आजचे रविवारचे वर्तमान पत्र गाजतय ते काल शनिवार दि. १७ सप्टेंबर रोजी अहमदाबाद येथे सुरु झालेले गुजराथचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींच्या तीन दिवसीय आत्मशुध्दी उपोषणाच्या बातमीने तसेच त्यांच्यावर पुण्यात टिका करणारे डॉ. विनायक सेन यांच्या बातमीने.
मोदींचे विकास घडवण्याचे कर्तुत्व हा राजकारणातला वस्तुपाठ झाला आहे. अनेक राज्यातले लोक, अनेक पक्षातले लोक अभ्यास दौरे आयोजीत करुन या विकास प्रक्रियेचे मर्म समजाऊन घेत आहेत.
काल सुरु झालेल्या उपोषणाच्या सुरवातीच्या कार्येक्रमाला भाजपाचे नेते उपस्थित होते याशिवाय पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल, तसेच शिवसेना, तामिळनाडुतील सत्ताधारी अण्णा द्रमुक पक्षाचे मंत्री उपस्थीत होते.
या राजकीय परिस्थीचे वास्तव लक्षात येऊन विरोधी पक्षांना ते झोंबले तर नवल नाही. एके काळी भाजपाचे खासदार व गुजराथचे पक्षाध्यक्ष असलेले शंकरसिंग वाघेलांनी पण साबरमतीला महात्मा गांधींच्या आश्रमाबाहेर प्रती-उपोषण प्रारंभ करुन या मोदींच्या उपोषणाची टिका करण्याच्या प्रयत्न केला तर तो समजण्यासारखा आहे.
दै. मटा ने बातमी देताना १९९० हे दशक हे गुजराथ मध्ये धार्मिक दंगलींचे होते याची आठवण दिली आहे. जन्माला आलेला मुलगा आधी कर्फ़्य़ु हा शब्द शिकायचा आणि मग बाराखडी इतके धार्मीक संबंध विकोपाला गेलेले होते. दै. मटा मधे आलेली वस्तुस्थिती मी मागल्या वर्षी अहमदाबाद मध्ये गेले ३० वर्षे स्थायीक असलेल्या प्राध्यापक आणि डॉक्टरेट पदवीधर असलेल्या माझ्या नातेवाईक जोडप्याकडुन समजाऊन घेतली होती. आजच्या दै. मटा मध्ये लिहल्याप्रमाणे तिथे पतंग, सायकलच्या धक्का लागला यासारखे कोणतेही कारण दंगलीला पुरेसे होते.
प्राध्यापक आणि डॉक्टरेट पदवीधर असलेल्या माझ्या नातेवाईक जोडप्याकडुन याही पेक्शा धक्कादायक व विश्वासनीय बातमी मिळाली ती अशी होती की गुजराथ मधील भाजप सरकारने यासाठी रिबेरो या निवृत्त पोलीस अधिकायाची नियुक्ती किमान तीन वर्ष गुजराथ दंगली पुर्वी केलेली होती. दुर्दैवाने तेही निष्प्रभ ठरले होते. या पार्श्वभुमीवर गुजराथमधल्या विचारी आणि कोणत्याही धार्मिक टोकाचा विचार न करणार्या लोकांनी दंगलीतली मोदींनी घेतलेली भुमीका उशिराने का होईना पटलेली असल्याचे दिसते.
मुसलमान समाजाच्या धार्मिक नेते मतांची जुळवाजुळव करण्यासाठी जी प्रक्षोभक भाषणे करतात याचा परिणाम पुढे धार्मिक तेढ निर्माण करण्याकडे होतो हा इतिहास आहे. आज जर भगवा दशहतवाद असा शब्द प्रचलीत होत असेल तर तो प्रतिक्रियात्मक Reactive आहे असे माझे मत आहे. यावर मायबोलीवर प्रतिक्रिया येणे अपेक्षीतच आहे.
भारताबरोबरच ब्रम्हदेशपण स्वतंत्र झाला आणि तिथेही बुध्दाच्या मुर्तीच्या वाजत गाजत मिरवणुका निघु लागल्या. तिथेही या मिरवणुकांवर मशिदीतुन दगड येऊ लागले. तिथल्या सरकारने याबाबत आवाहन करुनही हे जेव्हा थांबले नाही तेव्हा पोलीसांनी मशिदिच्या आत घुसुन अशा समाजकंटकांना चोप दिला. पुढे अनेक काळ येतील मुस्लिम नागरिकांचे मतदानाचे अधिकारही निलंबीत होते हा इतिहास आहे.
रिबेरोंसारखा मातब्बर पोलीस अधिकारी जेव्हा हतप्रभ होतो तेव्हा राज्यकर्त्यांनी काय हातावर हात देऊन बसायचे होते ? अश्या परिस्थीतीत मोदींनी जर पध्द्तशीर दंगलींची केंद्रे उध्वस्त करण्याचे ठरवुन दंगलीला दिशा ( समजा ) दिली असेल तर कितीही वेदनादायक झाली असली तरी ही राजकिय शस्त्रक्रिया मानायला हवी. मानव अधिकार वाल्यांच्या _ _चे काय जाते गळे काढायला? जबाबदारी शुन्य तथाकथित मानव अधिकार नेते कश्मिरात हिंदुची गळचेपी झालेली आहे त्याबाबत मुग गिळुन का बसले आहेत ?
