'पाऊलवाट' प्रीमियर- वृत्तांत, छायाचित्रे व परीक्षणे

Submitted by माध्यम_प्रायोजक on 19 November, 2011 - 01:08

कोथरुडमधल्या 'सिटीप्राईड' येथे 'पाऊलवाट'चे संध्याकाळी सहा व सात वाजता- असे दोन प्रीमियर शो झाले. या दोन्ही खेळांना चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक, संगीतकार, गीतकार, कलाकार असे सारे उपस्थित होते. या कीर्तीवंतांची मांदियाळी, रांगोळ्या, लाल गालिचे, सनईचे सूर, कॅमेर्‍यांचा क्लिकक्लिकाट अशा भारलेल्या वातावरणातल्या या प्रीमियरना १४ मायबोलीकरांना उपस्थित राहण्याची संधी मिळाली.

उपस्थित मायबोलीकरांनी इथे वृत्तांत व फोटो टाकावेत. तसेच चित्रपटाबद्दल काय वाटलं, ते लिहावं, ही विनंती.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर्वांचा उत्साह येथपर्यंत पोचला Happy . छान.
सिनेमा आमच्या गावात आला तर नक्की पहाणार. देऊळ पण येतोय इथे.

पाउल वाट च्या सर्व टीम ला शुभेच्छा.... खूप दिवसांनी वैभव पहायला मिळाला... त्याचे mail id or contact no मिळाला तर बरे होईल ... त्याच्या कविता... चारोळी ... याने माबो वर धमाल केली होती...

मस्त वृत्तांत

अवांतर - रंगासेठ यांचा ' आमच्या सांगलीहून ' हा शब्द प्रयोग आवडला

( सांगलीकर ) अमोल केळकर

इतके दिवस माबो वर पाऊलवाट चा जो वृत्तांत, फोटो आणि वर्णन येत आहे ते सगळच भारी. चित्रपट बघण्याची उत्सुकता त्याने खूपच् वाढली आहे.
पाऊलवाट बद्दल सगळ्या पेपरातूनही खूप कौतुक येत आहे. माध्यम प्रायोजक म्हणून मायबोलीने घेतलेले सर्व परिश्रम आणि वाटचाल मस्तच आहे. सर्व टीमचे अभिनंदन.
सोनाली

मला खुपच उशीर झाला वाटातं.. Uhoh

असो, सर्वप्रथम साजीराचे आभार. Happy ऐनकेन प्रकारेन, त्याच्या मोबाईल वरुन माझ्या मोबाईल वर फोन आला. म्ह्ंटले परत टि-शर्ट टोप्यांचच कै तरी प्रकरण पेटलं असेल. पण प्रिमिअर बद्दल विचारल्यावर आनंद गगनात माईना झालं. त्याला होकार देउन फोन ठेवल्यावर कळलं की पिक्चर तर शुक्रवारी रिलीज होनार, प्रिमीअर सुद्धा शुक्रवारी. Uhoh सुट्टीची बोंब होईल वाटलं, ऐन वेळेस नाही गेलो तर... ? पण शुक्रवारी काहीतरी फेका-फेकी करुन कसा बसा हाफ डे मिळवला. Happy तेव्हा प्रिमीअर च्या निमंत्रणापेक्षा जास्त आनंद झालेला. ठरल्याप्रमाणे ५.०० वाजता सिटीप्राईडला पोहचलो आणि साजीराला फोन लावला तर तो अजुन निघालाच नव्हता. म्हंटलं तो पर्यंत सिटीप्राईडच्या आवारात बागडु. Happy प्रिमीअर च्या कार्यक्रमाची तयारी चालु होती. एक कलाकार आपली 'पाऊलवाट' गिरवत होता. त्याचे काहीक्षण टिपले...

मराठी कार्यक्रम आणि सनई चौघडे नाही असं होणार नाही... Happy

आत्ता पर्यंतच्या सगळ्या पोस्ट वरुन तुम्हाला कळंलंच असेल की ही कथा आहे एका स्ट्रगलर ची, जो एक उत्तम गायक होण्याची स्वप्नं घेउन मुंबईला येतो. चित्रपट पहायच्या आधी मलाही असंच वाटलं होतं की ही स्ट्रगल करणार्‍या त्या गायकाची 'पाऊलवाट' असेल. पण जेव्हा चित्रपट गृहातुन बाहेर आलो तेव्हा विशालला एकच वाक्य बोललो "म्हातारीने आख्खा पिक्चर खाल्ला." कारण हा चित्रपट पाहताना सुरवातीला जरी वाटत असले की आपण अनंताची पाऊलवाट चालतोय, पण शेवट झाल्यावर कळतं की आपण आक्कांच्या पाऊलवाटेचा एक भाग होतो. हे ट्रान्स्फोर्मेशन इतक्या नकळत झालंय, आणि त्या बद्दल दिग्दर्शकांच्या कौशल्याचं कौतुकच करायला हवे.

