निसर्गाच्या गप्पांचा चौथा भाग चालू होत आहे त्याबद्दल सर्व निसर्गप्रेमींचे अभिनंदन. निसर्गची ओढ असणार्या व्यक्तींचे इथे केव्हांही स्वागत आहे.
निसर्गमय झालेले आयडी (माझ्या स्मरणशक्तीच्या जोरावर आणि मागच्या धाग्याचे संदर्भ घेऊन मी खाली आयडींची नावे देत आहे. कोणी राहून गेले असल्यास प्रतिसादात टाका, वेळ असल्यास माझ्या विपुतही टाका मी अपडेट करेन). ह्या सर्वांच्या निसर्गावरच्या प्रेमामुळे निसर्गाच्या गप्पांच्या चौथ्या भागाची सुरूवा होत आहे.
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १
४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
२] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन
३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर
४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर
९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर
१०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री
११] गोईण - डॉ. राणी बंग
१२] कदंब - दुर्गा भागवत
१३] रानवाटा - मारूती चितमपल्ली
१४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली
१५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर
१६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली
१७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे
१८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
१९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली
२०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली
२१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली
२२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली
२३] रातवा - मारुती चितमपल्ली
२४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली
२५] निळावंती - मारुती चितमपल्ली
२६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली
निसर्गाशी निगडीत वेबसाईट्सच्या लिंक.
१] http://www.flowersofindia.net
२] http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/
३] http://www.maydreamsgardens.com/
४] http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
५] http://indigarden.blogspot.com/
६] http://gardenamateur.blogspot.com
७] http://the-urban-gardener.blogspot.com/
८] http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
९] http://lifeonthebalcony.com
१०] http://balconygarden.wordpress.com/
११] http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
१२] http://mrbrownthumb.blogspot.com/
१३] http://the6x8garden.blogspot.com
१४] http://theurbanbalcony.blogspot.com/
१५] http://raanaphule.blogspot.com/ (मायबोलीकर स_सा यांचा ब्लॉग)
कणकेचेच पोटीस. भाजल्यावर
कणकेचेच पोटीस.
भाजल्यावर (अर्थात गंभीर नसल्यास) पण लावता येते. तव्यावरच्या चपातीच्या वाफेचा चटका बसला तर बायका पटकन परातीतल्या कणकेला हात लावतात. अगदी नैसर्गिक आहे ते.
यावरुन आठवलं - लहानपणी
यावरुन आठवलं - लहानपणी पडणेझडणे चालूच असायचे - थोडंसंच खरचटणं / जखम असेल की एकदांडी / दगडीपाला हातावरच चुरुन लावायला सांगायची ही मोठी मंडळी...... लहानपणी डॉ. कडे फारसे गेल्याचे आठवतच नाही मला..... अजून काही वृद्ध मंडळी अभिमानाने सांगत असतात - अंगाला एकदाही सुई म्हणून लागली नाही - खरी भाग्यवान मंडळी......
मी लहानपणी पडून लागल्यावर कधी
मी लहानपणी पडून लागल्यावर कधी बाजारातले औषध लावलेच नाही. आमच्या घरात नसायचेच. कारण काही लागले की आजी लगेच पारींग्याचा पाला आणून हातावर चोळून रस काढून तो जखमेवर लावायची. रक्त तर लगेच थांबायचे पण जखमही लवकर भरायची दोन्-तिन वेळा लावल्यावर. हे मी आधीही इथे लिहील होत मला वाटत.
त्याचप्रमाणे आजी माक्याचा, भांबुर्ड्याचा पालाही कधी कधी चोळायची.
कानात दुखायला लागले की मखमालीच्या (झेंडूच्या) पाल्याचा रस टाकायची.
फोडा सारखे काही उठले की तुळशीचा पाला किंवा लालमाती लावायची.
जन्त झाले अस वाटल की कोवळ्या कुयलीच्या रोपांची मुळे चावायला द्यायची. त्याचा रस गिळायचा. मस्त लागतात मला आवडायची.
