आजकाल सकाळ संध्याकाळ प्रवासात माझा अर्धा पाऊण तास जातो. अंतर केवळ ८ किमीचे पण तेवढा
वेळ जातोच. ड्रायव्हर गाडी चालवत असतो, आणि मी मात्र एफ़ एम वर हिंदी गाणी ऐकत असतो.
इथे सकाळी कपाचा ऎंड कॉफी असा एक चांगला कार्यक्रम असतो. (हा कार्यक्रम Soundasiafm.com
वर उपलब्ध आहे.) त्यातल्या गाण्यांपेक्षा मला निवेदक जेसी आणि जीत यांच्या गप्पा ऐकायला आवडतात.
त्याबरोबर हवामानाचा अंदाज (जो कधीच खरा ठरत नाही.) आणि ठळक बातम्या यांच्यासाठी ऐकतो.
पण आज लिहायचे कारण म्हणजे, त्यात वाजवली जाणारी गाणी. हि गाणी अगदि नवीन असतात.
याच एफ़ेम स्टेशनवर दिवसभरात आणि रात्रीही जुनी सुंदर गाणी लावतात आणि त्यातले निवेदनही
चांगले असते, पण आमच्या येण्याजाण्याच्या वेळेत मात्र नवीनच गाणी ऐकवली जातात.
कबूल केले पाहिजे, कि यापैकी ऐकून झाल्यावर लगेच एकाही गाण्याचे शब्द मला सांगता येणार नाही्त.
सेनोरिता सारखी काही गाणी, सिनेमा बघितल्यामूळे ओळखीची वाटतात, पण बाकिची हिंदी होती कि
पंजाबी होती का इंग्लीश होती, हे ही मला सांगता येणार नाही.
सगळ्यात सामायिक जर मला काही वाटत असेल तर -
१) असप्ष्ट शब्दोच्चार : पुर्वीचे गाणे मला अनोळखी असले तरी त्यातले शब्द मी उतरवून घेईन, इतके
स्पष्ट ऐकू येतात. आताच्या गाण्यातले शब्द मात्र मला अजिबात कळत नाहीत.
हि सुरवात कधी झाली ते सांगता येत नाही, पण असे अगदी पहिले गाणे मला आठवतेय ते, रेमोचे
प्यार तो होनाही था. मला तर ते फ्यार ठो ओनाई ठा, असेच ऐकू आले होते.
या कलाकारांचे शिक्षण हिंदीतून झाले नसेलही, पण संगीतकाराने तसा आग्रह धरायला नको होता का ?
शुक्रतारा मंद वारा, गाण्यापुर्वी अरूण दाते आणि सुधा मल्होत्रा यांनी मराठी गाणे गायले नव्हते. पण
ते गाणे ऐकल्यावर हे खरे वाटेल का ? श्रीनिवास खळ्यांनी, लताच्या आवाजात अथर्वशीर्ष सादर केले
होते. त्यातल्या प्रत्येक शब्दाचा नव्हे तर अक्षराचा उच्चार खणखणीत आहे.
२) गेंगाणा स्वर : आता कधी कधी गाण्यात मधेच एक गेंगाणा स्वर ऐकू येतो. हा स्वर मानवी
गळ्यातून नक्कीच आलेला नसतो. याला गेंगाणा म्हणायचे कि आणखी काही ते पण मला सांगता
येणार नाही. पण हा स्वर बहुदा, कॉम्प्यूटरच्या मदतीने काढत असावेत.
३) एकापेक्षा जास्त व्यक्तीचे आवाज. गाणे एकच व्यक्ती गात असते पण दोन व्यक्ती एकत्र गाताहेत
असा परिणाम साधलेला असतो. आणि हे सहज चाळा म्हणून केल्यासारखे वाटते. असा परिणाम
आर्डीने पण काही गाण्यात साधला होता (क्या जानू सजन (लता), उलझन हजार कोई डाले, हो
बदन जलता है (दोन्ही आशा))
अजय देवगणच्या, आक्रोश मधे पण आझादी कि करे सौदेबाजी असे एक जरा बरे गाणे होते,
त्यातहि असाच परिणाम जाणवला मला. पडद्यावर तर ते गाणे बॅकग्राऊंडलाच वाजते.
४) एकसुरी ताल. खरे तर मी हा विचित्र शब्द प्रयोग करतोय, पण मला म्हणायचेय ते हे
कि ताल प्रकर्षाने जाणवतो, पण त्यात काही नाविन्य दिसत नाही. बहुतेक तो चार ते पाच
मात्रांचाच असतो. आणि तो नेहमीच गायक गायिकेच्या वरचढ वाजत असतो. कोण, कुणाला
साथ करतेय तेच कळत नाही. अगदीच नवीन काही ऐकायला मिळत नाही असे नाही.
