राशींनुसार व्यक्तिमत्त्वाचे नमुने

Submitted by निंबुडा on 15 February, 2012 - 05:34

खूप लहान असताना श्री. शरद उपाध्ये यांचा "राशीभविष्य" (की "राशीरंजन") हा कार्यक्रम पाहिला होता. त्यात प्रत्येक राशीच्या लोकांचे स्वभावविशेष विनोदी ढंगात (बर्‍याचदा अतिशयोक्तीपूर्ण प्रसंगांचा आधार घेऊन) सादर केलेले होते. त्यातला विनोदनिर्मिती साठी वापरलेल्या अतिशयोक्तीपूर्ण प्रसंगांचा भाग सोडून द्या! पण राशींचा जो बेसिक स्वभाव असतो तो त्या त्या राशींच्या सर्व लोकांना तितक्याच प्रमाणात अप्लिकेबल असतो का?? मला तरी तसे वाटत नाही. कारण मग जगात फक्त १२ राशींप्रमाणे १२ प्रकारचेच स्वभाव असलेली माणसे असली असती. म्हणजे जगातल्या सर्व लोकांना फक्त १२च कॅटेगरीत विभागता आले असते. म्हणजेच अमुक एक जण अमुक राशीचा म्हणून त्या त्या राशीसाठी प्रसिद्ध असलेले सर्व स्वभाव विशेष त्यात असतीलच असे नाही.
उदा. कर्क - या राशीची माणसे प्रेमळ स्वभावाची असतात. स्वयंपाकघरात रमणारी असतात. (पुरुष असले तरीही).
सिंह - खमकी लोकं असतात.
कन्या - संशयी स्वभाव. आत्मविश्वासाचा अभाव.
तूळ - बॅलन्स्ड व्यक्तिमत्त्व
इ.इ.
राशीप्रमाणे तुमचा स्वतःचा आणि जवळच्या लोकांचा तुमचा काय अनुभव आहे? प्रत्येक वेळी राशीवरून व्यक्तीचा बेसिक स्वभाव (संपूर्ण स्वभाव नाही) जज करता येतो का?

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माहितीतल्या -
५ मकर व्यक्तींपैकी ३ चे शिक्षण अर्धवट, एकीचे (कॉमर्स साईड ची कॉलेज रँकर असूनही) अपेक्षित यश नाही(सीए परीक्षेत), २ व्यक्तींना शिक्षणात अजिबात रस नाही.
४ वृषभ पैकी ३ अतिशय कामसू व १ कामात आळशी.
१ मिथुन - बडबडी.
२ मीनेच्या व्यक्ती निर्णय घ्यायला अत्यंत वेळ लावणारया व सतत द्विधा मनस्थितीत. संशयी व कडेकोट सुरक्षा ठेवणारया (कुलूप ५,५ वेळा ओढून नीट बसले की नाही तपासणे,कुठेही सही करताना नीट वाचून सही करणे,कुणावर पटकन विश्वास न ठेवणे,सतत शंका काढणे)

नुसत्या एका चंद्राच्या राशीवर माणसाचे व्यक्तीमत्व ठरत नाही. माझी रास धनु आहे. शरद उपाध्ये म्हणतात तस माणुस की घोडा अनुभवाला येते. परंतु माझे कन्या लग्न आहे. ( लग्न रास हा स्वतंत्र विषय आहे ) याचे गुण ही दिसतात. मी चिकित्सक आहे हा गुण कन्या राशीचा आहे. आत्मविश्वासाची कमी इतरांना जाणवतेच अस नाही. काम कुठल आहे हे त्यावर अवलंबुन असते.

मायबोलीवरच्या पोस्ट्स वरुन रास ओळखता नाही येत हे मी आणि दक्षिणाने सिद्ध केलेय !!
>>>>>>>>>>>>>>>>>>>>

दिनेशदा तुमच्या दोघांच्या कुंडल्या चुकल्या असणार Proud

दक्षी कर्क आणि तुम्ही सिंह कैच्याकै....... Light 1

कुंभः कमरेचे सोडुन देणारे. संत व्यक्ती. खुप हुषार. पण थोडे पुढेपुढे करण्यात कमी पडणारे. >>>>>> माझा नवरा Sad

वृश्चिक - नांगी मारतात. एखाद्याचा सूड घायचा असेल तर संधी सोडत नाहीत >>>>>> निंबे :रागः
मी वृश्चिक. पण मी नाही ब्वा अशी Wink