आपल्या कर्तुत्वावर गुजराथ मधे मागल्या निवडणुकीत २/३ बहुमताने निवडुन आलेल्या आणि सातत्याने प्रगतीपथावर नेणाया नेत्यावर छिंद्रान्वेशी थाटाने पुन्हा पुन्हा हीच टिका करण्याने काय साधणार आहे ? टिका करण्याच्या पध्दतीत काही प्रमुख आक्षेप असे.
१) नरेंद्र मोदी आत्मस्तुती करतात.
२) दंगलीकडे दुर्लक्श केले.
३) त्याचे शासन सुध्दा भ्रष्टाचारी आहे
४) सध्याचे उपोषण " हाय प्रोफ़ईल " आहे.
यावर मला असे वाटते.
१) जे कोणी प्रभावी नेते जांच्या स्वत:चा प्रभाव जेथे जास्त असतो तिथे स्वत:ची भुमीका विषद करताना हा प्रभाव दिसणे अपेक्षीतच आहे. मी स्वत: अहमदाबाद मध्ये फ़िरलो. मला क्वचीत कुठेतरी मोदींचा बॅनर दिसला तोही कोणत्यातरी महत्वाच्या उदघाटन प्रसंगी लावलेला. अन्यथा वाढदिवस किंवा राजकीय स्वागत यासाठी नरेंद्र मोदींचा बॅनर दिसत नाही. सु.श्री. मायवतींच्या कर्तुत्व व पुतळा पार्क यांची तुलना करताना हा मुद्दा केवळ मोदींवर टिका करण्यासाठी पेड न्युज सारखा वाटतो.
२) दंगलीकडे मोदींनी दुर्लक्ष केले हा आरोप अद्याप कोणत्याही न्यायालयात सिध्द झालेला नाही आणि झालाच तर त्याची शिक्षा भोगायला मोदींनी तयार असावे. भारतात ही काय एकमेव दंगल झालेली नाही. कै. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर उद्भवलेल्या दंगलीचे सुत्रधार जेव्हा पुन्हा लोकसभेच्या तिकिटासाठी मागणी करतात तेव्हा तथाकथित धर्मनिरपेक्श कॊंग्रेसने त्यांना तिकीटे दिली होती व टिकेनंतर मागे घेतली यावर हे प्रकरण कोणी लाऊन धरल्याचे दिसत नाही असे का ?
३) भ्रष्टाचाराचे मुल्यमापन करण्याची पध्दत असल्यास जाणकारांनी मुल्यमापन करावे. माझ्या मते गुजराथ मधला शासकीय भ्रष्टाचार न्युनतम पातळीवरचा असावा. माझा अनुभव असा की गुजराथ वीज मंडळाचा एक अधिकारी मी ज्या कंपनीत आधी होतो तिथे बडॊद्याला आधी वीज जोडणीचे काम पुर्ण करुन नंतर फ़ाईलमधल्या अपुर्ण कागदपत्रांची पुर्तता करण्यास आला होता. बडोद्याच्या ऑफ़िसमधल्या माझ्या सहकार्याने वीज अधिकायाने एक पैसाही लाच मागितली नाही असे सांगीतले. अन्य राज्यात हे शक्य आहे का ?
४) महात्मा गांधी सोडल्यास त्यांचे शिष्य यांच्या कोटावर काश्मीरी गुलाब आणि कोटाची धुलाई पॅरीसमधे असा थाट आधीच्या पिढीने पाहीला आहे. जास्त कशाला परवाच मायवतींच्या बुटासाठी काय काय घडले हेही छापुन आले. वातानुकुल इमारतीत रहाणे जिथे सामान्य माणसाला आवडते तिथे अत्यंत व्यस्त आणि लोकांनी घेरलेल्या नेत्याने असे स्थळ उपोषणासाठी निवडणे काय गैर आहे ?
डॉ. विनायक सेन यांना पुण्यातच नेमका याच दिवशी दौरा काढायचे कसे सुचले याचा विचार नक्की करावा लागेल. डॉ. विनायक सेनांवर नक्शलवाद्यांशी असलेल्या संबंधाचा आरोप आहे. पुण्यातही नक्षलवादाची लागवड झालेली आहे अश्यावेळी पुण्याचा दौरा करुन पुण्यातल्या धरपकडीने निराश झालेल्या नक्षलवादी चळवळीचे मनोधैर्य वाढवायचे आणि भाजप सरकारने घडवलेल्या तुरुंगवासाचा बदला म्हणुन मोदींवर टिका करायची असा दुहेरी डाव डॊ. विनायक सेन यांनी साधला म्हणायला पुरेसा वाव आहे.
जेव्हा सारा भारत मोदींच्या आत्मशुध्दी उपोषणाकडे एका वेगळ्या प्रयोगाच्या दृष्टीने पहात असताना हिंसेची कास धरलेल्या नक्षलवादी विचारांच्या नेत्याने गुजराथ मध्ये गेल्या अनेक वर्षात एकही दंगल घडली नाही याकडे सपशेल दुर्लक्ष करावे आणि यामुळे "दंगलीचा इतिहास " बदलणार नाहीत अशी टिका डॉ.विनायक सेनांनी करावी हे जरा उलटा चोर कोतवाल को डाटे या न्यायाचे वाटले. हा जाहीर आरोप करायला पुण्याची भुमी का सोयीची वाटली असा विचार करताना पुल देशपांडे यांनी पुणेरी जाज्वल्य वृतीचा खास उल्लेख केल्याप्रमाणे पुण्याचे लोक ह्या असल्या फ़ालतु विचाराचे समर्थन करतील असा विश्वास त्यांना वाटला असावा.
