कोचिंग क्लासेस : आजची गरज?

Submitted by बागेश्री on 14 December, 2011 - 03:42

काल टी ब्रेक मधील साधारण चर्चा-

मी : श्वेता, ओये अगं लक्ष कुठाय, चहा गार झाला
श्वेता : अं... हो यार, मैने कल बोला था ना, त्या सरांना भेटायला गेलो होतो

मी : धिरज च्या क्लास साठी ना?
श्वेता : हो ना, काय रेट आहेत माहितीये तुला, क्लासेसचे?
मी : अगं पण एक सांग, आता फायनल एक्झामस येतील काही महिन्यात, तू आता का कोचिंग्ज शोधते आहेस?
श्वेता : अरे यार, उसकी नाईन्थ के लिये, तो आता आठवीत आहे, मी ह्या वर्षी नाही, पुढच्या वर्षाची तयारी करते आहे
मी : ओह! अगं पण ७/८ महिन्यांआधीपासून?
श्वेता : हो मग? त्या टीचरकडे बुकींग करावं लागतं
मी : बुकींग? इथेही? ओअ गॉश!
श्वेता : अरे आगे सुन, नेक्स्ट नोव्हेंबर मुझे उसका टेन्थ का भी बुकींग करके रखना पडेगा
मी : हम्म.. शिक्षणाला अवघड करतोय आपण लोकच, आठवी नववी पण सेल्फ स्टडी होऊ शकतं जर पॅरेंट्सने लक्ष घातलंच तर, पण आज काल पालकांकडे वेळ कुठे? दॅट्स ऑदर टॉपिक! काय आहे फीस?
श्वेता : एटी के
मी : व्हॉट? अस्सी हजार??? आर यू ओके? (मी अ़क्षरशः उडाले बसल्या जागी)
श्वेता : येस मॅम, दॅट टू, उनको अगर बुक करना है तो, चालीस हजार आज भरने है... त्याच सगळ्या गोष्टींचा विचार करत आहे
मी : श्वेता, हे अतिच आहे, नववीतल्या सगळ्या विषयांना ऐंशी हजार? अगं इन्जिनीअरींग च्या फीस शी स्पर्धा झाली ही

श्वेता : मॅड्ड्म धीस ओनली फॉर टू सबजेक्ट्स!! गणित आणि विज्ञान, दहावीला तर सेम सब्जेक्टस ची फीस एक लाख, वोह भी अ‍ॅडव्हान्स बुकींग करेंगे तोह.
मी : आ>>>य कान्ट बिलिव्ह धिस ऑल! सिरिअसली, अरे काय चाललंय काय, आणि आहेत कोण हे सर, मुलाला मेरिटमधे आणूनच दाखवणार का मग, गॅरेन्टीने?
श्वेता : छे छे! ते म्हणे मुलाच्या बुद्धिमत्तेवर अवलंबून, आम्ही बेस्ट देणार, मुलं झोळीत किती पाडून घेतात ते आम्ही कसे ठरवणार!!

मी : बापरे! मग तू देणारेस चाळीस हजार??
श्वेता : वो सर के साथे निगोशिएट किया बहोत, तो सत्तर हजार में माना है, मग पस्तीस द्यायचेत
मी : वाह, काय महान!
श्वेता : तो म्हणतो, मी फक्त IB, ICSC स्टूडंट्स ला कोचिंग देतो सहसा, नेक्स्ट यिअर एक घंटेका स्लॉट फ्री है, इसिलिये "स्टेट बोर्ड" का सोचा!
मी : कम ऑन, श्वेता! ह्याची खरीच गरज आहे का? आय मीन सत्तर हजार, रोज एक तास, फक्त दोनच विषय?
श्वेता : बागी, कभी कभी ना बच्चे समझ नही पाते! धिरज को भी वोही क्लासेसे में जाना है... त्याचे सगळे क्लासमेट्स जाणार त्यांच्या पॅरेट्सनी भरले ना पस्तीस हजार.

मी : मागणारे आणि देणारे सगळेच तयार आहेत म्हटल्यावर बोलायचं काय?

मायबोलीकरांनो, तुम्हांलाही येतात का असेच अनुभव?

१) मुलांच्या शिक्षणाला असा पैसा ओतायची खरीच गरज आहे का?
२) सेल्फ स्टडी- हा ऑप्शन आधीपासूनच कसा बिंबवावा
३) कोचिंग क्लासेसच फावतंय, इतकी अवाढव्य मागणी पूर्ण केल्यावर आपली मुलं खरीच अभ्यासार्थी होत आहेत की त्यांना निव्वळ परि़क्षार्थी बनविण्यात आपणही सहभागी होतोय?

