हॅरी पॉटर

Submitted by चिमुरी on 2 August, 2011 - 23:04

हॅरी पॉटरवर बोलण्यासाठी हा धागा....

'स्पॉयलर अलर्ट' : ज्यांनी पुस्तके वाचली नाहियेत किंवा सगळे मूव्ही बघितले नाहियेत पण वाचायची किंवा बघायची इच्छा आहे आणि ज्यांना कोणतेही सस्पेन्स आधी कळायला नको आहेत त्यांच्यासाठी हा अलर्ट... वाचताना जरा जपुन वाचा.. कोणत्याही पोस्टला आता सस्पेन्स कळेल अशी अंधुकशीही शंका आली तर पुढे वाचु नका... ज्यांचे सगळी पुस्तके वाचुन झाली आहेत आणि मूव्हीज बघुन झाले आहेत अश्यांनी सगळ्या पोस्ट्स वाचायला हरकत नाही....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हॅग्रीडवर तळघर उघडल्याचा आरोप का होतो? कारण आळ तर अरागोगवर आलेला असतो, आणि तो तर आधीपासून बाहेरच असतो. तळघर उघडायचा संबंध येतोच कुठे?

जामोप्या, अरागॉग हा तळघरात्ला मॉन्स्टर आहे अशी टॉम रिडल सर्वाची समजूत करून देतो. आणि त्या मॉन्स्टरला हॅग्रिडने तळघरातून आणले आहे अशीदेखील. अरागॉग हॅग्रिडकडे सापडल्याने, मात्र वरील समजूतीला काहीच पुरावा न मिळाल्याने तसेच मायुस मीना (:फिदी:) अरागॉगमुळेच मेली यालादेखील पुरावा न सापडल्याने हॅग्रिडला शिक्षा होत नाही. मात्र अरागॉग हॅग्रिडकडे मिळाल्याने हॅग्रिडला शाळेतून काढून टाकले जाते. हॅग्रिडला सांभाळणारे अजून कुणीच नसल्याने (त्याची आई राक्षस व वडिल मगल आहेत. आई लहान्पणीच त्याला सोडून निघून जाते व वडिल हॅग्रिड तेरा वर्षाचा असताना वारतात) शाळेकडून त्याला गेमकीपरचे काम दिले जाते.

त्याचा वांड तोडला जातो, समारंभपूर्वक. हे म्हणजे काहीसं कोर्टमार्शल केलेल्या अधिकार्‍याचे स्टार्स अन स्ट्राईप्स काढून घेतात तसं.
पण जसा रॉन त्याचा तुटका वांड स्पेलोटेपने चिकटवून वापरत असतो, तसाच हॅग्रीड त्याची जादूई छडी त्याच्या छत्रीच्या दांड्यात लपवून वापरत असतो. छडी नसती तर डायगॉन अ‍ॅली मधे जात येत नाही, अन डडलीला डुक्कर बनविण्याचा प्रयत्न्ही करता येत नाही. पण छडी तुटकी असल्याने डडलीचं डुक्कर न होता त्याला फक्त शेपूट येते.

पण छडी तुटकी असल्याने डडलीचं डुक्कर न होता त्याला फक्त शेपूट येते.

पण हॅग्रीड तर फक्त शेपटासाठीच जादु करतो.. डुक्कर दिसायला त्याला फक्त एवढेच कमी होते, असा संवादही आहे बहुतेक. ( का हा संवाद आपली फजिती झाल्याचे कळू नये म्हणून तो म्हणतो कुणास ठाऊक.)

बहुतेक तो तेवढेच करतो.कारण सगळ्या पुस्तकात डडली-डुक्कर असेच वर्णन आहे. Happy

बर हे घ्या लोकहो, सप्रेम भेट Proud Light 1

जागोमोहनप्यारे | 6 November, 2011 - 19:09 नवीन

पाय मोडला तर ठीक करायला कुठला मंत्र वापरतात?

स्केलेग्रो घ्या. किंवा हर्मायनीकडून 'रिपेरो' म्हणून घ्या.

ट्रेलॉनीने हॉग्ज हेड मध्ये भविष्यवाणी वर्तवली तेव्हा तिथे एक डेथईटर चोरून ऐकत होता. भविष्यवाणी पूर्ण व्हायच्या आत तो पकडला आणि हाकलला गेला त्यामुळे त्याने अर्धवट भविष्यवाणी ऐकली आणि व्हॉल्डेमार्टला सांगितली.

.

अहो चिंगीताई, जागोमोहनप्यारेना असं सगळं सांगून नाही टाकायचं. मग ते पुस्तके कशाला वाचतील.
बदला बदला तुमची पोस्ट. जामोप्यानी वाचायच्या आत.

