नियम, संस्कार ?

Submitted by विनायक.रानडे on 3 December, 2011 - 00:51

हा लेख मी एक मानव? ह्या लेखाचा पुढचा भाग आहे. चांगले किंवा वाईट नियम, संस्कार कोणी ठरवले, का ठरवले? ह्याचा शोध मी माझ्या अनुभवांच्या विश्लेषणातून केला. अनादिकालापासून ह्या सृष्टीत नियमित प्रसंग घडले व घडत आहेत. ह्या नियमित प्रसंगांची यादी म्हणजेच नियम हे मला माझ्या क्षमते प्रमाणे समजले आहे. निसर्गाने दिलेल्या जीवदानाचा चांगला सतकारणी उपयोग व्हावा म्हणून मानवाने बरेच नियम स्वेच्छेने स्वीकारलेले आहेत. हे शरीर सुदृढ, निरोगी राहावे म्हणून ह्या नियमांचे संकलन करून सुनियोजित केलेला कार्यक्रम म्हणजे संस्कार असा माझा मीच ठरवलेला अर्थ आहे.

माझ्या जन्मापासून माझ्या पोटात जाणारा आहार हा देखील एक संस्कार होता. माझ्या आईने जमा केलेल्या अनुभवांनी तिने ठरवले कोणते अन्न माझ्या प्रकृतीला पोषक होते. त्या आहारातील प्रत्येक पदार्थाची निवड, स्वच्छता, शिजवणे, व कोणत्या वेळेला मी ते खावे हे सगळे आहार विषयक संस्कार होते व त्या संस्कारांनी माझ्या शरीराची वाढ झाली म्हणून ते आहाराचे संस्कार चांगले होते. पण रोज दिसणारा विरोधाभास समजणे कठीण झाले आहे, भिकारी बाई तीच्या मुलांना आहाराचे कोणते संस्कार देते? त्या आहार संस्कारांना चांगले वाईट कोण ठरवणार?

जो पर्यंत स्वत:ची काळजी घेण्याची क्षमता माझी नव्हती तेव्हा माझ्या पालकांनी माझ्या वर संस्कार केले पुढे त्यांनीच त्याचे नियम तयार केले व मला ते नियम पाळण्याची सक्ती केली. त्या नियमांचे मी पालन केल्यास माझे दैनंदिन जीवन सुलभ निरोगी होईल हा त्या नियम बनवण्या मागचा हेतू होता. हे सगळे नकळत घडत गेले. कारण मी अजून घराच्या चार भिंतींच्या मर्यादेत होतो. जेव्हा शेजारी व घराबाहेरील वातावरणात मिसळणे सुरु झाले तेव्हा माझ्या वर झालेले संस्कार व नियम पालन सक्तीची तुलना करण्याची संधी मला मिळाली. त्या आहार संस्कारांनी माझ्या शरीरातील अवयवांच्या घनतेत (बॉडीमास) बदल घडला होता. त्यामुळे वेगवेगळ्या नैसर्गिक स्पंदन लहरींना एकरूप (रिझोनेट) होण्याच्या क्षमतेत बदल घडत होता. म्हणून त्या आहार संस्कारांनी माझी मानसिकता व संवेदनाक्षमता इतरांच्या तुलनेत बरीच वेगळी तयार झाली हे आज जाणवते आहे.

माझ्या क्षमतेची सत्यता रोज घडणार्‍या प्रसंगातून जाणवत होती. समवयस्क मुले-मुली माझ्या घरात केव्हाही खेळायला येत असत, त्यांना कधीच कोणी अडवले नाही पण मी फारसा कोणाच्या घरात गेलो नव्हतो, शेजारची मंडळी आम्हा मुला-मुलींना सारखे घरातून बाहेर काढत असत. हा माझ्या पालकांच्या संस्कारांतील फरक मला अगदी सहज जाणवला. संध्याकाळी आमच्या ६ फुटाच्या झोपाळ्यावर समवयस्क मुले-मुली श्लोक व पाढे म्हणायला रोज जमत होते. त्या श्लोकांचे उच्चार आम्हा भावंडांचे इतरांच्या तुलनेत जास्त स्पष्ट होते, आमचे पाठांतर देखील जास्त होते. हा सगळा संस्कारांचाच परिणाम होता.