(No subject)
तुम्हाला वाचुन आश्चर्य वाटेल
तुम्हाला वाचुन आश्चर्य वाटेल पण आज मी सकाळी ऑफिसला निघताना चिमण्यांचा चिवचिवाट ऐकला. मला खरेच आजकाल पुण्यात चिमण्या औषधाला पण दिसत नाहीएत.
मी लकी आहे या बाबतीत. रोज
मी लकी आहे या बाबतीत. रोज सकाळी बेडरुमच्या खिडकीबाहेर दयाळ गातो. मेला ५.३०-६ वाजल्यापासुनच गळा तापवायला लागतो आणि माझी झोपमोड करतो
मला जाग आल्यावर पक्ष्यांचा किलबिलाट ऐकु आला की खुप वाईट वाटते. पक्षी गाताहेत म्हणजे आपण उठण्याची वेळ झाली. शांतता आहे म्हणजे अजुन थोडा वेळ झोपायला स्कोप आहे
शोभा मस्त फोटो आहे गं! कुठला
शोभा मस्त फोटो आहे गं! कुठला आहे?
साधना, मेला ५.३०-६ वाजल्यापासुनच गळा तापवायला लागतो आणि माझी झोपमोड करतो>>>
कावळे कधी कधी रात्री भेसूर
कावळे कधी कधी रात्री भेसूर आवाजात ओरडायला लागतात. बहुतेक वटवाघळांचे आणि त्यांचे वाजलेले असते.
केनयातल्या लेक व्हीक्टोरियाच्या काठावर आणखी वेगळ्या तर्हेचे बगळे दिसतात. त्यांच्या डोक्याच्या मागे पण चोचीसारखा भाग असतो. रंगाने तपकिरी असतात. माझे आणि माझ्या मित्राचे घर समोरासमोर होते. आम्ही सर्वजण संध्याकाळी गप्पा मारायचो. तर आमचा आवाज आम्हाला ऐकू यातचा नाही, इतक्या मोठ्या आवाजात हे पक्षी घरावर बसून ओरडायचे. काही माझ्या घरावर काही त्यांच्या घरावर.
नुसती आवाजी. झटापट नसायची.
मित्राची बायको म्हणायची, लग्नाची बोलणी चाललीत. "स्थळा"तले दोष सांगितले जाताहेत. मानपानाच्या याद्या होताहेत... मग आम्ही त्यानुसार ते काय बोलत असतील त्याची कल्पना करायचो.
आणि हे चंदनेश्वर तर वाळत घातलेले मोजे, रुमाल अलगद पळवायचे. त्यांच्या घरट्यात ठेवायला.
शोभा, फोटोबद्दल चार शब्द ?!!!
शोभा, फोटोबद्दल चार शब्द ?!!!
>>>पक्षी गाताहेत म्हणजे आपण
>>>पक्षी गाताहेत म्हणजे आपण उठण्याची वेळ झाली. शांतता आहे म्हणजे अजुन थोडा वेळ झोपायला स्कोप आहे
त्यांना इथल्या पक्षांना शिकवायला फ्लोरिडात पाठवा. अंगणातल्या तळ्याभोवती रात्रीबेरात्री बदकं ओरडतात, त्यांना काही काळावेळ नाही.
अगदी रांगेत चालून, रिच्युअल असल्यासारखं क्वॅक क्वॅक करत तळ्याभोवती प्रदक्षिणा मारतात. त्यांच्या जोडीला क्रेनपक्षी येतात. ते केकाटले की शेजारच्या विद्यार्थ्यांच्या वीकएंड पार्टीतला स्टिरिओ बरा, असं वाटायला लागतं. शेवटी काय, परिसर पंखवाल्या केकाट्गटाचा. आपणच उपरे म्हणून काही करता येत नाही.
शाहाणे पक्षी आहेत.
