फ्रॅक्चरवरचे धनगराचे आयुर्वेदिक औषध

Submitted by जागोमोहनप्यारे on 5 November, 2011 - 05:14

फ्रॅक्चरवरचे धनगराचे आयुर्वेदिक औषध :

यावर्षीच्या २०११ मधील एप्रिलमधील गुढी पाडव्याला आमचा 'पाडवा' झाला. म्हणजे मला अ‍ॅक्सिडेंट झाला आणि पाय मोडला. Proud डाव्या पायातील पटेला ( गुढग्याची वाटी) , टिबिया, फिब्युला, ( लेग बोन्स) आणि तळपायामधील एक लहान हाड एवढे सगळे मोडले. त्यानंतर ऑपरेशन झाले. प्लेट, मोळे, तारा.. काय काय बसवले. मग हळूहळू वॉकर, काठी घेऊन आणि आता तसेच चालायला लागलो.

गेल्या आठवड्यात सहज नरसोबावाडीला गेलो. तिथे अन्नछत्रात प्रसादाला जात होतो. स्टँडवरुन उतरून अन्नछत्राकडे जात होतो. मी थोडा लंगडत जात होतो. अचानक एक माणूस माझ्याजवळ आला आणि म्हणाला, लंगडताय का? पाय फ्रॅक्चर झाला आहे का? मी होय म्हणताच त्याने सांगितले त्यांच्या भावाला फृएक्चर झाले होते, तेंव्हा एका धनगराने एक औषध लावायला सांगितले होते. तुमचा नंबर द्या आम्ही तुम्हाला त्याची माहिती सांगू.

दुसर्‍या दिवशी त्याच्या बहिणीचा फोन आला. त्यानी औषधाची कृती सांगितली. ती खालीलप्रमाणे..

साहित्य :

२ नारळाचे पाणी
११ गुलाबाची फुले
१०० ग्रॅम बदाम
५० ग्रॅम वेलदोडा घेऊन सोलून बिया घेणे.
२ चमचे हळद.
२ मुठी तुळशीचा पाला
सव्वा किलो खोबरेल तेल

प्रथम मिक्सरमधून वेलदोडा आणि बदाम बरीक पूड करावी. मग त्याच्यात गुलाबाच्या पाकळ्या, तुळशीचा पाला चुरुन घालून पुन्हा बारीक करावे. त्यात २ नारळाचे पाणी घालून पुन्हा मिक्सर फिरवून लगदा करुन घेणे.

नंतर तेलामध्ये हा लगदा आणि हळद घालून ढवळावे. आणि १५ मिनिटे उकळू द्यावे. मिश्रण ढवळत रहावे आणि मोठ्या पातेल्यात कृती करावी. कारण हळद घातली की उतू जाते.

नंतर गार करुन फडक्याने गाळून घ्यावे.

आयुर्वेदिक भांडारातून खालील औषधे आणावीत आणि त्यात मिसळावीत.

१. जंगल पपिता तेल ५० मिली
२. रत्नज्योत तेल ५० मिली
३. वातचिंतामणी रस ५ ग्रॅम
४. योगेंद्र रस ५ ग्रॅम
५. कुमार कल्याण रस ५ ग्रॅम
६. पंचरत्न अनमोल रस ५ ग्रॅम
७. सुवर्ण भस्म ५ ग्रॅम
८. हिरा भस्म ५ ग्रॅम

( शेवटची दोन औषधे प्रचंड महाग आहेत. माझ्या सर्जरीलाही इतका खर्च आला नव्हता ! Proud )

मिश्रण बाटली हलवून ढवळावे. एक दिवस तसेच ठेवावे. त्यानंतर दररोज रात्री फ्रॅक्चर झालेल्या हाताला/ पायाला चोळून लावून मुरवावे. यामुळे ...

हाड जुळायला मदत होते.
स्नायुंची पुष्टी होते.
दुखावलेल्या शिरा पुन्हा कार्यक्षम होतात.

औषध तीन महिने वापरावे.

हे औषध फक्त इजेमुळे झालेल्या (अपघाती) फ्रॅक्चरला वापरावे. फृएक्चर अन्य कारणाने, उदा कॅन्सर, टीबी वगैरे असेल किंवा त्वचेवर ओली जखम असेल तर हे औषध वापरू नये.

