पाककृतीची पुस्तके

Submitted by क्ष... on 31 March, 2009 - 01:32

मंडळी, आपल्यापैकी बर्‍याच जणांकडे निरनिराळी पाककृतींची पुस्तके असतील. काही तुमच्या अत्यंत आवडीची तर काही गरजेची जसे रुचिरा, अन्नपूर्णा वगैरे. तर तुमच्या संग्रहात असणार्‍या पुस्तकांची नावे त्यांच्या लेखक/लेखिकांच्या नावासहीत इथे लिहा.
तुमच्या मते एखादे पुस्तक तुम्हाला आवडले नसेल तर ते का आवडले नाही हे पण लिहा म्हणजे एखाद्याला घ्यायचे असेल तर माहिती उपयोगी पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्याकडे असलेली -
१. रुचिरा - कमलाबाई ओगले
मला अधुनमधुन रेफर करायला उपयोगी पडते. काही काही भाज्या वेगळ्या प्रकारे दिलेल्या आहेत. त्या आवडतात.
२. Raw (the uncookbook) - Juliano
मी जेव्हा रॉ फूडच खायचे तेव्हा यतले बरेच प्रकार केले होते.
3. Raw - Charlie Totter and Raxanne
हे बरे आहे. काही काही रेसीपीज ठिक आहेत पण खुप वापरले नाही हे.
4. Eat More, Weigh Less - Dr. Dean Ornish
हे मस्त आहे. मला खुप प्रकार आवडले. मुख्य म्हणजे ८०% रेसिपीज वेगन आहेत.

अजुनही २-३ आहेत जी मी वापरत नाही त्यामुळे नावे लक्षात नाहीत. उद्या परवा टाकेन.

१) रुचिरा भाग - १
२) रुचिरा भाग - २
३) सात्विक शाकाहारी पदार्थ
४) बालकांचा आहार
५) बॅचेलर्स रेसेपी
६) वर्तमानपत्रातील कात्रणे.

बी, लेखक/लेखिकेची नावेही लिहा हो कृपया. कारण सात्विक शाकाहारी पदार्थ, बालकांचा आहार किंवा बॅचेलर्स रेसेपी असे विचारले तर अनेक लेखकांची पुस्तके दुकानदार पुढ्यात ठेवण्याची शक्यता आहे. म्हणून लेखक/लेखिकेची नावे लिहिलीत तर बरे होईल.

संपूर्ण पाककला, असे उषा पुरोहित, यांचे पुस्तक बाजारात आले आहे. याच्या शाकाहारी आणि मांसाहारी अश्या दोन आवृत्त्या आहेत. पुस्तकात बरेच पदार्थ आहेत, पण लेखन नीट नाही, ते तूटक वाटते. काहि पदार्थांचा उल्लेख ( उदा, बर्गर बन्स ) आहे पण कृति नाही. अवतरण चिन्हाचा अति आणि गैर वापर आहे. पण तरिही हे पुस्तक संग्राह्य आहे.
निव्वळ साहित्यिक रुचिसाठी, लक्ष्मीबाई धुरंधर यांचे गॄहिणीमित्र अर्थात हजार पाककृति हे पुस्तक, नव्याने छापलेले, उपलब्ध आहे. हे पुस्तक खुपच जुने आहे, तरी याचे वाचन, नक्कीच रंजन करते.

माझ्याकडे 'स्वयंपाक' आहे...कुणाचे आहे ते बघुन सांगेन...पण त्यांचे प्रमाण खुप छान आहे...

पार्टी पार्टी - निर्मला टिळक
रुचिरा १ आणि २- कमलाबाई ओगले

संजीव कपूरच्या आठ छोट्या पुस्तकांचा सेटही आहे माझ्याकडे.
................................
आज फिर जीनेकी तमन्ना है .....

