कोचिंग क्लासेस : आजची गरज?

Submitted by बागेश्री on 14 December, 2011 - 03:42

काल टी ब्रेक मधील साधारण चर्चा-

मी : श्वेता, ओये अगं लक्ष कुठाय, चहा गार झाला
श्वेता : अं... हो यार, मैने कल बोला था ना, त्या सरांना भेटायला गेलो होतो

मी : धिरज च्या क्लास साठी ना?
श्वेता : हो ना, काय रेट आहेत माहितीये तुला, क्लासेसचे?
मी : अगं पण एक सांग, आता फायनल एक्झामस येतील काही महिन्यात, तू आता का कोचिंग्ज शोधते आहेस?
श्वेता : अरे यार, उसकी नाईन्थ के लिये, तो आता आठवीत आहे, मी ह्या वर्षी नाही, पुढच्या वर्षाची तयारी करते आहे
मी : ओह! अगं पण ७/८ महिन्यांआधीपासून?
श्वेता : हो मग? त्या टीचरकडे बुकींग करावं लागतं
मी : बुकींग? इथेही? ओअ गॉश!
श्वेता : अरे आगे सुन, नेक्स्ट नोव्हेंबर मुझे उसका टेन्थ का भी बुकींग करके रखना पडेगा
मी : हम्म.. शिक्षणाला अवघड करतोय आपण लोकच, आठवी नववी पण सेल्फ स्टडी होऊ शकतं जर पॅरेंट्सने लक्ष घातलंच तर, पण आज काल पालकांकडे वेळ कुठे? दॅट्स ऑदर टॉपिक! काय आहे फीस?
श्वेता : एटी के
मी : व्हॉट? अस्सी हजार??? आर यू ओके? (मी अ़क्षरशः उडाले बसल्या जागी)
श्वेता : येस मॅम, दॅट टू, उनको अगर बुक करना है तो, चालीस हजार आज भरने है... त्याच सगळ्या गोष्टींचा विचार करत आहे
मी : श्वेता, हे अतिच आहे, नववीतल्या सगळ्या विषयांना ऐंशी हजार? अगं इन्जिनीअरींग च्या फीस शी स्पर्धा झाली ही

श्वेता : मॅड्ड्म धीस ओनली फॉर टू सबजेक्ट्स!! गणित आणि विज्ञान, दहावीला तर सेम सब्जेक्टस ची फीस एक लाख, वोह भी अ‍ॅडव्हान्स बुकींग करेंगे तोह.
मी : आ>>>य कान्ट बिलिव्ह धिस ऑल! सिरिअसली, अरे काय चाललंय काय, आणि आहेत कोण हे सर, मुलाला मेरिटमधे आणूनच दाखवणार का मग, गॅरेन्टीने?
श्वेता : छे छे! ते म्हणे मुलाच्या बुद्धिमत्तेवर अवलंबून, आम्ही बेस्ट देणार, मुलं झोळीत किती पाडून घेतात ते आम्ही कसे ठरवणार!!

मी : बापरे! मग तू देणारेस चाळीस हजार??
श्वेता : वो सर के साथे निगोशिएट किया बहोत, तो सत्तर हजार में माना है, मग पस्तीस द्यायचेत
मी : वाह, काय महान!
श्वेता : तो म्हणतो, मी फक्त IB, ICSC स्टूडंट्स ला कोचिंग देतो सहसा, नेक्स्ट यिअर एक घंटेका स्लॉट फ्री है, इसिलिये "स्टेट बोर्ड" का सोचा!
मी : कम ऑन, श्वेता! ह्याची खरीच गरज आहे का? आय मीन सत्तर हजार, रोज एक तास, फक्त दोनच विषय?
श्वेता : बागी, कभी कभी ना बच्चे समझ नही पाते! धिरज को भी वोही क्लासेसे में जाना है... त्याचे सगळे क्लासमेट्स जाणार त्यांच्या पॅरेट्सनी भरले ना पस्तीस हजार.

