परस्परसंबंध ओळखा स्पर्धा - ४

Submitted by माध्यम_प्रायोजक on 22 January, 2012 - 23:43

'जनगणमन' या आपल्या राष्ट्रगीताची शताब्दी साजरी करण्यासाठी, आणि 'जन गण मन' या चित्रपटाचं स्वागत करण्यासाठी मायबोलीवर आयोजित केलेल्या स्पर्धांमधली ही चौथी परस्परसंबंध ओळखा स्पर्धा!!!

खाली काही चित्रं दिली आहेत. या सर्व चित्रांचा कशाशी संबंध आहे, या चित्रांतून काय लक्षात येते, ते तुम्ही इथे लिहायचं आहे.

quiz_4b.jpg

समान धागा, म्हणजेच परस्परसंबंध ओळखण्यासाठी तुम्ही कितीही वेळा प्रयत्न करू शकता, कितीही वेळा उत्तर देऊ शकता. यासाठी तुम्ही कुठल्याही माहितीस्रोतांचा वापर करू शकता.

मात्र पूर्ण उत्तरंच स्पर्धेसाठी ग्राह्य धरली जातील. सर्व चित्रांचा संबंध उत्तरात असणे आवश्यक आहे.

बाफवर जे उत्तर सर्वप्रथम बरोबर असेल त्याला बक्षीस मिळेल. बरोबर उत्तर जेव्हा येईल तेव्हाच आम्ही तसे जाहीर करू. चूक उत्तराला आमच्याकडून काहीच प्रतिसाद मिळणार नाही. जोपर्यंत आमच्याकडून 'हे बरोबर उत्तर आहे' असे जाहीर केले जात नाही, तोपर्यंत तुम्ही कोडे सोडवण्याचे प्रयत्न चालू ठेवावेत, अशी विनंती.

आलेल्या सर्व उत्तरांमध्ये कुठलेच उत्तर अचूक नसेल, तर अचूक उत्तराच्या सर्वात जवळ जाणारे उत्तर 'बरोबर' म्हणून निवडले जाईल. याबाबत संयोजकांचा निर्णय अंतिम असेल.

उत्तर देताना 'उत्तर कसे काढले' हे सांगणे आवश्यक आहे Happy

या स्पर्धेच्या विजेत्याला मिळेल पुण्यात २६ जानेवारी, २०१२ रोजी होणार्‍या 'जन गण मन' या चित्रपटाच्या प्रीमियर शोचं एक तिकीट, किंवा मुंडू टिव्हीचं हा चित्रपट एकदा पाहण्यासाठीचं सबस्क्रिप्शन. त्यामुळे तुम्ही भारतात नसलात तरी या स्पर्धेत भाग घेऊ शकता.

तुम्हांला सर्वांना शुभेच्छा. Happy

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@ माप्रा - कोड व्यवस्थित अवघड होते ...
'खुन्या मुरलीधर' तर अजिबातच वाटले नव्हते . . .

@ ललिता-प्रीति - गूगल आणि विकीचे आभार मानायला हवेत... ते नसते तर आपण काय केलं असतं!! >> माप्रांनी कोडी कढलिच नसती Happy . :p

@ ललिता-प्रीति, विक्रम३११ आणि देवचार ... Happy ... काँग्र्याट्स ...

विक्रम काका, जबरी डोके लावलात.

या माप्रांचं काही खरं नाही. जबरी स्पर्धा होती. कसले कसले आकडे लावले लोकानी.

Pages