परस्परसंबंध ओळखा स्पर्धा - ४

Submitted by माध्यम_प्रायोजक on 22 January, 2012 - 23:43

'जनगणमन' या आपल्या राष्ट्रगीताची शताब्दी साजरी करण्यासाठी, आणि 'जन गण मन' या चित्रपटाचं स्वागत करण्यासाठी मायबोलीवर आयोजित केलेल्या स्पर्धांमधली ही चौथी परस्परसंबंध ओळखा स्पर्धा!!!

खाली काही चित्रं दिली आहेत. या सर्व चित्रांचा कशाशी संबंध आहे, या चित्रांतून काय लक्षात येते, ते तुम्ही इथे लिहायचं आहे.

quiz_4b.jpg

समान धागा, म्हणजेच परस्परसंबंध ओळखण्यासाठी तुम्ही कितीही वेळा प्रयत्न करू शकता, कितीही वेळा उत्तर देऊ शकता. यासाठी तुम्ही कुठल्याही माहितीस्रोतांचा वापर करू शकता.

मात्र पूर्ण उत्तरंच स्पर्धेसाठी ग्राह्य धरली जातील. सर्व चित्रांचा संबंध उत्तरात असणे आवश्यक आहे.

बाफवर जे उत्तर सर्वप्रथम बरोबर असेल त्याला बक्षीस मिळेल. बरोबर उत्तर जेव्हा येईल तेव्हाच आम्ही तसे जाहीर करू. चूक उत्तराला आमच्याकडून काहीच प्रतिसाद मिळणार नाही. जोपर्यंत आमच्याकडून 'हे बरोबर उत्तर आहे' असे जाहीर केले जात नाही, तोपर्यंत तुम्ही कोडे सोडवण्याचे प्रयत्न चालू ठेवावेत, अशी विनंती.

आलेल्या सर्व उत्तरांमध्ये कुठलेच उत्तर अचूक नसेल, तर अचूक उत्तराच्या सर्वात जवळ जाणारे उत्तर 'बरोबर' म्हणून निवडले जाईल. याबाबत संयोजकांचा निर्णय अंतिम असेल.

उत्तर देताना 'उत्तर कसे काढले' हे सांगणे आवश्यक आहे Happy

या स्पर्धेच्या विजेत्याला मिळेल पुण्यात २६ जानेवारी, २०१२ रोजी होणार्‍या 'जन गण मन' या चित्रपटाच्या प्रीमियर शोचं एक तिकीट, किंवा मुंडू टिव्हीचं हा चित्रपट एकदा पाहण्यासाठीचं सबस्क्रिप्शन. त्यामुळे तुम्ही भारतात नसलात तरी या स्पर्धेत भाग घेऊ शकता.

तुम्हांला सर्वांना शुभेच्छा. Happy

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

किंवा उजवीकडून पहा :
श्री लास्की म्हणजे ब्रह्मा (ललीनं दिलेल्या लिंकनुसार त्यांचा भारताच्या जडणघडणीत वाटा होता)
मग तर काय मध्ये विष्णुचा अवतार
आणि टर्मिनेटर = महेश=संहार करणारा
(काय जुळतय वा वा ...)
ते आकडे म्हणजे तितक्या दिवसांनी प्रलय होणारे.>>>>>>>>>>>>>>>>>>>

मामी, तुला साष्टांग दंडवत ग बाई, कमाल आहे तुझं डोकं खरंच Lol

अर्नॉल्ड ऑस्ट्रियामधे जन्मला पण कॅलिफॉर्नियाचा गव्हर्नर होता.

कृष्णाचा जन्म मथुरेला झाला. पण तो द्वारकेचा राजा होता. असा काही संबंध लागतोय काबघा...

ते टर्मिनेटर आणि कृष्णाचे फोन नंबर्स आहेत. >>> अश्वे ... Biggrin

टर्मिनेटरने १६००० गोळ्या मारल्या. कृष्णाने १६००० बायका सोडवल्या.. लेबर पार्टीत १६००० लोक होते.
>>>> जामोप्या .. Biggrin

दीपांजली ... ग्रेट विमेन थिंक अलाईक वगैरे. Happy

कृष्णाचा फोटो दोन्ही फोटोंच्या मधे आहे, याचा अर्थ इतर दोघांनी प्रेरणा कृष्णा पासुनच घेतली असावी का? Proud

किंवा पाश्चात्य संस्कृतीमुळे भारतीय संस्कृतीचं सँडवीच होत आहे .... Proud

आता चहा पिऊन येते. म्हणजे तारे तोडणं थांबून काहीतरी व्यवस्थित विचार करता येईल. Happy