मी : मागणारे आणि देणारे सगळेच तयार आहेत म्हटल्यावर बोलायचं काय?

मायबोलीकरांनो, तुम्हांलाही येतात का असेच अनुभव?

१) मुलांच्या शिक्षणाला असा पैसा ओतायची खरीच गरज आहे का?
२) सेल्फ स्टडी- हा ऑप्शन आधीपासूनच कसा बिंबवावा
३) कोचिंग क्लासेसच फावतंय, इतकी अवाढव्य मागणी पूर्ण केल्यावर आपली मुलं खरीच अभ्यासार्थी होत आहेत की त्यांना निव्वळ परि़क्षार्थी बनविण्यात आपणही सहभागी होतोय?

मुलांचा अभ्यास, कॉम्पीटेशन, मुलांवर पडणारा ताण ह्यावर सकस/ सर्वांगीण चर्चा घडावी, हा हेतू.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

मवा, आकडे खरे आहेत. मुंबईपुण्यामधे तरी आहेतच.

अर्थात कृपया आमच्या पोटावर पाय देऊ नका.
आम्ही ट्युशन्स घेतो. घरच्याघरी. सर्व विषय पाचशे रूपये (आणि आम्ही होमवर्क करून घेत नाही.) Proud

नंदिनी,
पोटावर पाय देण्याचा प्रश्न नाहीच हो, हेतू ही नाही.
मुलांना दर्जेदार शिकवणं आणि त्यांना खर्‍या अर्थाने "विद्यार्थी" बनवणं ह्याकडे ही तेव्हढाच कल हवा, हा मुद्दा आहे, कमर्शिअल अ‍ॅटिट्यूडमुळे तो टिकवला जात नाहीये

पोटावर पाय देण्याचा प्रश्न नाहीच हो, हेतू ही नाही.>> अहो त्या मजेत म्हणाल्या असाव्यात Happy

पण मला नंदिनी यांचे पटते. सिलॅबसचा व ते शिकवण्याचा पैशाशी संबंध नाही.

फुकटही शिकवता येईलच की?

ह्या फीज (हेच आकडे) खरंच आहेत का ? कुठे ?>>> ठाणेला पण बहुदा कारण मी सोसायटीतील काहिजणांकडुन हे ऐकले आहे.

नंदिनी, मला वाटते या क्लासेस्ची सुरुवातच होमवर्क करुन घेण्यासाठी होते.

फुकटही शिकवता येईलच की?
>> बेफी मुद्दा छान!
ज्ञान देत- अर्थार्जन करणे, हा जरी चांगला हेतू असला, तरी पालकांकडून वरिल आकड्यात पैसा उकळणे, ही पद्धत (७०, ८० हजार वगैरे) अतिरेकीच म्हणावी.

मोनाली. हो, म्हणून मी जेव्हा होमवर्क करवून घेणार नाही हे सांगते तेव्हा कित्येक पालक मुलाना पाठवत नाहीत. मी ज्याना पैसे देणे शक्य नसते अशाना फुकट शिकवलेले आहे. पण ज्याना पैसे देणे शक्य आहे अशाना फुकट शिकवले की त्याची किंमत राहत नाही असा अनुभव. असो, धागा भरकटवूया नको.

बागेश्री, तुमचा मुद्दा मान्य आहे. मी सहज गंमत केली. साठ आणि सत्तर हजार रूपये देऊन ट्युशन लावणारे कुणी पालक असतील तर त्यांची मनोभूमिका समजून घ्यायला आवडेल.

क्लासची फी इतकी वाढायची काही कारणे:

१. आज काही क्लासेस मार्केटींग करून स्टेटस सिंबल्स बनले आहेत. पालकांना आपला पाल्य त्या क्लासला जातो हे सांगायला अभिमान वाटतो.
२. मुलांसाठी वेळ नसल्याने पालकांना अपराधी वाटत असते. करीअरला प्राधान्य आणि वेळ दिल्यामुळे हाती पैसा पण असतो. मग ती अपराधीपणाची भावना आणि पैसा यांचा मेळ घातला जातो.
३. चढाओढीच्या जगात आपल्या पाल्याने यश मिळवावे या इच्छेचा अतिरेक होतो.