महात्मा गांधींनीही फ़ाळणी घडणार नाही असे सांगीतल्यामुळे पाकिस्थानातला हिंदु फ़ाळणी पुर्वी गाफ़िल राहिला. महात्मा गांधींनी याची जबाबदारी स्विकारुन उपवास केल्याचे ऐकीवात नाही याउलट राजकीय हेतुंनी अडवलेली ५५ कोटींची रक्कम पाकिस्थानला देण्यासाठी उपवास केल्याचा इतिहास आहे. त्या महात्मा गांधींच्या वंशजानेही तारे तोडावेत ? यात महात्मा गांधींचा वंशही आता पेड टीकेच्या कार्येक्रमला विकला गेला की काय असा संशय येतो.
राजकीय नेत्याने बदल घडवणे अपेक्षित असते. त्याची जबाबदारी स्विकारणे हे ही अपेक्षीत असते. घडलेल्या चुकांची माफ़ी मागणे अपेक्षीत असते. आणी बाणी लादली म्हणुन एकदा कै. इंदीरा गांधींनी सत्तेवर आल्यावर दिलगीरी व्यक्त केली आणि त्यावरची टीका संपली. ३५०० शिखांच्या नरसंहाराचे कारण झालेल्या पक्षाच्या पंतप्रधानाने लोकसभेत माफ़ी मागीतली हे सुध्दा जनतेला मानवले पण नरेंद्र मोदींनी आत्मशुध्दी करणे हे तथाकथीत मानव अधिकार किंवा तत्सम पुळका आलेल्या पेड लोकांना मानवु नये याचा अर्थ ते सामाजीक कार्यकर्ते नसुन पेड न्युज पसवरणारे पोटार्थी आहेत हे विचार करणाया व्यक्तीला समजल्याशिवाय रहाणार नाही.
>>>> मायबोली वय केवळ ४९
>>>> मायबोली वय केवळ ४९ मिनीटे आणि चांगल टाईप करायला येतेय. गुड.. >>>

अनघा, पण ती लिन्क वरवर बघु नका हो! जरा थोड निरखुन बघितलत तर गुजराथ दन्गलीबाबत निधर्मीवाद्यान्नी अन हिन्दुत्वविरोधकान्नी पसरवलेल्या अफवान्चे निराकरण त्यात केलेले आढळेल!
लिन्क बद्दल धन्यवाद
<<पुरावे देऊन काय साध्य
<<पुरावे देऊन काय साध्य करायचय?>>
पुराव्याशिवाय दोषी आहेत हे कसे सिद्ध करू शकता? सिद्ध करायला पुरावा लागतोच.
<<पण म्हणुन त्यांनी घडवुन आणलेला नरसंहार योग्य असं म्हणणं योग्य आहे काय??>> अगदी बरोबर. ते दोषी असतील तर कारवाई झालीच पाहिजे>>
सहमत, पण त्यासाठी आधी पुरावे द्या, सिद्ध करा. 'टीका' हा पुरावा होऊ शकत नाही.
लिम्बूसाहेब, या साईट वरील
लिम्बूसाहेब,
या साईट वरील आरोप अन त्यांच्या निराकरणास पुरावे कोणते?
न्यायप्रविष्ट आहेत ती प्रकरणे. मोदींचे सुद्धा. यांत कुणाकुणाला आजपर्यंत शिक्षा झाल्या, कुणाला केस गुजरात बाहेर नेण्यास सुप्रीम कोर्टाने सांगितले, कुणाला गुजराथेत चालवा खटला म्हणून 'राहत' दिली? या "राहत" चा अर्थ काय? जणु कोर्टाने दोषमुक्त केले असे प्रोजेक्ट केले गेले. राहत म्हणजे गुजराथेत खटला चालवा असे सांगितले.
यामुळे नक्की काय "राहत" मिळाली? दुसर्या गावी केस साठी फेर्या मारणे वाचले, इतकाच अर्थ आहे, की दुसरा काही अर्थ 'मॅनॅज' होतो? बघा बरं विचार करून?
असल्या भरपूर साईट आहेत. दुसर्या अन तिसर्या बाजूच्या देखिल. सगळ्या लिंका इथे पोस्टू का? वर लिंक चे रामायण झालेले वाचले नाही वाट्टं तुम्ही?
>>> विनायक सेन यांना ज्या अणी
>>> विनायक सेन यांना ज्या अणी जितक्या पुराव्यावरून अटक झाली ते पहाता नक्षलवादावर पीएच डी करणारे किंवा रिपोर्टिंग करणारे सारेच देशद्रोहाच्या आरोपाखाली जन्मभर आत जातील.
विनायक सेनांचे नक्षलवाद्यांशी जवळचे संबंध होते. त्यांना बंदी असलेल्या नक्षलवादी संघटनेशी संबंध ठेवल्याच्या कारणावरून अटक करून तुरूंगात टाकले होते. २३ महिन्यानंतर त्यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन दिल्यामुळे ते बाहेर आले. त्याआधी त्यांचा जामीन उच्च न्यायालयाने अनेकवेळा नाकारला होता. तुरूंगात असताना तिथे काही इतर नक्षलवादीही तुरूंगात होते. सेन यांना भेटायला जी माणसे येत होती, त्यांच्याकरवी सेन हे तुरूंगातल्या नक्षलवाद्यांच्या व बाहेर असलेल्या नक्षलवाद्यांच्या चिठ्ठ्या व निरोप एकमेकांना पोचवत होते. आपल्याला भेटायला आलेल्या लोकांकरवी त्यांनी बंदी असलेल्या नक्षलवाद्यांचा संपर्क म्हणून गैरवापर केला होता.
