या आधीची उत्तर कर्नाटक भटकंती:
२. उत्तर कर्नाटक (१) — बेळगाव आणि परीसर
३. उत्तर कर्नाटक (२) — सौंदत्ती (यल्लमा देवी आणि हुळी मंदिर )
४. उत्तर कर्नाटक (३) — पारसगड (सौंदत्ती किल्ला)
५. उत्तर कर्नाटक (४) — नृसिंह-वराह मंदिर (हलशी)
७. उत्तर कर्नाटक (६) — कित्तुर (कित्तुर किल्ला आणि कमल नारायण मंदिर)
===============================================
===============================================
बेळगाव, गोकाक, कणबर्गी, हळशी, कित्तुर, सौंदत्ती अशी खानापूरच्या जवळची ठिकाणे बघुन झाल्यावर आम्ही कोस्टल कर्नाटक सफरीवर निघालो. या सफरीत आम्ही मुख्यत्वे गोकर्ण, मुरूडेश्वर, सिरसी, याना हिल्स या ठिकाणाला भेट देणार होतो. खानापूरहुन येल्लापूर-सिरसी मार्गे मुरूडेश्वरला जाता येते, रस्ताही चांगला आहे. मात्र आम्ही खानापुर - लोंढा - रामनगर - सुपा - कारवार मार्गे मुरूडेश्वरला जाण्याचे ठरवले. हा रस्ता सर्वांगाने निसर्गसौंदयाने बहरलेला आहे. सकाळच दाट धुकं, आकाशाला गवसणी घालणारे वृक्ष, हिरवा, पिवळा, तांबडा साज ल्यायलेली भात शेती, निळे आकाश निळे पाणी, दाट झाडीतुन जाणारा नागमोडी वळणाचा रस्त असा निसर्गाचा सारा नजारा या वाटेवर होता. या मार्गावरचे बरेचसे प्रचि माझ्या कलर्स ऑफ उत्तर कन्नडा या धाग्यात आहे. 
त्याची एक झलक:
यातील पहिले ठिकाण गोकर्ण करून मुरूडेश्वरला एक दिवस राहून दुसरा दिवस याना हिल्स, सिरसी असा आमचा प्लान होता. गोकर्णला साधारण दिड दोनच्या सुमारास पोहचलो पण गोकर्ण महाबळेश्वर मंदिर दुपारी १२:३० ते संध्याकाळी ५:०० वाजेपर्यंत बंद असते हे माहित नसल्याने दर्शन झाले नाहे. :(. ५ वाजेपर्यंत थांबण्यात काही अर्थ नव्हता म्हणुन आम्ही तडक मुरूडेश्वरला निघालो. वाटेत इडगुंजीच्या उभा गणपतीचे दर्शन घेतले. मुरुडेश्वरला एक रात्र राहुन दुसर्या दिवशी सकाळी लवकर परत गोकर्णला आलो.
इडगुंजी गणपती मंदिर आणि परीसर
प्रचि ०१
प्रचि ०२
प्रचि ०३
प्रचि ०४
मंदिरात मूळ मूर्तीचा फोटो काढण्यास बंदी असल्याने हा फोटोचा फोटो 
प्रचि ०५
प्रचि ०६
कोकण रेल्वे 
वाळ्याच्या गवतापासुन केलेले हे शोपीस
प्रचि ०७
गोकर्ण महाबळेश्वर मंदिराची कथा:
रावण हा मोठा शिवभक्त होता. शंकराकडुन आत्मलिंग मिळवण्यासाठी त्याने कठोर तपस्या सुरू केली होती. पण शंकर कही प्रसन्न होत नव्हते, शेवटी त्याने आपले एक-एक शिर कापून समर्पित करावयास सुरूवात केली. भोळा शंकर त्याच्या कठोर तपस्येवर प्रसन्न झाले आणि त्याला "आत्मलिंग" दिले. मात्र भगवान शंकराने रावणाला आत्मलिंग देताना एक अट घातली होती, ""कैलासाहून लंकेत जाईपर्यंत जर तू हे माझे आत्मलिंग कुठेही भूमीवर खाली ठेवलेस तर, ते तेथेच घट्ट रूतून बसेल!''