कोचिंग क्लासेस : आजची गरज?

Submitted by बागेश्री on 14 December, 2011 - 03:42

काल टी ब्रेक मधील साधारण चर्चा-

मी : श्वेता, ओये अगं लक्ष कुठाय, चहा गार झाला
श्वेता : अं... हो यार, मैने कल बोला था ना, त्या सरांना भेटायला गेलो होतो

मी : धिरज च्या क्लास साठी ना?
श्वेता : हो ना, काय रेट आहेत माहितीये तुला, क्लासेसचे?
मी : अगं पण एक सांग, आता फायनल एक्झामस येतील काही महिन्यात, तू आता का कोचिंग्ज शोधते आहेस?
श्वेता : अरे यार, उसकी नाईन्थ के लिये, तो आता आठवीत आहे, मी ह्या वर्षी नाही, पुढच्या वर्षाची तयारी करते आहे
मी : ओह! अगं पण ७/८ महिन्यांआधीपासून?
श्वेता : हो मग? त्या टीचरकडे बुकींग करावं लागतं
मी : बुकींग? इथेही? ओअ गॉश!
श्वेता : अरे आगे सुन, नेक्स्ट नोव्हेंबर मुझे उसका टेन्थ का भी बुकींग करके रखना पडेगा
मी : हम्म.. शिक्षणाला अवघड करतोय आपण लोकच, आठवी नववी पण सेल्फ स्टडी होऊ शकतं जर पॅरेंट्सने लक्ष घातलंच तर, पण आज काल पालकांकडे वेळ कुठे? दॅट्स ऑदर टॉपिक! काय आहे फीस?
श्वेता : एटी के
मी : व्हॉट? अस्सी हजार??? आर यू ओके? (मी अ़क्षरशः उडाले बसल्या जागी)
श्वेता : येस मॅम, दॅट टू, उनको अगर बुक करना है तो, चालीस हजार आज भरने है... त्याच सगळ्या गोष्टींचा विचार करत आहे
मी : श्वेता, हे अतिच आहे, नववीतल्या सगळ्या विषयांना ऐंशी हजार? अगं इन्जिनीअरींग च्या फीस शी स्पर्धा झाली ही

श्वेता : मॅड्ड्म धीस ओनली फॉर टू सबजेक्ट्स!! गणित आणि विज्ञान, दहावीला तर सेम सब्जेक्टस ची फीस एक लाख, वोह भी अ‍ॅडव्हान्स बुकींग करेंगे तोह.
मी : आ>>>य कान्ट बिलिव्ह धिस ऑल! सिरिअसली, अरे काय चाललंय काय, आणि आहेत कोण हे सर, मुलाला मेरिटमधे आणूनच दाखवणार का मग, गॅरेन्टीने?
श्वेता : छे छे! ते म्हणे मुलाच्या बुद्धिमत्तेवर अवलंबून, आम्ही बेस्ट देणार, मुलं झोळीत किती पाडून घेतात ते आम्ही कसे ठरवणार!!

मी : बापरे! मग तू देणारेस चाळीस हजार??
श्वेता : वो सर के साथे निगोशिएट किया बहोत, तो सत्तर हजार में माना है, मग पस्तीस द्यायचेत
मी : वाह, काय महान!
श्वेता : तो म्हणतो, मी फक्त IB, ICSC स्टूडंट्स ला कोचिंग देतो सहसा, नेक्स्ट यिअर एक घंटेका स्लॉट फ्री है, इसिलिये "स्टेट बोर्ड" का सोचा!
मी : कम ऑन, श्वेता! ह्याची खरीच गरज आहे का? आय मीन सत्तर हजार, रोज एक तास, फक्त दोनच विषय?
श्वेता : बागी, कभी कभी ना बच्चे समझ नही पाते! धिरज को भी वोही क्लासेसे में जाना है... त्याचे सगळे क्लासमेट्स जाणार त्यांच्या पॅरेट्सनी भरले ना पस्तीस हजार.

