फ्रॅक्चरवरचे धनगराचे आयुर्वेदिक औषध

Submitted by जागोमोहनप्यारे on 5 November, 2011 - 05:14

फ्रॅक्चरवरचे धनगराचे आयुर्वेदिक औषध :

यावर्षीच्या २०११ मधील एप्रिलमधील गुढी पाडव्याला आमचा 'पाडवा' झाला. म्हणजे मला अ‍ॅक्सिडेंट झाला आणि पाय मोडला. Proud डाव्या पायातील पटेला ( गुढग्याची वाटी) , टिबिया, फिब्युला, ( लेग बोन्स) आणि तळपायामधील एक लहान हाड एवढे सगळे मोडले. त्यानंतर ऑपरेशन झाले. प्लेट, मोळे, तारा.. काय काय बसवले. मग हळूहळू वॉकर, काठी घेऊन आणि आता तसेच चालायला लागलो.

गेल्या आठवड्यात सहज नरसोबावाडीला गेलो. तिथे अन्नछत्रात प्रसादाला जात होतो. स्टँडवरुन उतरून अन्नछत्राकडे जात होतो. मी थोडा लंगडत जात होतो. अचानक एक माणूस माझ्याजवळ आला आणि म्हणाला, लंगडताय का? पाय फ्रॅक्चर झाला आहे का? मी होय म्हणताच त्याने सांगितले त्यांच्या भावाला फृएक्चर झाले होते, तेंव्हा एका धनगराने एक औषध लावायला सांगितले होते. तुमचा नंबर द्या आम्ही तुम्हाला त्याची माहिती सांगू.

दुसर्‍या दिवशी त्याच्या बहिणीचा फोन आला. त्यानी औषधाची कृती सांगितली. ती खालीलप्रमाणे..

साहित्य :

२ नारळाचे पाणी
११ गुलाबाची फुले
१०० ग्रॅम बदाम
५० ग्रॅम वेलदोडा घेऊन सोलून बिया घेणे.
२ चमचे हळद.
२ मुठी तुळशीचा पाला
सव्वा किलो खोबरेल तेल

प्रथम मिक्सरमधून वेलदोडा आणि बदाम बरीक पूड करावी. मग त्याच्यात गुलाबाच्या पाकळ्या, तुळशीचा पाला चुरुन घालून पुन्हा बारीक करावे. त्यात २ नारळाचे पाणी घालून पुन्हा मिक्सर फिरवून लगदा करुन घेणे.

नंतर तेलामध्ये हा लगदा आणि हळद घालून ढवळावे. आणि १५ मिनिटे उकळू द्यावे. मिश्रण ढवळत रहावे आणि मोठ्या पातेल्यात कृती करावी. कारण हळद घातली की उतू जाते.

नंतर गार करुन फडक्याने गाळून घ्यावे.

आयुर्वेदिक भांडारातून खालील औषधे आणावीत आणि त्यात मिसळावीत.

१. जंगल पपिता तेल ५० मिली
२. रत्नज्योत तेल ५० मिली
३. वातचिंतामणी रस ५ ग्रॅम
४. योगेंद्र रस ५ ग्रॅम
५. कुमार कल्याण रस ५ ग्रॅम
६. पंचरत्न अनमोल रस ५ ग्रॅम
७. सुवर्ण भस्म ५ ग्रॅम
८. हिरा भस्म ५ ग्रॅम

( शेवटची दोन औषधे प्रचंड महाग आहेत. माझ्या सर्जरीलाही इतका खर्च आला नव्हता ! Proud )

मिश्रण बाटली हलवून ढवळावे. एक दिवस तसेच ठेवावे. त्यानंतर दररोज रात्री फ्रॅक्चर झालेल्या हाताला/ पायाला चोळून लावून मुरवावे. यामुळे ...

हाड जुळायला मदत होते.
स्नायुंची पुष्टी होते.
दुखावलेल्या शिरा पुन्हा कार्यक्षम होतात.

