Submitted by मामी on 14 January, 2011 - 10:17
लहानपणी (आणि खरंतर मोठेपणी सुध्दा) बिस्किटांचा मोह कधी आवरता येत नाही. मग ही बिस्किटे खाताना आपण असंख्य नवनविन प्रयोग केलेले असतात. ते इथे नमुद करावेत ह्या सदिच्छेने हा धागा काढण्यात आला आहे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
होय होय श्रुजबेरी. गडबड
होय होय श्रुजबेरी. गडबड बिकेम.
जिरा, टोस्ट, खारी ह्ये सम्दे बिस्कीटांतच धरतो ना आपण. नसेल तर आता या धाग्यापुरतं धरा ना. वाद नकोत बटरांवरून. बेटर ना????
ग्लूकोज बिस्किट खाववत
ग्लूकोज बिस्किट खाववत नाही.
इथे माझा लेक ओरिओज आणि तत्सम क्रीमची बिस्किटं खवणी पद्धतीने खातो.
खारी आवडतात - पण कधीमधीच. बिस्कॉटीज आवडतात. (आता हे बिस्किट नाही, केक आहे असं कोणी म्हणू नका. :P)
"गोल्डफिश" हल्ली लेकीच्या
"गोल्डफिश"
हल्ली लेकीच्या बरोबरीने मलाही आवडतात ही बिस्किटं.
खायची कशी ते सांग की!
खायची कशी ते सांग की!
कारपेट वर सडा घालायचा आधी मग
कारपेट वर सडा घालायचा आधी मग वेचून वेचून खायची
प्रॅडी मलाही आवडतात गोल्डफिश
प्रॅडी

मलाही आवडतात गोल्डफिश - पुड्यात हात घालून खायला.
माझी मुलगी टेडी ग्रॅहॅम्स तशी
माझी मुलगी टेडी ग्रॅहॅम्स तशी खाते.
(जिभेने वेचून :फिदी:)
माझ्या भाच्याला मारी बिस्किट
माझ्या भाच्याला मारी बिस्किट आडवं धरुन तोंडात घालावं हे कळत नसे, तो ते बिस्किट पालथ्या हातासारखं एकदम तोंडात कोंबायला बघायचा. ते जमलं नाही की अख्खं बिस्किट तोंडाला परपेंडिक्युलर ठेवून खायला बघायचा . तेही जमलं नाही की रागाने जमिनीवर आपटायचा. मग तुकडे झाले की एकेक वेचून तोंडात कोंबून खायचा.
एकदा भावाच्या हातून पुडाभर बिस्किटं जमिनीवर सांडली तर लगेच बहिणीला म्हणे " मी कचरा नाही करत, तुझ्या लेकाला वाढतोय "
कारपेट वर सडा घालायचा आधी मग
कारपेट वर सडा घालायचा आधी मग वेचून वेचून खायची>> आमच्याकडे पण हेच दृश्य असते
कारपेट वर सडा घालायचा आधी मग
कारपेट वर सडा घालायचा आधी मग वेचून वेचून खायची >>>
सोफ्याच्या कुशनखाली लपवून जरा जरा वेळाने २-३ खाल्ली तरी छान लागतात 
त्या आधी हातात वाटी मिळाली की
कॅम्पात इस्ट स्ट्रीट वरच्या
कॅम्पात इस्ट स्ट्रीट वरच्या त्या बेकरीतील श्रूजबेरी बिस्किटे आणि आजकाल अगदी कोथरूडमधेही मिळणारी सगळीच मस्त असतात चवीला. जास्त खरपूस असतील तर आणखी मस्त.
उसगावात मिळतात का कोठे?
ईबा - ग्लूकोज सुद्धा अत्यंत चवदार, खरपूस खाल्ल्याचे आठवते. मुंबईतील एका हॉटेलात कॉन्फरन्स होती तेथे. पुलंनी ज्याचे नाव घेतले की वाक्य पुरे करायची गरज नसते म्हंटलेले आहे अशा एका
मग तुला वाक्य पुरं करायचं(च)
मग तुला वाक्य पुरं करायचं(च) होतं म्हणून तू नाव घेतलं नाहीस तर!

पुलंनी ग्लुकोज बिस्किटांबद्दल काय म्हटलं होतं ते विसरलास का?
