पानिपत... एक सल...

Submitted by सेनापती... on 10 February, 2012 - 00:38

बुधवार, १४ जानेवारी १७६१. पौष शु. अष्टमी.

गोविंद्रग्रजांच्या शब्दात सांगायचे तर,

"कौरव पांडव संगर तांडव द्वापरकाली होय अती, तसे मराठे गिलचे साचे कलीत लढले पानिपती !!"

त्या भयंकर रणसंग्रामाला अडीचशेहून अधिक वर्षे होऊन गेली तरी पानिपतची जखम आजही मराठी मनावर कायम आहे. शिवछत्रपतींचा राज्याभिषेक आणि अटकेपार फडकवलेले भगवे झेंडे हा मराठी इतिहासाचा मानबिंदू असेल तर पानिपत हा एक सल आहे. तो कधीच पुसला जाणार नाही. आजही कुठल्याही गोष्टीत आपला पराजय झाला की त्याला पानिपतची उपमा दिली जाते तर विजयाला अटकेपार झेंडे रोवणे असेच म्हटले जाते ह्यातच सर्व काही आले. पण मुळात ही परिस्थिती त्याकाळी मराठ्यांवर का आली हे देखील जाणून घेणे गरजेचे ठरेल. संपूर्ण भारतभर आपल्या घोड्यांच्या टापांनी आणि तलवारीच्या जोरानी मराठी साम्राज्याचा विस्तार(?) करता करता असे काय घडले की मराठ्यांचे अध:पतन झाले? मुळातच हे अचानक झाले नाही.

ह्यासाठी पानिपत समजून घेताना त्याआधीच्या काही वर्षांचा इतिहास समजून घेणे क्रमप्राप्त आहे. मराठी किंवा हिंदू साम्राज्य स्थापण्यामागची शिवछत्रपतींची इतिकर्तव्यता नेमकी काय होती? त्यांना नेमका कुठला महाराष्ट्र धर्म अभिप्रेत होता? त्यांच्या पाश्च्यात त्यांच्या नीतीमूल्यांची किती जपणूक मराठ्यांच्या राज्यकर्त्यांना करता आली? खरेतर कितपत झेपली किंवा पेलली असेच म्हणावे लागेल. एका १६ वर्षाच्या पोट-मोकासेदाराने मुघल आणि आदिलशाहीविरुद्ध उभा केलेला हा महाराष्ट्र धर्म होता. त्यांची इतिकर्तव्यता हीच होती की मुसलमानी साम्राज्य उखडून फेकायचे. हा देश, ही भूमी पारतंत्र्यातून मुक्त करायची. फक्त महाराष्ट्र नाही तर सिंधू नदी ते कावेरी पावेतो... त्यासाठी त्यांनी अखंड श्रम सोसले. संपूर्ण दक्षिण भारत जवळ-जवळ ताब्यात आणला. आदिलशाही जवळ जवळ नामशेष झालेलीच होती. उरली सुरली कुतुबशाही मराठ्यांच्या जीवावर जगत होती. पण मग पुढे असे काय झाले की दिल्लीपतीला दख्खनेत दफन करणारे मराठे खुद्द दिल्ली राखू लागले? पेशवे काळात नेमके असे काय बदलले की पातशाही नामशेष करायची सोडून मराठे स्वतः: चक्क तिचे रक्षणकर्ते बनले?

सदर धाग्यावर पानीपत संदर्भातून मराठी साम्राज्यावर चर्चा अपेक्षित आहे. इथल्या अनेक जाणकारांकडून मला त्यांची मते जाणून घ्यायला आवडतील. मी देखील माझी मते वेळोवेळी मांडीन.. Happy

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

महेश जेव्हा आठवेल की तुम्ही हे कशात वाचले त्यावेळेस नक्की लिहा.... पण तोपर्यंत नको....आधीच खुप पिल्ल आहेत ईथ मुळ विषय सोडुन....

फारेंड,सेनापती,केदार>>>> मी ते वाक्य अज्ञानाने लिहले नाही.ईतीहासाच्या धाग्यावर तरी मी पुराव्याशिवाय बोलणार नाही याची खात्री असावी..कधी प्रत्यक्ष भेटीत वेळ मिळाला तर जरुर च्यर्च्या करु..
पण इथली सुंदर च्यर्च्या... केदार्,सेनापती,अशोकरावांसारख्या जाणकाराच्या पोस्ट वाचुन लिहण्यापेक्षा वाचणेच पसंद करेन.. कारण च्यर्च्या भरकटण्यापेक्षा काही उत्तम पोस्ट वाचायला मिळतात ते ज्यास्ती महत्वाचे आहे.. Happy

>>>>हा 'च्यर्च्या' शब्द कुठल्या भाषेतला आहे ? >>>><<<
मराठीतला, फक्त आधुनिक!
नुस्ती जीभ अथवा लेखणी वापरुन दोनचार जणांत होते ती चर्चा
अन जीभलेखणीबरोबरच "दातओठ खाऊन उणीदुणी काढत" जी होते ती च्यर्चा Proud Light 1 असे काहीसे असावे.
असो, विषयान्तर नको बाजो. Happy

अशोककाका, पीनल कोडच्या धाग्यावर तुमचे प्रतिसाद वाचले आणि तुम्ही इथे काय लिहाल याची उत्सुकता निर्माण झाली होती. अतिशय संयमित प्रतिसाद आहे तुमचा. तुमच्याकडून आणि इतर जाणकारांकडून अजून माहीती वाचायला आवडेल.

कशाचा पुरावा? पानिपतवर आज पर्यंत किती पुस्तकं निघालीत
१) शेजवलकर २) विश्वास पाटील ३)संजय सोनवणी ४) संजय क्षीरसागर.

यातील सर्वात विश्वसनीय पुस्तक म्हणजे शेजवलकरांचं. विश्वाव पाटलाची व सोनवणींची कादंबरी परस्पर विरोधी आहेत. याला मुख्य कारण असे की विश्वास पाटलानी पेशव्यांची पालखी वाहीली तर सोनवणीनी तटस्थ लिखान केले. राहीला प्रश्न संजय क्षीरसागरांचा, यानी शेजवलकरांची गणितं फिरविणारे सिद्धांत मांडले आहेत. शेजवलकारांना बिनतोड उत्तर जर कुणी दिले असेल तर ते संजय क्षीरसागरानी. आता ज्याना ते वाचायचं असेल त्यानी हे संदर्भग्रंथ वाचावे.
-------------------

आता थोडं पानिपत बद्दल.

