पाककृतीची पुस्तके

Submitted by क्ष... on 31 March, 2009 - 01:32

मंडळी, आपल्यापैकी बर्‍याच जणांकडे निरनिराळी पाककृतींची पुस्तके असतील. काही तुमच्या अत्यंत आवडीची तर काही गरजेची जसे रुचिरा, अन्नपूर्णा वगैरे. तर तुमच्या संग्रहात असणार्‍या पुस्तकांची नावे त्यांच्या लेखक/लेखिकांच्या नावासहीत इथे लिहा.
तुमच्या मते एखादे पुस्तक तुम्हाला आवडले नसेल तर ते का आवडले नाही हे पण लिहा म्हणजे एखाद्याला घ्यायचे असेल तर माहिती उपयोगी पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुलीगटावनी का काय ते तामिळ मध्ये काळमिरी(असेच काहीसे आठवते मला तामिळ मैत्रीणीने संगितलेले). त्याचा सूप सर्दी तापात घेतला नी त्यात चिकन टाकले अन अ‍ॅडिशनली त्यात थाइम्,रोसमेरी,कांदा वगैरे टाकले की खल्लास्(माणूस नाही,सर्दी). Happy

मस्त पुस्तकं कळाली. शोनू अभारतिय पुतके पण लिही.

ते एक रत्तल मटण अशा प्रकारे मापे लिहिलेले पुस्तक म्हणजेच लक्ष्मीबाई धुरंदर यांचे ना? माझ्या आज्जीकडे होते ते मला तिच्या एका बॅगमधे सापडले. एकेक रेसिप्या वाचुन धमाल आली Lol

रैना,
>>>>संजीव कपूर वर गाढ विश्वास. त्याच्या अगणित अगणित पाककृती ट्राय केल्या आहेत. कधीही बिघडल्या नाहीत.
ह्याबद्दल मोदक. माझ्याही संक च्या रेसिप्या कधीच बिघडल्या नाहीत. गेल्या वर्षीपर्यंत त्याच्या साईटची मेंबरशीपही होती माझ्याकडे.

हो मिनोति, तेच पुस्तक ते.
बिलिग साहेबाचे सूप, काशीताई किर्लोस्करांचे चिरोटे असे अनेक पदार्थ आहेत त्यात.
"बगळ्याच्या हाडाची पूड करुन, माश्यास चोळली असता त्यातील काटे विरघळतात, असे ऐकून आहोत... तरी आमच्या शिकारी मित्रानी अनुभव घेऊन आम्हास कळवावे, " असल्या टिप्स आहेत त्यात.
पण त्या काळात, पन्हेर, व्हॅनिला वगैरे करायची कृति, उडदाची डाळ करायची कृति असे बरेच त्यानी लिहिले होते.
त्या पुस्तकात त्या काळी जाई काजळ आणि डोंगरे बालामृत या जाहिराती पण होत्या.

छानय थ्रेड.
पंजाबी पद्धतीचा मेन्यु ठरवायचा असेल तर "पार्टी पार्टी "हे निर्मला टिळकांचे पुस्तक चांगले आहे. पनीर वापरून केलेल्या भाज्या, कोफ्त्यांचे आणि भाताचे काही प्रकार चांगले आहेत.

मोळगा किंवा मोझ्हगा ( डी एम के पार्टीच्या नावातल्यासारखं ) म्हणजे मिरी. तन्नी म्हणजे पाणी.
मोळगातन्नी म्हणजे मिरीचं सूप. ( अर्थात सार किंवा रस्सम्) त्याचा ब्रिटीशांनी केलेला अपभ्रंश मलिगाटॉनी...

माझ्या ते कधीच नीट लक्षात रहात नाही. मी आपली एखाद्या अडाणी बाईसारखी 'मुलगीवाटणी' करून टाकते. Proud
खरे तर अडाणी बाईच्या वर्(असे माझी बहीण म्हणते मला) तू उच्चार करतेस.

