गाजराची चटणी

Submitted by एम्बी on 21 December, 2011 - 07:07
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

गाजर १ मध्यम
लसूण २-३ पाकळ्या
तिखट आवडीनुसार
मीठ चवीप्रमाणे
लिंबाचा रस १ चमचा
तेल
मोहरी
हिंग

क्रमवार पाककृती: 

१) १ मध्यम गाजर साल काढून जाडसर किसून घ्यावे(मोठ्या भोकाच्या किसणीने)
२) गाजराच्या किसात २-३ लसूण पाकळ्या, तिखट, मीठ, लिंबाचा रस घालून मिक्सरला फिरवून घ्यावे. बारीक वाटले तरी चालेल. शक्यतो पाणी न घालता वाटावे पण अगदीच मिक्सर फिरत नसेल तर अगदी थोडे घालावे.
३) तयार चटणी बोलमधे काढून घेऊन वरून हिंग मोहरी ची चरचरीत फोडणी घालून हलवावे.

वाढणी/प्रमाण: 
१ गाजराची चटणी जेवताना २-३ माणसांना पुरेल
अधिक टिपा: 

१) याच चटणीत थोडे दाण्याचे कूट घातले तरी छान खमंग होते.
२) फोडणीत हळद घालू नये नाहीतर चटणीचा रंग बदलतो.
३) पोळी, भाकरी, डोसे, पराठे, सँडविच कशाही बरोबर छान लागते.

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रंग पाहूनच अहाहा! करेनच.
मी बंगलोरला असताना का नाही दिलीस ही पाकृ. तिथे गाजरे उदंड अशी परिस्थिती आहे! Proud

लाजो, आडो, शैलजा, सायो धन्यवाद.

दिनेशदा कडू नाही लागत इकडची गाजरे. अगदीच वाटले तर मधला पिवळा दांडा ठेवून किसायची.

सायो, आई लोणचे पण करते. गाजर छोट्या फोडी करून घ्यायचे, त्यात मीठ, कोणताही कैरीच्या लोणच्याचा तयार मसाला घालायचा, वरून लिंबू पिळून मस्त खमंग फोडणी!
फ्रीजमधे १ महिना टिकते पाण्याचा हात लागला नाही तर. आणि फोडी पण छान करकरीत रहातात. आमटीभाताबरोबर एकदम मस्त!!