गोलाची लढाई चूक की बरोबर अशी चर्चा केली जाते. मुळात गोलाची लढाई असते का? हा बेसीक प्रश्न आहे. गोलाची लढाई नसतेच कधी. गोलाची रचना पळून जाण्यासाठी केली जाते. १४ जानेवारीला भाऊच्या सेनेनी गोलाची रचना करुन पानिपतच्या बाहेर पडण्याचा जो प्लॅन आखला होता तो युद्धासाठी होता का? अजिबात नाही. गोलाची रचना पळून जाण्यासाठी करण्यात आली होती. त्याच बरोबर आजून एक महत्वाची गोष्ट अशी की जाने १४ हा अत्यंत थंडी असण्याचा काळ व सकाळी नऊ दहा वाजे पर्यंत धूके असतात तिकडे उत्तरेत. क्षीरसागरांच्या मताप्रमाणे धुक्यांचा फायदा उचलून पळून जाण्याचा तो प्लॅन होता पण दुर्दैवाने त्या दिवशी धूके न पडल्यामूळे अब्दालिला हे मराठ्यांचे यात्रेकरु दिसले व (युध्द ?) कापाकापी सुरु झाली.

जर सुदैवाने त्या दिवशी रोजच्या सारखे धुके असते तर मराठी यात्रेकरु सुखरुप पळून गेले असते, व आज आपण जे पानिपतचे युद्ध वगैरे म्हणून मोठाल्या बाता करतो त्या झाल्याच नसत्या.

भाऊ हा कधीच सुध्दास तयार नव्हता हे उपलब्ध सर्व पुराव्यांनी सिद्ध होते. त्याच बरोबर यमूना ओलांडण्यासाठी त्यानी काहीच प्रयत्न केले नाही. त्या अब्दालीने ज्या पद्धतीने यमूना ओलांडली ते पाहता भाऊचे युद्ध धोरण बुचकळ्यात टाकणारे आहेत. देवा धर्मावर युद्ध सोपविणारा भाऊ मारला गेला ते योग्यच झाले. बाजार बुणगे असा शब्द वापरून शेजवलकर व विश्वास पाटलानी भाऊंच्या पुणेरी अंधश्रद्धाळू (?) देवभोळया (?) (कि जातीयवादी नि मुर्ख) लोकांचा बचाव करण्याचा प्रयत्न केला.

होळकरानी भाऊना वेळीवेळी 'गनिमीकाव्याने' युद्ध करण्याची विनंती केली पण भाऊनी त्यास नकार दिला. कारण मुळात भाऊना युद्धच करायचे नव्हते. मग अशा आत्मघातकी भाऊ सोबत जिव देण्यात काय अर्थ म्हणून होळकरानी मोठ्या कुशलतेने व योग्य वेळी माघार घेतली.

>>भाऊ हा कधीच सुध्दास तयार नव्हता असे एकंदरीत सिद्ध होते
Rofl Rofl Rofl Rofl Rofl Rofl
बकासूर. लिहीत रहा. असले विनोद फार वाचायला मिळत नाहीत

बकासुर.. मी अजून संजय क्षीरसागर वाचलेले नाही.. खरे सांगायचे तर मी ऐकलेले पण नाही. तेंव्हा ते मी वाचीनच. पण शेजवलकर यांच्याआधी राजवाडे, सरदेसाई आणि जदुनाथ यांनी लिखाण केलेले आहेच. ते ही एकदा वाचायला हरकत नाही.

१४ जानेवारीला भाऊच्या सेनेनी गोलाची रचना करुन पानिपतच्या बाहेर पडण्याचा जो प्लॅन आखला होता तो युद्धासाठी होता का? अजिबात नाही. गोलाची रचना पळून जाण्यासाठी करण्यात आली होती.

>>> मला हे मान्य आहे. पण पळून दक्षिणेकडे जाताना मध्ये लढाई करणे भाग आहे हे भाऊला उमगले होते. तेंव्हा तो लढाई करण्याच्या तयारीत नव्हता हे बोलणे योग्य वाटत नाही. दुपारी १ पर्यंत लढाई करण्याचे कारण मग समजत नाही.

होळकरानी भाऊना वेळीवेळी 'गनिमीकाव्याने' युद्ध करण्याची विनंती केली पण भाऊनी त्यास नकार दिला. कारण मुळात भाऊना युद्धच करायचे नव्हते.
>>> ज्यांना गोलाची लढाई मान्य नव्हती त्यांनी योग्य वेळी तिथून पळ काढला. ते कोण होते ह्याची यादी वर दिलेली आहेच. हे लोक तिथे टिकून लढते तर दुपारीच निकाल आपल्या बाजूने वळला असता. असो त्यांची तिथून काढता पाय घेण्याची स्वतःची करणे आहेतच. ती पत्रे देखील उपलब्ध आहेत. शेवटच्या क्षणी हुजुरात बरोबर कोण उभे असेल तर ते तुकोजी शिंदे, जानकोजी शिंदे, सोनाजी भापकर.. (अजून काही नावे आहेत पण आता नेमके कोण लक्ष्यात नाही. उगाच कोणाचे नाव चुकीच्या यादीत पडायला नको म्हणून आत्ता देत नाही. नंतर इथेच येऊन एडीट करीन.)

बाकी शिंदे आणि होळकर कधीच पसार झाले होते. विश्वासराव पडल्यावर नानाला स्वतः भाऊंनी मागे जायवास सांगितले आणि तो शेवटच्या लढाईसाठी सज्ज झाला. ह्या क्षणी त्याजकडे अवघे २००-३०० सैनिक होते असे शेजवलकर म्हणतात. ह्यावरून काय ते ठरवा. भाऊचे मुंडके उडण्याआधी त्याने एका वेळी ३-३ गारद्यानबरोबर लढाई केली असे फारशी कागद म्हणतात ते का खोटे? त्याला लढाई करायची नव्हती तर तो पळून जाऊ शकता असता. तसेही कोणी उरले नव्हतेच तिथे. बाजार-बुणगे अर्धे मेले होते, लुटले जात होते. पळाले होते. बंदी झाले होते.

बकासुर्राव, युद्ध करायचेच नव्हते तर एवढा करोडोने खर्च करुन पुण्यातून पानिपतपर्यंत कशाला गेले सगळे ? वेळ जात नव्हता म्हणून?

बकासुर्राव, युद्ध करायचेच नव्हते तर एवढा करोडोने खर्च करुन पुण्यातून पानिपतपर्यंत कशाला गेले सगळे ? वेळ जात नव्हता म्हणून?>> अहो, यांचे सर्व देव तिकडे उत्तरेत हायत ना, ते देव दर्शनासाठी गेले होते.

यातील सर्वात विश्वसनीय पुस्तक म्हणजे शेजवलकरांचं

>> असे वर तुम्हीच म्हणालात बकासुर आणि वर असेही म्हणता की 'बाजार बुणगे असा शब्द वापरून शेजवलकर व विश्वास पाटलानी भाऊंच्या पुणेरी अंधश्रद्धाळू (?) देवभोळया (?) (कि जातीयवादी नि मुर्ख) लोकांचा बचाव करण्याचा प्रयत्न केला.'

बर होळकरनेच भाऊला चंबळ पार करून वर न येण्याची विनंती केली होती. थोडक्यात लढाई होळकर याला करायची नव्हती असेही मत मांडता येते. भाऊ मात्र लढाई करण्याच्या इर्षेने उत्तरेपर्यंत चालून आला होता हे स्पष्ट होते.

