फ्रॅक्चरवरचे धनगराचे आयुर्वेदिक औषध

Submitted by जागोमोहनप्यारे on 5 November, 2011 - 05:14

फ्रॅक्चरवरचे धनगराचे आयुर्वेदिक औषध :

यावर्षीच्या २०११ मधील एप्रिलमधील गुढी पाडव्याला आमचा 'पाडवा' झाला. म्हणजे मला अ‍ॅक्सिडेंट झाला आणि पाय मोडला. Proud डाव्या पायातील पटेला ( गुढग्याची वाटी) , टिबिया, फिब्युला, ( लेग बोन्स) आणि तळपायामधील एक लहान हाड एवढे सगळे मोडले. त्यानंतर ऑपरेशन झाले. प्लेट, मोळे, तारा.. काय काय बसवले. मग हळूहळू वॉकर, काठी घेऊन आणि आता तसेच चालायला लागलो.

गेल्या आठवड्यात सहज नरसोबावाडीला गेलो. तिथे अन्नछत्रात प्रसादाला जात होतो. स्टँडवरुन उतरून अन्नछत्राकडे जात होतो. मी थोडा लंगडत जात होतो. अचानक एक माणूस माझ्याजवळ आला आणि म्हणाला, लंगडताय का? पाय फ्रॅक्चर झाला आहे का? मी होय म्हणताच त्याने सांगितले त्यांच्या भावाला फृएक्चर झाले होते, तेंव्हा एका धनगराने एक औषध लावायला सांगितले होते. तुमचा नंबर द्या आम्ही तुम्हाला त्याची माहिती सांगू.

दुसर्‍या दिवशी त्याच्या बहिणीचा फोन आला. त्यानी औषधाची कृती सांगितली. ती खालीलप्रमाणे..

साहित्य :

२ नारळाचे पाणी
११ गुलाबाची फुले
१०० ग्रॅम बदाम
५० ग्रॅम वेलदोडा घेऊन सोलून बिया घेणे.
२ चमचे हळद.
२ मुठी तुळशीचा पाला
सव्वा किलो खोबरेल तेल

प्रथम मिक्सरमधून वेलदोडा आणि बदाम बरीक पूड करावी. मग त्याच्यात गुलाबाच्या पाकळ्या, तुळशीचा पाला चुरुन घालून पुन्हा बारीक करावे. त्यात २ नारळाचे पाणी घालून पुन्हा मिक्सर फिरवून लगदा करुन घेणे.

नंतर तेलामध्ये हा लगदा आणि हळद घालून ढवळावे. आणि १५ मिनिटे उकळू द्यावे. मिश्रण ढवळत रहावे आणि मोठ्या पातेल्यात कृती करावी. कारण हळद घातली की उतू जाते.

नंतर गार करुन फडक्याने गाळून घ्यावे.

आयुर्वेदिक भांडारातून खालील औषधे आणावीत आणि त्यात मिसळावीत.

१. जंगल पपिता तेल ५० मिली
२. रत्नज्योत तेल ५० मिली
३. वातचिंतामणी रस ५ ग्रॅम
४. योगेंद्र रस ५ ग्रॅम
५. कुमार कल्याण रस ५ ग्रॅम
६. पंचरत्न अनमोल रस ५ ग्रॅम
७. सुवर्ण भस्म ५ ग्रॅम
८. हिरा भस्म ५ ग्रॅम

( शेवटची दोन औषधे प्रचंड महाग आहेत. माझ्या सर्जरीलाही इतका खर्च आला नव्हता ! Proud )

मिश्रण बाटली हलवून ढवळावे. एक दिवस तसेच ठेवावे. त्यानंतर दररोज रात्री फ्रॅक्चर झालेल्या हाताला/ पायाला चोळून लावून मुरवावे. यामुळे ...

हाड जुळायला मदत होते.
स्नायुंची पुष्टी होते.
दुखावलेल्या शिरा पुन्हा कार्यक्षम होतात.

औषध तीन महिने वापरावे.

हे औषध फक्त इजेमुळे झालेल्या (अपघाती) फ्रॅक्चरला वापरावे. फृएक्चर अन्य कारणाने, उदा कॅन्सर, टीबी वगैरे असेल किंवा त्वचेवर ओली जखम असेल तर हे औषध वापरू नये.