हे जसे आहार विषयाचे संस्कार व आहार नियम होते तसेच माझी मानसिक क्षमता निरोगी असावी म्हणून माझ्या पालकांनी माझ्यावर मानसिक संस्कार केले व मानसिक नियम पालनाची सवय मला लावली. ह्या नव्याने उमजलेल्या माझ्या क्षमतेची तुलना घराबाहेरील वातावरणातील इतरांच्या मानसिक संवेदनाक्षमतेशी करण्याची संधी मला मिळाली. आजतागायत मला कोणाला अथवा कोणाविषयी शिव्या अपशब्द काढण्यात कमीपणा वाटतो. माझे असे ठाम मत आहे की शिव्या अपशब्द काढणे ही बुद्धी कमकुवत असण्याची लक्षणे आहेत. अहो एकदा चक्क माझ्या आईनेच मला गाढव आहेस असे म्हणताच जन्म देणारी तीच आहे व ही चूक तिची आहे माला दोष देऊन काय उपयोग असे मीच तीला सांगितले होते. तिने त्या करता तत्काळ माझ्या कानाखाली वाजवली होती पण त्यानंतर तिने बोलणे बदलले होते, गाढवासारखे वागू नकोस असे ती म्हणू लागली. ह्यालाच तुम्ही चांगले संस्कार म्हणाल की अजून काही उपाधी देणार? ह्या चांगल्या संस्कारांचा परिणाम म्हणजे मी मित्र गोळा केले नाहीत पण महत्त्वाचे म्हणजे शत्रू निर्माण होऊ नयेत ह्याची जास्त काळजी घेतली. आजही तशी काळजी घेतो आहे.

माझ्या लहान पणी शेजारी असणार्‍या समवयस्क मुला-मुलींनी माझी खेळणी व वस्तू परवानगी शिवाय त्यांच्या घरी लंपास केल्या होत्या. हा परिणाम त्यांना मिळालेल्या संस्कारांचाच होता हे मला त्या काळातच समजले होते. प्राथमिक शाळेत शिक्षण सुरु झाले तेव्हा घराच्या चार भिंतीत झालेल्या संस्कारांचा व शाळेत घडणार्‍या संस्कारांचा विरोधाभास जाणवू लागला होता. खोटे बोलणे वाईट असते, देव त्याला शिक्षा करतो वगैरे संस्कार घरापुरतेच असतात असे अनुभव रोज येत होते. शाळेत मुले-मुली, शिक्षक खोटे बोलत होते. त्यांना शिक्षा होताना दिसली नव्हती. उघड्यावर मुतायला, संडासाला बसणारी मुले-मुली बघताना आईने दिलेले संस्कार चुकीचे आहेत की काय असेच काही वेळा वाटत होते. भिंतीवरील नग्न चित्रे व त्या खाली लिहिलेली आकलन न होणारी वाक्ये माझ्या पालकांच्या संस्कारांना / नियमांना जुनाट ठरवीत होती.

माध्यमिक शालेय शिक्षण सुरु झाल्यानंतर ब्राम्हण व ब्राम्हणेतर हा फरक व त्याचे परिणाम मी अनुभवले होते. त्याचेच हे एक उदाहरण आहे. माझ्या बाबांनी एका १३ एकर जमिनीच्या ७० प्लॉट असलेल्या सोसायटीचा कार्यवाह म्हणून काम केले होते. रस्ते, दुतर्फा झाडे अशी बरीच कामे विशेष लक्ष देऊन केली होती. त्या जागेत बाबांनी त्यांच्या मालकीचे घर बांधले होते. आमच्या शेजारी लेवा पाटील समाजाचे एका शाळेचे मुख्याध्यापक होते व त्यांची बायको दुसर्‍या एका शाळेत मुख्याध्यापिका होती. त्यांची तीन मजली इमारत होती. त्यात आधुनिक संडासाची व्यवस्था होती पण त्यांची नातवंडे आमच्या घरासमोर झाडाखाली उघड्यावर संडास करायला सकाळी, दुपारी येऊन बसत होती. मी त्यांना हे चुकीचे आहे असे सांगण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी त्यांच्या संस्कारांना साजेसे उत्तर मला दिले " ए बाम्हण्या, माझी नातवंडं अशीच रोज संडासाला बसतील. ती जागा तुमच्या हद्दीत नाही. पटत नसेल तर ही जागा खाली करा. जा बाम्हणाच्या वस्तीत जाऊन राहा." सगळेच ब्राम्हण चांगले व ब्राम्हणेतर वाईट असे नव्हते / आजही नाहीत मग ब्राम्हण कोण व का? ह्या १८ पगड जाती का व कोणी निर्माण केल्या हा माझा शोध सुरु झाला.