भाऊचे मुंडके उडण्याआधी त्याने एका वेळी ३-३ गारद्यानबरोबर लढाई केली असे फारशी कागद म्हणतात ते का खोटे?>> हे जरी सत्य असले तरी ते भाऊना कुठलाच पर्याय उरला नसल्यामुळे करावे लागले. बघा त्या दिवशीची एकंदरीत सैन्याची हालचाल कशी होती व त्यावरुन युध्दाची तय्यारी सिद्ध होते का?

पहाटेच उठून मराठी सैन्य कूच करते. बाजार बुणग्याना (माझ्या मते पुणेरी दैववाद्याना) वाचविण्यासाठी गोलाची रचना केल्या गेली. त्या नंतर उत्तरेकडून दक्षिणेकडे (म्हणजेच दिल्लीकडे ) कूच केली जाते. वाटेत अब्दाली उभा होता. सर्वात डाव्या बाजूला इब्राहीम गारद्याचा तोफखाना व फिरंगी प्रशिक्षण घेतलेले ऐटबाज गारदी, ज्यांच्यावर भाऊला अती विश्वास होता. तर सर्वात उजवीकडे होळकर व शिंदे. मधल्या फळीत भाऊ. सर्वात आधी इब्राहिम गारदी गारद होतो (पकडल्या जातो). तोवर ईकडे होळकर, शिंदे, पवार वगैरे पळून जातात. भाऊकडे पर्यायच नसतो.

पण अत्यंत महत्वाची गोष्ट अशी की काही इतिहासकारांच्या मते भाऊसुद्धा पळून गेला... सोनवणीने तर चक्क भीमनाकानी भाऊला वाचविल्याचे लिहले आहे. भाऊच्या नावाने पार्वतीबाईस आलेल्या अस्सल पत्राचा उल्लेख विश्वास पाटलानीही केला आहे, नंतर त्यानी सारवासारव करत परत एकदा पेशव्यांची पालखी वाहिली.

थोडक्यात भाऊ पानिपतात पडला हे सिद्ध होत नाही...

थोडक्यात भाऊ पानिपतात पडला हे सिद्ध होत नाही... आणि
सोनवणीने तर चक्क भीमनाकानी भाऊला वाचविल्याचे लिहले आहे. भाऊच्या नावाने पार्वतीबाईस आलेल्या अस्सल पत्राचा उल्लेख विश्वास पाटलानीही केला आहे,

>>> >>> हे म्हणजे अतीच झाले. कोण सोनवणी? आणि विश्वास पाटील हे इतिहासकार नव्हेत. तेंव्हा त्यांची मते किती ग्राह्य धरायचे हे पुराव्यावर अवलंबून. बर पुरावा काय म्हणतो ते पण बघू. भाऊचे शीर नसलेले धड दुसऱ्या दिवशी सापडले. शुजाउद्दोलाने त्याचे अब्दालीची परवानगी घेऊन योग्य पद्धतीने अंतिम क्रियाकर्म केले. नंतर २ दिवसांनी एका गीलच्याकडे मुन्डकेही सापडले त्याचेही नंतर अब्दालीची परवानगी घेऊन योग्य पद्धतीने क्रियाकर्म केले.

पार्वतीबाईला ही बातमी काळू नये म्हणून एक पत्र भाऊच्या नावाने पुढे तिला इंदोरला असताना पाठवले गेले. ते पत्र अस्सल नव्हे. दुर्दैवाने त्या पत्राचा किवा घटनेचा फायदा घेऊन पुढे भाऊचे तोतये निर्माण झाले.

बर भाऊ पळून गेला तर मग कुठे गेला? कसा मेला? ह्याबद्दल काही माहिती द्याल का?

अहो, यांचे सर्व देव तिकडे उत्तरेत हायत ना, ते देव दर्शनासाठी गेले होते >>

कोणाचे देव फक्त ब्राह्मणांचे? ब्राह्मणांचे न हिंदूंचे देव वेगळे असतात का? थोडेतरी बुद्धिला ( माझ्या नाही इतरांच्या, जो तुमचा ऑडियन्स आहे) पटेल असे लिहा ना? का उगाच सारखे सारखे ब्राह्मण ब्राह्मण करता?

विश्वास पाटलानीही केला आहे, नंतर त्यानी सारवासारव करत परत एकदा पेशव्यांची पालखी वाहिली. >>> Lol आधीच लिहिले होते पानिपत पुस्तक वाचून तेच खरे असे माणनार्‍यांनी इथे येऊन बहुमोल मत मांडले तरी तेच सत्य म्हणून कुरवाळत बसू नये. पेशव्यांची पालखी नाही वाहणार तर कोणाची? अब्दालीची का?

बर भाऊ पळून गेला तर मग कुठे गेला? कसा मेला? ह्याबद्दल काही माहिती द्याल का? >>> काय विचारता राव! भाऊ पण अब्दालीला जाऊन मिळाला कारण त्याला गोलाच्या लढाई करून इतर हिंदूंना मारल्याबद्दल (बकासुरांचे बहुमुल्य मत) बक्षिस मिळाले. रादर पुढे जाऊन मी तर म्हणेन की ब्राह्मण पेशवे हे मोगलांचे गुप्तहेर होते, जसे रामदास अदिलशहाचा होता तसेच. अजून सोनवणींनी हे का नाही मांडले? कितीतरी वाव आहे, पानपतात ब्राह्मणनेतरांना मारायचे हा कट होता राव, कट. तुम्ही बसले आपले पुरावे देत.

सेनापती,
दि. १९ जुलै १९९४ रोजी डॉ. दिपक टिळक यांच्या ’सह्याद्रि’ अंकात दुसरे नानासाहेब पेशवे म्हणजे शिर्डीचे साईबाबा हा लेख प्रसिद्ध झाला होता. लेखक अरुण ताम्हणकर यानी गौप्यस्फोट करताना एक अज्ञात साधुचा आधार घेतला होता. त्यांचा हा लेख मुलनिवासीकडे उपलब्ध आहे. ताम्हणकर या लेखात जे म्हणतात त्याचा सारांश असा आहे.
-----------------------------

सदाशिवराव: स्वामी समर्थ

दि. १४ जानेवारी १७६१ रोजी पानीपत येथे लढाई झाली. विश्वासरावानी गोळी लागुन ते खाली पडल्यावर सदाशिवराव जीव मुठीत घेऊन रणांगणातुन पळून जातात. (संदर्भ: म.यु.भा. इतिहास पान क्र. ११२) आणि योगा योगा काय ते बघा. स्वामी समर्थ नेमके १७६०/६१ च्या दरम्यानच मंगळवेढ्याला आलेत. स्वामी समर्थांच्या प्रकटीकरणाशी लढ्याचा घटनाक्रम जुळतो.

