहासाची चर्चा अशीच असणार. एकाला मुद्दे पटणार एकाला नाही. त्यात जातींचा काय संबंध?

बेफि....

बेधडक विधाने करू नका केदार, मी पहिल्यापासून हेच म्हणत आहे की पानीपताचे विषय आज काढून केवळ वाद होत आहेत व कोणाचीच माहिती अचूक असल्याचे कोणीच छातीठोकपणे सांगू शकत नसताना हे वाद कशाला?

वाद होणारच. कारण हा जिव्हाळ्याचा विषय आहे. अख्ख्या मराठे शाहीचा इतिहास ज्या घटने मुळे बदलला, ती घटना साधीसुधी नाहीच. ह्या वादांतुनच आपल्याला नवे नवे मुद्दे मिळतात. फक्त ह्याला जातिय स्वरुप नसावे. पुर्वी वादविवाद स्पर्धा होत असत. वसंत व्याख्यान माला वगैरे. त्यातुनच देशाला खुप चांगली कर्तुत्ववान नेत्रुत्व मिळाली. उदा: टिळक, सावरकर, गोखले, विवेकानंद इ.इ... वाद हे हवेतच त्याशीवाय आपलं मत तावुन सुलाखुन कसे काय बघता येणार? फक्त त्यात वैयक्तिक मत नसावे. विषयाला धरुन असावे.

इतिहास कशासाठी? नक्की काय झाले ते समजण्या साठी, कुठे चुकले, कुठे बरोबर हे कळण्या साठी.

त्याचा काय उपयोग? आत्मसंमाना साठी. रुटस मजबुत करण्यासाठी. त्या वेळचे राजकारण कसे होते, त्या काळात लोकांची मानसिकता कशी होती हे पहाण्यासाठी. इतिहासा वरुन आपण काहीच नसतो शिकलो, तर आजही माझ्या सारख्या बायका स्वयंपाकघरात खितपत पडल्या असत्या. १० व्या वर्षी लग्ने झाली असती. चीन मध्ये अजुनही बायकाचे पाय ३र्‍या वर्षी बांधले गेले असते. इतिहास हा आपल्या पासुन लांब नसतो. तो आपल्यातच असतो. आपल्या आजोबां बद्दल आपण आपल्या मुलांना सांगतो. त्यांचं कर्तुत्व आपण पुढल्या पीढी पर्यंत नेतो. म्हणजेच आपण आपल्या नकळत पणे इतिहासाची पाने लिहित असतो.

मी वर म्हंटल्या प्रमाणे, पानीपता वर हरवलेल्यांपैकी माझ्या नवर्‍याच कुटुंब आहे. त्या एका घटने मुळे आमच्या घराण्याच्या इतिहासात प्रचंड उलथापालथ झाली. मग इतिहास माझ्या पासुन वेगळा कसा! त्याचा उपयोग काय, हा प्रश्ण मनात येतच नाही.
ह्या विषयाची चर्चा जर भांडणात रुपांतरीत होणार असेल तर मी असे म्हणेन की मायबोली वर भांडण जास्त आणि चर्चा कमी होते. ह्या चर्चे चा काय उपयोग? तसा तर कशाचाच काहीच उपयोग नसतो. मायबोली वर लिहिल काय आणि नाही लिहिल काय. त्याचा काय उपयोग?
प्रत्येक गोष्टीला उपयोग हा असतोच. आपल्याला वाटत नसेल तर तिकडे फिरकु नये. मला पाकक्रुती आवडतात, मी रोज पाहिन. पण मला कविता कळत नाहीत, मी फिरकत नाही. मला कथा-कादंबरी फार आवडतात, मी रोज फेरफटका मारते. मला इतर इतिहासाबद्दल फारसे संदर्भ माहित नाहीत. वाचायला आवडते, पण प्रतिक्रिया देत नाही. इकडचा विषय माझ्या उत्सुकतेचा होता, डोकावले.
हा बाफ असाच चालु रहाणार असेल तर आपोआप लोक येणं थांबवतिल.