जामीनावर सुटल्यावर काही दिवसातच उच्च न्यायालयाने त्यांच्याविरूध्दच्या खटल्यात त्यांना जन्मठेपेची शिक्षा दिलेली आहे. त्यावर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केलेले असून ते प्रलंबित आहे. सध्या ते जामिनावर मुक्त आहेत.
देशद्रोहाच्या आरोपावरून न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा दिलेल्या व्यक्तीला जाहीर समारंभात बोलवून त्याची व्याख्याने आयोजित करणे हे अयोग्य आहे.
>>> १२ ऑगस्ट २००५, तब्बल २० वर्षांनी, श्री. मनमोहन सिंग यांनी या घटनेला जबाबदार असणार्या काँग्रेसच्या वतीने देशाची आणि शिख समाजाची संसदेत माफी मागितली.
३००० हून अधिक लोकांची ठेचून हत्या केल्यावर लोकसभेत तोंडी माफी मागितल्यावर सगळे गुन्हे माफ झाले का? दंगलीला जबाबदार असलेल्या एच के एल भगत, सज्जनकुमार, धरमदास शास्त्री, ललित माखन, जगदिश टायटलर, कमलनाथ इ. नेत्यांवर काँग्रेसने कारवाई करणे तर सोडाच, १९८५ पासून त्यांना अनेक वर्षे मंत्री केलेले होते. ललित माखनची १९८६ मध्ये सूड म्हणून शीख अतिरेक्यांनी हत्या केली. भगत १९९६ पर्यंत मंत्री होता. नंतर २००४ मध्ये काँग्रेसचे सरकार येण्यापूर्वीच तो वारला. कमलनाथ अजूनही मंत्री आहे. त्याच्यावर जागतिक न्यायालयात खटला भरलेला आहे. टायटलर २००५ पर्यंत मंत्री होता. २००५ मध्ये नानावटी आयोगाने त्याच्यावर ठपका ठेवून सुध्दा लोकसभेत मनमोहन सिंगांनी शेवटपर्यंत त्याचा बचाव केला होता व त्याला मंत्रीपदावरून काढायला सक्त नकार दिला होता. शेवटी जनतेचे दडपण इतके वाढले की त्याला राजीनामा द्यायला लागला. कमलनाथ अजूनही मंत्री आहे. टायटलर व सज्जनकुमार यांना २००९ च्या निवडणूकीत तिकिटे दिली होती. परंतु चिदंबरमला बूट फेकून मारल्यावर सोनिया गांधींना उपरती होउन त्यांची तिकिटे कापली.
मनमोहन सिंगांनी मागितलेली माफी हा निव्वळ देखावा होता. त्यांच्या उक्ती व कृतीमध्ये महद्अंतर होते.
>>> मोदी किंवा गुजरात बद्दल चांगले बोलले की दंगलींना समर्थन असे होत नाही. दंगली या कोणत्याही भागात आणि कोणत्याही काळी समर्थनीय नाहीतच मुळी. जे झाले त्याबद्दल मोदींना शासन द्यायचे झाले तर बाकी राजकारण्यांना तर तीच शिक्षा लाखो करोडो वेळा द्यावी लागेल.
अनुमोदन. मोदी दोषी असतील तर त्यांना शिक्षा व्हायलाच पाहिजे. पण त्याआधी १९८४ मध्ये शिखांचे हत्याकांड केलेल्यांना शिक्षा व्हायला पाहिजे. त्यावेळचे आरोपी, टायटलर, सज्जनकुमार, कमलनाथ इ. अजूनही जिवंत आहेत व मजेत लाथा झाडत आहेत. त्यांना आधी शिक्षा द्या व नंतर मोदींना द्या. हर्ष मांदेर, टिस्ता सेटलवाड इ. निधर्मांध तद्दन खोटा प्रचार करत आहेत. बेस्ट बेकरी खटल्यात व इतर काही खटल्यात तिस्ताने साक्षीदारांना खोटी साक्ष देण्यासाठी प्रलोभने दाखविल्याने व धमकावल्याचे उघडकीला आल्याने न्यायालयाने तिला ताकीद दिलेली आहे. हर्ष मांदेरने केलेला एक भयंकर आरोप कसा खोटा होता हे वाचा. http://news.outlookindia.com/item.aspx?677068
>>> ३५०० शिखांच्या हत्याकांडासाठी "तुमचा राजधर्म कोठे होता" हा प्रश्न कोणी राजीव गांधींना का विचारला नाही ?
छे! कोण विचारणार? हे विचारणं तर सोडाच, उलट त्यांना मरणोत्तर "भारतरत्न" हा सन्मान दिला.
काही मुद्दे ... १) मोदींनी
काही मुद्दे ...
