हिंदि सिनेमाचे नाव इतर भाषात का नसते

Submitted by पुरोगामी on 21 November, 2011 - 04:55

नुकताच एक हिंदि सिनेमा पाहिला. सुरवातीला सिनेमाचे नाव हिंदित दिसले. नंतर ते इंग्रजीत दिसले व नंतर ते उर्दुत दाखवले. पण मराठी, कानडि, गुजराति, तेलगु अशा इतर कोणत्याहि भाषेत नाव दाखवले नाही. जर सिनेमाचे नाव ३ भाषात दाखवितात, तर ते इतर राज्यांच्या भाषेत दाखवायला पाहिजे. हा इतर भाषांवर अन्याय आहे. एकतर फक्त हिंदित दाखवा किंवा सर्व १४ भाषात दाखवा. १४ पैकी फक्त ३ भाषात नाव दाखविणे अयोग्य आहे. तुम्हाला काय वाटते याबद्दल?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काल एका पेप्रात वाचले कि युपीमधे एका पोलिस चौकित उर्दुत एफआयआर दाखल केला म्हणुन जज्जनी कोर्टात पोलिसांना झापले.न्यायाधिश म्हणाले की त्यांना उर्दुतले बरेचसे शब्द समजले नाहित,म्हणुन एफआयआर इंग्लिश किंवा हिंदित लिहायला पाहिजे होता.

पिक्चरचे टायटल इथपासून यु पी तला एफ आय आर इथे धागा नेल्याबद्दल अभिनंदन.. पण आता कुणी इथे येणार नाही.

मी एक काडी टाकून निघून जातोय.

एकतालाचा जोरकस ठेका (पुढे त्रिताल) दरबारी कानडाची सुरावट, अभिजात कथ्थक नृत्य...

http://www.youtube.com/watch?v=s30geA0gWxs

पण कलाकार मात्र दुष्मन देशातले ..

हॅ दिनेश ही काडी आधीपण झालेली आहे.
नुसरत फतेह अली खान, गुलाम अली, दिलिपकुमार, अबिदा परवीन, फरिदा खानुम अश्या स्टेशनातून जात जात अचानक वहिदा रेहमान, अमजद अली खान, बिस्मिल्ला खान अश्या भारतीय मुस्लिम कलाकारांवरून मग हुसेनवर घसरली. आणि मग ज्यांना कुणाला पैसाभर जरी आदर असेल हुसेनबद्दल ते सगळे ................................. असा निर्णय झाला. आठवत नाही?

कायदा करून हिंदी सिनेमाचे नाव उर्दूत असण्याला प्रतिबंध करावा. सुरूवातीची पाच मिनिटे २६ भाषा आणि बोलीभाषेत सिनेमाचे नाव असावे.
भोजपुरीत सिनेमाचे नाव बदलून द्यायची प्रथा आहे. त्याचीही दखल घ्यावी.

मिया अनारी बा
बीवी खिलारी बा

किंवा
जीन्स वाला भौजी

सूचना १
चित्रपटाला नाव देऊच नये.
नंबर द्यावा.
आणि तो ईंग्रजी भाषेत द्यावा. त्याशिवाय आंतरराष्ट्रीय दर्जाचे चित्रपट बनणार नाहीत.

सूचना २
चित्रपटातील कलाकारांच्या नावाची फक्त आद्याक्षरे द्यावीत.
पुर्ण नाव देऊ नये. त्याने जात धर्म कळतो.
पुन्हा कुठल्या युसुफ खानला आपले नाव दिलीपकुमार करायची वेळ आली नाही पाहिजे.

बाकी जुन्या हिंदी चित्रपटातले उर्दू संवाद, गाणी वगैरे कानाला गोड वाटायची. ती परत आणा पाहू. मग टायटल हिब्रूतून दिलंत तरी चालेल.
नीधप म्हणतात तसं पूर्वी उत्तर प्रांतात फारसी लिपी शिक्षणासाठी वापरली जायची. राज कपूरच्या संगम चित्रपटात काहीतरी उल्लेख आहे की वैजयंतीमाला ने लिहीलेलं पत्र तो वाचू शकत नाही कारण त्याला हिंदी वाचता येत नाही, उर्दू येतं.