इ.स. १८१८ साली कोकणातील ब्राह्मण गोपाळबुवा केळकर यानी स्वामींची पहिली बखर लिहली. गोपाळबुवा हे स्वामींच्या गुप्त गोष्टींची इत्थ्यंभुत माहिती असलेले शिष्य होते. त्या नंतर ९ मे १९७५ रोजी बखरीचे पुनरलेखन करण्याचे काम रामचंद्र चिंतामण यानी केले. स्वामींचा जन्म कुठे झाला? त्यांची जात काय होती? त्यांचे मातापिता कोण होते? ते लहानाचे मोठे कसे झाले? या पैकी एकाही गोष्टीचा पत्ता लागला नाही असे बखरित लिहलेले आहे.

स्वामी मंगळवेढा गावात बसप्पा तेल्याच्या घरात राहात होते. हे मजुरी करुन जीवन जगणारं एक अत्यंत गरीब कुटूंब होतं. तसं बसप्पाची बायको मात्र नव-यावर नाराजच होती. कारण तीचा नवरा नको त्या वेड्या बुवाच्या पाठी लाउन उगीच नको त्या अडचणीना तोंड दयावे लागत असल्याची सल तीच्या मनात कायम असे. अचानक या कुटुंबाचे दिवस बदलतात कारन प्रत्यक्ष स्वामीना भेटण्यासाठी मोलोजीराव पेशवे मंगळवेढ्याला येतात व स्वामींचा महिन्याचा खर्च बसप्पाला देण्याचे ठरते व तसे दिले जाते. पेशव्याकडुन महिना अर्थसाहाय्य येताच गणपत चोळप्पा हे सेवेकरी मंगळवेढ्याला स्वामींच्या सेवेसाठी रुजु झालेत.

कर्वे नावाचा ब्राह्मण (कृरता)

या कर्व्यांची मुलगी बिघडली होती, उपाय शोधण्यासाठी कर्वे स्वामींकडे जातो. पोरीचं काय काय करावं म्हणुन स्वामींना विचारल्यावर स्वामी म्हणतात, “होळी करा.”

पुढे कर्वेनी त्याना विचारले, आपली जाती कोण ? त्यावर स्वामी म्हणतात. यजुर्वेदी-ब्राह्मण, गोत्र-कश्यप, रास-मीन. काही दिवसानी कर्वेच्या मुलीचे होलीका दहन झाले. म्हणजेच जाळण्यात आले. (संदर्भ. स्वामी समर्थ बखर. पान ५८) इ.स. १८०० मधे स्वामींचा अंत झाले ते सत्तरी ओलांडले होते. अक्कलकोटला स्वामी एकुण २३ वर्षे राहिले.

इ.स. १८०० मध्ये चैत्र शुद्ध पौर्णिमेला त्यांचा अंत झाला. त्यांच्या अंत्ययात्रेला अंगारीचे हत्ती, सजविलेले घोडे, तोफदार, पायदळ, जरिपटाख्याचे पेशवे असा एकुण शाही लवाजमा होता. लोकं घोषणा देत होती, “ श्री स्वामी समर्थ महाराज की जय”.

पण प्रत्यक्षात हा अंत होता १७६१ रोजी रणांगणातुन पळून गेलेल्या सदाशिवराव पेशवे यांचा. स्वामीना मंगळवेढ्यात असताना पेशव्यांकडुन मिळणारे अर्थसाहाय्य शेवट पर्यंत बंद करण्यात आलेले नाही. मालोजीरावाना स्वामी एकदा कानपटीत मारतात. याचे प्रमुख कारण हेच होते की स्वामी हे इतर कुणी नसुन सदाशिवराव पेशवे होते. पुढे हाच प्रयोग तात्या टोपे व नानासाहेब पेशव्यांवर करण्यात आला.
-----------------------------------
असाही संदर्भ आहे याचं काय करायचे ते तुम्हीच सांगा.

बरं Rofl

कठीण आहे आपल्याला पाहिजेल तेवढेच संदांर्भ घेवून आपले ब्राह्मण चुका शोध मोहीम चालू ठेवा. बाकी एक लक्षात ठेवा दुसऱ्याच्या चुका (खऱ्या व खोटया) काढताना भान ठेवा. हे वेळ काही वर्षांनी आपल्यावर पण येऊ शकते आणि तेंव्हा बाजू मांडणे फार कठीण जाईल. असो चालू द्यात तुमचे.

सदाशिवराव: स्वामी समर्थ

दि. १४ जानेवारी १७६० रोजी पानीपत येथे लढाई झाली.

>>> इकडे तारीख चुकीची पडली ती नीट करा प्लीजच... Proud

आणि हो ती दुसरे नानासाहेब पेशवे म्हणजे शिर्डीचे साईबाबा ही गोष्ट पण सांगा ना.. मज्जा येते आहे.. Happy

रादर पुढे जाऊन मी तर म्हणेन की ब्राह्मण पेशवे हे मोगलांचे गुप्तहेर होते>> केदार. यवनांचे राज्य येणार असा प्रचार कुणी चालविला जरा इतिहासाची पान चाळून पहा.

यवनांचे राज्य येण्या आधीच ते येईल असा प्रचार करुन लोकांच्या मनाचे खच्चिकरण करण्याचे पाप ज्यानी केले त्यानी खरतर देशद्रोह केला. कारण या प्रचारामूळे देवभोळ्या लोकानी यवन ईथे उतरण्या आधीच त्यांचा मानसिक पातळीवर स्विकार केला. यवनांसाठी ही उपयूक्त मानसीकता तयार करण्याचे कंत्राट ज्यानी घेतले ते कोण? प्रत्यक्ष युद्धभूमीत यवनांशी दोन हात करण्या आधी झालेला हा प्रचार युध्दभूमीतील पराजयास कारणीभूत नाही का? जर असेल तर त्या पराजयाचे दोषी कोण? याउलट यवनाना आम्ही पिटाळून लावू असा प्रचार जर या लोकानी (कोण ते विचारु नका) केला असता तर आमची सेना मोठ्या त्वेषाने लढली नसती का? किंवा हिंद प्रांतात प्रवेशताना यवनाना खडे चारण्यात आले नसते का?

यवनांसाठी ईथे अनुकूल परिस्थीत निर्माण करण्याचे काम ज्या शास्त्राने, समाजाने केले ते मोघलांचे गुप्तहेरच होते केदार.

केदार... म्हणजे अब्दालीला नजीब आणि माधोसिंग यांनी बोलावलेच नव्हते... ते तर नानासाहेब याने बोलावलेले. बरोबर ना? माझ्याकडे पुरावे पण आहेत... Wink

आणि हो ती दुसरे नानासाहेब पेशवे म्हणजे शिर्डीचे साईबाबा ही गोष्ट पण सांगा ना.. मज्जा येते आहे..>>>>

अहो ते तुम्ही टिळकांकडून संदर्भ मागवा त्यानीच प्रकाशीत केला होतो तो लेख.

