'पाऊलवाट' प्रीमियर- वृत्तांत, छायाचित्रे व परीक्षणे

Submitted by माध्यम_प्रायोजक on 19 November, 2011 - 01:08

कोथरुडमधल्या 'सिटीप्राईड' येथे 'पाऊलवाट'चे संध्याकाळी सहा व सात वाजता- असे दोन प्रीमियर शो झाले. या दोन्ही खेळांना चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक, संगीतकार, गीतकार, कलाकार असे सारे उपस्थित होते. या कीर्तीवंतांची मांदियाळी, रांगोळ्या, लाल गालिचे, सनईचे सूर, कॅमेर्‍यांचा क्लिकक्लिकाट अशा भारलेल्या वातावरणातल्या या प्रीमियरना १४ मायबोलीकरांना उपस्थित राहण्याची संधी मिळाली.

उपस्थित मायबोलीकरांनी इथे वृत्तांत व फोटो टाकावेत. तसेच चित्रपटाबद्दल काय वाटलं, ते लिहावं, ही विनंती.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गुरुवारी चिनूक्सचा इमेल आला की कॉल कर एक महत्वाचं काम आहे. त्याच्याशी बोलल्यावर कळालं की पाउलवाट च्या प्रिमीअर शो चे एक तिकीट उपलब्ध आहे आणि मला जायला जमेल काय यासाठी त्याने इमेल केला होता. मी लगेचच होकार दिला व त्याने साजिराशी संपर्क करुन माझे जाणे पक्के केले. Happy

शुक्रवारी ऑफिसमधून लवकर कल्टी मारून थेट 'सिटी प्राइड, कोथरुड' येथे आलो. आत गेल्यावर लगेचच 'पाउलवाट' चे भले मोठे पोस्टर स्वागताला होते.

सनई वादनाने सोहळा सुरु झाला होता.

स्वागत समितीतील दोघेजण खास चित्रपटाची नामावली असलेली रांगोळी काढण्यात मग्न होते. रांगोळी एकदम सुरेख काढली त्यांनी

आणखी एक फोटो

रांगोळी काढून होइपर्यंत इतर मायबोलीकर पण आले. कलाकार मंडळींचे पण आगमन सुरू झाले. प्रथम सुबोध भावे आला. त्याला प्रत्यक्षात पाहिल्यावर जाम भारी वाटलं. एकदम रिलॅक्स होता आणि त्याचा कुठलाही अंहंकारिक डामडौल नव्हता वावरताना. त्यानंतर निर्माते नरेंद्र भिडे यांचेही आगमन झाले.

नंतर ज्येष्ठ अभिनेते 'श्रीकांत मोघे' यांचे आगमन झाले. अतिशय उत्साहात त्यांनी पाउलवाटच्या टीमला शुभेच्छा दिल्या. 'निशाणी डावा अंगठा, देऊळ' या चित्रपटात मस्त काम केलेला 'ह्रुषिकेश जोशी' व नायिका 'मधुरा वेलणकर-साटम' आले. आम्ही फोटो काढण्यासाठी, स्वाक्षरी घेण्यासाठी धावलो. जबरदस्तच वाटलं.

श्रीकांत मोघे

मधुरा वेलणकर-साटम

हृषिकेश जोशी

तोपर्यंत साजिरा आमचे पासेस घेऊन आला. साजिरा व इंगळेसर.

सिनेमा हॉलमध्ये पहिल्यांदा सर्व प्रमुख कलाकार, तंत्रज्ञ, संगीतकार व निर्मात्यांचा एक छोटासा माहितीपर कार्यक्रम झाला. त्यात सिनेमाबद्द्ल माहिती, केलेली तयारी याची माहिती दिली.

मायबोलीच उल्लेख पोस्टरवर Happy

सिनेमा प्रत्यक्ष सुरु होताना दोनदा वीज खंडित झाली, या दोन्ही वेळेस पब्लिकने जाम आरडाओरडा करुन मला सिंगलस्क्रीन मध्ये समोरच्या खुर्चीवर पाय टाकून बसल्यासारखा आनंद दिला. शेवटी चित्रपट सुरू झाला.

