'जनगणमन' या आपल्या राष्ट्रगीताची शताब्दी साजरी करण्यासाठी, आणि 'जन गण मन' या चित्रपटाचं स्वागत करण्यासाठी मायबोलीवर आयोजित केलेल्या स्पर्धांमधली ही चौथी परस्परसंबंध ओळखा स्पर्धा!!!
खाली काही चित्रं दिली आहेत. या सर्व चित्रांचा कशाशी संबंध आहे, या चित्रांतून काय लक्षात येते, ते तुम्ही इथे लिहायचं आहे.
समान धागा, म्हणजेच परस्परसंबंध ओळखण्यासाठी तुम्ही कितीही वेळा प्रयत्न करू शकता, कितीही वेळा उत्तर देऊ शकता. यासाठी तुम्ही कुठल्याही माहितीस्रोतांचा वापर करू शकता.
मात्र पूर्ण उत्तरंच स्पर्धेसाठी ग्राह्य धरली जातील. सर्व चित्रांचा संबंध उत्तरात असणे आवश्यक आहे.
बाफवर जे उत्तर सर्वप्रथम बरोबर असेल त्याला बक्षीस मिळेल. बरोबर उत्तर जेव्हा येईल तेव्हाच आम्ही तसे जाहीर करू. चूक उत्तराला आमच्याकडून काहीच प्रतिसाद मिळणार नाही. जोपर्यंत आमच्याकडून 'हे बरोबर उत्तर आहे' असे जाहीर केले जात नाही, तोपर्यंत तुम्ही कोडे सोडवण्याचे प्रयत्न चालू ठेवावेत, अशी विनंती.
आलेल्या सर्व उत्तरांमध्ये कुठलेच उत्तर अचूक नसेल, तर अचूक उत्तराच्या सर्वात जवळ जाणारे उत्तर 'बरोबर' म्हणून निवडले जाईल. याबाबत संयोजकांचा निर्णय अंतिम असेल.
उत्तर देताना 'उत्तर कसे काढले' हे सांगणे आवश्यक आहे
या स्पर्धेच्या विजेत्याला मिळेल पुण्यात २६ जानेवारी, २०१२ रोजी होणार्या 'जन गण मन' या चित्रपटाच्या प्रीमियर शोचं एक तिकीट, किंवा मुंडू टिव्हीचं हा चित्रपट एकदा पाहण्यासाठीचं सबस्क्रिप्शन. त्यामुळे तुम्ही भारतात नसलात तरी या स्पर्धेत भाग घेऊ शकता.
तुम्हांला सर्वांना शुभेच्छा.
अश्विनी के आणि जामोप्या आलात
अश्विनी के आणि जामोप्या आलात का तुम्ही? ... तुमच्या कमेंन्ट्स वाचून गाल दुखायला लागतात हसून हसून ..
जामोप्या, १६०००.... हे भारी
जामोप्या, १६०००.... हे भारी आहे
अश्विनी के आणि जामोप्या आलात
अश्विनी के आणि जामोप्या आलात का तुम्ही? ... तुमच्या कमेंन्ट्स वाचून गाल दुखायला लागतात हसून हसून ..
१) 'द टर्मिनेटर' चे पोस्टर २)
१) 'द टर्मिनेटर' चे पोस्टर
२) अमर चित्र कथा मधील "कृष्ण आणि नरकासूर" पुस्तकाचे मुखपृष्ठ
३) Ellsworth Toohey - द फाऊंटनहेड
तिन्ही चित्रं नॉवेल्सशी निगडीत आहेत.
तिन्ही चित्रांत त्या कथांचे नायक आहेत.
कृष्णाचा सत्तेसाठी संघर्ष
कृष्णाचा सत्तेसाठी संघर्ष कुठे होता?
.
.
कृष्णाचा सत्तेसाठी संघर्ष
कृष्णाचा सत्तेसाठी संघर्ष कुठे होता? --> नव्हता पण 'सत्ताबदला' साठी होता
.
.
त्या चित्रात महाभारत नाही..
त्या चित्रात महाभारत नाही.. महाभारतात कृष्णाने एकदाच चक्र घेतले, तेंव्हा समोर भीष्म होते. ते रथात होते.. इथे हत्ती आहे, तो नरकासुराचा आहे/असावा.
हाय्ला ! हो की ! याला
हाय्ला ! हो की !

याला जबाबदार तुम्हीच्च आहात. तुम्ही ते महाभारतातलं चित्रं वगैरे बाफ काढता आणि बाकिच्यांचं असं होतं
(No subject)
अगं अश्विनी, पोस्टी एडीट
अगं अश्विनी, पोस्टी एडीट केल्यास काय? म्हणजे माझी १२:३२ ची पोस्ट इन्व्हॅलिड.
अगं हो. कारण मी हत्तीऐवजी रथ
अगं हो. कारण मी हत्तीऐवजी रथ डोळ्यासमोर आणला, कृष्णाला रथातून खाली उतरवला, नरकासुराऐवजी पार्थाला रथात बसवला आणि लिहिलं होतं ते
टर्मिनेटर म्हणजे
टर्मिनेटर म्हणजे अरनॉल्ड.
कृश्ण म्हणजे हरि ओल्ड
आणि तिसरे हॅरॉल्ड.
