पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२

Submitted by रूनी पॉटर on 10 March, 2011 - 17:20

या अगोदरचा पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१ धागा.
पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
या ठिकाणी, या ठिकाणी आणि या ठिकाणी अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
बर्‍याचदा पोळी-चपाती-फुलके-पराठे याबद्दल प्रश्न येतात, त्यासाठी आता इथे वेगळा धागा आहे.
तसेच वेगवेगळ्या पदार्थांच्या घटकांच्या नावाबद्दल वगैरे प्रश्न इथे विचारता येईल

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक्स्पर्टसना एक विनंती आहे.
भारतातून परदेशात गेलेल्यांना भारतीय वस्तूंना परदेशी पर्याय काय हे बर्‍याचदा गोंधळल्यासारखं होतं. पण निदान भारतीय वस्तू परिचयाच्या असल्याने पर्याय शोधणं कदाचित सोपं जात असावं. कदाचित नसेलही.
तसंच अनेक देशोदेशीच्या रेसिपी वाचताना भारतात करून बघाव्याश्या वाटल्या तरी सगळ्या वस्तू इथे मिळतातच असं नाही आणि अनेकदा त्या काय असतात हे ही माहित नसतं त्यामुळे इथे पर्याय शोधता येत नाहीत.
उदाहरणार्थ आजच मी सूपच्या रेसिप्या शोधत असताना crème fraîche हा शब्द आडवा आला. गुगलल्यावर हा सॉवर क्रीमचा आत्येचुलतभाऊ असावा असं जाणवलं. कदाचित इथे कुठल्यातरी पंचतारांकित फूड स्टोरमधे मिळतही असेल पण सामान्य बाईने काय पर्याय वापरावा बा?
हे एक उदाहरण झाले. असे अनेक पदार्थ असू शकतात ज्याचे भारतीय ते पाश्चात्य वा इतर खाद्यसंस्कृती आणि पाश्चात्य वा इतर अभारतीय खाद्यसंस्कृती असे दोन्ही प्रकारे 'भाषांतर/ रूपांतर' होऊ शकते. किंवा निदान अगदी एक्झॅक्ट तीच वस्तू नाही पण जवळपासची तेच काम करणारी वस्तू असेही...

तर अश्या याद्या इथल्या एक्स्पर्टसनी बनवल्या तर आमच्यासारख्या बिगारी पास लोकांसाठी लय लय उपकार होतील. Happy

करणार का कोणी?

दिनेशदा, अंडी उकळण्याची कृती अगदी पर्फेक्ट बरं का.. फक्त मला अंडी ३ मि. ऐवजी ४-५ मि उकळावी लागली. कदाचित आमच्याकडील दमटपणाचा परीणाम असू शकतो. पण हो. तो टिपिकल वास येतोच, फक्त तेवढा उग्र नाही.

धारा,
अगदी शास्त्रीय कृति सांगायची तर पाण्याला उकळी आली कि त्यात अंडी टाकून झाकण ठेवायचे आणि चक्क गॅस बंद करायचा.
३ मिनिटात, पाण्याचे तपमान ६५ अंश सेंटीग्रेड खाली उतरणार नाही. (अर्थात हवामान खुपच थंड असेल, तर उतरेलही.)
एका अंड्यावर कुणी प्रयोग करुन करणार का ?

दिनेशदा, अंडी उकडणे याविषयीचे प्रश्न पुन्हा पुन्हा येत आहेत. त्याबद्दलची सविस्तर माहिती/ कृती नविन बाफ उघडून लिहाल का कृपया?

अगदी शास्त्रीय कृति सांगायची तर पाण्याला उकळी आली कि त्यात अंडी टाकून झाकण ठेवायचे आणि चक्क गॅस बंद करायचा. >> मी केले आहे. अंडी १००% उकडली पण वासाबाबत आठवत नाही. मी एकावेळी १२ अंड्यांसाठी केले आहे.

धन्यवाद दिनेशजी आणि इतर.............

कालच प्रयोग यशस्वी झाला.......... मदत करणार्‍या सर्व शास्त्रज्ञांचे आभार.. Happy

सुखदा,
त्यासाठी ड्राय यीस्ट किंवा सेल्फ रेझिंग फ्लोअर लागेल.
सेल्फ रेझिंग फ्लोअर वापरणे जास्त सोयीचे पडते. साधारण सैलसर भिजवायचे आणि थापून पॅनमधे मम्द आचेवर भाजायचे. आपोआप फुलून येते. यीस्ट वापरून प्रूव्ह करण्यासाठी थांबावे लागते तसे थांबावे लागत नाही.

पिझ्झा वरुन आठवले, काल अलका चौकाजवळ कुलकर्णी पेट्रोलपंपासमोरच्या बर्गर किंग मधला पिझ्झा खाल्ला. बराचसा पुना बेकरी मधे मिळतो तसा. यावरचे चिझ वितळलेले नसते. शेवटी चीझ टाकतात. मला तरी हा प्रकार आवडतो. रेडिमेड बेस वापरतात आणि त्यात फक्त भो. मिरची, कांदा, टोमॅटो असते. पण आधी कुठलीशी चटणी वापरतात. कुणाला हा पिझ्झा करायची प्रमाणासकट रेसिपी माहित असेल तर टाका ना.