हमखास पाकसिद्धी Happy
स्वयंपाक शोध आणि बोध

****************
ठेविले अनंते तैसेची रहावे
चित्ती असू द्यावे समाधान! Happy

माझा अमेरिकेला यायचा व्हिसा झाल्यावर माझ्या बहिणीला साक्षात्कार झाला होता ' आयला, हिला बोर्न्व्हिटा पासून बॉईल्ड एग्स पर्यंत सगळं काही येतं. मॅगी नूडल्स सुद्धा हमखास बिघडतात. हिचं कसं होणार तिथे ?'

मग माझ्या मामींनी एका एल आय सी च्या डायरीत अगदी भात, वरण, कोशिंबीर , साध्या भाज्या, उसळी, तळलेले मासे वगैरे प्रकार अगदी सविस्तर लिहून काढले होते. त्याशिवाय टॅननबाऊम अन कनुथ च्या जोडीला ओगले व संशींची पुस्तकं पण माझ्याबरोबर आली होती. जास्त उपयोग कुठल्या पुस्तकांचा झाला हे सांगणं नकोच.

मुंबईच्या ऑफिसमधल्या पारशी, गोवन, मल्याळी मैत्रिणींनी त्यांच्या डब्यातल्या मला आवडणार्‍या पदार्थांच्या कृती एका वहीत लिहून दिल्या होत्या ( रस्त्याच्या बाजूने - एस्प्लनेड मॅन्शन अन आर्मी नेव्ही बिल्डिंगच्या मधोमध, फूटपाथ वर जे स्टेशनरी दुकान आहे त्याच्यासमोर क्रेन्स अन पपायरस म्हणजे किस झाडकी पत्ती ).

त्या एल आय सी च्या डायरीत पुढे आईला, मावशीला, मित्राच्या आईला , भावाच्या सासूबाईंना अशा कोणा कोणाला विचारलेल्या कृती उतरवून घेतल्या आहेत.

अनेक वर्षांपुर्वी सॉक.कल्चर्.इंडीयन मधून डाउनलोड केलेल्या पाककृती, रेक.रेसिपीज मधल्या कृती छापून एका फोल्डर मधे ठेवल्या होत्या.

न्यू यॉर्क टाईम्स चं व्यसन लागल्यापासून तिथून मधून कापलेल्या, छापलेल्या, ढापलेल्या रेसिपी गोळा करायला सुरुवात केली .

भारतातून मासिकातली , वर्तमानपत्रातली कात्रणं, दर महिन्याला रेसिपी कार्डे पाठवणर्‍या क्लब्ज नी फुकट पाठवलेली पहिल्या महिन्यातली कार्डे, ऑफिसचे कूकबूक्स, मैत्रिणींकडे कूकी एक्स्चेंज झाले तेंव्हाच्या रेसिपीज, हे सगळं आहेच.

त्याशिवाय दर खेपेला भारतात गेले तेंव्हाची पुस्तकं, इथे बूक क्लब मधली पुस्तकं, गराज सेल मधे, लायब्ररीच्या सेल मधे, क्रेग्ज लिस्ट मधून घेतलेली अशी पुस्तकं अनेक.

रुचिरा भाग एक व दोन, हे माझ्यापेक्षा माझ्या आईने जास्त वापरलं असेल. - डिंकाचे लाडू, सांडगे ,मेतकूटाचं प्रमाण ( तिची वही भारतात अन ती इथे असं झाले तेंव्हा) , वेगवेगळ्या वड्या, भारतात कधी न केलेले लाडू असे सगळे प्रकार तिने रुचिरात बघुन केलेत.

पर्फेक्ट रेसिपीझ - प्रतिभा कोठावळे - हे मला रुचिरा पेक्षा जास्त बरे वाटते. प्रमाण नेटके दिले आहे सगळ्या पदार्थांचे. टिप्स पण चांगल्या आहेत.
पार्टी पार्टी - ह्यातले बरेच प्रकार मला अ वि म मं च्या धर्तीचे वाटतात ( किंवा ट्यू ने लिहिलेल्या रंगीबरंगी प्रकारांसारखे)