दि. १९ जुलै १९९४ रोजी डॉ. दिपक टिळक यांच्या ’सह्याद्रि’ अंकात दुसरे नानासाहेब पेशवे म्हणजे शिर्डीचे साईबाबा हा लेख प्रसिद्ध झाला होता. लेखक अरुण ताम्हणकर

बरोबर आहे बकासूर. हा पहा खरा इतिहास (काही लोक अती-हास म्हणतील पण आपण लक्ष देऊ नये):

त्या वेळी प्रतापगडाच्या परिसरात फार थंडी माजली होती. शिवाजीने घातलेल्या जाड हातमोज्यांमुळे अफझलखानाला मिठी मारताना त्याला फारा गुदगुल्या होऊन हसता हसता त्याचा कोथळा आपसूक बाहेर आला [यावरुन पुढे हसते हसते 'कट' जाए रसते (त्याकाळी अरबीत पोटाला रसत म्हणत म्हणे) हे गाणे पैदा झाले. असो. आपण विषयांतर करु नये]. पण त्याच वेळी सय्यद बंडाचा असा गैरसमज झाला की काहीतरी दगाफटका होत आहे म्हणून त्याने महाराजांना नुसतेच घाबरवायला तलवार उचलली तर त्याच वेळी भडक डोक्याच्या जिवाजीचाही गैरसमज होऊन त्याने बंडाला तलवारीच्या टोकाने गुदगुल्या केल्या. पण ते तलवारीचे टोक फार टोकदार असल्याने बंडा शहीद जाहला. असे झाल्यावर महाराजांनी खानाचे शरीर कोथळा आत घालण्याच्या शस्त्रक्रियेसाठी गडावर न्यायचे ठरवले व बाहेर काढले, पण एका पत्र्याला अडकून शीरच तुटले. पुढे फूल ना फुलाची पाकळी या न्यायाने तेच शीर मेंदूच्या विश्लेषणासाठी महाराजांनी मांसाहेबांकडे पाठवून दिले.

मग बाहेर लढाई जाहली त्यात अनेक लोक हकनाक मारले गेले त्यात खानाचा वकील कृष्णाजी भास्करही जखमी झाला. पुढे गंजलेल्या तलवारीचा वार झाल्याने त्याला गँगरीन/सेप्टिक झाले व तो त्यात मेला. तो ब्राह्मण असल्याने महाराजांनी सगळ्या बामण लोकांना दोरीने बांधून धिंड काढली. त्याचीच आठवण म्हणुन बामण लोक अंगात जानवे नावाची दोरी घालतात व नंतर फारा वर्षांनी पानिपतात झालेल्या कत्तलीची आठवण म्हणून जानव्याला गाठ असते. त्याला ते ब्रह्मगाठ म्हणतात पण आपण त्याकडेही लक्ष देऊ नये.

अरे काय चालले आहे Sad

या धाग्यावर एकदा प्रतीसाद दिल्यावर परत फक्त वाचनमात्र राहणार होतो पण धाग्याने घेतलेले वळण बघता धाग्याचा मुळ उद्देशच हरवलाय असे वाटते...

सेनापतीनी काय उद्देशाने धागा काढला व त्याला आपण कुठे घेऊन जात आहोत.... चर्चेला कुणाचीही हरकत नसावी पण पुर्वग्रहदुषीत चर्चा शेवटी निष्फळच ठरते...

वरील काही प्रतीसादातून असे वाटतेय की मुळ धागाकर्त्यांचा व त्याला सुरुवातीला अभ्यासपुर्ण प्रतीसाद देणार्‍यांचा धाग्यातील इंटरेस्ट संपलाय की काय? असे होऊ नये असे वाटते...

शेवटी ह्या धाग्याचेही पानिपत होऊ नये म्हणजे मिळवली......

स्वच्छंदी - या धाग्यावर चांगले काही वाचायला मिळत होते. पण आता तो इतका भरकटलाय की अजून काही मु्देसुद वाचायला मिळेल याचा अजिबात विश्वास (राव नव्हे) नाही.

>>> स्वामी समर्थ नेमके १७६०/६१ च्या दरम्यानच मंगळवेढ्याला आलेत. स्वामी समर्थांच्या प्रकटीकरणाशी लढ्याचा घटनाक्रम जुळतो.

अगदी बरोब्बर माहिती. थोडीशी तपशिलात चूक आहे. ही घटना १७६०/६१ ला नसून त्यानंतर जवळपास १०० वर्षांनी घडलेली आहे.

>>> इ.स. १८०० मधे स्वामींचा अंत झाले ते सत्तरी ओलांडले होते. अक्कलकोटला स्वामी एकुण २३ वर्षे राहिले.

पुन्हा एकदा तपशिलात चूक आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांनी १८७८ साली अक्कलकोट येथे समाधी घेतली.

जर भाउसाहेब पेशवे हेच अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज असतील तर ते १५० वर्षे जगले म्हणायचे! Happy

श्री.बकासूर यांचे आज सायंकाळचे [भारतीय प्रमाणवेळ] प्रतिसाद आणि हा धागा सुरू झाल्यानंतर आलेले प्रतिसाद मी वाचले आहेत. त्यांचा या विषयातील अभ्यास प्रशंसनीय आहे यात शंका नाही, पण कृपया त्यानी (आणि इतरांनीही) 'इतिहास' आणि 'कादंबरी' यात गल्लत करू नये. कादंबरी हे एकप्रकारचे ललितलेखन असते आणि त्यात संबंधित लेखकाला मनसोक्त संचार करण्याची संधी असते [यात प्रकाशक नावाचा एक रिंगमास्टरही असतो, जो या लेखकाचा लेखकराव होईपर्यंतच्या प्रवासात त्याच्याकडून कशाप्रकारचे हमखास यशस्वी फॉर्म्युल्याचे लेखन कसे करून घ्यायचे हे जाणत असतो]. जरी लेखक 'मी अमुक इतका अभ्यास करून हे लेखन केले आहे' असे प्रस्तावनेत म्हणतो तसेच कादंबरीच्या शेवटी जाणीवपूर्वक 'संदर्भ ग्रंथसूची' ही देत असला, तरी त्याच्या 'कल्पनाविलासा'चा मोठा भाग पानापानात अवतरत असतोच. त्यामुळे सत्याच्या कितीही जवळ जाण्याचा त्याचा यत्न असला तरी एखाद्या व्यक्तीरेखेतील 'अप्रिय' बिंदू त्याला झाकावेच लागते.

शिवाजी सावंतांचा 'कर्ण' असो वा रणजित देसाईंचे 'माधवराव' ही पात्रे सर्वार्थाने 'स्पॉट्लेस' होती असे इतिहासतज्ज्ञ मानत नाहीत. यांच्यातही एखाद्या मनुष्यात अपरिहार्यतेने असणारे डावेउजवे गुण असतातच. पण वाचकाच्या 'भावने'ला हात घालण्याची हमखास युक्ती जर लेखकात असेल तर ते डावे गुण तिळाएवढे तर उजव्याचा आकार डोंगराएवढा करण्यात त्याला यश येते. अर्थात 'कादंबरी' लेखन हे प्रामुख्याने 'मनोरंजन' ह्या एकमेव हेतूने केले असल्याने मग त्यात सत्याचे अपलाप जरी झाले असले तरीही त्याकडे वाचक आणि समीक्षक दुर्लक्ष करतातच.