ब्राम्हण कोणाला व का म्हणतात हे प्रथम ब्राम्हणेतरांचे मत जाणून घेतले. पूजा पाठ करणारे, उगीचच जास्त शिकलेले आहोत असे समजणारे, लोकांना भविष्य सांगून फसवणारे, लग्न कार्यात पत्रिकांचा घोळ घालणारे, न समजणारे मंत्र म्हणून दक्षिणा गोळा करणारे, फुकट मेजवानी खाणारे, लांब शेंडी उघडे पोट दाखवत गावभर फिरणारे, पाले भाज्या कढी भात खाणारे, अशी विधाने ऐकायला मिळाली. सिनेमा नाटकातून ब्राम्हण असाच काहीसा दाखवला गेला, आजही दाखवला जातो. पण असले कोणतेच प्रकार माझ्यात नव्हते मग मला ब्राम्हण का व कोणी ठरवले? ह्याचा अर्थ मला समजवून सांगण्यात आला. माझा जन्म एका ब्राम्हणाच्या घरात झाला होता, आडनाव रानडे म्हणून मी ब्राम्हण ठरलो होतो. तो माझा दोष कसा होता? मला माझे डोके चांगल्या प्रकारे वापरता येते हा दोष का व कोणी ठरवला?

जसे वय वाढत गेले तसे जाती, पोटजाती, ब्राम्हणांचा द्वेष, धर्म व त्यातील फरक असे विविधं प्रश्न त्रास देत होते. त्या प्रश्नांच्या उत्तरांचा शोध आता सुरु झाला.

ह्या चित्रणात माझी मोठी बहिण सातवीच्या मुलांना "ध्वनी प्रदूषण" हा विषय समजण्या करता तीने केलेली कवीता वाचन करते आहे. मोठी बहिण २००४ ला हृदय विकाराने आम्हाला सोडून गेली. ही कवीता म्हणजे एक संस्काराचाच प्रकार आहे. तिच्याच शब्दात ऐकू या. दुवा - http://youtu.be/gcYfSHNVFm8

गुलमोहर: 

>>>असे म्हटले तर वावगे काय ते कळले नाही >>><<< कळणारच नाही, कारण मूळ पोस्ट मधे कुठेही , ते वावगे आहे असे दर्शविलेले नसून, उलट बाबासाहेबान्ना ज्या गोष्टीचे मुद्दामहून जातीचा उल्लेख करुन उदाहरण द्यावे लागले, ते दर्शविले आहे. की असा "बाबासाहेबान्च्या कडुन दिलेल्या उदाहरणाचा उल्लेख जरी केला" तरी ते आजकाल "वावगे" ठरावे? सामाजिक बहुसन्ख्यान्कान्च्या दृष्टीने? Wink
जोडीला, ब्राह्मणान्च्या बहुतेक चांगल्या गोष्टीन्चे अनुकरण करण्याचा अध्यार्‍हुत सल्ला, जो आजही त्यान्च्याच अनुयायान्कडुन पाळला जात नाही, ते दर्शविले. बाबासाहेबान्चे निरीक्षण योग्यच होते, त्यान्च्या अनुयायान्ना त्यातले काडीचेही कळले नाही. असो. पण तो या बीबी चा विषय नाही.

>>>> १) पुणासारख्या सुधारलेल्या शहरातही : म्हणजे मांसाहार, मदिरापान, वेश्यागमन यांचे समर्थन (इथे प्रत्यक्ष कृती केली की नाही ते कळायला मार्ग नाही) करणे हे सुधारलेपणाअचे लक्षण आहे असे चक्क लिंबूमहाराज म्हणत आहेत का? की चुकून बिघडलेल्या याजागी सुधारलेल्या असा शब्द पडला? <<< तुमचा मुद्दा बरोबर आहे. आजकालच्या सामाजिक प्रथेप्रमाणे, निरनिराळ्या उपहारगृहे/रेस्टॉरन्ट्स/बार्स यात जाऊन घरचे सोडून बाहेरचे खाणे म्हणजे एक प्रकारची सामाजिक सुधारणा व प्रतिष्ठित पणाचे लक्षण मानले जाते, अशा प्रकारे आधुनिकरित्या "सुधारलेल्या " पुण्यातील काही "मागास/प्रतिगामी वगैरे" बामण कुटुम्बे आजही, बाहेरचे खाणे त्याज्य मानतात. अन ही मण्डळी, पूर्वी चार आण्याची भान्ग वा दिडकीची पावशेर देशी झोकुन आलेल्यासही त्याच मापात मोजते व चकचकीत मॉल्स्/रेस्टॉरण्ट्स्/बार्स मधे जाऊन हजाराच्या हिशेबात दमडा खर्च करुन झोकुन व गिळून आलेल्या बामणासही त्या मापात मोजते.
पुणे सुधारलय, ते इतरान्करता, या अशा मागास/प्रतिगामी बामणान्करता बिघडलेलेच आहे.