मी : मागणारे आणि देणारे सगळेच तयार आहेत म्हटल्यावर बोलायचं काय?

मायबोलीकरांनो, तुम्हांलाही येतात का असेच अनुभव?

१) मुलांच्या शिक्षणाला असा पैसा ओतायची खरीच गरज आहे का?
२) सेल्फ स्टडी- हा ऑप्शन आधीपासूनच कसा बिंबवावा
३) कोचिंग क्लासेसच फावतंय, इतकी अवाढव्य मागणी पूर्ण केल्यावर आपली मुलं खरीच अभ्यासार्थी होत आहेत की त्यांना निव्वळ परि़क्षार्थी बनविण्यात आपणही सहभागी होतोय?

मुलांचा अभ्यास, कॉम्पीटेशन, मुलांवर पडणारा ताण ह्यावर सकस/ सर्वांगीण चर्चा घडावी, हा हेतू.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

फुकटात शिकवण्याची पण एक गम्मत आहे. माझ्या साबा एक मुख्याध्यापिका म्हणुन निव्रुत्त झाल्या. माझी मुलगी स्कॉलरशीप च्या परिक्षेला बसली तेंव्हा त्यांनी घरात पुस्तकं होती म्हणुन फुकटात क्लास घ्यायला सुरवात केली. सुंदर शिकवायच्या. त्याच बरोबरीने "संस्कार केंद्र" पण सुरु केलं. मुलं पहिले २-३ महिने आली. नंतर आलीच नाहीत.

आता काय म्हणाल?

मोहनची मीरा...निष्णांत होईल तो. अशी गॅरेंटी कोणी देत नाहीना!!! >> मि तेच म्हटले आहे वर

चातक | 20 December, 2011 - 09:47
अवाढाव्य फि आकारणारे क्लासेस आपल्या पाल्याला 'उच्च गुणवत्ता वर्धक बनवु शकतात' या गैर समजुतीत राहु नये......ते स्वत: पाल्याची १०% सुध्दा गॅरंटी घेत नाही. (असे ते बोलुनही दाखवतात).
---------------------------------

आता काय म्हणाल? >> कर्म करा फळाची अपेक्षा नको. पाटी लावुन ठेवा. ज्याला खरंच गरज आहे ते नक्की येतील.

तुमच्या साबाचे कौतुक..... Happy

चर्चा जोरात रंगली आहे. नमस्कार... मी नवीन मायबोलीकर - याच क्षेत्रात असल्याने लिहावेसे वाटले... लिहू की नाही यावर अनेकदा विचार केला पण आता माझे काही अनुभव सांगितल्याशिवाय रहावत नाहीये.

नववीत शिकणारी, झोपडपट्टीत रहाणारी एक हुषार मुलगी. तिची आई कुठल्याशा हॉस्पिटलमध्ये नर्स आहे. आईला आपल्या परिस्थितीचा विचार न करता केवळ मुलीच्या इतर मैत्रिणींप्रमाणे मोठ्या क्लासला घालायचे आहे. यासाठी त्या आईने साठ हजाराचे कर्ज काढले. आणि ह्या कर्जातून केवळ फीचा पहिला ’हफ्ता’ भरला!

प्रत्येक गोष्टीचे मूल्य म्हणजे पैसा! दहावीच्या मुलाचे काऊन्सेलिंग चालु होते. त्याच्याशी आईवडिलांसम्दर्भात बोलणे चालू असता त्याने value म्हणजे केवळ money असा अर्थ सांगितला. प्रत्येक गोष्टीचे समीकरण हे समाधानापेक्षा पैशात केले तर महागडे क्लासेस उत्तम हे समीकरण योग्य ठरेल.

आजचा विद्यार्थी दिवसातील जवळपास १०-१२ तास अभ्यास(?) करतो. ५-६ तास शाळेत, ३-४ तास क्लासमध्ये (हे गणित काहीच दिवसात उलटही होऊ शकते!) आणि घरी आल्यावर १-२ तास हे होमवर्क complete करण्यात. पन याच विद्यार्थ्याला झोपणापूर्वी जर आपण विचारले की तू काय शिकलास तर त्याचे उत्तर सरळ १२ वाक्येही नसते हे खरे दुर्दैव!