१) मोदींनी केलेला गुजरात चा विकास:- मोदींनी गुजरात चा विकास केला आहे यात वाद नाही..प्रचंड काम करण्याची वृत्ती आणि दुरदृष्टी पणा यात एकसुत्रीपणा त्यानी आणला आहे..जे गुजरात महाराष्ट्राकडुन कधी वीज विकत घेत होते ते आता आपली वीजेची गरज पुर्ण करुन दुसर्यांना वीज विकत आहे..यातच प्रगतीची झेप अधोरेखीत होत आहे.. साम काम दंड भेद सगळे मार्ग मोदींनी अनुसरलेत या साठी.. मुळातच गुजराती लोकांची मानसिकता ही मराठी लोकांपेक्षा वेगळी आहे..गुजराती लोक एकमेकांना आधी मदत करतात..मग ती कसली ही का असेनात..गुजरात मधे सुध्दा जेव्हा सुधारना करण्याचे काम मोदींनी आणले तेव्हा विरोधी पक्ष व इत्यादी वर्ग सर्वांनी पाठींबा दिला..व्यापारी वर्ग राजकारणी सर्वच थरातुन मदत मिळत गेली..विरोध अत्यल्प झाला..तो सुध्दा पध्दतशीर पणे मोडला गेला..गुजरात चा मोदींनी १२ वर्षात चीन केला..आत काय चालु आहे हे बाहेर च्या जगाला पटकन दिसेनासे झाले...जेव्हा पेटारा उघडला तेव्हा प्रगतीचे तेजाने डोळे झाळोकले गेले..नर्मदा नदीचे आंदोलन..हे याचेच प्रतिक आहे..सरदार सरोवरचे पातळी वाढवली... सगळ्याना लाभ झाला ज्यांना नाही झाला ते आंदोलनकारी झाले..त्यांची तोंडे पुसली गेली..पण प्रगती बाकीच्या लोकांना दिसली..फक्त.. मेधा पाटकर अजुन ही लढा देत आहेत..पण बाकीचा गुजरात त्यांच्या विरोधात आहे..का..? मानसिकता..
तेच महाराष्ट्रात नाही होत.. शिवसेना- भाजप- राष्ट्रवादी यांनी राजकारण अश्या नीच पातळीला नेले आहे..की प्रगतीचे प्र तरी कोणी काढले तर आधि विरोध होतो...उदा. एंरोन प्रकल्प..मुंडेनी मोठ्या आवेशात अरबी सागरात बुडवेन जाहीर केले..नंतर पडद्यामागे जाउन परत घेउन तेच आले.. तो पर्यंत मिळणार्या वीजेचे भाव वाढलेत..आणि तसेच ग्राहकांच्या माथी मारले.. त्या नंतर चे आताचे ताजे प्रकरण जैतापुरचे...मुळातच हा प्रकल्प हा महाराष्ट्राची गरज आहे..पण यात ही राजकारण केले गेले..काँग्रेस ने व्यवस्थीत लोकांना माहीती दिली नाही.. राष्ट्रवादी ने जी माहीती दिली ती अपुरी दिशाहीन होती..शिवसेने ने माहीती न घेताच विरोध सुरु केला...
काही महामुर्ख लोक नी तर हा प्रकल्प विदर्भात सुरु करा.. असे ही म्हणाले..(अणुप्रकल्पाला सागर किनारा का लागतो..याचा अभ्यास सुध्दा न करता बोंबा मारणे हे महाराष्ट्राचे राजकारण्यांचे लक्षण आहे)....या वरुन असे दिसुन येते की..महाराष्ट्रातील राजकारणी लोकच आधी दुर केले पाहीजेत..सगळे भिकारचोट लोक आहेत.. तरच काही महाराष्ट्राचे कल्याण होइल....
२) मोदींची दंगलीतील भुमीका: खरतर ही सुरुवात कारसेवक हे गोध्राला का आले इथुन करायला हवी...त्या वेळी नाही राममंदीरचा काही मुद्दा धगधगत होता नाही अजुन काही..केंद्रात भाजपाचेच शासन होते आणि भाजपाने हा मुद्दा निवडणुक जिंकल्याबरोबर मुद्दा न्यायालयात आहे असे सांगुन सोयिस्कर विसरली होती...मग हे कारसेवक का आणि कुणाच्या सांगण्यावरुन आले..? हे अजुन गुलदस्त्यातच आहे.. ठिक आहे आले ते...मग ते एका विशिष्ट डब्ब्यातच आहेत ही माहीती मुस्लिम समुदायला कशी मिळाली.. गोध्रा जाळताना तो विशिष्ट डब्बाच आधी जाळण्यात आला बहुतेक बाकीच्या डब्ब्यातील लोकांना आधी उतरवले गेलेले..(माझ्या माहीती प्रमाणे..चुकीची सुध्दा असु शकते) म्हणजे हे सगळे पुर्वनियोजीत होते का..यात हिंदु-मुस्लिम एकत्र होते का? हे मुद्दे उठले आहेत.. गोध्राची दंगल जेव्हा झाली तेव्हा..विशिष्ट समुदायला लक्ष्य करण्यात आलेले होते..रस्त्यावर खुलेआम तलवारी नाचवण्यात आल्या..फोटोग्राफर्सना पोझ देउन फोटो काढण्यात आले..कत्लेआम खुलेपणाने केले जात होते..ते ही दिवसा..सर्वांसमोर..हिंदु सुध्दा तसेच मारले जात होते..
एकदा दंगलीला सुरुवात झाली त्यानंतर तिला कोणताच रंग उरत नाही फक्त लाल रंग हाच काय तो एक असतो..भगवा हिरवा निळा हे सगळे रंग त्या लाल रंगात विरुन जातात.
