कोचिंग क्लासेस : आजची गरज?

Submitted by बागेश्री on 14 December, 2011 - 03:42

काल टी ब्रेक मधील साधारण चर्चा-

मी : श्वेता, ओये अगं लक्ष कुठाय, चहा गार झाला
श्वेता : अं... हो यार, मैने कल बोला था ना, त्या सरांना भेटायला गेलो होतो

मी : धिरज च्या क्लास साठी ना?
श्वेता : हो ना, काय रेट आहेत माहितीये तुला, क्लासेसचे?
मी : अगं पण एक सांग, आता फायनल एक्झामस येतील काही महिन्यात, तू आता का कोचिंग्ज शोधते आहेस?
श्वेता : अरे यार, उसकी नाईन्थ के लिये, तो आता आठवीत आहे, मी ह्या वर्षी नाही, पुढच्या वर्षाची तयारी करते आहे
मी : ओह! अगं पण ७/८ महिन्यांआधीपासून?
श्वेता : हो मग? त्या टीचरकडे बुकींग करावं लागतं
मी : बुकींग? इथेही? ओअ गॉश!
श्वेता : अरे आगे सुन, नेक्स्ट नोव्हेंबर मुझे उसका टेन्थ का भी बुकींग करके रखना पडेगा
मी : हम्म.. शिक्षणाला अवघड करतोय आपण लोकच, आठवी नववी पण सेल्फ स्टडी होऊ शकतं जर पॅरेंट्सने लक्ष घातलंच तर, पण आज काल पालकांकडे वेळ कुठे? दॅट्स ऑदर टॉपिक! काय आहे फीस?
श्वेता : एटी के
मी : व्हॉट? अस्सी हजार??? आर यू ओके? (मी अ़क्षरशः उडाले बसल्या जागी)
श्वेता : येस मॅम, दॅट टू, उनको अगर बुक करना है तो, चालीस हजार आज भरने है... त्याच सगळ्या गोष्टींचा विचार करत आहे
मी : श्वेता, हे अतिच आहे, नववीतल्या सगळ्या विषयांना ऐंशी हजार? अगं इन्जिनीअरींग च्या फीस शी स्पर्धा झाली ही

श्वेता : मॅड्ड्म धीस ओनली फॉर टू सबजेक्ट्स!! गणित आणि विज्ञान, दहावीला तर सेम सब्जेक्टस ची फीस एक लाख, वोह भी अ‍ॅडव्हान्स बुकींग करेंगे तोह.
मी : आ>>>य कान्ट बिलिव्ह धिस ऑल! सिरिअसली, अरे काय चाललंय काय, आणि आहेत कोण हे सर, मुलाला मेरिटमधे आणूनच दाखवणार का मग, गॅरेन्टीने?
श्वेता : छे छे! ते म्हणे मुलाच्या बुद्धिमत्तेवर अवलंबून, आम्ही बेस्ट देणार, मुलं झोळीत किती पाडून घेतात ते आम्ही कसे ठरवणार!!

मी : बापरे! मग तू देणारेस चाळीस हजार??
श्वेता : वो सर के साथे निगोशिएट किया बहोत, तो सत्तर हजार में माना है, मग पस्तीस द्यायचेत
मी : वाह, काय महान!
श्वेता : तो म्हणतो, मी फक्त IB, ICSC स्टूडंट्स ला कोचिंग देतो सहसा, नेक्स्ट यिअर एक घंटेका स्लॉट फ्री है, इसिलिये "स्टेट बोर्ड" का सोचा!
मी : कम ऑन, श्वेता! ह्याची खरीच गरज आहे का? आय मीन सत्तर हजार, रोज एक तास, फक्त दोनच विषय?
श्वेता : बागी, कभी कभी ना बच्चे समझ नही पाते! धिरज को भी वोही क्लासेसे में जाना है... त्याचे सगळे क्लासमेट्स जाणार त्यांच्या पॅरेट्सनी भरले ना पस्तीस हजार.

मी : मागणारे आणि देणारे सगळेच तयार आहेत म्हटल्यावर बोलायचं काय?

मायबोलीकरांनो, तुम्हांलाही येतात का असेच अनुभव?

१) मुलांच्या शिक्षणाला असा पैसा ओतायची खरीच गरज आहे का?
२) सेल्फ स्टडी- हा ऑप्शन आधीपासूनच कसा बिंबवावा
३) कोचिंग क्लासेसच फावतंय, इतकी अवाढव्य मागणी पूर्ण केल्यावर आपली मुलं खरीच अभ्यासार्थी होत आहेत की त्यांना निव्वळ परि़क्षार्थी बनविण्यात आपणही सहभागी होतोय?

मुलांचा अभ्यास, कॉम्पीटेशन, मुलांवर पडणारा ताण ह्यावर सकस/ सर्वांगीण चर्चा घडावी, हा हेतू.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

१) कोचिंगक्लासेस कडे- संस्कारवर्ग म्हणून पाहता येते काय? -> अजिबातच नाही... घरगुती कोचिंग क्लास असेल तरीही असे म्हणणे धाडसाचेच ठरेल..

२) एकदंरित शाळेपे़क्षा जास्त मुलं कोचिंगक्लासला जाण्यासाठी जास्त उत्सुक असतात का? -> बरोबरचे सगळे जातात मग मी पण का नको जाऊ...

३) कोचिंग्जमधे शिकवले जाते की घोकमपट्टीच करवली जाते? -> पोर्शन पूर्ण करण्याकडेच जास्त भर असतो.. काही अपवाद असतात...

