फ्रॅक्चरवरचे धनगराचे आयुर्वेदिक औषध

Submitted by जागोमोहनप्यारे on 5 November, 2011 - 05:14

फ्रॅक्चरवरचे धनगराचे आयुर्वेदिक औषध :

यावर्षीच्या २०११ मधील एप्रिलमधील गुढी पाडव्याला आमचा 'पाडवा' झाला. म्हणजे मला अ‍ॅक्सिडेंट झाला आणि पाय मोडला. Proud डाव्या पायातील पटेला ( गुढग्याची वाटी) , टिबिया, फिब्युला, ( लेग बोन्स) आणि तळपायामधील एक लहान हाड एवढे सगळे मोडले. त्यानंतर ऑपरेशन झाले. प्लेट, मोळे, तारा.. काय काय बसवले. मग हळूहळू वॉकर, काठी घेऊन आणि आता तसेच चालायला लागलो.

गेल्या आठवड्यात सहज नरसोबावाडीला गेलो. तिथे अन्नछत्रात प्रसादाला जात होतो. स्टँडवरुन उतरून अन्नछत्राकडे जात होतो. मी थोडा लंगडत जात होतो. अचानक एक माणूस माझ्याजवळ आला आणि म्हणाला, लंगडताय का? पाय फ्रॅक्चर झाला आहे का? मी होय म्हणताच त्याने सांगितले त्यांच्या भावाला फृएक्चर झाले होते, तेंव्हा एका धनगराने एक औषध लावायला सांगितले होते. तुमचा नंबर द्या आम्ही तुम्हाला त्याची माहिती सांगू.

दुसर्‍या दिवशी त्याच्या बहिणीचा फोन आला. त्यानी औषधाची कृती सांगितली. ती खालीलप्रमाणे..

साहित्य :

२ नारळाचे पाणी
११ गुलाबाची फुले
१०० ग्रॅम बदाम
५० ग्रॅम वेलदोडा घेऊन सोलून बिया घेणे.
२ चमचे हळद.
२ मुठी तुळशीचा पाला
सव्वा किलो खोबरेल तेल

प्रथम मिक्सरमधून वेलदोडा आणि बदाम बरीक पूड करावी. मग त्याच्यात गुलाबाच्या पाकळ्या, तुळशीचा पाला चुरुन घालून पुन्हा बारीक करावे. त्यात २ नारळाचे पाणी घालून पुन्हा मिक्सर फिरवून लगदा करुन घेणे.

नंतर तेलामध्ये हा लगदा आणि हळद घालून ढवळावे. आणि १५ मिनिटे उकळू द्यावे. मिश्रण ढवळत रहावे आणि मोठ्या पातेल्यात कृती करावी. कारण हळद घातली की उतू जाते.

नंतर गार करुन फडक्याने गाळून घ्यावे.

आयुर्वेदिक भांडारातून खालील औषधे आणावीत आणि त्यात मिसळावीत.

१. जंगल पपिता तेल ५० मिली
२. रत्नज्योत तेल ५० मिली
३. वातचिंतामणी रस ५ ग्रॅम
४. योगेंद्र रस ५ ग्रॅम
५. कुमार कल्याण रस ५ ग्रॅम
६. पंचरत्न अनमोल रस ५ ग्रॅम
७. सुवर्ण भस्म ५ ग्रॅम
८. हिरा भस्म ५ ग्रॅम

( शेवटची दोन औषधे प्रचंड महाग आहेत. माझ्या सर्जरीलाही इतका खर्च आला नव्हता ! Proud )

मिश्रण बाटली हलवून ढवळावे. एक दिवस तसेच ठेवावे. त्यानंतर दररोज रात्री फ्रॅक्चर झालेल्या हाताला/ पायाला चोळून लावून मुरवावे. यामुळे ...

हाड जुळायला मदत होते.
स्नायुंची पुष्टी होते.
दुखावलेल्या शिरा पुन्हा कार्यक्षम होतात.

औषध तीन महिने वापरावे.