त्यांना इथल्या पक्षांना
त्यांना इथल्या पक्षांना शिकवायला फ्लोरिडात पाठवा. अंगणातल्या तळ्याभोवती रात्रीबेरात्री बदकं ओरडतात, त्यांना काही काळावेळ नाही. अगदी रांगेत चालून, रिच्युअल असल्यासारखं क्वॅक क्वॅक करत तळ्याभोवती प्रदक्षिणा मारतात. त्यांच्या जोडीला क्रेनपक्षी येतात. ते केकाटले की शेजारच्या विद्यार्थ्यांच्या वीकएंड पार्टीतला स्टिरिओ बरा, असं वाटायला लागतं. शेवटी काय, परिसर पंखवाल्या केकाट्गटाचा. आपणच उपरे म्हणून काही करता येत नाही.>>>>>>>>>>>>>

मृण्मयी दिनेश, तुम्हाला बरेच
मृण्मयी
दिनेश, तुम्हाला बरेच दिवस सांगणार होते पण लक्षात राहातच नव्हते. मागे तुम्ही कुठल्यातरी झाडावर बसल्यावर कावळाही चांगला ओरडतो म्हणुन लिहिलेले. मी कावळ्यांचे वेगवेगळे आवाज ऐकलेत हल्ली. काही कावळे तर चक्क कोंबडीसारखे नुसतेच कॅक कॅक करतात. ऐशुच्या मते त्यांचे घसे बसले असावेत. आता तर कावळे कावळ्याचे सोडुन बाकीचेच आवाज काढताना दिसतात. असला विचित्र आवाज कोण काढतय म्हणुन खिडकीबाहेर डोकवावे तर कावळा ओरडतोय बिचारा. माणसांचे अन्न खाऊन खाऊन पक्षी व प्राणी बदलताहेत असे माझे हळुहळू मत होतेय.
मी ह्या धाग्याला रोज रिलिजसली
मी ह्या धाग्याला रोज रिलिजसली भेट देते, पण शेअर करायला काहीच माहिती नसते, म्हणुन एक मुक वाचक आहे मी. काल दिनेशदांची आणि मग जागुची पोस्ट वाचुन मलाही आज धोक्याची सुचना लिहाविशी वाटली.
माझ्याकडे एक फिकट हिरव्या आणि पांढर्या रंगाची डिझाइन असलेलं शोभेचं रोपटं आहे. ते अनेक महिने लिविंगमधे होतं. नंतर काही पानं वाळली म्हणुन मी हाताने तोडली. तेव्हा बाजुच्या पानांमधुन आलेला रस बोटांना लागला आणि झोंबला. मी बोटं लगेच धुतली, पण धुताना तो रस सगळ्या बोटांना पसरला. रस लागल्यापासुन २ मिनिटात बोटं खाजायला लागली, ५-७ मिनिटात प्रचंड आग व्हायला लागली आणि साधारण ४५ मि ते १ तासात बोटांना ब्लिस्टर्स आले. हा त्रास इतका असह्य झाला कि dermatologist क्डे जावं लागलं आणि जवळ जवळ २-३ आठवडे बोटांना इरिटेशन, स्कीन निघणं असं काहीतरी होत होतं. तेव्हापासुन मी इतका धसका घेतला आहे कि तुळशीला सुद्धा ग्लव्हज शिवाय हात लावत नाही, सो लोकहो सावधान. ही रोपं फार कॉमनली सगळीकडे दिसतात. मी फोटो टाकेनच, म्ह़णजे तुम्हालाही यापासुन सावध रहाता येइल. बागकाम करताना काळजी घ्या.
मनिमाऊ, हे वाचुन मला
मनिमाऊ, हे वाचुन मला विज्ञान-कम्-गुढकथा वाचल्यासारखे वाटले एकदम.
आपण शोभेची म्हणुन ठेवतो ती रोपेही कित्येकदा विषारी असु शकतात, फक्त आपल्याला माहित नसते. डायफनबेकिया खुप जणांकडे असते. त्याची पाने तोडल्यावर निघणारा रस विषारी असतो हे आम्हाला कलबागसरांनी सांगितलेले. रुईच्या पानांचा डिंक, एरंडाच्या फळांचा स्त्राव इ. पण थोडेफार विषारी असतात. त्यामुळे काळजी घेतलेली बरी असते. दिनेशनी लिहिल्याप्रमाणे झाडांपासुन निघणा-या स्त्रावांपासुन आपण सावध राहिलेले बरे.