आपली पूर्वीची मराठी पुस्तके जी आहेत त्यात तंत्राकडे फार कमी लक्ष दिलं गेलंय असं वाटतं. त्यामुळे ती कोणालाही वापरता येतीलच असं नाही. स्वयंपाकाबद्दल प्राथमिक माहिती आहे असं गृहित धरलेलं असायचं त्यात. मी पाहिलेली रुचिरा, मंगला बर्वेंचं अन्नपूर्णा, मांसाहारी इच्छाभोजन वगैरे त्यातलीच. नवीन आलेली फारशी पाहिलेली नाहीत त्यामुळे आता लेखनात काही फरक पडलाय का ते माहित नाही. बर्‍याच पाश्चात्य इंग्रजी पुस्तकांत मात्र कृती तंत्रासह व्यवस्थित लिहिलेली असते त्यामुळे तंतोतंत केली तर कोणालाही जमू शकतात.

सायो, कारवारकरांचे 'शोध आणि बोध' मी नाही वाचले, पण ते मुख्य आहारशास्त्रावर असेल ना?

मोहसिना मुकादम 'पुढारी' मध्ये लेख लिहायच्या. मलाही माहित नाही त्यांचे पुस्तक आहे का ते. लेखाची कात्रणे ठेवली होती तेव्हा. खाद्य परंपरा, इतर माहिती आणि मग त्यावर आधारीत पाककृती असायची.

मराठी पाककृतींवर एखादे चांगले इंग्रजी पुस्तक आहे का?

>>मराठी पाककृतींवर एखादे चांगले इंग्रजी पुस्तक आहे का?<<
हो, हो मलाही हवेय. माझ्या एका अफ्रीकन अमेरीकन भावजयीला पूपोची रेसीपी सांगताना जीव गेला माझा. त्यानंतर अळूवड्या.. भारी होता तो दिवस. तेव्हा एखादे पुस्तक भेट देवून ओळख करून देइन मराठी रेसीपीची.

लालू, हो. हवं असल्यास पाठवून देईन.
नवीन लग्न झाल्यावर सगळ्यांनाच स्वयंपाकाचं बेसीक ज्ञान नसतं किंवा असलं तरी करता येत नसतात अगदी साध्या साध्या गोष्टी. हा स्वानुभव. मला साधा उपमाही कसा करायचा हे माहित नव्हतं. तेव्हा अशा रेसिपींचाही पुस्तकांत समावेश असावा.

मन:स्विनी, हो. भारतीय पुस्तके बरीच आहेत पण मराठी अशी माहित नाहीत. पुढच्या वेळी नीट लिहून ठेव कृती इंग्रजीत. खास तुझ्या टिपांसह. मग पुस्तक काढूया. Happy
साईट्स आहेत तश्या. आपल्या समीची http://www.mumbai-masala.com/ ही आहे.
सायो, थॅन्क्स. नको. Happy

अत्यंत आवडती NON indian पुस्तक
Everyday Italian: 125 simple and delicious recipes
Everyday Pasta
Giada च्या रेसीपीज तीच्याइतक्याच देखण्या आणि सुंदर आहेत.

पानाची डावी बाजु----- वंदना मुंगी (पुस्तक चाम्गल आहे. यातल मिक्स वेज लोणच्याची रेसीपी मस्त आहे एकदम)
पोळ्या आणि पराठे मंगला बर्वे .......(नाही आवडल)
चाट ....संजीव कपुर (मला अतिशय आवडल हे पुस्तक )
food of india (costco मधुन ) चित्र इतकी मस्त आहेत ना Happy रेसिपी वेगळ्या आणि चांगल्या आहेत.
श्री व सौ चे नाष्टयाचे प्रकार आणि भाज्याचे प्रकार अशी दोन मासिक कम पुस्तक आहेत. नाष्त्याच्या पुस्तकात इन्स्टंट सा.खि,इडली,उपमा रेसीपीज एकदम आवडल्या.
अजुन खुप आहेत पुस्तक . बघुन लिहिन.

लालु मराठी रेसिपीज चे english मधुन blog पण बरेच आहेत.
पाकक्रुतीच्या आवडत्या साईट्स असा पण एक बाफ चालु करायला हवा.:)

लालू, तू मदत करणार अशील ह्या बाबतीत तर काय काढू शकतो. Happy

#हमखास पाकसिद्धी--जयश्री देशपांडे
सोप्या रेसिपीज आणि प्रमाण वगैरे तपशिलवार दिल्यामुळे पदार्थ हमखास चांगला होतो.