>>>>> २) तो ब्राह्मण असला तरीही घरात रवेश दिला जात नाही :म्हणजे फक्त ब्राह्मणालाच घरात प्रवेश असतो का? <<< असा प्रश्न कसा काय निघू शकतो? निरर्थक प्रश्न. कोणत्याच परक्याला प्रवेश नसतो. त्यातुन "नातेवाईक" अन अर्थातच जातीतला असेल तर त्यास प्रवेश दिला तर जातो, पण त्याचे वर्तन तपासले जाते, व वर्तन बामणि पद्धतीने योग्य नसेल, तर दाराबाहेरच ठेवले जाते हे निश्चित.
आजवर माझ्या वा माझ्या माहितीतील अन्य ब्राह्मण घरात, ब्राह्मणेतरान्ना प्रवेश दिला नाहीये असे माझ्या पहाण्यात तरी नाही. तुमच्या असेल, तर माहित नाही.

>>>>> ३) ब्राह्मणेतराने मांसाहार, मदिरापान, वेश्यागमन या गोष्टी केल्यास त्या क्षम्य किंवा योग्य ठरतात का? <<<<<
हा प्रश्न देखिल स्वतः बाबासाहेबान्नी इतके सान्गुनसवरुनही, "सुशिक्षीत समजल्या जाणार्‍या" बहुसन्ख्य ब्राह्मणेतरांस २०११मधे देखिल का पडावा हाच मोठा प्रश्न आहे. Proud नेमके याबाबतीत मात्र "बिघडलेल्या" बामणान्चे अनुकरण करावे वाटते काय? Wink
तरीही,

ज्यास ब्राह्मण म्हणून "ब्रह्मकर्म" करीत जगायचे आहे, त्यास वरील तिनही गोष्टी वर्ज्यच आहेत.
इतरान्चे बाबतीत, मांसाहार व मदिरापान हे त्यान्च्या निसर्गदत्त जिवीतकार्याप्रमाणे आवश्यक पासून अनावश्यक इथवर विविधप्रकारे मानलेले आहे, जसे की ज्यास क्षत्रीय म्हणून जगायचे असेल, तर त्यांस नुस्ता मांसाहारच नव्हे तर "शिकार" (मृगया) करुन तो मांसाहार सान्गितला आहे. आजही बर्‍याच खेडेगावातून ही प्रथा पाळली जाते, व त्या मांसाहाराचा नैवेद्य बामणाकडूनच दाखविला जातो, जरी बामण स्वतः तो खात नसेल. पण हल्ली काये? वेन्कीज वा इतर चिकन प्रोडक्ट मुळे, कस्ली शिकार? कस्ला पुरुषार्थ अन कस्ले काय? डेली पैसा फेको, चिकनमटण लावो, ऐश करो, मग त्याचे दु;ष्परिणाम तब्येतीमधे दिसतात ते वेगळेच. पण तो आपला विषय नाही.
मदिराप्राशन, क्षणभर सोईकर्ता सोमप्राशन म्हणावे काय? :P, तर ते देखिल ज्याच्यात्याच्या अन्गिकृत कामाप्रमाणे आवश्यक ते अनावश्यक्/त्याज्य ठरविले जाते. विश्वास बसत नसेल, तर कोणत्याही शवागारात पोस्टमार्टेम करणार्‍यान्चे काम स्वतः अनुभवुन समजुन घ्या, नाहीतर कुठेही कचरा/मैला व्यवस्थापन क्षेत्रात काम करणार्‍यान्चे काम स्वतः अनुभवुन समजुन घ्या. मांसाहार/मदिराप्राशनाबाबतचि योग्य/अयोग्यतेची डोक्यातील सर्व जळमटे झटक्यासरशी साफ होतील.
वेश्यागमन हे सर्वान्नाच त्याज्य सान्गितलेले आहे. (तरीही, अन वादाकरता, वाघ्या-मुरळीच्या/कर्नाटक साईडच्या देवदासीच्या प्रथान्चे/कथान्चे उदाहरण देऊन यास प्रतिवाद करु नका, कारण, त्या प्रथा या कलन्क या सदरातच होत्या/आहेत)

पुणे म्हणजे ते जोशी अभ्यंकर खून खटलावाले का? हे जोशी अभ्यंकर घरात खायचे का बाहेर खायचे आणि शौचाला कुठे बसायचे? एवढे ब्राह्मणी संस्कार होऊनही हे असे कसे उपजले?

