कारल्याचे काप

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 5 December, 2011 - 09:31
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ -२ कारली
मसाला
हळ्द
मिठ
लिंबाचा रस (ऑप्शनल)
तेल

क्रमवार पाककृती: 

कारली स्वच्छ धुवून घ्यावीत व त्याच्या गोल चकत्या कराव्यात. बी नाही काधले तरी चालते.

कारल्याच्या चकत्यांना हळद, मसाला, मिठ, लिंबूरस लावून घ्या.

तव्यात तेल गरम करून चकत्या मंद गॅसवर तळत ठेवा.

एक बाजू शिजली म्हणजे थोडी ब्राऊन झाली की पलटा आणि दुसरी बाजू कुरकुरीत करून घ्या. झटपट कारल्याचे कुरकुरीत काप तयार. (कुरकुर आवाज येत नाही कुरकुर्‍यांसारखा :हाहा:)

वाढणी/प्रमाण: 
प्रत्येकी ६-७ काप
अधिक टिपा: 

हे काप कुरकुरीत झाल्यामुळे कडू लागत नाहीत.
वरणभाताबरोबर छान तोंडीलावणे होते.
तुम्ही ह्याला रवा, बेसन लावूनही तळू शकता पण त्याच्याशिवायही ही चांगले लाग्तात.
काही जण ह्यावर धणे-जिरा पावडरही पेरतात.

माहितीचा स्रोत: 
मैत्रीण
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Pages