मोदींनी दंगल मधे काय भुमीका घेतली यावर जर लक्ष दिले तर...असे दिसुन येते की हो त्यांनी असे आदेश दिलेले ज्याने हिंदुना मदत मिळेल..(ठेचुन काढा..अशी दहशद निर्मान करा की कायम परत कधी डोके वर काढणार नाहीत..ही भावना दंगलकर्त्यांना मिळाली..). कट्टरवादी च्या बाजुने बघितले गेले तर बरोबर होते..हे असे करायलाच हवे..आमचा देश आहे आमच्या देशात तुमची लायकी हीच आहे आणि राहायचे असल्यास राहवा नाही तर पाकीस्तानात चालते व्हा.. हे बहुसंख्य गुजराती लोकांची भावना झालेली त्यावेळी...प्रचंड विरोधाभास निर्माण झालेला गुजराती हिंदु आणि मुस्लिम लोकांमधे...
पण याचे समर्थन होइल का..? नाही होणार... आता तेच गुजराती लोक जो हुवा बहुत ज्यादा हुवा..असे म्हणायला लागलेत.. कोणी विचार केलाच नाही की दंगल नेमकी झालीच का..असे काय झाले ज्याने ते कारसेवक गोध्रा ला आलेत...जेव्हा काहीच मुद्दा नव्हता..हा मुद्दा आधी विचारात घ्या....पार्श्वभुमी समजुन न घेता दंगलीला समर्थन करणारे लोक आंधळे आहेत...ही जगातील पहीली दंगल आहे जी ला काहीच ठोस पार्श्वभुमी नाही..कारण नाही....
जसे ९३ ला होते बाबरी मशीदी चे...तसे काहीच नाही आहे...
ज्याला माहीती असेल त्याने स्पष्ट करावे........................
अक्षय जोग | 20 September,
अक्षय जोग | 20 September, 2011 - 13:38 नवीन
मायबोलीवर स्वागत. तसा मी पण नवखाच आहे इथे. पण थोडा आधी आलो म्हणून स्वागत. (माबो माझ्याच तीर्थरूपांची जहागिर असल्याच्या थाटात.. दिवे)
रच्याकने,
तुम्ही दिलेल्या लिंक मधे मा. मोदीजीं बद्दल माहिती कुठे दिसली नाही. किंवा ते कोण सेन डॉक्टर? त्यांच्या बद्दल ही नाही. असल्यास मला कृपया सांगण्याचे करावे.
मा. मास्तुरे साहेब आपण इतक्या
मा. मास्तुरे साहेब
आपण इतक्या छातीठोकपणे जणू बॉक्स मधे बघून मॅच पहातो आहोत असल्या थाटात जगातल्या कोणत्याही घटने बद्दल कसे काय लिहू शकता हो??
नक्कीच त्या उदय यांनी म्हटल्या प्रमाणे तुम्हाला कर्णपिशाच्च वश आहे असे दिसते
दुसरे,
अनुमोदन. मोदी दोषी असतील तर त्यांना शिक्षा व्हायलाच पाहिजे. हे आवडले.
माझे ही अनुमोदन.
>>> मग हे कारसेवक का आणि
>>> मग हे कारसेवक का आणि कुणाच्या सांगण्यावरुन आले..? हे अजुन गुलदस्त्यातच आहे..
हा डबा जाळला त्याच्या ३-४ दिवस आधी कारसेवा आयोजित केलेली होती. ती संपल्यावर देशाच्या वेगवेगळ्या भागातून आलेले कारसेवक रेल्वेने आपापल्या गावी निघाले होते. २६ फेब्रुवारीपासूनच अयोध्येपासून निघणार्या वेगवेगळ्या रेल्वेगाड्यांत कारसेवक होते. त्यातल्या काही गाड्या गोध्रामार्गे जात होत्या. ही विशिष्ट गाडी जाळण्याच्या आदल्या दिवशीपासून कारसेवक असलेल्या ४-५ गाड्या गोध्रामार्गे रवाना झालेल्या होत्या. ही विशिष्ट गाडी पहाटेच्या सुमाराला गोध्राला पोचते, हे हेरून डबा जाळण्याची योजना आखण्यात आली असावी. डबा जाळण्याच्या आदल्या दिवशी नजीकच्या पेट्रोलपंपावरून ६० लिटर पेट्रोल विकत घेऊन कॅनमध्ये भरून स्टेशनजवळच्या एका घरात ठेवलेले होते, हे सिध्द झालेले आहे. गाडी येण्याच्या वेळेस स्टेशनजवळील मशिदीतून पहाटेच्या नमाजाकरता जमा झालेल्यांना उद्देशून प्रक्षोभक भाषणे चालू होती. प्लॅटफॉर्मवर दगडांचा मोठा साठा करून ठेवण्यात आला होता. गाडी येऊन थांबताक्षणीच पेट्रोल ओतून डब्याला आग लावण्यात आली. आतले प्रवासी बाहेर पडू नयेत म्हणून दारे बाहेरून लावून घेण्यात आली व खिडक्यांवर व दारांवर प्रचंड दगडफेक करण्यात आली होती.
>>> म्हणजे हे सगळे पुर्वनियोजीत होते का..
होय
>>> एकदा दंगलीला सुरुवात झाली त्यानंतर तिला कोणताच रंग उरत नाही फक्त लाल रंग हाच काय तो एक असतो..भगवा हिरवा निळा हे सगळे रंग त्या लाल रंगात विरुन जातात.
पूर्ण सहमत.
