उत्तर कर्नाटक (५) — गोकाक

Submitted by जिप्सी on 17 November, 2011 - 23:39

या आधीची उत्तर कर्नाटक भटकंती:

१. कलर्स ऑफ उत्तर कन्नडा

२. उत्तर कर्नाटक (१) — बेळगाव आणि परीसर

३. उत्तर कर्नाटक (२) — सौंदत्ती (यल्लमा देवी आणि हुळी मंदिर )

४. उत्तर कर्नाटक (३) — पारसगड (सौंदत्ती किल्ला)

५. उत्तर कर्नाटक (४) — नृसिंह-वराह मंदिर (हलशी)

===============================================
===============================================

मायबोलीकर सुनिल परचुरे आणि साधना यांचे गोकाक फॉल्सचे काही फोटो मायबोलीवर पाहिले होते. त्यामुळे भारताचा नायगरा असा ज्याचा उल्लेख होतो त्या गोकाक फॉल्सला या उत्तर कर्नाटक भटकंतीत भेटण्याची फार उत्सुकता होती, पण प्रत्यक्षात तेथे गेल्यावर (नोव्हेंबरच्या सुरूवातीस असल्यामुळे कदाचित) नदीला पाणी फार कमी असल्याने अगदी नळ सोडल्यासारखे धबधबे दिसत होते, त्यामुळे थोडा मूड ऑफ झाला Sad . याच ठिकाणी १८ व्या शतकात उभारलेले भारतातील पहिले विजनिर्माण केंद्र आहे. गोकाक परीसरात काहि पुरातन मंदिरे देखील पाहण्यासारखी आहे. राईसमिल, कॉटनमिलदेखील आहेत.

घटप्रभा नदीवरील झुलता पूल
प्रचि ०१

प्रचि ०२

प्रचि ०३

घटप्रभा नदी आणि परीसर
प्रचि ०४

नोव्हेंबर महिन्यातच पाणी इतके कमी Sad
प्रचि ०५

प्रचि ०६

प्रचि ०७

प्रचि ०८

प्रचि ०९

प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४
भारतातील पहिले विजनिर्माण केंद्र

प्रचि १५

प्रचि १६

गोकाक रस्त्यावर हे असे अंगावर येणारे मोठ्ठाले दगड भरपूर दिसतात. Happy
प्रचि १७

फोटोसाठी बेस्ट स्पॉट Wink
प्रचि १८

घटप्रभा नदी
प्रचि १९

खानापुरच्या मित्राने काढलेले आधीचे गोकाक फॉल्सचे फोटो Happy
प्रचि २०

प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३

येथील शंकर मंदिर आणि परीसरात बुचाची झाडे मस्तपैकी बहरली होती. त्यांचा धुंदकुंद सुवास वातावरण खरंच प्रसन्न करत होते.
बुचाची फुले/आकाशमोगरा/गगनजाई
प्रचि २४

प्रचि २५

प्रचि २६

श्री शंकर मंदिर
प्रचि २७

शिवलिंग
प्रचि २८

प्रचि २९

१८८७ सालातील एक मिल
प्रचि ३०
(क्रमश:)

गुलमोहर: 

खल्लास आहेत एकेक प्रचि!!
झुलता पुल, धबधबा, घटप्रभा नदी, शंकराचं मंदीर आणि शिवलिंगही सुंदर!!! Happy
कंबोडीयातली Angkor wat (उच्चार माहीत नाही) ही मंदीरं पण अशीच आहेत ना?

नदीला पाणी फार कमी असल्याने अगदी नळ सोडल्यासारखे धबधबे दिसत होते>>>> Lol Lol Lol
सर्व प्र चि अतिशय सुंदर...........

मस्त प्रची. शंकराच मंदीर, आणि पिंडी सुरेखच. Happy
तो नदीकाठचा दगड अगदी आता नदीत डुबकी मारण्याच्या पवित्र्यात असलेला बेडुक वाटतोय.>>>अगदी बरोबर.:स्मितः

छान प्रचि. मी २० वर्षापुर्वी गोकाक ला गेले होते. हे दोधाणा वहात होता. आता खरच ग्लोबल वॉर्मिन्ग आपल्या घरात पोहोचले आहे.

बाकि फोटो खुपच छान. माझ्या एका मस्त ट्रिपची आठवण करुन दिलीत. धन्स.

खरंच पाणी फारच कमी आहे.. आम्ही भर ऑगस्ट मध्ये गेलो होतो.. त्या पुलावर ५ मि पण थांबायची हिम्मत होत नव्हती.. तांबुस रंगाचं अशक्य वेगात वाहणारे पाणी.. आठवलं तरी काटा येतो. त्या पुलावर स्वतःच्या जबाबदारीवर जा अशा अर्थाची पाटी पण लावली होती.परत कधी जमलं तर पावसाळ्यात भेट द्या.

बाकी फोटो छान.

तरीही छानच रे. मला वाटतं दूधसागरला जायला हवे होते तूम्ही. (थोड्या दिवसात सगळे नसलेच जमते म्हणा.)

प्रतिसादाबद्दल धन्स लोक्स Happy

समोरच्या मिल मधे कॉटनचे कपडे मस्त मिळतात.. घेतलेस की नाही..>>>>येस्स, आम्ही गेलो होतो तिकडे माझ्या मित्रांनी केली शॉपिंग. Happy

त्या पुलावर ५ मि पण थांबायची हिम्मत होत नव्हती.. >>>>आताही तो पूल चिक्कार हलताना बर्‍याच जणांना भीती वाटत होती. Happy

मला वाटतं दूधसागरला जायला हवे होते तूम्ही>>>>दिनेशदा, विचार होता पण आधीच्या प्लानिंगमध्ये नसल्याने रद्द झाले. Sad

कुठला camera वापरता?>>>>Canon EOS 1000D Happy

तिसरा फोटो झोपुन काढलाय का ?>>>>नाही श्री, कॅमेरा पूलावर खाली ठेवून काढला Happy

फोटोसाठी बेस्ट स्पॉट प्रचि १८ >> हे तर दगडी बेडुकराव दिसताहेत Happy
धबधबे , उंचच उंच कातळकडे अगदी अंगावर येणारे मस्त.......च Happy जिओ जिप्सी....