पण "इतिहासा'ला असे करून चालत नाही. तिथे 'काय घडले आणि काय घडू शकले असते' या दोनच गोष्टी महत्वाच्या बाबी आणि त्यावर फक्त एक इतिहासकार म्हणून त्या संशोधकाचे टिपण. मग सर्वसामान्य वाचकाच्या मते त्या इतिहासकारांने जाणूनबुजून तसा इतिहास लिहिला असणार अशा टपल्या येत राहतात कारण त्या वाचकाच्या मेंदूवर कुण्या खांडेकराने, दांडेकराने, इनामदाराने, देसाईने, सावंताने वा पाटलाने त्यांच्या ललितलेखनाची शस्त्रक्रिया केली असल्याने तो वाचक तिथे अन्य पर्यायाना स्थान देत नाही.

थोडक्यात इथे या क्षणी 'पानिपत' वर जर लिहायचे/बोलायचे झाल्यास "कादंबरी" लेखनातील इतिहास ग्राह्य मानू नये. त्यासाठी विविध संस्थामधून उपलब्ध असलेल्या बखरी आहेत, कैफियत आहेत, थैली आहे [होळकर घराण्याने लिखित स्वरूपात ठेवलेल्या कागदपत्रांना "थैली" म्हणतात]. हे बखरकार्/थैलीकार प्रत्यक्ष युद्धभूमीवर मौजूद असत आणि आजच्या भाषेत ज्याला 'आँखो देखा हाल' म्हटले जाते त्यासदृश्य त्यांचे अहवाल तयार होतात. बखरनवीसांनी विविध प्रसंगी नोंदविलेल्या घडामोडीच्या आधारे इतिहासकारांनी त्या त्या घटनावर आपले भाष्य केले असल्याने बखर आणि थैलींचे महत्व वादातीत आहे.

हे मान्य की इतिहासाचार्य वि.का.राजवाडे बखरीना इतिहासाचे साधनग्रंथ म्हणून मान्यता देत नाहीत, पण असे असले तरीही खुद्द राजवाडे त्यातून इतिहास वजा करा असे म्हणत नाहीत. एखाद्याला विशिष्ट काळातील इतिहासाचे निरीक्षण करायचे असेल तर ज्या माहितीच्या पायावर ती इमारत उभी राहिली आहे तो पाया म्हणजे बखर असल्याने इमारतीच्या वेगवेगळ्या खोल्यांतील गूढ रहस्य शोधण्यासाठी त्यांचा वापर करणे अपरिहार्य आहे.

त्याआधारे ज्या "भाऊं" विषयी वर उलटसुलट चर्चा चालू आहे (व राहीलही नेहमी) त्यांच्यावर बखरनवीसांची नोंद पाहू या.

हे तर आपण सर्वांनीच मान्य केले पाहिजे की, वरवर होळकर आणि शिंदे घराणी पेशव्यांचा कितीही आदर करीत असली तरी प्रत्यक्षात हे दोघेही स्वतःला "स्वतंत्र राजे" असेच मानत होते. दादासाहेबांनी अटकेपार झेंडे लावले असे आपण नेहमी वाचतो (जे खरेही आहेच) ते कार्य तडीस नेण्यासाठी त्याना मल्हारराव होळकरांची मोठी मदत झाली होती. आग्रा किल्ल्यातून गाजुदीखानास घेऊन ते दोघेही दिल्लीस आले आणि आलमगीरला पुन्हा तख्तावर बसवून गाजुदीखानास वजिरी दिली. ते कृत्य पाहून मोघलांचा आणखीन एक कर्तबगार (व तितकाच कुटील राजनितीतज्ज्ञ) नजीबखानने दिल्लीत आपला आता तग लागणार नाही या भयाने मल्हाररावांकडे राजाश्रय मागितला. मल्हाररावांना प्रेमाचे भरतेच आले आणि त्यानी नजीबला आपला धर्मपुत्र म्हणून स्वीकारले. मल्हारबाबाच्या या कृत्यामुळे दादासाहेबांनी पुढे जनकोजीला सांगून नजीबखानाचे पारिपत्य करावयास सांगितले तरी ते होण्याचे कारणही शिंदे-होळकरांमधील बेबनावच कारणीभूत. म्हणजे दोन 'मराठा सरदार' एकमेकावर कुरघोडी करण्यासाठी प्रसंगी शत्रूतील एका अंगार्‍याला आपल्या अंगरख्यात लपवत असत हेच सिद्ध झाले. तिथे पेशवे तरी काय करणार ? कारण पुणेकरांना हे नक्की माहीत होते की दिल्ली आणि परिसर जर आपल्या जरबेखाली ठेवायचा झाल्यास शिंदे-होळकरांच्या दाढ्या कुरवाळल्या पाहिजेतच.

पुढे नजीबखानाने आपले दाखवायचे आणि खाण्याचे दात वेगळे आहेत हे सिद्ध केलेच आणि वरकरणी जरी शिंदे-होळकर तंबूत आपण आहोत हे दाखविले तरी आतून सुजाउदौलाशी आणि अबदालीशी तो मराठी साम्राज्याच्या र्‍हासासाठी मेतकूट जमवत होताच. कोणत्याही पूर्व-अभ्यासाविना दत्ताजी शिंदे सुजावर चाल करून गेले पण ती चाल फसवी ठरली कारण नजीबने केलेली अबदालीशी हातमिळवणी. अबदालीच्या प्रचंड सैन्याशी शिंद्यांचे सरदार त्र्यंबक बापूजी पथकासह प्रागंदा झाले. गोविंद बुंदेले आणि भोईटे यांच्या सैन्याची कांदा कापावा अशी अबदालीने कत्तल केली. दत्ताजी शिंदेलाही प्राणास मुकावे लागले. मल्हारराव जरूर त्यानंतर जनकोजीला भेटले पण ती केवळ औपचारिक गळाभेट ठरली होती. जनकोजीची पत्नी गौतमाबाईने तर मल्हारबाबाच्या वयाचा मुलाहिजा न ठेवता युद्धात सहभागी न झाल्याबद्दल तोंडावर निर्भत्सना केली [या प्रसंगाचा उल्लेख 'होळकर थैली'तच असल्याने तो सत्यच मानावा लागेल]...