गुजारिश मधल्या उडी उडी मधे जरा वेगळा ताल होता. सैफ़ आणि दिपिका च्या एका गाण्यातही
(चन्ना रे चन्ना रे ) काही वेगळे आढळले होते.
पण दादरा, झपताल, रुपक सारखे ओळखीचे ताल अजिबातच ऐकायला मिळत नाहीत.
५) परदेशी गाण्यांचा प्रभाव.
आता खुपदा परदेशात(च) चित्रीकरण होत असल्याने काही परदेशी धुन गाण्यात ऐकू येतात.
सात खून माफ़ मधल्या डार्लिंग वर रशियन गाण्यांचा प्रभाव होता तर जिंदगी ना मिलेगी दोबारा
मधे स्पॅनिश सुरावटी होत्या. त्या जरा अनोख्या असल्याने कानाला गोड वाटतात. पण हे अलिकडचेच
असे मात्र नाही.
अपनी कहानी छोड जा वर रशियन सुरावटीची छाप होती तर सायोनारा सायोनारावर जपानी.
ओये ओये वर स्वाहिली गाण्याची होती तर लडकियोंसे ना मिलो तूम वर अरेबिक.
पण परदेशी धुनींपेक्षा मला पंजाबी शब्द आणि सुरावटींचा नको तितका प्रभाव आढळतो.
अरेच्चा पण माझ्या लेखाचा हेतू हा नव्हता, तर पुर्वी जे काही साचे वापरात होते, ते आता
मोडल्याचे जाणवतेय, त्याबद्दल लिहायचे होते. असे काही साचे बघू या.
१) भजन
पुर्वी प्रेक्षक जास्त भाविक होते म्हणा कि आणखी काहि. पण अनेक सुंदर भजने त्याकाळात निर्माण
झाली. मैने प्रभु आजतक तूमसे कुछ नही मांगा सारखा एखादा संवाद झाला, कि भजन यायचेच.
हे रोम रोम मे बसनेवाले राम (नीलकमल) प्रभु तेरो नाम (हम दोनो) असे थेट भजनाचे प्रसंग
असायचे किंवा आडवळणाने एखादा डोस द्यायचा असायचा. ना मै धन चाहू ( काला बाजार)
कधी तरी सगळेच अवघड होऊन बसलेले असायचे. तेरी है जमी (द बर्निंग ट्रेन)
पण शेवटचे असे भजन तर मला लगान मधलेच आठवतेय ( तेरे बिना हमका ) नंतर काही
सुफ़ी रचना आल्या. पण त्यातला आवेश, गान प्रकार हा जरा वेगळाच असायचा. आपल्याकडे
भजनात शांत रस दिसतो. पण मुस्लीम धर्मातील भजनात थोडा बेभानपणा असतो.
हा प्रकार प्रत्यक्ष बघितल्याशिवाय नीट लक्षात येणार नाही. पण जॉन अब्राहम आणि अस्तादचा
जो अफ़गाणिस्तानमधला सिनेमा आला होता (काबूल ना ?) त्यात असा एक प्रसंग होता.
२) गझल
गझल हा शब्द ऐकला कि सिनेमासंदर्भात माझ्या पिढीच्या आधीच्या लोकांना मदनमोहन आणि
लताच आठवणार. अदालत, जहॉंआरा, दस्तक, गझल, मेरा साया, वह कौन थी असे अनेक
चित्रपट या दोघांनी गाजवले. पण बाकिच्या संगीतकारांनी देखील प्रसंगानुरुप उत्तम चाली बांधल्या.
रोशन, शंकर जयकिशन, जयदेव अशी अनेक नावे घेता येतील. मग मधे हा गायनप्रकार मागे
पडला. मग जगजित सिंग, गुलाम अली, पंकज उदास, सुरेश वाडकर, मनहर आदी लोकांनी
काही उत्तम गझला दिल्या. आता मात्र हा गायनप्रकार चित्रपट्संगीतातून गायब झाल्यासारखा
वाटतोय. सरफरोश नंतर चांगली गझल ऐकल्याचे आठवत नाही.
३) कव्वाली
चित्रपट संगीतात हा गायनप्रकार लोकप्रिय होताच पण त्या काळात मुंबईतही कव्वाली गायनाचे
कार्यक्रम व्हायचे. शकिला बानू भोपाली, जानी बाबू कव्वाल अशी मातब्बर मंडळी यायची.