मुलांचा अभ्यास, कॉम्पीटेशन, मुलांवर पडणारा ताण ह्यावर सकस/ सर्वांगीण चर्चा घडावी, हा हेतू.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

आई वडिलांनी वेळ देणे अपरिहार्य आहे. देता येत नसल्यास मुलं होऊ देऊ नयेत.
>>कटु पण सत्यच
माझ्या डोळ्यांसमोर राहुलकुमार बजाज मुलांचा अभ्यास घेत आहेत असं चित्र उभं राहतंय
>> doctor जयश्री फिरोदिया( kinetic group chyaa), कुमारमंगलम बिर्ला आपल्या मुलांच्या अभ्यासात जातीने लक्ष देत असत हे त्यांच्या मुलाखतीत वाचायला मिळाले आहे. राहुल बजाज किंवा त्यांच्या पत्नी मुलांचा अभ्यास घेत असतील तर त्यात आश्चर्य मुळीच वाटु नये.
लोक्सता चतुरंगमधे काही IAS/IPS lady officersच्याअ मुलाखती वाचल्या होत्या , त्यात त्यांनी त्या व त्याम्चे नवरे मुलाम्चा अभ्यास स्वतः घेतात असा उल्लेख आहे.
माझ्या ओळखीतले सर्व व्यस्त व यशस्वी लोक मुलांच्या अभ्यासासाठी वेळ राखुन ठेवतात हे माझे निरिक्षण आहे, त्यातल्या सर्वांचेच म्हणने हे असते कि आज आपण जे काही आहोत ते शिक्षणामुळे मग मुलांच्या अभ्यासाठी वेळ दिलाच पाहिजे.घरातल्याच मुलांचे साम्गायचे झाले तर आसपास पालंकाम्चा presence असेल तर मुलांना पुरेस असते.
आजकालच्या पालकांना मुले birthdayparty celibrate करण्यासाठी आणि खेळणी/कपडे खरेदीसाठी ,आणि facebook वर एकमेकांना कवटाळलेले फोटो टाकण्यासाठी जन्माला घालयची असतात के काय असे वाटण्याइतपत त्याम्चे वागणे असते.

कोचिंग क्लासेस ,
माझे अनुभव तरी उत्कृष्टच आहेत.

स्पर्धात्मक परिक्षांसाठी कोचिंग क्लासेस आवश्यक हे वेगळे सांगायला नकोच.

बागेश्री, सुंदर विषय चर्चेला आणला आहेस!

मी पालक नाही. पण आधी चार वर्षे संस्कृतच्या(९वी आणि १०वी, ssc board) ट्युशन्स घेतल्या आणि गेली चार वर्षे MBA entrance exams साठी Quantitative Aptitude and DI-LR शिकवतोय. खालील सर्व मुद्दे त्या 'शिक्षकाच्या' अनुभवातूनच आलेले आहेत.

१) कोचिंग क्लासेसकडे - संस्कारवर्ग म्हणून पाहता येते काय?
नाही. पण हे शिक्षकावर अवलंबून आहे. अर्थार्जनासाठी उघडलेल्या क्लासेसमध्ये शिक्षकांना संस्कार वगैरे करण्यासाठी वेळच नसतो, ही वस्तुस्थिती आहे. अर्थात स्वानुभवावरून हे नक्की सांगू शकतो, की सिलॅबसच्या पलिकडेही बरंच काही मुलांना देता येऊ शकतं. मी आणि माझ्या पोरांनी (लै भारी वाटतं- माझी पोरं म्हणताना) संस्कृतच्या क्लासमध्ये खरंच खूप धमाल केली. तेव्हाच्या मूव्हीजवर चर्चा करायचो, गाणी म्हणायचो, रामरक्षेचा अर्थ लावायचो, मी एखाद्या लेखकाचा एखादा उतारा वाचून दाखवायचो (तेव्हा प्रवीण दवणे यांचे लेख माझे फेवरिट होते) इ इ. अभ्यासक्रमाबरोबरच अनेक छोट्या छोट्या गोष्टींमधून त्यांना चांगल्या सवयी लागतील याकडे माझं लक्ष असायचं.

२) एकदंरित शाळेपे़क्षा जास्त मुलं कोचिंग क्लासला जाण्यासाठी जास्त उत्सुक असतात का?
दुर्दैवाने हो. आमच्या वेळेच्या बाई/ सर आणि सध्याचे शिक्षक यात खरंच खूप मोठी तफावत आहे. कालाय तस्मै नमः | Engineering केल्यावर जसं core मध्ये जावं असं फार फार कमी जणांना वाटतं तसं "शिक्षक व्हावं" असं मुलांना हल्ली वाटतच नाही, हा ही एक प्रॉब्लेम वाटतो. तुझ्या वरील चर्चेमधल्या त्या मैत्रिणीने 'नाही' म्हणायला हवं असं मला मनापासून वाटतं. शाळकरी पाल्य आणि पालक या दोघांमध्ये पालक अधिक सुजाण आणि जबाबदार निर्णय घेऊ शकतात हे मी गृहीत धरतोय.