४) मग मुलांना "कंन्सेप्ट्स" क्लियर होत आहेत का, हयावर किती भर? -> क्वचितच कुठल्या तरी क्लास मध्ये बघायला मिळते.. बाकीकडे नुसती मेथड शिकवली जाते... हे असं करा.. हे असं करा.. हे असं करा.. असं का करा हे शिकवायला वेळ मिळणे कठिण आहे..

माझा स्वतःचा कोचिंग क्लास लावण्यामागे एकमेव हेतू होता.. आपला आपला अभ्यास शाळा सुरू असताना होत नाही.. त्यापेक्षा कोचिंग क्लासला गेल्यावर निदान तो वेळ तरी अभ्यास केला जातो.. आणि काही गोष्टी तयार होतात...

:काय रामभाऊ, काय करतात मुलं ?"

" नमस्कार तात्या.. चार मुलं आहेत..
मोठा एमबीबीएस झाला, दुसरा बीई झाला, तिसरा वकील झालाय नुकताच.. "

" आणि चौथा ? "

"चौथ्याने वडापावची गाडी लावलीये..."

" अरेरे ! चौथ्याचं वाईटच म्हणायचं तिघांच्या तुलनेत ?"

" छे हो ! घर खर्च तोच चालवतोय "

अरे, आम्ही २/३ महिन्यापूर्वी एक छान मुलगी दत्तक घेतली आहे, फार प्रेमाने तिला आम्ही सगळे नातेवाइक मिळून घरी आणले
आता मी आनि माझी बायको, हाच विचार करत आहोत की तिला घडवायचे नूसते नाही वाढवायचे.
ती मुलगी फार शार्प आहे, तिला मी मोठे करून, एक चांगल व्यक्ती बनवायचे आहे.

तिला मराठी की इन्ग्लीश माध्यम मी द्यावे, इथून विचार करत आहे, तिला सेल्फ स्टडीचीच सवय लावनार आहे, पैसे आहेत म्हनुन कोचिंग नाही रे करवावे, त्यापेक्षा घरगूती क्लास मधे घालनार, फायदा नक्कि होतो.

मग मुलांना "कंन्सेप्ट्स" क्लियर होत आहेत का, हयावर किती भर? -> क्वचितच कुठल्या तरी क्लास मध्ये बघायला मिळते.. बाकीकडे नुसती मेथड शिकवली जाते... हे असं करा.. हे असं करा.. हे असं करा.. असं का करा हे शिकवायला वेळ मिळणे कठिण आहे.
.>> हे खरे लिहीले, अभ्यास म्हनजे पुर्ण समजले पाहिजे आपन काय शिकतो ते

तुमची चर्चा बिघडली नाही ना रे?

माझ्या नुकतेच पाहण्यात आलेले एक उदाहरण:
आई-वडील बँकेत उच्च पदावर. दोन्ही मुलांना मराठी माध्यमाच्या शाळेत घातले. "स्पेशल ट्रीट्मेंट" काही नाही. मुलाने ८ वीतच ठरवले होते की शेफ व्हायचे, त्याप्रमाणे पुढील शिक्षण घेत गेला, आणि वयाच्या २१ व्या वर्षी पंचतारांकीत हॉटेलमधे नोकरीही मिळवली. They are very proud of him.
हे उदाहरण क्लासच्या संदर्भात नाहिए, पण 'आई-वडीलांनी लादलेल्या अवास्तव अपेक्षा' या संदर्भात आहे.

मला वाटते, क्लासला जाणे यासाठीसुद्धा एक मानसिकता तयार व्हावी लागते. मी १० वी पर्यंत कधीच क्लासला गेले नाही, पण११ वीला गेल्यावर (प्रवाहपतित) गेले, तेव्हा मला ते झेपलेच नाही. गूण खाली घसरले!

मी माझ्या मूळ प्रस्तावनेतच लिहीले आहे, सर्वांगीण चर्चा व्हावी म्हणून.

संस्कारवर्ग- हा शब्द मी वापरला तेव्हा, निव्वळ "संस्कार" घालण्यासाठीचा वर्ग- असे गृहीतक नव्हते.
क्लासला जाणारं मुल एखाद्या वडिलधार्‍या माणसाच्या स्वाधीन असते- त्यांच्या वागण्या, बोलण्यातून चार वडीलकीच्या शब्दांतूनही संस्कार घडतात, तसा अ‍ॅप्रोच आणि मुलांना घडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न मात्र हवा.

मानेजी, आपण केलेलं विधान फार भावलं.
तुम्हांला मुलीला- घडवायचंय- निव्वळ वाढवायचं नाहीय्ये- ही मानसिकता मोलाची, त्याचवेळी त्या दिशेने उचलले जाणारे पाऊल बहूमोलाचे.

आपण शिकताना, नक्की काय फायदा होतोय हे आपल्याला कळत नसतं पण मोठं होऊन स्वतंत्र जगताना- जगात वावरताना, लहाणपणी मिळालेलं फाऊन्डेशनच सदैव कामी येतं, ते अधिकाअधिक पक्कं करून द्यायचा जिम्मा, पालकांचा आणि सबंध शिक्षणसंस्थेचाही आहेच, असं प्रामाणिकपणे वाटतं.

