Submitted by पुरोगामी on 21 November, 2011 - 04:55
नुकताच एक हिंदि सिनेमा पाहिला. सुरवातीला सिनेमाचे नाव हिंदित दिसले. नंतर ते इंग्रजीत दिसले व नंतर ते उर्दुत दाखवले. पण मराठी, कानडि, गुजराति, तेलगु अशा इतर कोणत्याहि भाषेत नाव दाखवले नाही. जर सिनेमाचे नाव ३ भाषात दाखवितात, तर ते इतर राज्यांच्या भाषेत दाखवायला पाहिजे. हा इतर भाषांवर अन्याय आहे. एकतर फक्त हिंदित दाखवा किंवा सर्व १४ भाषात दाखवा. १४ पैकी फक्त ३ भाषात नाव दाखविणे अयोग्य आहे. तुम्हाला काय वाटते याबद्दल?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
त्यात कुठली कला असते का ?
त्यात कुठली कला असते का ?
>>
इंजिनियरिंग, इंडस्ट्रीयल कन्झ्युमर प्रॉडक्ट डिझाईन, सॉफ्तवेअर डेवलपमेंट हे सगळे एक प्रकारचे कलाकृतीच आहेत.
बाकीच्या उत्पादकांना ते श्रेय
बाकीच्या उत्पादकांना ते श्रेय का देत नाहीत हा प्रश्न विचारणे जास्त योग्य होईल. असो.
Submitted by नीधप on 7 January, 2021 - 21:14
आणि
उत्पादने तुम्ही बघायला किंवा मनोरंजन करून घ्यायला जाता का ? त्यात कुठली कला असते का ?
Submitted by रानभुली on 7 January, 2021 - 21:21
हे
फारच परस्परविरोधी आहे.
डोळ्यांनी अनुभवायची असते व मनोरंजन करते तीच फक्त कलाकृती असते हा फार मोठा विनोद व जगाबद्दल असलेले अज्ञान आहे.
बावर्ची Introhttps://youtu.be
बावर्ची Intro
https://youtu.be/mkUGA1Eeh9c
भारतिय संगीत ज्याला
भारतिय संगीत ज्याला हिंदुस्थानी संगीत असं म्हटलं जातं मुस्लिमांची देणगी आहे. कित्येक वाद्यं, राग वगैरे मुस्लिमांनीच भारतात आणले. या कला मुस्लिमांकडेच वर्षानुवर्षे होत्या.. ज्याला घराणी असं म्हटलं जातं. आजही पं भीमसेन जोशी, दीनानाथ मंगेशकर किंवा कुठल्याही दिग्गज कलाकाराचे गुरू पाहीलं तर कुठलेतरी खांसाहेब असल्याचं दिसून येईल..
>>>>>>>
आपण आज ज्याला "हिन्दुस्तानी शास्त्रीय सन्गीत" म्हणुन ओळ्खतो त्याचा उगम भारतातीलच आहे. देवगिरीच्या राजवाड्यात (अल्लाउद्दीन खिल्जी जिन्कल्यानन्तर) सहा दिवस सिन्हासना खाली लपुन अमिर खुस्रोने गोपाल नायका चे गाणे ऐकले व नन्तर त्याने त्यात थोडी मोड्तोड करुन गावुन दाखविले हेच पुढे जावुन "हिन्दुस्तानी शास्त्रीय सन्गीत" झले. अर्थात खुस्रो ने वेगवेगळ्या वीणे चे सुसुत्रीकरण करुन "सतार" बनवली.
कुरुन्दकरान्चे ह्या वरचे विवेचन खुप सुन्दर आहे.
https://en.wikipedia.org/wiki/Indian_classical_music
http://hindustaniclassicalmusic.in/article1.php?sub_type_id=159
http://qawwal.blogspot.com/2010/05/gopal-nayak-and-amir-khusrau.html
See also: Bharat Muni's Natyashastra: https://en.wikipedia.org/wiki/Natya_Shastra
He wrote:
तत्र स्वराः –
षड्जश्च ऋषभश्चैव गान्धारो मध्यमस्तथा ।
पञ्चमो धैवतश्चैव सप्तमोऽथ निषादवान् ॥ २१॥
— Natya Shastra, 28.21
तुमचे एकदम बरोबर आहे. तुम्ही
तुमचे एकदम बरोबर आहे. तुम्ही कुणाचेही नाव न लिहिता सिनेमा काढा. माझी काहीही हरकत नाही.