सेनापती....
सेनापती सारखे वागा पाहु. चला सुत्रे हातात घ्या.

अजूनही ह्या धाग्यावर विश्वासराव, समशेर किंवां सुजाउदोल्ला यांच्याबद्दल काहीच लिहिले गेलेले नाहीये.. जमल्यास ते पण लिहेन >>>>>
लौकर लिहा.... वाचायला उत्सुक्.......मुख्यत्वे विश्वासरावा बद्दल. समशेर बाद्दल मलाही थोडेसे माहित आहे. ते टाकेनच...

लगे रहो सेनाभाय......

सेनापती,केदार.. खरेच चांगली चर्च्या आणी उत्तम वाचनीय पोस्ट.. Happy
पण जेंव्हा तुम्ही मराठ्यांच्या ईतीहासावर च्यर्च्या करता तेंव्हा ब्राम्हण, त्यांच्या ऐतीहासीक आणी अक्षम्य चुका त्यानी पुर्वी केलेले अन्याय या गोष्टी येणारच तेंव्हा या गोष्टीना तोंड देउन च्यर्च्या पुढे चालु ठेवा.. प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा प्रत्येकाचा दॄष्टीकोन वेगळाच असणार.. Happy

मोहन की मीरा, मी_चिऊ, aabasaheb...

मी शक्य तितके लिखाण करणार आहे ह्या धाग्यावार.. Happy आज थोडा कामात आहे. त्यामुळे रात्री उशिराने काही लिहायचा प्रयत्न करतो.. Happy

मराठ्यांच्या ईतीहासावर च्यर्च्या करता तेंव्हा ब्राम्हण, त्यांच्या ऐतीहासीक आणी अक्षम्य चुका त्यानी पुर्वी केलेले अन्याय.

>>>>>यात ब्राह्मण हा शब्द यायची गरज आहे असे मला वाटत नाही. दृष्टीकोन वेगळे असणार हे मान्य पण त्यासाठी जातीचा आधार घ्यायची गरज नसते. चुकाच काढायच्या तर सर्वांच्या काढा.. आणि त्या निघातीलाही इथे... मी देखील लिहिणार आहे. पेशव्यांचे कुठे चुकले, शिंदे-होळकर कुठे चुकले... एकंदरीत काय चुकले ते अनेकांनी वर लिहिलेले आहेच... Happy

जेव्हा तुम्ही स्वातंत्र्यापुर्वीचे विषय चर्चेला आणतात तेव्हा जातिविषयक चर्चा होणारच... किंबहुना त्या काळात जातीनुसारच वागले जायचे...... इथे ही जातीला आनले तरी काहीच वागवे नाही परंतु सतत आणि मुद्दामुन उपहासात्मक लिहु नये... जाती चा दाखला देताना थोडे भान नक्कीच राखले जावे....

(अवांतर - एका विशिष्ट जातीचे सभासद संख्येने जास्त असल्यामुळे दुसरी बाजू अजिबातच ऐकून न घेणे हे व्यक्तीशः पटत नाही. >> हे जुन्या मायबोलीवर व्हायचे,आता मात्र हे प्रमाण फार कमी झालय.कारण नेटवर सर्व जातींचीच संख्या लक्षणीय वाढली आहे.त्यामुळे सगळ्याच जातींना स्वतःला व्यवस्थित represent करणारे पुरेसे सदस्य आहेत.

अर्थातच, सेनापती व केदार यांनी ती ऐकून तर घेतलीच आहे व संयत चर्चाही केली आहे, >> खुप धन्यवाद ह्याचा उल्लेख केल्याबद्दल

मात्र नंतरच्या प्रतिसादांचा सूर 'दिसला की उपटून टाक' स्वरुपाचा होत चालला आहे)>>असे होत नाही कारण समोरची माणसे पण वाद घालण्यात तगडी आहेत.