असामी, तुमचे मुद्दे प्लीज विस्तारने लिहाल का? काय म्हणायच आहे ते नीट समजलं नाही (मला तरी). चर्चा चांगली सुरु आहे. बर्याच पालकांना असंही वाटत असतं की आपण पैसे भरले म्हणजे पाल्याला चांगले मार्क्स मिळवण्याची संधी दिली. त्यांच्या लक्षात नाही येत की आपल्या पाल्याची कुवत काय आहे?

<<<परीक्षेच्या प्रश्नपत्रिका कशा असतील, कुठल्या प्रकारे उत्तरं लिहिणं अपेक्षित आहे इ.इ. गोष्टी (ज्या SSC, HSC बोर्डाला अपेक्षित आहेत) त्याचं स्पष्टीकरण पाठ्यपुस्तकात दिल्याचं मला तरी आढळलेलं नाही. त्यामुळे अमुक प्रकारे उत्तर लिहिलं तर मार्क मिळतील की नाही याबद्दल मनात साशंकता असते. आणि त्यात अनेक प्रकारे भरही पडत असते. खरं तर याबाबतचं संपूर्ण मार्गदर्शन सविस्तरपणे पाठ्यपुस्तकातच दिलं गेलं पाहिजे. क्लासेस मध्ये त्या प्रकारचं मार्गदर्शन केलं जातं अशी समजूत असल्याने स्वाभाविकच क्लास करणं अपरिहार्य आहे की काय असं वाटतं.>>>
उल्हास, क्लासेस मुलांना विद्यार्थी नव्हे परीक्षार्थी बनवतात. आपली शिक्षणपद्धती तशी आहे. पण पाठ्यपुस्तकांनीही मुलाना सरळ परीक्षार्थीच बनवावे की काय?

नुसते पेपर लिहायचे टेक्निक समजून घेण्यासाठी किती क्लासेसची किती काळ गरज पडते? दहावीतल्या मुलांना याचे मार्गदर्शन शाळांतून मिळतच नाही का? (आजकाल वृत्तपत्रांतूनही मिळतं),

सगळ्याच मुलांचा अभ्यास अगदी पालकांनी घ्यायची गरज असते का? पालकांना अभ्यास घ्यायला वेळ नाही, म्हणून क्लास असे कारण दिसले. मग स्वाध्याय करायला मुलं कधी शिकणार? पदवी प्रमाणपत्र हातात पडल्यावर?

<<सगळ्याच मुलांचा अभ्यास अगदी पालकांनी घ्यायची गरज असते का?>> अगणित मोदक

माझ्या आईबाबांनी कधीही आम्हा भावंडांचा अभ्यास घेतला नाही. गृहपाठ करताना जे अडेल, येत नसेल तेवढेच विचारायचे असे अगदी १ली पासून सांगितले होते. आईने कधी इतर आयांसारखा फळ्यावरचा गृहपाठही उतरून घेतलेला आठवत नाही. ही जबाबदारी माझीच असायची. पण त्यामुळे कधीही काहीही नुकसान झालं असं मला वाटत नाही. उलट तेव्हापासूनच अभ्यासाबाबत स्वतंत्रपणा बाणवला गेला. मीही काही वर्षे क्लासला जात होते. पण त्यामुळे काही गुणात्मक फायदा झाला असं अजिबात वाटत नाही. फक्त इंग्लिशचा क्लास (५-६वी तला) आवडायचा कारण तिथे वेगवेगळ्या, सिलॅबसच्याही बाहेरच्या इंग्लिश शब्दांची स्पेलिंग्ज करून दाखवायला लावायचे आणि पंतोजी पद्धतीने पण ससंदर्भ स्पष्टीकरण देऊन व्याकरण शिकवायचे. बाकी क्लासेस निव्वळ बोअर मारायचे. शाळेत शिकलेलेच परत घोकंपट्टी... शेवटी क्लासला जाणे सोडलेच. जायला लागले होते माझ्याच हट्टाने. इतर मैत्रिणी जातात म्हणून. शेवटी आईचा ओरडा खाल्लाच की लावायला कुणी सांगितला होता क्लास म्हणून.... Happy

सॉरी, जरा विषयांतरच झालं..

"उल्हास, क्लासेस मुलांना विद्यार्थी नव्हे परीक्षार्थी बनवतात. आपली शिक्षणपद्धती तशी आहे. पण पाठ्यपुस्तकांनीही म्लांना सरळ परीक्षार्थीच बनवावे की काय?" >>>>

भरत,
परीक्षार्थी बनवावं या मताचा मी मुळीच नाही. विद्यार्जन हेच महत्वाचं. तरीदेखील विद्यार्जन करताना परीक्षा देणं, गुण मिळवणं इ. गोष्टी ओघाने येतातच ना ? त्यामुळे परीक्षेत कशा पद्धतीने उत्तर लिहिणं अपेक्षित आहे हे माहित असणं फार महत्वाचं ठरतं. (कारण हे नॉर्म्स संबंधित बोर्डाने ठरविलेले असतात.)

--- कल्पना करा : तुम्ही आणि मी ’पत्रलेखन’ या प्रश्नात अगदी तंतोतंत समान(अशक्य आहे... कल्पना करा) पत्र लिहिलं. आपले दोघांचे पेपर्स एकमेकासमोर ठेऊन एकाच परीक्षकाने तपासले. तुम्हाला माझ्यापेक्षा १ गुण अधिक मिळाला. कारण .... पत्रानंतर ’लिफाफ्याचं चित्रं’ काढणं आणि त्यावर दिलेले पत्ते योग्य ठिकाणी लिहिणं, उजव्या कोपर्‍यात छोटा चौकोन काढून त्यावर ’तिकीट’ असं लिहिणं हे मला माहित नव्हतं. त्यामुळे त्या लिफाफ्यासाठी असलेला एक(किंवा बोर्डाने निश्चित केलेले) गुण मला मिळाला नाही.
हे मार्गदर्शन पाठ्यपुस्तकात स्पष्टपणे करणं गरजेचं असावं ना ?

