पाककृतीची पुस्तके

Submitted by क्ष... on 31 March, 2009 - 01:32

मंडळी, आपल्यापैकी बर्‍याच जणांकडे निरनिराळी पाककृतींची पुस्तके असतील. काही तुमच्या अत्यंत आवडीची तर काही गरजेची जसे रुचिरा, अन्नपूर्णा वगैरे. तर तुमच्या संग्रहात असणार्‍या पुस्तकांची नावे त्यांच्या लेखक/लेखिकांच्या नावासहीत इथे लिहा.
तुमच्या मते एखादे पुस्तक तुम्हाला आवडले नसेल तर ते का आवडले नाही हे पण लिहा म्हणजे एखाद्याला घ्यायचे असेल तर माहिती उपयोगी पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो- दोन्ही कमी टाकले तर चालते. मध्यंतरी- तेलात पदार्थ कमी करुन तुपात केले तर ते कोलेस्ट्रॉल च्या दृष्टीने जास्त चांगले असेही वाचल्याचे स्मरते. पण कोणीतरी वैज्ञानिक दृष्ट्या समजवून सांगा. त्यातले मला काही कळत नाही.

अरे हो- रुढार्थाने कुकबुक नाही तरी- तेल कुठले वापरावे, हृदयरोगींसाठी पथ्य आणि निरोगी हृदयासाठी - अभय बंग यांचे माझा साक्षात्कारी हृदयरोग.
त्यात शेवटी तेलांचे पृधक्करणाचे तक्ते आहेत- ते खूप उपयोगी. बाकीही स्किम्ड मिल्क पासून केलेल्या गोष्टी वगैरेंसाठी बहूउपयोगी. त्या पुस्तकाचा तेवढाच उपयोग आहे असे मला म्हणायचे नाही. ह्या बा.फ ला संयुक्त म्हणुन मी एवढेच लिहीले आहे.

तरला दलालची पुस्तकं कुणाकडेच नाहीत वाटतं? नाही म्हणजे माझ्याकडेही नाहीत पण मी त्यांच्या वेबसाईट वरुन ई-मेलला सबस्क्राइब केले होते तेंव्हा त्यांच्या बर्‍याच रेसिपी वाचलेल्या आहेत. छान सविस्तर लिहिलेल्या असतात.

तेल तूप एकत्र करण्यात तसे गैर नाही. पण फोडणी करण्यापेक्षा तूप वरुन घातले तर चांगले, कारण तूप कमी तपमानाला जळते.
हाय कोलेस्ट्रॉल वाल्याना तसेही ते कमीच चालते !!!

तरला दलालची पुस्तकं चांगली आहेत. साध्या सोप्या रेसिपी असतात. मला तरी आवडलीत.

हाय कोलेस्टेरॉल असलेल्यांना तुपाची काही गरज नाही. एकतर शरीर कोलेस्टेरॉल तयार करत असतं. आणि दुसरं म्हणजे निवांत आयुष्य असलं की तयार झालेलं कोलेस्टेरॉल नीट वापरल्या न गेल्यामुळे प्रॉब्लेम असतो. तेव्हा अश्या लोकांनी तेल अगदी माफक प्रमाणात तर तूप तसंच मांसाहार पण शक्यतोवर कमी ठेवावा.
बर्‍याच साइट्स आहेत अश्या लो कॅल, लो फॅट स्वयंपाकावर.

पुस्तकाव्यतिरिक्त जी चर्चा आहे ती चांगली आहे पण आपण ती आहारशास्त्र मधे हलवुयात का?

रैना, इथे ती चर्चा योग्य नाही असा बोर्ड असल्याने एक वेगळा धागा काढ ना.:) मग तिथे आपण जोरदार चर्चा करू Happy

बरं सुधा (सुधाच काय? घरी बघायला लागेल) कुलकर्णी ह्यांचे मायक्रोवेव, ओटीजी अन कन्वेकशन ओवन असे पुस्तक आहे. मी विसरले होते. ह्यात नीट सांगितलेय कसे काय काय करायचे.