३) कोचिंग्जमधे शिकवले जाते की घोकमपट्टीच करवली जाते?

प्रॉब्लेम शिक्षणपद्धतीमध्येही आहे. अभ्यासक्रमाचे स्वरूप पाहता सर्वसामान्य शिक्षकापुढे घोकंपट्टीला पर्याय नाही. पण again that depends on the teacher! हसत खेळतही पाठांतर होऊ शकतं. कल्पनांना तोटा नसतो..

४) मग मुलांना "कंन्सेप्ट्स" क्लियर होत आहेत का, हयावर किती भर?
भरगच्च क्लासेसमध्ये तेवढा वेळच मिळत नाही. एकीकडे पैशाची मार्जिन्स सांभाळायची असतात आणि दुसरीकडे रिझल्टही आणायचा असतो. कमी विद्यार्थी घेतले तर फी वाढवावीच लागते.

माझं वैयक्तिक मतः कोचिंग क्लासेस शाळेपेक्षा अधिक उत्तम रीतीने विद्यार्थी घडवू शकतात!

असामींच्या दोन प्रश्नांबद्दल-
१. "शिकवणे" हि एक कला आहे '
शिकवणे ही एक कला नसली तरी कौशल्य नक्कीच आहे. शिक्षणक्षेत्राचा आत्मा आहे तो.
२. वयाने मोठे असणे ह्या एकमेव निकषावर मुलांना शिकवणे' ह्यासारखी गैरसमजूत नाही.
पूर्णपणे सहमत. MBA entrance देणार्‍या माझ्या विद्यार्थ्यांमध्ये कॉलेजियन्सपासून १०-१५वर्षांचा work-ex असलेले असतात. अर्थात, work -ex असणार्‍यांना शिकवताना वेगळीच मजा येते, कारण, त्यांना त्यांच्या फीच्या पैशांची किंमत असते. त्यामुळे शिकवणार्‍याच्या वयापेक्षाही त्यांचं payback value वर अधिक लक्ष असतं आणि त्यांचा शिकण्याचा approachही बराचसा professional असतो.

प्रामाणिकपणे सांगायचं तर, एकंदरीतच दर्जा ढासळतोय. मागच्याच आठवड्यात एका इमर्जन्सीमुळे पुण्याला दहावीच्या संस्कृतच्या एका बॅचमध्ये चार तासांचं एक लेक्चर घेतलं. महाकवी कालिदासाच्या मेघदूतमधला एक नितांतसुंदर संवाद शिकवत होतो. तेव्हा असं लक्षात आलं की मुलांचं अवांतर वाचन बोंबललंय! मी भयानक उत्साहाने अवांतर सुभाषितं, अवतरणं सांगत होतो आणि ती माहित असल्याची खूण एकाच्याही चेहर्‍यावर दिसत नव्हती. आमच्या बाईंनी असं काही अवांतर सांगितलं की आमच्यापैकी कुणाचा ना कुणाचा चेहरा उजळून निघायचा, कारण,कुठेतरी ते वाचलेलं असायचं..

दोष एकट्या मुलांचा नाहीयेच. पालकांचा खूप मोठा वाटा या मुलांच्या अविकसित राहण्यामध्ये आहे. मला तरी ही एक लाट वाटते, जी पिढ्या मागून पिढ्या जमीन दोस्त करत जाते आहे.. पालक सर्जनशील नाहीत, म्हणून मुलं नाहीत. यातलीच कोणीतरी पुढे शिक्षकही बनणार आणि the flow continues!!

अर्थात, हल्ली काही पालकही पाल्याचा कल ओळखून त्याच्या आवडीनुसार शिक्षण देण्याबद्दल सजग झाल्याची काही उदाहरणे ऐकली आहेत. पालकांनी पाल्याची मातृभाषा बळकट करण्यावर, थोडे श्लोक-ओव्या पाठ करण्यावर, संत-राजे-समाज इ बद्दल जुजबी माहिती लहानपणीच देण्यावर भर दिला तर यावर नक्की काही उपाय सापडेल.

शिक्षकाचं काम मुठीमध्ये बी घेऊन जमिनीत पेरणी करणार्‍या शेतकर्‍यासारखं असतं हे अनुभवांती पूर्ण पटलंय... शेवटी त्या बीचं रुजणं हे केवळ शेतकर्‍यावर नाही, तर जमिनीवरही अवलंबून असतं. आणि असं असलं तरी शेतकर्‍याला पेरणी वर्षानुवर्षे, न कंटाळता, तितक्याच उमेदीने करावी लागते!