#संपूर्ण पाककला--उषा पुरोहित
या पुस्तका बद्दल दिनेशना अनुमोदन.
अजिबात लेखन नीट नाही, तूटक वाटते.आणि पदार्थ चांगला होत नाहीच.

#सूप्स्--सुजाता चंपानेरकर
छोटे आहे पुस्तक पन अनेक नवीन सूप्स् आहेत आणि चांगली होतात.

#Corn खासियत--उषा पुरोहित
#Low Calory खासियत--उषा पुरोहित
अगदीच ठीकठाक

बाकी जपानी पदार्थ आवडत असल्याने अनेक जपानी पुस्तके,आई ची ढापलेली डायरी
आणि मायबोली झिन्दाबाद.

धन्यवाद orchid .स्वयंपाक चे प्रमाणानि मी पण केलेले काहि बिघडले नाहि कधी ..ऑनलाइन मध्ये मायबोली आणि चकलीन्चा ब्लौग बेस्ट....

आपले अनेक पदार्थ ( उदा. पुरणपोळी, मोदक, अळुवड्या ) हे प्रत्यक्ष बघितल्याशिवाय करायला जमणार नाहीत. आणि मराठी पुस्तकात प्रकाशचित्रांचा दुष्काळच असतो. त्यामुळे या क्षेत्रातही गुरूला पर्याय नाहीच.

आणि आपल्या कडची जी प्राथमिक तंत्रं आहेत, जसे लाटणे, तळणे, परतणे ( सवताळणे ) हि पण प्रत्यक्ष केल्यानेच जमत जातात. म्हणुन आईच्या हाताखाली प्राथमिक धडे घेणे, हे उत्तम.
मला पण प्राथमिक धडे आईनेच दिले.

बापरे, बरच कलेक्शन आहे की सगळ्यांकडे....

संजीव कपुर ची पुस्तक चांगली आहेत अस वर बहुतेकांनी लिहीलय.. घेण्यासारखी आहेत?

बापरे!!!! इतकी पुस्तके आहेत? आणि तुम्ही सगळे ते वाचुन इतक्या रेसिपी करता???
मला तर पुस्तक न बघता पोळीभाजी करता येते यात धन्य वाटत होते आत्ताआत्तापर्यन्त, (हो कारण बरोबरच्या मैत्रिणीन्ना चहाही करता येत नसे, मग मी बै भारी) एवढ्यात मायबोलीवर वाचुन फार तर ब्लॉग बघुन जरा नवीन पदार्थ करायला लागले आहे.
कराडकर, एकदम बेस्ट काम केलेत थॅन्क्स!!

पाककृतींचे आवडणारे ब्लॉग

वदनी कवळ घेता - http://vadanikavalgheta.blogspot.com/
सुंदर पाककृती! अगदी घरगुती आणि छान. मायबोलीच्याच कुणाचा तरी आहे. (मिनोतीचाच का.. छान)

व्हिगन वर्ल्ड http://earthvegan.blogspot.com/
उपयुक्त पाककृती.. वेगळं म्हणून छान

फूड फॉर थॉट http://food-forthought.blogspot.com/
मस्त ब्लॉग.. फोटोसाठी बघायला मस्त आहे Happy

सुंदर पाककृती! अगदी घरगुती आणि छान. मायबोलीच्याच कुणाचा तरी आहे. > कुणाचा तरी नाय काय. मिनोतीचा ( कराडकर आय डी पांशा ऑ मला माहित असलेला पांशा ऑ ) आहे तो ब्लॉग.

मला आवडणारा ब्लॉग म्हणजे वन हॉट स्टॉव्ह, नुपुर नावाच्या मुलीचा आहे. ती बहुदा मराठी आहे कारण यात मराठी पाककृतीपण खूप आहेत.

रुनि त्या नुपूर च्या ब्लॉग वर लोकरीच्या पदार्थांचे फोटो काय सही आहेत्....साईट पण बरी वाटली.....