औषध फक्त बाह्योपचारासाठी आहे. पिऊ नये. Proud

( गुगलवर सर्च करणार्‍याला ही लिंक मिळावी, म्हणून औषधांची नावे इंग्रजीत देत आहे.. Jungle Papita Oil, Ratnajot oil, Ratnajyot Oil, Vat chintamani Ras, Yogendra ras, kumar kalyan Ras, Pancharatna Anmol Ras, Suvarna Bhasma, Swarna Bhasma, Heerak Bhasma, Vajra Bhasma. Ayurvedic medicine for fracture, for external use only)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आयुर्वेदावर धागा निघाला तर हिंदुत्ववाद्याना आनंद वाटायला हवा.. पण इथे तर हिंदुत्ववादी मंडळीच टर उडवीत आहेत.. Proud

>>> एक दिवसात बर व्हायला गुढगा म्हणजे नखुरडं वाटलं का मास्तुरे? वर लिहिलय ना, तीन महिने औषध लावायचं म्हणून ..?

असू दे, असू दे. "लवकर बरे व्हा" ह्या पुन्हा एकदा शुभेच्छा!

एक शंका मनात आली. समजा तीन महिन्यांनंतर पण फरक नाही पडला तर . . .?

मला खरेच रावीसारखी शंका आलीये.. "धनगरी" औषध ही काही वेगळी संज्ञा आहे का? धनगर इतके महाग औषध.. नि सूवर्ण नि हिरे.. असले सगळे कसे सांगतील? Uhoh मला खरच वाटलं की अन्वर असेल नि जामोप्यांनी धनगर ऐकलय!

धनगर लोकांकडे अशी बरीच औषधे असतात... पुरंदर किल्ल्याच्या मागच्या डोंगरावर एक धनगर होते.. त्यांच्याकडे स्कीन कॅन्सरवरचे औषध होते... आणि त्याचा काही प्रमाणात उपयोग ही झाला होता....

समजा तीन महिन्यांनंतर पण फरक नाही पडला तर . . .?

नाही पडला तर नाही पडला.. हिंदु असून कर्मण्येवाधिकारस्ते वगैरे विसरलात म्हणजे अजबच ! Proud सगळ्या उपायामुळे रिजल्ट आलाच पाहिजे असं कुठं आहे? तुमच्या नथुरामानं गांधिजीना मारलं... बामणांची घरं जळली या पलीकडे इतर कुणाला, मुसलमानाना, हिंदुना, पाकिस्तानला, कॉग्रेसला, संघाला, गांधी घराण्याला, मशिदीतल्या बांगेला.... कुणाला काही फरक पडला का? Proud तसेच अस्ते हे ! Proud गोळी मारुन बघायची.. काम झालं तर झालं, नाही तर नाही..त्यात काय एवढं ? आमच्यासारख्यानी तुम्हासारख्या हिंदुत्ववाद्याला कर्मयोग शिकवायचा की काय?

आयुर्वेदिक औषध आहे, ते एखाद्याला उपयोगी ठरेल, एखाद्याला नाही, असं इथल्या तज्ञानी सांगितले आहेच की.

Proud

औषध आयुर्वेदिक औषधांवरच आधारीत आहे. पण त्या अनाम धनगरालाही त्याचे क्रेडिट द्यायचे, म्हणून त्याचाही नावात उल्लेख केला. तज्ञांच्या सहाय्याने या फॉर्म्युल्यात आणखी एखाद्याला आपल्या गरजेनुसार बदलही करता येतील.

Proud

हे हिंदुत्ववादी सगळ्या धाग्यावर आपली भगवी पाठ का दाखवत फिरतात समजत नाही... हिंदु धर्मातल्या पूजा, विधी, वैश्वदेव, पाचवी... इथं मात्र उत्तरं द्यायला यांच्यापैकी कुणी नस्तं..