कोचिंग क्लास लावण्याची बरीच कारणं असतात :

माझ्यामते क्लास लावणारे वेगवेग्ळ्या कॅटेगिरीतले असतात
१.
शाळेत नीट शिकवत नाहीत, शिक्षकांनाच विषयाचं आकलन नाही; (असा समज किंवा सत्य )
क्लासचं रेप्युटेशन.
क्लासमधे विषय शिकवण्यापेक्षा पेपर्स सोडवण्याचा प्रचंड सराव करून घेतला जातो.
सगळा अभ्यासक्रम उन्हाळ्याच्या सुट्टीत संपवून पुढचे १० महिने फक्त प्रश्नपत्रिका सोडवून / तपासून
घेतल्या जातात.
सगळे मित्र्-मैत्रिणी क्लासला जातात, गेलो नाही तर मागे पडू असा समज.

२.
अभ्यासात खरच मागं असणं, वेळ लागणं.
एखाद्या विषयांत जास्त सरावाची गरज असणं आणि शाळेत इतर मुलांच्या गर्दीत ह्या गोष्टीकडे
वैयक्तिक लक्ष द्यायला वाव नसणं.
काही काही ठिकाणी शाळेत शिकवणारे शिक्षकच क्लासेस घेतात, ते त्यांचं एक्स्ट्रा इन्कम असतं
त्यामुळे ते शाळेत नीट शिकवतच नाहीत ( जरी एखाद्याला गरज नसली तरी इतर गोष्टीत म्हण्जे
प्रॅक्टीकल / सबमिशन इ. ठिकाणी क्लास लावला नाही तर अतिशय त्रास देतात ).

इथेही या उदाहरणात तुमच्या मैत्रिणीच्या मुलाला ठराविक क्लासलाच जायचं आहे, त्याला पालकांच्या
आर्थिक कुवतीची कल्पना आहे. तुमची मैत्रिण त्याला नाही सांगूच शकते. त्यामुळे मी तरी ह्याला
लोकांकडून पैसे उकळणं म्हणणार नाही.

हा विषय अतिशय गंभीर आहे. खरच येवढी फी आहे. मुंबईत तर नक्किच आहे. ह्यात ही घरी येवुन शिकवणारे मास्तर लोक जास्त पैसे घेतात. माझ्या मैत्रिणी चा अनुभव आहे. आता माझा अनुभव

मी स्वतः आई नोकरी करत असल्याने क्लास ला जात होते. ठाण्यात एक प्रसिद्ध क्लास होता. लीला जोशी बाईंचा. त्या ८वी पासुन इंग्रजी शिकवायच्या. त्यांची बहीण जयवंत बाई गणित आणि सायंस शिकवायच्या. जोशी बाईंच्या क्लास ला जाणे हे एक जगणे असायचे. तिकडे जे गेले असतिल त्यांन्ना बाईंन्ना विसरणे अशक्य आहे. त्या २५ वर्षांपुर्वी रु.१० प्रति महिना फी घेत असत. नंतर सी.ए करताना ईंटर ला क्लास लावला होता. पण आर्टीकल शिप करुन ते जमेना. फायनल ला न्हवता लावला.

माझा नवरा हा सी.ए., आय्.सी.डब्लु.ए आणि सी.एस. आहे. तो १० वी ला क्लास न लावता मेरीट ला आला होता. तसेच पुर्ण शिक्षणात त्याने एकदाही क्लास लावला न्हवता. तो सी.ए. परिक्षेत भारतात ईंटर ला ४था, आणि फायनल ला ७ वा आला आहे.