अवांतर माझे मत> मायबोली हे समाजाचे perfect mini model आहे,असे ग्रुहीत धरले तर लक्षात येइल जुनी मायबोलीवर नेटला अक्सेस असणारे बहुजन समाजाचे लोक कमी होते. सगळ्याच जातीत वाढते शिक्षण,इंटरनेटचे कमी झालेले दर,अगदी तालुक्यातल्या सरकारी कार्यालयातसुध्दा कामकाजात झालेले संगणीकीकरण यामुळे वेगवेगळ्या समाजाचे लोक आपले बरोबर किंवा चुक समज घेउन इथे येणार आणि व्यक्त होणार.ह्या processमधे सगळ्यांनीच आत्मपरीक्षण करण्याची गरज असते.this is transition phase for all of us including Brahmins ,फक्त ह्या स्थित्यंतरानंतर चांगले काही तरी निर्माण व्हावे हीच सदिच्छा.

>>> पण जेंव्हा तुम्ही मराठ्यांच्या ईतीहासावर च्यर्च्या करता तेंव्हा ब्राम्हण, त्यांच्या ऐतीहासीक आणी अक्षम्य चुका त्यानी पुर्वी केलेले अन्याय या गोष्टी येणारच तेंव्हा या गोष्टीना तोंड देउन च्यर्च्या पुढे चालु ठेवा.. प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा प्रत्येकाचा दॄष्टीकोन वेगळाच असणार.. <<<<
का? अन फक्त ब्राह्मणच कसे काय बोवा? "सोनियाकार्ड" चालले नाही असे लक्षात आल्यामुळे बनलेल्या आजच्या "राष्ट्रवादी राजकारणाची" गरज म्हणूनच ना? Proud
अहो इतिहासात बघता, अनेकजण चूकलेत, सर्व जातीत; अनेक जण बरोबर ठरलेत, सर्व जातीत; अनेक जण फुकाफुकी तर अनेकजण पराक्रमाने मेलेत, सर्व जातीत; अनेकान्च्या बायकान्नी नवरा हरुन मृत्युमुखीपडल्यानन्तर शत्रुचे हाती सापडून इज्जतीची विटंबना नको म्हणून जोहार केलेत, सर्व जातीत; अनेकजणान्नी ऐनवेळेस कच खाऊन पळपुटेपणा केला आहे, अनेक जातीत; अन तरीही हल्ली मात्र हे काय लावलय सारख सारख की "ब्राह्मणान्च्या ऐतिहासिक वगैरे चूका वगैरे..."?

पण जेंव्हा तुम्ही मराठ्यांच्या ईतीहासावर च्यर्च्या करता तेंव्हा ब्राम्हण, त्यांच्या ऐतीहासीक आणी अक्षम्य चुका त्यानी पुर्वी केलेले अन्याय या गोष्टी येणारच तेंव्हा या गोष्टीना तोंड देउन च्यर्च्या पुढे चालु ठेवा.. प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा प्रत्येकाचा दॄष्टीकोन वेगळाच असणार >>

राम मराठ्यांच्या इतिहासात ब्राह्मणांच्या चुकांपेक्षा जास्त मराठ्यांच्या आहेत. खुद्द संभाजी शिवाजीला सोडून गेला, संभाजीला विकले कोणी तर शिवाजीच्या जावयाने, संभाजीच्या बहिणीच्या नवर्‍याने! बाजीराव घोरपडा शिवाजीचा कोण होता? हे आपणास माहिती असेलच. घरभेदीपणा, विकावू पणा इत्यादे इत्यादी पण ते लिहिताना कोणी, " हा मराठा म्हणून असे झाले" असे लिहित नाही. पण तिथे व्यक्ती ब्राह्मण असेल तर ती चूक ब्राह्मणांची म्हणून दाखविली जाते. आक्षेप आहे तो ह्याला.

आणि हो आणखी कोणत्या अक्षम्य चुका ब्राह्मणांनी मराठा एम्पायर मध्ये केल्या त्या दाखवून द्याल का? म्हणजे मलाही ब्राह्मण कुठे चुकले हे कळेल. आणि त्यावर काय ती एकदाच चर्चा होऊ दे. म्हणजे निदान माझा किंवा तुमचा पूर्वग्रह संपेल.