रसचंद्रिका - सारस्वत महिला समाज , अंबाबाई संशी व इतर. हे इंग्रजीतून पण उपलब्ध आहे. हे म्हणजे कोकणी स्वैपाकाचे लारूस गॅस्त्रोनॉमिक आहे.
पांचाळीची थाळी - पांचाळ भगिनी समाज्,शरदिनी डहाणूकरांचा मोठा सहभाग आहे यात. पांचाळ समाजातल्या लोकांकडून त्यांच्या पारंपारिक पाककृती मागवून एकत्र करुन छापलेल्या आहेत. शरदिनी डहाणूकरांचं सासर पांचाळ समाजातलं. त्यांनी सुरेख प्रस्तावना लिहिलेय पुस्तकाला.
खाना खजाना - अंजली नरवणे ( मटण , चिकन चे शे दोनशे प्रकार )
सारस्वत स्वयपाक - शालिनी नाडकर्णी,रसचंद्रिका नाहीच मिळालं तर हे चालेल.
आस्वाद - गोमंतकीय पाककृती- लक्ष्मी भिकू पै-आंग्ले, एकदम लहानसं पुस्तक ( २०-२१ पानं ) आहे. पण अस्सल गोंयकार रेसिपीज आहेत.

खमंग - दुर्गाबाई भागवत - यात पाककृती आहेतच पण अन पाककृतींचा इतिहास/ भूगोल, त्यात झालेला, होत असलेला बदल याबद्दल पण छान माहिती आहे.
मालवणी आस्वाद
सीकेपी पाकक्रुती
मस्त मालवणी - मासे व इतर समुंदरी खजान्याच्या रेसिपिज आहेत. खोबर्‍याशिवायचे किंवा कमी खोबर्‍याचे प्रकार आहेत.
दक्षिण
विमला पाटील यांची दोन इंग्रजी पुस्तकं - ही दोन्ही कॉस्मोपॉलिटन मुंबईकरांसाठी एकदम पर्फेक्ट आहेत. तेंव्हा कळत नव्हतं पण १९७० -१९८० च्या दशकात विमला पाटील बायकांकरता इंग्रजीमधून( कदाचित तेंव्हा एकुलतं एक ) मासिक चालवायच्या. मिस इंडीया स्पर्धा, वेगवेगळ्या प्रांतातल्या प्रातिनिधिक पाककृतींची निदान त्या मासिकच्या वाचकवर्गाला ओळख करुन देणे

मलबार मुस्लीम कूकरी
रेसिपीज फ्रॉम बनारस - शशिप्रभा जैन
कोडवू रेसिपीज ( कूर्ग )

अजूनही आहेतच ती हळू हळू लिहेन.

व्वा! खरंच चांगले पान आहे हे.. उपयुक्त! धन्यवाद कराडकर. Happy
आणि सगळे जण अशीच थोडक्यात माहिती देत रहा..म्हणजे नवीन पुस्तक आणताना सोपे होईल.
-----------------------------------------------
स्वतःचा असतो तो स्वाभिमान ,दुसर्‍याचा तो माज! Proud

अन्नपूर्णा-मंगला बर्वे--- सुरुवातीच्या काळातलं माझं आवडतं पुस्तक. साध्या घरगुती मराठी पदार्थांकरता चांगलं आहे
मुलांसाठी खाऊचा डबा-शुभदश्री तांदळे--- आणून काही वर्ष उलटली पण काहीच करुन पाहिलं नाही.ह्यातले पदार्थ मुलं खात नाहीत.
१०१ भाज्या व भात--- चांगल्या पाककृती. भाज्यांची आणि भाताच्या प्रकाराची व्हरायटी,
पंजाबी व मोगलाई पदार्थ- ठीक ठीक आहे,
स्वयंपाक-शोध व बोध- मालती कारवारकर--फार उपयुक्त नाही,
शाकाहारी उपाहार-संजीव कपूर,
सूप्स,सॅलेडस आणि सँडविचेस- संजीव कपूर,
एनी टाईम टेम्पटेशन्स-संजीव कपूर,
भारतीय शाकाहारी पाककृतींचा खजाना- संजीव कपूर,
खजाना ऑफ हेल्दी, टेस्टी रेसिपीज- संजीव कपूर

संजीव कपूरची पुस्तकं जास्त वाचली जाऊन जास्त पाककृती करुन बघणं होतं.