कॅम्पात इस्ट स्ट्रीट >> कयानी
कॅम्पात इस्ट स्ट्रीट >> कयानी बेकरी ना? तीच बिस्कीटे आता इतर दुकानांमध्ये सुद्धा मिळतात गावात.
सेम हेच आमच्याकडे. कारसीट कव्हर धुवायला काढलं की सापटीमध्ये मध्ये हमखास हे २-४ पिटुकले मासे सापडतात.
कारपेट वर सडा घालायचा आधी मग वेचून वेचून खायची>>
मामी हॅज अ बेट्टर बट्टर ओरिओ
मामी हॅज अ बेट्टर बट्टर
ओरिओ घालून केलेलं आईस्क्रीम खाल्लं ...यम्मी लागतं नुस्तं
नाईस बिस्किटावरची अक्खी साखर?? तीही आधी दाताने खरवडून खाणे :हाहा;
बर्षुतै, हेच ओरिओ इथे प्युर
बर्षुतै, हेच ओरिओ इथे प्युर मॅजिक म्हणून कॉपी केलेत. ओरिजिनल ओरिओ आता आता मिळायला लागले. तर ते प्युर मॅजिक भयानक सिनफुल प्रकर्ण अन त्यामुळेच भयानक चविष्ट. त्यात व्हॅनिला क्रीम आणि चॉकलेट क्रीम असे दोन प्रकार आहेत.
रच्याकने : हर्शीज चे ओरिओ चॉकलेट असेच मार डाला.
तर आता या धाग्यापुरतं धरा ना.
तर आता या धाग्यापुरतं धरा ना. वाद नकोत बटरांवरून. बेटर ना????>>>>
वाद नाही हो मामी...
या धाग्यापुरतं मी चकली, कडबोळी, भरपूर अमूल बटर लावलेला पाव हे सगळं बिस्किटात धरणार.
कारपेट वर सडा घालायचा आधी मग
कारपेट वर सडा घालायचा आधी मग वेचून वेचून खायची >>
नाही नाही ते आठवले. नशीब इकडे कार्पेट नसते.
खवणे पद्धत एकदम खास.
अरुंधतीने बोर्बोन बिस्कीटांबद्दल लिहीले आहे त्याला अनुमोदन. सगळी पोरं त्यातले क्रीम चाटुन टाकुन बिस्कीट आयांना खायला ठेवतात.
मामी- मस्त धागा.
मंजूडी, रैना >>>> कोणाला ती
मंजूडी, रैना >>>>
कोणाला ती वाईनची बिस्कीटं माहित आहेत का? ती छोट्या बत्ताश्यांसारखी दिसतात. त्यांना वाईनची बिस्कीटे का म्हणतात हा एक महत्त्वाचा प्रश्न! तर ही बिस्किटे एक एक घेऊन जिभेवर ठेवायची की ती जिभेवरचा ओलावा शोषून घेतात आणि जिभेला चिकटतात. मग खायची. मज्जा येते.
आणि एक प्रयोग : ग्लुकोज
आणि एक प्रयोग :
ग्लुकोज बिस्कीटावर फ्रीजमधल्या दुधाची घट्ट साय पसरवायची आणि त्यावर दुसरे ग्लुकोज बिस्कीट लावून सँडविच बनवून खायचे......>>>>>>>>>>
मामी मामी.............काय अगदी माझीच रेसिपी सांगितलीत...पण काय अहो ? साखर विसरलात...........
अरे हो तुमची ग्लुकोज आहेत...ती गोडच असतात. मी मारीवर साय साखर घालून खात होते(आता भीति वाटते हो.....!)
अरुंधतीने बोर्बोन
अरुंधतीने बोर्बोन बिस्कीटांबद्दल लिहीले आहे त्याला अनुमोदन. सगळी पोरं त्यातले क्रीम चाटुन टाकुन बिस्कीट आयांना खायला ठेवतात. >>>>>>>>>> हो अगदी जसं दाने खाऊन टाकून शेंगांची फोलपटं ठेवावीत तसंच!
मामी, मानुषी..
मामी, मानुषी.. साय्,साखर.ग्लुकोज बिस्किटं??????????
यम!!!!!!