हे औषध फक्त इजेमुळे झालेल्या (अपघाती) फ्रॅक्चरला वापरावे. फृएक्चर अन्य कारणाने, उदा कॅन्सर, टीबी वगैरे असेल किंवा त्वचेवर ओली जखम असेल तर हे औषध वापरू नये.

औषध फक्त बाह्योपचारासाठी आहे. पिऊ नये. Proud

( गुगलवर सर्च करणार्‍याला ही लिंक मिळावी, म्हणून औषधांची नावे इंग्रजीत देत आहे.. Jungle Papita Oil, Ratnajot oil, Ratnajyot Oil, Vat chintamani Ras, Yogendra ras, kumar kalyan Ras, Pancharatna Anmol Ras, Suvarna Bhasma, Swarna Bhasma, Heerak Bhasma, Vajra Bhasma. Ayurvedic medicine for fracture, for external use only)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पायाला फ्रेक्चर होऊनही ज्या उत्साहाने आपण नवनवे धागे उघडताय
>> विकु, जामोप्या पायांनी टाईप करून धागे उघडतात असं म्हणायचं आहे का तुम्हाला? सगळे जामोप्यांच्या एकेका अवयवांना वेगवेगळीच कामे जोडतायेत आज.. Proud

जामोप्या, तुम्हाला धागे उघडायची घाई फार. कुठे गिनिज बुकात नोंद होण्याचं ध्येय आहे का तुमचं? Proud

>>> >>> मी हे औषध कालच तयार केले आहे. ( म्हणुन तर औषध हिरवे असल्याचे समजले. ) .
----- औषध तयार करणार्‍याचे विचार औषधात उतरतात हे यातुन सिद्ध होते. पुढच्या काही दिवसांत औषधाचे गुण दिसतीलच

Rofl

इतके दिवस आजाराचे गुण दिसत होते, आता औषधाचे दिसतील. आजच्या अत्यंत शुभमुहूर्तावर त्यांनी औषध घ्यायला सुरूवात केली आहे. त्यामुळे ते लागू पडणारच!

असो. बहुत काय लिहिणे. अ‍ॅलोपथीच्या असो वा धनगरच्या औषधाने, "लवकर बरे व्हा" ह्या शुभेच्छा तुम्हाला पुन्हा एकदा देतो.

औषध तयार करणार्‍याचे विचार औषधात उतरतात हे यातुन सिद्ध होते. >>> उदय Rofl

पुढच्या काही दिवसांत औषधाचे गुण दिसतीलच >> Biggrin आयुर्वेद चांगला की ................... Wink

१. जंगल पपिता तेल ५० मिली
२. रत्नज्योत तेल ५० मिली
३. वातचिंतामणी रस ५ ग्रॅम
४. योगेंद्र रस ५ ग्रॅम
५. कुमार कल्याण रस ५ ग्रॅम
६. पंचरत्न अनमोल रस ५ ग्रॅम
७. सुवर्ण भस्म ५ ग्रॅम
८. हिरा भस्म ५ ग्रॅम

या सर्व औषधांमधे काय असते हे कोणी सांगीतले तर त्यात वर उल्लेखलेले नारळीपाणी वगैरे मिळुन कायकाय होतं ते कळेल व त्याचे काही अ‍ॅनॅलिसीस शक्य होईल

या प्रकाराचे प्रुफींग करण्याकरता किती जणांची हाडे एकदम मोडली असतील कुणास ठाऊक. आयुर्वेदीक प्रगोगशाळा व आखाड्यांचे घनिष्ट नाते याच कारणामुळे असावे.

या सर्व औषधांमधे काय असते हे कोणी सांगीतले तर त्यात वर उल्लेखलेले नारळीपाणी वगैरे मिळुन कायकाय होतं ते कळेल व त्याचे काही अ‍ॅनॅलिसीस शक्य होईल

त्यासाठीच तर धागा काढला.. पण इथे आखाडा झाला आहे. Proud

त्यासाठीच तर धागा काढला.. पण इथे आखाडा झाला आहे. .....>> आखाडा आवश्यकच आहे ना, नाहीतर कुस्त्या कश्या होतील आणि हाडे कशी मोडतील आणि मग 'हिरवे' औषध कसे लावता येतील ?