२ मीनेच्या व्यक्ती निर्णय घ्यायला अत्यंत वेळ लावणारया व सतत द्विधा मनस्थितीत. संशयी व कडेकोट सुरक्षा ठेवणारया (कुलूप ५,५ वेळा ओढून नीट बसले की नाही तपासणे
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>

परफेक्ट शाम Happy

दिनेशदा... Lol

वृश्चिकेत 'अनुराधा' नक्षत्रवाले देवगुणी आणि जरा सौम्य असतात आणि वृषभेसारखे कलासक्त. आठवा अनुराधा पौडवाल.
तसेच कर्केत पण 'पुष्य' देवगुणी तर 'आश्लेषा' कर्क राशीच्या स्वभावगुणविशेषाविरुद्ध! Proud

>>> १. लग्न राशी वरुन म्हणजे पत्रिकेतील पहिल्या स्थानात जी रास असेल त्या वरुन संबंधीत व्यक्तीच्या स्वभावाचे वर्णन केले जाते.
२. चंद्र राशी वरुन कर्म संबंधीत भाकीत केले जाते. <<<<
इन्द्रा, बरोबर, पण,
लग्न राशीवरुन सहसा तब्येत/शरिरयष्टी इत्यादिक बघितले जाते. नशिबात काय काय वाढुन ठेवलय ते बघितले जाते, तर चंद्र राशीवरुन, मिळालेली नशिबाची बैठक कशी वापरली जाईल् ते बघितले जाते. अर्थात, चंद्र मनाचा कारक असल्याने स्वभाव देखिल चंद्रराशिवरुन बघितला जातो.
बरेचदा;
१. लग्नी अथवा चंद्रासोबत कोणता बलिष्ठ ग्रह असेल्,तर राशिसहितच त्या त्या ग्रहाचे परिणामही स्वभावावर स्पष्ट आढळून येतात.
२. लग्न रास व चंद्र रास, यांचे मधिल योगाचे तानमानाने, लग्नरास चालेल, की चंद्ररास, ते ठरवावे लागते.
३. बारा राशीव्यतिरिक्त, वर म्हणल्याप्रमाणे नक्षत्र (त्यातिल एक चतुर्थांश भागाचा विचार करीत), चन्द्र रास, लग्नरास, आणि महत्वाचे ग्रहयोग/लग्नचन्द्रातील योग इत्यादीन्चा समुच्चित विचार करुन मगच अचूक प्रेडिक्शन करणे शक्य होते.

सबब, निव्वळ बारा राशीमधे जगातील यच्चयावत लोकसन्ख्या "बसविणे" ज्योतिषाला अपेक्षित नाहिच्चे, पण ढोबळमानाने हे आडाखे बरोबरच येतात हे देखिल खरय.

इथे "गहन गम्भिर" चर्चा अपेक्षित नसल्याने, इथेच थाम्बतो. Happy

दक्षी कर्क आणि तुम्ही सिंह कैच्याकै....... >>> भुंग्या... प्रत्येक सिद्धांतला काही ना काही उपवाद असतोच की Wink

लिंब्या... मौलिक भर पडली... धन्यवाद Happy

इथे "गहन गम्भिर" चर्चा अपेक्षित नसल्याने, इथेच थाम्बतो.
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>

आता या समंजसपणावरून सांगा बघू लिंबूदांची रास कोणती ते??? Wink

वृश्चिक - नांगी मारतात. एखाद्याचा सूड घायचा असेल तर संधी सोडत नाहीत>>> माझा असा अनुभव नाही

दक्षेला मी गेली आठ वर्षे ओळखतो, त्यामूळे ती कर्केची हे अगदी ठामपणे सांगू शकेन. (ती माझ्याबद्दल काय म्हणते ते बघू या.)

माझी आई कन्या, सतत काळजी. सगळे लवकर घरी आलो तर मी वाट कुणाची बघू, अशी काळजी असते तिला.

माझी बहीण आणि वहिनीची मैत्रिण, तूळा राशीच्या. कधीही कोणावर चिडलेल्या बघितल्या नाहीत. कुणावर अन्याय करतील, याची शक्यताच नाही. दोघीही नवर्‍यांच्या व्यवसायाचे उत्तम नियोजन करत आहेत.