चित्रपटांपैकी बरसात कि रात, (इश्क इश्क है, निगाहे नाजके मारोंका, जी चाहता है चूम लू)
कभी ए हकिकते मुंतजर (दुल्हन एक रात की) निगाहे मिलाने को ( दिल ही तो है)
चांदी का बदन (ताजमहाल) अल्ला ये अदा (मेरे हमदम मेरे दोस्त) जब इश्क कही हो जाता
(आरजू ) अशा कितीतरी कव्वाल्या आवर्जून संग्रही ठेवण्यासारख्या आहेत.
हम किसीसे कम नही, अमर अकबर ऎंथनी मधेही कव्वाल्या होत्या. शिरडीवाले साईबाबा तर
एकेकाळी रेल्वेतल्या भिकारी लोकांचे पेटंट गाणे होते. आर्डीने मग बर्निंग ट्रेन मधे, पल दो पल
अशी खणखणीत कव्वाली दिली.. पुढे मात्र हा प्रकार गायबच झाला. अगदी अलिकडे वन्स
अपॉन अ टाईम मधे कव्वाली सदृष्य काहितरी ऐकले खरे.
४) मुजरा
मला नेमके माहित नाही कि मुंबईत ताडदेवच्या कोठेवाल्या अजून मुजरा सादर करतात का, पण
हा प्रकार चित्रपटात खुप लोकप्रिय होता. अगर दिलबर कि रुसवाई (खिलौना), रुठे सैया (देवर)
चाहे तो मोरा जिया लैले (ममता) तस्वीरे मुहोब्बत ( संघर्ष) हम हाले दिल सुनाएंगे (मधुमति)
दिल कि कहानी (ताजमहाल) साकिया आज मुझे (साहब बीबी और गुलाम) हे माझे आवडते
मुजरे. रात बी है कुछ भिगी भिगी (मुझे जीने दो ) हा सर्वात जास्त आवडता.
पण या संदर्भात दोन चित्रपटांचा उल्लेख केल्याशिवाय चालणार नाही तो म्हणजे पाकिजा
आणि उमराव जान. पाकिजात मीना कुमारी नृत्यनिपुण नसली तरी सितारा देवीच्या नृत्य दिग्दर्शनाने
वेगळीच जान आली होती. रेखाच्या उमराव जान मधे अशाच्या गायनाचा मोठा वाटा होता.
मला ऐश्वर्याच्या उमराव जानचा पण उल्लेख करायला हवा. ती त्यात सुंदर नाचली असली तरी
गाणी मात्र अत्यंत सुमार होती.
देवदास मधला माधुरीचा, मार डाला, मात्र मला विशेष आवडला नव्हता, जून्यापैकी नर्तकी नावाच्या
सिनेमात नंदाने आणि तवायफ़ मधे रति अग्निहोत्रीने सुमार मुजरे पेश केले होते. नजर लागे
राजा तोरे बंगले पर, (काला पानी) नलिनी जयवंतचा नाचही काहि खास नाही.
अलिकडे नव्या सिनेमात असा मुजरा बघितल्याचे आठवतच नाही.
५) शास्त्रीय गायन आणि नृत्य
लता आणि आशा बरोबरच, मन्ना डे आणि रफ़ी हे शास्त्रीय गायनात तरबेज कलाकार सक्रिय होते
तोपर्यंत शास्त्रीय रागांवर आधारीत गाणी खुलत होती. प्रसंगानुरुप अनेक दिग्गज शास्त्रीय संगीत
गायकांनी पण आपला आवाज चित्रपटासाठी दिला होता. (मी इथे यादी देत बसलो तर पाने पुरणार
नाहीत.)
या गाण्य़ांना अनेकवेळा शास्त्रीय बृत्यांची पण जोड मिळत असे. मुख्य प्रवाहातल्या सर्वच नसल्या
तरी वैजयंतीमाला, वहिदा रेहमान, आशा पारेख, पद्मिनी, रागिणी, कुमकुम,संध्या या शास्त्रीय नृत्यात
पारंगत होत्या. त्यामूळे गाणे आणखीहि खुलत असे. या अभिनेत्रींबरोबरच काही कमी माहित असलेल्या
अभिनेत्रींनी पण उत्तम शास्त्रीय नृत्य पेश केलीत. उदा. रत्ना (लागा चुनरी मे दाग), विजया चौधरी
(पायलवाली देखना) बेला बोस (तेरे नैना तलाश करे जिसे) अनिता गुहा (प्रितम दरस दिखाओ)
कुठलीही सुरेल रचना हि कुठल्या ना कुठल्या शास्त्रीय रागावर आधारीत असतेच तरीपण आताच्या
गाण्यातले राग, ठळकपणे जाणवत नाहीत एवढे खरे. जोपर्यंत मी विविध भारतीवर संगीत सरिता
ऐकत होतो तोपर्यंत तरी नव्या चित्रपटातील गाणी रागाच्या नमुन्यादाखल वाजवत नसत.