ह्या सर्व गोष्टी परस्परपुरक आहेत.

पण मी म्हणतो, या पायी, बिचार्‍या "धनगरजातीला" का बदनाम करता?
(वरील औषधे धनगरी उपायान्मधे नस्तात, अन जी जडीबुटी/प्राणीज औषधे ते वापरतात, ते ती सान्गत नाहीत.)

>>> त्यासाठीच तर धागा काढला.. पण इथे आखाडा झाला आहे. .....>> आखाडा आवश्यकच आहे ना, नाहीतर कुस्त्या कश्या होतील आणि हाडे कशी मोडतील आणि मग 'हिरवे' औषध कसे लावता येतील ?

आणि औषधच नसेल तर "हिरव्या"चे गोडवे कसे गाता येतील? आणि समजा औषध नाहीच लागू पडलं तर सगळा दोष "नरसोबाची वाडी" या "भगव्या" स्थानाला देता येईल. हाकानाका.

>>> ह्या सर्व गोष्टी परस्परपुरक आहेत.

Biggrin

छान धागा. Happy

जामोप्या यांनी वर यादीत दिलेली बरीचशी औषधे आयुर्वेदाच्या 'वातघ्न' आणि 'बल्य' या प्रकारात मोडतात. काही तेले तर नुसतीच वापरली तरीही चालू शकते.

त्यांनी आधी म्हटल्याप्रमाणे एवढ्या मोठ्या फ्रॅक्चरनंतर स्नायू आणि शिरा (लिगामेन्ट्स/कार्टिलेजेस) पूर्ववत होण्यास उशीर लागणार हे नक्की. त्यासाठी वर दिलेल्या यादीतली औषधेही उपयुक्त आहेत, यात शंका नाही. मात्र त्यासाठी जो 'फॉर्मुला' सांगीतला आहे, (इतका वेळ ढवळणे, तितका वेळ उकळणे वगैरे) तो ग्रंथोक्त आयुर्वेदिक नाही. असे फॉर्मुले गावोगावचे वैद्य- पारंपारिक आणि डिग्रीवालेही- बनवत असतात. हे अनुभवातून शोधलेले नुस्खे असतात. त्यांचा काहींना फायदा होतो, काहींना होत नाही. अशी औषधे बनवण्याचे विधी इतके किचकट असतात, की सहसा फायदा झाल्याचेच म्हटले जाते. Wink
त्यामुळे वरचा फॉर्मुला बरोबर की चूक असे सरसकट म्हणता येणार नाही. औषधे आयुर्वेदिक आहेत, पण फॉर्मुला आयुर्वेदिक नाही. 'आजीचा बटवा' टाईप आहे. वापरून बघा, नुकसान होणार नाही असे काहीसे.
कसलेही स्टँडरडायजेशन नसणे ही आमच्या आयुर्वेदाची जुनी बोंब आहे. त्यामुळे कुणीही तुम्हाला काहीही कशातही मिसळायला आणि त्याला कितीही वेळा उकळायला सांगू शकतो आणि ते 'आयुर्वेदिक' म्हणून खपवू शकतो. तुम्हाला त्यास आक्षेपही घेता येत नाही आणि त्याचे समर्थनही करता येत नाही !

जामोप्या यांनी काहीही केले नाही, तरी आजच्यापेक्षा तीन महिन्यांनी त्यांना असेही बरे वाटणारच आहे, त्यामुळे औषधाला श्रेय मिळू शकते. Happy

असो. जामोप्या यांना लवकर आराम पडो, अशी शुभेच्छा देतो.