चित्रपट मस्त वाटला मला. गाणी सुरेख आहेत यात वादच नाहीत, आशाताईंचा आवाज अजून खणखणीत आहे Happy सिनेमाटॉग्राफीही सुरेख, फ्रेम्स मस्त घेतल्यात. मराठी चित्रपट तांत्रिकदृष्ट्या सरस होत चाललाय याचं हे चिन्ह. कथानकाबद्दल आपल्याला माहिती आहेच. थोडक्यात आमच्या सांगलीहून मुंबईत गायक होण्याचं स्वप्न असणारा अनंत देव, आक्कांकडे पेइंग गेस्ट म्हणून राहतो. अनंत, आक्का (ज्योती चांदेकर) , अनंताचा मित्र बाब्या (ह्रुषिकेश जोशी), आक्कांचे शेजारी नेने (आनंद इंगळे) व रेवती (मधुरा वेलणकर) यांच्यातील नात्याची कथा. अनंतला करावा लागणार्‍या 'स्ट्रगल'मध्ये हे सगळे त्याला आपापल्या परीने साथ देत असतात. संगीत क्षेत्रात येणारे अनुभव पाहून खचणार्‍या अनंतला वेळोवेळी उभारी देणारे 'उस्मानभाइ' (किशोर कदम) व 'मिनीस्टर' (अभिराम भडकमकर) त्याला भेटतात. या आशा-निराशेचा प्रवास संपूर्ण चित्रपटात उत्तम घेतलाय.

कलाकारांची कामे सहीच झालीत. सुबोधने अनंतचे, स्ट्रगलरचे, पात्र एकदम ताकदीने उभे केलय. आक्का आणि नेनेंची जुगलबंदी जबरदस्त. एकमेकांशी वाद घालणारे व तेवढेच एकदम घट्ट असणारे शेजारी मजा आणतात. या दोघांचे विनोदाचे टायमिंग सही आहे. बाब्याच्या भूमिकेत हृषिकेशने धमाल उडवलीय. मुंबईतील नोकरदार व वेळोवेळी मित्राला साथ देणारा बाब्या. रेवतीच्या भूमिकेत मधुरा एकदम परफे़ट. अनंतला आधार देणारी प्रेयसी मस्त साकारलीय. उस्मान सारंगीवाल्याच्या भूमिकेत 'किशोर कदम' यांनी चांगलं काम केलय. त्यांची ही आणखीण एक वेगळी भूमिका.

एकूण चित्रपट मला चांगला वाटला. नक्की बघा.

अवांतर :
१) सिनेमाच्या पहिल्या भागात थिएटर मध्ये आवाज जास्त सोडल्यामुळे एक-दोन गाणी व काही काही संवाद अजिबात कळले नाहीत. दुसर्‍या भागात परिस्थिती सुधारली.
२) आमच्या समोरच्या रांगेत एक उत्साही गृहस्थ बसले होते. अनंत, उस्मान यांच्या काही संवादांना त्यांची जोरदार दाद मिळत होती. त्यामुळे आमचं चांगलच मनोरंजन होत होतं. Happy

मायबोलीच्या कृपेने आणि चिनूक्स च्या समस ने आयुष्यात प्रथमच एखाद्या चित्रपटाच्या प्रिमियरला जाण्याची संधी आयती चालून आली. आत्तापर्यंत बातम्यांमधे वगैरेच प्रिमियर शो पाहिलेले होते त्यामुळे त्याबद्दलचं एक चित्र डोक्यात कुठेतरी तयार होतं की कसे एक एक कलाकार कार मधून उतरतात, त्यांना बघण्यासाठी आजुबाजूला लोकांची झुंबड उडालेली असते, मग ते कलाकार हात हालवून सगळ्यांच्या मधून चालत आत जातात वगैरे वगैरे...

साजिराच्या रिमाइंडर समस नुसार बरोब्बर ५.३० वाजता सिटी प्राईड ला पोहोचले त्यावेळी रांगोळी काढायला जस्ट सुरूवातच झाली होती... अतिशय सफाईदारपणे हात चालवत, सनई चौघड्यांच्या सुरावटीवर हुबेहुब पोस्टरसारखी रांगोळी हा हा म्हणता चितारली गेली. तोपर्यंत एक एक करत मायबोलीकर जमायला लागले आणि प्रिमियरला आलोय वगैरे विसरून गटगला जमल्यासारख्या गप्पा चालू झाल्या आणि सहज लक्ष गेलं तर आम्ही उभे होतो त्याच्या विरूद्ध बाजूने कलाकार आत निघाले होते..