भरपूर राज्यांची आहे

Urdu is also one of the officially recognised languages in India and one of the five official languages of Jammu and Kashmir, one of the two official languages of Telangana and also has the status of "additional official language" in the Indian states of Uttar Pradesh, Bihar, Jharkhand, West Bengal and the national capital, New Delhi.[117][118] In the former Jammu and Kashmir state, section 145 of the Kashmir Constitution stated: "The official language of the State shall be Urdu but the English language shall unless the Legislature by law otherwise provides, continue to be used for all the official purposes of the State for which it was being used immediately before the commencement of the Constitution."

इतर भाषिकांनी बहिष्कार टाकावा.(ज्यांची मागणी आहे की आपल्या भाषेत नाव पाहिजे).
नाहीतरी आता हिंदी सिनेमांचा दर्जा फारच खालावला आहे.
मोजकेच चित्रपट चांगले असतात.

ऑफिशिअल भाषा म्हण्जे काय ? महाराष्ट्रात पण दुसरी राजभाषा उर्दू करा असं म्हणताहेत ...हिंदी नको पण उर्दू हवी Happy Happy

जम्मू आणि काश्मिर - मधे उगाचच उर्दू पूर्वी राजभाषा होती, तिथे उर्दू भाषिक बहुसंख्येत नाहीत - डोगरा आणी गुर्जर आहेत; त्यामुळे उर्दू का होती राजभाषा?
युपी / तेलंगण / दिल्ली आणि काही प्रमाणात महाराष्ट्र ( सोलापूर भाग निजामशाहीत होता म्हणून) बद्दल समजू शकत पण काश्मिर , बंगाल ??

Sanskrit is one of the 22 official languages in India. In 2010, Uttarakhand became the first state in India to have Sanskrit as its second official language. In 2019, Himachal Pradesh became the second state to have Sanskrit as the second official language.

National Commission for Scheduled Tribes Chairman Nand Kumar Sai Thursday demanded that the government make Sanskrit the official language, as many Indian languages originate from it.

चित्रपटांमध्ये नावे लिहायचीच नाहीत, भाषेचा वादच नको.
सरळ उच्चारून दाखवायची, अमीन सयानी, अमिताभ बच्चन आणि माधुरी दीक्षित, रेखाच्या आवाजात.

"सरळ उच्चारून दाखवायची" - बावर्ची मधे हृषिकेश मुकर्जी ने तो प्रयोग केलाय. टायटल्स अमिताभ च्या आवाजात 'सांगितली' आहेत. अर्थात त्यावेळी अमिताभ, 'अमिताभ' झालेला नव्हता.

जगात कर्णबधीर व्यक्तीही सिनेमा बघतात. टायटल्स द्यायचीच नाहीत हे कसे चालेल? आणि चार नटांच्यापालिकडेही असते श्रेयनामावली.

चित्रपटगृहामध्ये कर्णबधिर चित्रपट बघायला गेले तर सबटायटल्स नसतात ना. कर्णबाधिरांंसाठी खास शो, ज्यात त्यांना हव्या त्या भाषेत टायटल्स आणि सबटायटल्स निवडता येतील अशी सोय असावी. हा वेगळा विषय आहे तसा.

टायटल्स द्यायचीच नाहीत हे कसे चालेल? आणि चार नटांच्यापालिकडेही असते श्रेयनामावली.
>>
यानिमित्ताने, अनेक वर्षे मनात असलेला प्रश्न विचारतो.
त्याआधी हे स्पष्ट करतो की कलाकाराल त्याचे मानधन + श्रेय मिळायला हवे व नोकरी/काम करणा-यांना त्याचा योग्य मोबदला, कंपनी/संस्थेतर्फे अंतर्गत कामाची/कष्टाची पावती व आदराची वागणुक मिळाली पाहिजे.