यात्रेलाही गेले ते चूक असे मी देखील लिहिले पण यात्रेला केवळ ब्राह्मण गेले अन सैन्यातील मराठे मात्र ब्राह्मणांचे दर्शन होई पर्यंत हातातल्या तलवारीला परजत होते असे चित्र नव्हते. अनेक मराठा सरदारांचे काफिले पेश्वयांएवढेच असत. राजघराण्यातील लोकांचे नाटकशाळांचे खर्च पेशवाई दफ्तरात आपणास सापडतील.

इथे सर्व सारखेच! त्यामुळे कृपया ब्राह्मण, मराठा, लिंगायत, महार असे वाद घालन्यापेक्षा व सर्वजातीला त्यात गोवन्यापेक्षा त्या त्या व्यक्ती बद्दल लिहा ही विनंती.

पण जेंव्हा तुम्ही मराठ्यांच्या ईतीहासावर च्यर्च्या करता तेंव्हा ब्राम्हण, त्यांच्या ऐतीहासीक आणी अक्षम्य चुका त्यानी पुर्वी केलेले अन्याय या गोष्टी येणारच >>> राम, काहीतरी गडबड होते आहे. या धाग्यावर व विषयावर लिहीताना 'ब्राह्मण' या, किंवा दुसर्‍या कोणत्याही, जातीवर घाऊक लिहीण्याची काय गरज आहे? पेशव्यांच्या चुका म्हणजे तेव्हाच्या सर्व ब्राह्मणांच्या चुका असे तर नाही ना?

आणि ब्राहमणांच्या अक्षम्य चुका म्हणजे काय? सगळ्या ब्राह्मणांच्या? त्या काळात जे लोक चुकले ते सगळे ब्राह्मण होते, किंवा जे ब्राह्मण होते ते सगळे चूक होते. नक्की काय म्हणायचे असते जेव्हा मायबोलीवर 'ब्राह्मणांनी अमुक केले' असे लिहीले जाते तेव्हा?

मला वाटते काही लोक यातील 'मराठ्यांच्या" हा उल्लेख वाचताना 'मराठा' या जातीबद्दल असे समजत आहेत. हा उल्लेख पेशव्यांच्या व इतर सरदारांच्या फौजेबद्दलचा आहे आणि त्यात अनेक जातींचे लोक असणार याबद्दल कोणीतरी खुलासा करणे आवश्यक आहे.

कोणत्याच जातीबद्दल येथे लिहायची गरज नाही.

>>>> मला वाटते काही लोक यातील 'मराठ्यांच्या" हा उल्लेख वाचताना 'मराठा' या जातीबद्दल असे समजत आहेत. <<<
तसे अस्ते तर खुलासा करता आला असता (मूळात गरजच पडली नाही पाहिजे), पण फारेन्डा, दुर्दैवाने तसे काहीही नाहिये. एकतर असा समज करुन घेणे म्हणजे वेड पान्घरुन पेडगावला जाण्यासारखे आहे.
असो.

अरे पण आता हा विषय सोडुन मुळ मुद्द्याला धरुन पोष्टी लिहुयात ना. (म्हणजे जाणकार आणि अभ्यासु लोक लिहीतिल, माझी या विषयातील गती तितकी नाही)

नमस्कार मंडळी ~

सर्वश्री केदार, फारएण्ड, सेनापती, बेफिकिर, उदयवन, किरण्यके, मोहन की मीरा, लिंबूटिंबू आदींचे या विषयावरील लिखाण (तसेच ज्यांच्या प्रतिसादाबद्दल, वा त्यातील भाषेच्या मांडणीबद्दल डावीउजवी चर्चा झाली, होत आहे, असे श्री.बकासुर यांचेही लिखाण) मी वाचले - एकदा नव्हे तर अनेकदा. माझे 'पानिपत' [पानीपत असे लिहू नये, श्री.सेनापतीना शक्य असल्यास शीर्षकात दुरुस्ती करावी ही विनंती] या विषयावर ज्याला बर्‍यापैकी म्हटले जाईल असे वाचन असल्याने मी इथे लिहिले पाहिजे असे मनी खूप वाटत होते, पण नित्यनेमाने मराठी संस्थळांवर एखाद्या विषयाचा हकनाक विचका होत जाऊन तो परत त्या ब्राह्मण-ब्राह्मणेतर शापभूमीकडे का वळतो हे अजूनही उमगलेले नसल्याने, व त्याच रितीरिवाजानुसार हा अभ्यासू होत असलेला धागा [दुर्दैवाने] भरकटत गेल्याचेही पाहण्यात आल्यामुळे केवळ वाचनमात्रच होतो. पण काल रात्री इथल्याच एकदोन सदस्यांनी [अन्य एका धाग्यावर] आपल्याला जे भावते ते इथे मांडावे असा आग्रह केल्याने मी तसा प्रयत्न करीत आहे.