धावत पळत तिकडच्या मॉबमधे सामिल झालो आणि समोर दिसला आपला लाडका सुबोध भावे... निवांत उभा होता, फोनवर बोलत होता, फोटो काढून दिले, इतका कॅज्युअल, कसलाही दिमाख नाही... मस्त!

प्रत्यक्ष चित्रपट सुरू व्हायला ६.३० वाजले, सर्व कलाकार, तंत्रज्ञ, गीतकार मायबोलीकर वैभव जोशी, संगीतकार, डायरेक्टर, प्रोड्युसर आणि उडनछू गाण्यातले सगळे बालगायक यांचा सत्कार समारंभ पार पडला आणि प्रत्यक्ष चित्रपटाला सुरुवात झाली.
चित्रपटाचा नायक अनंत देव (सुबोध भावे) आक्कांच्या (ज्योती चांदेकर)घरी पेइंग गेस्ट म्हणून रहायला येतो या प्रसंगाने चित्रपटाची सुरूवात होते आणि सुरूवातीला खवट वाटणार्‍या या घरमालकीण म्हातारीशी नायकाचे कसे ऋणानुबंध जुळत जातात हे अतिशय तरलपणे चित्रपटात मांडले जाते. यशस्वी गायक बनण्याचे स्वप्न उराशी घेऊन सांगलीहून मुंबईत आलेल्या नायकाचा 'स्ट्रगल', या प्रवासात त्याला भेटलेली माणसे, त्यांचे एकमेकांशी असलेले, फुलत जाणारे नाते, आक्कांचा भूतकाळ हळूवारपणे आणि संथगतीने उलगडत जातो.
ज्योती चांदेकर, सुबोध भावे यांचे अभिनयाचे नाणे खणखणीत. आनंद इंगळेंचा नेने ही मस्तच. किशोर कदम चा उस्मानचाचा, मधुरा वेलणकरची रेवती, अभिराम भडकमकर चा मिनिस्टर आणि अनंतचा मुंबईतला मित्र बाब्या (ऋषिकेश जोशी) सर्वांनीच आपल्या सहजसुंदर अभिनयाने या 'पाऊलवाटेवर' आपले ठसे उमटवले आहेत. एका छोट्याश्या भूमिकेतही सीमा देव यांनी जान आणली आहे.
प्रिमियर ला उपस्थित राहून, चित्रपटातले कलाकारही आपल्याबरोबरच बसून चित्रपट पहात आहेत या आनंदात ह्या पाऊलवाटेने जाण्यात मजा आली. चित्रपट संपल्यानंतर बाहेर आल्यावर समोर परत सुबोध भावे Happy प्रेक्षकांच्या चेहर्‍यावरचे भाव तपासण्यात गर्क असलेला. त्याला शेकहॅन्ड केल्यावर मी माझा हात अजून धुतला नाहीये. Proud
श्रीकांत मोघेंना भेटून धन्य झाले.
सर्वात शेवटी भेटली माझी मैत्रिण विभावरी देशपांडे Happy

आमच्या समोरच्या रांगेत एक उत्साही गृहस्थ बसले होते. अनंत, उस्मान यांच्या काही संवादांना त्यांची जोरदार दाद मिळत होती. त्यामुळे आमचं चांगलच मनोरंजन होत होतं.>>>>>>>>> रंगासेठ, अगदी अगदी Happy

(माझ्याकडचे फोटो साइज मोठी असल्यामुळे अपलोड होत नाहियेत :(... रंगासेठच्या पोस्ट नं २ प्रमाणेच ते फोटो आहेत)

ए विभावरीला मस्त दिसतोय ना नवीन हेअरकट?

सुबोधही शेकहॅन्ड! अगदी अगदी! Lol

मंजिरी, मस्त दिसत आहेस Happy फोटोही भारी सगळे

मस्त वृत्तांत. अगदी घरचे कार्य असल्यासारखी शोभा आली आहे. स्टार्स बरोबर आपले माबोकर बघून खूप छान वाट्ते.