वरच्या मुद्द्यांमध्ये "मी मी" असं जाणवलं असल्यास सॉरी! पण हा विषय फार जिव्हाळ्याचा आहे आणि हे सारे अनुभवाचेच बोल आहेत! वर आलेल्या पोस्टपैकी बहुसंख्य पालकांच्या असाव्यात असेही वाटले. कुणी शिक्षक असल्यास स्वत: शिकवताना केलेल्या एखाद्या अभिनव प्रयोगाबद्दल लिहिल्यास चर्चा अजून पुढे जाईल असे वाटते.

(अवांतरः विक्रम३११, "नाना क्लासेस" म्हणजे पुण्यातले नाना जोशी का? (जोशीच ना?) त्यांचे विद्यार्थी दाते सरांकडे मी दहावीला क्लास लावला होता.)

नचिकेत, चर्चेत तुझेही स्वागत!
सुंदर मतप्रदर्शन!

शिक्षकाचं काम मुठीमध्ये बी घेऊन जमिनीत पेरणी करणार्‍या शेतकर्‍यासारखं असतं हे अनुभवांती पूर्ण पटलंय... शेवटी त्या बीचं रुजणं हे केवळ शेतकर्‍यावर नाही, तर जमिनीवरही अवलंबून असतं. आणि असं असलं तरी शेतकर्‍याला पेरणी वर्षानुवर्षे, न कंटाळता, तितक्याच उमेदीने करावी लागते! >> पटलं

दोष एकट्या मुलांचा नाहीयेच. पालकांचा खूप मोठा वाटा या मुलांच्या अविकसित राहण्यामध्ये आहे>> मुद्दा चर्चा करण्याजोगा आहे.

असामींचे मुद्दे क्लास!

arc तुम्ही म्हणताय ते बर्‍यापैकी "हाय क्लास स्टेटस" असणार्‍या आणि ते जपणार्‍या कुटंबात सर्रास आढळते, मुलांचे संस्कर आणि जडण-घडण ह्याबाबतीत त्यांची उदासीनताच आहे.

ही उदासीनता जबाबदार पालक/ शिक्षकांत नसल्यासच एक परिपक्व व्यक्ती /नागरिक घडविण्यास हातभार लागू शकतो.

आपल्यापैकी किती पालक, कोचिंग क्लासेस च्या शि़क्षकांना महिन्यात एकदातरी वगैरे जाऊन पाल्याच्या प्रगतीची चौकशी करतात? महागडे कोचिंग/ घरगूती क्लासेस - पालकसभा घेतात का? जर नाही- तर पालक त्यांना सूचवतात का अश्या सभेबद्दल?

"नाना क्लासेस" म्हणजे पुण्यातले नाना जोशी का?>> नाना आगाशे. नागनाथ पारा जवळ.

http://www.business-standard.com/results/news/isqualityiit-students-decl...

The quality of Indian Institute of Technology (IIT) students is certainly declining. We have to, however, first clarify what we mean by “quality”. Since IITs are technical institutes, for me the quality of students as engineers is the defining criterion. Students may be intrinsically good or brilliant, but their quality as engineers is definitely declining. The first reason is the impact of coaching classes on students entering the IIT system. Most of the students are mentally fatigued when they enter an IIT. Many are already burnt out and are no longer able to perform to their potential. Students also get used to a system of “spoon feeding”, which is prevalent in coaching classes and they are slow to adapt to the Institute’s way of teaching, where emphasis is laid on extra reading, on showing creativity, and on applying reason and logic to solving problems. Students, therefore, do not work as hard, or learn as much of their subject, as earlier students used to.
Gautam Barua
Director, IIT Guwahati

निलिमा अगदी हेच नियम मी दहावीला असताना आमच्या शाळेत स्कॉलर बॅचमध्ये शिकवले होते.
हे नियम सगळ्याच विद्यार्थ्यांना का सांगत नाहीत हा प्रश्न तेंव्हाही पडला होता..
माझी मुलगी तिसरीला आहे अजुन तरी तिला ट्युशन लावलेलं नाही व या पुढेही लावायची इच्छा नाही.
तिचा अभ्यास घेण्याचा आनंद मी नाही गमावू शकत. कठिन कठिन गणित एकत्र सोडवणे, एखादी न समजलेली कविता उलगडून दाखवणे ह्यात सामावलेला आनंद तुम्ही स्वतः घेतल्याशीवाय नाही समजणार.... तिच्या मोठ्या होण्याच्या प्रत्येक पायरीवर मला तिच्या सोबत रहायचयं.... तिच्यावर स्वत: ची मत न लाद्ता फक्त तिला योग्य दिशा देण्याच काम करायचय.... तिच फुलणार व्यक्तीमत्व लांबून बघायचय. त्यामुळे घोकंमपट्टी करवुन घेणार्‍या क्लासेसना बिग नो नो...
अर्थात हे माझं वैयक्तीक मत आहे.