आपल्या वेळेला सेल्फ स्ट्डी होत होतं. माझ्या मुलीला अजुन तरी क्लास लावलेला नाही ( ती ५ वीत आहे). पण आजु बाजुला अनेक मुले १ली पासुन क्लास ला जाताना पाहाते आहे. त्यांच्या आया घरी आहेत तरीही. कारणे अनेक दिलि जातात. पण मला तरी ती पटत नाहीत. माझी मुलगी अत्त्ता स्कॉलरशिप च्या परिक्षेत राज्यात २० वी आली ( ४थी च्या) तिला क्लास लावला न्हवता. शाळेतुनही काहीच शिकवले न्हव्हते (कारण जनगणने मुळे शिक्षक बीझी होते). सगळा अभ्यास मी आणि माझ्या साबा ह्यानी मिळुन घेतला. अजुन पुढचा काही प्लॅन नाही. पण नवरा तरी म्हणतो की क्लास नको लावुया. तोपर्यंत काय होईल माहीती नाही.
क्लास लावयचा की नाही ते अनेक गोष्टींवर अवलंबुन आहे
१. मुलाची तयारी किती आहे.
२. मुले सेल्फ स्ट्डी साठी आई वडील वा ईतर लोकांचे किती ऐकतात
३. तुमची कीती तयारी आहे
४. मुलाचा अभ्यास झेपण्याची ताकद आहे का?
५. त्याचं समाधान करण्याची तुमची कितपत क्षमता आहे
६. तुम्ही मुलांकडुन काय अपेक्षा करता
७. मार्क जर कमी मिळाले ( अपेक्षेपेक्षा) तर काय पर्याय आहे आणि पचवायची ताकद पाहीजे.
८. मुलगा जर स्वतः आपला आपण अभ्यास करत आहे तर त्याच्यावर विश्वास पाहीजे. (जसा माझ्या सासु सासर्‍यांचा त्यांच्या मुलावर होता. तो एकटा अभ्यास करत होता. त्यांनी मुलाचा वकुब ओळखुन त्याच्या कलाने सगळे घेतले)

ह्यातले एक जरी नसेल तरी सरळ क्लास लावावा. अत्ताची मुलं खुप फोकस्ड असतात. त्यान्ना खुप माहीती होत असतं. त्यामुळे त्यांन्ना कळत असतं की आपल्याला काय हवय. आज काल मुलं खुपच विस्ताराने विचार करतात. आजकाल अनेक मार्ग आहेत. मी कॉमर्स ला गेले तर माझ्या वडिलांकडच्या प्रत्येकाने नाके मुरडली ( ते सगळे ईंजीनीअर किंवा डॉक्टर आहेत). मुलांन्ना वेळ द्या. त्यांच्याशी बोला.

मी माझ्या मुलीला रोज एका विषयाचा पेपर देते. त्यात कधी कधी १५ गणिते पण असु शकतात किंवा १५ प्रश्ण सुध्धा. तिला आता त्याची सवय झाली आहे. रोज असा एक विषय संपवल्याने परिक्षा आली की खास बर्डन घेवुन काही करावे लागत नाही. रोज १ तास असा अभ्यास केला तरी पुरे. होम वर्क झाल्या वर ती आनंदाने हा अभ्यास करते. परत रोजचे खेळायला आणि टी.व्ही. बघायला मोकळी. तुम्ही मुलांकडे लक्ष देता ही भावना त्यांन्ना खुप काही देवुन जाते. रोजचा असा अभ्यास केल्याने मलाही तिच्या कच्च्या बाजु कळतात. तिला तिचे इतर उद्योग ( बॅडमिटंन, नाच, सायकल, टीव्ही, एक्स बॉक्स ३६०) करायला वेळ मिळतो.