मीही ६ च्या थोडा आधी पोहोचलो तर सिटी प्राईडला रांगोळी, सनई वगैरे जोरात होते. मी पार्किंगमधून बाहेर आल्यापासून "आपल्याला प्रिमीयरचा पास मिळणार आहे भौ" चा भाव चेहर्‍यावर घेऊन फिरत होतो पण बराच वेळ कोणी न दिसल्यामुळे तो भाव कधीच विरून गेला. मग तो भव्य पोस्टर दिसला, खाली मायबोलीचा लोगो दिसला.
citypride.jpg

लगेच साजिराही दिसला. पण मी इतर माबोकरांना आधी न भेटल्यामुळे तो माबोकरांशीच बोलत आहे की चित्रपटाचे निर्माते, तांत्रिक लोक, प्रसिद्धी प्रमुख इत्यादींशी "बिझिनेस" च्या गोष्टी करत आहे हे आधी कळाले नाही. त्यामुळे आपण घुसावे की नाही याचा एक दोन विचार करून शेवटी त्याला हात केला. तर ते आजूबाजूचे लोक म्हणजे मल्लिनाथ, रंगासेठ, ह.बा., मंजिरी सोमण आणि श्री व सौ जोशी होते, हे ओळखीनंतर कळाले. नंतर विशाल कुलकर्णीही आला.

मग थिएटरच्या उजव्या बाजूला जरा गर्दी दिसू लागली. त्यामुळे जरा फोटो काढावे म्हणून तेथे गेलो. त्याआधी ती रांगोळी, सनई वाले वगैरेंचेही फोटो काढले. मग सुबोध भावे व श्रीकांत मोघे दिसले. त्यांना एक फोटो काढला तर चालेल का विचारले, तर ते लगेच "हो काढ" म्हणून फोटो च्या पोज मधे उभेही राहिले.

paaulvat_smsb.jpg

जिप्सीच्या देऊळ प्रीमियर च्या लेखावर नंदिनीने दिलेल्या सल्ल्यामुळे कोठेही न बुजता विचारायचे असेच ठरवले होते आणि एकाही कलाकाराने आखडूपणा केला नाही. सगळे अगदी सहज तयार होत एक पोज देउन पुन्हा आपआपल्या चर्चेत मग्न होत होते, असा एकदम चांगला अनुभव. मधुरा वेलणकर-साटम बरोबर माबोकरांनी फोटो काढले.

तेवढ्या (चित्रपटाचा गीतकार व माबोकर) वैभव जोशी, संगीतकार नरेंद्र भिडे, दिग्दर्शक आदित्य इंगळे हे ही दिसले.
aPaulwat_vjs.jpg

हळुहळू तेथे चित्रपटाशी संबंधित लोक जमू लागले. पण मी बर्‍याच जणांना ओळखत नव्हतो. आधी पाउलवाट च्या वेबसाईटवरू शक्य तेवढे वाचून गेलो होतो, निदान त्यामुळे थोडे लोक तरी ओळखू शकलो. तेथे 'देऊळ' मधले काही कलाकारही आले होते. ज्योती मालशेशी (देऊळ मधली "पिंक्या") थोड्या गप्पाही झाल्या. तिचा देऊळ पहिलाच चित्रपट होता हे माहीत नव्हते. एखाद्या अभिनेत्याला/अभिनेत्रीला 'तुमचे काम मस्त झाले आहे, पण मला तुमचे नाव माहीत नाही' असे ऐकण्याचे प्रसंग क्वचित येत असतील Happy

तसेच नंतर देऊळ मधेच नानाच्या पुतण्याचे काम केलेला तो अभिनेताही दिसला. तेजस्विनी पंडित, संदीप खरे, विभावरी देशपांडे ई. लोकही आले होते. हे त्यांचे काही फोटो:

हृषिकेश जोशी

aPaulwat_hj.jpg

ज्योती मालशे व श्रीकांत यादव (देऊळ मधला नानाचा पुतण्या)

aPaulwat_jm.jpg

मधुरा वेलणकर-साटम
aPaulwat_mv.jpg

संदीप खरे
aPaulwat_sk.jpg

विभावरी देशपांडे (बरोबरचे माबोकर जाणकार ओळखतीलच Happy )
aPaulwat_vd.jpg

नंतरच्या स्टेजवरच्या कार्यक्रमाबद्दल रंगासेठ, मंजिरी यांनी लिहीलेलेच आहे.