पण, हे असे एवढे प्रत्येकाचे नाव सांगणे, दृश्य चित्रपट माध्यम सोडता, इतर कोणत्या "उत्पादनात" का नसते?
म्हणजे कोणत्या कंपनीने बनवले, किंवा कोण मुख्य लेखक, गायक, अभिनेता/अभिनेत्री आहे त्या कलाकॄतीमागे ते सांगणे समजु शकतो.

पण त्याव्यतिरिक्तचे इतर हजार नावे कशाला? ती ईतर हजार मंडळी केवळ त्यांना नेमुन दिलेले व योग्य मोबदला दिलेले काम करत आहेत. जसे हॉटेलात एखादा पदार्थ फारच आवडला तर आपण आचा-याचे नाव विचारुन किंवा त्याला समक्ष बोलावुन ते सांगतो, कौतुक करतो व त्याला श्रेय देतो, तसेच ईथेही का नाही? हॉटेल मधे कुठे सर्व आचारी व मदतनीस यांचे नाव असते मेन्युमधे?

तेच इतर सर्व क्षेत्रातील उत्पादनांना लागु आहे. चित्रपटालाच वेगळा न्याय का? यामागे काही ईतिहास आहे का?

इतर सर्व उत्पादनांमधे फक्त त्या कंपनीचे नाव किंवा काही क्षेत्रांमधे फक्त मुख्य कलाकाराचे/रचनाकराचे/निर्मितीकाराचे/संकल्पकाचे नाव असते.
कुणालाही दुखावण्याचा हेतु नाही. केवळ उत्सुकता म्हणुन विचारले आहे.

बाकीचे लोक श्रेय देत नाहीत हा श्रेय देणाऱ्या क्षेत्राचा दोष असू शकत नाही. बाकीच्या उत्पादकांना ते श्रेय का देत नाहीत हा प्रश्न विचारणे जास्त योग्य होईल. असो.

कुठे देत नाहीत श्रेय ? नाटकात देतात. कादंबरी पुस्तकात पण जेव्हढ्यांचे योगदान आहे त्या सर्वांचे नाव येते.
इथे कला आणि कारागिरीसाठी श्रेय देतात.
उत्पादने तुम्ही बघायला किंवा मनोरंजन करून घ्यायला जाता का ? त्यात कुठली कला असते का ?

बाकीचे लोक श्रेय देत नाहीत हा श्रेय देणाऱ्या क्षेत्राचा दोष असू शकत नाही. बाकीच्या उत्पादकांना ते श्रेय का देत नाहीत हा प्रश्न विचारणे जास्त योग्य होईल. असो.
Submitted by नीधप on 7 January, 2021 - 21:14
>>
वरवर बघितले तर हा युक्तिवाद न्यायाला धरुन व फार पुरोगामी वाटेल.
पण मुळातच, "मूळ कला निर्मितीपेक्षा वगेळे असलेले - पुरक" काम - जे एक निव्वळ काम आहे , कलाकृती नाही व ज्याचा पूर्ण मोबदला मिळाला आहे व संस्थेअंतर्गत शाबासकी मिळाली आहे - अशा कामाची आणखी त्रयस्थ जनतेसमोर श्रेय घेण्याची गरज का भासावी?
भुकेले असताना मी हॉटेलात ऑर्डर दिल्यावर जर ऑर्डर येईपर्यंत मला हॉटेलात काम करणा-या ५० जणांची नावे ऐकावी लागणार असतील तर कसे वाटले? ती सर्व नावे, त्यांच्या योगदानासहीत मला लक्षात राहतील का?
रेल्वे तिकीट बुक करताना, नावे ऐकत बसलो तर वेटींग लिस्ट मधे नाही का जाणार ?
नगरपालिकेचे कर्मचारी साफसफाई करायला आले असता, आधी प्रधानमंत्र्यांपासुन साखळीतले सर्व हजार नावे ऐकावी लागतील का?

Pages