कोचिंग क्लासेस मधे असलेली स्पर्धा हा चिंतेचा विषय आहे. त्यातून इतर क्लासेसबद्दल द्वेषपूर्ण बदनामी पसरवणे, गैरसमज निर्माण करणे आणि आमचं तेच चांगलं, इतर सगळे वाईट अशा प्रकारे क्लासेसची जाहीरात करणे असे शिक्षण क्षेत्रातील अनैतिक प्रकार वाढीस लागतात. कोचिंग क्लासेस असावेत तर गोखले क्लासेस सारखे. काही प्रमाणात स्वरदा कोचिंग क्लासेसला यश मिळालंय. कुठल्याही जाहीरातीशिवाय इतकी वर्षे चालू आहेत. इतर कुठल्याही क्लासकडे ती हातोटी नाही.

तीव्र जाहीरातबाजीतून काही व्यापारी क्लासेसच्या बदनामीकारक मोहिमांमुळे चांगल्या हेतूने चालवण्यात येणारे काही कोचिंग क्लासेस बंद झाल्याची उदाहरणे आहेत.

हि एक बातमी जरूर वाचा
http://www.rediff.com/news/2000/jun/12dilip.htm
HSC टॉपर सोबत २००० मधे घडलेली घटना... कॉलेज ने मेहनत घेऊन घडवलेल्या विद्यार्थ्यांच्या यशावर कोचिंग क्लासेस ने क्लेम केले होते
कोचिंग क्लासेसचा बोगसपणा यातून उघड होतोच पण या मधे महत्वाचा मुद्दा हा आहे की शाळा- कॉलेजेसने विद्यार्थ्यांवर निट मेहनत घेतल्यास कोचिंग क्लासेस विना देखिल विद्यार्थी चांगले मार्क्स मिळवू शकतात

प्रसिक

कोल्हापूरच्या एका मुलाच्या बाबतीत घडलं होतं असंच. दहावीला पहिला आलेल्या या मुलाचं यश खरं तर शाळेचं होतं पण क्लासने ते यश क्लेम केलं.

पण प्रत्येक वेळी असं होत नाही. काही शिक्षक देखील गुप्त रितीने कोचिंग क्लासेस चालवतात आणि असेच शिक्षक इतर क्लासेसच्या बदनामीकारक मोहीमांमधे सहभागी क्लासेसच्या बदनामीमधे सहभागी होत असतात. शिक्षकाने सांगितलं तर पालकांचा विश्वास बसतो.

अशा शिक्षकांच्या कारवायांकडे फार काळ दुर्लक्ष करणे कठीणच आहे. कधी न कधी त्यांचं बिंग हे फोडावेच लागणार.

माझ्या नवर्‍याच्या बाबतीत असं झालं होतं. तो १० वी ला असताना फक्त १ महीना क्लास ला गेला. दादर मधला प्रथित यश क्लास होता. नंतर त्याने तो सोडला आणि कुठलाच क्लास केला नाही. तो मेरिट ला आल्या वर त्या क्लास ने त्याचे नाव जाहिरातित वापरले. त्याची आई पण शिक्षिका होती. उगाच पंगा नको म्हणुन हे लोक गप्प बसले.

उत्तम लेख आणि चांगली चर्चा!
लेखातील शेवटचा प्रश्न यासगळ्याचे मूळ आहे. जोपर्यंत परिक्षापद्धती 'घोका आणि ओका' असेल तोपर्यंत कोचिंग क्लासेसची गरज लागणार. ३इडीअट्समधे आमिरचे पात्र म्हणते तसे आज काय शिकायला मिळाणार यापेक्षा हा धडा अमुक एक मार्कांना आहे यालाच सध्या महत्व आहे. दुसरे असे की मिळालेल्या ज्ञानाचे अपरिचित परिस्थितीत उपयोजन हा प्रकार अस्तित्वातच नाही, त्यामुळे हे जे शिकतो आहे ते परिक्षेपुरतेच लक्षात ठेवायचे आहे ही मानसिकता पक्की झाली आहे.