चित्रपटातले एक एक प्रसंग अप्रतिम आणि आगदी सहज गुंफलेत. उस्मान भाई, एका संगीत पर्वाचे जिवंत साक्षीदार. एकीकडे अनंताचे एका संधीसाठी स्ट्रगल, उस्मान भाईचे कमी होत जाणारा मान आणि धन, मुमताजबेगचे आयुष्याशी स्ट्रगल, इतक्या सगजपणे या गोष्टी एकमेकांत गुंतवलेत की कुठेही वाटत नाही की यांचा एकमेकांशी काही संबंध नाही. एकीकडे अनंताचे उत्तम गाण्यासाठीचा तगादा, दुसरी कडे "दुनियाको सिर्फ साऊंड चाहीये, शोर चाहीये, अपनी टेन्शन्स भुलाने के लीये." म्हणनारे उस्मान भाई. एकीकडे संसाराची स्वप्ने पाहणारा अनंता, तर दुसरीकडे प्रॅक्टिकल विचार करनारी रेवती. एकीकडे २० रुपयांच्या बक्षीसाने सोन्याहुन पिवळा होणारे नेने, दुसरीकडे बाळकृष्णाची पोथी जपणार्‍या आक्का. किती हा विरोधाभास, प्रत्येक पात्राला एक स्वतःच वलंय आहे तरीही तो 'पाऊलवाटे'वर एकसंधपणे चालताना दिसतोय.

सुरवातीला चित्रपटातली ब्लॅक-अँड-व्हाईट कट्स हे आक्कांच्या आयुष्याबद्दल, त्यांच्या रोख-ठोक आणि व्यवहारी स्वभावा बद्दल गुढ राखुन चालतात. दिग्दर्शकांचा तो फॉर्म्युला एकदम लागु पडलाय. आणि अगदी मानधनचा जल्लोष सारख्या सहज प्रसंगातुन तो गुढ उकल्लाय. चित्रपटात असे खुप प्रसंग आहेत ज्यांच्या बद्दल आवर्जुन लिहावं वाटतंय, पण ते तुम्ही स्वतः पडद्यावर अनुभवा. त्याची मजाच वेगळी असते. कलाकाराच्या अभिनयावर, एखाद्या प्रसंगावर, एखाद्या संवादावर नकळत तोंडातुन दाद येईल तेव्हाच चित्रपट पाहील्याचं खरं समाधान.

या चित्रपटात मला काही त्रुटीही जाणवल्या, कदाचित माझा दृष्टीकोन वेगळा असेल. पहीली गोष्ट जी मला खटकली म्हणजे साऊंड. चित्रपटाच्या मध्यांतरा आधीच्या भागात आवाजाचं गणित जरा चुकलेलं होतं. सवांद, गाण्याचे बोल या पेक्षा संगीत, पार्श्व संगीतच जास्त होतं. त्यामुळेच कदाचीत गाण्याचे बोल कोणाच्या लक्षात राहीले नसावेत. हे कदाचीत ब्रॉड्कास्टरला समजले असावे, किंवा कोणीतरी जाउन तक्रार केली असावी की काय म्हणुन मध्यांतरा नंतर तो आवाज जरा कमी झाला. Happy उस्मान भाईंचं हिंदी खटकली. रेवतीचा ड्रेस खटकला. विश्ल्याला म्हंटलं अरे ही एक तास झाली तोच ड्रेस घालतेय तर म्हणे "अरे ती नेनेंची आहे... Proud "
आणि अनंताच्या घरच्यांना दिग्दर्शांनी वाळीतच टाकलेले. Sad सुरवातीच्या दोन चार फ्रेम नंतर बिचारे कधी दिसलेच नाहीत. अनंताने साधा एक फोन सुद्धा केला नाही त्यांना किंवा त्यांना मुलाची चौकशीही करावी वाटली नाही. एवढं त्याने अल्बम काढाय्चा विचार केला आणि घरचे पिक्चर मध्येच नाहीत. ते फार खटकले. असो, दिग्दर्शकाला कदाचीत काहीतरी वेगळं सुचीत करायचे असेल, जे मला उमगले नसेल. पहा तुम्हाला उमगते का. Happy

तशी ही कथा खुपच साधारण आहे, आणि या आधी कितीतरी चित्रपटात कित्येकजण आपापली स्वप्ने घेउन मुंबईत आलेली आहेत आणि यशस्वी झालेत. पण आनंद इंगळेंनी तो मोह टाळुन ज्या पद्धतीने हा चित्रपट संपवलाय तो आवडला. आक्कांची पाऊलवाट पुढे अशीच चालु ठेवायची, सुधारायची कल्पना काहीतरी वेगळं आहे सांगुन जाते.

एकंदरी हि 'पाऊलवाट' तुम्ही चालुन पहायला हवी. अनंताची म्हणुन नव्हे तर आक्काची म्हणुन !

(त. टी. : सर्वांनी आधीच कलाकारांचे फोटो टाकले आहेत, त्यामुळे मी तो मोह टाळतोय. Happy )

पाऊलवाट'च्या प्रीमियरचा सोहळा ....प्रथमच एखाद्या चित्रपटाच्या प्रिमियरला जाण्याची संधी.. सोहळा अतिशय सुरेख , आणि त्या उत्साहाच्या वातावरणात पाउलवाट बघण्यातली मजा , हा एकंदरीत अनुभव खूप वेगळा आणि छान होता. सिनेमा आणि त्यातील गीते पण मस्तच !!!!माझ्याकडचे फोटो टाकत नाही कारण त्यातील सगळे फोटो वर आहेतच.

मल्ल्या मस्तच रे ! ते अनंताच्या घरच्या माणसांचं मी विसरलोच होतो बघ. ते जरा खटकलंच !

Pages