औषध फक्त बाह्योपचारासाठी आहे. पिऊ नये. Proud

( गुगलवर सर्च करणार्‍याला ही लिंक मिळावी, म्हणून औषधांची नावे इंग्रजीत देत आहे.. Jungle Papita Oil, Ratnajot oil, Ratnajyot Oil, Vat chintamani Ras, Yogendra ras, kumar kalyan Ras, Pancharatna Anmol Ras, Suvarna Bhasma, Swarna Bhasma, Heerak Bhasma, Vajra Bhasma. Ayurvedic medicine for fracture, for external use only)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुमचा पाय एखाद्या हिंदुत्ववाद्याने मोडला का हो? की अ‍ॅ़सिडेंट झाला तेव्हा एखाद्या भगव्या रंगाची गाडी आसपास होती?
वर तुम्ही दिलेले उपचार हे आपल्या आयुर्वेदिक औषधोपचार पद्धतीमधे सांगितलेले उपचार आहेत. म्हणजे सेक्युलर नव्हेत. तुम्हाला बरे चालले!! Proud

AUSHADHE GHETALI ASEL TAR KIMMAT LIHAA TYANCHYA PUDHE...

UGACH 500/- GHEUN MEDICAL MADHE MAGAYLA JAAU.... Happy

जमोप्या....

तुमच्या वरील बाफ वरून तुम्हाला नक्कि काय सुचवायच आहे ? नावातच सर्वकाही आलय !

सर्जरीच्या ७ महीन्या नंतर एका धनगराने दिलेल्या आयुर्वेदिक औषधाचा वापर तुम्हाला करावासा का वाटला ?

तुमच्या म्हणण्या प्रमाणे तुम्ही ईतका खर्च करून सर्जरी करून घेतली तर ७ महीन्यानंतर ही पुर्णपणे बरे का
झाला नाहीत ? अजून ही लंगडतच चालता आहात, ह्याचा अर्थ प्रोब्लेम आहेच.

तुम्ही सर्व रेसीपी पुर्णपणे लिहून घेतलीय, तुम्हाला ह्या औषधात लागणार्या पदार्थाची किंमत व उपलब्धता
या वर ही माहीती आहे.

तुम्ही जर हे औषध वापरून बघीतल आणी जर कदाचीत ... त्या नंतर गूण आलाच तर त्याच क्रेडीट तुम्ही त्या औषधाला ध्याल ?

तुम्ही म्हणता आहात त्या प्रमाणे ह्या औषधाने हाड जुळवायला मदत होते. पण मूळात हाड मोडल्यावर जर मोडलेले हाड जर एकमेकाच्या जवळ नसेल तर ते बाह्य क्रुतीने जवळ आणावे लागते अन्यथा हाड जुळणे शक्य
नसते. अशा परीस्थीतीत फक्त औषध घेऊन काय फायदा ?

अचानक एक माणूस माझ्याजवळ आला आणि म्हणाला, लंगडताय का? पाय फ्रॅक्चर झाला आहे का? मी होय म्हणताच त्याने सांगितले त्यांच्या भावाला फृएक्चर झाले होते,
----- हे समाजसेवा करणारे रस्तो-रस्ती सावजाच्या शोधार फिरत असतांत कां? त्याने तुम्हाला नंबर का मागितला, भावाचा नंबर का नाही दिला ?

माझ्याकडे असाच अनुभव (तुम्हाला हा प्रॉब्लोम आहे कां ? माझ्या भावाला किंवा अजुन कुणा नातेवाईकाचे नांव असेच झाले होते, तुमचा नंबर द्या, ते संपर्क करतील) आहे. मी त्याच्या बोलण्याला जास्त भिक न (मराठी समजत नाही :स्मित:) घालता पुढे चालता झालो.

जामोप्या काळजी घ्या स्वत:ची आणि स्वतःच्या पायाची. आता तुम्हाला त्याच्या औषधाने बरे वाटले अथवा नाही हे ह्याच बाफ वर लिहा (नवीन बाफ काढायचा विचार असेल तर तशी लिंक येथे पण द्या).

हिरा भस्म कसे तयार करतात? हिरा हा डायमंड कार्बन आहे आणि तो ३२०० सें ला वितळतो. तो जळुन त्याचे भस्म कसे तयार होते याची माहिती मिळावी.

>>हिरा भस्माऐवजी कोळशाची राख वापरली तर?<<
हिरा भस्माला हा पर्याय चांगला आहे. म्हणजे औषधात टाकून गुण आला तर आला, नाही आला तर
तीच कोळशाची राख दात घासायला कामाला येईल. म्हणजे एक औषध आणि फायदे दोन. Proud
हा.का. ना. का.

सर्जरीच्या ७ महीन्या नंतर एका धनगराने दिलेल्या आयुर्वेदिक औषधाचा वापर तुम्हाला करावासा का वाटला ?

