या आधीची उत्तर कर्नाटक भटकंती:
२. उत्तर कर्नाटक (१) — बेळगाव आणि परीसर
३. उत्तर कर्नाटक (२) — सौंदत्ती (यल्लमा देवी आणि हुळी मंदिर )
४. उत्तर कर्नाटक (३) — पारसगड (सौंदत्ती किल्ला)
५. उत्तर कर्नाटक (४) — नृसिंह-वराह मंदिर (हलशी)
७. उत्तर कर्नाटक (६) — कित्तुर (कित्तुर किल्ला आणि कमल नारायण मंदिर)
===============================================
===============================================
बेळगाव, गोकाक, कणबर्गी, हळशी, कित्तुर, सौंदत्ती अशी खानापूरच्या जवळची ठिकाणे बघुन झाल्यावर आम्ही कोस्टल कर्नाटक सफरीवर निघालो. या सफरीत आम्ही मुख्यत्वे गोकर्ण, मुरूडेश्वर, सिरसी, याना हिल्स या ठिकाणाला भेट देणार होतो. खानापूरहुन येल्लापूर-सिरसी मार्गे मुरूडेश्वरला जाता येते, रस्ताही चांगला आहे. मात्र आम्ही खानापुर - लोंढा - रामनगर - सुपा - कारवार मार्गे मुरूडेश्वरला जाण्याचे ठरवले. हा रस्ता सर्वांगाने निसर्गसौंदयाने बहरलेला आहे. सकाळच दाट धुकं, आकाशाला गवसणी घालणारे वृक्ष, हिरवा, पिवळा, तांबडा साज ल्यायलेली भात शेती, निळे आकाश निळे पाणी, दाट झाडीतुन जाणारा नागमोडी वळणाचा रस्त असा निसर्गाचा सारा नजारा या वाटेवर होता. या मार्गावरचे बरेचसे प्रचि माझ्या कलर्स ऑफ उत्तर कन्नडा या धाग्यात आहे. 
त्याची एक झलक:
यातील पहिले ठिकाण गोकर्ण करून मुरूडेश्वरला एक दिवस राहून दुसरा दिवस याना हिल्स, सिरसी असा आमचा प्लान होता. गोकर्णला साधारण दिड दोनच्या सुमारास पोहचलो पण गोकर्ण महाबळेश्वर मंदिर दुपारी १२:३० ते संध्याकाळी ५:०० वाजेपर्यंत बंद असते हे माहित नसल्याने दर्शन झाले नाहे. :(. ५ वाजेपर्यंत थांबण्यात काही अर्थ नव्हता म्हणुन आम्ही तडक मुरूडेश्वरला निघालो. वाटेत इडगुंजीच्या उभा गणपतीचे दर्शन घेतले. मुरुडेश्वरला एक रात्र राहुन दुसर्या दिवशी सकाळी लवकर परत गोकर्णला आलो.