(No subject)
सिनेमात नावे द्यावीत
सिनेमात नावे द्यावीत
पण फुडारी लोक दगड बसवून त्यावर अमक्याच्या निधीतून वगैरे लिहितात , ते पटत नाही
पण फुडारी लोक दगड बसवून
पण फुडारी लोक दगड बसवून त्यावर अमक्याच्या निधीतून वगैरे लिहितात , ते पटत नाही
नवीन Submitted by BLACKCAT on 7 January, 2021 - 21:50
+१११११
"माझ्या" निधीतुन पत्रे बसवले, रंगकाम केले, दिशादर्शक फलक बसवले - जसे काही "याच्या" खाजगी मालमत्तेतुनच दिले पैसे.
पैसे जनतेचे, जागा सर्वजनीक, काम संबंधीत सरकारी विभागाचे आणि "याचे" काय?
कला आणि दगड फोडणे एकच हे
कला आणि दगड फोडणे एकच हे माहीत नव्हतं.
सरकारला सांगून टेक्नॉलॉजी आणा की. म्हणजे चालला दगडफोड्या की हवेत नाव दिसणार. चित्रपटात दिसतं तसं.
मॉलमधे कॉर्न फ्लेक्सच्या पुड्याला हात लावला की शेतकरी, त्याच्याकडून विकत घेणारा, मग कंपनीत गोडाऊन मधे ठेवणारा, कणीस उफणणारा अशी सगळ्यांची नावे आपोआप तरंगली पाहीजेत.
शुभेच्छा !
अभिनय, संगीत, नृत्य या
अभिनय, संगीत, नृत्य या कलांमध्ये ग्लॅमर आहे. लोक त्यात नाव कमावण्यासाठीच जातात, आपलं नाव येण्यास धडपडतात. त्यामुळे तिथे अशी सगळ्यांची नावे दिसतात. बऱ्याच प्रेक्षकांनाही दिग्दर्शक कोण, संवाद कुणी लिहिले, संगीत कोणी दिलं, पार्श्वगायक कोण, कोरिओग्राफी कुणाची, नृत्य कोणी बसवली वगैरे इंटरेस्ट असतो.
आता रेस्टॉरंट्स मध्ये जाऊन लोक ऑर्डर करतेवेळी मुख्य शेफ कोण? ही डिश बनवणारा सह कलाकार कोण, सर्व्ह करणारा वेटर कोण?, भाज्या आणणारा कोण वगैरे इंटरेस्ट घेऊन विचारू लागले तर मेन्यूमध्ये हे सगळं लिहितील, ज्यांना इंटरेस्ट आहे ते वाचतीलही.
कला आणि दगड फोडणे एकच हे
कला आणि दगड फोडणे एकच हे माहीत नव्हतं.
नवीन Submitted by रानभुली on 7 January, 2021 - 22:02
>>
योग्य पद्धतीने दगड फोडुनच पाटा वरवंटा सारखे उपयुक्त अवजार बनवले जातात व अध्यात्मिक शांती देणारी प्राचीन मंदीरं बांधली जातात व देवाच्या मुर्ती घडवल्या जातात . ही कलाच आहे.
बऱ्याच प्रेक्षकांनाही दिग्दर्शक कोण, संवाद कुणी लिहिले, संगीत कोणी दिलं, पार्श्वगायक कोण, कोरिओग्राफी कुणाची, नृत्य कोणी बसवली वगैरे इंटरेस्ट असतो.
नवीन Submitted by मानव पृथ्वीकर on 7 January, 2021 - 22:06
>>
पण या "मुख्य" - "कलाकारांची" नावे नमुद करण्याला विरोध नाहीच केलेला. प्रश्न त्या "ईतर" "काम" करणा-यांबद्दल होता.