अजूनी माप्रा काहीही बोललेले
अजूनी माप्रा काहीही बोललेले नाहीयेत त्यामुळे आत्तापर्यंत तोडलेले तारे निष्प्रभ ठरणारसं वाटतंय, नव्याने बघायला हवं चित्रांकडे आता...
मामी नाही का या पपसं मधे??
याचा स्वातंत्र्याशी संबंध आहे
याचा स्वातंत्र्याशी संबंध आहे असे वाटतेय.
लास्की बद्दल हे बघा विकिपिडिया मधून.
Laski had a huge effect on the politics and the formation of India, having taught a generation of future Indian leaders at the LSE. According to John Kenneth Galbraith, "the center of Nehru's thinking was Laski" and "India the country most influenced by Laski's ideas"
Speaking at a meeting organized in Laski's memory by the Indian League at London on 3 May 1950, Nehru praised him as follows:
“ It is difficult to realise that Professor Harold Laski is no more. Lovers of freedom all over the world pay tribute to the magnificent work that he did. We in India are particularly grateful for his staunch advocacy of India's freedom, and the great part he played in bringing it about. At no time did he falter or compromise on the principles he held dear, and a large number of persons drew splendid inspiration from him. Those who knew him personally counted that association as a rare privilege, and his passing away has come as a great sorrow and a shock.
आले आले. सकाळापासून बाहेर
आले आले. सकाळापासून बाहेर होते. एक तारा माझ्या डोक्यात उगवला तो असा :
तीन चित्रं शेजारी शेजारी दिली आहेत. त्यापैकी मधल्या चित्रात निळा कृष्ण हातात सुदर्शन चक्र घेऊन आहे. हा झेंड्याचा मधला पांढरा भाग असेल का? आणि त्यावर सुदर्शन चक्र. पांडव = पांढरा असं असेल का? (हे फारच कैच्याकै होतय बहुतेक .... )
आणि मग टर्मिनेटरचा आणि केशरी रंगाचा, आणि तिसर्या चित्राचा आणि हिरव्या रंगाचा संबंध जुळवावा लागेल. टर्मिनेटर = शौर्य ??? (बाकी कोणी मिळालं नाही का? की अतिरक्तपात दाखवल्याने त्याचा केशरी रंगाशी संबंध प्रस्थापित होतो?)
शिवाय ते नंबर क्रंचिंग आहेच.
आता तुमचे तारे वाचते .....
पांडव = पांढरा>>>>>>>>>>
पांडव = पांढरा>>>>>>>>>>
पंडू राजाला पंडूरोग होता
पंडू राजाला पंडूरोग होता म्हणून तो पांढरा दिसत असे. त्याचे वंशज ... असा एक महान शोध मी लावला आहे.
पण नरकासुराला मारले तेंव्हा
पण नरकासुराला मारले तेंव्हा पाम्डव कुठे होते? ते चित्र महाभारताचे की नरकासुराचे ते आधी फायनल करा
जामोप्या, हा घ्या संबंध -
जामोप्या, हा घ्या संबंध - अगदी सबंधच्या सबंध ...
नरकचतुर्दशी दिवाळीत असते - दिवाळीत थंडी असते - थंडीत बर्फं पडतं - ते पांढरं असतं.
खुश???? हुश्श !!!!!!
कृष्ण आणि नरकासुर असे संपूर्ण
कृष्ण आणि नरकासुर असे संपूर्ण नाव दिले आहे ना, मग महाभारत कुठून आलं मध्येच?
ते आकडे काय असतील ह्याची हिन्ट द्या माप्रा
सगळेच __/\__
सगळेच __/\__
मामी
मामी
किंवा उजवीकडून पहा : श्री
किंवा उजवीकडून पहा :
श्री लास्की म्हणजे ब्रह्मा (ललीनं दिलेल्या लिंकनुसार त्यांचा भारताच्या जडणघडणीत वाटा होता)
मग तर काय मध्ये विष्णुचा अवतार
आणि टर्मिनेटर = महेश=संहार करणारा
(काय जुळतय वा वा ...)
ते आकडे म्हणजे तितक्या दिवसांनी प्रलय होणारे.
टार्मिनेटर आणि कृष्ण दोघांनी
टार्मिनेटर आणि कृष्ण दोघांनी जगाला वाचवण्याकरता अवतार घेतला.
ते आकडे म्हणजे तितक्या
ते आकडे म्हणजे तितक्या दिवसांनी प्रलय होणारे.
>>> हो का ! मग भरपूर वेळ आहे आपल्याकडे
ते आकडे म्हणजे तितक्या
ते आकडे म्हणजे तितक्या दिवसांनी प्रलय होणारे>> पण २ वेगळे वेगळे आकडे दिलेत. म्हणजे २ वेळा प्रलय होणारैका?
पण मग तिसर्याचं काय? मध्येच
पण मग तिसर्याचं काय? मध्येच नरकासूर कुठनं काढला कुणास ठाऊक. आम्हाला वर्षातून फक्त एकच दिवस त्याची आठवण असते, तेही त्याला मारला बिरला म्हणून नाही, तर त्या दिवशी ऑफिशियली फराळ खाणे सुरु करायचे म्हणून.
त्या तिन्ही चित्रांचा नरकाशी संबंध असेल का?
भाऊ ..... मंसो ...
भाऊ .....

मंसो ...
Pages