पुस्तकातली एखादी आवडती पाककृती शेअर केली तर जास्त चांगल न? कारण पुस्तकांच्या नुसत्या नावावरून काय समजणार?

आर्च, त्या रेसिपीज शेअर करायला आहारशास्त्र बीबी आहेच की. पुस्तकं घ्यायला गेलं की कोणतं चांगलं की कोणतं नाही ह्याबाबत गोंधळच उडतो त्यामुळे इथे नुसती पुस्तकं शेअर केली तरी फायदाच होईल.

सायो, मग पुस्तक आवडल का आणि काय आवडल ते सांगितल तर फायदा होईल न. दुकानात गेलं आणि विचारल की पुस्तकाची नाव समजतात पण कोणच घ्यावं ते समजत नाही.

म्रिनिश,
स्वयंपाक हे पुस्तक सिंधुताई साठे यांनी लिहीले आहे.
माझ्याकडे पाककलेचे हे एकमेव पुस्तक आहे. लग्नानंतर च्या काळात ह्या पुस्तकानी मला अगदी मदतीचा हात दिला. त्यावेळी मी रुचीरा पण आणल होत. त्यात पदार्थाची रेसीपी दिलीय पण सर्व घटकांच प्रमाण नीट दिलं नाहीये.
बाकी आईनी भेट दिलेली तरला दलाल, संजीव कपुर ईत्यादींची पुस्तक मी सोयीस्करपणे भारतातच विसरुन आलेय.:P

पानाची डावी बाजु : सौ. वंदना मुंगी.
चटण्या, कोशिंबीरी, रायत्यांसाठी ठीक ठाक पुस्तक. 'वरून चरचरीत फोडणी घातली की दगड-धोंड्याची चटणी पण उत्तम लागते' हे मातुलगृहीच्या एका जेष्ठ व्यक्तीचं मत अगदी मान्य असल्यामुळे ह्या पुस्तकात नवं काही शिकायला मिळालं नाही.

पावाच्या १०१ पाककृती : प्रा. सौ. शीला काकडे.
काही पाकृ चांगल्या आहेत. टिप्स तर खरंच उपयोगी पडतात. आयत्या पावापासून सँडविचेस, कबाब, पॅटीज, बर्गर, गोड असे (आणि भरपूर) बरेच पदार्थ आहेत. पुस्तक तसं छोटसं आहे. पण उपयोगी.

आजीच्या विविध चटण्या : प्रमिला पटवर्धन
खोबरं - रायअवळे, खोबरं- अनारदाणा अश्या काही चटण्या माझ्यासाठी नव्या होत्या. 'लाल मिरच्यांची लालडी', पानडी असले प्रकार पहीलुनच वाचले. अजुनपर्यंत करायची हिंमत झाली नाही.

'लोकप्रभा मेजवानी'चे नातेवाईकांनी संग्रही ठेवलेले अंक मला सप्रेम भेट मिळाले. बरेच छान पदार्थ आहेत. त्यात पाहून केलेलं पीच-कूल नामक डिझर्ट चांगलं झालं होतं.

किचन्स ऑफ केरला (सलीम पुष्पनाथ आणि निम्मी पॉल) हे छोटसं, भेट मिळालेलं पुस्तक छान आहे. पण सगळ्यात खूप नारळ आणि नारळाचं तेल वाचून आजवर त्यातलं फक्त व्हेजिटेबल स्ट्यु सोडून काही करून बघीतलं नाही.

अ‍ॅट होम विथ मायकल शरेल्लो (Michael Chiarello) चं फूड नेटवर्कवालं पुस्तक चांगलं आहे. ब्रुशेटा टार्ट, ३० मिनिट प्राइम रिब, काही पानिनी सँडविचेस, सूप्स आणि फ्रिटर्स छान आहेत.