मस्त चालू आहेत उत्तरे! Lol
माझा अंदाज.
पहिले चित्र : Arnold Schwarzenegger. हा बॉडीबिल्डर, अ‍ॅक्टर, बिझनेसमन, इन्व्हेस्टर आणि राजकारणी आहे. तो कॅलिफोर्नियाचा ३८ वा गव्हर्नरही आहे. २००३ ते २०११ या काळातला. त्याला विसाव्या वर्षी मि. युनिव्हर्स असा किताब मिळाला होता. म्हणजे तो ताकदवान,देखणा,कुशल राजकारणी, हुशार व्यापारी आहे. अनेक झेंगट्यांमध्ये त्याचे नावही गोवले आहे. तरीही त्याच्यावर फिदा असलेल्या स्त्रियांची काय गणती? अगदी आपल्या कृष्णासारखा. Proud
दुसरे चित्र : नरकासुराचा वध. अमर चित्रकथेचे मुखपृष्ठ. नरकासुराने माजवलेले अराजक नष्ट करण्यासाठी कृष्णाने केलेला संहार. देवांची आई अदिती हिला नरकासुराच्या ताब्यातून मुक्त केले. कृष्ण हा आजही भारतामध्ये पालनहार, कुशल राजकारणी म्हणून सर्वमान्य आहे.
तिसरे चित्र :Harold Laski हे मार्क्सवादी राजकारणी, लेखक आणि प्राध्यापक होते. यांचा प्रभाव स्वतंत्र भारताच्या निर्मितीवर आहे. One Indian Prime Minister said "in every meeting of the Indian Cabinet there is a chair reserved for the ghost of Professor Harold Laski".[10][11] His recommendation of K. R. Narayanan (later President of India) to Jawaharlal Nehru (then Prime Minister of India), resulted in Nehru appointing Narayanan to the Indian Foreign Service.[12] In his memory, the Indian government established The Harold Laski Institute of Political Science in 1954 at Ahmedabad. पुरुषोत्तम गणेश मावळणकर यांनी लास्की यांच्या मार्गदर्शनानुसार इंग्लंडमध्ये अभ्यास केला आणि स्वतंत्र भारतामध्ये The Harold Laski Institute of Political Science ची अहमदाबादेत १९५४ साली स्थापना केली. ते स्वतः राजकारण अभ्यासक, संशोधक आणि संसद सदस्य होते. इंदिरा गांधींच्या काळातील आणीबाणीला त्यांनी सक्रिय विरोध, संसद सभेला हजर राहून, दर्शवला होता.
म्हणजे थोडक्यात, माप्रा आपल्याशी 'राजकारण' खेळतायत!आता तर आकडेही लावलेत! Proud माप्रा, Light 1

'राजकारण' हे उत्तर मी आधिच दिलय ...
पण 'माप्रा' कै बोलेनात . . . यातच मला कैच्याकै 'राजकारण' दिसतय .. Proud

नरकसुर वधाच्या गोष्टित तेवढे शब्द आहेत . .असे असेल.. आकड्यांच्या आधि 'words' असे पण लिहिले आहे

तरीही त्याच्यावर फिदा असलेल्या स्त्रियांची काय गणती? अगदी आपल्या कृष्णासारखा. >> Lol

सुदर्शन 'चक्र' यावरून याचा संबन्ध परमवीर चक्राशी असेल असं वाटतय. The PVC was established on 26 January 1950 (the date of India becoming a republic), by the President of India.

बाकी डोके लावायला आज वेळ नाही. कुणाला या सुतावरून स्वर्ग गाठायचा असल्यास जरूर प्रयत्न करा Proud

१.समाजवाद,भांडवलवाद आणि ईश्वर वाद हे तिन्ही म्हणजेच राजकारण वा सत्ताकरण.
३. मायबोली आकडा ६७५१ बघा.

हे माझं उत्तर.

१) द टर्मिनेटर - against slavery - मुक्तता

२) नरकासुराच्या तावडीतून स्त्रियांची मुक्तता - स्वातंत्र्य

३) Harold Laski - भारताच्या स्वातंत्र्यावर प्रभाव
-----
त्या आकड्यांचं काही कळत नाहिये.

१) द टर्मिनेटर - against slavery - मुक्तता

२) नरकासुराच्या तावडीतून स्त्रियांची मुक्तता - स्वातंत्र्य

३) Harold Laski - भारताच्या स्वातंत्र्यावर प्रभाव>> अश्विनी, उत्तर बरचस रिलेटेड वाटतय

आपल्याला सगळं रिलेटेडच वाटतं गं. माप्रांना ते अनरिलेटेड वाटतं त्याचं काय Proud सगळेजण बघ ना कुठून कुठून सगळी चित्रं ताणून त्यांची एकत्र गाठ मारत असतात. गाठी बसतातही पण माप्रांना हवी ती गाठ नसते ती.