---------------------------------

हिरा भस्माबद्दल- हिरा भस्म म्हणजे हिर्‍याची राख- असे नाही. (सुवर्ण भस्म म्हणजेसुद्धा सोन्याची राख नाही.) आयुर्वेदाची भस्मकल्पना वेगळी आहे. भस्म निर्माण करण्याचे काही शास्त्रोक्त विधी असतात. हीरक भस्माचासुद्धा असाच एक विधी आहे. कोणाला उत्सुकता असेल तर रसशास्त्राच्या पुस्तकात शोधाशोध करून तो विधी देता येईल.

----------------------------------

इथल्या काही प्रतिसादांबद्दल (ते गंमतीत दिले असले, तरी) खेद वाटला. एखाद्या चिकित्सापद्धतीला एखाद्या धर्माशी जोडणे गैर आहे. आयुर्वेद फक्त हिंदूंचा नाही. आयुर्वेदिक औषध घेतले म्हणून तुम्ही हिंदुत्ववादी होत नाही. होमिओपथी घेतली म्हणून तुम्ही क्रिश्चन होत नाही. युनानी रूह-अफ्जा प्याले म्हणजे तुम्ही इस्लाम स्वीकारला असे होत नाही. Happy
अशी स्वीपिंग स्टेटमेन्ट्स टाळली गेली पाहिजेत, असे मला वाटते. औषधोपचार आणि राजकीय विचारधारा यात गल्लत करू नये.

-----------------------------------
(खुलासा- मी बी.ए.एम्.एस. केलेला- म्हणजे डिग्रीवाला आयुर्वेदिक वैद्य आहे. प्रॅक्टिसमधे मी आयुर्वेद आणि अ‍ॅलोपथी- दोन्ही वापरतो.)

असो. बहुत काय लिहिणे. अ‍ॅलोपथीच्या असो वा धनगरच्या औषधाने, "लवकर बरे व्हा" ह्या शुभेच्छा तुम्हाला पुन्हा एकदा देतो.

>>>
हो ना ठोसा मारायला समोर माणूस तरी पाहिजे ना? इंग्रजांनी दुस्काळात भारतीय माणसे जगवली ती भूतदया म्हणून नाही तर , शोषण करायला कुणीतरी जागेवर पाहिजे ना Happy .

आयुर्वेदाची भस्मकल्पना वेगळी आहे.

हिंदुत्व हिंदुत्व करत नाचणार्‍यानाही याची कल्पना नसावी म्हणजे अजबच ! त्यांच्या दृष्टीने हिरा, कोळसा आणि नथुरामाच्या गाडग्यातील राख ... सगळं कार्बनच ! Proud

>>> आयुर्वेदाची भस्मकल्पना वेगळी आहे. ----- हिंदुत्व हिंदुत्व करत नाचणार्‍यानाही याची कल्पना नसावी म्हणजे अजबच ! त्यांच्या दृष्टीने हिरा, कोळसा आणि नथुरामाच्या गाडग्यातील राख ... सगळं कार्बनच !

"आयुर्वेद फक्त हिंदूंचा नाही" हे वाचलेलं दिसत नाही किंवा वाचून समजलेलं दिसत नाही. चालायचंच. एकंदरीत "गुडघ्या"चं दुखणं खूपच गंभीर दिसत आहे.

उदय | 6 November, 2011 - 05:20

अचानक एक माणूस माझ्याजवळ आला आणि म्हणाला, लंगडताय का? पाय फ्रॅक्चर झाला आहे का? मी होय म्हणताच त्याने सांगितले त्यांच्या भावाला फृएक्चर झाले होते,
----- हे समाजसेवा करणारे रस्तो-रस्ती सावजाच्या शोधार फिरत असतांत कां? त्याने तुम्हाला नंबर का मागितला, भावाचा नंबर का नाही दिला ?