चित्रपट चांगला वाटला. सुबोध, ज्योती चांदेकर, हृषिकेश जोशी, मधुरा, आदित्य सर्वांचीच कामे मस्त झाली आहेत. आदित्य इंगळेने नेनेंचे बेअरिंग सुरेख घेतले आहे. ज्योती चांदेकरांचेही तसेच. किशोर कदम चा उस्मानभाईही मस्त, त्याचे हिन्दी अभ्यासपूर्णरीत्या बरोबर केलेले वाटते पण अलिगढ मधे बालपण घालवलेल्या व्यक्तीचे "सहज" हिन्दी वाटले नाही. त्यामानाने सीमा देव चे वाटले. किशोर कदम चे काम मात्र मस्त झाले आहे. जुन्या एका मराठी चित्रपटामधे - बहुधा "रंगल्या रात्री अशा" -शरद तळवलकरांनी सारंगीवाल्या दादुमियॉचा जो एक रोल केला होता त्याबद्दल खूप वाचले होते, या रोल चे त्याच्याशी काही साम्य किंवा त्याचे इन्स्पिरेशन आहे की नाही कल्पना नाही. सुबोधला सुरूवातीला काम देणारे ते संगीत दिग्दर्शक - ते कलाकार कोण माहीत नाही, पण त्यांचे ही काम छान झाले आहे.

गाणी ही चांगली आहेत पण मला गीतरचना विशेष आवडली. वैभव च्या काही कविता/गझल्स माबोवर वाचलेल्या आहेत त्यामुळे गाण्यांच्या रचना ओळखीच्या वाटतात. हिन्दीत साहिर ज्याप्रमाणे ओळीत अर्थपूर्ण वाक्ये चपखल शब्दांसह वापरून पुन्हा त्याचे यमकही योग्यरीत्या जमून जात असे तसे काहीसे त्याची वाक्ये वाचताना वाटते. या चित्रपटातील मराठी/हिन्दी रचनाही तशाच आहेत. गाणे चालू असताना पुढच्या ओळींमधून आपल्याला काहीतरी अर्थपूर्ण ऐकायला मिळणार आहे अशा अपेक्षेने बसल्यावर आपली निराशा होत नाही.

चित्रपटात दोन प्रकारचे संवाद असलेले शॉट्स आहेत - काही जरा बुकिश/साहित्यिक संवाद तर इतर बरेच एकदम सहज्/हलकेफुलके संवाद - विशेषत: आक्का आणि नेने यांच्यातले किंवा आक्का आणि अनंत (सुबोध), अनंत आणि बाब्या (हृषिकेश) यांच्यातले.

मात्र पूर्वार्धात सिटीप्राईडने अत्यंत लाऊड बॅकग्राउंड करून ठेवल्यामुळे रसभंग होत होता (रंगासेठने उल्लेख केलेल्या पुढच्या रांगेतील कॉमेंट्स वगळून सुद्धा Happy ), आणि एसीही जरा जास्तच थंड करत होता. मध्यंतरानंतर मात्र हे दोन्ही प्रॉब्लेम आले नाहीत.

परवा देऊळ बद्दल लिहीताना डॉ मोहन आगाश्यांच्या ऐवजी चुकून श्रीकांत मोघे लिहीले होते तर आठवड्यातच त्यांची भेट झाली. त्यामुळे या लेखात "चुकून" अमिताभ बच्चन आला होता म्हणून लिहीणार होतो Happy

छान... सॅटॅलाइट सुविधेमुळे हल्ली आमच्या गावातही सगळे पिक्चर अगदी लवकर येतात.. हा पिक्चर बघायला हवा.

आई शप्पथ जळून खाक!
सोडा कंपन्या च्या मायला..
भंगार डिलिव्हर्‍या करा, इथे यायचे सोडून.
हाड!

जबरदस्त वृत्तांत!!! Happy बघालाच्च हवा चित्र्पट!!!

त्या नानाच्या पुतण्याचे जरा बटाट्याची चाळ मधल्या काशिनाथ नाडकर्ण्याचा मुलगा सारखे झाले आहे पण मी वेबवर शोधले तरी त्याचे नाव कळाले नाही. कोणाला माहीत असेल तर सांगा, करेक्ट करेन.
(साजिर्‍याच्या खालील माहितीवरून मूळ पोस्ट मधे करेक्शन केली आहे. धन्यवाद साजिरा).