--- तसंच मराठी/हिन्दी च्या पेपरमध्ये सविस्तर उत्तर लिहिताना, प्रत्यक्ष उत्तराआधी दोन ओळीत ’प्रस्तावना’ लिहिणं बोर्डाला अपेक्षित आहे की नाही ? न लिहिल्यास अर्धा गुण कापला जातो की नाही ?
याचं स्पष्टीकरण पाठ्यपुस्तकात असणं आवश्यक नाही का ?

--- त्याचप्रमाणे कुठल्या चॅप्टरला किती मार्कांच वेटेज आहे (म्हणजे त्यावर किती मार्काचे प्रश्न विचारले जातील)
हा खुलासा पाठ्यपुस्तकात करणं आवश्यक नाही का ?

--- ’विधाने चूक की बरोबर ते सांगा’(True or False ) यासारख्या प्रश्नाचं उत्तर लिहिताना केवळ उप-प्रश्न क्रमांक टाकून त्यापुढे उत्तर लिहायचं की प्रश्नात दिलेलं विधान लिहून त्यापुढे ते ’बरोबर’ अथवा ’चूक’ लिहायचं ?

--- प्रश्न दिलेल्या क्रमानेच सोडवयचे की तो क्रम उलट सुलट केलेला चालू शकतो ?

या आणि अशाच काही तांत्रिक बाबींची माहिती, खाजगी प्रकाशनांची पुस्तके किंवा तुम्ही म्हणता त्याप्रमाणे वर्तमानपत्रातील संबंधित सदरे यामधून मिळविण्याऐवजी बोर्डानेच पाठ्यपुस्तकात उपलब्ध केली तर हरकत काय आहे ? फार तर प्रत्येक पुस्तकाची ८-१० पानं वाढतील, पण ही माहिती ऑथेंटिक स्वरूपात प्रत्येकाकडे सहजगत्या उपलब्ध असेल.

अभ्यासाचं काही शास्त्र असतं का ?

एका शिक्षणतज्ञाच्या मते वर्गात जे शिकवलं जातं त्यातलं दहा टक्केच लक्षात राहतं. त्यासाठी आज शाळेत काय शिकवणार आहेत याची कल्पना मुलांना / पालकांना असायला हवी. त्यातले ठळक मुद्दे लक्षात असले कि वर्गात जे शिकवणार आहेत त्यात गोडी निर्माण होते. माझी मुलं अर्थातच खूप लहान आहेत. चौथीनंतर त्यांना थोडी समज येईल..

सिनेमाला जाताना तीन तासाच्या सिनेमाचं सार आपल्याला कुणीतरी दोन मिनिटात सांगितलेलं असतं...त्यावरून आपल्याला आता असं असं घडेल याचा अंदाज येत राहतो तशाच पद्धतीने मुलांना थोडातरी अंदाज आधी आलेला असला पाहीजे.

धडा वाचावा कसा ?
याचंही शास्त्र आहे. धडा वाचण्याआधी सबहेडिंग्ज वाचून काढाव्यात. पुस्तक वाचण्याआधी नाही का आपण चाळत ? धड्याशी प्राथमिक ओळख होऊ द्या. या पद्धतीने पूर्वतयारी झालेली असल्यास लेक्चर ब-यापैकी समजते.

त्यानंतर लगेचच घरी आल्यावर ते वाचून काढावे. महत्वाच्या मुद्यांखाली रेघा माराव्यात आणि प्रश्नांची उत्तरे सोडवावीत.

या पद्धतीत समजणे आणि परीक्षेची तयारी दोन्ही गोष्टी होऊ शकतील. आपणच करायला हवं असं नाही. एखाद्या क्लासमधे अभ्यास घेत असतील तरीही चालेल. अभ्यास घेण्याची पद्धत महत्वाची...

Kiran
8th appeared

कोचिंग क्लास हा इथं विषय चालू आहे. तिकडे वळूयात आता..

कोचिंग क्लास म्हणजे एखादा विषय समजण्यासाठीची शिकवणी. दुर्दैवाने तिला परीक्षेत यश मिळवून देणा-या केंद्राचे स्वरूप आलेले आहे. नाईलाज आहे. मार्क्स मिळवणे ही गरज आहे. रेस आहे. किती समजले यापेक्षा गुण किती आणले याला महत्व आहे. मग या भीतीतून यशस्वी क्लासेसकडे पावलं वळतात.

दुसरं कारण आपल्या पद्धती जुन्या झालेल्या असणे.

तिसरं कारण माझ्या बाबतीतलं. मी एसएससीचा विद्यार्थी, मुलं आयसीएसई शा़ळेत. नाईलाजाने मुलीला पहिलीसाठी ट्यूशन आहे Proud
शाळेने विचारलं होतं कि प्रिप्रायमरी बद्दल आपलं मत लेखी द्या. मी बंद करा असं लिहून दिलं तेव्हा मला भेटायला बोलावण्यात आलं होतं. ( हा कोण प्राणी असावा ही उत्सुकता ) कारण काय विचारल्यावर मी त्यांना यशस्वी लोकांची नावं विचारली .. त्यांनी जी सांगितली त्यापैकी कितीजण नर्सरी आणि केजी मधे गेले होते हा प्रश्न विचारला..