मुळात आज पालकांचा कलही शिकण्यापेक्षा मिळवण्याकडॆ अधिक आहे. "आम्ही आमच्या मुलाला तुमच्याकडे पाठवले, तुम्ही त्याचे counseling करुन काही होणार नाही हो. कारण तो कोणाचे ऐकतच नाही. त्यापेक्षा मी त्याचा एक्झाम नं. देते तुम्हाला...बघा हो बोर्डात तुमची ओळख असेल तर ..." हा एका आईचा तिच्या मुलासमोरील संवाद. आज शाळेतून प्रोजेक्ट्स दिले जातात. काय ह्या नवीन कटकटी म्हणून चक्क पालक असे प्रोजेक्ट्स विकत घेऊन देतात. जेवढी प्रोजेक्टची दुकानातील किंमत जास्त, तेवढा तो प्रोजेक्ट चांगला आणि त्याचे मार्क्सही! (हे निदान मुंबईत तरी घडते आहे)पाढे मिळवण्या ह्या गोष्टी आज मुलांना माहित नाहीत. 2-मिनट मॅगीचा जमाना आहे. आणि त्यांचा अभ्यासही त्यांना तसाच वाटतो. Spoon feeding वर शाळेतील शिक्षण पूर्ण केलेली मुले पुढे कमी पडतात आणि वर प्रतिक्रियात केदारने म्हटल्याप्रमाणे confidence च्या कोचिंगची गरज भासते ही सत्य परिस्थिती आहे.

मुळात coaching म्हणजे नेमके काय? ते कशासाठी ह्याचा विचार व्हायला हवा. जर आज घराघरात बालक-पालकांमध्ये एक सुंदर संवाद असेल तर आपल्या कुटुंबाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही कोचिंगची आवश्यकता निदान दहावीपर्यंत तरी भासण्याची गरज नाही. (विषयांतर झाले असल्यास क्षमस्व.)

माझे मत

>>> १) मुलांच्या शिक्षणाला असा पैसा ओतायची खरीच गरज आहे का?

गरज आहे.

>>> २) सेल्फ स्टडी- हा ऑप्शन आधीपासूनच कसा बिंबवावा

सेल्फस्टडीच्या मर्यादा आहेत. सेल्फस्टडी करून एखाद्या क्षेत्रात परिपूर्ण ज्ञान मिळविणारे फार थोडे विद्यार्थी सापडतील. कोणत्याही क्षेत्रात कोचिंगची गरज असतेच. मग ते कलाक्षेत्र असो की क्रीडाक्षेत्र की पाककला किंवा शिक्षणक्षेत्र. निव्वळ शाळेतल्या खेळाच्या तासाला जाऊन एखादा उत्तम खेळाडू घडला असता किंवा चित्रकलेच्या तासाला जाऊन एखादा उत्तम चित्रकार तयार झाला असता किंवा शाळेतल्या गायनाच्या तासाला जाऊन उत्तम गायक घडला असता, तर या क्षेत्रातल्या गुरूंची/प्रशिक्षकाची गरजच उरली नसती. हाच नियम शिक्षणक्षेत्रालाही लागू पडतो.

>>> ३) कोचिंग क्लासेसच फावतंय, इतकी अवाढव्य मागणी पूर्ण केल्यावर आपली मुलं खरीच अभ्यासार्थी होत आहेत की त्यांना निव्वळ परि़क्षार्थी बनविण्यात आपणही सहभागी होतोय?

दुर्दैवाने आपली शिक्षणपद्धती ही विद्यार्थ्यांना त्यांना मिळणार्‍या गुणांवरूनच जोखते. त्यांना किती ज्ञान आहे हे पाहण्यापेक्षा त्यांना किती जास्त गुण पडत आहेत यावर त्यांची कामगिरी मोजली जाते. त्यामुळे नाईलाजाने मुलांना अभ्यासार्थी/परिक्षार्थी बनावेच लागते.

