बिस्किटे कशी कशी खावीत...

Submitted by मामी on 14 January, 2011 - 10:17

लहानपणी (आणि खरंतर मोठेपणी सुध्दा) बिस्किटांचा मोह कधी आवरता येत नाही. मग ही बिस्किटे खाताना आपण असंख्य नवनविन प्रयोग केलेले असतात. ते इथे नमुद करावेत ह्या सदिच्छेने हा धागा काढण्यात आला आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी आताच दिवसाभराच्या शॉपिंगनंतर दमून भागून आले. मस्तपैकी बंपर मगामध्ये चहा घेतला आणि त्यात बटर बुडवलेत. काय मज्जा येतेय खायला. आणि ही बट्रं अर्धवटच मऊ झाली पाहिजेत. काहीसा भाग कडक, काही मऊ ... अशी खायला मला खुप आवडतात. Proud Proud Proud

==========================

देवा, माझे पोट दुखु देऊ नकोस.

खारी बिस्कीटे खाण्याची माझी पध्दत.

कपात खारी घालायची. वरून साखर घालायची. खारी जवळ जवळ सगळा चहा शोषून घेतील. उरलेला चहा भुर्रभुर्र करून प्यायचा. त्याला छानपैकी साखरमिश्रित खारीची चव आलेली असते. मग चमच्याने खारी खायची ...

आता वयापरत्वे हे बंद झालेय. केवळ आठवणी उरल्यात.

====================

देवा, माझे पोट दुखु देऊ नकोस.

बटर म्हणजे बिस्किटे नव्हे.

-चहात बुडवून
-चहा बिस्किटे खीर
-दुधात बुडवून
-दूध बिस्किटे खीर
-बिस्किटे बशीत मांडायची त्यावर गरम चहा, दूध ओतायचे. मग आधी चहा दूध बशीने प्यायचे.मग बिस्किटे खायची.
-चुरा करुन
-नुसतीच

मामी..क्या बात है..एक्दम हटकर !!! Lol
मला पण अजून पार्ले जी दुधात किन्वा चहात बुडवूनच खायला आवडतात.. पण जरासी चूक हुई..कि मेलं अर्धं बिस्किट पुटकन चहात बुडून गडप होतं Angry
भारतीय जे बी मंघाराम ची मधे जेली भरलेली बिस्किटे.. व्वा..
ही बिस्किटे वेगळी करून आधी आतली भरलेली जेली खालच्या दातांवर खरवडून ( विळीवर नारळ खवतो तशी Proud ) खायचीच.

अनकॅनी हे काय अमुल बटर नाही. ती जीरा बटर वगैरे असतात ना ती.

वर्षुतै, जेली बिस्कीटे ... अहाहाहा ..... खायची पध्दत अगदि अनुमोदन!

ऑरेंज क्रीम/ पायनॅपल क्रीम/ जिमजॅमची बिस्किटे क्रीमचा भाग चाटून साफ करून मग उर्वरित बिस्किटाकडे लक्ष द्यायचे.

बुर्बॉनची बिस्किटेही मधील चॉकलेटचा भाग फस्त करून मग खाण्यासाठीच असतात!

खारी बिस्किटे : उदा क्रॅकजॅक, क्रीम क्रॅकर्स इत्यादीवर चीझ, पायनॅपल क्यूब्ज किंवा केचप, सिमला मिर्ची इत्यादी घालून खादडायचे.

पार्ले ग्लुकोज च्या बिस्किटांची चहा/ दूध ह्यांतील खीर

गुड-डे च्या बिस्किटांची दुधातील खीर.

खार्‍या बिस्किटांवर चीझ स्प्रेड किंवा इतर खारी स्प्रेड्सही छान लागतात.

मारीच्या बिस्किटांवर जॅम/ जेली Happy

मी बरेचदा पारले ग्लुकोज किंवा टायगर बिस्किटे अगदि थोड्यावेळाकरता मावे मध्ये गरम करते. आणखी भाजली जातात आणि खरपुस लागतात.

आणि एक प्रयोग :
ग्लुकोज बिस्कीटावर फ्रीजमधल्या दुधाची घट्ट साय पसरवायची आणि त्यावर दुसरे ग्लुकोज बिस्कीट लावून सँडविच बनवून खायचे......