>>> कला आणि दगड फोडणे एकच हे
>>> कला आणि दगड फोडणे एकच हे माहीत नव्हतं.
६४ कला मानल्या जातात भारतीय संस्कृतीत , जाहिरात करणं ही ६५ वी.
दगड फोडणे/ शिल्पकाम ही एक महत्वाची कला आहे
हा धागा कुठूनही कसाही जाऊ
हा धागा कुठूनही कसाही जाऊ शकतो एव्हढी जादू आहे त्यात.
हा धागा कुठूनही कसाही जाऊ
हा धागा कुठूनही कसाही जाऊ शकतो एव्हढी जादू आहे त्यात.

नवीन Submitted by रानभुली on 7 January, 2021 - 22:31
>>
ही वाचकांची एक कलाच आहे! आता त्याचे श्रेय द्या बघु मला!
ज्या गोष्टींबद्दल 'ही पण एक
ज्या गोष्टींबद्दल 'ही पण एक कलाच आहे' असं बोललं जातं, त्या गोष्टी काही १००% कला नाहीत. चित्रपट ही पण कलाच आहे असं कधी सांगावं लागत नाही.
तुमचे कलेबद्दलचे अज्ञान, हे
तुमचे कलेबद्दलचे अज्ञान, हे ती गोष्ट कला नाही हे सिद्ध करण्याचे प्रमाण होउ शकत नाही.
सिद्ध काय करायचंय त्यात? हा
सिद्ध काय करायचंय त्यात? हा काही सिद्धांत नाहीये.
सिनेमाचे टायटल्स १४ भाषांत
सिनेमाचे टायटल्स १४ भाषांत असावे आणि गृहपाठाच्या वहीवर मुलांनी १४ भाषांत नाव लिहावे या दोन्ही मागण्यांमध्ये फरक हाच, कि दुसरी मागणी वेडगळ आहे हे लगेच समजते.
कॉमी
कॉमी
जर सिनेमाचे नाव ३ भाषात
जर सिनेमाचे नाव ३ भाषात दाखवितात, तर ते इतर राज्यांच्या भाषेत दाखवायला पाहिजे. हा इतर भाषांवर अन्याय आहे. एकतर फक्त हिंदित दाखवा किंवा सर्व १४ भाषात दाखवा. १४ पैकी फक्त ३ भाषात नाव दाखविणे अयोग्य आहे.
>>
सिनेमाचे टायटल्स १४ भाषांत असावे आणि गृहपाठाच्या वहीवर मुलांनी १४ भाषांत नाव लिहावे या दोन्ही मागण्यांमध्ये फरक हाच, कि दुसरी मागणी वेडगळ आहे हे लगेच समजते. Happy
Submitted by कॉमी on 8 January, 2021 - 10:53
>>
मी हिंदी चित्रपट बघत नाही. त्यामुळे धाग्याच्या विषयावर बोलु शकत नाही, पण कॉमी, ते मूळ लेखातील, जर-तर तुम्ही मुद्दाम दुर्लक्ष केले की तुमची मराठी वाचनाची समज कमी आहे?
हिंदीत आणि मराठीत वेगवेगळे
हिंदीत आणि मराठीत वेगवेगळे नाव कसे दाखवतात ?
तुम्हाला भाषांतर म्हणायचेय का ?
हिंदीत आणि मराठीत वेगवेगळे
हिंदीत आणि मराठीत वेगवेगळे नाव कसे दाखवतात ?
>>
दात काढुन झाले असतील तर स्टेट बैंकेच्या कोणत्याही शाखेत जाऊन बघा लगेच कळेल.
मी आताच टी ब्रेक मध्ये
मी आताच टी ब्रेक मध्ये माझ्या ऑफिसमधल्या सगळ्या तेलुगू लोकांना विचारले " तुम्ही हिंदी पिक्चर बघता, त्यात चित्रपट सुरू झाला की नाव हिंदी, इंग्लिश, आणि उर्दूतच दाखवतात तेलुगूत नाही. तुम्हाला हा अन्याय नाही वाटत का?"