माय गॉड!!!!!! हाऊ क्रिमिनल!!!!!!!!!!!!!
पार्लेकर्स या बाबतीत लई
पार्लेकर्स या बाबतीत लई नशिबवान. दिवसातून दोनदा त्यांच्या गावी ग्लुकोज बिस्किटांचा घमघमाट सुटतो.
चित्रांची बिस्किटं नाही खात
चित्रांची बिस्किटं नाही खात कोणी? मासा, घंटा, जोकर, हॉकी स्टिक वगैरेंचे एक एक भाग तोडत खायचे

गरमागरम चहा दोन कप विदाऊट गिल्ट प्यायचा असेल, तर पहिल्या कपात टोस्ट बुडवायचे- त्यात एक कप संपतो. मऽग दुसरा कप सावकाऽऽश प्यायचा
ह्म्म्म. इथे काय काय लिहिलेय
ह्म्म्म. इथे काय काय लिहिलेय ते वाचुन चक्कर आली एकदम.. हे सगळे खरेच खाता तुम्ही मंडळी??? मग डायेट्चे काय होते????
मी जीरा बटर चहात बुडवते. थोडा वेळ त्याने चहा प्याला की तो असा मस्त लुसलुशित होतो.. मग चमचा घेऊन त्याला निवांतपणे खायचे... स्वर्ग अगदी. सावंतवाडीसारखे बटर इतरत्र कुठेही मिळत नाहीत. तिथले जीरा बटरही अगदी स्पेशल असतात.
पार्लेकर्स या बाबतीत लई
पार्लेकर्स या बाबतीत लई नशिबवान. दिवसातून दोनदा त्यांच्या गावी ग्लुकोज बिस्किटांचा घमघमाट सुटतो.
जीवघेणा सुवास सुटतो पार्ल्यातुन जाताना...... मी राहायला सांताक्रुजला, पार्ल्याला कॉलेज आणि क्लास अंधेरीला. रोज सुवासावरुन आज कोणती बिस्किटे भाजताहेत हे ओळखायचा कार्यक्रम करायचो ट्रेनमध्ये
हे क्रिम बिस्किटातले क्रिम
हे क्रिम बिस्किटातले क्रिम खाण्यावरुन आठवले. एकदा घरी कोणी येणार होते म्हणुन आधीच प्लेटमध्ये क्रिम बिस्किटे वगैरे ठेऊन बाहेर मांडत होते. थोड्या वेळाने लेकीला टिपॉयकडे घुटमळताना पाहिले. जवळ जाऊन् पाहते तर ती बिस्किटे उघडुन मधले क्रिम चाटुन परत बिस्किटे बंद करुन प्लेटमध्ये लावत होती
पहिल्यांदा दुकानात जावून
पहिल्यांदा दुकानात जावून पादले ('र' अजून म्हणता येत नाही ना..) जी हवा म्हणून हट्ट. मग पुडा अक्खा मागून घ्यायचा हट्टाने, आपल्यालाच पुडा फोडायचा हा दुसरा हट्ट. डबा असेल तर तो अक्खा मागूनच घ्यायचा. पुडा असेल तर मग तो कसाही फाडून वा डबा हातात आला की खाली पाडून झाकण उघडायचे(हि एक कला आहे) मग बिक्सिटे जमिनीवर/कारपेटवर पसरायची. काही पाश्वभागाखाली(हे कसे लिहायचे?) मग हाताने फोडावीत व चुरा करावा. त्याचा चुरा करून लाळ गाळत खावीत, मध्येच दिसेल त्याला प्रेमाने ऑफर करत. ती बरबटलेली बिस्किटे तुम्ही खाल्लीच पाहिजेत अशी ऑफर आली की नाहितर पुन्हा रडून गोंधळ घालायचा.
हुश्श... (इति १० महिन्याची भाची)
मस्का चस्का किंवा कुर्कुरित
मस्का चस्का किंवा कुर्कुरित खारी बिस्किटे खारुताईसारखी कुर्तूडून खायला मज्जा येते.
दादरला रानडे रोडवर मनोहर
दादरला रानडे रोडवर मनोहर बिस्किट मार्ट आहे, तिथे मिळतात तशी खारी बिस्किटं अख्ख्या दुनियेत मिळत नाहित.
Pages