मी आधी ज्या नोकरीत होते तिकडे फारच उशीर होत असे. पण तिकडे मला खुपच स्कोप होता. मुलगी तेंव्हा खुप लहान होती. तेंव्हा आम्ही दोघांन्नी ठरवले होते की जर मी पुढे गेले तर त्याने घर बघायचं, म्हणजे लो प्रोफाईल जॉब घ्यायचा. पण जर त्याला संधी मिळाली तर मी लो प्रोफाईल जॉब घ्यायचा. त्या वेळेस मी धावत होते, म्हणुन त्याने घर पाहीलं. आता सध्या तो धावतो आहे, म्हणुन मी लो प्रोफाईल आहे. (संध्याकाळी साडेसहा पर्यंत घरी). त्याची पुर्ण कल्पना मुलीला आहे. त्यामुळे ती त्या प्रमाणेच रीअ‍ॅक्ट होते. आईचा वेळ आपल्या इतकाच महत्वाचा आहे हे कळल्यावर ती त्याचा आदर करते.

पुढे क्लास जरी लावला तरी मला नाही वाटत की सगळ्या विषयांन्ना लावला जाईल. आणि लावला जाईल तोही फक्त १०वी ला. कारण मला तरी वाटतं की तो पर्यंत मी अभ्यास घेवु शकेन.

ज्यांची मुले ९ वी १०वीत आहेत त्यांचे अनुभव खुप मार्गदर्शक ठरतील.

काही फार छान मुद्दे आलेत चर्चेत इथे. तेच जरा मांडू पहाते

१) स्टेटस सिम्बॉल- खरे आहे हे, ह्यात पालकांनी स्वतःचा स्टेटस राखण्यासाठी मुलांच्याच कुबड्यांसारखा वापर केलेला दिसतो- माझ्या ह्या बाफ चा उद्देश मुळी हाच आहे, मुलांच्या मानसिकतेचा कितीसा विचार पालक, शाळा/ कोचिंग मधील शिक्षक करतात?

२) कोचिंग क्लासेस आजची गरज आहे, हे मानले तर- ते क्लासेस अवखळ मुलं घरी आई बाबा नसताना अभ्यास न करता उंडारत फिरण्यापे़क्षा तासभर अभ्यास करत बसतात हा रिलीफ- आणि अर्थातच ज्ञानग्रहण केल्याची श्वाश्वती मिळवणे- हा पालकांचा उद्देश असावा, लेखात डिमांड केलेल्या फी मुळे "मी ह्या पोरावर इतका पैसा ओतूनही, प्रगतिपुस्तकावर दिवेच" अशी मानसिकता पालकांची नसेल होत का?

३) सेल्फ स्टडी आणि कोचिंग, ह्यातून मुलांचा खरोखर उत्कर्ष होतोच आहे का, हे पाहणेही महत्वाचे.
शिकणं हा सुंदर अनुभव असावा- डोक्याचा ताप नको- ही मानसिकता मुलांमधे रुजवायला पालक, शाळा शिक्षक आणि कोचिंग क्लासेस चे शिक्षक ह्या सार्‍यांनीच पाऊलं उचलायला हवीत

पैशाचा विचार नि क्लासेसमधे कसे शिकवतात हे दोन मुद्दे बाजूला ठेवून,
१. "शिकवणे" हि एक कला आहे नि '
२. वयाने मोठे असणे ह्या एकमेव निकषावर मुलांना शिकवणे' ह्यासारखी गैरसमजूत नाही.

ह्या दोन मुद्द्यांचा पण विचार करावा.

"शिक्षणाला अवघड करतोय आपण लोकच, आठवी नववी पण सेल्फ स्टडी होऊ शकतं जर पॅरेंट्सने लक्ष घातलंच तर, पण आज काल पालकांकडे वेळ कुठे?" >>>

पूर्वीपेक्षा वेळ कदाचित कमी असेलही. पण त्याहीपेक्षा महत्वाचं हे आहे की पालकांनी मुलांचा अभ्यास घेणं ही संकल्पना जवळपास नष्ट होत चाललेय, किंबहुना झालीच आहे असं म्हटलं तर फारसं वावगं ठरणार नाही. Outsourcing हा प्रकार गेल्या १०/१२ वर्षात जास्त बोकाळलाय पण त्या आधीपासूनच पालकांकडून मुलांना शिकवणं outsource केलं जातंय.... निदान गेल्या २०/२५ वर्षांपासून तरी नक्कीच.