कावळे उत्कृष्ट नकलाकार असतात
कावळे उत्कृष्ट नकलाकार असतात असं माझंही मत आहे. कारण ते अनेक आवाजांची नक्कल करू शकतात. माझ्या ऑफिसच्या इथे पिंपळाच्या झाडावर एक कावळा बसायचा; खालून मांजर गेलं की तो त्याच्या ओरडण्याची नक्कल करायचा, बिल्डिंगचं काम चालू होतं; कामगारांनी काही ठोकाठोकी केली की हा तसा आवाज काढायचा!
एकदा ३/४ लोकं खाली उभे राहून जरा मोठ्या आवाजात बोलत होते; तर हा शहाणा कावळा त्यांच्या बोलण्याची अगदी सही नक्कल करत होता!
त्याशिवाय त्यांचा ग्रूप सेन्स खूप चांगला असतो. थव्यातल्या एखाद्या कावळ्याला माणसापासून काही इजा वगैरे झाली तर इतर कावळे त्या माणसाला नको जीव करून टाकतात. किंवा एखादा कावळा मेला तर बराच काळपर्यंत ते कावकाव करून शोकसभा घेऊन श्रद्धांजली व्यक्त करतात!
थव्यातल्या एखाद्या कावळ्याला
थव्यातल्या एखाद्या कावळ्याला माणसापासून काही इजा वगैरे झाली तर इतर कावळे त्या माणसाला नको जीव करून टाकतात
साधना, अगं खरंच घाबरायला झालं
साधना, अगं खरंच घाबरायला झालं होतं मला. एवढं होवुनही मी ते रोप अजुन टाकलं नाही. छान दिसतं ते. मोह सुटत नाही.
साधना रुईच्या चिकावरून आठवल.
साधना रुईच्या चिकावरून आठवल. जेंव्हा पायात काटा रुततो आणि त्यावेळी रुईचा चिक काटा गेलेल्या जागी टाकतात. मग ती जागा चिमटीत पकडली की काटा लगेच बाहेर येतो.
लहान बाळाचे पोट दुखत असते तेंव्हा रुईच्या पानांना खराट्याच्या पाठच्या बाजूने ठोका देऊन किंवा कशानेतरी टोचुण ते पान पोटावर ठेवून फडक्याने शेकवले की पोट दुखायचे थांबते असे म्हणतात.
पुर्वी पापड करताना रुईची पाने पाण्यात उकळवून पाने काढून टाकून राहीलेले पाणी पापड मळण्यासाठी घेत.
आमच्याकडे पावसाळ्यात एक खाजेरी वनस्पती उगवते. पान कातरी, पोपटी असतात. त्याच्या खोडापासून पानाच्या कडांपर्यंत बारीक लव असतात. ती रोपे तण म्हणून काढताना किंवा नुसता हात जरी लागला तरी खुप खाज येते. येत्या पावसाळ्यात फोटो टाकेन.
मृण्मयी मने त्या झाडाचा फोटो
मृण्मयी
मने त्या झाडाचा फोटो नक्की डकव येथे
साधना, शांकली छान माहिती.
हे का गं???
हे का गं???
नाही. हे नाही. अगं लिविंगमधे
नाही. हे नाही. अगं लिविंगमधे खुप कॉमनली असतं. आता दिवाळीत आई आली तेव्हा तिने रागाने कट केलं होतं. सध्या वाढलं तरी तसं छोटंच आहे. थांब नाव विचारते तिला फोन करुन.
डंब केन नाव म्हणे त्याचं.
डंब केन नाव म्हणे त्याचं. गुगलवर बघितलं. त्याचं टायटलच - poisonous house plant असं आहे. प्लान्टस घेताना नाव विचारत नाही मी, त्याचा हा परिणाम. नाव माहित असतं तर गुगललं तरी असतं आज पर्यंत कधी. या पुढे नाव विचारल्याशिवाय आणि गुगलल्याशिवाय नो गार्डन.
