बिस्किटे कशी कशी खावीत...

Submitted by मामी on 14 January, 2011 - 10:17

लहानपणी (आणि खरंतर मोठेपणी सुध्दा) बिस्किटांचा मोह कधी आवरता येत नाही. मग ही बिस्किटे खाताना आपण असंख्य नवनविन प्रयोग केलेले असतात. ते इथे नमुद करावेत ह्या सदिच्छेने हा धागा काढण्यात आला आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त धागा, मामी आज वाचला. Happy
तुला सगळ्या प्रकारची हवी ती बिस्किटे, खारी, बटर इत्यादि सारे काही मुबलक, हवे तेह्वा मिळो Happy

मस्त धागा!! इथे मी पुर्वी टकलेला एक किस्सा अगदी फिट्ट बसेल.

माझा नवरा माझ्या घरी प्रथमच वडिलांना भेटायला आला होता. अजुन त्याने त्याच्या घरी आमच्या प्रेमप्रकरणाबद्दल सांगितलेही नव्हते.

प्रसंग मोठा बाका!! अदल्या दिवशी आम्ही दोघांनी काय काय बोलायचे याची तालिमही केली होती. त्यावेळी मी त्याला सांगितले की, तुला चहा आणि गुड डे बिस्कीटे मिळणार आहेत, तर नेहमीच्या सवयीने ती चहात बुडवु नकोस. तो हो म्हणाला.

घरी आल्यावर पहिल्या एक दोन प्रश्नोत्तरातच त्याची विकेट गुल होण्याच्या बेतात होती. चहा आणि गुड डे बिस्कीटे आली. पपा विचारत होते, ' घरी तरी सांगितले आहे का?'......साहेब सर्व सुचना विसरुन गुड डे ला चहात बुडवत होते. धडधड्त्या छातीने आणि थरथरत्या हाताने ते बिस्कीट त्याने पळार्ध उशिराने बाहेर काढले, त्या बिस्कीटाचा मऊ भाग टुप्पकीनी चहात पडला, त्यामुळे आर्किमिडीज नियमांना अनुसरुन चहाच्या तेवढ्याच घनतेचा मोठ्ठा थेंब टप्पकीनी कार्पेट्वर उडाला..... हे सगळे घडत असताना नवरा अजुनच पडलेल्या चेहर्‍याने "नाही" असे उत्तर देत होता......

पुढची फजिती सांगणे न लगे..........

मा>>मी.. पार्सल पाठव साखर लावलेल्या खारीचं .. Sad
खारी से हमको बिछडे हुए
एक जमाना बीत गया Proud
भारतीय बिस्किट्स आर द बेष्ट

वर्षुताई, पफ्ड पेस्ट्री शिट्स च्या पट्ट्याकापुन ३ पट्ट्या एकावर एक ठेऊन बेक कर, खारी सारखंच लागत :).. आपल्याकरता तेव्हढच सुख Happy

अ........प्र.......ति..........म........... धागा............

आता घरी जाताना भले थोरले बिस्किटांचे पुडेच घेऊन जाते............. Happy

मामी.. बटर, बिस्किटे कशी-कशी खावीत याची हवंतर एक चित्रफित बनव आता.. Happy डोकुमेंतेषण गं... Lol
शुटींग साठी मोडेल हवा असल्यास मी आहेच... Wink

बाकी लहानपणी आणि अगदी आत्ता-आत्ताही एक एक भयानक प्रकार केलेत बिस्कीतांबरोबर...

सर्वात मज्जा यायची ती ट्रेकला गेल्यावर पाण्यात बुडवून पार्ले-जी खायचो.. Happy

>>बाकी लहानपणी आणि अगदी आत्ता-आत्ताही एक एक भयानक प्रकार केलेत बिस्कीतांबरोबर>> फार लोडेड Proud

मी पार्ले जीची ग्लुको बिस्किटे नुसती कोरडी खातांना चहूबाजूंची कड तोडून भुंडी करून खातो. एक चाळा म्हणून! Happy

चहात जास्ती बुडवलेलं बिस्कीट खाली पडतं त्याला कँटिलिव्हर इफेक्ट असं नाव ठेवलं आहे. कारण कँटिलिव्हर बीम जशी तुटते तसं ते हातातून कोसळतं. Proud बायकोला हे नाव खूप आवडतं! Biggrin

माझ्या एका चुलत भावा ची मुलं बशीत बिस्किटे कुसकरायची चहा वरुन टाकयचा आनि खायची .......

ज्यु प्रितीभुषण्........प्रथम बिस्किटा चे निरीक्शण करायचे , मग थोडा भाग हळुच चावुन काढायचा, मग तो दुसर्या हातात घेउन त्याचे निरेक्शण करायचे मग चुरा होई पर्यंत हातात मळायचे ... मग जमेल तसे तोंडात टाकायचे

आख्खी पारले जी बिस्किट चहात टाकायची जोपर्यंत सगळा चहा शोषला जात नाही आणि मग चमच्याने ति चहा-बिस्किट पेस्ट खायची... Happy

बशीभर गरम गरम कांदेपोहे, गुड्डे बिस्कीटं चार ते पाच, चहा हवा तेवढा.
खाण्याची कृती: पोह्यांचा एक घास, त्याच्यासोबत बिस्कीटाची एक बाइट, आणि चहाचा एक घोट..
अहाहा..!! स्वर्गसुख असतं..
खाऊन बघाच एकदा..!! Happy

हा हा. मी क्रीमची बिस्किटं अजुनही उघडून खाते.
बिस्किट उघडायचं, क्रीम खायचं आणि बाहेरचा बिस्किटाला कुणी वाली सापडला (उदा. बाबा) तर त्याला द्यायचं. नाहीतर चहात बुडवून खायचं.

ज्यु. ह. बा. लै भारि!!!!
बिस्किटे खावीत ती एकटे असतानाचं... निवान्तपणे खातातरी येतात... चहात बुडवून... खीर करून.... कोणी समोर असले कि त्याला पाहताना काय वाटेल याचा विचार करण्यातचं चहा थंड होतो.
आता चहा करते, बिस्किटे खात पुढच्या पोस्टी हहगलो:

सेनापती | 21 January, 2012 - 12:36 नवीन
सायो.. फार लोडेड म्हणजे?

"अमेरिकन पाय" हा सिनेमा बघ Wink

सायो... गॉट इट... Happy

कल्पनाशक्तीची धाव भारी हा तुमची... Happy भयानक म्हणजे खातानाचे असेच म्हणायचे होते मला... Lol

हा हा. मी क्रीमची बिस्किटं अजुनही उघडून खाते.
>>>>>>>>>>>>

सई, आम्ही प दुमडून नाही खात Biggrin

बिस्किट उघडायचं, क्रीम खायचं आणि बाहेरचा बिस्किटाला कुणी वाली सापडला (उदा. बाबा) तर त्याला द्यायचं.
>>>>>>>>>>>>>>

सगळ्या मुली बाबावेड्याच Wink माझी चिमुरडी पण क्रीम खाऊन बिस्कीट मल देते Proud
"सईचा ब्लॉग" ती आतापासूनच वाचतेय की काय Uhoh

क्रीम बिस्किट्स चं क्रीम चाटुन बिस्किट्स फेकुन द्यायची किंवा मम्मी ला किंवा तिथे जवळ पास असणार्याला ती दोन्ही बिस्किटं पुन्हा चिटकवुन द्यायची (क्रीम नसलेली )

Pages