>>> नव्हता..हा मुद्दा आधी विचारात घ्या....पार्श्वभुमी समजुन न घेता दंगलीला समर्थन करणारे लोक आंधळे आहेत...ही जगातील पहीली दंगल आहे जी ला काहीच ठोस पार्श्वभुमी नाही..कारण नाही....
या दंगलीपूर्वी भारतात जोरदार अतिरेकी कारवाया सुरू होत्या. संसदेवरील हल्ला देखील केवळ २ महिने आधीच झाला होता. सरकारच्या बोटचेप्या धोरणामुळे जनता चिडलेली होती. त्यात डबा जाळण्याचे निमित्त मिळाल्याने दंगल पेटली.
>>> मग हे कारसेवक का आणि
>>> मग हे कारसेवक का आणि कुणाच्या सांगण्यावरुन आले..? हे अजुन गुलदस्त्यातच आहे..
हा डबा जाळला त्याच्या ३-४ दिवस आधी कारसेवा आयोजित केलेली होती. ती संपल्यावर देशाच्या वेगवेगळ्या भागातून आलेले कारसेवक रेल्वेने आपापल्या गावी निघाले होते. २६ फेब्रुवारीपासूनच अयोध्येपासून निघणार्या वेगवेगळ्या रेल्वेगाड्यांत कारसेवक होते. त्यातल्या काही गाड्या गोध्रामार्गे जात होत्या. ही विशिष्ट गाडी जाळण्याच्या आदल्या दिवशीपासून कारसेवक असलेल्या ४-५ गाड्या गोध्रामार्गे रवाना झालेल्या होत्या. ही विशिष्ट गाडी पहाटेच्या सुमाराला गोध्राला पोचते, हे हेरून डबा जाळण्याची योजना आखण्यात आली असावी. डबा जाळण्याच्या आदल्या दिवशी नजीकच्या पेट्रोलपंपावरून ६० लिटर पेट्रोल विकत घेऊन कॅनमध्ये भरून स्टेशनजवळच्या एका घरात ठेवलेले होते, हे सिध्द झालेले आहे. गाडी येण्याच्या वेळेस स्टेशनजवळील मशिदीतून पहाटेच्या नमाजाकरता जमा झालेल्यांना उद्देशून प्रक्षोभक भाषणे चालू होती. प्लॅटफॉर्मवर दगडांचा मोठा साठा करून ठेवण्यात आला होता. गाडी येऊन थांबताक्षणीच पेट्रोल ओतून डब्याला आग लावण्यात आली. आतले प्रवासी बाहेर पडू नयेत म्हणून दारे बाहेरून लावून घेण्यात आली व खिडक्यांवर व दारांवर प्रचंड दगडफेक करण्यात आली होती.
>>> म्हणजे हे सगळे पुर्वनियोजीत होते का..
होय
>>> एकदा दंगलीला सुरुवात झाली त्यानंतर तिला कोणताच रंग उरत नाही फक्त लाल रंग हाच काय तो एक असतो..भगवा हिरवा निळा हे सगळे रंग त्या लाल रंगात विरुन जातात.
पूर्ण सहमत.
>>> नव्हता..हा मुद्दा आधी विचारात घ्या....पार्श्वभुमी समजुन न घेता दंगलीला समर्थन करणारे लोक आंधळे आहेत...ही जगातील पहीली दंगल आहे जी ला काहीच ठोस पार्श्वभुमी नाही..कारण नाही....
या दंगलीपूर्वी भारतात जोरदार अतिरेकी कारवाया सुरू होत्या. संसदेवरील हल्ला देखील केवळ २ महिने आधीच झाला होता. सरकारच्या बोटचेप्या धोरणामुळे जनता चिडलेली होती. त्यात डबा जाळण्याचे निमित्त मिळाल्याने दंगल पेटली.
.
.
>>>> ही जगातील पहीली दंगल आहे
>>>> ही जगातील पहीली दंगल आहे जी ला काहीच ठोस पार्श्वभुमी नाही..कारण नाही.... <<<
इतके विनोदी आगानापिछा असलेले हे वाक्य मात्र जगातले काय पहिलेच वाक्य नाही!
>>>> ही जगातील पहीली दंगल आहे
>>>> ही जगातील पहीली दंगल आहे जी ला काहीच ठोस पार्श्वभुमी नाही..कारण नाही.... <<<
इतके विनोदी आगानापिछा असलेले हे वाक्य मात्र जगातले काय पहिलेच वाक्य नाही!
>>>> ही जगातील पहीली दंगल आहे
>>>> ही जगातील पहीली दंगल आहे जी ला काहीच ठोस पार्श्वभुमी नाही..कारण नाही.... <<<
इतके विनोदी आगानापिछा असलेले हे वाक्य मात्र जगातले काय पहिलेच वाक्य नाही!
बघा, दन्गल दन्गल घोकु नका रे
बघा, दन्गल दन्गल घोकु नका रे भो, दृपलचा कर्फ्यु सुरू झालाय मगाधरनं!
(दृपलच्या नानाच्ची टान्ग)
इब्लिस धन्यवाद! ह्यात
इब्लिस
धन्यवाद!
ह्यात मोदींपेक्षा दंगलीविषयी जास्त माहिती आहे म्हणून त्याचे नाव 'गुजरात दंगल' असेच आहे....त्या दुव्यावर सेनविषयी माहिती नाही
मास्तुरेसाहेब, धन्यवाद, डॉ
मास्तुरेसाहेब,
धन्यवाद, डॉ विनायक सेनांची पाश्वर्भुमी मलाही नीट ठाऊक नव्हती. मला इतकच कळत होत की सज्जड पुरावे असल्याशिवाय कुणालाही इतके महिने अडकवणे अशक्य आहे. हैबीयस कॉपर्स की काय असा युक्तीवाद नक्षलावाद्यांना महितच नसेल हे शक्य नाही.