----------हे जामोप्या चेहेर्‍यवरूनच सावज अस्ल्या सारखे दिसतात असं तुम्हाला वाटतं का? Wink

@ ज्ञानेश.
आपण आयूर्वेदात पदवीधारक आहात तरी झापडे बांधून घेतली नसल्याबद्दल अभिनंदन. आपण आयुर्वेदाची लिमिट्स योग्य प्रकारे बोललात. >>कसलेही स्टँडरडायजेशन नसणे ही आमच्या आयुर्वेदाची जुनी बोंब आहे.<< खरोखर संतुलित प्रतिसाद. आवडला.
या साईटीवर काही पुराणमतवादी झापडे बांधून वावरतात. उदा. पान खाणे हे माऊथवॉश सारखे आहे इ. तारे तोडले जातात. मग श्री मास्तुरे सारख्या आय्डी इथे येऊन :: जामोप्यांना वेड लागले आहे.:: गुडघ्याचा आजार :: पक्षी डोके गुडघ्यात आहे:: असे काही बाही बोलतात. मग श्री जोशी येऊन 'झिल तोडतात'(जीरं रं जी रं रं जी जी), या जोशींना डेक्कन चा बसस्टॉप जाम आवडतो.
बहुधा, या सगळ्या प्रकारा मुळेच जामोप्या या लोकांना चिमट्या काढायला असले धागे काढतात.
यात आयुर्वेदावर टीका नाही. हे धनगरी औषध आहे. कुणी करून पाहिले तर खिशाला चाट बसेल. बाहेरून कोणतेही तेल चोळले तरी मसाजमुळे येणारे गुण येतीलच.

आयुर्वेदाच्या अन मॉडर्न मेडिसिनच्या बाबत चर्चा करायची असली तर सेन्सिबली चर्चा करायला वेगळी जागा शोधावी लागेल असे दिसते. इथे झापडवाले अन झिलतोडे येणार अन बेरंग करणारच Wink

---

>>>असो. बहुत काय लिहिणे. अ‍ॅलोपथीच्या असो वा धनगरच्या औषधाने, "लवकर ब(क)रे व्हा" ह्या शुभेच्छा तुम्हाला पुन्हा एकदा देतो.<<<

हॅपी बक्री ईद @ जागोमोहम्मद्प्यारे Wink

या साईटीवर काही पुराणमतवादी झापडे बांधून वावरतात.>>>>>> Lol

उदा. पान खाणे हे माऊथवॉश सारखे आहे इ. तारे तोडले जातात. मग श्री मास्तुरे सारख्या आय्डी इथे येऊन :: जामोप्यांना वेड लागले आहे.:: गुडघ्याचा आजार :: पक्षी डोके गुडघ्यात आहे:: असे काही बाही बोलतात.>>>>>>

Lol

मग श्री जोशी येऊन 'झिल तोडतात'(जीरं रं जी रं रं जी जी), या जोशींना डेक्कन चा बसस्टॉप जाम आवडतो.
बहुधा, >>>>>

Lol

या सगळ्या प्रकारा मुळेच जामोप्या या लोकांना चिमट्या काढायला असले धागे काढतात.

Lol

यात आयुर्वेदावर टीका नाही. हे धनगरी औषध आहे. कुणी करून पाहिले तर खिशाला चाट बसेल. बाहेरून कोणतेही तेल चोळले तरी>>>>>>

Lol

आयुर्वेदाच्या अन मॉडर्न मेडिसिनच्या बाबत चर्चा करायची असली तर सेन्सिबली चर्चा करायला वेगळी जागा शोधावी लागेल असे दिसते. >>>>>>

Rofl

इथे झापडवाले अन झिलतोडे येणार अन बेरंग करणारच >>>>>> Lol

ज्ञानेश,

<<<आपण आयूर्वेदात पदवीधारक आहात तरी झापडे बांधून घेतली नसल्याबद्दल अभिनंदन. आपण आयुर्वेदाची लिमिट्स योग्य प्रकारे बोललात. >>कसलेही स्टँडरडायजेशन नसणे ही आमच्या आयुर्वेदाची जुनी बोंब आहे.>>>
....... आयुर्वेदाची लिमिट्स योग्य प्रकारे बोललात !!! ......

ज्ञानेश.... मला वाट्ते की तुम्ही वरील वाक्याशी सहमत असाल !!