धनु राशीचा एक मित्र. पोकळ धमक्या देण्यात पटाईत. पण हातून काही होणे नाही.

आणखी एक मायबोलीकर, कुंभ राशीचा. डोळ्याच्या कडा कायम ओल्या. जरा म्हणून चिडता येत नाही त्याच्यावर.

पुतण्या, मकर राशीचा. अति धडपड्या.

एक जुनी मायबोलीकर. वृश्चिक राशीची. प्रचंड मेहनती. एकाग्रपणे काम करण्याची तिची कुवत अचंबित करणारी.

थोडेसे अवांतरः
पनवेलमधील सुप्रसिद्ध 'धूतपापेश्वर' या आयुर्वेदीक औषधांच्या कंपनीत उमेदवाराची पत्रिका शरद उपाध्येंना दाखवुन मगच नोकरी देतात असं ऐकलं होतं! Uhoh

वृश्चिक - नांगी मारतात. एखाद्याचा सूड घायचा असेल तर संधी सोडत नाहीत>>> माझा असा अनुभव नाही
>>>
अ‍ॅक्च्युली माझाही नाही. पण जे ऐकले आहे ते लिहिले.

मी वृस्चिक-अनुराधा नक्षत्र.... Happy असे लोक कलासक्त असतात काय? मला शास्त्रीय संगीत आवडते.

चंद्रराशीची वृश्चिक व्यक्ती आणि सूर्यराशीची वृश्चिक व्यक्ती.. यांचे स्वभाव सारखे असतात का???

वृश्चिक हे फक्त उदाहरण... एकाच राशीचे गुण दोन्ही, चंद्र आणि सूर्य राशीत सारखे असतात क

पनवेलमधील सुप्रसिद्ध 'धूतपापेश्वर' या आयुर्वेदीक औषधांच्या कंपनीत उमेदवाराची पत्रिका शरद उपाध्येंना दाखवुन मगच नोकरी देतात असं ऐकलं होतं!

सरसकट सगळ्याच नाही. काही महत्वाच्या ( की पोझीशन्स ) पत्रिका उपलब्ध असल्यास बघण्याचा काही कंपन्यांचा कल असतो. एच आर मध्ये योग्य उमेदवारांची निवड करताना काही सपोर्टींग टुल्स वापरली जातात. काही कंपन्या सायकोमेट्रीक टुल्स वापरतात ज्यात एच आर प्रोफेशनल्स ना ती थोड्याश्या ट्रेनिंगने सहज वापरता येतात.

जर कंपनीचा मालक ज्योतिषशास्त्र आणि ज्योतिषी यांच्यावर विश्वास ठेवणारा असेल तर लहान कंपनीत हे शक्य आहे. यात ज्योतीषाला व्यावसायीक अनुभव असणे पण गरजेचे आहे.

उदा. पर्चेस मॅनेजर घ्यायचा आहे. ह्या माणसाच्या जबाबदार्‍या काय असतात हे महित असलेला ज्योतिषी हा माणुस विश्वासार्ह आहे हे पत्रिका पाहुन याबाबत निर्वाळा देऊ शकेल.

वृश्चिकेचा एक चांगला गुण म्हणजे ते कायम असमाधानी असतात. असमाधान असते ते स्वत:च्याच कामगिरीवर. त्यामूळे ते सतत प्रगती करायचा प्रयत्न करत असतात आणि त्यासाठी प्रचंड कष्ट करायची त्यांची तयारी असते. त्यांच्या तूलनेत बाकिचे कष्ट करण्यात कमी पडतात, आणि त्याचा त्यांना राग येतो. संशोधन क्षेत्रात ते जास्त यशस्वी होतात.

माझा एक डोगरी मित्र आहे. टिपीकल वृषभ. आग्रह करावा तर त्यानेच. त्याच्याबरोबए जेवायचे म्हणजे संकट. बस क्या, मेरे लिये भी नही लोगे. नाराज कर दोगे मुझे.. अशी भाषा कायम तोंडात.

सिंह लोकांकडे नेतृत्व आपसूक येते. बर्‍याच क्षेत्रातली त्यांना (जुजबी) माहिती असते त्यामुळे ते सेंटर ऑफ अट्रॅक्शन होतात. प्रेम केले तर मनापासून आणि दुस्वास केला तर तोही मनापासून. एखाद्याला आपले मानले तर, त्याच्यासाठी रक्ताचे पाणी करतील. पण मेहनतीत कमी पडतात (अंगात आळस असतो.)