शेवटचे असे गाणे ऐकले ते, हम दिल दे चुके सनम मधले. सूरसंगम नंतर शास्त्रीय नृत्यगायनावर
आधारित चित्रपटही आल्याचे आठवत नाही. शबानाचा रागा, अपवदात्मकच.
शेवटचे उत्तम क्लासिकल नृत्य आठवतेय ते तब्बूचे, तक्षक मधले (रंग दे नाही, नुसतेच भरतनाट्यम
केलंय)
६) कॅबरे
कॅबरे आणि हेलन हे जवळजवळ समानार्थी शब्द आहेत. पण हेलन यायच्या आधी कक्कू अशी नृत्ये
सादर करत होतीच. हेलन ने देखील इतर नृत्यप्रकार लिलया पेलले होते. तिने अगदी वैजयंतीमालाशी
मुकाबला केला होता (डॉ.विद्या, शतरंज) तिने कॅबरेला मात्र एक दर्जा मिळवून दिला. ती कुशल नर्तिका
तर होतीच त्यामूळे तिच्या नृत्यामधे अश्लील हावभाव करायची तिला गरज वाटली नाहि. ते आणले
बिंदूने. पुढे हेलनलापण तसे करावे लागले (इंतकाम, डॉन, राम बलराम, इन्कार)
अगदी क्वचितच मुख्य अभिनेत्री अशी नृत्ये सादर करत असत. मुमताज (हमजोली) आणि नर्गिस
(रात और दिन) तिच्या समकालीन अशा पद्मा खन्ना, जयश्री टी, मीना टी (या तिघी कथ्थक नर्तिका
होत्या. शिवाय फ़रियाल हे पण नाव ऐकल्याचे आठवतेय.
पण पुढे मुख्य नायिकाच अशी नृत्ये सादर करु लागला. झीनत, परवीन बाबी, रिना रॉय या पहिल्यावहिल्या
नट्या. पुढे अगदी माधुरी, मनिषा, उर्मिला पर्यंत हेच चालले.
याचेच पुढचे रुप म्हणजे आयटम सॉंग म्हणायचे का ? पण असली गाणी सादर करणा-या राखी सावंत,
मल्लिका शेरावत, याना गुप्ता, बिपाशा आदी काही नृत्यनिपुण वाटत नाही, त्यामूळे बराचसा नाच कॅमेराच
करतो.
७) डिस्को
ट्रॅव्होल्टाच्या सॅटरडे नाईट फीव्हर नंतर आपल्याकडे डिस्को गाण्यांची लाट आली होती. उषा उत्थपने
आधी अशी काही गाणी आणली. मग आशाचे हथकडी मधले गाणे आले होते (डिस्को स्टेशन) ते रिना
रॉयने सादर केले होते. मग परवीन बाबीचे पण नो पार्किंग असे शब्द असलेले गाणे आले होते.
मिथुन चक्रवर्तीचा डिस्को डान्सर नावाचा सिनेमाच होता पण आता फारसा कुणाला आठवत नसेल
असा स्टार नावाचा एक चित्रपट आला होता. त्यात कुमार गौरव आणि रति अग्निहोत्री होते.
नाझिया हसनच्या आवाजात गाणी होती त्यात. त्या काळात बहुतेक सिनेमात डिस्को गाणी
असायची. पण ही ट्रेंड लवकरच मागे पडली.
८) लोकगीत.
भारतभरातील समृद्ध लोकसंगीताचा बाज अनेक हिंदी गाण्यात दिसला. अनिल विश्वास, सलील चौधरी
सचिनदेव बर्मन यांनी बंगाली लोकसंगीताचा छान वापर केला. गुजराथी ( मै तो भूल चली बाबूल का
देस) मुत्तूकोडी कव्वारी हडा (मल्याळम) चढ गयो पापी बिछुआ (आसामी) थाणे काजळीया बनालू
(राजस्थानी) आहे मैया सोने का बनायो (मध्यप्रदेश) कि मै झुठ बोलिया, कोय ना (पंजाबी)
घे घे घे रे, घे रे सायबा (गोवा) अशी अनेक उदाहरणे सांगता येतील.