कॉन्ग्रेसच्या साईटवर ही माहिती मिळाली
Laski asked for a fixed date about three years after the end of the war for giving India Dominion Status and declared that the Indians would work out their Constitution within this period.

यावरून उत्तर 'भारतीय घटना' हे किंवा त्या संबन्धीत असावे.

भाऊ, तुमचा इथला संदेश वाचला. काम एकदम सोप्पंय मग! लास्कीचा शिष्य कृष्ण (मेनन), बरोबर? कृष्णाचा शिष्य अरनॉल्ड श्वार्झनेगर अर्थात अर्जुन शिवाजीनगर!! Lol

तेव्हढं आकड्यांचं जरा जमवाच, मी म्हणतो! मग सारा बेत ठिक्क जुळून येईल! Proud

आ.न.,
-गा.पै.

<< तेव्हढं आकड्यांचं जरा जमवाच, मी म्हणतो! मग सारा बेत ठिक्क जुळून येईल! >> आतां काय पैलवानानीच आखाड्यात उडी टाकलीय, मग आंकड्यांची काय बिशाद !! Wink

[ पण सिरीयसली, लास्की व कृष्ण मेनन हा संबंध अगदींच बादरायण व हास्यास्पद नसावा ; मेनन यांच्या विकेपिडेयातील माहितीतला हा खास उल्लेख पहा -
In London, Menon pursued further education at the London School of Economics and University College, London, where Harold Laski described him as the best student he had ever had.[3] ]

words79816022
words हा sword चा अ‍ॅनाग्राम आहे (हे कोणत्याच डॅन ब्राऊन पंख्यांच्या लक्षात आले नाही)?
आकड्यांची चीरफाड (तलवारीने) करता कळते की त्यात ७८६ दडलेले आहे, अरनॉल्ड ०.२२ कॅलीबर ची बंदूक वापरायचा व एकोणीस वर्षे पूर्ण झाली असतांना मिस्टर युनिवर्स बनला.

पुढची हींट (कृष्ण = मिस्टर युनिवर्स संबंधीत) उद्या.

आत्ता माझ उत्तर
पहिल्या प्रथम ते तिघं हि राजकारणी होते हे पाहिलं साम्य.
त्या व्यतिरिक्त आर्नोल्ड नी आपल्या अभिनयाद्वारे लोकांवर ( लोकांच्या हृदयावर) राज्य केलं. कृष्णाचं एक नाव ग्यानेश्वर होत म्हणजे बुद्धीची देवता. त्याने लोकांवर बुद्धीवर राज्य केल आणि Harold Laski जो एक पोलिटीकल सायन्स चा प्रोफेसर होता आणि एक उत्तम लेखक होता ज्यांनी आपल्या लेखन- विचारांनी लोकांच्या मनावर राज्य केल. त्या तिघांनीही लोकांच्या हृदयावर, बुद्धीवर आणि मनावर राज्य केलं आहे. त्यामुळे त्या तिघांचा जयजयकार असो.
असा काहीतरी परस्परसंबंध असावा

लोकहो,

कोडं सोडवण्यासाठी तुम्ही दाखवलेल्या उत्साहाबद्दल धन्यवाद Happy

तिसरं चित्र हे हॅरॉल्ड लास्कीचं आहे, जे तुम्ही बरोबर ओळखलंत. आता जरा इतर चित्रांकडे बारकाईनं बघा. टर्मिनेटरच्या चित्राखाली आकड्यांच्या आधी 'वर्डस्' हा शब्द आहे, त्याकडे आकड्यांबरोबरच लक्ष द्या. आकडा आणि त्याच्यावरचे चित्र यांचाही संबंध लावण्याचा प्रयत्न करा. Happy

माप्रा, त्या words आणि संख्येनंतर जो स्वल्पविराम आहे तो ही महत्त्वाचा आहे का? प्लीज ही जेन्युईन शंका आहे.

मामी, मलाही त्या स्वल्पविरामाचा काही सिग्निफिकंस असावा असं वाटतंय सुरुवातीपासूनच. मी तो आकडा वर्ड्स मध्येही टाकून मग डिलिट केला. वेड्याचा बाजार झालं Lol

अगं तो कृष्णाखालचा आकडा म्हणजे त्याच्या सुदर्शनचक्राचे rpm असाही काहितरी फाजिलपणा सुचला होता.

Pages