वृश्चिकेचा एक चांगला गुण म्हणजे ते कायम असमाधानी असतात. असमाधान असते ते स्वत:च्याच कामगिरीवर. त्यामूळे ते सतत प्रगती करायचा प्रयत्न करत असतात आणि त्यासाठी प्रचंड कष्ट करायची त्यांची तयारी असते. त्यांच्या तूलनेत बाकिचे कष्ट करण्यात कमी पडतात, आणि त्याचा त्यांना राग येतो. संशोधन क्षेत्रात ते जास्त यशस्वी होतात.<<< +१ अगदी बरोबर दिनेशदा... अनुभव आहे:)

वृश्चिकेचा एक चांगला गुण म्हणजे ते कायम असमाधानी असतात. असमाधान असते ते स्वत:च्याच कामगिरीवर. त्यामूळे ते सतत प्रगती करायचा प्रयत्न करत असतात आणि त्यासाठी प्रचंड कष्ट करायची त्यांची तयारी असते. त्यांच्या तूलनेत बाकिचे कष्ट करण्यात कमी पडतात, आणि त्याचा त्यांना राग येतो.>>>

प्रचंड सहमत, माझा गेल्या दहा वर्षातला अनुभव आहे. मात्र मला(मकरेला) हा चांगला गुण वाटत नाही....

प्रचंड सहमत, माझा गेल्या दहा वर्षातला अनुभव आहे. मात्र मला(मकरेला) हा चांगला गुण वाटत नाही....

का बर ?

त्यांच्या तूलनेत बाकिचे कष्ट करण्यात कमी पडतात, आणि त्याचा त्यांना राग येतो.>>> यात मकर रास बसत नाही. वृश्चिकेपेक्षा मकर जास्तच कष्टाळु.

एकाच गोष्टीत जमत नसेल. मकर राशीने एखादे मत बनवले तर सहसा त्यात बदल करणे त्यांना आवडत नाही. कष्ट कमी पडावेत म्हणुन कोणताही शॉर्ट कट शोधण्याचा विचार त्यांच्या मनात येत नाही.

स्वभावावरून रास (म्हणजे चंद्ररास) नक्की ओळखता येते. अनुभवातून मला बर्‍याच जणांची रास ओळखता येते. काही राशींचे गुणविशेष अगदी प्रकर्षाने दिसून येतात.

उदा.

तूळ - प्रसन्न व्यक्तिमत्त्वाचे, संगीत्/गायन्/चित्रकला/अभिनयकला अशा कलेत रस असणारे
मेष - Aggressive, नेतृत्वगुण असलेले, फटकळ
वृश्चिक - नावाप्रमाणेच नांगी मारणारे
मिथुन - बडबडे, बुद्धिमान, पण अतिशय उपरोधिक/धारदार्/वर्मी लागेल असे बोलण्यात पटाईत
मीन - अतिशय सज्जन, धार्मिक, अतिशय मनापासून देवपूजा करणारे, देवळात जाऊन देवाला अनेकवेळा नमस्कार करणारे, निर्णयशक्तीचा अभाव (चंचल स्वभाव असल्यामुळे)
वृषभ - अतिशय रसिक, पण ही रास बिघडलेली असेल तर मात्र विबासं, फ्लर्टिंग इ. दिसून येते
कर्क - Gullible, भोळे, भिडस्त, सज्जन पण सहज फसविता येतील असे
कुंभ - बुद्धिप्रामाण्यवादी, देव्/आत्मा इ. वर फारसा विश्वास न ठेवणारे

कोणत्याही व्यक्तीच्या स्वभावात साधारणपणे ७०-८० टक्के गुणविशेष चंद्रराशीचे व उर्वरीत गुण हे लग्न राशीचे येतात.

माबोवरील काही जणांच्या लिखाणावरून त्यांची चंद्ररास लगेच लक्षात येते.

म्हणजे मी ७०-८०% मीन आणि उरलेली तूळ.

मी कुठल्याही कारणासाठी पत्रिका दाखवणं, वर्तमानपत्रातील आठवड्याचे राशीभविष्य बघणं कधीच करत नाही पण टाईमपास म्हणून स्वभावविशेषांचं वाचायला बरं आहे.

Pages