दुर्दैवाने, मास्तुरे,
इथे ही मी असहमत तुमच्याशी.
>>> १) मुलांच्या शिक्षणाला असा पैसा ओतायची खरीच गरज आहे का?

पैसा 'ओतणे' म्हणजे काय?
गरज असेल तिथे खर्च करणे, अन नाही तिथे फेकणे. यात फरक काय? ओतणे हे दुसर्‍या प्रकारात येते.

>>> २) सेल्फ स्टडी- हा ऑप्शन आधीपासूनच कसा बिंबवावा

सेल्फस्टडीच्या मर्यादा आहेत. सेल्फस्टडी करून एखाद्या क्षेत्रात परिपूर्ण ज्ञान मिळविणारे फार थोडे विद्यार्थी सापडतील. कोणत्याही क्षेत्रात कोचिंगची गरज असतेच. मग ते कलाक्षेत्र असो की क्रीडाक्षेत्र की पाककला किंवा शिक्षणक्षेत्र. निव्वळ शाळेतल्या खेळाच्या तासाला जाऊन एखादा उत्तम खेळाडू घडला असता किंवा चित्रकलेच्या तासाला जाऊन एखादा उत्तम चित्रकार तयार झाला असता किंवा शाळेतल्या गायनाच्या तासाला जाऊन उत्तम गायक घडला असता, तर या क्षेत्रातल्या गुरूंची/प्रशिक्षकाची गरजच उरली नसती. हाच नियम शिक्षणक्षेत्रालाही लागू पडतो.

<<
महोदय,
जर आपण कोणत्याही प्रोफेशनल कोर्सला अगदी ३० वर्षांपूर्वीदेखिल प्रवेश घेतला असता तर सेल्फ स्टडी म्हणजे काय हे तुम्हीच लोकांना सांगितले असते.
अगदी तेंडुलकरांच्या सचिननेही सेल्फ स्टडी शेल्फावर ठेवला असता, तर त्याचा कांबळी झाला असता हो.
'गुरु' वाट दाखवण्यासाठी असतो. तो शाळेचा मास्तर्/कोचिंगचा मास्तर यापैकी कुणीही असतो. तुम्हाला कोणता बरा याबद्दल चर्चा सुरू आहे हेच समजत नाहीये. वाट दिसल्यावर तुम्ही गुरूच्या उरावर बसून चल, मला कडेवर घे म्हणून भोकाड पसराल तर कसे होईल? पैसे देणार का गुरूला कोचिंगची फी म्हणूण?? मग कदाचित तो कोचिंगवाला गुरू तुम्हाला पेपर देईल आणून 'फोडलेले'?? बरोबर होईल का ते?

>>> ३) कोचिंग क्लासेसच फावतंय, इतकी अवाढव्य मागणी पूर्ण केल्यावर आपली मुलं खरीच अभ्यासार्थी होत आहेत की त्यांना निव्वळ परि़क्षार्थी बनविण्यात आपणही सहभागी होतोय?

दुर्दैवाने आपली शिक्षणपद्धती ही विद्यार्थ्यांना त्यांना मिळणार्‍या गुणांवरूनच जोखते. त्यांना किती ज्ञान आहे हे पाहण्यापेक्षा त्यांना किती जास्त गुण पडत आहेत यावर त्यांची कामगिरी मोजली जाते. त्यामुळे नाईलाजाने मुलांना अभ्यासार्थी/परिक्षार्थी बनावेच लागते.<<<

चर्चा इथे आजची सिस्टीम योग्य की अयोग्य याबद्दलच सुरू आहे. आजची सिस्टीम बरी असती तर ही चर्चा कशाला झाली असती हो साहेब?