Happy

<<<तो ब्राह्मण असला तरीही घरात प्रवेश दिला जात नाही :म्हणजे फक्त ब्राह्मणालाच घरात प्रवेश असतो का? <<< असा प्रश्न कसा काय निघू शकतो? निरर्थक प्रश्न. कोणत्याच परक्याला प्रवेश नसतो. त्यातुन "नातेवाईक" अन अर्थातच जातीतला असेल तर त्यास प्रवेश दिला तर जातो, पण त्याचे वर्तन तपासले जाते, व वर्तन बामणि पद्धतीने योग्य नसेल, तर दाराबाहेरच ठेवले जाते हे निश्चित.
आजवर माझ्या वा माझ्या माहितीतील अन्य ब्राह्मण घरात, ब्राह्मणेतरान्ना प्रवेश दिला नाहीये असे माझ्या पहाण्यात तरी नाही. तुमच्या असेल, तर माहित नाही. >>>

पहिल्या व दुसर्‍या परिच्छेदात परस्परविरोधी विधाने आणि अर्थ आहेत. 'तो ब्राह्मण असला तरीही' या शब्दांतून ब्राह्मण असणे हे घरात प्रवेश करण्यासाठी लागणारे क्वालिफिकेशन आहे असे सूचित होत आहे.

<<इतरान्चे बाबतीत, मांसाहार व मदिरापान हे त्यान्च्या निसर्गदत्त जिवीतकार्याप्रमाणे आवश्यक पासून अनावश्यक असे मानलेले आहे, जसे की ज्यास क्षत्रीय म्हणून जगायचे असेल, तर त्यांस नुस्ता मांसाहरच नव्हे तर "शिकार" (मृगया) करुन तो मांसाहार सान्गितला आहे>> निसर्गदत्त जीवितकार्य म्हणजे काय? आपण २०११ सालाबद्दल बोलतोय असे आपणच सांगितले. ब्राह्मण व्यक्ती सैन्यात/पोलिसात भरती झाली म्हणजे क्षत्रियकार्य करू लागली असे समजावे का? अशा व्यक्त्तीने मांसाहार इत्यादी केलेले चालतील का?

ज्यास क्षत्रीय म्हणून जगायचे असेल, तर त्यांस नुस्ता मांसाहरच नव्हे तर "शिकार" (मृगया) करुन तो मांसाहार सान्गितला आहे.

हा नियम ब्राह्मणानीच केला असेल ना? आणि ब्राह्मण स्वतः तरी तो पाळतात का?

आनंद वाटला.. संस्कार म्हणजे कुठे हगणे, कुठे मुतणे, कुणी दारु प्यायची, किती संस्कृत पाठाम्तर करायचे.. इ इ ....

लिंबूमहाराज वरच्या पोस्टमधल्या निसर्गदत्त जीवितकार्य या शब्दांचा अर्थ स्पष्ट करा नाहीतर तुमच्या सोयीनुसार बदला Wink

निसर्गदत्त जीवितकार्य

या बमणांचं काही कलतच नाही. कधी वर्ण कर्मावरुन ठरतात असे साम्गतात.. कधी म्हणतात निसर्गदत्त.. म्हणजे जवळजवळ जन्मानुसार असाच अर्थ ना? Proud

>>>> निसर्गदत्त जीवितकार्य म्हणजे काय? आपण २०११ सालाबद्दल बोलतोय असे आपणच सांगितले. <<<<
निसर्गदत्त या शब्दाद्वारे मला "अन्गिकृत" वा कुन्डली/ग्रहयोगाद्वारे आपसूक हाती घेतलेले उपजिवीकेचे कर्म असे दर्शवायचे आहे. इथे यात जातीचा संबन्ध नाही.