इडगुंजी गणपती मंदिर आणि परीसर
प्रचि ०१
प्रचि ०२
प्रचि ०३
प्रचि ०४
मंदिरात मूळ मूर्तीचा फोटो काढण्यास बंदी असल्याने हा फोटोचा फोटो 
प्रचि ०५
प्रचि ०६
कोकण रेल्वे 
वाळ्याच्या गवतापासुन केलेले हे शोपीस
प्रचि ०७
गोकर्ण महाबळेश्वर मंदिराची कथा:
रावण हा मोठा शिवभक्त होता. शंकराकडुन आत्मलिंग मिळवण्यासाठी त्याने कठोर तपस्या सुरू केली होती. पण शंकर कही प्रसन्न होत नव्हते, शेवटी त्याने आपले एक-एक शिर कापून समर्पित करावयास सुरूवात केली. भोळा शंकर त्याच्या कठोर तपस्येवर प्रसन्न झाले आणि त्याला "आत्मलिंग" दिले. मात्र भगवान शंकराने रावणाला आत्मलिंग देताना एक अट घातली होती, ""कैलासाहून लंकेत जाईपर्यंत जर तू हे माझे आत्मलिंग कुठेही भूमीवर खाली ठेवलेस तर, ते तेथेच घट्ट रूतून बसेल!''. आत्मलिंग मिळाल्यावर रावणाची शक्ती अजुन वाढेल याची देवांना जाणीव होती म्हणुनच त्यांनी श्री गणेशाला यावर मदत करण्यास विनवणी केली. यावर श्री गणेशाने एक उपाय सुचवला, रावण नियमित संध्यापूजा करावयाचा म्हणुन त्यांनी काही वेळ सूर्याला झाकोळुन संध्याकाळचा आभास निर्माण केला. रावण न चुकता संध्यापुजा करावयचा पण त्यावेळी हातात आत्मलिंग असल्याणे धर्मसंकटात सापडला. तितक्यात रावणाला विघ्नहर्ता श्रीगणेश एका बाल गुराख्याच्या वेषात गुरे राखताना जवळच दिसला. रावणाने या बाळ गुराख्यायाला बोलावून त्याच्याजवळ शिवाचे आत्मलिंग थोडावेळ सांभाळण्यासाठी दिले. आणि "जमिनीवर ठेवू नकोस" असे त्याला बजावलेही. परंतु त्याचवेळी त्या गोपाळरूपी गणेशानेही रावणाला एक अट घातली, ""हे जड लिंग मला असह्य झाले तर मी मी तुला तीन वेळा हाक मारेन आणि तु नाही आलास तर लगेच खाली भूमीवर ठेवीन. लवकर ये!'' रावण पूजेस बसला आणि काही वेळाने गुराख्याच्या रूपातील गणेशाने त्याला हाक मारली, परंतु रावण काही वेळेवर परत आला नाही आणि गणेशाने देवांना संकटमुक्त करण्यासाठी एक देवकार्य म्हणून ते शिवाचे आत्मलिंग तेथेच भूमीवर ठेवले. थोड्या वेळाने रावन तेथे परत आला आणि शिवलिंग जमिनीवर पाहून संतप्त झाला. त्याने ते भूमीवरून खेचुन काढण्याचा प्रयत्न केला आणि या सगळ्या ओढाताणीत शिवलिंगाचा आकार गाईच्या कानासारखा झाला. हेच ते कर्नाटकातील प्रसिद्ध "गोकर्ण महाबळेश्वर" मंदिर. कर्नाटकातील सात मुक्तीस्थळांपैकी एक असलेले हे दाक्षिणात्य शैलीतील मंदिर कदंब आणि चालुक्य मंदिर शैलीचाही प्रभाव दाखवतो.
गोकर्ण महाबळेश्वर मंदिरात आणि परीसरात फोटोग्राफिला बंदि असल्याने फोटो काढता आले नाही. येथे हिंदू धर्माव्यतिरीक्त इतरांना प्रवेश बंदी आहे. येथे परदेसी पर्यटकांनाही मंदिरात प्रवेश करण्यास पूर्णत: बंदी आहे. 
गोकर्ण महाबळेश्वर मंदिरात खुपच छान दर्शन झाले, गाभार्यात असलेल्या खळग्यात हात घातला असल्यास गाईच्या आकाराच्या शिवलिंगाचा स्पर्श जाणवतो. 
गोकर्णचा समुद्रकिनारा
प्रचि ०८
एक घर
प्रचि ०९
श्रद्धा आणि विज्ञान 
प्रचि १०
ओम बीचवर जाताना रस्त्यावर हा दिसला 
प्रचि ११
प्रचि १२
ओम बीच
गोकर्ण येथुन साधारण ६-७ किमी अंतरावर स्वच्छ आणि नितांत सुंदर "ओम बीच" आहे. या समुद्रकिनार्याचा आकार "ओम" सारखा असल्याने याला हे नाव पडले.
