पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२

Submitted by रूनी पॉटर on 10 March, 2011 - 17:20

या अगोदरचा पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१ धागा.
पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
या ठिकाणी, या ठिकाणी आणि या ठिकाणी अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
बर्‍याचदा पोळी-चपाती-फुलके-पराठे याबद्दल प्रश्न येतात, त्यासाठी आता इथे वेगळा धागा आहे.
तसेच वेगवेगळ्या पदार्थांच्या घटकांच्या नावाबद्दल वगैरे प्रश्न इथे विचारता येईल

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ज्वारी भिजवून घ्यावी लागेल का ह्यासाठी ?>>> नाही.

राजगीरा खूप उडतो भाजताना म्हणून जरा मोठा रूमाल घ्यावा भाजताना. एकावेळी साधारण एक मुठ राजगीरा घ्यावा. कढई चांगली तापलेली हवी.
साळीच्या लाह्यांसाठी मात्र फिजवून घ्यावी लागेल साळ.

सुमेधा ज्वारी भिजवायची नाही. पातेले चांगले तापलेले हवे. मूठभर ज्वारी घालून लगेच लाकडी कालथ्याने हलवत रहायचे. एकदा लाह्या फुटायला लागल्या की आच मंद करुन पातेल्यावर अर्धवट झाकण ठेवायचे आणि कालथा थोडा बाहेर काढुन हलवायचे.

धन्यवाद लालु! मला ही ग्रिल भेट म्हणुन मिळाली आहे आणि ग्रिल बाबत काही खास माहीती नाही ! आता काही रेसीपीज करुन पाहीन!!

राजगिर्‍याच्या लाह्या करताना माझी आई ताक करायच्या रवीच्या तोंडाला (लाकडाची रवी) फडकं बांधायची आणि लाह्या हलवायची. हात लांब रहातो आणि भाजत नाही लाह्या करताना.

साळीच्या लाह्यांसाठी मात्र फिजवून घ्यावी लागेल साळ.>>
साळ म्हणजे नक्की काय असत.
ह्या लाह्या पित्त प्रव्रुत्तीच्या लोकांनी खाव्यात मग आराम मिळतो अस वाचल आहे.

ह्या लाह्या पित्त प्रव्रुत्तीच्या लोकांनी खाव्यात मग आराम मिळतो अस वाचल आहे.>> शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी सुद्धा लाह्या भिजवलेले पाणी पितात असे डॉ अश्विनीने सांगितल्याचे आठवते.

साळ म्हणजे नक्की काय असत.>>>>> ही असते साळ अन त्याच्या आत तांदूळ.

saaL.jpg

अंडी कशी उकडावित.....? न फुटता.......... एकदम नीट व्यवस्थित उकडायला हवी तर काय करावे लागेल किती वेळ उकडावीत......??????????
जेव्हा जेव्हा उकडलीत...
१)आतले पिवळे उकडले गेले नाही....
२)कवच काढताना पांढरे सुद्धा निघत होते.. Sad
३)५ मिनीट गॅस वर ठेउन सुध्दा कच्चेच राहीले... Sad
कोणी सांगतात का खरी प्रक्रिया काय आहे ती....... ?

उदय, मी जमलं तर संध्याकाळी सविस्तर लिहिन अंड्याबद्दल.

सुखदा, साबुदाणा कोरडाच भाजून (थोडासाच ) त्याचे मिक्सरवर पिठ करता येते.
शिंगाड्याचे पिठ तयार मिळते. घरी करायचे असेल तर त्यावर आदणाचे पाणी ओतून ते उन्हात कडक वाळवायचे. मग खलबत्त्यात थोडे कुटायचे (किंवा आणखी उपायाने लहान तूकडे करायचे.) आणि मग मिक्सरवर पिठ करायचे.

udayone, मला वाटते तुम्ही अंडी उकडण्याचा वेळ वाढवावा.
कमी वेळ गॅस वर ठेवल्याने अस होत बर्याचदा.

उदय बरोबर ८ मी. अंडी उकडा व नंतर गॅस बंद करुन झाकण ठेवुन द्या ५ ते १० मी परफेक्ट उकडली जातात. मागे माबोवरच कोणीतरी दिल्याचे आठवतेय.

मी शास्त्रीय पद्धत लिहिन, संध्याकाळी ( गरब्याला जायच्या आधी वेळ मिळाला तर ) अंडे जास्त वेळ उकडल्यास आतल्या बलकाचे आवरण करडे होते आणि ते पचायला कठीण होते. अंडे उकडण्याचे तपमान पाणी उकळण्याच्या तपमानापेक्षा कमी असते.

अंडी उकडण्याआधी ती रुम टेंपरेचरला आलेली असावीत.
पाण्यात अंडी ठेवून पाणी उकळू नये. अंडे उकडायला १०० अंश सेंटीग्रेड एवढ्या तपमानाची आवश्यकता नसते. अंड्यातील पांढरा भाग ६० ते ६५ अंश सें. ला शिजतो तर पिवळा भाग ६५ ते ७० अंश सें. ला

म्हणून अंडी मावतील एवढे भांडे घेऊन त्यात अंडी बूडतील त्यापेक्षा थोडे जास्त पाणी उकळत ठेवावे. दुसर्‍या एका बोलमधे तेवढेच बर्फाचे पाणीही तयार ठेवावे.