***

इथे कोचिंगची गरजच काय? हा प्रश्न आहे.
शाळा आहे ना?
तिथे शिक्षक आहेत ना?
तिथेही फी भरतो आहोत ना?
मग डबल शाळा कशाला हवी???
फक्त बोर्डाचा फॉर्म भरायला???
येडे का खुळे तुम्ही? डबल पैसे का फेकता?
जाब विचारा शाळा मस्तरांना? का माझ्या पोराला ट्यूशन लावावी लागते म्हणून??
अन तरी पोरगं शिकत नसेल तर पोराला घाला दोन लाथा?

वा रे वा!

म्हणे कोचिंगची गरज आहे का?
अहो तुम्ही शाळा/कॉलेजात नोकरि करीत असाल मास्तर म्हणून, तर शिकवण्या करणे बेकायदेशीर आहे हे सगळ्या मास्तरांना ठाऊक आहे.
कुण्या पेशाने शिक्षक असलेल्याने इथे खुलासा करावा की इब्लिसचे वरील वाक्य बरोबर की चूक?

वरील प्रतिसादात 'लाथ घाला' हे 'जाब विचारा' या अर्थी आवेशात येऊन लिहिलेले आहे.
कुणाच्याही भावना दुखावण्याचा अथवा अपमान करण्याचा हेतू नव्हता हे नमूद करू इच्छितो.

<<सेल्फस्टडीच्या मर्यादा आहेत. सेल्फस्टडी करून एखाद्या क्षेत्रात परिपूर्ण ज्ञान मिळविणारे फार थोडे विद्यार्थी सापडतील. कोणत्याही क्षेत्रात कोचिंगची गरज असतेच. मग ते कलाक्षेत्र असो की क्रीडाक्षेत्र की पाककला किंवा शिक्षणक्षेत्र. निव्वळ शाळेतल्या खेळाच्या तासाला जाऊन एखादा उत्तम खेळाडू घडला असता किंवा चित्रकलेच्या तासाला जाऊन एखादा उत्तम चित्रकार तयार झाला असता किंवा शाळेतल्या गायनाच्या तासाला जाऊन उत्तम गायक घडला असता, तर या क्षेत्रातल्या गुरूंची/प्रशिक्षकाची गरजच उरली नसती. हाच नियम शिक्षणक्षेत्रालाही लागू पडतो.>>

१०० टक्के सेल्फ स्टडी स्वाध्याय असं कोण म्हणतंय? शाळेत/कॉलेजात जातात ना मुले? तिथे त्यांना शिकवले जाते ना? त्याउपर स्वाध्याय करून विषयाची तयारी नाही होणार का? शाळा/कॉलेजच्या अभ्यासात असं काय ग्रेट असतं की त्याला स्वाध्याय पुरणार नाही? जिथे मुलांना शिकवलेले कळले नाही, विषय अवघड वाटतोय तिथेच विशेष मार्गदर्शनाची गरज असते.

कॉस्ट अकाउंटन्सी, भारतीय बँकिंग संस्थेच्या व्यावसायिक परीक्षांची तयारी बहुसंख्य लोक स्वाध्यायानेच करतात. आय ए एसची तयारीही स्वाध्यायाने करणारे लोक आहेत.

कॉस्ट अकाउंटन्सी, भारतीय बँकिंग संस्थेच्या व्यावसायिक परीक्षांची तयारी बहुसंख्य लोक स्वाध्यायानेच करतात. आय ए एसची तयारीही स्वाध्यायाने करणारे लोक आहेत.>>>

मी माझ्या वरील प्रतिसादात ह्या बद्दल सांगीतले आहे. सी.ए., सी.एस, आय्.सी.डब्लु.ए. हे कोर्स आपले स्वतःचे स्ट्डी मटेरिअल देतात. सी.सी. ( म्हणजे सरावाचे पेपर ) खुप सोडवुन घेतात. हे कोर्स मध्येच अंतर्भुत आहे. म्हणजेच परिक्षेसाठी जी पुर्व तयारी लागते ते हे आधीच करुन घेतात. ह्यात मुलांन्नी सेल्फ स्ट्डीकरावा अशीच अपेक्षा असते.

इब्लिस ह्यांच्या मताशी सहमत की ३० वर्षा पुर्वी कुठे कोण व्यवसायिक शिक्षणासाठी क्लास लावत होत?