या संग्रामाचा सविस्तर अहवाल पुण्यास गेल्यावर व त्यात दत्ताजी शिंदे यांच्या वधाची तसेच अबदालीने केलेल्या कत्तलीची माहिती आल्यावर सदाशिवरावभाऊ यानी विश्वासरावांसमवेत उत्तरेची ती मोहिम हाती घेतली. मल्हारराव होळकरांना स्वत:च्या बळाविषयी खूप अवास्तव कल्पना होत्या, त्यामुळे भाऊसाहेब स्वतः उत्तरेच्या मोहिमेवर आल्याचे त्याना रुचले नव्हते, त्यानी भाऊंना माळव्यातच राहून युद्धाचे नेतृत्व करावे असे सुचविले पण बळवंतराव मेहेंदळे याना मल्हारबाबाच्या क्षमतेविषयी विश्वास नसल्याने त्यांच्या सांगण्यावरून भाऊंनी दिल्लीकडे कूच केले. दिल्लीत खर्चाची तोंडमिळवणी करण्यासाठी भाऊनी तख्तावरील छ्त पाडले, ते सुरजमल जाटास रुचले नाही व त्याने विरोधही केला. साहजिकच जाट आणि पेशव्यांचे सैन्य यात वितुष्ट निर्माण झाले [इथे हे लक्षात घेणे फार गरजेचे आहे, की आपण ज्यावेळी 'पेशव्यांचे सैन्य' म्हणतो त्यामध्ये शिंदे आणि होळकरांचे सैन्य गृहित धरू नये. हा वेगळ्या चुलींचा वेगळाच विषय होईल.]

सुरजमलचे वर्तन पाहून चिडलेल्या भाऊंनी त्यालाच आता लुटावे ["लुटणे" हे क्रियापदही बखरीतील नसून थैलीतील आहे] असा विचार मांडला, तर त्याला विरोध म्हणून उलटपक्षी जनकोजी शिंदे आणि मल्हाररावानीचे सुरजमल जाटास दिल्लीतून पळून जाण्यास सहाय्य केले. अजून अबदालीशी सामना व्हायच्या आतच इथेच मराठ्यांचा एकीच्या भिंतीस जाणवण्यासारखे तडे गेले होते. पुढे भाऊंनी तरीही कुंजपुर्‍यावर हल्ला केला आणि कुतुबशहाचा वध केला. साहजिकच आता एक झालेल्या अबदाली आणि नजीबखानाचे सैन्य भाऊंवर चालून आले. कत्तलही बरीच झाली. खर्च अवाढव्य होत चालला होता, पण म्हणून नानासाहेबांकडे विश्वासरावांनी परस्पर एक कोट रुपये पाठविण्याबाबतचा खलिता भाऊंना रुचला नव्हता. गोविंदपंत बुंदेले यांचाही नजीबच्या सैन्याने वध केला. धान्यही नाही रक्कमही नाही अशा दुहेरी गुंत्यात भाऊ सापडल्याने त्यांच्या हतबलतेची कल्पना यावी. मेहेन्दळे यांचे शिंदे-होळकर यांच्या क्षमतेविषयी कधीच चांगले मत नसल्याने तरीही ज्यावेळी जनकोजी दुराणीशी युद्ध करण्यासाठी तयार झाले त्यावेळी भाऊंनी व्यक्तिगत सूचना करून बळवंतराव मेहेन्दळेना त्यांच्या मदतीसाठी पाठविले होते. त्या युद्धात मेहेन्दळे मारले गेले, त्यांची पत्नी तिथेच त्या वीरभूमीवर सती गेली असा इतिहास आहे.

आता प्रत्यक्ष सदाशिवरावभाऊंना सैन्यामध्ये जिवंतपणा आणण्यासाठी स्वत:च युद्धात उतरणे आवश्यक होते, जे त्यानी मोठा समर्थपणे केले. युद्धात विश्वासरावांना गोळी लागून ते ठार झाले. अबदालीच्या समुद्राच्या लाटेसम सैन्यापुढे मल्हाररावांना रण सोडून जावे लागले. पण म्हणून भाऊंनी रण सोडले नाही, पराभव पाहाण्याऐवजी त्यानी मरण पत्करले. अर्थात सैन्याचीही क्रूरपणे कत्तल झाली.

हा प्रत्यक्षदर्शी इतिहास आहे.

अशास्थितीत विनाकारण त्यांच्या मरणाविषयी बोलताना ब्राह्मण-मराठा अशी वेगळी ताटे या काळात मांडून आपण नेमके काय साधत आहोत ? हा प्रश्न पडतो. कारण बखरीतील पुढील लिखाण स्पष्टच दर्शविते की ब्राह्मण आणि मराठा यानीच एकत्रितपणे अंत्यसंस्काराची कार्ये केली :

"....विश्वासरावाच्या मुडद्यासुद्धा हत्तीअंबारी सुजातदौला यांजकडे नेला होता. ते समयी सुजातदौला याजकडील उमरावगीर गोसावी याणे मागेती आणखी तीन लक्ष रुपये देऊन विश्वासराव, तुकोजी होलकर, संताजी वाघ, आणि यशवंतराव पवार असे चार मुडदे सोदवून आपलेकडे घेतले. ब्राह्मण-मराठे मिळवून तिथेच मग विधियुक्त अग्निसंस्कार साहित्य आणून सर्व मुडद्यांचे दहन केले आणि अस्थी वाराणशीस रवाना केल्या..."

प्रेतदहनसमयी कुणी हा ब्राह्मण आणि तो मराठा असा विचार केल्याचे बिलकुल दिसून येत नाही. 'जे मेले ते मराठा साम्राज्याचे ते प्रतिनिधी' अशीच त्यामागील भूमिका होती हे स्पष्ट असताना आज जातीवरून वा केलेल्या वा न केलेल्या पराक्रमाबद्दल वितंडवाद घालणे अयोग्य.

अशोक पाटील

>>> पण अत्यंत महत्वाची गोष्ट अशी की काही इतिहासकारांच्या मते भाऊसुद्धा पळून गेला... सोनवणीने तर चक्क भीमनाकानी भाऊला वाचविल्याचे लिहले आहे.

सोनवणी बरेच काही खरडत असतात. ते वाचू नये. वाचल्यास करमणूकीच्या उद्देशाने वाचून सोडून द्यावे.

सोनावणी सोडून बाकीचे जे काही लिहितात, त्याला तरी करमणुकीशिवाय दुसरे काय मूल्य आहे? इतिहासाच्या नावानं लोक एक तर भाटगिरी करतात नाहीतर शंख्ध्वनी तरी.. एखादा आपल्या जातीतला, प्रांतातला, धर्मातला असला की शूर, मुत्सद्दी... दुसर्‍या बाजूचा असला तर क्रूर, लुटारु, पैशाचा लोभी आणि सत्तेला हपापलेला..

सोनावणीनी पुढे आणलेले मुद्दे...