औषध तीन महिने वापरावे.

हे औषध फक्त इजेमुळे झालेल्या (अपघाती) फ्रॅक्चरला वापरावे. फृएक्चर अन्य कारणाने, उदा कॅन्सर, टीबी वगैरे असेल किंवा त्वचेवर ओली जखम असेल तर हे औषध वापरू नये.

औषध फक्त बाह्योपचारासाठी आहे. पिऊ नये. Proud

( गुगलवर सर्च करणार्‍याला ही लिंक मिळावी, म्हणून औषधांची नावे इंग्रजीत देत आहे.. Jungle Papita Oil, Ratnajot oil, Ratnajyot Oil, Vat chintamani Ras, Yogendra ras, kumar kalyan Ras, Pancharatna Anmol Ras, Suvarna Bhasma, Swarna Bhasma, Heerak Bhasma, Vajra Bhasma. Ayurvedic medicine for fracture, for external use only)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आयुर्वेदिक भांडारातून खालील औषधे आणावीत आणि त्यात मिसळावीत.

१. जंगल पपिता तेल ५० मिली
२. रत्नज्योत तेल ५० मिली
३. वातचिंतामणी रस ५ ग्रॅम
४. योगेंद्र रस ५ ग्रॅम
५. कुमार कल्याण रस ५ ग्रॅम
६. पंचरत्न अनमोल रस ५ ग्रॅम
७. सुवर्ण भस्म ५ ग्रॅम
८. हिरा भस्म ५ ग्रॅम >>>>>>>>> हे धागा लेखक आहेत का सध्या इथं ऍक्टिव्ह .. हे बाबा बंगाली औषध कुठून मिळालं ? विडम्बनात्मक होत का हे लेखन ? सुवर्ण भसम आणि हीरक भसम ५-५ ग्रॅम आणि तेही चोळायच्या तेलासाठी .. भारीच Rofl
एक लिंक टाकतो आपल्या संदर्भाला
https://www.healthmug.com/product/dhootapapeshwar-heerak-bhasma-1g/21466...
https://www.eayur.com/ayurvedic/bhasma-pisthi/dhootapapeshwar-suvarna-sv...

on serious note -

गांठिया झड
सतराव्या शतकात महाराणा राजसिंहच्या काळात मेवाड्मधे पितांबर म्हणून जैनमुनी होऊन गेले. त्यांच्या कौशल्याने प्रभावित होऊन राजसिंहने त्यांना राजाश्रय दिला होता. त्यांनी आयुर्वेदासारसंग्रह नावाच एक विविध औषधाचं संकलन स्थानिक भाषेत लिहिलंय. त्यात सर्व उपाय हे राजस्थानात आसपास मिळणाऱ्या वनौषधीचें साधे सोपे आहेत. अस्थिभन्गावर गांठिया झड म्हणून एका वनौषधीचा काढा तीन दिवस पिण्यास सांगितलं आहे. हि वनस्पती भारतात फक्त एकलिंगजी म्हणून तीर्थक्षेत्र आहे त्याच्याच आसपास डोंगरदऱ्यात आढळते. याच्या वापराने फक्त तीन दिवसात मोड्लेलं हाड सांधला जात असा उल्लेख आहे. यातील काही प्रयोग आजही त्या राजघराण्यात वापरले जातात. १९६८ साली याच्या मूळप्रतीवरून मुनी कांतीसागर यांनी "आयुर्वेदना अनुभूत प्रयोगा" हे गुजराती भाषांतर पालीताना येथून प्रकाशित केलंय. कोणीतरी यावर प्रयोग करून बघायला पाहिजे.

सांगली कोल्हापुरात शेतात शेळ्या बसवायला मेंढपाळ येतात म्हणे, यंदा ते आले नव्हते, त्यांना पुराचे भविष्य समजले होते म्हणे,

धनगरांचे औषध जिंदाबाद ?

Pages