तर माझ्याकडे विचित्र नजरेने बघायला लागले. एकजण म्हणाला की आम्ही चित्रपट बघायला जायच्या आधीच आम्हाला त्याचं नाव माहीत असतं. थिएटरच्या बाहेर, पेपर मध्ये ते तेलुगुत लिहिलं असतं. नाव बघुन, चित्रपट कसा आहे याचा अंदाज घेऊन मगच तिकीट काढतो आम्ही. थिएटरमध्ये तिकीट काढुन जाऊन, बसून मग कोणता चित्रपट बघायला आलो बरं आपण हे स्क्रीनवर वाचून बघण्याइतके दूधखुळे वाटलो काय तुम्हाला?
बाकीच्यांनीही त्याला सहमती दर्शवली.
थिएटरमध्ये तिकीट काढुन जाऊन,
थिएटरमध्ये तिकीट काढुन जाऊन, बसून मग कोणता चित्रपट बघायला आलो बरं आपण हे स्क्रीनवर वाचून बघण्याइतके दूधखुळे वाटलो काय तुम्हाला?
>>
अनेक वेळेला, थियेटरमधे आत गेल्यावर काही कारणास्तव चुकुन दुस-याच स्क्रिनमधे तर आलो नाही ना हे पडताळण्यासाठी, मला अनेकदा "हा कोणता पिक्चर आहे?" अशा अर्थाचे विचारले गेले आहे. त्यामुळे ही शक्यता अगदीच अशक्य नाही. एकदा तर मीच तेलुगु/तामीळ चित्रपट थेटरला बघत असताना, तेलुगु/तामीळ भाषिक शेजा-यानेच मला विचारले की हा कोणता पिक्चर आहे म्हणुन.
चिडू नका. अभिनव हे नाव हिंदी
चिडू नका. अभिनव हे नाव हिंदी आणि मराठीत वेगवेगळे लिहून दाखवाल का प्लीज ?
माझं अज्ञान दूर होईल.
अभिनव हे नाव हिंदी आणि मराठीत
अभिनव हे नाव हिंदी आणि मराठीत वेगवेगळे लिहून दाखवाल का प्लीज ?
माझं अज्ञान दूर होईल.
नवीन Submitted by रानभुली on 8 January, 2021 - 11:35
>>
स्टेट बैक व ळ लिहुन दाखवले ते पुरेसे नाही का?
संस्कृतमधुन जशाच्या तसे आलेले/घेतलेले शब्द/नाव वेगळे कसे असतील?
बैक असं लिहीणं चुकीचं आहे.
बैक असं लिहीणं चुकीचं आहे. मूळ शब्द बँक आहे. मराठीत इंग्रजी शब्द जसाच्या तसा लिहीतात. अभिनव मूळचा इंग्रजी शब्द असेल तर मला माहीत नाही.
बैक असं लिहीणं चुकीचं आहे.
बैक असं लिहीणं चुकीचं आहे.
नवीन Submitted by रानभुली on 8 January, 2021 - 11:43
>>
मग हे मला का सांगताय? आम्ही बँकच लिहितो. हिंदी भाषिकांना सांगा.
संस्कृतमधुन जशाच्या तसे आलेले
संस्कृतमधुन जशाच्या तसे आलेले शब्द/नाव वेगळे कसे असतील? >>> बघा आता तुम्हीच. मला मेलीला काय कळतं यातलं ?
संस्कृतमधुन जशाच्या तसे आलेले
संस्कृतमधुन जशाच्या तसे आलेले शब्द/नाव वेगळे कसे असतील? >>> बघा आता तुम्हीच. मला मेलीला काय कळतं यातलं ?

नवीन Submitted by रानभुली on 8 January, 2021 - 11:45
मराठीत इंग्रजी शब्द जसाच्या तसा लिहीतात. अभिनव मूळचा इंग्रजी शब्द असेल तर मला माहीत नाही.
Submitted by रानभुली on 8 January, 2021 - 11:43
Pages