अर्थात शाळेत अजूनही हे वर्ग चालूच आहेत. शेवटी आपण प्रॅक्टिकल असणं महत्वाचं इतकंच ....!

उल्हासचे म्हणणे अत्यंत बरोबर आहे.

भुगोल हा माझा अत्यंत आवडीचा विषय माझी उत्तरे एकदम छान असत पण मार्क्स ४० पैकी ३० / ३२ मिळत. संस्क्रुत मध्ये तर ८० च्या वर क्वचितच.
आमच्यावेळी पार्लेश्वर सोसायटीत गोडबोले सर म्हणुन मोफत मार्गदर्शन करायचे. बाबा मला १० वीत पहिल्या चाचणीनंतर तिथे घेउन गेले.
ते माझ्याबरोबर २ तास होते पण त्यांनी मला बहुमोल मार्ग दर्शन केले.
त्यांचे काही नियम.

१) ज्या पेनाने फायनल परिक्षा देणार त्याच पेनाने हस्ताक्षर चांगले काढुन रोज लिहायचे.
२) पेपर मिळताच लगेच पुरवण्या पण मागुन घ्यायच्या. शेवटी घाइत असताना नाही. किती पुरवण्या प्रत्येक विषयाला लागतात याचा अंदाज आधिच पाहिजे.
३)यानंतर पेपरच्या व पुरवण्यांच्या प्रत्येक पानावर ६ मार्जिन काढायच्या ३ ठळक यात ३ पुसट. हे काम उत्तरे लिहायच्या आधिच करायचे. पहिल्या-दुसर्या मार्जिन मध्ये प्रश्ण क्रमांक लिहायचा. दुसरी-तिसरी त अ, ब, इत्यादी.
चौथ्या फिकट मार्जिन पासुन उतार्याची सुरवात करायची तर पाचवी मार्जिन उतार्याच्या इतर अक्षरे एका खाली एक यावी या साठी वापरायची.
४) १० वीत भुगोलासाठी टेन्सिल्स्चा वापर अधिक्रुत आहे त्याचा पुरेपर उपयोग करावा. भुगोल आक्रुत्यांचा विषय आहे. गाळलेल्या शब्दाला आक्रुती काढुन उत्तर लिहिले तरी चालेल आक्रुत्या जास्त म्हणुन मार्क्स कोणी कापणार नाही.
५) एकही लाइन पेपर मध्ये हाताने (पट्टी वा स्टेन्सिलशिवाय) काढायची नाही अगदी आपण समानार्थी शब्द लिहिताना मध्ये = काढतो तीपण.

असे अनेक नियम त्यांनी सांगितले परिणाम १० वी सहामाही, प्रिलीम आणि फायनल सर्वात भुगोलात ४० पैकी ४० संस्क्रुत मध्ये ९५, ९९, ९८

त्यांनी मला या २ तासात पेपर मध्ये काय लिहायचे हे अजिबात सांगितले नाही शिकवले फक्त तंत्र अणि परिक्षेत वेळेचे नियोजन.
पण तुम्हा माझे यापुर्वीचे पेपर पाहिले असते तर कोणाचाच विश्वास बसला नसता की २ पेपर एकाच मुलीचे आहेत.
फायनलला मेरिट लिस्ट ४ मार्काने हुकली जर सरांना आधि भेटले असते तर नक्की होती.

मी पण क्लास लावलेत. पण .. खेळाचे / इतर अ‍ॅक्टीव्हिटीचे. . अभ्यासाचे लावायची गरजच वाटत नाही. घरीच आम्ही तिच्यासोबत आठवड्यात दोन तीन तास बसतो. स्पेशली सुट्टीच्या दिवशी. इतर वेळी अडचण आल्यावर ती विचारते. अजून ती १० वीत नाही म्हणा. Happy पण तेंव्हाही आत्ता सारखेच चालू राहिल असे वाटते.

क्लास लावायचाच असेल तर आत्मविश्वासाचा क्लास लावावा असे नेहमी वाटते. त्या ट्युशन क्लास मध्ये पण काय घोकून घेतात हे सर्वांना माहिती असतेच.

आई वडिलांनी वेळ देणे अपरिहार्य आहे. देता येत नसल्यास मुलं होऊ देऊ नयेत.

आई वडिलांनी वेळ देणे अपरिहार्य आहे. देता येत नसल्यास मुलं होऊ देऊ नयेत.

Uhoh

लग्नच करू नये हे कसं राहील ? Proud

-------------------------------------------------------
अवांतर : आता ही सर्वांगीण चर्चा लिव्ह इन पासून विबासं या सगळ्या अंगांचा अभ्यास करत जाण्याची दाट शक्यता. तज्ञांच्या आगमनाची वेळ झाली आहे.

~रुमाल~
---
उल्हास जी,

आपले दोन्ही प्रतिसाद वाचले. > > या आणि अशाच काही तांत्रिक बाबींची माहिती, खाजगी प्रकाशनांची पुस्तके किंवा तुम्ही म्हणता त्याप्रमाणे वर्तमानपत्रातील संबंधित सदरे यामधून मिळविण्याऐवजी बोर्डानेच पाठ्यपुस्तकात उपलब्ध केली तर हरकत काय आहे ? फार तर प्रत्येक पुस्तकाची ८-१० पानं वाढतील, पण ही माहिती ऑथेंटिक स्वरूपात प्रत्येकाकडे सहजगत्या उपलब्ध असेल.<<

आपली कळकळ पोहोचली. बोर्ड मास्तरांसाठी काही पुस्तके प्रकाशित करीत असते. हे आपणांस ठाउक आहे काय? त्यात या सर्व बाबी, किंबहुना शिकवावे कसे, याची च चर्चा व मार्गदर्शन असते. हे फाऽर वर्षांपासून सुरू आहे.