३इडीअट्समधे आमिरचे पात्र म्हणते तसे आज काय शिकायला मिळाणार यापेक्षा हा धडा अमुक एक मार्कांना आहे यालाच सध्या महत्व आहे. दुसरे असे की मिळालेल्या ज्ञानाचे अपरिचित परिस्थितीत उपयोजन हा प्रकार अस्तित्वातच नाही,>>> तो सिनेमा सगळ्यांना आवडला पण तसे बद मुलांत घडवायला किती जणांना आवडेल? ज्ज्ज्ज्जरा ५-१० मार्क कमी पडले तर पालकांचे चेहेरे दुप्पट पडण्याचा काळे हा.

माझा मुलगा/ मुलगी नेहेमी पहिल्या पाचात असते असे सांगणारे पालकच खरे दोशी. कारण ते जाणते / अजाणतेपणी ईतरांना 'चला या स्पर्धा करा' असा संदेश देत असतात.

अवाढाव्य फि आकारणारे क्लासेस आपल्या पाल्याला 'उच्च गुणवत्ता वर्धक बनवु शकतात' या गैर समजुतीत राहु नये......ते स्वत: पाल्याची १०% सुध्दा गॅरंटी घेत नाही. (असे ते बोलुनही दाखवतात).

बुध्दीमान विद्यार्थि सामान्य मधुनही असामान्य ज्ञान मिळवु शकतो.

मोठ्या शहरातला एम बी ए देखील सहा लाखाचे पॅकेज घेतो... सर्जन लाखभर रुपये फी घेतो.. ( आमच्या गावात त्याच सर्जरील बारा हजार स्म्पूर्ण खर्च येतो.. ) घरांच्या किमतीही तशाच.. मग क्लासेस्वाल्यानी घेतलं तर बिघडलं कुठं?

प्रत्येकालाच जास्त पैसे हवे असतात.. मग रिक्षावाल्यानई , क्लासवाल्यानी घेतले तर असे धागे का निघतात?

मोठ्या शहरातला एम बी ए देखील सहा लाखाचे पॅकेज घेतो... सर्जन लाखभर रुपये फी घेतो.. ( आमच्या गावात त्याच सर्जरील बारा हजार स्म्पूर्ण खर्च येतो.. ) घरांच्या किमतीही तशाच.. मग क्लासेस्वाल्यानी घेतलं तर बिघडलं कुठं? >>>>>

ईथे फी बद्दल चर्चा होत नसुन मुलात क्लास ची गरज आहे का हा मुद्दा आहे. फी हा त्या मुद्द्यातला एक भाग झाला. हा धागा फक्त फी चा मुद्दा घेवुन नाही. क्लास वाले फी घेणारच, तुम्ही त्यांची गरज निर्माण केली आहे. मुळात गरज आहे का हा मुद्दा आहे.

गरज आहे का, हा मुद्दा होऊच शकत नाही.. उद्या कुणीतरी म्हणेल प्रत्येकाने सायकल वापरावी म्हणजे रिक्षाची गरज उरणार नाही... तसेच आहे हे. क्लासची गरज आहे का, हा मुद्दा कसा होऊ शकेल? प्रत्येकाच्या परिस्थितीवर ते अवलंबून आहे.. कुणाला गरज वाटेल, कुणाला नाही..

प्रत्येकालाच जास्त पैसे हवे असतात... >>> बोरोबर आहे......मग त्याची परत फेड ही तशी हवी ना??? जागोजी.... Happy

गरज आहे का, हा मुद्दा होऊच शकत नाही.. >> सहमत आहे.., कारण 'ज्ञान' कधीच पुर्ण होउ शकत नाही...... भर घालण्याची गरज 'सतत' असते.

मोहन्चीमिरा जरा मुळ्लेखव्यवस्थित्वाचा......>>>>

मुळ लेख नीट वाचला आहे. म्हणुनच माझ्या मनात संभ्रम नाही. मुळ लेखात त्यांनी सरळ म्हंटलेले आहे की

मायबोलीकरांनो, तुम्हांलाही येतात का असेच अनुभव?

१) मुलांच्या शिक्षणाला असा पैसा ओतायची खरीच गरज आहे का?
२) सेल्फ स्टडी- हा ऑप्शन आधीपासूनच कसा बिंबवावा
३) कोचिंग क्लासेसच फावतंय, इतकी अवाढव्य मागणी पूर्ण केल्यावर आपली मुलं खरीच अभ्यासार्थी होत आहेत की त्यांना निव्वळ परि़क्षार्थी बनविण्यात आपणही सहभागी होतोय?

मुलांचा अभ्यास, कॉम्पीटेशन, मुलांवर पडणारा ताण ह्यावर सकस/ सर्वांगीण चर्चा घडावी, हा हेतू.

ह्याचाच अर्थ क्लास ला ऑप्शन वा पर्याय काय? तर सेल्फ स्टडी . म्हणजेच क्लास ची गरज आहे का?

दुसरा मुद्दा हा की येवढा पैसा ओतायचा का?