स्लो कुकर कॅसेरोल्स अ‍ॅन्ड मोर हे आमच्या घरातलं सगळ्यांचं आवडतं पुस्तक आहे. बीफ, पोर्क, चिकन, टर्की, फिश, शेलफिश, भाज्या सगळ्यांच्या रेसिपीज आहेत. सूप्स, स्ट्यु, चिली, बर्‍याच देशातले वेगवेगळे प्रकार, लाइट अँड ईझी मधे लो कॅल पदार्थ, वन डिश मील्स, ब्रंचेस सगळं आहे. तेच ते जेवून कंटाळा आला तर रुचीपालट म्हणून ह्या पुस्तकातले पदार्थ होतात.

ह्याशिवाय थाई आणि चिनी रेसिपीजचं पुस्तक आहे. पण ते कुणीतरी घेऊन गेलंय. नाव आठवत नाही.

१. स्वयंपाक - सौ. सिंधुताई साठे.
चांगलं आहे पुस्तक. आईकडे अन्नपूर्णा आहे, सासरी रुचीरा आहे. इकडे यायच्या वेळेस अन्नपूर्णा घ्यायला गेले तर त्या दुकानात नव्हतं आणि मला इतर दुकान फिरायला वेळ नव्हता. म्हणून हे घेतलं. यात बघुन केलेले माझे जवळजवळ सगळे पदार्थ पर्फेक्ट झालेत.
२. फिशच्या चमचमीत १०१ पाककृती - सौ. शीला काकडे.
हे पण एक नेहमी वापरलं जाणारं पुस्तक.
३.द्रौपदीची थाळी - अपना बाजार तर्फे काढलेला एक अंक.
यात विविध पदार्थ आहेत. रोजचेच घटक पण वेगवेगळ्या पधतीने वापरलेले.
४. The ultimate Asian & Chinese Cookbook
७-८ च पदार्थ करुन पाहीलेत.
५. एक केक अन कुकीज चे पुस्तक आहे.
६. एक सॉसेस, डीप्स आणि सालसा चे पुस्तक आहे.
७. सगळ्यात आवडतं "मायबोली पाककृती विभाग" Happy

पहीलुनच>
मृ, अगदी टिपिकल सिकेपी शब्द, बर्‍याच दिवसानी ऐकला.

सगळ्यात आवडतं "मायबोली पाककृती विभाग" >>>
अगदी अगदी पन्ना. मुख्य म्हणजे ह्या विभागाचा हेल्प डेस्क एकदम चांगला आणि अतिशय तत्पर आहे. अशी सोय कुठल्याही पुस्तकासोबत येत नाही. Happy

१. स्वयंपाक - सौ. सिंधुताई साठे.
<<यात बघुन केलेले माझे जवळजवळ सगळे पदार्थ पर्फेक्ट झालेत.
<<सगळ्यात आवडतं "मायबोली पाककृती विभाग" स्मित
पन्ना, अगदी अगदी सेम पिंच
तमाम मायबोलिकरणींनी मला नेहमीच मदत केलीय. आणि हो १ मायबोलिकर राहीलेच सांगायचे..दिनेशदा!

पन्ना आणि रुनिला मोदक...

मी फक्त माबो पाककलेच्या विभागावर अवलंबुन असते . आईकडे असतांना रुचिराच्या साथीने माझे स्वयंपाकघरातील पहिले प्रयोग केलेत.

माझ्याकडे पुस्तक बिस्तक काय नाय Sad . पण आता ही लिस्ट पाहुन मागवावे म्हणते Happy

-प्रिन्सेस...

>>>माझ्याकडे पुस्तक बिस्तक काय नाय

छ्या, वाईट बिईट वाटून घ्यायचं नाही प्रिन्सेस. उलट पुस्तकं बघून जेवण करणार्‍या मैत्रिणींकडे तुच्छतेने बघायचं. Wink

सायो Lol

-प्रिन्सेस...