>>>> ब्राह्मण व्यक्ती सैन्यात/पोलिसात भरती झाली म्हणजे क्षत्रियकार्य करू लागली असे समजावे का? अशा व्यक्त्तीने मांसाहार इत्यादी केलेले चालतील का? <<<<
नेमका प्रश्न विचारलात. पहिल्या प्रश्नाचे उत्तर "होय" असेच असले तरी जातीनिहाय कारणपरत्वे दुसर्‍या प्रश्नाचे उत्तर सपशेल नाही असे आहे. तसेच, पूर्विच्या क्षत्रीयाप्रमाणे, आजकालच्या सैन्य/पोलिसान्ना सदासर्वकाळ कमरेला तलवार लावुन व वेळ आल्यास केवळ बाहुबळावर तलवार चालवित, घोडे दौडवत रपेटा मारत जी व जशी युद्धे खेळायला लागली तशी लागतात का, अन नाही, तर तसा आहार खरेच आवश्यक आहे का हा एक वेगळाच प्रश्न विचारार्थ आहे. माझ्या पहाण्यातिल पोलिसदलातील अनेक मराठा उच्चपदस्थ पूर्णतः शाकाहारी आहेत, व ते व्यवस्थित काम करतात.
मात्र, तरीही, समाजातील विशिष्ट गटास, शत्रुद्वारा निर्माण केलेल्या विशिष्ट परिस्थितीला तोन्ड द्यायला आवश्यक असणारे कडवेपण/रसरशीतपणा/ताकद/तामसी-आक्रमकवृत्ती/व पुरेशी क्रुरता अन्गी बाणविण्यास नुस्ता मांसाहार नव्हे तर शिकारीसहित मांसाहार आवश्यक आहे.

ऐतिहासिक संदर्भानुसार, बाजीप्रभू देशपाण्डे वा मुरारबाजी ते गेल्या दोन शतकातील योद्धे, वासुदेव बळवन्तादिक, चाफेकरादीक वा अन्य कुणीही ब्राह्मण सरदार/शिपाई मांसाहार न करता देखिल बलिष्ठ/बलवान होते व त्यास कारण आहारविहाराचे त्यान्चे चोख नियम व भारतीय खन्डातील एकन्दरीत शाकाहारास पोषक हवामान/उपलब्धता. त्या ब्राह्मणान्ना गरज भासली नाही मांसाहाराची, तर आजकालच्या "खरेतर शेळपट" ब्राह्मणान्ना खुर्च्यागाद्यागिर्द्यान्वर बसुन कामे करत वर मांसाहार करुन कुठले पराक्रम करायला जायचे आहे?
तेव्हा खरे तर ब्राह्मण व्यक्तिने उपजिविकेचे/कर्तव्याचे मार्ग बदलले तरीही, आहारविहारविषयक बन्धने तोडण्याचे स्वातन्त्र्य तिला नाही.

तेव्हा खरे तर ब्राह्मण व्यक्तिने उपजिविकेचे/कर्तव्याचे मार्ग बदलले तरीही, आहारविहारविषयक बन्धने तोडण्याचे स्वातन्त्र्य तिला नाही.

म्हणजे वर्ण हे जन्मजात आहेत, असेच ना? मग उगीच गुण कर्माच्या भाकडकथा कशाला साम्गायचे?

आजकालच्या "खरेतर शेळपट" ब्राह्मणान्ना खुर्च्यागाद्यागिर्द्यान्वर बसुन कामे करत वर मांसाहार करुन कुठले पराक्रम करायला जायचे आहे?

मग जावा ना सैन्यात.. मरायला बहुजन आणि बहुजन बाहेर हगतात म्हणून लेख पाडायला बामण!

Proud

>>>> म्हणजे वर्ण हे जन्मजात आहेत, असेच ना? मग उगीच गुण कर्माच्या भाकडकथा कशाला साम्गायचे? <<<<<
अहो वर्ण हे जन्मासहित प्रत्यक्ष आयुष्यातील गुणकर्मावर आधारितच आहेत. पण बामणाने मांसमच्छी राहुदेच शेण जरी खाल्ले तरी आजच्या कायद्याच्या अन खास करुन रिझर्वेशनच्या जगात तो "बामण " म्हणूनच ओळखला जातो ना? अहो कायद्यानेच जात जन्मजात ठरविली आहे त्याला तुम्ही आम्ही काय करणार?? लिम्ब्याला अचकटविचकट प्रश्न विचारुन कायदा बदलणार आहे का? Wink
तुम्ही बसा तो घोळ घालत.