हे हिंदुत्ववादी म्हणजे धनगराच्या मेंढरागत असतात.. एक खड्ड्ञात पडलं की बाकीचीही मागोमाग येतात.. ! Proud धनगराचा उल्लेख झाला म्हणून ही मेंढरं इथं कडमडली वाटतं ! Proud

तेल गाळल्यानंतर उरलेला चोथा फेकून देऊ नये. तो सुकवून उटण्याप्रमाणे आंघोळीच्या वेळी वापरता येतो.

>>> हे हिंदुत्ववादी म्हणजे धनगराच्या मेंढरागत असतात.. एक खड्ड्ञात पडलं की बाकीचीही मागोमाग येतात.. ! धनगराचा उल्लेख झाला म्हणून ही मेंढरं इथं कडमडली वाटतं

जामोप्यांच्या पाठोपाठ तुम्ही स्वतः, जामोप्यांचे एचएमव्ही आणि इतर बरीच निधर्मांध मेंढरं आणि त्यांचे डूआय इथं कडमडले की! एका निधर्मांधाने असंबद्ध बरळायला सुरूवात केली की ही बाकीचीही एकाच निधर्मी सुरात बें बें करायला लागतात. Light 1

मला खरच वाटलं की अन्वर असेल नि जामोप्यांनी धनगर ऐकलय!
>>>>
कदाचित पायाऐवजी कानावर पडले असतील, असो तेल झिरपत झिरपत पायापर्यंत (कानापासून) पोहोचेल ३ महिन्यांत

हिंदुत्व, हे औषध, धनगर , निधर्मां या सगळ्या गोष्टींचा एक मेका शी काय सबंध आहे देवच जाने

नीम हकीम .....

>>> तेल गाळल्यानंतर उरलेला चोथा फेकून देऊ नये. तो सुकवून उटण्याप्रमाणे आंघोळीच्या वेळी वापरता येतो.

Rofl Biggrin Rofl Biggrin Rofl Biggrin

>>> तेल गाळल्यानंतर उरलेला चोथा फेकून देऊ नये. तो सुकवून उटण्याप्रमाणे आंघोळीच्या वेळी वापरता येतो.
>>>

यावर कोणी नवीन धागा काढु शकतो. -> जामोप्या उटणे

उरलेले तेल हाड मोडल्यास लावू शकतात.
:G:-G

उरलेले तेल हाड मोडल्यास लावू शकतात.
---- अरे आगी लावायला काही तेल शिल्लक ठेवा.... जामोप्यांना तब्बल ३ महिने (आगी लावायला) पुरेल एव्हढी तेलाची किमान मागणी आहे...

धनगर नको, अन्वर नको !!

घ्या फक्त डॉ मुनीर खान चे औषध बॉडीरीवाइव्ह.

मोडलेल्या हाडा सकट शरीरात असलेला ह्रुदय रोग, कर्क रोग, मधुमेह, किडनी फेल्युएर, सोरासीस, मलेरीआ, डेन्गु, मुळव्याध या सर्वांवर अक्सीर जालीम (हिरवा) उपाय.

मलकापूर बाजारात फ्रॅक्चरसाठी जडीबूटी औषध मिळते, असे ऐकून आहे.. मलकापूर ( कोल्हापूर जिल्हा) येथे कुणी मायबोलीकर आहे का ? औशधाची जुडी मिळते, सात दिवसांच्या औषधासाठी फक्त १० रु घेतात असे ऐकून आहे. हे औषध ताजेच घ्यावे लागते. त्यामुळे सात दिवसाचेच मिळते. नंतर पुन्हा नवीन आणावे लागते. १ ते २ महिने औषध घ्यावे लागते. ही नेमकी कोणती वनस्पती आहे?

उरलेले तेल हाड मोडल्यास लावू शकतात.