या वरून थोडा विस्तृत प्रतिसाद देत आहे:

आजकाल, माझ्या खासगी शिकवणीस येशील तर तुला २री/६वी पास करीन असले प्रकार शामां कडुन सुरू आहेत अन अगदीच हायक्लास मटेरियलचं मूल नसेल तर सगळ्या आया ती ट्यूशन लावतीलच लावतील हे ही सत्यच आहे. त्यामुळे आपण कितीही म्हटले की मुलांनी सेल्फ स्टडी करावा अन शिक्षकांनी नीट शिकवावे, तरीही अवास्तव अपेक्षांपुढे हे अशक्यच आहे. (प्रत्येकीस हेच वाटते की माझ्याच मुलाने पहिले यावे. यासाठी शाळेत जाऊन भांडायची फारच तयारी, बहुतेक आयांची. बापही मागे नाहीत)

माझ्या मते तरी, आजकालचे पालक जसे मला मिळालं नाही ते खेळणं मी माझ्या मुलाला ('एस्डी' करून झालेला मुलगा.) मी देणार! ती माझी "ऐपत" आहे असे म्हणून पैसे फेकतात, तसेच मला मिळाले नाही तितके मार्क्स माझ्य पोराला मिळायलाच हवेत असे म्हणत नुसत्या ट्यूशन्स नाही लावत, तर कॉप्या पुरवण्यासाठी लाच देण्यातही खर्च करतात. परवाच झालेल्या शाळा पटपडताळणीत मुंबइची मुलं फार खेड्यांतल्या शाळांत १०वी साठी दिसत होती असे वाचले पेपरात. हे का होत होतं?

अन मुलासाठी वेळ देणे सोडून पैसे फेकायला जर असे मूर्ख तयार असतील, तर यांना एक्स्प्लॉईट करायला कोचिंगवाले फोफावणारच. अन मग त्यांच्या आपसातील स्पर्धेतून अजून वाईट निघणारच. (जिम वाले डाएट देण्याच्या नावाखाली सर्रास स्टिरॉईड्स खाऊ घालतात पोरांना, आमच्या जिम्मधे कशी बॉडी बनते! रस्तोरस्ती वाढलेले सलमान पहा जरा. तुमच्या लहानपणी व्यायाम करीत नसत काय?.. तसे)

शेवटी माझं मूल ही माझी जवाबदारी हे समजेल तेव्हा हे असे प्रश्न मुळात येणारच नाहीत. असे मला वाटते.

सुन्या | 14 December, 2011 - 20:42

म न पा च्या शाळेत शिकवतात का?
मुलाला तिथेच टाकायचा विचार आहे.....
<<<

नाही. आजकाल तिथे शिकवत नाहीत. उगा पोराचा जीव घेऊ नका.
पण ज्या 'रेप्युटेड' शाळेत कमीत कमी देणगी मागतात, तिथेच घाला पोराला.

असामी, तुमचे मुद्दे प्लीज विस्तारने लिहाल का? काय म्हणायच आहे ते नीट समजलं नाही (मला तरी)>>अतिशय साधा मुद्दा आहे. आपण शिकलो म्हणजे आपल्याला वाटते कि आपण जे शिकलोय ते सहजपणे इतरांना शिकवू शकतो. कमीत कमी आपल्या मुलांचा अभ्यास सहज घेऊ शकतो. पण हे जेव्हढे वाटते तेव्हढे सोपे आहे का ? शिकवण्यासाठी इरेला पडलात तर काहिही शिकवता येईल, पण शिकणार्‍याला आवड लागून self sufficient बनवता येईल असे शिकवता येईल का ? क्लासेस मधे हे होते असा माझा दावा नाहि किवा शाळेमधे होते असाही नाहि पण कुठेही शिकण्यासाठी घालताना अशा गोष्टींचा विचार किती जण करतात ?

उल्हास तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे इब्लिस यंनी दिली आहेत. ही सगळी माहिती शाळेतल्या शिक्षकांकडून मिळणे अपेक्षित आहे.

माझ्या स्मरणाशक्तीला ताण देऊन सांगतो की तुम्ही विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे, अर्थात अपेक्षित उत्तरांचा आकृतीबंध कसा असतो हे आम्हाला शाळेत शिकवले गेले होते. उदाहरण द्यायचे तर पत्राबद्दल : पत्राचा मजकूर येत नसला तरी पत्राशी संबंधित सगळ्या गोष्टी जसे मायना, प्रेषकाचा पत्ता, समारोप, ज्याला पत्र पाठवायचे त्याचा पत्ता, लिफाफ्याची आकृती इ. गोष्टी लिहिल्या तरी त्यासाठी गुण मिळतील हे सांगितले गेले होते.
बीजगणित, भूमिती या विषयांत नुसत्या योग्य उत्तराला गुण नसतात तर प्रश्न सोडवण्याच्या पद्धतीलाही गुण असतात,प्रत्येक पायरी लिहिणे गरजेचे असते उत्तर बरोबर पण पद्धत चूक तर गुण कापले जातील, तेच पद्धत बरोबर पण उत्तर चुकले तरी प्रत्येक पायरीनुसार गुण मिळतात हे सांगितले गेले होते.
भाषा विषयांमध्ये प्रत्येक वेच्याच्या लेखकाचे/कवीचे नाव, तो ज्या पुस्तकातून घेतला त्याचे नाव व साहित्यप्रकार या गोष्टीही लक्षात ठेवणे आवश्यक होते. य गोष्टींचा समावेश दीर्घोत्तरी प्रश्नांच्या उत्तरांत हवा हे सांगितले गेले होते.