डावी उजवी मते कितीही असोत पण शेवटी अशा वादाच्या भोवर्‍यातूनच निखळ सत्याचे झरेही झरत राहतील या आशेपोटी मी चार ओळी लिहितो. त्यामागील माझी भूमिका एका 'पाटला'ची नसून जातीच्या राजकारणापलिकडे गेलेल्या एका महाराष्ट्रीयन व्यक्तीची आहे इतपत जरी इथल्या सदस्यांनी समजले तरी पुष्कळ झाले. ज्यावेळी आपण 'मराठा' म्हणतो त्याचा अर्थ खरा तर लौकिकार्थाने घ्यावा, वाच्यार्थाने घेऊ नये. पानिपतच्या मोहिमेचे नेते जरूर ब्राह्मण असतील पण ते प्रथम 'मराठा साम्राज्या'चे रक्षक होते आणि सातार्‍यात बसलेल्या राजानेच त्याना अन्य मराठ्यांना घेऊनच पानिपत मोहिम आखण्याची सूचना दिली होती. भाऊ आणि विश्वासराव मृत्युमुखी पडले त्यावेळी शोक करणारे केवळ ब्राह्मणच नव्हते तर सारे 'मराठा सैन्य' होते ही वस्तुस्थिती नाकारण्यात अर्थ नाही. इथे "मराठा सैन्य" याचा अर्थ फक्त '९६ कुळी मराठा' इतका क्षुद्र नसून त्यावेळी असलेल्या अठरापगड जाती जमातीनी सिद्ध झालेल्या मराठी समाजाचे दर्शन त्या मोहिमेत होते. ब्राह्मण, मराठे, धनगर, कुणबी हे ते चार प्रमुख गट, शिवाया इब्राहिमखान गारदी सारखे स्वामीनिष्ठ मुसलमानही त्या मोहिमेत होते.

त्यावेळी पेशवाईत "चातुर्वर्ण्यव्यवस्था" प्रचलित नव्हती का ? जरूर होती, पण परकीयांचा हल्ला आला की मराठी समाज एकवटून तो निपटून काढण्याचा यत्न करतोच करतो असे चित्र पानिपत युद्धात दिसून आले आहे. भोई, पारधी, भडभुंजे, महन्त, कोतवाल, गारूडी अशा विभिन्न जातीजमातीचा मोहिमेत भरणा तर होताच पण लष्करातही वैविध्य आढळते. सांडणीस्वार, राऊत, बुणगे, बिनी, गाडदी, बारगीर, नगारची, तबीब अशा पदी कामे करणार्‍यांच्या जाती तर आत्ताच्या अनुसूचीत जमातीत आढळतात. शिवाय त्या दरम्यान पेशव्यांनी गोसावी, बैरागी, फकीर, अवलिया, साधू या समाजापोटी असलेल्या भक्तीभावपूर्ण श्रद्धेने त्यांच्या परिपालनाची जबाबदारी स्वीकारली होती.

काय होतो याचा अर्थ ? सारा 'मराठा' समाज एकदिलाने त्या मोहिमेवर निघाला होता. त्याला "जत्रा" म्हणण्यात आपण त्यांचा अपमान करीत आहोत. पेशव्यांचा हुकूम झाला की तो पाळायचा ही शिकवण मराठा समाजात [यात पुन्हा: "फक्त मराठा जात" असा घेऊ नये ही विनंती. व्याप्ती फार मोठी आहे 'मराठा समाज' या नामाची] लहानपणापासूनच भिनली असल्याने त्याकाळी आज्ञापालन म्हणजे 'देवकाम' असेच मानले जात असे.