हे शाणं आहे, एक गोडु.
आणि
मनीमाऊ छान फोटो आहेत.
मनीमाऊ छान फोटो आहेत.
आग्गं मने त्या पॉईझन प्लांटचं
आग्गं मने त्या पॉईझन प्लांटचं फोटो दे नाSSSsss.....
अगं मने मी ते खाजखुजलीचं झाड
अगं मने मी ते खाजखुजलीचं झाड टाकलंय वर.. जागूसाठी.
आणि तुझे डंब केन म्हणजेच डायफनबेकिया. पाने दिसतात सुरेख पण पानांचा चिक विषारी असतो.
चातका dieffenbachia म्हणुन सर्च मार. खुप कॉमन आहे हे रोप.
शांकली, कावळ्यांबद्दल नवीनच
शांकली, कावळ्यांबद्दल नवीनच काहितरी वाचतोय. मी अंड्यावर बसलेल्या कावळीबद्दल लिहिले होते.
आमच्याकडे थोडे वेगळे असतात कावळे. त्यांचा गळा आणि पोट पांढरे असते आणि आकार निदान दिडपट. आवाजही कर्कश असतो. पण सहसा माणसांच्या जवळ येत नाहीत (पिंडाचे वगैरे काम करावे लागत नसेल)
मनिमाऊ, एक ब्रिटल म्हणून पण असेच खाजरे झाड असते.
साधना, मला पण या झाडाचा चांगलाच प्रसाद मिळाला होता.
एक माहिती आहे का ? उसाच्या वगैरे पानावरचे जे काटे असतात ते जवळजवळ काचेसारखेच असतात. म्हणून तर टोचतात. म्हणजे माणसाने काचेचा शोध लावायच्या आधी, झाडांनीच लावला होता.
dieffenbachia म्हणुन सर्च
dieffenbachia म्हणुन सर्च मार. खुप कॉमन आहे हे >>>>>>>>>
http://www.google.co.in/search?hl=en&nord=1&q=dieffenbachia&gs_sm=&gs_up...
दिनेश, उसाचे काटे टोचत नाहीत
दिनेश, उसाचे काटे टोचत नाहीत तर सरळ कापतातच
उसाच्या फडात काळजी न घेता जोरात घुसले तर दंडांवर कापले जाते.
दिनेश हे झाड मी आंबोलीला पाहिले. त्याला वर गोल हिरवी बोंडेही आलीत पाहा. आईने ह्याला ती खाजकुयली म्हणते सांगितले. ऐशु मॅडम हिमाचलची सफर करुन आल्यात, त्यांनी बिच्चुबट्टी म्हणुन सांगितले. अर्थात ह्याचा स्पर्शही एकदम भारी आहे, मस्त खाज सुटते यावर दोघींचेही एकमत झाले.
अरे हे प्लांट तर अगदी लहानपणी
अरे हे प्लांट तर अगदी लहानपणी खुप म्हणजे खुपच वेळा हाताळले आहे.... यांना डहाळ्या नसतात्...एका खोडावर एकावर एक मोठी लांबट पानेच फक्त.....अगदी याची पाने ब्लेडने चिरली सुध्दा होती खेळताना...त्या वेळी असंकाही जाणवलं नाही....आता या झाडांना काय झालं?
धन्स साधुतै,गिरी...
पण सहसा माणसांच्या जवळ येत नाहीत (पिंडाचे वगैरे काम करावे लागत नसेल) >
चातका, काहीजण जास्त सेन्सिटिव
चातका, काहीजण जास्त सेन्सिटिव असु शकतात नाही का?
माझ्या आठवणीप्रमाणे याची पाने तोडल्यावर पाढ-या रंगाचा चिक गळतो खोडातुन आणि तो साधारण विषारी असतो पण जीव वगैरे जाण्याइतका नाही. मनीमाऊला जरा जास्तच त्रास झाला. कदाचित त्या पर्टिकुलर झाडात विषारी गुण जास्त असावा.
Pages