हे होण्याची अनेक कारणे आहेत. त्यातली काही प्रमुख कारणं....

(१) इंग्रजी माध्यमातून दिलं जाणारं शिक्षण. …. हे सर्वात महत्वाचं कारण. बहुसंख्य पालकांना अभ्यास घेणं जमत नाही. सर्वसामान्य मुलांना भाषेच्या अडचणीमुळे विषय कळत नाही. म्हणून क्लासचा आधार घ्यावासा वाटतो.
(२) परीक्षेच्या प्रश्नपत्रिका कशा असतील, कुठल्या प्रकारे उत्तरं लिहिणं अपेक्षित आहे इ.इ. गोष्टी (ज्या SSC, HSC बोर्डाला अपेक्षित आहेत) त्याचं स्पष्टीकरण पाठ्यपुस्तकात दिल्याचं मला तरी आढळलेलं नाही. त्यामुळे अमुक प्रकारे उत्तर लिहिलं तर मार्क मिळतील की नाही याबद्दल मनात साशंकता असते. आणि त्यात अनेक प्रकारे भरही पडत असते. खरं तर याबाबतचं संपूर्ण मार्गदर्शन सविस्तरपणे पाठ्यपुस्तकातच दिलं गेलं पाहिजे. क्लासेस मध्ये त्या प्रकारचं मार्गदर्शन केलं जातं अशी समजूत असल्याने स्वाभाविकच क्लास करणं अपरिहार्य आहे की काय असं वाटतं.
(3) क्लासमध्ये तोच विषय परत शिकवला जाणार आहे हे माहित असल्याने शाळेतल्या शिकवण्याकडे दुर्लक्ष करण्याची मुलांची (सहज) प्रवृत्ती.
४) पालकांच्या अती वाढलेल्या अपेक्षा.
५) SSC/HSC नंतर (विशेषत: इंजीनीअरिंग बाबत) डिग्री जरी युनिव्हर्सिटीची घ्यायची असली तरी कॉलेज कोणतं होतं हे महत्वाचं मानलं जातं असं ऐकिवात असल्याने नावाजलेल्या कॉलेजमधील ऍडमिशनसाठी चालणारी जिवापाड धडपड. त्यामुळे चांगलं कॉलेज मिळविण्याच्या उद्देशाने, खूप मार्क मिळविण्यासाठी क्लासला जाणं भाग पडतं.
................................
माझ्या जवळचं एक उदाहरण देतो. उत्तम बुद्धीमत्ता असलेला मुलगा, इंग्रजी माध्यम, ९ वी पर्यंत खेळ आणि इतर टाइमपास सांभाळून स्वत: अभ्यास करण्याची वृत्ती. घरी आई आणि वडिल या दोघांनी केलेलं मार्गदर्शन. त्यामुळे सुयोग्य/मर्यादित श्रमात ९ वी पर्यंत सुमारे ८५ ते ९० टक्क्यांपर्यंत त्याला मार्क मिळत.

तो मुलगा १० वीत गेला तेव्हा बाकीच्यांच्या आग्रहावरून (किंवा आपल्याकडून ही गोष्ट करायची राहून गेली असं वाटायला नको म्हणून आणि आर्थिक कुवत असल्याने) त्याला एका नामांकित क्लास मध्ये घातला. सुमारे दोन महिन्यांनंतर तो कंटाळला... "शाळेत शिकवलेलंच परत काय शिकायचं ? उगाच वेळ फुकट जातो." या त्याच्या विधानाचा आई-वडिलांनी नीट अभ्यास केला. आणि “क्लासला गेला नाहीस तरी चालेल, पण परफॉर्मन्स बिघडता कामा नये” या अटीवर त्याने पुढचे सर्व महिने क्लासला न जाता व्यवस्थित अभ्यास केला. आई-वडिलांचं मार्गदर्शन होतंच. मुलगा SSC बोर्डात मेरिटमध्ये आला ….. २००२ साली, ९३ % मार्क मिळवून.