>>> मग जावा ना सैन्यात.. मरायला बहुजन आणि बहुजन बाहेर हगतात म्हणून लेख पाडायला बामण! <<<<
बघा बघा, आयडीतील अर्थप्रमाणेच बुडबुड्यसारखे फुटलात... बाहेर हगण्याच्या त्या उदाहरणातील बहुजन सैन्यात नव्हे तर शाळेत मुख्याध्यापक म्हणून नोकरी करीत होता हो! इतक्यातच विसरुन जाऊन सोईस्कर संदर्भ घेऊन टाळ्यापाडू वाक्ये मात्र भारी पेरता बर्का! बुडबुडेच बुडबुडे! Proud

वर तुम्ही ब्राह्मण अल्पसंख्यांक आहेत असे म्हटले आहे.
देशाच्या बाबतीत विचार करता धार्मिक अल्पसंख्य म्हणजे मुस्लिम मुख्य प्रवाहापासून फटकून राहतात अशी ओरड ऐकू येते.
हिंदू धर्माच्या बाबतीत ब्राह्मण अल्पसंख्यांक म्हणून मुख्य प्रवाहापासून फटकून राहतात असे समजावे का? रादर असे का समजू नये?

<<ब्राह्मण व्यक्ती सैन्यात/पोलिसात भरती झाली म्हणजे क्षत्रियकार्य करू लागली असे समजावे का? अशा व्यक्त्तीने मांसाहार इत्यादी केलेले चालतील का? <<<<
नेमका प्रश्न विचारलात. पहिल्या प्रश्नाचे उत्तर "होय" असेच असले तरी जातीनिहाय कारणपरत्वे दुसर्‍या प्रश्नाचे उत्तर सपशेल नाही असे आहे.>>

पहिल्या प्रश्नाचे उत्तर होय तर सैन्यात भरती झालेल्या ब्राहमण व्यक्तीस क्षत्रीय का समजू नये?

वर तुम्ही मैला गोळा करणारे, पोस्टमार्टेम करणारे इ.चा उल्लेख केला आहे. : ब्राहमण व्यक्तीने हे जीवितकार्य अंगिकारलेच तर त्यास मदिराप्राशन करणे मान्य आहे का?

मोहनप्यारेजी, धागा सतत वर ठेवयाला फक्त स्माईली टाकून आपण जो हातभार लावत आहात त्याबद्दल अनेक आभार....

धन्यवाद!

वाल्या कोळी | 5 December, 2011 - 17:07

पुणे म्हणजे ते जोशी अभ्यंकर खून खटलावाले का? हे जोशी अभ्यंकर घरात खायचे का बाहेर खायचे आणि शौचाला कुठे बसायचे? एवढे ब्राह्मणी संस्कार होऊनही हे असे कसे उपजले<<<

जोशी अन अभ्यंकरांचे खून झाले होते, अन करणारे जक्कल, सुतार, जगताप अन शाह असे ४ दिवटे होते. अभ्यास वाढवा.

Proud

एवढे ब्राह्मणी संस्कार होऊनही हे असे कसे उपजले

म्हणजे त्याना म्हनायचे असेल की स्वतःचे संरक्षणही ते करु शकले नाहीत, चांगले संस्कार असताना.... Proud

इथे प्रत्येकजण कोणत्याही वाक्यावर विरोध दर्शवतो... मग कधी ते मूळ लेखकाला विरोध करतात, कधी मूळ लेखकाला विरोध करनार्याचेही वाक्य खोडण्याची शक्यता नाकारता येत नाही. Proud

( तसेही ते बुडबुडा आहेत. बुडबुड्याचा काय भरवसा.. ? आता इथे, मग तिथे! ) Proud

>>बेफ़िकीर | 5 December, 2011 - 20:28 नवीन
जामोप्या व इब्लिस, बुडबुडा हे सदस्य या वादात कोणाच्या बाजूने आहेत हे सांगाल का मला, काही समजले नाही मला!
<<

बेफिकीरराव,
आम्चं ते थोडं दुहेरी निष्ठा झालंय.
शिवाय या बाफावरच ते विष्ठा प्रकरण जरा जास्तच उघड्यावर येऊन वास मारतंय.

आम्ही बाजू कुणाचीही घेत नाही. आम्ही घेतो फक्त सत्याची. Wink सत्त्या -आय मीन- सत्य असेल तिथे मी असं भगवंतांनीच सांगून ठेवलंय ना??

