दु:खद घटना - जुना धागा

Submitted by admin on 9 June, 2008 - 15:59

काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हम बेखुदी मे तुमको पुकारे चले गये... Sad

देव आनंद यांचे पार्थिव शरीर भारतात आणले जाणार नाही. आपल्या फॅननी आपले असे दर्शन घेऊ नये अशी त्यांची इच्छा होती. आपल्याच इमेजवर इतके प्रेम करणारा माणूस. हे एकच व्यसन होतं त्याना.

आम्हाला एका शिक्षकाने एकदा सांगितलं होतं. कधी चान्स मिळाला तर देव आनंदची मुलाखत जरूर घ्या. त्यांचं एंग्लिश, हिंदी आणि उर्दू जबरदस्त होतं. भाषाप्रभुत्व आणि स्पष्ट वाक्यरचना हे सध्याच्या फिल्मस्टारमधे दुर्मिळ होत जाणारे गुण आहेत.

देव आनंद याना श्रद्धांजली.

... के दिल अभी भरा नहीं..

श्रद्धांजली... Sad

Sad

Sad

Sad Sad

चित्रपट समीक्षक वगैरे कोणीही काहीही म्हणो, पण जीवन कसं जगावं याचं एक मूर्तीमंत उदाहरण म्हणजे देवसाब.... कंटाळा, थकवा... माहीतच नव्हता त्यांना! >>>>अगदी अगदी Sad

दिन ढल जाये हाय, रात ना जाय
तु तो ना आये, तेरी याद सताय.....
देव आनंद Sad

शम्मी कपूर गेले तेव्हा जगाचे दंगा करू इच्छिणारे बालपण गेले.

आता जगाचे तारुण्यही गेले, आता सगळे जग म्हातारे झाले आहे.

विनम्र श्रद्धांजली आणि अश्रुंनी भिजलेल्या स्मृती!

देव आनंद!

पुरुषालाही सुंदर हे विशेषण लावणे शक्य असते हे त्यांच्यामुळे समजले.

देव आनंद ~ "जगणे" या गोष्टीवर मनापासून प्रेम करणारा माणूस. सदैव उत्साहाने खळाळून वाहता झराच म्हटले तरी देवसाहेबांच्याबाबतीत ती अतिशयोक्ती ठरणार नाही. "ज्या व्यवसायात पैसे कमावले त्याच व्यवसायावर ते खर्च केले. मिळाले म्हणून आनंद नाही, गेले म्हणून वाईट वाटून घ्यायचे नाही." हे तत्वज्ञानच होते जणू त्यांच्या चित्रपटनिर्मितीचे.

देव आनंदने आत्मचरित्रास नाव दिले आहे "Romancing with Life" आणि ते अर्पणही केले आहे "जीवनाला"च. पत्रिकेत देव आनंद म्हणतात :

"I dedicate this book to life as it is lived by people the world over and to that special ray of sunshine that makes life worth living."

जीवनावर इतके नीतांत प्रेम करणार्‍या या सर्वार्थाने "चॉकोलेट हीरो" ला श्रद्धांजली.

साधारण ३ महिन्यांपूर्वी प्राध्यापक रमेश देसाई गेले... बहुतेकांना हे कोण ते ठावूक असेलच असे नाही...

त्यांच्या कार्याची थोडी माहिती देणारा एक लेख..

http://dongarwadi.blogspot.com/

ओह.. प्रा. रमेश देसायांना श्रद्धांजली. त्यांचं 'तिसरा ध्रुव' वाचलं होतं. नंतर 'मानसरोवर' की 'मानससरोवर' यावर त्यांचा सत्त्वशीला सामंत यांच्याशी झालेला लेखन व पत्रव्यवहारही वाचला होता. अतिशय वाचनीय अशी ती पत्रं होती.

हो, रमेश देसाई गेल्याचं मध्यंतरीच कळलं. माझा त्यांचा द्वारकेच्या पुरातत्त्वावरून मटामधे जोरदार वाद झालेला. पण त्यांचे बाकी लेख खूप वाचनीय असत

प्रख्यात व्यंगचित्रकार मारिओ मिरांडा यांचे निधन Sad
त्यांच्या चित्रांना मॅड आणि पंच मधे ही स्थान मिळाले होते..

मारिओ मिरांडा Sad कॅफे माँडेगार हा कॉलेज नंतर माझा रेग्युलर अड्डा होता आणि त्याच्या भींतीवरची म्युरल्स मारिओंची आहेत.

ओह.. मारिओ मिरांडा याना श्रद्धांजली. त्यांच्या एका पुस्तक प्रकाशन सोहळ्याची बातमी कव्हर केली होती. Sad

एक वाईट बातमी

कळवताना अत्यंत दुख: होत आहे कि आपला लाडका "धुंद रवी" याच्यावर प्राणघातक हल्ला झाला आहे. त्याला हॉस्पिटलमध्ये भरती केले असून सकाळी फोन केला असता असे कळले कि तो सध्या ऑऊट ऑफ डेंजर आहे..
ईश्वर चरणी हीच प्रार्थना आहे कि तो लवकरात लवकर बरा होवो..

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/11076046.cms

Sad

धुंद रवी यांच्या नातेवाइकांकडून कळते की सगळ्यांची प्रकृती आता धोक्याच्या बाहेर आहे.

Pages