तल्लख बुद्धिमत्ता असूनही त्याच्यावर अपेक्षांचं ओझं लादलेलं नव्हतं हा भागही तितकाच महत्वाचा आहे.
पालकांनी याचा गांभीर्याने विचार करायला हवा.

अनेकदा वाटतं.... आपल्यासारखी सामान्य माणसं अशा गोष्टींवर इतक्या गांभीर्याने विचार करतात.
मग शिक्षणतज्ञ, समाजधुरीण, मानशास्त्रज्ञ, सरकारी शिक्षण खातं यांच्या मनात, डोक्यात हे विचार का येत नाहीत ? का योग्य ते बदल घडत नाहीत ? का सर्वच दृष्टीने शिक्षण इतकं अवघड होतंय ?

.... की आपणच मूर्ख (हे फक्त मी स्वत:ला म्हणवून घेतोय) म्हणून या सार्‍याचा इतक्या गांभीर्याने विचार करतोय...... 'मेरा भारत महान' म्हणून गप्प बसायचं सोडून ....... !!!!!

पैसा जास्त झाला आहे असं वाटल्यावर... 'खुश्शाल्ल' उडवुन आपले स्टेटसप्रदर्शन करावे....पण मुलांकडुन तसेच शिकवणार्‍यांकडुन ०.००१% रिटर्नची अपेक्षाही ठेवु नये.

क्लासमध्ये तोच विषय परत शिकवला जाणार आहे हे माहित असल्याने शाळेतल्या शिकवण्याकडे दुर्लक्ष करण्याची मुलांची (सहज) प्रवृत्ती.
माझ्या दोन्ही मुली पुण्याच्या नामांकित शाळेत जातात. मोठीच्या वेळी, ५ वर्षांपुर्वी, ट्युशन क्लास लावण्यासाठी शाळेतून लेखी परवानगी घ्यावी लागायची...शाळेत व्यवस्थित शिकवायचे, होमवर्क नसायचा, प्रत्येक आठवड्याला क्लास टेस्ट असायची, ज्याचं मुलांना आणि पालकांना अज्जिबात टेन्शन नसायचं, कारण वर्गात उत्तम शिकवायचे आणि जे शिकवलंय त्यावर टेस्ट असायची, त्यामुळे मुलं लक्ष देत.
पण आता दुसरया मुलीच्या वेळी परिस्थिती इतकी बदल्लीए ....... तिलाही ८ वी पासुन जर्मन आहे, मोठ्या मुलीला काहीच प्रॉब्लेम न आल्याने, क्लास लावला नाही, पण लक्षात आलं की सगळेच क्लासला जातात, त्यामुळे कुणीच लक्ष देत नाही, आणि मुलं लक्ष देत नाहीत, त्यांच क्लासमधे सगळं होतंय, मार्क चांगले मिळतायत, वर्गाचा निकाल चांगला लागतोय, म्हणुन शिक्षक ही नीट शिकवत नाहीत !
शेवटी पहिल्या युनिट टेस्ट चा निकाल बघुन, ट्युशन लावण्याचा निर्णय घेतला .

३. चढाओढीच्या जगात आपल्या पाल्याने यश मिळवावे या इच्छेचा अतिरेक होतो.>>> हे खुपच महत्वाचे आहे. पण खरेच हल्ली सरसकट ८०-९० टक्के ऐकायला येतात. व मुलेही इंजी. डॉ. इथेच जाताना दिसतात.

मला खेळातच पुढे जायचे आहे. त्यामुळे मी कोणताही सोपा विषय घेउन ग्रज्युएशन करीन असे फार कमी वा नाहितच.