>>जागोमोहनप्यारे | 5 December, 2011 - 20:32

इथे प्रत्येकजण कोणत्याही वाक्यावर विरोध दर्शवतो... मग कधी ते मूळ लेखकाला विरोध करतात, कधी मूळ लेखकाला विरोध करनार्याचेही वाक्य खोडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
<<

यालाच पुरोगामी स-माज वादी असे म्हंतात. सगळेच नेते. कुणीही अनुयायी नाहीत. प्रत्येकाची विचार'सरणी' वेगळी अन स्वतंत्र!

असो. कुणी कुठे विष्ठा करावी अन त्याला संस्कार म्हणावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.

(जगातले समस्त लेवा पाटील किंवा सुशिक्षित हेडमास्तर ('इतर' जातींचे) आपली पोरे उघड्यावर मुद्दाम बसवतात असा काही विदा / सर्वेक्षण असेल तर बरे होईल.)

आहाहा,कित्ती तो सुंदर लेख. कित्ती त्या रम्य प्रतिक्रिया.
आजच्या जगात एखाद्याला त्याच्या जातीचा इतका पराकोटीचा अभिमान वाटू शकतो हे वाचूनच भरून आलं. सद्गदितच व्हायचं होतं पण ते नीट टंकता येईना.

आपण आपल्या मुलांवर पण असेच उच्च संस्कार करून निर्दोष तरूण ब्राह्मण पिढी तयार कराल याची खात्री वाटते.
धन्यवाद.

त्या देशपांड्यांना (बाजीप्रभू) ब्राह्मणांत आणि शाकाहारी लोकांत का टाकता?

>>>> हिंदू धर्माच्या बाबतीत ब्राह्मण अल्पसंख्यांक म्हणून मुख्य प्रवाहापासून फटकून राहतात असे समजावे का? रादर असे का समजू नये? <<<<<
नये समजू. रादर हे समजुन घ्यावे की ४८ चे निमित्त करुन, इतर समाज ब्राह्मण समाजापासून फटकुन राहू लागला. भले बाबासाहेबान्नि सान्गितले की त्यान्च्यातल्या चान्गल्या गोष्टीन्चे अनुकरण करा, तरीही ते बाजुला ठेऊन फटकुन राहिला. ब्राह्मण समाज मात्र जिथे पूर्वी होता, आजही तिथेच "हिन्दू" म्हणूनच आहे.
बाकी समाज कशाप्रकारे कोणकोणत्या "धारान्ना" वहावत गेला ते चर्चिण्याची ही जागा नव्हे, व त्यावर कायद्याच्या चौकटीत राहून भाष्य करण्याची माझी तितकी पात्रताही नाही, आवश्यकता/गरज नाहीच नाही.

>>>>> वर तुम्ही मैला गोळा करणारे, पोस्टमार्टेम करणारे इ.चा उल्लेख केला आहे. : ब्राहमण व्यक्तीने हे जीवितकार्य अंगिकारलेच तर त्यास मदिराप्राशन करणे मान्य आहे का? <<<<<
अपेक्षा अशी असेल की त्याने मदिराप्राशन न करताच ते कार्य करावे. तरीही जर त्यास शारिरीक/मानसिक मर्यादेमुळे प्रेतान्च्या दुर्गन्धी सहन करण्याचे न जमुन त्याने मदिराप्राशन करुन ते काम केले, तर ते मान्य असण्यानसण्याचा प्रश्न न उद्भवता, कायदेशीरपणे तो "ब्राह्मण" म्हणून गणला जात असला तरीही, "यजमानाकडून धार्मिक कृत्ये करुन घेणारा गुरुजी/भिक्षुक/पुरोहित" म्हणून काम करण्यास मात्र पात्र धरला जाणार नाही हे त्रिवार सत्य.

त्या देशपांड्यांना (बाजीप्रभू) ब्राह्मणांत आणि शाकाहारी लोकांत का टाकता?

मग ते कोण होते?

मदिराप्राशन करुन ते काम केले, तर ते मान्य असण्यानसण्याचा प्रश्न न उद्भवता,
----- मदिराप्राशना वर कठोर आक्षेप कशासाठी :अरेरे:... आपले देव सोमरसाचा अस्वाद घ्ययचे, श्री गजानन महाराज चिलीम ओढायचे.

एका ठराविक पातळी नंतर कुठल्याही गोष्टींचा अतिरेक चांगला नाहीच.

Pages