सर्जरी झाली तरी काही स्नायू हे दीर्घकाळ आखडलेले रहातात.. इतर लिगामेंट, नर्व यानाही इजा झालेली असते. सर्जरी करुन हाड जुळवले की सगळे बरे झाले असे नसते. हे दोष निघून जायला काही काळ लागतो. आयुर्वेदिक औषधे अशा वेळी मदत करु शकतात. ( तज्ञ माहिती देतील, अशी अपेक्षा.) अशी औस्षधे सर्जरीच्या जखमा सुकल्यानंतरच वापरावी लागतात..

मोडलेल्या हाडाचा कॅल्शियम कंटेट वाढावा यासाठी काही आयुर्वेदिक कॅप्सुलही वापरल्या जातात. सर्जनदेखील सर्जरीनंतर अशा गोळ्या प्रिस्क्राइब करतात. मला युनियन टोटल ही कॅप्सुल दिली होती.. http://boneunion.com/
माझे बोन्स व्य्वस्थीत हील झाले आहेत.. आण्खी वर्षभराने तारा, मोळे काढून टाकतील. तोपर्यंत स्नायु, लिगामेम्ट मजबूत व्हायला आयुर्वेदिक औषधेच उपयोगी पडतात.. अ‍ॅलोपथीत कॅशियम, विटॅमिनच्या गोळ्या याशिवाय यासाठी काही नाही. अपघात, फ्रॅक्चर झालेले इतर लोकही माहिती देऊ शकतील.

अ‍ॅडमिन, हा लेख विनोदी स्वरूपाचा आहे आणि एका मान्यता मिळालेल्या औषधपद्धतीची खिल्ली उडवणारा आहे. मुळात याचा "योग आणि आयुर्वेद" याच्याशी काहीही संबंध नाही, कृपया हा बीबी इथून काढाल का?
>>>
नंदिनी हा लेख विनोदी आहेच हे कशावरून.. ह्याची खात्री प्रथम लेखकास वा इतर तज्ञास विचारुन करून घेणे अधिक सयुक्तिक नाही का? जर विनोदी असेल तर दिशाभूल होवू नये ह्यासाठी इथून तो विनोदी लेखनात हलवणे योग्य.

राहिला विषय >> एका मान्यता मिळालेल्या औषधपद्धतीची खिल्ली उडवणारा आहे. >> ह्या वाक्याचा. ही विचारपद्धत खूप धोकादायक आहे. मान्यता मिळालेल्या, सर्वमान्य असलेल्या गोष्टींची खिल्ली उडवणे, त्यावर विनोद करणे जर आक्षेपार्ह मानले जाऊ लागले व त्यावर बंदी घालण्याची मानसिकता आली तर समाजाचे तालिबनायझेशन होण्यास वेळ लागत नाहीत (मार्कंडेय काट्जूंची माफी मागून :फिदी:). उदा. डार्लिंग दत्तवर आक्षेप. उद्या ह्याच न्यायाने फलज्योतिषाची चेष्टा करणे आक्षेपार्ह ठरेल.

तुमचा पाय एखाद्या हिंदुत्ववाद्याने मोडला का हो? की अ‍ॅ़सिडेंट झाला तेव्हा एखाद्या भगव्या रंगाची गाडी आसपास होती?

त्या दिवशी गुढी पाडव्याचा मुहुर्त होता . Proud

हा लेख विनोदी नाही, . स्टेप बाय स्टेप फोटॉ टाकायचाही विचार होता. हिरवट शेवाळी रंगाचे तेल तयार झालेले आहे. मला वाटले होते इथले आयुर्वेदिक तज्ञ यातील आयुर्वेदिक औषधींवर काही माहिती देऊ शकतील, म्हणून इथे लिहिले.

जामोप्या तुम्ही स्वतः डॉक्टर आहात ना? मालदीवला मेडिकल ऑफिसर होते ना? मग अशा अनधिकृत औषदावर कसा विश्वास ठेवला? नन्दिनी यानी ज्या मान्यता प्राप्य पद्धतीची खिल्ली उडवलीय म्हटले आहे ती कोणती मान्यताप्राप्त पद्धत? ही तर बुवाबाजीच दिसते आहे.

जामोप्या,

तुमचे गेल्या काही दिवसांतले/महिन्यांतले प्रतिसाद बघता, अ‍ॅलोपथी तसेच धनगराच्या आयुर्वेदिक औषधांनी तुमचा गुडघा बरा झालेला नाही, असे स्पष्ट दिसून येत आहे. Biggrin

जामोप्या, इथे हे लिहिण्यात जरा घाईच केलीत असं वाटत नाही? स्वतः वापरुन, उपयोग होतोय का/ गुण येतोय का हे बघून लिहायचंत ना.

