खूप लहान असताना श्री. शरद उपाध्ये यांचा "राशीभविष्य" (की "राशीरंजन") हा कार्यक्रम पाहिला होता. त्यात प्रत्येक राशीच्या लोकांचे स्वभावविशेष विनोदी ढंगात (बर्याचदा अतिशयोक्तीपूर्ण प्रसंगांचा आधार घेऊन) सादर केलेले होते. त्यातला विनोदनिर्मिती साठी वापरलेल्या अतिशयोक्तीपूर्ण प्रसंगांचा भाग सोडून द्या! पण राशींचा जो बेसिक स्वभाव असतो तो त्या त्या राशींच्या सर्व लोकांना तितक्याच प्रमाणात अप्लिकेबल असतो का?? मला तरी तसे वाटत नाही. कारण मग जगात फक्त १२ राशींप्रमाणे १२ प्रकारचेच स्वभाव असलेली माणसे असली असती. म्हणजे जगातल्या सर्व लोकांना फक्त १२च कॅटेगरीत विभागता आले असते. म्हणजेच अमुक एक जण अमुक राशीचा म्हणून त्या त्या राशीसाठी प्रसिद्ध असलेले सर्व स्वभाव विशेष त्यात असतीलच असे नाही.
उदा. कर्क - या राशीची माणसे प्रेमळ स्वभावाची असतात. स्वयंपाकघरात रमणारी असतात. (पुरुष असले तरीही).
सिंह - खमकी लोकं असतात.
कन्या - संशयी स्वभाव. आत्मविश्वासाचा अभाव.
तूळ - बॅलन्स्ड व्यक्तिमत्त्व
इ.इ.
राशीप्रमाणे तुमचा स्वतःचा आणि जवळच्या लोकांचा तुमचा काय अनुभव आहे? प्रत्येक वेळी राशीवरून व्यक्तीचा बेसिक स्वभाव (संपूर्ण स्वभाव नाही) जज करता येतो का?
राशींनुसार व्यक्तिमत्त्वाचे नमुने
Submitted by निंबुडा on 15 February, 2012 - 05:34
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
दिनेशदा, लिंबुदा, माझी रास
दिनेशदा, लिंबुदा, माझी रास ओळखा की....
(मला वाटतं सुनील गावस्कर आणि
(मला वाटतं सुनील गावस्कर आणि सचिन दोघेही सिंह आहेत. ) >>> दा... सचिन धनु राशीचा आहे. पुर्वाषाढा की उत्तराषाढा ते नक्की माहित नाही... २५ फेब. नंतर त्याच्यावर गुरुची कृपा दृष्टी होऊन विलंबित आणि अपेक्षित फळ मिळेल असे वाटते. :p
मी आणि माझा नवरा दोघे सिंह
मी आणि माझा नवरा दोघे सिंह रास्.....जन्मपत्रिका मधे दोघांच्या स्वभावात एकच फरक लिहलाय्...मी हट्टी आणि तो चिडचिडा...प्रत्यक्ष तसेच आहे :P....आता आमचा संसार कसा चालु असेल तुम्हाला अंदाज आलाच असेल

लिंबूदा, पत्रिकेवरून
लिंबूदा, पत्रिकेवरून मृत्यूबद्दल काय काय समजते?
एकही ज्योतिषी बाराव्या स्थानाबद्दल बोलत नाही.
लिंबूदा, पत्रिकेवरून
लिंबूदा, पत्रिकेवरून मृत्यूबद्दल काय काय समजते? >>> जल्ला काय माणूस हाय... लग्ना आधीच मरायची भाषा... शो. ना. हो.
लिंबू सांगेलच पण मृत्यूबद्दल
लिंबू सांगेलच पण मृत्यूबद्दल सांगायचे नाही, असे नैतिक बंधन ज्योतिषांनी स्वतःवर घालून घेतलेले आहे.
लाजो, बहुतेक वृश्चिक.
माझ्या अंदाजाप्रमाणे, वर्षू तूळ असणार तर अकु, मिथुन (अंदाचच फक्त.) जिप्स्या, कर्केचा असेल. मामी, सिंहेची.
चंद्ररास, सूर्यरास, लग्नरास तशी एक माबोरास पण वेगळी कॅटेगरी आहे.
दिनेशदा, मी धनु आहे. सौररास
दिनेशदा, मी धनु आहे. सौररास मेष.
जल्ला काय माणूस हाय... लग्ना
जल्ला काय माणूस हाय... लग्ना आधीच मरायची भाषा... शो. ना. हो.