आईच्या पेशल पाककृती एका वहीत लिहुन आणल्या आहेत ती वही, आरतीला मेल करुन विचारलेल्या कृती आणि मायबोली पाककला विभाग ह्यावरच मी अवलंबुन असते.

याशिवाय रुचिरा, सूप्स, रोटी आणि पराठे ही मराठी आणि Soups and Starters (Cheff Express) Italian Favorites (Recipe Book by William Sonota) ही इंग्रजी पुस्तके आहेत. अधिक माहिती संध्याकाळी लिहिते. रुचिरात एक तांबड्या भोपळ्याची पाणी घालुन शिजवायची कृती बघुनच जे बंद करुन ठेवले आहे ते आजवर हात नाही लावला. त्यातल्या त्यात Italian Favorites बरेचदा बघते काही वेगळी पास्ता/पिझाची कृती हवी असेल तर.

रुनी, हेल्प डेस्क बद्द्ल अनुमोदन!
सिंडे, आईच्या रेसिपीजची डायरी आहेच. तसच तिच्या कडच्या कात्रणांच्या, झेरॉक्सच्या पण झेरॉक्स केलेली एक फाईल आहे. अजुन एक डायरी मावशा, आज्जी, सासुबाई (हो, त्यांच्या पण) ह्यांच्या स्पेशल रेसिपीजची आहे. Happy

मी पण मायबोलीच्या पाकृ विभाग आणि हेल्पडेस्कवरच अवलंबून असते.. बाकी कुठलंच पुस्तक नाही आहे..
ही लिस्ट पाहून ठरवता येईल..!

वा वा,हा भाग मस्त आहे, इंग्लीश मधली चालतील ना असे गृहीत धरून,आतापर्यन्त अभ्यासा व्यातीरिक्त,health & nutrition नंतर ह्याची पुस्तके #३ लागेल संख्यच्या बाबतीत.
बरीच आहेत, जी ज्यास्त अभारतीय ज्यास्त मग भारतीय स्वयंपाकाची(इंग्लीश मध्ये) आहेत. एकेक आठवले तसे लिहिन. मला नावं कधीच लक्षात रहात नाहीत. घरी जावून हीच पोस्ट अपडेट करीन. Happy
१) The worlds' best thai cooking.
ह्याच्यात अगदी थाइ इन्ग्रेडींयन्ट्स काय असतात, त्याचा कसा उपयोग आहे शारीरिक दृष्ट्या पासून ते साधारण कुठे मिळतील ह्यावर चर्चा सुरु होवून मस्त इझी सूप्स ते करीज आहेत. मी बर्‍एच ट्राय केलेत.
२)soups n salads(असेच नाव आहे वाटते)
बरेच इटालीयन सूप्स आहेत मेनली पण काही भारतीय सूप्स जसे रसम, मूलगीवाटनी(ह्याचे नाव मी कधी नीट लिहिन असे वाटत नाही) वगैरे वगैरे आहेत. खासियत हिच की जे काही फ्लेवरींग आपण वापरतो त्याचा कसा फायदा आहे हे थोडेसे सांगितलेय. जसे थाइम ह्याचे बरेच फायदे आहेत. ते सर्दी तापात चिकन सूप मध्ये टाकले तर कसे क्लीन्सींग होते वगैरे.
३) ५० great curries of India
ह्या पुस्तकाची एक गोष्ट म्हणजे आपल्या भारताची ओळख मस्त सांगितलीय. वेगवेगळ्या प्रदेशाचा प्रभाव हा कसा आहे त्यांच्या खाण्यात वगैरे. प्रत्येक प्रदेशाच्या रेसीपीज आहेत. तेव्हा काहींना आवडू शकते.बाकी मला स्वताला रेसीपीस काही खास नाही वाटल्या. बंगाली रेसीपीज आवडल्या. पण घाबरत केल्या त्यात माश्यात दही वगैरे टाकून होत्या.बिगेनीर्सना चांगले आहे.खरे तर भारतीय रेसीपी पुस्तके कमीच आहेत. कारण घरात बर्‍यापैकी अर्धा अधिक भारत भरला आहे, तेव्हा त्यांचाकडून मिळतेच रेसीपी.
४)Easy Juicing.
सर्व प्रकारचे फळ व भाज्या जुसेस,स्मूथीज वगैरे. कुठले कोम्बो कशावर चांगले. त्याचा शरीरावर होणारा फायदा.
5)juice fasting
वरील सारखेच पण छान आहे. आता लक्षात नाही कसे वेगळे आहे.
६) पास्ताज अँड नूडल्स (मी नंतर नावं नीट अपडेट करीन) - चांगले आहे. पण मी कार्ब खात नसल्याने आणून पैसे फुकट घातले. तसेही पास्ताज मध्ये बेसीक रेसीप सेम असते फक्त तो सॉस कसा वेगवेगळा असतो ते ह्यात ज्यास्त सांगितलेय.
७) The best bread ever - हे पुस्तक असुद्याच तुमच्या घरी जर तुम्हाला ब्रेड वगैरे करायची आवड आहे. आतापर्यन्त जेवढे म्हणून मी ब्रेड्स घरी केले का जे काही प्रयोग केले स्वताच गव्हाचे पिठ वापरून ते हे पुस्तक वाचूनच अन काही प्रमाणात नेट वरील रेसीपीही पण हे पुस्तक मस्तच. खूप बेसीक समजावून सांगितलेय.