मला वाटले हात पाय मोडके अजून लोक असतील.. सगळ्यानी मिळून वापरले, तर डेटा चांगला गोळा होईल ! Proud शिवाय आयुर्वेदिक तज्ञ औषधांची माहिती देतील असे वाटले.

मास्तुरे, मी औषध गुढग्यालाच लावणार आहे, तुम्ही हवे तर डोक्याला लावून बघा... पण तुम्हाला हे औषध बहुधा चालणार नाही, कारण त्याचा रंग हिरवा आहे.. Proud

टण्या. माझा आक्षेप खिल्ली उडवण्याला बिल्कुल नाही, ती तर अ‍ॅलोपॅथी, होमिओपॅथी अशी सर्वांची उडवली जातेच ना. अथवा मी बीबीवर बंदी आणा असेही कुठे म्हटलेले नाही. फक्त तो या विभागामधे असू नये अशी इच्छा होती.

कुणी दुसरा रोमामधला माबोकर ही रेसिपी वाचून याप्रकारे औषध वापरले तर? असा विचार मनात होता. जर हा लेख विनोदी नसेल अणि खरोखर जामोप्या हे औषध वापरत असतील तर काहीच प्रॉब्लेम नाही. उलट या औषधाचा नक्की काय फायदा झाला हे जरूर लिहावे. ते स्वत: डॉक्टर असल्याने त्याना ते उत्तम रीत्या लिहिता येइल.

जामोप्यानी पूर्ण लेखामधे हे औषध त्यानी वापरले आहे का याचा उल्लेख केलेला नाही, त्यांचे आधीचे धागे उघडण्याची परंपरा हाही बीबी त्यानी फक्त वादविवाद करण्यासाठी अथवा खिल्ली उडवण्यासाठी उघडला असावा असा समज होऊ शकतोच. आता वरच्या प्रतिसादामधे जामोप्या यांनी लिहिलय की हे तेल त्यानी बनवले आहे. त्याना अजून माहिती हवी आहे, हेच त्यानी लेखामधे लिहिले असते तर कदाचित हा गैरसमज झाला नसता.

मी माझी वरची पोस्ट एडिट करत आहे. Happy माझा आयुर्वेदावरती पूर्ण विश्वास आहे, फक्त त्यामधे बुवाबाजी करून पैसे उकळणार्‍यांचा मात्र फार राग आहे.

मी हे औषध कालच तयार केले आहे. ( म्हणुन तर औषध हिरवे असल्याचे समजले. ) . आज रात्रीपासून वापरणार आहे. यातील आयुर्वेदिक औषधांबाबत गुगल सर्च केला, पण विशेष माहिती मिळू शकली नाही.. एकंदरच आयुर्वेदाबाबत गुगल अजुन अडाणीच आहे ! Proud

वापरणार्याने आपल्या जबाबदारीवर वापरावे.. ( पण ही सूचना सगळ्याच गोष्टीना लागू असतेच, त्यामुळे तसे मी लिहिले नाही. )

हिरा दुसरे तिसरे काही नसून कार्बन आहे. हिरा भस्माऐवजी कोळशाची राख वापरली तर?

अगदी बरोबर... बायकोला किंवा गर्ल फ्रेंडला हिर्‍याऐवजी कोळसा भेट देऊन बघा.. म्हणजे लगेच समजेल दोन्ही एकच का वेगवेगळे ते ! Proud

(दोन्ही म्हणजे हिरा, कोळसा.. गर्लफ्रेंड बायको नव्हे! ) Proud

देव करो आणी तुमचा पाय लवकर बरा होवो. पायाला फ्रेक्चर होऊनही ज्या उत्साहाने आपण नवनवे धागे उघडताय ते पाहून पायाला फ्रॅक्चर असतानाही समोरच्या फ्लॅट मधल्या खुनाचा शोध लावणारा हिचकॉक चा नायक आठवला Happy

>>> मी हे औषध कालच तयार केले आहे. ( म्हणुन तर औषध हिरवे असल्याचे समजले. ) .

बापरे! आधीच "गुडघ्याचा" आजार आणि त्यातून हे असलं औषध!

>>> मी हे औषध कालच तयार केले आहे. ( म्हणुन तर औषध हिरवे असल्याचे समजले. ) .
----- औषध तयार करणार्‍याचे विचार औषधात उतरतात हे यातुन सिद्ध होते. पुढच्या काही दिवसांत औषधाचे गुण दिसतीलच :स्मित:...

ह्यात धनगराचा काय संबध ते कळ्ळल नाय बा!

डॉ. अन्वर असे काही तरी म्हणाले असतील नि तुम्ही "धनगर" ऐकले असेल बहुदा!

Pages