मेडिकल चे कोचिंग क्लास बघीतले आहेत कुठे?

बरं अश्या कोर्स मध्ये क्रमीक अभ्यास क्रम असा नसतो. मग क्लास तरी काय शिकवणार? मेथड च ना? ती एकदा आली की सेल्फ स्टडी ह्या शिवाय पर्याय नाही.

उदा. सी ए. च्या अकाऊंटंसी च्या पेपर मध्ये कोणती बॅलन्स शीट चा प्रोब्लेम येणार हे पेपर सेटर पण सांगु शकत नाही, कारण एकाच वेळी ४ पेपर सेट करुन ठेवतात, आयत्या वेळेला त्यातला एक येतो.

मोहन की मीरा, ICWA केले मी. दोन दशके झाली त्याला. त्यात मॅनेजमेंट अकाउंटन्सी वर स्टडी मटेरियल मध्ये नसलेल्या मटेरियलवर बहुसंख्य प्रश्न होते. मग कळले की वेगवेगळ्या इंडस्ट्रीजशी संबंधित पुस्तिका (टेक्स्ट बुक नव्हे तर बिझिनेस लिटरेचर) वाचणे भाग आहे.

बरोबर आहे तुमचे, भरतजी. स्टडी मटेरिअल वगळुन ही खुप येत असे पेपरात. म्हणजे कितीही कोचिंग लावले तरी काय फायदा. आपला आपणच अभ्यास करणे भाग होते. टॅक्स च्या पेपर मध्ये लेटेस्ट केसेस यायच्या. त्या तर आपल्या आपणच वाचाव्या लागतात.

मला तेच म्हणायचे होते स्टडी मटेरिअल वगैरे वापरुन तुम्हाला मेथड कळेल, पण अभ्यास आपला आपणच!!!

>>> शाळेत/कॉलेजात जातात ना मुले? तिथे त्यांना शिकवले जाते ना? त्याउपर स्वाध्याय करून विषयाची तयारी नाही होणार का? शाळा/कॉलेजच्या अभ्यासात असं काय ग्रेट असतं की त्याला स्वाध्याय पुरणार नाही?

ज्यांची मुले/मुली शाळा-कॉलेजात आहेत त्यांनी आपल्या पाल्यांना शाळा-कॉलेजातल्या शिक्षणाच्या दर्जाबद्दल विचारावे व ते मत इथे मांडावे. विशेषतः कॉलेजमध्ये दिल्या जाणार्‍या शिक्षणाचा दर्जा फारसा समाधानकारक नाही असे माझे मत आहे. इतरांचे मत वेगळे असू शकते. शाळा-कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांनीच यावर आपला अभिप्राय द्यावा हे उत्तम. इथे लिहिलेल्यांपैकी किती जण आपल्या पाल्यांना कोचिंग क्लासला पाठवत नाहीत/पाठवणार नाहीत ते देखील सांगावे.

मी बी कॉमला असतानाही कोचिंग क्लासचे वेड भारी होते. अकाउंटन्सी या मुख्य विषयासाठी मुले हमखास क्लासला जायची. आणि त्या विषयाच्या लेक्चरला वर्ग रिकामा असायचा. कारण मुलांचे क्लासात आधीच शिकून झालेले असायचे. शिकवणारे प्रोफेसर, जे स्वतः प्रॅक्टिसिंग सीए होते, विषय अगदी छान समजावून सांगायचे.
फायनल परीक्षेत क्लासला जाणार्‍या मुलांच्या आणि न जाणार्‍या माझ्यासारख्या अपवादात्मक मुलांच्या गुणांत फरक नव्हता.

यंदा आमच्या शेजारचा एक मुलगा छान ९४ टक्के गुण मिळवून दहावी पास झाला. पण त्याने अ‍ॅडमिशन जवळच्याच, ज्याचे नावही कधी ऐकले नाही अशा कॉलेजात घेतली. रुपारेल लांब पडले असते तरी पार्ले कॉलेज लांब नव्हते. जवळचे कॉलेज का तर तीन तीन क्लासेस करायला वेळ पुरावा एवढ्यासाठी. तीन क्लासेस + कॉलेज करून मुलगा स्वतः अभ्यास कधी करणार?