त्रिलोनीने केलेली भविष्यवाणी वॉल्डेमॉर्टला कशी कळते?
>>> हे सांगायचं म्हणजे अख्खं प्रकरण सांगण्यासारखे आहे. पुस्तकामधे तो भाग वाचण्यासारखा आहे. Happy

Proud पण हे कुठल्या भागात आहे? मी चारच भाग वाचलेत आणि सगळे शिणेमे पाहिलेत.. शिणेमात हे कुठेच नाही.

शिनेमात काहीच नाहिये... काल ४था भाग बघितला, इतक्या डोक्यात गेला.... काहीच दाखवलं नाहिये त्यात.... Sad

जामोप्या, ७ही पुस्तकं वाचा, कुठे ना कुठे नक्की सापडेल... क्लुलेस पेक्षा हे सोप्पंच आहे Happy

ऑर्डर ऑफ फिनिक्स नीट वाचलात का?

प्रिझनर ऑफ अझकबान, ऑर्डर ऑफ फिनिक्स आणि हाफ ब्लड वाचले नाही.. उरलेले सर्व वाचले आहे.

आपण हॅरी पॉटर आणि लॉर्ड ऑफ द रिंग्ज दोन्ही चे प्रचंड फॅन. पण LOTR मधे प्रमुख पात्रांमधले खूप कमी जण मरतात. हॅरी पॉटर मधे एकामागून एक किती जण बिचारे धारातीर्थी पडतात. अर्थात प्रत्येक मृत्यू कथेसाठी खूप महत्वाचा आहे. पण ही कथा लहान मुलांसाठी योग्य वाटत नाही.

शेवटचा भाग वाचल्यापासून एक प्रश्न पडलाय: हॅरी, हर्मायनी आणि रॉन ग्रिंगॉट ला जायला सकाळी ६ वाजता निघतात. आणि तिथून बाहेर पडायला फार फार तर १-२ तास लागले असतील. मग त्या ड्रॅगन च्या पाठीवरुन उतरेपर्यन्त सूर्यास्त कसा काय झालेला असतो? आणि ते ही उन्हाळ्यात - म्हणजे कमीत कमी संध्या ७! आणि व्हॉल्डेमॉर्ट ला ही बातमी कळायला इतका वेळ लागतो?

मा़झ्या बहिणीला मराठी पुस्तकाची पीडीएफ फाईल हवी आहे. कोणी मेल करू शकेल का? माझ्या आयडीवर.. प्लीज.

Bagz | 14 November, 2011 - 18:20 नवीन

ओ काकू~!
ते रिन्ग्झ काही केल्या वाचवलं जाईना हो..
नक्कि काय प्रॉब्लेम असेल आमचा?

बेसिलिकला पाहिल्यावर सर निकोलस बेशुद्ध होतो.. तो शेवटी परत जागा कसा होतो? पुस्तकात आहे, त्याला काढा दिला म्हणून.. पण सर निकोलस भूत असल्याने काही खात नसतो. ५०० वर्षे त्याने काही खाल्लेले नसते. मग त्याला काढा कसा पाजतात?

टॉम रिडल म्हणजे वॉल्डेमॉर्ट हे सर्वाना कधी समजते? चेंबर ... मध्ये रॉन, हॅरी, हर्मायनी, सर्वांच्या बोलण्यात टोमचा उल्लेख आहे. पण तो कॉलेजचा एक जुना हुशार विद्यार्थी म्हणून.....

टॉम रिडल म्हणजे वॉल्डेमॉर्ट हे सर्वाना कधी समजते?>>>> डम्बलडोरला खूप आधीपासून माहित असते. वोल्डमार्ट जेव्हा डाडाची नोकरी मागायला येतो तेव्हा डम्बलडोर याचा उल्लेख करतो. Happy

चेंबर ... मध्ये रॉन, हॅरी, हर्मायनी, सर्वांच्या बोलण्यात टोमचा उल्लेख आहे. पण तो कॉलेजचा एक जुना हुशार विद्यार्थी म्हणून.....<<<

The Chamber Of Secrets मध्ये टॉम रिडल स्वतः हॅरीला सांगतो की तोच व्होल्डमार्ट आहे. (TOM MARVOLO RIDDLE <----> I AM LORD VOLDEMORT) नंतर ते सगळे वर येतात तेव्हा जिनीचे आईवडिल शाळेत आलेले असतात. तिथे डंबलडोर त्या सर्वांना त्याचा टॉम रिडल ते व्होल्डमार्ट हा भूतकाळ सांगतात. त्यात ते हेही सांगतात की पन्नास वर्षांपूर्वी ते स्वतः टॉम रिडलला शिकवायला होते.

Pages