अभारतीय स्वैपाकाची पुस्तके

जॉय ऑफ कूकिंग - यातनं वाचून केलेले केक्स एकदम पर्फेक्ट होतात. क्लासिक अमेरिकन रेसिपीज आहेत.

लारुस गॅस्त्रॉनॉमिक - इंग्रजी मधून . हे मुळात फ्रेंच पुस्तक आहे. त्यांच. रुचिरा आहे म्हणण्यापेक्षा रुचिरा हे मराठी लारुस आहे म्हणणं एक वेळ चालेल. स्वैपाकातल्या अनेक सुरस अन चमत्कारिक गोष्टी आहेत. टेक्निक्स, बेसिक रेसिपीज वगैरे फार तपशीलात दिले आहेत. यातनं एकही प्रकार केलेला नाही आजतागायत. पण वाचायला खूप मजा येते. बारीक प्रिट मधे ११०० पानं आहेत.

गूड हाउसकीपींग बेकिंग : सुंदर फोटो, एकदम क्लिअर इनंस्ट्र्कशन्स, अन टिप्स पण छान आहेत. यात वाचून पण बेक केलेले पदार्थ मस्त होतात. ब्रेड, मफिन्स, केक्स, कुकीज वगैरे विभाग आहेत

बेकिंग विथ जुलिआ : यात पण सुंदर फोटो, घटक पदार्थांबद्दल अतिशय सुंदर विवेचन. प्रत्येक पदार्थाच्या स्टेप्स तपशिलवार . यातली बिस्कोटीची कृती वापरून मी कमीतकमी शंभर वेळा बिस्कोटी केल्या असतील.

इसेंशियल्स ऑफ क्लासिक इटालियन कूकिंग - मार्चेला हझान - फोटो नाहीत. इल्स्ट्रेशन्स सुंदर आहेत. अन एकदम तपशीलवार पाकक्रुती. फक्त यातल्या कुठल्याही कृतीची सामग्री गोळा करायला आठेक दिवस अन तितक्या दिवसांचं फूड बजेट ( एकाच रेसिपीला ) लागेल Happy . थोड्या अनुभवाने सबस्टिट्युशन स्वतःला कळायला लागली तर पुस्तक एकदम मस्त आहे. हौशी खाणारे असतील तर व्हॅलेंटाईन डे ला करण्यासारख्या रेसिपीज आहेत.

विलियम सोनोमा चं कम्प्लिट ग्रिलिंग कूकबूक - हे फक्त आय कँडी म्हणून ठीक. यातनं वाचून एकदा मिसो मॅरिनेटेड ग्रिल्ड हालिबट मासा केला होता. सगळं ओतून द्यावं लागलं कचर्‍यात अन आदल्यादिवशीचं वरण भात जेवलो होतो. नशिब आम्ही दोघंच होतो. कोणी पाव्हणे नव्हते. पण स्वैपाकघरात कर कूकबूक चं शेल्फ असेल तर त्यावर विलियम सोनोमा ची पुस्तक अगदी सुंदर दिसतात Wink

जुलि अ‍ॅन्ड जुलिया - न्यू यॉर्क शहरातल्या एका बाईने एका वर्षात जुलिया चाइल्ड च्या मास्टरिंग द आर्ट ऑफ फ्रेंच कूकिंग या पुस्तकातल्या सगळ्या रेसिपि आपल्या छोटेखानी किचन मधे त्याहूनही छोटेखानी बजेट मधे बसवत केल्या . त्याबद्दल तिने ब्लॉग लिहिला . तिचा ब्लॉग इतका प्रसिद्ध झाला की त्याचं हे पुस्तक निघालं, मी ब्लॉग अधून मधून वाचत असे. पुस्तक थोडं अब्रिज्ड आहे.