फारेंडा, तो श्रीकांत यादव आहे. अत्यंत गुणी कलाकार. त्याच्याशी बोललात, तर तो त्याच्या मूळ खान्देशी टोनमध्ये बोलतो. चित्रपटांत तो पुणे आणि नगर जिल्ह्यातल्या ग्रामीण माणसाचा रोल करतो. अत्यंत चपखल, आणि तो त्या प्रदेशात जन्मला नाहीये, अशी अजिबात शंका न येण्याइतका अफाट. हा गिरीश-उमेशचा आवडता कलाकार (आणि माणूसही). देऊळमध्ये त्याने फारच भारी काम केलेय.

वाह, मस्तच वृतांत आणि फोटोज. मी जबरदस्त 'जे', कारण हातात आलेलं तिकीट नाकारायला लागलं. माझा फेवरिट सुबोध भावे येणार असुन मला जाता नाही आलं, हे किती वाईट. एकदम झकास तयारी केली होती प्रिमियरला जायची, पण.....

साजिरा, मी तुला आदल्या दिवशी फोन केला होता ३-४ वेळा, पण तु रेंजबाहेर आहेस असा मेसेज आला, म्हणुन तिकिटाचा निरोप प्रत्यक्ष देता आला नाही.

btw ती पिंक ड्रेसमधली माबोकरीण मधुरा वेलणकर पेक्षा सुंदर दिसते आहे. Happy

एक भा प्र.! मांग मे सिंदुर मराठी लोकात अस्तो का? की एकता कपूर रोग म्हणायचा ह्याला! (रेफ. वेलणकर-सावंत)

सिटी प्राइड कोथ्रुड बघून नॉस्टॅलजिआ एकदम :).
मस्तं फोटोज आहेत सगळे, रांगोळी-सनई वातावरण निर्मिती झाली एकदम.
मधुरा वेलणाकरचा हेअरकट सही, विभावरी पण स्मार्ट दिसतेय शॉर्ट हेअर कट मधे.

परवा देऊळ बद्दल लिहीताना डॉ मोहन आगाश्यांच्या ऐवजी चुकून श्रीकांत मोघे लिहीले होते तर आठवड्यातच त्यांची भेट झाली. त्यामुळे या लेखात "चुकून" अमिताभ बच्चन आला होता म्हणून लिहीणार होतो स्मित
<< :).
हे वाचताना पोस्ट फारेंड ची असणार ओळखलच :).

आईग्ग्ग्ग्ग...! भन्नाट! श्या.... पुण्यात का नाहीये मी आत्ता? Sad प्रिमीयर आणि ते पण सिटी प्राईड ला.....!!

मस्त फोटोज आणि रिव्ह्यु.
हल्ली मायबोलीला एक ग्लॅमर आल्यासारखं वाटतयं.
मी माझा हात अजून धुतला नाहीये. >>> श्शी , मंजीरी हात धु तो आधी Proud Light 1

'पाऊलवाट'च्या प्रीमियरचा सोहळा मुंबईच्या पीव्हीआर सिनेमात १७ नोव्हेंबरला दणक्यात पार पडला. चित्रनाट्यसृष्टीतले अनेक तारे 'पाऊलवाट'च्या टीमला शुभेच्छा देण्यासाठी, कौतुक करण्यासाठी उपस्थित होते.

या सोहळ्याची ही क्षणचित्रं...

रवींद्र साठे, मुक्ता बर्वे आणि आनंद इंगळे

PA7.jpg

नरेंद्र भिड्यांना शुभेच्छा देताना केदार शिंदे

PA8.jpg

राजदत्त आणि वैभव जोशी

PA9.jpg

संजय जाधव व सुबोध भावे

PA10.jpg

सचित पाटील व महेश लिमये

PA11.jpg

टीम 'पाऊलवाट'

PA12.jpg

पद्मजा फेणाणी जोगळेकर व ज्योती चांदेकर

PA1_0.jpg

सीमा देव

PA3.jpg

अमृता सुभाष

PA4.jpg

रमेश देव

PA5.jpg

अभिनय देव, रमेश देव आणि सुबोध भावे

PA6.jpg

तो 'सचित जोशी' एकदम 'शर्मन जोशी ' सारखा दिसतोय इथे Proud
बस्के Rofl
पोस्ट पाहिली तर खरच मी 'शर्मन वे' लिहिलं होतं , मला वाटलं तूच चुकुन लिहिलस तिथे Biggrin

छान वृतांत.

फोटोंचे टायटल वाचताना त्या ब्राउन साडीतल्या बाई पण माबोकर असाव्यात असे वाटले Uhoh

Pages