तिसरा मुद्दा आपल्याला नक्कि काय हवय? अभ्यासार्थी मुल का परिक्षार्थी मुल?

म्हणुनच मी म्हंटलं की मुळात गरज आहे का ह्याचा विचार आधी व्हावा. मग गरज आपणच जर निर्माण केली असेल, तर पैसे मोजायलाच पाहिजेत. आमच्या वेळी (साधारण २० वर्षां पुर्वी) एम्.बी.ए. कोर्स असणारी मोजकी कॉलेज होती. तीथे अ‍ॅड्मिशन पण मेरिट वर मिळत ( जमनालाल बजाज, एन्.एम., वेलिंगकर आणि आर्थातच आय्.आय्.एम. , सिंबॉयसिस). आता जो उठतो तो एम्.बी.ए. कोर्स चालु करतो. मागणी वाढली. आर्थातच फी भरमसाठ झाली. माझ्या नवर्‍याने जेंव्हा सी.एफ्.ए. केलं तेंव्हा ची त्याची फी आणि अत्ताची फी ह्यात जमीन आसमानाचा फरक आहे. पण सी.ए. इंस्टीट्युट ने मात्र त्यांची कमी फी ची परंपरा चालु ठेवली आहे.

(सी.ए. कोर्स तेंव्हाही सेल्फ स्ट्डी ला उद्युक्त करत होता आजही आहे. तिकडे पास व्हायची गॅरेण्टी तेंव्हाही कोणी देत न्हवतं आजही नाही. क्लास तेंव्हाही होते आज ही आहेत. पासिंग पर्सेंटेज तेंव्हाही २-३ टक्के होतं आजही तेवढच आहे. मला वाटतं सी.ए. , सी.एस आणि आय. सी. डब्लु. ए हे फार थोडे पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सेस असावे जे नाम मात्र फी घेवुन तुम्हाला एनरोल करतात आणि उत्क्रुष्ट स्ट्डी मटेरिअल नाम मात्र किमतीला देतात. त्यानंतर ही त्यांच्या तर्फे जे रेफ्रेशर कोर्स चालतात ते मेंबर व स्टुडंट ना कमी दरात असतात. मी अजुनही जुनी स्ट्डी मटेरिअल ठेवलेली आहेत रेफरन्स साठी)

माझा मुलगा २रीमधे आहे. मी engg. college मधे associate prof आहे आणि माझा नवरा science college मधे principal. आम्ही दोघे ९ ते ६ पर्यन्त घरी नसतो. माझा मुलगा दुपारी ३.३० वाजता घरी येतो. शाळेत शिकवलेले फारसे समजत नाही. आम्ही त्याला आमच्याच building मधे tution लावली आहे. तो ४.३० ते ६ पर्यन्त tution ला जावुन येतो. मग ६ ते ९ पर्यन्त आम्ही मस्त खेळतो, त्याला गणिताचि फार आवड आहे त्यामुळे NCERT ची पुस्तके आणुन त्याच्याकडुन गणिते सोडवुन घेतो,
poems learn करुन घेतो. पण हे सर्व करुन घेताना सर्व मस्त हसत खेळत होते. त्यामुळे त्याच्याबरोबरचा घालवलेला वेळ आमच्यामधील मैत्रीचे नाते अजुन धट्ट करते.

मोहन कि मीरा
चर्चेला भरकटू न दिल्याबद्दल तुमचे मनस्वी आभार मानते!

ज्ज्ज्ज्जरा ५-१० मार्क कमी पडले तर पालकांचे चेहेरे दुप्पट पडण्याचा काळे हा.>> +१

हीच मानसिकता बदलण्यासाठी पालकांनी जागरूक व्हावं आणि क्लासेस वाल्यांनी निव्वळ कमर्शिअल राहण्यापेक्षा- "एक आख्खी पिढी" आपल्या हातात आहे, असं मानून जबाबदारीचा स्विकार करायला हवा.

एक एक विद्यार्थी इथला नागरिक आहे, ह्या प्रत्येकाला घडवतांना थोडी सावधानता- जागरूकपणा पालकांनी बाळगावा, हळू हळू घडत जाणारा हा बदल, पुढे नक्कीच चांगला रिझल्ट देईल... पालकांची सतर्कता- कोचिंग क्लासेसची मानसिकता बदलू शकते- हे प्रामाणिक मत!!