लोकसंगीतातून आलेल्या रागांचा वापर पण काहि प्रतिभावान संगीतकारांनी करुन घेतला होता.
तू चंदा मै चांदनी ( रेश्मा और शेरा-लता-जयदेव-राग पिलू / देस / मांड ) बिरजमे होली खेलत नंदलाल
(गोदान-रफि-पं. रविशंकर-राग काफि)
मराठी लोकगीतांची मात्र मोजकीच उदाहरणे आठवताहेत.
दर्याकिनार एक बंगलो, मच गया शोर सारी नगरी रे, एक दो तीन वगैरे. मनोजकुमारच्या शिरडी के साईबाबा मधे,
शिव भोला भंडारी असे वाघ्या मुरळीचे गीत होते (पडद्यावर सचिन आणि उषा चव्हाण ) . अशांती मधे लवंगी मिरची
अशी एक लावणी होती (पडद्यावर शबाना, झीनत आणि परवीन) पण चाल काही लावणीची वाटत नव्हती.
चुनरी संभाल गोरी मधे लेझिम वाजलेय, वास्तव मधे मराठी आरती आहे तर सई परांजपेच्या साज मधे
एक नाट्यगीत सदृष्य गाणे आहे. पण फारसे काही नाहीच.
याशिवाय लोरी, युगुलगीते, लग्नगीते असेही काही साचे होतेच.
आता प्रतिसादातही अनेक साचे सापडतील मला.
कव्वाली- फरहा खानने मै हूं ना
कव्वाली- फरहा खानने मै हूं ना मधे कोरिओग्राफ केलेली 'तुमसे मिलके दिल का है जो हाल क्या करें.. ' कव्वाली आधुनिक आणि चांगली होती.
भजन- जोधा-अकबर मधलं बेला शेंडेनी गायलेलं 'मन मोहना' भजनही सुंदर आहे.
जिप्सी ~~ "पूनम की रात" मधील
जिप्सी ~~
"पूनम की रात" मधील [अर्थात या गटातील मनोज कुमार या ठरलेल्या नायकाचा] हे 'साथी रे, तुजबिन जिया उदास" हॉन्टिंग साँग. कुमुद छुगानी नायिका होती. सलिल चौधरींचेच संगीत होते. चित्रपट काही खास चालला नाही, मात्र तुम्ही उल्लेखिलेले गाणे बिनाका हिट होते.
>>>> पण असली गाणी सादर
>>>> पण असली गाणी सादर करणा-या राखी सावंत,
क्यामेराच नाचतो.....

मल्लिका शेरावत, याना गुप्ता, बिपाशा आदी काही नृत्यनिपुण वाटत नाही, त्यामूळे बराचसा नाच कॅमेराच करतो. <<<<
"अतृप्त आत्मा" मेरे मेहेबूब
"अतृप्त आत्मा"
मेरे मेहेबूब क़यामत होगी --- मी. एक्स इन बॉम्बे
गुमनाम है कोई ----- गुमनाम
झूम झूम ढलती रात -- कोहरा
तूफ़ान रातो में जब तू नहीं आता = सन्नाटा
धन्स, अशोकजी. सलिल चौधरींचेच
धन्स, अशोकजी.
सलिल चौधरींचेच संगीत होते>>>>यात एक म्युझिक पॅच आहे जो "बागमें एक कली खिली बगिया महकी पर हाय रे अभी तलक भंवरा नही आया" या गाण्याचा आहे ना?
विषयांतराबद्दल क्षमस्व
मराठी लोकगीतांची मात्र मोजकीच
मराठी लोकगीतांची मात्र मोजकीच उदाहरणे आठवताहेत.>>>>>>>>>>
झुमके ठुमके लटके झटके ---- पडद्यावर माधुरी -- अंजाम
तुम्हारे बिन जी ना लगे घरमे = भूमिका -- स्मिता पाटिल
मेरा रसीला बालम आया = भूमिका -- स्मिता पाटिल
हमको आज कल है इंतज़ार -- माधुरी
मराठी लोकगीतांची मात्र मोजकीच
मराठी लोकगीतांची मात्र मोजकीच उदाहरणे आठवताहेत.>>>>>>>>>>अजुन काही
अग बाई मयके तु जाऊ नकोस — शाका (??) - जितेंद्र, सिंपल कापडिया
सोड माझा हात मला पीने दे — फिफ्टी फिफ्टी - टिना मुनिम, राजेश खन्ना
अजुन एक situation पार्टी
अजुन एक situation
पार्टी मध्ये/ किंवा इतरत्र हिरविन चे कोणातरी वेगल्याशी लग्न ठराल्याने हीरो गाणे म्हणतो
--खुश रहे तू सदा = खिलौना
--तेरी दुनिया से होके मजबूर चला
--तेरी गलियों में ना रखेंगे कदम
--अजीब दास्तान है ये
--साथ ना कोई मंजिल
--मैं ना भूलूंगा
--दिल आज शायर है
--रंगीला रे तेरे रंग में
--कोई जब तुम्हारा ह्रदय
--तू प्यार है किसी और का
जिप्सी... "बाग में' ~ बिल्कुल
जिप्सी...