पानिपतची लढाई हा एकूणच महाराष्ट्राच्या इतिहासातील अत्यंत निकराचा प्रसंग होता. मराठेशाहीचे जे वैभव थोरल्या राजांपासून आले होते, भोगले गेले, ते पानिपतानंतर लयाला गेले हा इतिहास आहे. मराठी फौज परागंदा झाली. भाऊ आणि विश्वासराव तर जागीच गेले तर पुढे त्या धक्क्याने इकडे नानासाहेबही. अशाप्रसंगी त्यावेळी सारा महाराष्ट्र प्रांत मूळापासून हादरून न जावा तर ते नवलच होते. अर्थात होते असे की, विजयाचे बाप शंभर तर पराभूतचे कपाळ पांढरे असल्याने त्या पांढरेपणाची जबाबदारी कुणावर टाकायची याचीच सुंदोपसुंदी होते हे त्यावेळेच्या महाराष्ट्राला नवे नव्हते, तर तोच पलिता आजच्या महाराष्ट्रालाही नवलाचा वाटत नाही, हे आपण नेमेची येतात निवडणुका या माध्यमाद्वारे पाहात असतोच.

इथे "इतिहास" म्हणजे काय ? यावरही मतप्रदर्शने झालेली दिसतात. शेवटी 'इतिहास' हा नेहमीच देदीप्यमान असतो असे जगातील कोणत्याच राष्ट्राच्या इतिहासात आढळणार नाही. निम्म्यापेक्षा जास्त जगावर राज्य केलेल्या ब्रिटिशांना हादरविणारा इतिहास नाही का ? निश्चितच आहे. हिटलरचा जरूर पाडाव झाला असेल पण १९३८ ते १९४४ अशी तब्बल ६ वर्षे त्याने इंग्लंडची रात्रीची झोप घालवून टाकली होती. त्या युद्धात ते जेते ठरूनही दिवाळखोर झाले. हा इतिहास आहे, जो तुम्ही आम्ही पाहिला वाचला आहे. पण 'पानिपत' बद्दल जे काही समोर येत जाते त्याच्या आधारेच तुम्ही आम्ही मत प्रदर्शित करणे भाग असते. पण ते करताना 'अमुक एका जातीच्या नेत्याने तसे केले म्हणून तमुक एका जातीला नुकसान पोचले' असे म्हणणे ही आत्मवंचना ठरेल. पानिपतावर जो गेली तो 'मराठा' इतपतच त्याचा सोक्षमोक्ष. मग त्या 'मराठा' नामाची फोड करायची झाल्यास त्यात वर उल्लेख केलेल्या सर्व जातीच्या लोकांचा समावेश करावा लागेल हे विसरू नये.

चुका झाल्या म्हणून पराभव व चुका होत नाहीत म्हणून विजय असे तत्व असले तरी हे 'डिसेक्शन' विजय वा पराभवानंतरच करावे लागते कारण प्रत्यक्ष युद्धाच्यावेळी दोन्ही पक्ष आमची चाल ही 'बरोबर' आहे असे म्हणूनच खेळत असते. भाऊ, विश्वासराव, होळकर, दत्ताजी शिंदे, जयाप्पा, नजीबखान, सुजाउदौला, सुरजमल जाट, अबदाली ह्या व्यक्तीना 'वीर' म्हटलेच पाहिजे. ते अमुक एका जातीचे होते म्हणून इतरांपेक्षा काकणभर सरस असे कधीच होत नाही.