पाण्याला उकळी आली की त्यात अंडी अलगद सोडावीत. घड्याळ लावून अडीच ते तीन मिनिटात अंडी बाहेर काढून लगेच बर्फाच्या पाण्यात सोडावीत.
मग ती जरा थंड झाली कि सोलावीत.
असे केल्याने, अंड्यातील दोन्ही भाग व्यवस्थित शिजतात पण वातड होत नाहीत. अंड्यातील लोह आणि गंधक यांचा संयोग होऊन आयर्न सल्फेट तयार होऊन बलकाला जो हिरवट करडा रंग येतो तो येत नाही. आतला बलक पिवळाजर्द राहतो. त्याचा पोतही मऊसर असतो आणि खाताना त्याचा तोठरा बसत नाही.
तसेच हायड्रोजन आणि सल्फर यांचा संयोग होऊन, हायड्रोजन सल्फाईड तयार होत नाही व त्यामूळे तो टिपीकल वासही येत नाही

इतक्या बारीक-सारीक टीपांबद्दल धन्यवाद दिनेशदा.
माझ्यासाठी सर्वात महत्वाचा भागः तो टिपीकल वासही येत नाही >>> माझा नवरा तुम्हाला दशलक्ष धन्यवाद देईल. त्याला अजिबातच सहन होत नाही तो वास.

मला हे कुठे विचारावं कळालं नाही म्ह्णुन ह्या बाफ वर विचारते आहे. Happy

मी आज ज्वारीचं पीठ आणलं इंग्रो मधुन पण ते पीठ कडु आहे, त्याची भाकरी कडु लागते.
म्ह्णजे ते पीठ खराब झालं आहे का? पाकिटावर कुठेच त्याची Expiry date लिहीली नाही आहे. आता काय करु त्याचं?

हो ते पिठ खराब झालेय.
त्यांच्याकडे तक्रार करायला हवी.
खरं तर प्रत्येक खाद्यपदार्थावर एक्स्पायरी डेट असायलाच हवी, असा बहुतेक देशांत नियम आहे.

दिनेश, सुप्रभात, गरबा कसा झाला? मुंबई पण अगदी गरबा मय आहे सध्या.
आई लाह्या करायच्या आधी सकाळी ज्वारी चाळ्णीत घेउन त्यावर गरम उकळते पाणी घालत असे पाणी निथळून जाई. व दुपारी लाह्या करत असे. ह्यास उंबले घालणे म्हणत. लाह्या मस्तच होत. लोखंडी घमेल्यात थोडी वाळू घालून वर ज्वारी घालून आपला पूजेची जागा साफ करायचा एक देवाचा कुंचा असतो बघा बारका त्याने ती करत असे. स्टोव्ह वर. मंद आचेवर. एकदम फ्रेश लाह्या. एकदा करून बघते व रिपोर्ट टाकते.

अश्विनी नक्की.
लाह्या (अर्थात बटर वगैरे न लावता ) हा एक पचण्यास सोपा आणि आरोग्यपूर्ण पदार्थ आहे.
अगदी पूर्वापार आपल्याकडे होत आलाय.

रेडिमेड मायक्रोवेव्ह पॉपकॉर्नचे पाकीट उघडल्यावर जो बटरी मस्त वास येतो तो डायसेटिल ह्या घातक केमिकल ने येतो. तसले पाकीट शक्यतो वापरू नये. डायसेटिल हे कार्सिनोजेनिक आहे. त्यापेक्षा घरच्या फोड्णीच्या लाह्या बेस्ट.

अमा, माहितीसाठी धन्यवाद. आमच्याकडे ते रेडीमेड मायक्रोवेव्ह पॉपकॉर्न खूप 'हिट्ट' आहेत. ते कूकरमध्ये बनवता येतात, त्यांच्यात पण असतं का हे डायसेटिल?

कागदी बॅगेत पॉप कॉर्न अस्ते व मावेत ठेवून ४ मिनिटात होते ते वाले. अ‍ॅक्ट टू वाली पाकिटे मिळतात ते नाही.

कणकेची प्लेन (म्हणजे चॉकलेट चिप्स, इतर पिठे न घालता) आणि बिनाअंड्याची बिस्किटे करण्याची रेसिपी माहित आहे का कुणाला?

माझ्याकडे २ ते अडिच किलो खजुर आहे. ( रमदान मधे नवरर्‍याला कुणिनी कुणि भेट देतच असते. जसे आपल्या कडे दिवाळिला सुकामेवा बगैरे देतात तसे.) त्याचे काय करावे? बराचसा खजुर मित्रमैत्रिणिना देवुन झालाय. तरीहि एवढा आहे. खजुरहि एकाच प्रकारचा नाहि. लहान- मोठा, बियाचा, बिन बियाचा, डार्क चॉकलेटि. please काय करु ते सान्गा? लाडु आणि रोल करुन झालेत.

Pages