१. मराठे म्हणजे धीरोदात्त नायक व इतर सर्व वेगवेगळ्या दर्जाचे खलनायक असे आपण समजतो. सोनवणींच्या मते मराठ्यांच्यासह सगळेच आपापला स्वार्थ व फायदा पहाणारे होते - अमुक बरे व तमुक वाईट असे काही नव्हते. जनतेच्या भल्याबुर्‍याचे कोणालाच सोयरसुतक नव्हते, तीच गत धर्माचीही.
२. शिवाय ही सर्व पात्रे (त्यांच्या पूर्वजांच्या तुलनेत) सुमार करतबगारीची होती. मराठे चौथाई वगैरे सारखे वायदे केले की पुढे उपद्रव देत नसत. शिन्दे, होळकर, गायकवाड, इ. सरदार आपापली तळी भरण्यात दक्ष होते पण एकूण पेशवे वसुलीबाबत फारसे कार्यक्षम नसत.
३. औरंगजेबानंतरचे पादशहा नालायक होते. दिल्लीमध्ये सरदारांचे अंतर्गत कलह व राजकारण संघर्ष हेच अधिक होते व पादशहाला महत्व उरले नव्हते. नादिरशहाने दिल्लीची लूट केल्यावर त्या भागात फारसे काही मिळण्याजोगे राहिलेले नव्हते. शाह वली उल्लाह् हा मात्र नजीबखानासारख्याना हाताशी धरून धार्मिक राजकारण चालवीत होता.
(पानिपत संघर्ष सुरू असताना व मराठे स्वतःला दिल्लीच्या पादशाहीचे व तख्ताचे रक्षणकर्ते म्हणवत असताना स्वतः पादशहा दुसरीकडेच - बिहारमध्ये - या घडामोडींपासून अलिप्त व दूर होता आणि त्याने नजीबाच्या नावाने आपण त्याला अमुक अधिकारी नेमल्याचे पत्रही दिले होते.)
४. त्यामुळे राघोबांनी अटक घेतली वगैरे मध्ये खास कर्तबगारी तर नव्हतीच पण फायदाही नव्हता. याचमुळे ते कोटींचे कर्ज करून आले.
५. भाऊ हे युद्धसेनापती होण्याच्या योग्यतेचे नव्हतेच. शिवाय् युद्ध करण्याचा त्यांचा हेतूही नसावा, नाहीतर त्यांनी २-३ लाख बाजारबुणगे बरोबर घेतलेच नसते. शेवटपर्यंत त्यांनी युद्ध टाळण्याचाच प्रयत्न केला. पेशव्यांनाही युद्ध अपेक्षित नसावे नाहीतर त्यांनी विश्वासरावाला पाठवले नसते. लढायचेच असते तर भाऊंऐवजी रघुनाथरावांची नेमणूक योग्य झाली असती.
दत्ताजीचा मृत्यू हा अपघात होता पण त्याने झालेल्या मानहानीबद्दल "काहीतरी" केले पाहिजे म्हणून ही पानिपताची मोहीम आखली गेली.
६. नजीबाविषयी मराठ्यांचे धोरण व आकलन एकसूत्र नव्हते. दत्ताजी शिंदेही इतकी वर्षे उत्तरेत राहूनही नावांचा पूल बांधून देण्यासाठी नजीबावर अवलंबून राहिले व त्यानेही या ना त्या सबबीखाली ते करायचे टाळले. होळकरांचे तर शेवटपर्यंत नजीबाशी संवाद् होतेच.
७. इतके करून जो मराठ्यांचा मित्र ठरू शकला असता, त्या सफदरजंगाशी व शुजाउद्दौल्याशी पैशाच्या लोभाने त्यांनी नाहक शत्रुत्व घेतले. एकूणच मराठ्यांनी आपल्या क्षुद्र स्वार्थापोटी बहुतेकांना दुखावले, आपले शत्रू बनवले व शेवटी दिल्लीचे तख्त फोडून जनतेचाही असंतोष पत्करला.
८. लढाईत रस नसल्यामुळे एकूण भाऊच्या हालचाली धीम्या गतीने चालल्या होत्या. कुंजपुरा जिंकल्यावर उपाशी मराठ्यांची पोटे भरली व मग ते सुस्तावले नि लढाईचा पाठपुरावा न करता केवळ कुरुक्षेत्रावर धर्मकार्ये करण्यासाठी यमुना ओलांडून गेले -- आणि कचाट्यात् सापडले.
९. अगदी लढाईच्या शेवटच्या दिवशीही भाऊंचा इरादा पलायनाचाच होता, गोलाची लढाई ही सुरक्षित पलायनासाठीच योग्य असते.
भाऊंनी स्वतःसुद्धा विश्वासराव पडल्यावर पळ काढला. भाऊ पानपतात मरण पावले याची कुठेही नोंद-पुरावा नाही. तोतयाप्रकरणीदेखील त्याकाळात फारशी चिकित्सा झालेली इतिहासात दिसत नाही, तपशीलांबद्दल मौनच दिसते.

संदर्भ : आंतरजाल http://mr.upakram.org/node/3056

अशोकराव, तुमचे अभिनंदन अतीशय अभ्यास पूर्ण आणि संयमीत पोस्टी. दुर्दैवाने जसे आपले राजकारणी स्वतःची पोळी भाजतात तद्वत इथे काही लोक मुद्दामच कळ काढताना दिसतात. थोडक्यात आपण इतिहासातून काहीही शिकलेलो दिसत नाहीये. इतिहासातील प्रत्येक व्यक्तीला एका साचत अडकून पडतो आहोत. चालायचेच बहुदा हा संक्रमणाचा काल मानुयात. अजून किती वर्ष असे चालायचे ते माहिती नाही पण अशी लोक बाकीच्यांपेक्षा काहीच वेगळी दिसत नाहीत. फक्त पूर्वी एका जमातीने असे केले आणि आता त्यांचाच कित्त गिरवून नवीन इतिहास लिहून अजून तेढ निर्माण करणे हा उद्योग.

होय.

एखादा आपल्या जातीतला, प्रांतातला, धर्मातला असला की शूर, मुत्सद्दी... दुसर्‍या बाजूचा असला तर क्रूर, लुटारु, पैशाचा लोभी आणि सत्तेला हपापलेला..

आपले हे वाक्य काही पटले नाही.. Happy

धागा कितीही असंबध्द पोस्टी आल्या तरी काही भरकटलेला नाही..... अधूनमधून पडणार्‍या पोस्टी खूपच चांगली माहिती देत आहेत.......

सेनापती, तू खरेच खूप चिकाटीने आणि नेटाने सावरतोयेस.... शिवाय अशोकरावांची साथ आहेच.

सेन्या, हीच चिकाटी तिथे पानिपतात दिसली असती तर Sad
(आता यावरून सेनापती पानिपतात होता की काय असे नको कोणी म्हणायला..... सेन्या, आधीच जाहिर कर रे तू ठाण्यात किती साली प्रगट झालायस...... Proud नाहीतर तुझ्यावर पण एखादा लेख यायचा Wink )

आपले हे वाक्य काही पटले नाही..

कसे पटणार? तुमच्या दृष्टीने मी दुसर्‍या बाजूचा असणार Happy

>>सेन्या, हीच चिकाटी तिथे पानिपतात दिसली असती तर <<
लढाया फक्त चिकाटी आणि दुर्दम्य ईच्छाशक्तीवर जिंकता येत नाहित, त्यासाठी उत्तम नियोजनाची आणि शीघ्र निर्णयाची (वॉरटाइम डायनामिक्स) सुध्धा आवशक्यता असते. कदाचित आपण त्यात तोकडे पडलो.

Pages