अरे इंद्रा तुलाही ज्योतिषातलं एवढं कळतं हे मला माहितच नव्हतं
बाकी लग्न-बिग्न तर मोहमाया आहे रे!

सत्य दोनच - जन्म आणि मृत्यू!
दिनेशदा, अगदी बरोबर. हे बन्धन
दिनेशदा, अगदी बरोबर. हे बन्धन आहेच. किम्बहुना, मूळात अडचणित सापडलेला जातक प्रश्न घेऊन येतो, तेव्हा त्याची भिती घालवुन त्याची उमेद वाढविण्याकरताच ज्योतिषाचा वापर करावा असेही सन्केत आहेत.
अन्य प्रकारे, दुसर्या शब्दात सान्गायचे तर जातकाच्या वैयक्तिक/अन्यकुणाकडुन केलेल्या अनेकविध उपायान्नी "भविष्यातील ज्या घटना/त्यान्चे संदर्भच बदलता येऊ शकते" तितकेच सान्गायला परवानगी आहे. अलिखित अटळ खास करुन अशुभ घटना शक्यतो वर्तवु नयेत असाच सन्केत पाळला जातो.
शक्यतोवर "शुभ तेवढेच बोलले-उच्चारले जाते", वर कोणीसे म्हणल्याप्रमाणे तशी, "वाचासिद्धी" असेल तर हा नियम फारच कसोशीने पाळावा लागतो. "वाचासिद्धी" येण्यासाठीही अनेक दीर्घकालिक साधना/उपाय आहेत. पण सामान्यमाणसास, व्यावहारिक जगात जगताना ते उपाय अंमलात आणणे बव्हंशी अशक्यप्रायच ठरते. तरीही, पूर्वापार चालत आलेल्या अनेक रिती/संस्कारातून, हे व अशाच प्रकारचि साधना/उपाय करवुन घेतले जातात. (असे माझे मत).
अर्धवट माहिती वाचून, वा अर्धवट ज्ञानाद्वारे, व्यक्ति चूकीचे अन्दाज बान्धू शकते, यामुळे विशिष्ट मर्यादेपलिकडे भविष्यकथनाच्या "गुढ" विषयान्वर जाहीर चर्चा/वादविवाद वगैरे टाळले जातात. व विशिष्ट ज्ञान गुरूमार्फतच प्राप्त करावे लागते, ते पुस्तकातुन मिळत नाही. गुरू उपलब्धच नसेल, तर साधना/जपजाप्य याद्वारे ते प्राप्त होऊ शकतेच शकते असाही विश्वास आहे. अन गुरू कोणत्या जातीधर्माचा असेल, यास बन्धन नाही, इतकेच नव्हे, तर गुरू हा मानवच असावा/सजीवच असावा, असेही बंधन नाही. ज्ञानप्राप्तीचा दृढ निश्चय, दृढ निष्ठा व दृढ श्रद्धा मात्र हवीच हवी.
लिंबूदा, प्रश्न माझा होता.
लिंबूदा, प्रश्न माझा होता. माझा अनुल्लेख केलात हे बरं केलं नाहीत हो!
लिंबूदा, तुम्ही इतक्या
लिंबूदा, तुम्ही इतक्या डिफेन्सिव्ह पोझिशनमधे जाल असं वाटलं नव्हतं!
असो, हा धागा मजा म्हणूनच घेतला जातो आहे असे वाटले म्हणून गमतीने विचारले, त्यात पुन्हा आपले 'सुखसंवाद' नेहमी होतच असतात त्यावरुन तुम्ही काय अंदाज बांधाल असा विचार मी करीत होतो. तुम्हीही ते लाईटली घ्याल असे वाटले होते पण.....
मला कुंडलीची गरज नाही हे मात्र खरेच!
पर्फेक्ट दिनेशदा माझी सन
पर्फेक्ट दिनेशदा

माझी सन साईन वृश्चिक
आता चंद्ररास सांगा
आणि मी दिनेशदा?
आणि मी दिनेशदा?
दिनेशदा माझी रास सांगा ?
दिनेशदा माझी रास सांगा ?
मज्जा चाललीये नुस्ती. लिंडा
मज्जा चाललीये नुस्ती.