. आत्मलिंग मिळाल्यावर रावणाची शक्ती अजुन वाढेल याची देवांना जाणीव होती म्हणुनच त्यांनी श्री गणेशाला यावर मदत करण्यास विनवणी केली. यावर श्री गणेशाने एक उपाय सुचवला, रावण नियमित संध्यापूजा करावयाचा म्हणुन त्यांनी काही वेळ सूर्याला झाकोळुन संध्याकाळचा आभास निर्माण केला. रावण न चुकता संध्यापुजा करावयचा पण त्यावेळी हातात आत्मलिंग असल्याणे धर्मसंकटात सापडला. तितक्यात रावणाला विघ्नहर्ता श्रीगणेश एका बाल गुराख्याच्या वेषात गुरे राखताना जवळच दिसला. रावणाने या बाळ गुराख्यायाला बोलावून त्याच्याजवळ शिवाचे आत्मलिंग थोडावेळ सांभाळण्यासाठी दिले. आणि "जमिनीवर ठेवू नकोस" असे त्याला बजावलेही. परंतु त्याचवेळी त्या गोपाळरूपी गणेशानेही रावणाला एक अट घातली, ""हे जड लिंग मला असह्य झाले तर मी मी तुला तीन वेळा हाक मारेन आणि तु नाही आलास तर लगेच खाली भूमीवर ठेवीन. लवकर ये!'' रावण पूजेस बसला आणि काही वेळाने गुराख्याच्या रूपातील गणेशाने त्याला हाक मारली, परंतु रावण काही वेळेवर परत आला नाही आणि गणेशाने देवांना संकटमुक्त करण्यासाठी एक देवकार्य म्हणून ते शिवाचे आत्मलिंग तेथेच भूमीवर ठेवले. थोड्या वेळाने रावन तेथे परत आला आणि शिवलिंग जमिनीवर पाहून संतप्त झाला. त्याने ते भूमीवरून खेचुन काढण्याचा प्रयत्न केला आणि या सगळ्या ओढाताणीत शिवलिंगाचा आकार गाईच्या कानासारखा झाला. हेच ते कर्नाटकातील प्रसिद्ध "गोकर्ण महाबळेश्वर" मंदिर. कर्नाटकातील सात मुक्तीस्थळांपैकी एक असलेले हे दाक्षिणात्य शैलीतील मंदिर कदंब आणि चालुक्य मंदिर शैलीचाही प्रभाव दाखवतो.
गोकर्ण महाबळेश्वर मंदिरात आणि परीसरात फोटोग्राफिला बंदि असल्याने फोटो काढता आले नाही. येथे हिंदू धर्माव्यतिरीक्त इतरांना प्रवेश बंदी आहे. येथे परदेसी पर्यटकांनाही मंदिरात प्रवेश करण्यास पूर्णत: बंदी आहे. 
गोकर्ण महाबळेश्वर मंदिरात खुपच छान दर्शन झाले, गाभार्यात असलेल्या खळग्यात हात घातला असल्यास गाईच्या आकाराच्या शिवलिंगाचा स्पर्श जाणवतो. 
गोकर्णचा समुद्रकिनारा
प्रचि ०८
एक घर
प्रचि ०९
श्रद्धा आणि विज्ञान 
प्रचि १०
ओम बीचवर जाताना रस्त्यावर हा दिसला 
प्रचि ११
प्रचि १२
ओम बीच
गोकर्ण येथुन साधारण ६-७ किमी अंतरावर स्वच्छ आणि नितांत सुंदर "ओम बीच" आहे. या समुद्रकिनार्याचा आकार "ओम" सारखा असल्याने याला हे नाव पडले.
प्रचि १३
प्रचि १४
प्रचि १५
प्रचि १६
प्रचि १७
प्रचि १८
प्रचि १९
प्रचि २०
प्रचि २१
प्रचि २२
प्रचि २३
प्रचि २४
प्रचि २५
प्रचि २६
प्रचि २७
प्रचि २८
प्रचि २९
प्रचि ३०
प्रचि ३१
(क्रमश:)
़अर्नाटकाचा हा सगळा परिसर
़कर्नाटकाचा हा सगळा परिसर केरळ इतकाच सम्रुद्ध , हिरवागार , नयनमनोहर .. स्वच्छ , आणि स्वस्त.

आम्ही उडूपीलाही गेलो होतो. तिथले क्रुष्ण मंदीर , मालपे बीच पहाण्यासारखे. शहर अतिशय सुंदर आहे , जणु १०० वर्षांपूर्वीचे मुंबई .
मालपे बीच समोर समुद्रातले सेंट मेरि आयलंड
तसेच सिरसी पासून ३०-४० किमी वर आम्ही एका बनवासी नावाच्या ठिकाणीही गेलो होतो. १५०० वर्षांचा इतिहास सांगणारे मंदिर पहाण्यासारखे.

Pages