प्रचि १३
प्रचि १४
प्रचि १५
प्रचि १६
प्रचि १७
प्रचि १८
प्रचि १९
प्रचि २०
प्रचि २१
प्रचि २२
प्रचि २३
प्रचि २४
प्रचि २५
प्रचि २६
प्रचि २७
प्रचि २८
प्रचि २९
प्रचि ३०
प्रचि ३१
(क्रमश:)
योगेश, सर्वच फोटो छान.
योगेश, सर्वच फोटो छान.
इतक्या सुंदर फोटोंसाठी
इतक्या सुंदर फोटोंसाठी अप्रतिम वगैरे शब्द वापरून गुळगुळीत झालेत!!! नवे शोधायला पाहिजेत!
भन्नाट, अफलातून!!
जिप्सी, तुझ्या मुळे घरबसल्या मस्त सफर घडतिये!
प्रतिसाद राखीव!!
प्रतिसाद राखीव!!
असं_लिहू_नये---पण्_नेहमीपेक्ष
असं_लिहू_नये---पण्_नेहमीपेक्षा_काहितरी_उणीव्_जाणवतेय.
(काय_ते_पण्_सांगता_येत्_नाही.)
मित्रा ... पहिला कोलाज
मित्रा ... पहिला कोलाज आवडला... त्यातला पहिला पॅनोरमा खासच..
बाकी फोटोबद्दल काय बोलणार ... तुझ्याबरोबर आमची सुद्धा भटकंती चाललेय ....
धन्यवाद
ए छानेय रे..
ए छानेय रे..
खुप छान....
खुप छान....
मस्त फोटोज !
मस्त फोटोज !
खूपच सुंदर.. पहिला व शेवटचा
खूपच सुंदर..
पहिला व शेवटचा फोटो वाईड अँगल लेन्सने काढलाय का किंवा इतर काही तंत्रज्ञान असेल तर जाणून घ्यायला आवडेल......
जिप्सी, माहिती हवी आहे मधे मी
जिप्सी, माहिती हवी आहे मधे मी लिहिलं होतं ना मंदिरे दुपारची बंद असतात म्हणून. वास्तविक पर्यटकांवर एवढा खर्च करणारे कर्नाटक सरकार यामधे का लक्ष घालत नाही कुणास ठाऊक?
नेहमी प्रमाणेच सुंदर.
नेहमी प्रमाणेच सुंदर.
मंदीर १२ ते ५ बंद..
मंदीर १२ ते ५ बंद.. पुजार्यांचे पूर्वज पुण्यातील होते की काय... देवाच्या झोपेची वेळ म्हणून मंदीर बंद..
राजस्थान मधले रणछोडदास मंदीर तर अजूनच भन्नाट प्रकारे बंद ठेवतात.. आणि दर्शनाची वेळ पण फारच कमी असते... आणि जेव्हा असते तेव्हा जेमतेम १५ मिनीटेच उघडं असतं... नुसता कल्ला असतो त्यावेळात..
आभार्स लोक्स
आभार्स लोक्स
नेहमीपेक्षा_काहितरी_उणीव्_जाणवतेय.>>>>कदाचित समुद्रकिनार्याचे जास्त फोटो असल्याने तोचतोचपणा जाणवत असेल. पण मंदिर आणि परीसराचे फोटो काढण्यास मनाई आहे.
जिप्सी, माहिती हवी आहे मधे मी लिहिलं होतं ना मंदिरे दुपारची बंद असतात म्हणून>>>>हो ना, मला वाटल कि जास्तीत जास्त तास-दिड तास बंद असेल.
वास्तविक पर्यटकांवर एवढा खर्च करणारे कर्नाटक सरकार यामधे का लक्ष घालत नाही कुणास ठाऊक?>>>>अगदी अगदी
मंदीर १२ ते ५ बंद.. पुजार्यांचे पूर्वज पुण्यातील होते की काय... देवाच्या झोपेची वेळ म्हणून मंदीर बंद.. >>>>हिम्स,

अफलातुन मित्रा... कोलाज, बीच,
अफलातुन मित्रा...
कोलाज, बीच, पॅनो... असे बरेच मनापासुन आवडले...