समास सोडणे, दोन उत्तरांत जागा सोडणे, प्रत्येक प्रश्न नव्या पानावर सुरू करणे या सूचना तर आधीच्या इयत्तांतच घोटवल्या जातात.
आमच्या शाळेत एस वाय गोडबोले सरांची 'अभ्यास कसा करायचा, उत्तरपत्रिका कशा लिहायच्या' यावर विशेष व्याख्याने होती.

कोचिंग क्लास आणि परीक्षांची तयारी असंच काहीसं समीकरण आहे का

परीक्षेसाठी उत्तरं लिहीता येणं हा एकमेव उद्देश शिक्षणाचा आहे का ? डीएस कुलकर्णीयांचची भाषणं ऐकली होती.. त्यांच्याप्रमाणेच काही लोकांची मतं इथं नंतर देईन. अर्थातच ३ इडियटस या सिनेमात मनोरंजनाच्या माध्यमातून महत्वाच्या विषयाला हात घातला गेला आहे.

कोचिंग क्लासची गरजच लागणार नाही अशी शिक्षणपद्धती येऊ शकत नाही का ?

आई वडिलांनी वेळ देणे अपरिहार्य आहे. देता येत नसल्यास मुलं होऊ देऊ नयेत.

>>>>>
कटु असल तरी सत्यच आहे हे.

क्लास कडे थोड वेगळ्या दृष्टीने ,म्हणजे acceleration किंवा अधिक चॅलेंजिग वातावरण देतील या दृष्टीने पाहिल तर. बरेचदा शाळेमध्ये सरसकट अभ्यासक्रम घेतला जातो. जी हुशार मुल आहेत त्यांना अधिक चॅलेंजीग कामाची गरज असते तर जी मुल Below average किंवा special need आहेत त्यांना थोड्या अधिक मार्गदर्शनाची. क्लास जर का ती गरज पुर्ण करत असेल तर काय हरकत आहे क्लासेस लावायला?

सीमा, कोणे एके काळी कोचिंगची(विशेष मार्गदर्शन) गरज बिलो अ‍ॅव्हरेज मुलांनाच आहे असे मानले जायचे. मग मेरिट लिस्ट्स आणि 'चांगल्या' कॉलेज/कोर्सेस ना अ‍ॅडमिशनच्या सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये सीट मिळवायची म्हणून अबव्ह अ‍ॅव्हरेज मुलांसाठीही कोचिंग क्लासेस आले.

महाराष्ट्रापुरते बोलायचे तर अबव्ह अ‍ॅव्हरेज मुलांसाठी प्राथमिक/माध्यमिक शिष्यवृत्ती स्पर्धापरीक्षा, टिमविच्या परीक्षा, राज्य/राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा असतात.

आजकाल मुलांच्या सर्वांगीण वाढीसाठी जड खिसा असलेले पालक मुलांना आपल्या आवडीनुसारकिंवा समाजातल्या ट्रेंडनुसार सचिन/सानिया/सायना/विश्वनाथन आनंद/मुग्धा वैशंपायन करायच्या क्लासला घालतात.

चांगला विषय.

अकरावी आणि बारावीत असताना मलाही क्लास लावलाच होता. आता तिथे आम्ही काय दिवे लावलेत ते आम्हालाच माहिती.
माझे काही मित्र तर क्लासचे पैसे घरून घेऊन ते उधळून बसले होते.
आज तसाही अभ्यास न करण्याकडे भरपूर मुलांचा कल असतो. अभ्यास करणाऱ्या मुलाला आजकाल Nerd / Geek वैगेरे संबोधतात. तुम्ही जर cool असाल तर अभ्यास पाहून तुम्ही नाक मुरडले पाहिजे.
तुम्ही जरा विचार करा. आज तुम्ही जे काम करताय. ह्यामध्ये त्या शालेय शिक्षणाचा किती हातभार आहे ? शिक्षण जाऊ द्या, त्या मेरीट आणि मार्कांचाही किती हातभार आहे ? (काहींसाठी १००% सुद्धा असू शकतो)
मला असे दिसते की पालक लोक बढाई मिरवण्यासाठी मुलांना 'प्रतिष्ठित' कोचिंग लावतात. च्यायला पोटची पोरे म्हणजे काय शोभेची वस्तू आहे काय !

मुलांना जर एखादा विषय अवघड जात असेल तर तेवढा क्लास लावण्यात काहीच हरकत नाही. पण सरसकट सगळे विषय लावणारे पालक स्वतः च्या मुलांना चक्क गाढव समजत असावीत.
अहो जर त्या मुलाला एकही विषय वाचन करून / शाळा कॉलेजातून समजून घेता येत नसेत तर गाढव नाही तर काय समजावे ? Happy

कटु असल तरी सत्यच आहे हे.