"बाग में' ~ बिल्कुल बिल्कुल. हे गाणे सलिलदांनी पुढे "चांद और सूरज" मध्ये तनुजाच्या तोंडी दिले होते. धर्मेन्द्रला उद्देश्यून ती म्हणते.
असा गाण्याचा इंटरपीस सलीलदानी 'मधुमती' मधील 'आजा रे परदेसी...' मध्येही वापरला आहे. 'घडी घडी मोरा दिल धडके' या गाण्याचा.
सुंदर लेख आणि चर्चा ! 'पियानो
सुंदर लेख आणि चर्चा !
'पियानो साँग्ज' च्या यादीत 'परिणीता' ला विसरू नका. "
दिल की जो बाते है, बाते जो दिलकी है.."
मोहन की मीरा- तुमच्या यादीत
मोहन की मीरा- तुमच्या यादीत अजून एक भर
दो रास्ते मधलं- खीजा के फूल मे आती कभी बहार नही.. मेरे नसीब मे ऐ दोस्त तेरा प्यार नही..
पियानो सॉन्ग्जवर ट्यू ने लिहिलेला एक स्वतंत्र लेखच आहे.
पुर्वीच्या सिनेमात बालकलाकार
पुर्वीच्या सिनेमात बालकलाकार पडद्यावर गात आहे अशीही खुप गाणि असत आता बर्याच दिवसात अशी गाणी दिसली नाहीत.
उदा: मेरा तुझसे है पेहले का नाता कोई
नानी तेरी मोरनी को
अलिकडच्या काळातली गाणि म्हणजे आदित्य नारायणने लहानपणी गायलेली गाणी आठवतात उदा. अकेले हम अकेले तुम. आता तोही नायकाच्या भुमिका करू लागलाय. म्हणजे बराच काळ लोटला म्हणायचा.
दिनेशदा, कुठे कुठे फिरवून
दिनेशदा, कुठे कुठे फिरवून आणलंत?
पण चांगल्या गझलांच्या यादीत पंकज उदास हे नाव खटकलं.
मामींनी दिलेली फोडणी आवडली. त्यातल्या चौथ्या साच्यातल एक मराठी गाणं आठवलं. चित्रपट : नाव मोठं लक्षण खोटं. पडद्यावर उषा चव्हाण आणि दुसरी कोणीतरी. दोघींना आवाज मात्र आशाचा....नको रे नंदलाला, धरु नको हरी रे पदराला.
जुन्या काळातले नायक नायिका कविता बिविता पण करायचे.कधी चक्क स्वतः कवी नाहीतर गायक असायचे. त्यामुळे त्यांच्या काव्यगायनाचे कार्यक्रम व्हायचे.
गझल : मीनाकुमारी-सुनील दत्त : किसे पेश करूं (या काफियाला धरून चक्क तीन वेगवेगळ्या गझला चित्रपटात आहेत).
बरसात की रात : जिंदगी भर नही भूलेगी....
मेरे मेहबूब,प्यासा, साजन, कभी कभी, अनुरोध, आलाप, सनी(चक्क सनी देओल), अभिमान .....
ऋषी कपूर गायक/कवी/डान्सर असं काय काय असायचा.
याला साचा म्हणावं का कळत नाही, पण कोणाला तरी शोधत म्हटलेली गाणी :
देव आनंदचं 'तू कहां ये बता इस नशीली रात में', आंखें मधलं 'तुझ को रख्खे राम तुझको अल्ला रख्खे', ड्रीमगर्लमधलं एक.
रस्त्यावर भिकारी, साधू,
रस्त्यावर भिकारी, साधू, डोंबारी इ नी म्ह्टलेली गाणी.. असा एक साचा होता... आता अशी गाणी दिसत नाहीत.... लेके पहला पहला प्यार, नाही खर्चली कवडी दमडी, दिवाने है दिवानों को ना घर चाहिये.. जंजीर की दीवार मध्ये एक गाणे आहे ना? काही काही वेळेला स्वतः हिरो हिरॉईनच त्या भूमिकेत असायचे.. काही वेळेला हिरो हिरॉईन नुसतेच शेजारी असत, म्हणणारे वेगळेच असत.