माझ्या भाच्याने इंजिनीयरिंगच्या द्वितीय वर्षाला डिप्लोमानंतर प्रवेश घेतला. या प्रवेशप्रक्रियेत होत असलेल्या उशिरामुळे त्याने क्लासला अ‍ॅडमिशन घेतली होती, पण कॉलेजचे एक सेमिस्टर झाल्यावर क्लास बंद केला. कॉलेजातले शिक्षण + स्व-अध्ययन त्याला पुरेसे वाटले आणि ठरले.

मयेकरजी, हेच म्हणतो आहे मी.

कोचिंगची गरजच नको.

शाळा / कॉलेजचे शिक्षक काय मठ्ठ आहेत का? प्रायव्हेट कोचिंगला अर्धा - पाव लाख रुपये फीया भरून मुले जातात, तिथे किती मुले असतात एका बॅचमधे? १००? १५०? २००?? अन अशी कोणती ज्यादाची अती हुशारी/अतींद्रीय शक्ती त्या कोचिंगच्या मास्तरांच्या अंगी असते?

अहो,
शाळेत शिकवत नाहीत याचे कारण गर्दी असेल तर कोचिंगला काय लाऊडस्पिकर लावल्याने नीट ऐकू येते काय? तो लाऊडस्पिकर १००० रुपयांचा तुम्ही शाळेला देणगीत द्या ना?? कितिक महाग आहे असा?

अन हे नसेल कारण तर दुसरे कारण काय आहे असे की आजकाल मुलांना शाळेपेक्षा कोचिंग बरे वाटते?
या विषयावर चर्चा होऊन काही निष्पन्न होईल तर बरे! माणसिकता बदलायला हवी आहे मुळात.

अन्यथा इथे वायफळ चर्चा करण्यात काही हशिल नाही.

इब्लिस
सेल्फस्टडीच्या मर्यादा आहेत. सेल्फस्टडी करून एखाद्या क्षेत्रात परिपूर्ण ज्ञान मिळविणारे फार थोडे विद्यार्थी सापडतील.
>>>
सहमत.

१०० टक्के सेल्फ स्टडी स्वाध्याय असं कोण म्हणतंय? शाळेत/कॉलेजात जातात ना मुले? तिथे त्यांना शिकवले जाते ना?

>> दहावी, बारावीत बर्याच प्रथितयश शाळा कॉलेजेस मध्ये पोर्शन पुर्ण (७५% सुद्धा ) शिकवला जात नाही. १०० मुले वर्गात कोंबली असताना वैयक्तिक शंकासमाधान होणे अशक्यच.

त्याउपर स्वाध्याय करून विषयाची तयारी नाही होणार का?

>> होइल, जे अत्यंत हुशार असतील त्यांची.

शाळा/कॉलेजच्या अभ्यासात असं काय ग्रेट असतं की त्याला स्वाध्याय पुरणार नाही? जिथे मुलांना शिकवलेले कळले नाही, विषय अवघड वाटतोय तिथेच विशेष मार्गदर्शनाची गरज असते.

>> भरतजी आज जर मला एका महिन्यात अभ्यास करुन बारावीचे पेपर द्यायला लावले तर मी फेल होइन हो.
तुम्हाला आत्ता

tanx = i * (e ^ ix - e ^ -ix) / (e ^ ix + e ^ -ix)

याचा प्रुफ बर्याच जणांना आठवेल का. ट्रिग्नोमेट्रीत असे चारशे प्रुफ असतील आणि लॉगॅरिदम, इन्टिग्रेशन , स्टॅटिस्टिक्स
डिफरन्शिअल ईक्वेशन्स, प्रॉबॅबिलिटी प्रत्येकात असे चारशे समीकरणे असलेले १५ विषय गणितातच आहेत.