पण येथे एक नमुद करावेसे वाटते, हल्ली (ज्यांची मुले अजुन लहान आहेत) असे पालक मुलांचा ओढा बाकी अ‍ॅक्टीविटी मधे कसा आहे हे पाहुन त्यांचे त्यातच करियर घडवु असे म्हणताना आढळत आहेत. ही अशी उदाहरणे कमी प्रमाणात पण दिसताहेत पण आहेत हे खुपच सकारात्मक आहे.

आपणही सहज कोणत्याही मुला / मुलीला किती टक्के मिळाले???? असा सहज प्रश्ण करतो. तेही योग्य आहे का? हे स्वताच्या मनाला विचारले पाहीजे. केवळ मिळवलेले टक्के हिच त्या मुलांची ओळख आहे का? कधितरी आपण 'मग यावेळी स्पोर्टसमधे किती बक्षिसे मिळवलीस असे विचारतो?' 'नविन कोणता राग शिकलास असे विचारतो?'

सगळे मुद्दे अगदी खरे आहेत.. आणि एव्हडं करुन क्लासेसच्या एका बॅचला ७०-८० मुलं असतात..

आणि फक्त क्लासेस नाही, तर सध्या शाळांचीही हीच परिस्थिती.. भरमसाठ फी असते...

मोनाली, छान मुद्दा
तुम्ही म्हणालात तसे, हो आता पालक मुलांच्या एकंदरीत आवडीचा विचार करू लागले अहेत, तरीही, मुला/ मुलीने किमान ग्रॅज्युएट व्हावे, ही मानसिकता कायम आहेच, त्याचमुळे शाळा, कोचिंग, कॉलेज हा प्रवास आहेच.

उकाका, फारच छान मुद्दे मांडलेत!
त्यात "तल्लख बुद्धिमत्ता असूनही त्याच्यावर अपेक्षांचं ओझं लादलेलं नव्हतं हा भागही तितकाच महत्वाचा आहे.पालकांनी याचा गांभीर्याने विचार करायला हवा. " >> हे फार फार पटलं!

ह्या चर्चेच्या फोरम मधे, मुलांची मानसिकता पालकांनी समजून घ्यावी आणि कोचिंगचा अ‍ॅप्रोच थोडा कसा असावा, असेही मत द्यावेत

माझ्याकडून काही चर्चेचे मुद्दे: कृपया भर घालावीत माबोकर्स

१) कोचिंगक्लासेस कडे- संस्कारवर्ग म्हणून पाहता येते काय?
२) एकदंरित शाळेपे़क्षा जास्त मुलं कोचिंगक्लासला जाण्यासाठी जास्त उत्सुक असतात का?
३) कोचिंग्जमधे शिकवले जाते की घोकमपट्टीच करवली जाते?
४) मग मुलांना "कंन्सेप्ट्स" क्लियर होत आहेत का, हयावर किती भर?

१) कोचिंगक्लासेस कडे- संस्कारवर्ग म्हणून पाहता येते काय?>>>

संस्कारवर्ग नाही म्हणता येणार ना?

उकाकांना अनुमोदन Happy

पालकांना वेळ नसल्यामुळे....आणि दुसरे म्हणजे... शिकविण्याची पद्धत वेगळी असल्यामुळे... मुलांना घरी शिकविणे पालकांना कठिण जातं.... त्यात सेंट्रल बोर्ड चे तर विचारुच नका Happy

) कोचिंगक्लासेस कडे- संस्कारवर्ग म्हणून पाहता येते काय?>>>..नाही नाही...फक्त वर्ग म्हणुनच बघायचे Happy

कोचिंग क्लासला संस्कारवर्ग म्हणणे म्हणजे नवनित गाइड किंवा २१ अपेक्षित संचाला संदर्भग्रंथ म्हणण्यासारखं आहे.:)

बेफी तेच तर.
स्मितूतै, अल्पना Happy

कोचिंग क्लासेस कडे "मुलांना घडविण्याचं" जबर्दस्त पोटेंशिअल आहे, पण ते त्या ताकदीने वापरलं जातं?

Pages