ओ पी नय्यर टांगा ठेका गाणी हाही एक पॅटर्न होता. आता नाही..
किती नवीन साचे सापडले ! ती
किती नवीन साचे सापडले !
ती भूताची गाणी हा भन्नाट प्रकार होता आणि त्याकाळच्या काळ्या पांढर्या जमान्यातच ती गाणी जास्त खुलायची.
आता सुधारणा झाली आहे ति तंत्रात. आणि कोरिओग्राफी मधे सुद्धा.
हम दिल दे चुके मधल्या तिन्ही गाण्यांची कोरिओग्राफी सुंदर होती.
सरोज खानने तर संजय द्त्त, सुनील शेट्टिला पण चांगले नाचवले.
दिल हि तो है मधली नूतनची कव्वाली, (निगाहे मिलाने को ) आठवतेय ना. त्याची कोरिओग्राफी सरोज खानची होती. त्या कव्वालीत ती सहनर्तिका पण होती.
आणि, टांग्याच्या ठेक्याची पण मस्त गाणी होती. मांगके साथ तूम्हारा, उसको नही देखा वगैरे तर टांग्यातच चित्रीत झाली होती. पण त्याच ठेक्यातले हौले हौले साजना, मात्र ट्रकमधे चित्रीत झाले होते. या साच्यातले शेवटचे गाणे ऐकले ते अंदाज अपना अपना मधे.
नव्या तंत्रापैकी, मै हू ना मधले पहिले गाणे जे आहे ते पूर्णपणे एका शॉटमधे चित्रीत झालेय ना ? मला नाही वाटत तो प्रयोग आधी कधी झाला होता.
नवे विषय आले तरी संगीत लागतेच ना ? विषयानुरुप / कालानुरुप संगीताचा विचार होताना दिसत नाही. लगान काय किंवा असोका काय, गाण्यातून तो काळ जाणवत नाही. (जसा मदर इंडिया, बैजू बावरा, तिसरी कसम. आम्रपाली मधे जाणवतो तसा.)
जामोप्या हा साचा सॉलिडच आहे.
जामोप्या हा साचा सॉलिडच आहे. एका चित्रपटात संजय खान त्याच्या मैत्रिणीबरोबर बागेत फिरत असतो. तिथे त्याला एक भिकारी दिसला. भिकार्याकडचा हार्मोनियम घेऊन संजय खानने गायला सुरुवात करतो. 'गरीबोंकी सुनो वो तुम्हारी सुनेगा.' मग काय पैशाचा पाऊसच पडतो!
जामोप्या, मला पण हाच
जामोप्या, मला पण हाच टांग्याचा साचा आठवत होता.
भिकार्यांच्या गाण्यात जून्या आँखे मधले, तूझको रख्खे राम तुझको अल्ला रख्खे, हे माझे आवडते. गायलय आशा / मन्ना डे.
पडद्यावर माला सिन्हा, धुमाळ वगैरे.
आधुनिक अरेबिक गाण्यात पण मस्त ठेका असतो टाळ्यांचा. तो बाज अजून आपल्याकडे दिसत नाही.
मधुचंद्राची गाणि :- कभी कभी
मधुचंद्राची गाणि :-
कभी कभी मेरे दिल मे ख्याल यह आता है (कभी कभी)
मैने पुछा चांद से (अब्दुल्लाह)
अजुन एक साचा राहिला स्वप्न
अजुन एक साचा राहिला
स्वप्न दृश्य
नायिका / नायक स्वप्न बघायचे. एकदम स्वप्नात सेट यायचे. आत्ताच्या ३ idiots मध्ये त्याचे छान विडंबन आहे. स्वप्न दृश्यंचे काही नमूने खुप गजले होते
घर आया मेरा परदेसी --- आवारा
हम आपकी आंखोमें इस दिल को बसा दे तो --प्यासा
ना जाने मेरे दिल को क्या --- ddlj
कभी मैं कहू , कभी तुम कहो ---लम्हे
पांच रुपैय्या बारा आना --- चलती का नाम गाडी
ओ मेरे सपनों के सौदागर -- दिल है के मानता नहीं.
चांदनी ओ मेरी चांदनी --- चांदनी
स्वप्नामधील गाणी.... पांढरे
स्वप्नामधील गाणी.... पांढरे पांढरे धुके ( की धूर) त्यात गाणी असायची..