लक्षात घ्या..... असले धागे हे लोक फक्त चीमटेच घ्यायला काढतात. खर्या ज्ञानाची यांना गरजच नाहीय

अन्यथा फ्राक्चर झाल्यावर ७ महीन्यानंतर रस्त्यावर भेटलेल्या एका धनगरांकडून माहीत झालेल्या औषधा वर यांनी लिहीले नसते, तो वर त्यांनी हे औषध वापरले सुद्धा नाही.

<<<<बहुधा, या सगळ्या प्रकारा मुळेच जामोप्या या लोकांना चिमट्या काढायला असले धागे काढतात.>>>

<<<<<<यात आयुर्वेदावर टीका नाही. हे धनगरी औषध आहे. कुणी करून पाहिले तर खिशाला चाट बसेल. बाहेरून कोणतेही तेल चोळले तरी मसाजमुळे येणारे गुण येतीलच.

आयुर्वेदाच्या अन मॉडर्न मेडिसिनच्या बाबत चर्चा करायची असली तर सेन्सिबली चर्चा करायला वेगळी जागा शोधावी लागेल असे दिसते. इथे झापडवाले अन झिलतोडे येणार अन बेरंग करणारच >>>>

भले बहाद्दर !!

>>> आयुर्वेदाच्या अन मॉडर्न मेडिसिनच्या बाबत चर्चा करायची असली तर सेन्सिबली चर्चा करायला वेगळी जागा शोधावी लागेल असे दिसते. इथे झापडवाले अन झिलतोडे येणार अन बेरंग करणारच

तरी विचार करत होतो की जामोप्यांच्या संरक्षणाला हे इब्लिसराव अजून कसे नाही उगवले! इब्लिस आणि जामोप्या यांच्याशी कोणत्याही विषयावरची सेन्सिबल चर्चा करणे अशक्य आहे, हे इथल्या सर्वांना चांगले माहित आहे. त्यामुळे इतर सर्वजण चिमटे काढणारच! त्यात एवढे मनाला लावून घेण्यासारखं काय आहे?

>>> लक्षात घ्या..... असले धागे हे लोक फक्त चीमटेच घ्यायला काढतात. खर्या ज्ञानाची यांना गरजच नाहीय

सहमत! पुस्तकाचा एकही परिच्छेद न वाचता हे पुस्तकावर व लेखकावर वाटेल तशी पूर्वग्रहदूषित टीका करतात आणि वर त्याचे समर्थनही करतात. हे एका धाग्यावर हिंदूंचे समर्थन करतात तर दुसर्‍या धाग्यावर आपण निधर्मी, सर्वधर्मसमभावी असल्याचा कांगावा करतात; हे एका धाग्यावर आम्ही सर्व भारतीय आहोत तर दुसर्‍या धाग्यावर महाराष्ट्रातून युपी, बिहारच्या लोकांना घालवून द्या असे सांगतात; हे एका धाग्यावर गांधींच्या अहिंसेचा पुरस्कार करतात तर दुसर्‍या धाग्यावर बिहारींना बदडून काढायचे समर्थन करतात. आणि म्हणे यांच्याशी सेन्सिबल चर्चा करायची!

मग श्री जोशी येऊन 'झिल तोडतात'(जीरं रं जी रं रं जी जी), या जोशींना डेक्कन चा बसस्टॉप जाम आवडतो.
बहुधा,

>>
कोण्ते जोशी तुम्हाला अभिप्रेत आहेत? मी की मंजो? बहुधा मंजोच असावेत. Happy

कसलेही स्टँडरडायजेशन नसणे ही आमच्या आयुर्वेदाची जुनी बोंब आहे.> अगदी अगदी !
धनगर येवढे महाग औषध वापरत असतील का ? बनवाबनवी वाटते.
जामोप्या > लवकर बरे वाटू दे .

काय म्हणतोय गुडघा? बरा झाला की नाही?

एक दिवसात बर व्हायला गुढगा म्हणजे नखुरडं वाटलं का मास्तुरे? वर लिहिलय ना, तीन महिने औषध लावायचं म्हणून ..? Proud

Pages