एक चांगले पुस्तक : सुगरणीचा सल्ला... पूर्वी सा.सकाळ किंवा अशाच एका साप्ताहीकात हे सदर येत असे त्याचे कलेक्शन आहे.... पाक बिघडला, पदार्थ उरला वगैरे साठी.. आपला ' माझे काय चुकले ' चा पुस्तक अवतात Happy

क्ष, धन्यवाद! हो तो माझाच ब्लॉग आहे (आणि हो कराडकर म्हणजेच मिनोती)
वैशालीचा ब्लॉगही अप्रतीम आहे.
अश्विनीचा म्हणजे फूड फॉर थॉट बघायला मस्तच आहे आणि रेसिपीच खुप सोप्या आणि मस्त आहेत.
नुपुरचा ब्लॉगही खुप मस्त आहे. आणि हो ती मराठी आहे कोल्हापुरची.

असे अनेक ब्लॉग आहेत जे मला खुप आवडतात. कधीतरी लिस्ट टाकेन.

वर लिहिल्याप्रमाणे रुचिरा , पार्टी पार्टी , सूप्स , संपूर्ण पाककृती या खेरीज अत्यंत सुटसुटीत , योग्य प्रमाण लिहिलेली पुस्तके म्हणजे सुधा मायदेव ह्यांची " लाजवाब " ह्या मालिकेतील पुस्तके .
ह्याचे फिश , मटण , चिकन , पुलाव बिर्याणी , मिष्टान्न , करीज , भाज्या हे सात भाग आहेत . माझ्याकडे फिश , चिकन ( माझे सर्वात आवडते पुस्तक :- चिकनचे अतिशय वैविध्यपूर्ण प्रकार आहेत , सगळेच मी करून बघितले आहेत , पार्टीसाठी उत्तम मदत . ) , पुलाव बिर्याणी , करीज ही ४ पुस्तके आहेत . संग्रही असावीत अशीच पुस्तके आहेत . साहित्य , कृती आणि तो पदार्थ कशाबरोबर सर्व्ह केल्यास छान लागेल ह्याचे नेमके वर्णन आहे .

***************************************
नूतन वर्षाभिनंदन.

उषा पुरोहीत यांचं शाकाहारी पाकक्रुतींचं पुस्तक मी मागच्या आठवड्यातच विकत आणलं आणि इथे त्या पुस्तकावरच्या प्रतिक्रीया वाचायला मिळाल्या.
या पुस्तकातल्या काही क्रुती जरा गोंधळात टाकणार्या आहेत.
खुप ठिकाणी त्यांनी फोडणी करताना तेल व तुप एकत्र करा किंवा तेल व लोणी एकत्र करा असं लिहीलं आहे. ते बरोबर आहे का? की तो typo error आहे? म्हणजे तेल किंवा तुप च्या ऐवजी तेल व तुप असं लिहीलं गेलं आहे?
कारण मी कधी तेल व तुप किंवा तेल व लोणी एकत्र करुन फोडणी केलेली पाहिली नाहीये.

तेल आणि तूप अशी एकत्र फोडणी करतात.. वेगळी आणि छान चव येते पदार्थाला.. पण नेहेमीसारखी तेलाची फोडणी केली आणि वरून तूप सोडले, तरी चालते

मी रुचिरा आणि मायबोलीवरच अवलंबून आहे. पण पंजाबी पदार्थांसाठी 'पार्टी पार्टी' खूपच चांगले आहे, असे ऐकलेय. तसेच संजीव कपूरची आणि संपदाने सांगितलेली सुधा मायदेवांची पुस्तकं चांगली वाटत आहेत. यातलं घेतलं, तर लिहीन इथे..

तेल आणि तुपाची फोडणी करायला संजीव कपूर बरेचदा सांगतो. पदार्थ निर्वीवाद चांगले होतात (अनुभव). कॅलरीज कमी लागतात असे मला वाटते. पण जाणकारांनी वैज्ञानिक दृष्टीकोनातून सांगावे.

पण तेल व तूपाची फोडणी कोलेस्ट्रॉल हाय असणार्‍या लोकांना चालते का ?
**********************************************
http://www.maayboli.com/node/6733 इथे भेट द्या मित्रांनो Happy

Pages