लिंडा गुडमनच पुस्तक सगळ्यांनी वाचाच. मस्त टाईमपास
ओक्के आगावा, तुझी रास मला
ओक्के आगावा, तुझी रास मला सिंह किन्वा वृश्चिक वाटते. (कदाचित तूळ ही असू शकेल)
धन्यवाद, पण १२ पैकी ३ हे जरा
धन्यवाद, पण १२ पैकी ३ हे जरा जास्तच रँडम होतेय का?
अर्थात तुम्ही ह्या तीन का म्हणाताय याचा अंदाज नक्कीच करु शकतो
>>> अर्थात तुम्ही ह्या तीन का
>>> अर्थात तुम्ही ह्या तीन का म्हणाताय याचा अंदाज नक्कीच करु शकतो <<<
मग आता तुझा तो अन्दाजही इथे मान्डच की!
र्यान्डम चे सोड रे, तू तसल(च) काही म्हणणार म्हणूनच मी डिफेन्सिव पोझीशन मधे गेलो होतो.
>> ज्ञान गुरूमार्फतच प्राप्त
>> ज्ञान गुरूमार्फतच प्राप्त करावे लागते, ते पुस्तकातुन मिळत नाही. गुरू उपलब्धच नसेल, तर साधना/जपजाप्य याद्वारे ते प्राप्त होऊ शकतेच शकते असाही विश्वास आहे. अन गुरू कोणत्या जातीधर्माचा असेल, यास बन्धन नाही, इतकेच नव्हे, तर गुरू हा मानवच असावा/सजीवच असावा, असेही बंधन नाही. ज्ञानप्राप्तीचा दृढ निश्चय, दृढ निष्ठा व दृढ श्रद्धा मात्र हवीच हवी. >>
ह्ये ब्येष्ट
ओके, हा घ्या माझा अंदाज! मला
ओके, हा घ्या माझा अंदाज!
मला कुंडलीची गरज नाही हे मात्र खरेच! >>> हा कदाचित वृश्चिकपणा
त्यात पुन्हा आपले 'सुखसंवाद' नेहमी होतच असतात त्यावरुन तुम्ही काय अंदाज बांधाल असा विचार मी करीत होतो.>>> हा कदाचित 'सिंह'पणा
आणि हे दोन्ही एकाच पोस्टीत आहे, हा कदाचित 'तूळ'पणा
मामी मी पण धनु..वर झंपी ने
मामी मी पण धनु..वर झंपी ने धनुवाल्यांना धूर्त म्हटले आहे..ह्या झंपीचं काय करायच????
माझी जाऊ आणि दिर दोघेही सिंह
माझी जाऊ आणि दिर दोघेही सिंह पण दोघांच्या स्वभावात खुप फरक आहे. एक शांत तर एक शिस्तप्रिय.
नाव बदलले की रास बदलते अस मी मध्ये ऐकल होते ते खर आहे का ? ज्यांची नावे राशीप्रमाणे ठेवत नाहीत त्यांचे स्वभाव त्यामुळे वेगळे होऊ शकतात का म्हणजे कदाचीत दक्षिणा आणि दिनेशदांची नावे नावराशीवरून नसतील ठेवलेली ..
लाजोच्या प्रफेक्शनिस्ट
लाजोच्या प्रफेक्शनिस्ट असण्यावरुन अंदाज बांधला. (ज्या खटपटीच्या पाककृती आणि त्यांचे लेखन असते त्यावरुन.)
मामी, धनु म्हणजे लेकीची चंगळ.. बघ हं मी रागावेन ! अशी धमकी, कायम. रागवायचे मात्र नाही.
हसरी बहुतेक कन्या. (सारखी काळजी असते ना ?)
आगाऊ, वृषभ किंवा मिथुन असू शकेल (बाकिंच्याच्या डोक्याला ताप देऊन, स्वतः बिनघोर राहणे.)
>>>ह्ये ब्येष्ट <<< खरच
>>>ह्ये ब्येष्ट <<< खरच कौतुकाने म्हणते आहेस की......?
>>>>मला कुंडलीची गरज नाही हे मात्र खरेच! >>> हा कदाचित वृश्चिकपणा <<<<
= वृश्चिकपणा मी तुझ्या आयडीवरुन ठरवला (पण विक्षिप्तपणाचा आव आणणे हे काही खर्या वृश्चिकेचे रुप नाही, सबब, दुसरी रास शोधू लागलो)
>>>>त्यात पुन्हा आपले 'सुखसंवाद' नेहमी होतच असतात त्यावरुन तुम्ही काय अंदाज बांधाल असा विचार मी करीत होतो.>>> हा कदाचित 'सिंह'पणा <<<<
पण सिंह एका डरकाळीशिवाय दुसर्या कसल्याच प्रकारे कसलाच कबुलीजबाब देऊ शकत नाही, अन तू तर इथे.....