बाकी बरीच पुस्तके आठवत नाही तेव्हा घरी जावून लिहिन,नाहीतर आठवेल तसे लिहिन इथे.

माहिती बेष्ट. वाचतेय.. वाचतेय.
माझी ट्रायल आणि टेरर मेथड. पण संजीव कपूर वर गाढ विश्वास. त्याच्या अगणित अगणित पाककृती ट्राय केल्या आहेत. कधीही बिघडल्या नाहीत.
बाकि त्या उषा पुरोहितांचे आणि माझे बरे नाही. डिटेलवार कध्धी सांगत (लिहीत) नाहीत. त्यांची पाकृ (मी) केली की हमखास बिघडते. Sad
एकुणातच - घटकांचे प्रमाण व्यवस्थीत दिलेले नसले तर त्या कृतींना आणि जरा जास्तच एक्झॉटीक घटक सांगीतले अस्तील तर त्याही कृतींना टांग मारण्याकडे माझा कल असतो.
पाकृ वाचून जमेल असे वाटले तरच ती जमते असा अनुभव आहे.

वरती जे काहि माबो बद्दल लिहिलय ना, त्यामुळे कसं भरुन भरुन आल्यासारखं वाटतय !!!

दूर्गा भागवतांचे. खमंग नावाचे एक छोटेखानी पुस्तक छान आहे.
मोहसिना मुकादम यांचे या विषयावरचे लेखन मला खूप आवडते, पण त्यानी पुस्तक लिहिलेय का ते मला माहित नाही.
द्रौपदीची थाळी, हे मासिकाच्या आकारातले पुस्तक, एकदम छान आहे, पण सध्या ते उपलब्ध नाही बहुतेक ( खुप जुने आहे ते पुस्तक, १९९३ च्याही आधीचे )
कोल्हापूरी खासियत अश्या नावाचे एक देखणे पुस्तक बघितले होते, पण ते नुसतेच देखणे आहे.
मंगला बर्वे यांचे मेजवानी, हे खास पुस्तक आहे.

मूलगीवाटनी >> Lol बहुतेक ते मुलीगटावनी आहे.

हे मलाही मुलगी गटावनी सुप वाटले, आणि नावाचे ओरीजीन सिंधी वाटले. Happy मी एका ब्याचलर मित्राला म्हणलं की बाबा हे सुप पी मग मुलगी रस्तावरच गटेल. Happy आणि त्याने घेतल्यावर देशी हाटेलातल्या एक दोन मुली, ज्यांचाकडे वारंवार तो पाहत होता, त्या त्याला बघू लागल्या, मी म्हणलं बघ कमाल झाली की नाही, मुलगी गटली आता. Happy

Pages