कारल्याचे काप

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 5 December, 2011 - 09:31
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ -२ कारली
मसाला
हळ्द
मिठ
लिंबाचा रस (ऑप्शनल)
तेल

क्रमवार पाककृती: 

कारली स्वच्छ धुवून घ्यावीत व त्याच्या गोल चकत्या कराव्यात. बी नाही काधले तरी चालते.

कारल्याच्या चकत्यांना हळद, मसाला, मिठ, लिंबूरस लावून घ्या.

तव्यात तेल गरम करून चकत्या मंद गॅसवर तळत ठेवा.

एक बाजू शिजली म्हणजे थोडी ब्राऊन झाली की पलटा आणि दुसरी बाजू कुरकुरीत करून घ्या. झटपट कारल्याचे कुरकुरीत काप तयार. (कुरकुर आवाज येत नाही कुरकुर्‍यांसारखा :हाहा:)

वाढणी/प्रमाण: 
प्रत्येकी ६-७ काप
अधिक टिपा: 

हे काप कुरकुरीत झाल्यामुळे कडू लागत नाहीत.
वरणभाताबरोबर छान तोंडीलावणे होते.
तुम्ही ह्याला रवा, बेसन लावूनही तळू शकता पण त्याच्याशिवायही ही चांगले लाग्तात.
काही जण ह्यावर धणे-जिरा पावडरही पेरतात.

माहितीचा स्रोत: 
मैत्रीण
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एकदम कुरकुरीत दिसते आहे भाजी!
साध्या वरण भाताबरोबर मस्त लागते .मी चिंच खजुराची चटणी टाकते..
फोटो मस्त आलेत !

वाढणी/प्रमाण:
प्रत्येकी ६-७ काप

बास?? निषेध!
ते फोटूत दाखवलेत तितके तर मी एकटा खातो :ड

(आता भरली कारली पण टाका)

जागुतै, लिंबाच्या रसाविना बहुधा कडू लागत असावेत.

बाकी एकदम कुरकुरीत झाले आहेत हे फोटूतले काप. Happy

दिप्ति, जागोमोहन, नलिनी
इब्लिस मग मला प्रमाण प्रत्येकी एक डिश असे करावे लागेल :स्मित:ड
डॉ. नाही बिना लिंबानेही चांगलेच लागतात. वहिनींना सांगा एकदा करायला.
स्नेहा काय योगायोग ग मी चार दिवस आधीच केली पण आज टाकली.
नीलू, सुके बोंबील Lol

हे shallow fry करून पण छान लागतात. आणि तसं fry करताना त्यात थोड्याश्या लसणीच्या पाकळ्या घालायच्या. मस्त चव येते.

छान.
फक्त, आमच्या घरीं कारल्याचीं कापं उभी [ वरीलप्रमाणे गोल चकत्या न काढतां] काढतात; तितकंच दिसण्यात तरी माशांच्या कापांशी साम्य ! Wink

जागू मस्तच, वांग्याचे कारल्याचे दोन्ही काप एकदम छान लगेच करायची इच्छा झाली. घरात कारल सगळ्यांना प्रचंड आवडत. आता शनिवारी दुकानात ताजी कारली मिळालीतर लगेच आणते Happy
रचक्याने मी कारल्याचा कोणताही पदार्थ करताना कारल्याच्या बिया काढते वरील फोटोत त्या दिसतायत बियासकट कारल केल तर खूप कडू लागत नाही का? ( अर्थात त्याचा पुर्ण कडवट पणा गेलातर त्यात मजा नाही)

मी पण असेच करते. फक्त काप करुन त्याला तिखट, मीठ, हळद, लिंबू लावून १ दिवस जरा उन्हात ठेवून देते, अर्थात तेवढे उन असले पाहिजे. माझ्या ऑफीस मधील एक कलीग करते असे.
पुढे सेम, तेलात परतायचे. तेल सुद्धा कमी पुरते.

आम्ही कारल्याचे पातळ उभे तुकडे करुन असे करतो अगदी सुक्या बोंबलासारखे लागते >> नीलु मी पण असे करते Happy आणि जागुसारखेही करते, फक्त बिया काढते, नी मस्त कुरकुरीत करुन मग एकावर एक बोटात घालुन घालुन रिंगा रिंगा करते ... Happy

छान आहेत काप जागू. Happy मी कढईत असे काप करते बिया काढून (शिवाय पारंपारिक पध्द्तीनुसार मीठ लावून थोडा वेळ नुसतेच ठेवते अन ३ दा खळख़ळून धुवून/पिळून घेते. कडूपणा थोडाच राहू देते) तुझ्या पध्दतीतल्या कडू नाही का लागत?

माझी आई असे काप करते. पण आधी ते काप उन्हात वाळवते. छान लागतात. चकत्या कापण्याऐवजी अर्धचंद्राकार कापले तरीही चालतात. वरण भाताबरोबर तर छानच कॉम्बी होते.

साक्षीमी Happy
अग हाताच्या बोटापेक्षा कान तोंडाच्या जवळ असतात Lol

साक्षी धन्यवाद.

अग पण कितीही जवळ असला तरीही कान (स्वतःचा Wink ) तोंडात जात नाही ना? Lol उगाच स्वत:भोवती प्रदक्षिणा घालाव्या लागतील मांजरासारख्या.. Proud

Pages