भटकंतीवर असताना कुठल्याही टपरीत घेतलेला तो इवल्या इवल्या ग्लासातला चहा आणि त्याबरोबर ग्लुकोजचा आख्खा पुडा. दोन-तिन बिस्कीटे झाली की तो चहाच संपतो...की मग पुन्हा एकदा रिफील करून घ्यायचा...
आहा....अशा वेळी बाहेर जर पाऊस कोसळत असेल तर भिजत्या अंगाने अशी गरमागरम चहा-बिस्कीटे खाण्याची मजाच और आहे

ती मिल्कमेड, बिस्किटांचा (बहुतेक मारी), कोको पावडर आणि पीठीसाखर वापरून बनवलेल्या कोको वड्या ही ज ब री लागतात.

मध्यंतरी मी अशीच ग्लूकोज बिस्किटे, साय, चुरडलेला सुकामेवा व कोको पावडर घालून कायतरी रेसिपी बनवली होती भाचरांसाठी. त्यांनाही आणि मलाही आवडली. Happy

वर्षू, जेली बिस्किटे दातानी खरवडणे.. अहाहा

आता मला नेहमीची बिस्किटे आवडेनाशी झालीत, पण ऑल बटर आणि फिग रोल्स अजूनही आवडतात. ऑल बटर बरोबर चहा आणि फिग रोल्स बरोनर कॉफी हवी.

ती पुण्यात ज्युसबेरी का अशाच काही नावाची बिस्किटे मिळतात. नेमकं नाव माहीत नाही, पण मस्त असतात. पुणेकर सांगतीलंच!
अजून आपल्याला आवडतात ती पार्लेजी अन् गुड डे बिस्किटं. ती पार्लेचीच २०-२० देखील छान आहेत.
ती मारी बिस्किटं.. च्यामारी एवढा भंपक प्रयोग कोण्त्या शाण्याने केलाय कुणा ठाऊक?
मी पार्लेजी पाण्यात बुडवून देखील अनेकदा फस्त केलाय.. वेगळीच मज्जा!

गूजबेरी.. अच्छा अच्छा!
पुण्यात जाईन तेव्हा घेईनच, कँपात एका बावा(पारशी)कडे छान मिळतात.
मामी धन्स! Happy

साय आणि पिठीसाखर घोटून घेऊन दोन मारी बिस्किटांच्या मध्ये जाड थर द्यायचा आणि थोडी गार करुन खायची. ( हे ग्रॅहम क्रॅकर्सला पण करता येते. साखर घालू नये. )
मारी बिस्किटं चुरून पुडिंगमध्ये वापरणे.
सॉल्टिन क्रॅकर्सचा बारीक चुरा ( आणि कॉर्नफ्लेक्स वापरुन ) अवन बेक्ड चिकन
कुठलीही मल्टिग्रेन हर्बल सिझनिंग असलेली बिस्किटं चुरुन त्यात फिश घोळवून केलेलं फिश फ्राय
मोनॅको सारख्या कुठल्याही बिस्किटांवर थोडं चीज घालून ते वितळेपर्यंत मायक्रोवेव्ह करणे. गरमागरम खाणे.

मारी बिस्किटे चुरून चीजकेकच्या बेसकरता वापरायला उत्तम.

गूजबेरी.. अच्छा अच्छा!
पुण्यात जाईन तेव्हा घेईनच, कँपात एका बावा(पारशी)कडे छान मिळतात.
>>>>> ट्यागो, ती कयानी बेकरी.

shrewsbury का?

>>जिरा बटर बिस्किट नाय, पाव हाय.
ह्येच म्हणायलेय न्हवं का मी!

>> विळीवर नारळ खवतो तशी>> Lol
मस्त धागा आहे
>>अजून आपल्याला आवडतात ती पार्लेजी अन् गुड डे बिस्किटं. >> मला पण Happy
मी अगोदर ग्लुकोज बिस्किटं बशीत घालून वरुन चहा ओतून मग ते मिश्रण चमच्याने खायची. हल्लीच बंद केलेय. आजू बाजूच्यांना अगदीच बघवत नाही ते Proud

Pages