ऑर्गॅनिक केमिस्ट्री, ते १ ग्रॅम टर्शरी प्रोपेनॉल किती टेम्परेचरला
अमुक रिएजंट असेल तर ब्रेक व्हायला किती एनर्जी लागेल असे प्रश्ण. एन्ट्रोपी, एन्थाल्पी, काही दहा हजार समीकरणे

मेकॅनिकल फिजिक्स ते रेन्चेस, त्या पुल्या, त्या स्टॅन्डिन्ग वेव्हज, हायजेल्बर्ग्स इक्वेशन्स, इलेक्ट्रोमॅगनेटीझम, मॅगनेटीझम यांची सारखी दिसणारी पण वेगळी असलेली एक्वेशन्स आणि त्यांचे प्रुफ यावर चकवणारी उदाहरणे

बायोलॉजी मधल्या शेकडो आक्रुत्या आणि हजारो टर्म्स.

१२ वीत तरी विषय कठीण नसले तरी व्याप्ती प्रचंड असते. मी तर म्हणेन जवळ जवळ ३ वर्षांचा अभ्यास थोडक्यात असतो.

<<<याचा प्रुफ बर्याच जणांना आठवेल का. ट्रिग्नोमेट्रीत असे चारशे प्रुफ असतील आणि लॉगॅरिदम, इन्टिग्रेशन , स्टॅटिस्टिक्स डिफरन्शिअल ईक्वेशन्स, प्रॉबॅबिलिटी प्रत्येकात असे चारशे समीकरणे असलेले १५ विषय गणितातच आहेत.>>>
पहिली गोष्ट म्हणजे प्रूफ पाठ करायची नसतात. त्यांच्या पद्धती लक्षात ठेवायच्या असतात. हल्ली शाळेत काय किंवा क्लास मध्ये काय, सगळा जोर पाठांतरावरच देतात. मी गणिताच्या फक्त शालेयच नाही तर सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठीही अगदी चौथी ते १२ वीच नव्हे तर कॉलेजेस मधील campus interview साठी लागणा ~या
'quantitative aptitude व analitycal reasoning या विषयांसाठी गेली ४० वर्षे शिकवण्या घेत आहे. माझा भर विद्यार्थ्यांनी टॉपीक समजून घेण्यावर असतो. घोकंपट्टी नाही.
campus interview मध्ये माझे १००% टक्के विद्यार्थी यशस्वी होतात. इतर शालेय स्पर्धात्मक परीक्षांमध्येही अगदी १००% नसले तरी ९० ते ९५ % विद्यार्थी यशस्वी होतात.

नीलिमा, मुलांना पहिलीपासून ट्युशनला पाठवून त्यांना स्पून फीडिंग आणि घोकंपट्टीची सवय लावली जाते. मग सेल्फ स्टडीची सवय दूर, ओळखही मुलांना होत नाही.
मी वाणिज्य शाखेचा विद्यार्थी. कॉलेजात शिकलेल्या विषयांवर पुन्हा प्रोफेशनल कोर्सेस करताना पेपर्स दिले. पाच वर्षांत शिकलेले अकाउंट्स, चार वर्षांचे अर्थशास्त्र, ३ वर्षांतले आणि त्याबाहेरचे मॅथ्स्-स्टॅट्स इ. तेही नोकरी करताना, सुट्या न घेता महिना दोन महिने अभ्यास करून. यात कॉलेजात न शिकलेले काही विषयही पूर्ण नव्याने अभ्यासासाठी होते.
कन्सेप्ट्स समजून घेऊन अभ्यास केलेले असल्याने हे पुन्हा आठवायला थोडीशी उजळणी पुरली.

जिथे गरज आहे तिथे ती तपासून ट्युशन ठेवली तर ना नाही. पण प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्येक विषयाचे कोचिंग, ट्युशन अशी मेंढरांची रांग चालली असेल तर उपयोग काय? आधीच्या एका प्रतिसादात IIT च्या एका संचालकाच्या लेखाची लिंक दिली आहे ती बघाल का?

.

Pages