दु:खद घटना - जुना धागा

Submitted by admin on 9 June, 2008 - 15:59

काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी पण सकाळीच वाचली होती बातमी, पण त्यातले एक जखमी आपले धुंद रवी आहेत हे माहिती नव्हते. Sad
त्यांच्या तब्येतीत सुधारणा होवो लवकर.

आई गं!

धुंद रवीच्या परिवारातील सर्वांच्या तब्येतीत लवकर सुधारणा होवो.

आयला... कालच्या आमच्या ओळखीच्यांनी ही बातमी सांगितली होती.. त्याच बिल्डींग मधला एक फ्लॅट विकावू होता तो दाखविण्यासाठी ते गेले होते.. तेव्हा त्यांच्या समोरच चौघांना पोलिस अ‍ॅम्ब्युलन्स मधून घेऊन गेले.. Sad

आत्ताच इस्पितळात जाऊन आलो. रवी झोपला असल्याने त्याची भेट झाली नाही पण त्यांच्या पत्नीशी बोलणे झाले. पहाटेपर्यंत शस्त्रक्रिया सुरु होत्या, त्यामुळे किमान २-३ दिवस तरी सगळ्यांना इस्पितळातच रहावे लागेल. तथापि सगळे धोक्याच्या बाहेर आहेत ही त्यातल्या त्यात चांगली गोष्ट.

सध्या तो ऑऊट ऑफ डेंजर आहे....
जे पुण्यातले लोक त्याला भेटायला जाणार आहेत त्यांनी १-२ दिवस जाउ नये.. अजुनहि त्याची तब्येत ठिक नाही आणि त्याला भेटायला परवानगी नाही आहे...

-आका

बापरे! आज सकाळी ही बातमी वाचल्यावर वाचून संताप आला होता. जखमी झालेली व्यक्ती हीच 'धुंद रवी' हे माहित नव्हते. त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना लवकर बरे वाटू दे!

कालच 'लुंगीखरेदी' परत वाचली त्याची. खूप हसवलं पुन्हा आणि आज हे वाचतेय. देवा! रवी लवकरात लवकर बरा होवो आणि इतरही सगळ्यांना लवकर बरं वाटो. प्रार्थना करतेय.

रवी आणि सर्व कुटुंबियांना लवकरात लवकर बरे वाटो ही प्रार्थना!
प्रचंड धक्कादायक बातमी!
हल्ल्याचा निषेध!

आत्ताच रविच्या एका जवळच्या मित्राशी बोलणं झालं. रवीची तब्बेत आता बरी आहे. त्याच्या हातावर शस्त्रक्रिया झालीये. आजपासून त्याला हळू हळू खायला, प्यायला पण देतील.
रविच्या वडिलांची तब्बेत अजून बरी नाहीये. ते ICU मधेच आहेत.

सध्या रविला खूपच मोठा मानसिक धक्का बसला आहे. त्यामुळे त्याला लगेच कोणीही भेटायला जाऊ नये.

>> पुण्यातल्या एका मित्राकडुन असं कळलं आहे...

ह्म्म्म फारच धक्कादायक आणि दु:खद बातमी आहे ही.
रवि आणि त्यांच्या कुटुंबियांच्या तब्ब्येतीत लवकर सुधारणा होवो.

बाप रे! फार भयानक बातमी आहे! धुंद रवी आणि त्यांच्या कुटुंबियांना आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो ही प्रार्थना.

Pages