आपले सैन्य कुचकामी कसे ठरले याचा खोलवर तपास केल्यास दिसून येईल की, अबदालीपेक्षाही अंतर्गत कलहाच्या 'कर्का' ने मराठा सैन्य पोखरले होते हा इतिहास आहे. दादासाहेबांनी (राघो भरारी) हटून सुरजमल जाटाकडे खंडणी म्हणून एक कोटीची मागणी केली. जाटाने ४० लक्ष घेण्याची जी विनंती केली होती, ती दादासाहेबांनी मानली असती आणि पुढे मुलुखगिरी करीत उत्तरेकडे सरकले असते तर जे सैन्य कुंभेरी किल्ल्यात विनाकारण अडकून पडले व त्यांची क्षती होत गेली, ते चुकले असते.

खंडेरावाला गोळी लागून तो मृत्युमुखी पडला हे कुंभेरी वेढ्यातील एक प्रकरण. तसे पाहिले तर गरज नसताना खंडेराव तटाकडे गेला आणि त्याला जाटाच्या सैनिकांनी टिपले. तोही एक सैनिकच, पण मल्हारबाबाना आपला 'सैनिक' गेला याच्यापेक्षा आपला मुलगा गेला यामुळे 'मी सुरजमलाचा नि:पात केल्याशिवाय कुंभेरीतून हलणार नाही' ही प्रतिज्ञा. त्यात जाटाला जयाप्पा आणि मल्हारराव यांच्यातील वितुष्ट माहीत, ज्याचा त्याने पुरेपूर फायदा करून घेतला नसता तर नवलच. म्हणजेच पानिपत मोहिम ही 'मराठ्यां" ची मोहिम की दोनचार लहानमोठ्या सरदारांनी आपली भांडी बडवित बसण्याचे निमित्त ? ज्या जयाप्पा शिंदेशी होळकरांचे वितुष्ट त्या जयाप्पाचा पुढे बिजेसिंगाने मारेकर्‍यांकरवी खून केला त्याचा सूड म्हणून खरे तर मल्हाररावानी बिजेसिंग आणि रामसिंग याना सळो की पळो करणे भाग होते, पण आपल्या डोळ्यात सलत असलेले कुसळ गेले म्हणून समाधान मानून याच मल्हाररावानी नागुरकरांसमवेत तह केला.

अजून खूप काही लिहिता येईल. पण हाच प्रतिसाद मोठा झाल्याने इथेच थांबतो.

अशोक पाटील

शिर्षकात पानिपत.. असा बदल केला आहे... Happy अनावधानाने झालेले लक्ष्यात आणून दिल्याबद्दल धन्यवाद.. Happy

आत्ता हा धागा पहिल्यापासुन वाचून काढला.
अशोक, नेहेमीप्रमाणे अभ्यासपुर्ण आणि छान लिखाण.

शिंदे, होळकर, गायकवाड, इ. लोकांना त्या त्या भागात नेमले कोणी ? पेशव्यांनीच ना ?
उत्तरेमधे मराठी साम्राज्याला लागलेल्या ग्रहणाला शिंदे, होळकर, इ. जास्त जबाबदार आहेत. एकमेकांमधले हेवेदावे, तिकडे मिळणारी संपत्ती/खंडणी इ. चा बराचसा भाग स्वतःच ठेवणे, तसेच अनेक बाबतीत पेशव्यांना अंधारात ठेवून सहकार्य न करणे अशी अनेक कारणे आहेत. आता यामधे जातीचा काही एक संबंध नाहीये. हे सगळे जर कोणी ब्राह्मण सरदारांनी केले असते तरी त्यांना पण कोणी चांगले म्हणले नसतेच. ?
शिंदे तर आजदेखील गबर आहेत. पेशव्यांचा थांगपत्ता तरी आहे का ? एवढे वैभवशाली साम्राज्य राखले, वाढविले त्यातला एक कण देखील पुण्यात दिसतो आहे का आज ?
यशवंतराव होळकराने तर शनिवारवाडा जाळायला मदत केली होती म्हणे इंग्रजांना.

यशवंतराव होळकराने तर शनिवारवाडा जाळायला मदत केली होती म्हणे इंग्रजांना.>>>>

हे मात्र साफ चुकीचे आहे. मला वाटतं मराठ्यांच्या नंतर एकहाती इंग्रजांशी लढलेला तो एकमेव बहाद्दुर होता !

Pages