परस्परसंबंध ओळखा स्पर्धा - ४

Submitted by माध्यम_प्रायोजक on 22 January, 2012 - 23:43

'जनगणमन' या आपल्या राष्ट्रगीताची शताब्दी साजरी करण्यासाठी, आणि 'जन गण मन' या चित्रपटाचं स्वागत करण्यासाठी मायबोलीवर आयोजित केलेल्या स्पर्धांमधली ही चौथी परस्परसंबंध ओळखा स्पर्धा!!!

खाली काही चित्रं दिली आहेत. या सर्व चित्रांचा कशाशी संबंध आहे, या चित्रांतून काय लक्षात येते, ते तुम्ही इथे लिहायचं आहे.

quiz_4b.jpg

समान धागा, म्हणजेच परस्परसंबंध ओळखण्यासाठी तुम्ही कितीही वेळा प्रयत्न करू शकता, कितीही वेळा उत्तर देऊ शकता. यासाठी तुम्ही कुठल्याही माहितीस्रोतांचा वापर करू शकता.

मात्र पूर्ण उत्तरंच स्पर्धेसाठी ग्राह्य धरली जातील. सर्व चित्रांचा संबंध उत्तरात असणे आवश्यक आहे.

बाफवर जे उत्तर सर्वप्रथम बरोबर असेल त्याला बक्षीस मिळेल. बरोबर उत्तर जेव्हा येईल तेव्हाच आम्ही तसे जाहीर करू. चूक उत्तराला आमच्याकडून काहीच प्रतिसाद मिळणार नाही. जोपर्यंत आमच्याकडून 'हे बरोबर उत्तर आहे' असे जाहीर केले जात नाही, तोपर्यंत तुम्ही कोडे सोडवण्याचे प्रयत्न चालू ठेवावेत, अशी विनंती.

आलेल्या सर्व उत्तरांमध्ये कुठलेच उत्तर अचूक नसेल, तर अचूक उत्तराच्या सर्वात जवळ जाणारे उत्तर 'बरोबर' म्हणून निवडले जाईल. याबाबत संयोजकांचा निर्णय अंतिम असेल.

उत्तर देताना 'उत्तर कसे काढले' हे सांगणे आवश्यक आहे Happy

या स्पर्धेच्या विजेत्याला मिळेल पुण्यात २६ जानेवारी, २०१२ रोजी होणार्‍या 'जन गण मन' या चित्रपटाच्या प्रीमियर शोचं एक तिकीट, किंवा मुंडू टिव्हीचं हा चित्रपट एकदा पाहण्यासाठीचं सबस्क्रिप्शन. त्यामुळे तुम्ही भारतात नसलात तरी या स्पर्धेत भाग घेऊ शकता.

तुम्हांला सर्वांना शुभेच्छा. Happy

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

"वन म्यान शो" असा काहीसा अर्थ मला भावतोय.
जसे की टर्मिनेटर मधे एकला नायक शत्रूपक्षाला चारीमुन्ड्या चीत करतो.
नरकासूराचे निर्दाळन कृष्ण करतो.
वरील दोघेही शक्तीचा वापर करतात.
तिसरा फोटो ओळखता आला नाहीये, पण तो जर मोहनदासान्चा असेल, तर अहिंसात्मक शक्तिचा(?) वापर त्यान्नीही केला. पण शेवटी वन म्यान शोच, अन सूष्टाची दुष्टावर मात, सत्याचा असत्यावर विजय वगैरे वगैरे........!
(देवाऽऽरेऽऽ, हिन्साअहिन्सेचा काही घोळ प्रायोजकान्चे मनात असू नये रे देवाऽऽ Proud त्यामुळे आधीच पुरेसे वाटोळे झालय या देशाचं! अजुन नको)

तिसरं चित्र -

British socialist Harold Laski was one of Rand's primary inspirations for the character of Ellsworth Toohey.

Ellsworth Toohey - द फाऊंटनहेड मधील एक व्यक्तिरेखा

याचा काही उपयोग होतोय का पहा -

In the biography of Toohey, it is mentioned that in his younger age he aspired to become a clergyman, but abandoned religion after discovering Socialism and considering that it better served his purposes.

ललिता, अग तोच तर अचूक सम्बन्ध आहे!
सोशॅलिझममधे माणसान्ची यन्त्रेच बनणे (यन्त्रवत कामे करणे/वागणे) अपेक्षित अस्ते असे माझे मत.
पण मग मधल्या कृष्णाचे प्रयोजन कळत नाही. कृष्ण (वा महाभारत) अन सोशॅलिझम? ये बात कुछ् हजम नै होती!

समान दुवा = क्रान्ती!
पहिल्या दोन फोटोमधे शस्त्रासहित क्रान्ती, वैज्ञानिक प्रगतीची क्रान्ती, समाजरचनेतील बदलाची/बदलामुळेची क्रान्ती, तर तिसरा फोटो वर म्हणल्याप्रमाणे "सोशॅलिझम" वगैरेकरता असेल, तर वैचारिक क्रान्ती!

Toohey had already in early childhood developed a talent for subtly manipulating his parents and elementary school class-mates in order to gain power over them. The adult Toohey - who "never sees men, only forces" (Book II, Ch. 6) - is a master schemer and manipulator who, like a chess master, can devise a gambit and predict many moves in advance.

हे वर्णन तीनही चित्रांना लागू होतं.

पहिल्या २ चित्रात अजुन १ समान गोष्ट म्हणजे - 'शस्त्र' ...
हे नं ३ ला ' विचार हे शस्त्र' असे जोडता येते ..
आकडे नै बा कळतेत ...

हॅराल्ड लास्की हे अर्थतज्ञ व व प्राध्यापकही होते. "कॄष्ण" मेनन हा माझा सर्वोत्तम विद्यार्थी आहे", असं ते अभिमानानं सांगत. [ कृष्ण मेनन हे नेहरूंच्या मंत्रीमंडळातील महत्वाचे व वादग्रस्त घटक होते ] कदाचित लास्की व कृष्णाच्या चित्रातील हा दुवा असूं शकतो.
'.. विनाशायच दुष्कृताम ' हा संबंध पहिल्या दोन चित्रांत तरी भावतो.

कृष्णाने नरकासुराचा वध नरकचतुर्दशीला केला, टर्मिनेटर त्याच दिवशी रिलिज झाला होता का? Proud आणि तिसरा फोटो त्या लास्की ने नरकचतुर्दशीला काढून घेतला असेल Lol

मन्जिरी Lol
अन नरकचतुर्दशीला फटाके फोडून "दिवाळी" साजरी होते, तस्सेच फटाके आतषबाजी टर्मिनेटर शिनेमात पण दिस्ते! Proud लस्कीच्या दिवाळीबाबत माहित नाही बोवा!

भाऊ......................... Lol Lol Lol
(कदाचित त्याचसाठी हा अट्टाहास तर नव्हे? Wink )

पहिली २ चित्रं म्हणजे विनाशकारी शक्ति वर मात करण्या साठी पृथ्वी वर प्रकटलेले अवतार आहेत Proud
नंबर्स वगैरे काही समजले नाहीत.

१६०००.

टर्मिनेटरने १६००० गोळ्या मारल्या. कृष्णाने १६००० बायका सोडवल्या.. लेबर पार्टीत १६००० लोक होते.

Pages