मोहन कि मीरा
चर्चेला भरकटू न दिल्याबद्दल तुमचे मनस्वी आभार मानते! >>> म्हणजे आज कित्तीही आर्थिक नुकसान सोसुन मुलांना क्लासेस लावावेत. असं म्हणायचं आहे का तुला बागेश्री????
आणी जर तुझा मुद्दा फक्त असा आहे की, "एक्स्ट्रा क्लासेसची आज गरज आहे की नाही?" तर हा मुद्दाच मुळी चुकीचा आहे. कोणत्याही विषयतील विद्यार्थ्याला त्या त्या विषयामध्ये पारंगत होण्यासाठी जास्त मेहनत घेण्याची आवश्यकता आहेच. हे कुणी न शिकलेलाही सांगेल प्रॅक्टीकल बाब आहे ही. आणी आजच्या काळात तर अत्यावश्यक आहे. एकाच नाही तर अनेक विषयात क्लासेस लावण्याची आवश्यकता आहे. आणि आजकालच नाही तर भुत भविष्यात कोणत्याही काळी गरज आहेच. नेहमीच असेल. हे बोलण्याची किंवा विचारण्याची गरज नाही.

लेख जर फक्त..., मुलांना शाळे व्यतिरीक्त 'कोचिंग क्लासेस' (म्हणजे थोडे 'जास्तीची ज्ञानार्जन' करणे) लावणे की न लावणे या मुद्द्यावर असेल तर...... मुद्दा 'गौण' आहे 'हलका' आहे.

मुलांना थोडे जास्तीचे क्लासेस लावण्यात, शिकवण्यात पालकांना/कुणालाच काहीच हरकत आणि कधीच नसते. जेवढे शिकणार तेवढे समजाणारच हे स्पष्ट आहे. विचारायला कशाला पाहीजे की आपल्या पाल्याला एक्सट्रा शिकवु की नको शिकवु??? (असं नाही की चोवितास शिकवत बसावं)

क्लासेस आसावेत......फि माफक असावी...वाजवी असावी.....कोण्त्याही वर्गाला परवडण्यासारखी असावी.

बागेश्री, आता तु मला सांग......जर,

एखाद्याने पालकांना येउन सांगीतले,

"आम्ही रोज तुमच्या पाल्यांची 'फुकटात' शिकवणी करुन घेउ, तुम्ही फक्त २-३ तास त्याला आमच्याकडे पाठवा. निष्णांत होईल तो."
तर, असे कोणते आईबाबा आहेत या जगात या पृथ्विवर जे राजी होणार नाहीत?????

'पाल्याला' शंभरात १०% तरी जास्त कळेल. जातंय काय??? काहीच नाही. फक्त मुलं आणखी दोन तास डोळ्यासमोर नसतील पालकांच्या.

तेच तर! मोफत मिळाले की क्लास हवे की नको हा वाद रहानार नाही! पण क्लासवाल्याना शहरात जी जागा भाड्याने घ्यावी लागेल, त्याचे काय? हे भाडे महागच असणार ना? शिवाय शहरातले क्लास चटईवर नसणार.. फर्निचरचा खर्चही आला. Happy

"आम्ही रोज तुमच्या पाल्यांची फुकटात शिकवणी करुन घेउ तुम्ही फक्त २-३ तास त्याला आमच्याकडे पाठवा. निष्णांत होईल तो.">>>>

इकडे निष्णांत होईल तो. अशी गॅरेंटी कोणी देत नाहीना!!! हेच तर दुख: आहे. आज जर ही गॅरेंटी कोण देत असेल तर लोक डोक्यावर घेवुन नाचतिल, फुकट शिकवलं नाही तरी चालेल. उलट हवे तेवढे पैसे देतिल.

आजचं दुखःच ते आहे. कोणी कसलीच गॅरेंटी देत नाही. परत आपले पैसे जातात ते जातातच. क्लासेस काय पुर्वी न्हवते. होते ना. ( प्रोफेशनली क्लासेस सुरु करायचा मान लो.टिळकांन्ना जातो). पण त्या वेळचा त्या मागचा उद्देशच वेगळा होता.

आज मुलांनी निष्णांत होण्या साठी आई बाप हवे ते करतिल. पण असे "निष्णांत्"कोण बनवेल हा प्रश्ण आहे.

क्लास जर जास्त ज्ञानार्जना करीता लावले जसे एखादी वेगळी भाषा, खेळ, वाद्य, न्रुत्य, हस्तकला इ. आणि मुल जर नवं काही शिकलं तर मला नाही वाटत कोणी नाही म्हणेल. पण आज काल क्लास हे फक्त मार्क वाढवण्या साठी लावले जातात ही ह्या लेखातिल खंत आहे. ८वी पासुनच १० वी ची तयारी. अभ्यास, अभ्यास फक्त अभ्यास. मग जरा ईकडे तिकडे गेलं की असुरक्षित. मार्क कमी पडले तर? ह्या शीवाय दुसरा विचार नाही.

ज्ञान जर क्लास लावुन "हमखास" मिळत असेल तर छानच आहे.

Pages