म्हणुन अजुन एक रास शोधू पाहिली)
= नाही, सहसा कुठल्याच "कम्पुत" तुला सामिल झालेला बघितला नाही, अन तरीही कुठे कुठे एकेकट्याने जाऊन विनाकारणच फोडलेल्या "वैचारिक डरकाळ्या/गुरगुर" मात्र बघितलीये, म्हणून सिंह
>>>> आणि हे दोन्ही एकाच पोस्टीत आहे, हा कदाचित 'तूळ'पणा <<<<
काय पटतय ना? 
= हे बरेचसे बरोबर आहे. तरीही, जगाच्या दृष्टीने तुळ रास "ब्यालन्स" करण्यात उत्कृष्ट समजली जात असली तरी माझे दृष्टीने, "अन्ग सावरणे" यात ती जास्त वाकबगार असते. म्हणजे असे की पाचर काढल्यामुळे जशी माकडाची शेपटी अडकते वा दोघान्चे भाण्डण सोडवायला गेलेलाच दोघान्कडूनही फटके खातो, तशाप्रकारे तूळेचे कधीच होत नाही. हे "आपले अस्तित्व/अन्ग शाबुत ठेवण्याचे" व काळवेळेनुसार भुमिका बदलायचे/बदलल्यासारखे दाखविण्याचे/तात्पुरते नमते घेण्याचे ब्यालन्सिन्ग तुळेला अत्युत्कृष्ट पणे जमते. म्हणून तूळ
अन गुरू कोणत्या जातीधर्माचा
अन गुरू कोणत्या जातीधर्माचा असेल, यास बन्धन नाही, इतकेच नव्हे, तर गुरू हा मानवच असावा/सजीवच असावा, असेही बंधन नाही. ज्ञानप्राप्तीचा दृढ निश्चय, दृढ निष्ठा व दृढ श्रद्धा मात्र हवीच हवी.>>>>
हे अगदी पटलं. लींबुजी तुमचं विवेचन छान आहे. श्रद्धेने केलेली कोणतीही गोष्ट फायदा देतेच. मग गुरु कोणताही असो. गुरु म्हणजे प्रेरणा. मग ती सजीव, निर्जीव, जात्-पात ह्या सगळ्याच्या पलिकडे असते.
मागे अनील अवचटांचा एक लेख वाचला. ते पक्के निरिश्वर वादी आहेत. पण तरीही ध्यान एकाग्रता ह्याच्या वर त्यांचा विश्वास आहे. ग्रॅन्ड कॅनियन पाहिल्यावर त्यांनी असे लिहिले आहे, की ध्यान करताना डोळ्यासमोर आणायला एक भव्य रुप मिळालं.
>>>>ह्ये ब्येष्ट <<< खरच
>>>>ह्ये ब्येष्ट <<< खरच कौतुकाने म्हणते आहेस की......? >> अगदी मनापासून म्हणत आहे. अख्ख्या बाफावर तेच एक काय ते ग्राह्य आहे
माझी चंद्ररास वृषभ आनि
माझी चंद्ररास वृषभ आनि नक्षत्र रोहिणी. लग्नरास वै. काये ते माहीत नाही. या काँबिनेशन बद्दल जाणकारांनी लिहा प्लीज.
जागू आपल्याकडे नावरस नाव
जागू आपल्याकडे नावरस नाव सांगायची पद्धत नव्हती पुर्वी. माझे खरे नाव, महेश.
दक्षिणेचे, खरे नाव मात्र द वरुनच आहे.
आगाऊच्या रुपड्यात, मला मिथुन ची शक्यता वाटली.
दिनेशदा माझी रास ओळखा पाहू...
दिनेशदा माझी रास ओळखा पाहू...
:धमकी देणारी बाहुली: 
>>> माझी चंद्ररास वृषभ आनि
>>> माझी चंद्ररास वृषभ आनि नक्षत्र रोहिणी. <<< मग दिसायला सार्वकालिक "सुन्दर-आकर्षक-प्रसन्नच" असणार हे नक्की!
दिनेशभौ, सगळ्यान्च सान्गताय, मग माझ्या "लिम्बुटिम्बुच्या" रुपड्यात तुम्हाला काय शक्यता वाटते ते सान्गा की?
Pages