पिकनीक साँग्स :- सोचा ना हाय
पिकनीक साँग्स :-
सोचा ना हाय रे देखा ना हाय रे (बॉम्बे टु गोवा)
बंबई से आया मेरा दोस्त (विनोद खन्ना चा कोणता तरी शिन्मा)
प्यासा मधलं हम आपकी आंखोंमें
प्यासा मधलं हम आपकी आंखोंमें स्वप्नगीत आहे का? मला ते कॉलेजातलं गाणं म्हणून आठवतंय.
<<रस्त्यावर भिकारी, साधू,
<<रस्त्यावर भिकारी, साधू, डोंबारी इ नी म्ह्टलेली गाणी.. असा एक साचा होता<<
अगदी अगदी!!
कधी कधी कुबड्या घेतलेले फकीर,भिकारी यांच्या गाण्यांच्या माध्यमातुन फ्लॅश बॅक होत असे किंवा कथानक पुढे सरकवण्यासाठीही त्याचा वापर होई.
विशिष्ट दिवशी म्हणायची गाणी
विशिष्ट दिवशी म्हणायची गाणी म्हणजे दिवाली, होली, राखी
मच गया शोर सारी नगरी रे
शोर मच गया शोर देखो आया माखन चोर
गोविंदा आला रे
होली के दिन दिल खिल
भय्या मेरे राखी के बंधन
बहेना ने भाई की कलाई पे
सब घर में दिवाली है मेरे घर में अँधेरा
रंगोली सजावो
फागुन आयो रे
दूसरा साचा
दारु / भांग पिवून गायलेली गाणी
नदिया से दरिया
ये लाल रंग
ये क्या हुवा
हंव गोयचो सायबा
जय जय शिव शंकर
खाइके पान बनारस वाला
नावेमधली गाणी.. अजी रुठकर
नावेमधली गाणी..
अजी रुठकर अब
तू गंगा की मौज मै
प्यार की कश्ती मे
अजुन एक साचा स्वगत गीते : जी
अजुन एक साचा
स्वगत गीते : जी बहुदा खुप फिलोसोफिकल असत उदा :
दिल ऐसा किसी ने मेरा तोड़ा - अमानुष
दिन ढल जाये -- गाइड
मैं जिंदगी का साथ निभाता - हम दोनों
हमने देखि है उन आंखोकी झलकती खुशबू - खामोशी
जिंदगी कैसी है पहेली - आनंद
कंही दूर जब दिन ढल जाये. -- आनंद
बनाके क्यों बिगाड़ा रे - जंजीर
अब तो है तुमसे हर ख़ुशी अपनी - अभिमान
नावेमधली गाणी..>>> ये चाँद सा
नावेमधली गाणी..>>>
ये चाँद सा रोशन चेहेरा
रुला के गया सपना मेरा
तू गंगा की मौज मैं
कुछ और ज़माना कहेता है
.
. फुस्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स !!
( नाग साप असलेली गाणी)
'आवारापन बंजारापन' हीपण गझलच
'आवारापन बंजारापन' हीपण गझलच आहे... तीन ते चार व्गवेगळ्या वेळी वेगवेगळ्या शेरांसह एम एम क्रीम ने गायली आहे. विशाल भार्द्वाज चांगले प्रयोग करतो. नमक इस्क का किंवा बिडी अगदी फिट्ट आणि चांगली गाणी आहेत. मला 'नमक' जास्त आवडते.
सुफी संगिताचा आणि पर्यायाने पंजाबी प्रभाव असलेली काही खूप चांगली गाणी सध्या ऐकायला मिळाली आहेत.
- ओ रे पिया : राहत्/सलिम-सुलेमान
- अब सारे बंधन तोडके: राहत
- रब्बा: राहत
सध्या आलेला अजून एक प्रकार म्हणजे स्पॅनिश सुरावटी आणि गिटारचा वापर असलेली
माझे आवडते : एक दिन तेरी राहों मे: जावेद अली/नकाब
अजून एक : प्यार की ये कहानी सुनो : हनिमून ट्रॅव्हल्स
नाते सम्बन्ध दाखवणारी गाणी
नाते सम्बन्ध दाखवणारी गाणी म्हणजे आई +मुलगा, भाऊ+बहिण, किंवा मुलांच्या वर्णनात्मक गाणी
मेरे चंदा मेरे भैया मेरे अनमोल रतन
बड़ा नट खट है रे
मुन्ना बड़ा प्यारा
दादी अम्मा दादी अम्मा
मम्मी ओ मम्मी तू कब सास बनेगी
बच्चा है महान
चंदा मामा से प्यारा मेरा मामा
ना रोना मुन्नी ना तू रो
Pages