आठवड्याची सुरूवात छान झाली...
वॉव! जिप्सीदा जवाब नही!
वॉव! जिप्सीदा जवाब नही!
योग्या, इतक्या सगळ्या सुंदर
योग्या, इतक्या सगळ्या सुंदर ठिकाणी एकटा फिरलास?
आता एकटं फिरायचं बंद कर...
छान फोटो जिप्सी. या
छान फोटो जिप्सी.
या इडगुंजीच्या गणपतीचीपण एक कथा आहे. हा बाल गणेश आहे.
भाया , पुन्हा एकदा तोडून
भाया ,
पुन्हा एकदा तोडून फोडून टाकला आहे......
फोटो खुपच जबरदस्त...............
(प्रचि.31 खुपच अप्रतिम)
इडगुंजीच्या गणपतीचीपण एक कथा
इडगुंजीच्या गणपतीचीपण एक कथा आहे >> माझ्या मते गुराख्याच्या रूपातील गणेशाची ही मुर्ती आहे.. तेव्हा ते शिवाचे आत्मलिंग जमिनीवर ठेवल्यावर रावणाने संतप्त होऊन त्याच्या डोक्यावर जोरदार काठी मारली. त्यामूळे त्याच्या डोक्यावर खोक पडली. मुर्तीच्या डोक्यावरुन हात फिरवील्यास ती खोक जाणवते..
सगळेच फोटो अप्रतिम
सगळेच फोटो अप्रतिम
आवडेश... मस्त!!!!!
आवडेश... मस्त!!!!!
मस्त. गोकर्ण फार सुरेख आहे.
मस्त. गोकर्ण फार सुरेख आहे. आणि उत्तर कर्नाटकाचा किनारापण सुरेख आहे.
छान रे
छान रे
जिप्सी, मस्त फोटो आलेत..
जिप्सी, मस्त फोटो आलेत.. सुरेखच..!!
जिप्सी, गोकर्णच्या
जिप्सी, गोकर्णच्या समुद्रकिनार्यावर उभे राहिल्यास डावीकडे डोंगरावर एक मंदिर दिसते... रामतीर्थ नावाचे... आणि तिथूनच पुढे डोंगरमाथ्यावर जायला रस्ता आहे. माथ्यावरच्या खडकाळ पठारावर मध्येच एक विवर आहे आणि जरा पुढे त्या विवरात उतरण्याजोगा रस्ता आहे. प्रथमदर्शी विवराच्या आत एवढी मोठी पोकळी असेल याची अजिबात कल्पना येत नाही. एकदम सुंदर जागा आहे. या जागेला 'गोगर्भ' म्हणतात.
अजून पुढे गेल्यावर डोंगरावरुन खाली समुद्रात उतरण्यासाठी एक चिंचोळी, निसरडी वाट आहे. या वाटेवरुन खाली उतरल्यावर मध्येच डोंगराच्या खोबणीत एक गुहा दिसते. गुहेत सहजा सहजी जायला रस्ताच नाहीये, लांबूनच डोकावून पाहता येते. पण डोंगरावरुन दोर सोडून बहुधा उतरता येते. या जागेला 'जटायूतीर्थ' असे नाव आहे. जटायूचे निवासस्थान अशी दंतकथा आहे.
दोन्हीही जागा एकदाच आणि तेही फार-फार वर्षांपूर्वी गेलो होतो, पण अजून डोळ्यासमोरुन जात नाहीत
पुढच्या ट्रीपच्या वेळी या दोन्ही जागा चुकवू नका
सुंदर सफर घडवतोयस मित्रा ,
सुंदर सफर घडवतोयस मित्रा , प्र. ची. सगळेच आवडेश सुंदर
अन कोकण रेल्वे च शेवटच स्टेशन कारवार आहे अस
एकुन होतो , होय का ?
अप्रतिम......................
अप्रतिम.......................................
सुं द र!
सुं द र!
अवर्णनीय !
अवर्णनीय !
वर काढतोय गारवा
वर काढतोय गारवा
Pages