फूड अँड वाइनचे 'Annual Cookbook' कसे असते? यात व्हेज रेसिपीज पण असतात काय?

हो व्हेज रेसिपीज असतात. त्यांचे वर्षभराचे (मासिक) अंक देखिल खूप छान असतात. ह्या वेळचा स्पेशल ट्रॅव्हल इश्यु पण मस्तच आहे.

फूड अँड वाइनचे 'Annual Cookbook' कसे असते? >> अमेरीकन एक्स्प्रेस का? Happy

नात्या.. सही जवाब... फुकट मिळते तर का सोडायचे wink.gif

अगदी अगदी.. अमेरिकन एक्स्प्रेस, तेच म्हणणार होतो Wink

तरला दलाल ची पुस्तक नाहीत का कोणाकडे? कशी असतात?

तरला दलालची पुस्तके मी लायब्ररीतुन आणुन वाचली आहेत. मला तरी आवडली. त्यांची कृती सांगायची पद्धत छान आहे. एक्दम सोपे वाटते सगळे. Happy
................................
आज फिर जीनेकी तमन्ना है .....

संजीव कपूरच्या पुस्तकांचा सेट आहे माझ्याकडे. त्यात बर्‍याच मांसाहारी पाककृती आहेत आणि मी मांसाहारी पदार्थ बनवत नसल्याने मी सगळी पुस्तकं वापरत नाही असच वाटतं मला.

माझ्याकडे फक्त रुचिराचे दोन भाग् आहेत. आई (कर्नाटकी स्वयंपाक) आणि सासूबाई (टिपिकल कोकणस्थी पदार्थ) याची मदत असतेच.
पण सर्वात महत्वाचे मायबोली. Happy इथे पदार्थ चुकला तर विचारता येतं. आणि टिप्स पण भरपूर असतात.

--------------
नंदिनी
--------------

काल अम्मीनी रामचंद्रनचे केरळी व्हेजिटेरियन पुस्तक अमेझॉनवरुन आले. एक रसम आणि एक उसळ करुन पाहिली अप्रतीम झाली.

अजुन एक the joy of vegan baking पण आलेय शनिवारी रविवारी करेन. गिनिपीग शोधायला हवेत. Wink

अजुन २-३ नविन पुस्तके वाचलि परवा मैत्रिणीकडुन आणुन. आवडली म्हणुन त्यातली काही माझ्यासाठी आज ऑर्डर करतेय.
१. मधुर जाफरी - वर्ल्ड वेजिटेरियन
२. निलोफर इचापोरिया किंग - माय बॉम्बे किचन
३. चित्रिता बॅनर्जी - बेंगॉली कुकिंग: सिझन्स अँड फेस्टिवल्स

अजुन एक पुढच्यावेळी देशातुन आणावे लागेल -
३. पुरोबी बब्बर - रोटिज अँड नान्स ऑफ इंडिया

स्वंयपाक घरातील विद्यान - वर्षा जोशी.
रुढ अर्थीने पाक कलेचे पुस्तक नाहीये. पण पदार्ध करतानाच्या कुठल्या प्रक्रिया कराव्या लागतात, ते का कराव्या ह्याचे सुन्दर विवेचन आहे.

१)microwave cooking for the indian cooking : nita mehta
2) wonderful microwave cooking - vegetarien - jyotu nikunj parekh
4) the vegetarian bible : sarah brown (recipes+ nutrition)
5) india's vegetarian cooking - a regional guide : monisha bharadwaj
6) भारतीय व्यंजनों का खजाना - संजीव कपूर
७) कालनिर्णय, लोकसत्ता मधील पाककृतींची कात्रणे
८) लोकप्रभाचे विशेषांक.
पहिल्या २ पुस्तकात मा.वे.च्या वापराबद्दलच्या छान टिप्स आहेत.५ वे पुस्तके वेगवेगळ्या राज्यांमधल्या प्रसिद्ध पाककृती संग्रह.

Pages