धन्यवाद दिनेशदा,अजुन एक प्रश्न आहे,कदाचित बाळबोध वाटेल ,पण तुम्हि सांगितल्या प्रमाणे पिझ्झा बेस बनवल्या नंतर तो बेक करुन घ्यावा आणि मग त्यावर टोपिंग्ज लावून पुन्हा बेक करावा म्हणजे दोनदा बेक करायचा कि डायरेक्ट सैल सर भिजवून थापलेल्या पिठावरच टोपिंग्ज लावून एकदाच बेक करायचा?[sorry पण या बाबतित मी गहन अज्ञानी आहे.]

सुखदा, ही एका ब्लॉगची लिन्क देतेय. माझी आवडती पिझ्झा रेसिपी आहे ही. छान होतो पिझ्झा या पद्धतीने! tried n tested आहे. Happy
फक्त मी जरा कष्ट वाचवायचे म्हणून रेडीमेड पास्ता सॉस वापरते बेसला लावायला.

http://fooddreamers.blogspot.com/2011/02/my-style-stuffed-crust-chicken-...

थापून किंवा लाटून घेतला की तव्यावर दोन्ही बाजूने बटर सोडून जरासा भाजून घ्यायचा. मग बेकिंग ट्रे वर ठेवून त्यावर टोमॅटो प्युरी( टोमॅटो प्युरी, जिरापावडर, लाल तिखट, मिठ, जराशी साखर एकत्र जारावेळ शिजवून घेतलेली) पसरवायची. त्यावर आवडीच्या भाज्या(पालक प्युरी, मशसिभ, भो. मिरची, कांदा, झुकीनी, मक्याचे दाणे, ऑलिव, ईतर. ) पसरायच्या. त्यावर हवे तेवढे किसलेले चिज घालायचे, आवडत असल्यास जरासे ऑलिव ऑईल टाकयाचे आणि बेक करायचे. गरम गरम पिझ्झावर ताव मारायचा.

कुरकुरीत पिझ्झा हवा असेन तर बेस पातळ करायचा. कापयला सोपा हवा असेन तर जरा जाडसर करायचा.

पातळ थापला आणि ग्रिल करायचा असला तर एकदाच टॉपिंग लावून बेक करायचा. पण जाड हवा असेल तर दोनदा.
मला स्वतःला एक बाजू भाजून त्यावर टॉपिंग लावून दुसर्‍या बाजूने भाजलेला आवडतो. आमच्याकडे असा दोन्ही बाजूनी भाजलेला बेस तयारच मिळतो.

धन्यवाद गोडगोजिरी ,नलिनी आणि दिनेशदा!!आता उद्याच पिझ्झा बनवते.खरंच माबो मुळे कित्ति मदत होते,थॅक्स यू माबो!!!

पिझ्झा बेस' चं पिझ्झा सोडून अजुन काही करता येइल का ? (लेकाला अचानक ताप आल्यामुळे आवडीचा असुनही त्याला खाता येणार नाही म्हणून पिझ्झा करायचा नाहीये. )

@राखी,

पिझ्झा बेस च्या स्ट्रिप्स कापुन त्यावर गार्लिक बटर लावुन बेक कर. हवं तर त्यावर थोडे पिझ्झा चीज पण घालु शकतेस.

अश्याच स्ट्रिप्स कापुन थोड्या कडक बेक कर. सूप बरोबर सूप स्टिक्स म्हणुन खा. यावर हवं तर थोड्या कलौंजी (कांद्याच्या बीया) किम्वा तीळ लावुन बेक करु शकतेस.

पिझ्झा बेस क्लिंग रॅप मधे बांधुन फ्रिझ करं.

दिनेशदा, मी केला एका अंड्यावर प्रयोग - पूर्ण फसला. आधीचीच पद्धत सेफ आहे. गॅस बंद केल्यावर ३ मि.नी अंडं पूर्ण उकडलंच नाही गेलं. Sad

अंडी उकडण्याची खात्रीशीर पद्धत अशी

भांड्यामधे पाणी घ्या.
त्यात अंडी घाला. शेगडी चालू करा.
पाणी उकळले की शेगडी बंद करून टाका आणि भांड्यावर झाकण ठेवून द्या.
८ मिनिटानंतर झाकण काढा. परफेक्ट अंडी तयार.
काळी/हिरवी रिंग अजिबात येत नाही या पद्धतीने अंडी उकडली तर.

आभार धारा, मला सध्या असे प्रयोग करता येत नाहीत, कारण हाताशी गिनी पिग नाही !!!

पावडर कर आणि रोज एक चमचा खा. कुटुंबातील इतर सदस्यांना पण दे.

थोडे मला पाठव. परवा दुकानात घेता घेता राहिले. Proud

Pages