त्यातूनही आणखी तेल उरले तर नामणदिव्यात घालावे.. Proud उगीच दिव्याखाली अंधार व्हायला नको! Proud ( ते लामणदिवा हवे का? की हा नामणदिवा वेगळा? http://www.flickr.com/photos/light_artist/4026745596/ )

जामोप्या उटणे >>> Lol

उरलेले तेल हाड मोडल्यास लावू शकतात. : फिदी:

जामोप्या, तुम्ही मला एकदम आवडलेले आहात. सगळं कसं खेळीमेळीत घेता. बाकी ( ओळखा कोण?) असते तर रान पेटलं असतं अशा प्रतिक्रियांवर. पण एवढ्या आजारपणात्/वेदनेत तुम्हाला बरेच गंमतीदार धागे काढायला सुचताहेत. म्हणजे ते तुम्हाला खरंच काढावेसे वाटतात कि कुरापती (controverciesला हाच शब्द आहे ना?) काढुन टीपी करावसा वाटतो ते तुम्हालाच माहित. तुम्ही फारच गंमतीदार माणुस असणार. तुमचे ठिकठिकाणचे प्रतिसादही मी आवर्जुन वाचते. Lol ( आ॑ताच मुलं लाजवतात..... वरचा वाचुन आले.) Happy

तुमचे पाय लवकर बरे व्हावेत अशी सदिच्छा करुन मी माझे भाषण संपवते. Happy

तुमचे पाय लवकर बरे व्हावेत अशी सदिच्छा करुन मी माझे भाषण संपवते.
----- बरेच मायबोलीकर पदस्पर्श करण्यासाठी तिष्ठत उभे आहेत, त्यांच्यासाठी तरी तुम्ही लवकरात लवकर उभे रहा आणि पळायला Happy लागा. शुभेच्छा.

माझे धागे लोकाना का विनोदी वाटतात ते मला माहीत नाही.. सगळं व्यवस्थीत सुरु असताना अचानक पाडव्याच्याच दिवशी अ‍ॅक्सिडेंट झाला, तर असा मनुष्य ' लोकांची नजर लागू नये म्हणून काळी बाहुली बांधू का लिंबु मिरची बांधू ' असा धागा काढणं अगदी स्वाभाविकच आहे नै का? पण लोकाना मात्र ते विनोदी वाटते.. Proud ( मी आता घराच्या दारावर काळी बाहुली बांधली आहे.. Proud )

बरेच मायबोलीकर पदस्पर्श करण्यासाठी तिष्ठत उभे आहेत,

त्याना निराश करणार नाही.. त्यांचा पदस्पर्श वाया जाणार नाही, असा एखादा धागा नक्कीच काढेन ! Proud

( आगामी आकर्षण .. ????? Proud )

त्यातूनही आणखी तेल उरले तर नामणदिव्यात घालावे..>>

जरुर घाला की एवढे महाग तेल, तेही आपल्याहातून!! दिवा नक्कीच तृप्त होईल. तसे दिव्यात पुरेसे तेल आहे, प्रकाश द्यायला. फक्त गरज असणा-यांनी योग्य तिथे प्रकाश पडेल याची काळजी घ्यावी.

नामणदिवा की लामणदिवा? >> बाफ साठी छान विषय आहे :). दिवे घ्या. Happy

जामोप्या 'जापानी तेल ' वापरा. नक्की गुण येईल. आपल्या आयुष्यातील खास क्षणांसाठी असते म्हणे ते ! Proud पाय बरा होऊन चालता येणे हा खास क्षणच नाही का म्हणता येणार ? Proud

>>> पण एवढ्या आजारपणात्/वेदनेत तुम्हाला बरेच गंमतीदार धागे काढायला सुचताहेत. म्हणजे ते तुम्हाला खरंच काढावेसे वाटतात कि कुरापती (controverciesला हाच शब्द आहे ना?) काढुन टीपी करावसा वाटतो ते तुम्हालाच माहित.

देव आनंद जसा या उतारवयात सुद्धा जसे उत्साहाने नवेनवे चित्रपट काढत असतो (चित्रपटाच्या दर्जाचा आणि तो किती चालेल याचा जरादेखील विचार न करता), तसेच हे रोज नवीननवीन धागे निर्माण करत असतात.

>>> तुम्ही फारच गंमतीदार माणुस असणार. तुमचे ठिकठिकाणचे प्रतिसादही मी आवर्जुन वाचते.

ते खूप विचार करून आणि खूप गांभीर्याने प्रतिसाद देतात. पण आता लोकांना, ते आणि त्यांचे प्रतिसाद गंमतीदार वाटत असतील, तर तो दोष कोणाचा?

Pages