माझ्या डोळ्यांसमोर राहुलकुमार बजाज मुलांचा अभ्यास घेत आहेत असं चित्र उभं राहतंय

विषय छान आहे...
मी स्वतः कधीच क्लास लावला नाही... ९ वी व १० वी त असताना शाळेत कधीच क आणि ड विभागातली गणिते मास्तर घेत नव्हता....त्यामुळे क्लास लावला असता तर बरे झाले असते असे कधी कधी वाट्ते....मुळात शाळेत जर निट व्यवस्थीत शिकवणारे असतील तर असल्या कोचिंग ची गरजच भासणार नाही....

मास्तरांनी पैश्यांच्या मागे लागुन शाळेतल्या विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष केले.....

छान चर्चा आहे.

हल्लि वर्गात शिकवत नाहीत हे बर्‍याच वेळेला ऐकते. त्याची करणे अनेक असतिल. कदाचीत वाढत्या लोकसंख्येचा भार शिक्षकांन्ना पण जाणवत असेल. परत त्यांच्या कडुन करुन घेतली जाणारी ईतर कामे जसे जनगणना, निवडणुका, ईत्यादी. माझी मुलगी मागच्या वर्षी ४थीत होती. मागच्या वर्षी खुप सुट्ट्या मिळाल्या कारण शिक्षक जनगणनेला गेले होते. तिने मागे मला विचारलं,"दर वर्षी का नाही घेत ही जनगणना. म्हणजे आम्हाला सुट्टी मिळेल."

परत शाळेत ईतर अ‍ॅक्टीव्हीटी खुप वाढल्या आहेत. कुठली ना कुठली स्पर्धा चालुच असते. आर्थात सध्या बाह्य मुल्य मापन (फॉर्मेटीव्ह इव्हल्युएशन) असल्याने कोणीच ८वी पर्यंत नापास होत नाही.

मी वर मांडलेल्या मुद्यांमध्ये लिहिलेच आहे की एक जरी शक्यता मिसींग असेल तरी क्लास लावावा. आपण प्रयोग करत बसण्या पेक्षा बरं.

प्रश्न जरी कोचिंग क्लासबद्दल असला तरी..

तुमचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोण कसा आहे, यशाची व्याख्या तुमच्यासाठी काय आहे यावर तुमच्या मुलांचा विकास ठरतो. तुमची प्राश्वभूमी, आर्थिक परिस्थिती या गोष्टींचाही प्रभाव असतोच. शिक्षणाची सुरूवात घरापासून होते. शाळेच्या चार भिंतींच्या बाहेरही शिक्षण मिळत असतं. जग हीच एक शाळा आहे. जगाच्या शाळेत शिकलेला मनुष्य सहसा उपाशी राहणार नाही.

या पलिकडे आपण शाळेत मुलांना का पाठवतो हे तपासून पहायला हवे. मुळात आपल्याला ते क्लिअर आहे का ? ज्या उद्देशासाठी मुलांना आपण शाळेत पाठवतो त्याची पूर्तता शाळेकडून होते आहे का ?

मला इथपासून सुरूवात करायला आवडेल..

चर्चेत सहभागी सगळ्यांना नमस्कार Happy
मंदार, सहभागी होत तुझे मतप्रदर्शन करशील, तर वाचायला नक्कीच आवडेल Happy

किरण,
तज्ञांना आमंत्रण नको रे देऊस, लोकांची एनर्जी एका चांगल्या मुद्द्यावर चर्चा करण्यात वापरली जाते आहे, शिवाय ह्या विषयाच्या अनुषंगाने आपल्यातला प्रत्येकजणच पालक/ पाल्य आणि शि़क्षक, ह्या मानसिकतेचा आपसूकच विचार करतो आहे पाहून बरे वाटतेय- हा विष्य मुलभूत आहे, आणि चर्चेने नवे विचार नक्कीच मिळतील, असंही वाटतय!
कोचिंग क्लासेस ला जाणे प्रॅक्टीकली अ‍ॅक्सेप्टेबल/ अनाव्हॉईडेबल आहे आज, असे तू म्हणालास त्यातही तथ्य आहे.
त्याची अनेक कारणे आपल्या सगळ्यांच्या चर्चेतून पुढे येत आहेत.

पालकांची जागरूकता, क्लासेस असूनही मुलांन्ना स्व-अध्ययनाची सवय लावणे हा खरेच फार महत्वाचा मुद्दा आहे, शाळेत आणि क्लास मधे शिकवलेलं, घरी येऊन एकदा नजरेखालून घालण्याने फायदाच होतो.

आपल्यापैकी किती पालक, कोचिंग क्लासेस च्या शि़क्षकांना महिन्यात एकदातरी वगैरे जाऊन पाल्याच्या प्रगतीची चौकशी करतात? महागडे कोचिंग/ घरगूती क्लासेस - पालकसभा घेतात का? जर नाही- तर पालक त्यांना सूचवतात का अश्या सभेबद्दल?

मी स्वतःचा एक अनुभव सांगतेय-
१० वी ला असताना, ज्या शिक्षांकांकडे कोचिंगला जात होते (ते कुठल्याही शाळेत शि़षक म्हणून नोअकरीला नव्हते) , त्यांनी दिवसाला फक्त ३ बॅचेस ठेवल्या होत्या, प्रत्येकी १५ विद्यार्थी.
दर दोन महिन्यात एकदा ते धर्माधिकारी सर प्रत्येक पालकाच्या घरी जात, पाल्याकडून काय अपेक्षा आहेत आणि तो/ती कुठे कमी पडत आहे, प्रत्यक्षात सांगत!! पालकांना "सतर्क" रहायला भाग पाडणारे शि़क्षक ते!

Pages