नक्षलवादात अनेक हुशार आणि बुध्दीमान भारतीय मंडळी भारताच्या विरोधात चीन ने हायर केलेली आहेत. जन्मठेपेची शिक्षा झालेला आणि जामिनावर आलेला लोकशाहीत दुसर्याच्या सिध्द न झालेल्या आरोपाची चर्चा करतो या सारखे दुसरे वैषम्य काय असावे ?
गोध्रा हत्याकांडाबाबत चर्चा करायची नाही कारण हिंदुंना राग आलाच नाही पहिजे ही मानसिकता हिंदुंनीच जोपासायची या पेक्षा वाईट काय असु शकते ?
अनेक आयोगांच्या अहवालात कॉग्रेस नेत्यांनी शिखांचे हत्याकांड घडवले हे सिध्द झाल्यानंतर मनमोहन सिंगांनी माफी मागीतली.
ना आयोगाच्या अहवालात सिध्द झाले ना कोर्टात सिध्द झाले पण मोदींनी माफी मागीतली पाहीजे हा मायबोलीवरचा काही मान्यवरांचा आग्रह मायबोलीवरच्या किती जणांना पटलाय ? गुन्हा सिध्द झाला तर मोदींना शिक्षा द्या हे मी म्हणलेले आहेच.
ज्या मशिदीच नाव जन्मभुमी मशिद होत हाच पुरावा न मानता कागदोपत्री ती मशिद होती असे गळे काढणारे मान्यवर आजही २/३ जागा हिंदुना द्यावी ह्या हायकोर्टांच्या निकालाकडे डोळे झाक करुन मायबोलीवर अडवाणींनी माफी मागीतली नाही म्हणुन लिहीत आहेत ? धन्य आहे.
ज्यांचा गुन्हा सिध्द होऊन ज्यांना फाशी झाली ती फाशी पुढे ढकलावी असली निर्ल्लज कारस्थाने या देशात जे पक्ष करतात आणि राज्य सरकारे साथ देतात याबाबत कोणीच का बोलत नाही ? कारण त्यातील एक गुरु अफजल आहे आणि त्याच्या विरुध्द बोलणे म्हणजे धर्म निरपेक्षते विरुध्द बोलणे असा रोग मायबोलीवरील काही मान्यवरांना जडला आहे.
तुम्हाला खालील दुव्यावर
तुम्हाला खालील दुव्यावर Banerjee and Nanavati Commission मधील भिन्नता कळून येईल. उत्तम लेख आहे.
Nanavati Commission: conjured controversy
Shreerang Godbole
01 Oct 2008
http://vijayvaani.com/FrmPublicDisplayArticle.aspx?id=151
नितिन, अनुमोदन, चान्गलि पोस्ट
नितिन, अनुमोदन, चान्गलि पोस्ट
मोदींवर दंगलीच्या संदर्भात
मोदींवर दंगलीच्या संदर्भात मीडिया, विरोधी पक्ष, एन्जीओज, इत्यादींनी केलेले दोषारोप धादांत खोटे आहेत असं छातीठोकपणे सांगणार्यांनी प्रस्तुत लेखामधील(च) "अश्या परिस्थीतीत मोदींनी जर पध्द्तशीर दंगलींची केंद्रे उध्वस्त करण्याचे ठरवुन दंगलीला दिशा ( समजा ) दिली असेल तर कितीही वेदनादायक झाली असली तरी ही राजकिय शस्त्रक्रिया मानायला हव" या वाक्याचा अर्थ स्पष्ट करावा अशी मी तिसर्यांदा विनंती करतो.
विकास झाला(?!) म्हणजे दंगलींच परिमार्जन झालं, सगळं काही आलबेल आहे या वाक्यातही दंगलीच्या काळातील मोदीभूमिकेचं समर्थनच आहे.
http://dahd.nic.in/ch2/an2.7.
http://dahd.nic.in/ch2/an2.7.htm
गुगलल्या नंतर आंतरजालावर सापडलेला हिंदु-मुस्लिम दंगलींचा आजपर्यंतचा लेखाजोखा..
अनघा, पण ती लिन्क वरवर बघु
अनघा, पण ती लिन्क वरवर बघु नका हो! >>> लिंबूदा, मी लिंक पाहिली नाही, पहाणार ही नाही कारण अशा लिंक्स गुगल केल्यावर कित्येक मिळतील.
"बेटी बचाओ" आंदोलन खूप यशस्वी ठरलेय पण
गावागावांतून प्रतिसाद चांगला आहे.
मोदींबद्दल चांगले बोलण्यासारखे खूप आहे. पण इथ नको. कारण मला कोण पैसे देतं असा प्रश्न निघेल.
मुंबईसारख ब....ल नाहीये अ'बाद. मुली सुरक्षित वाटतात इथं. पानटपरी वर मी तरी महाराष्ट्रात असताना कधी गेले नाही. इथ मुली बिनधास्त पानटपरीवर जाऊन भगत (डाळ) खरेदी करू शकतात. टपोरी, रिकामे लोकं नसतात पा.ट. वर. 
गुजरातची प्रगती मी माझ्या डोळ्यासमोर पहात आहे. सामान्य माणूस ही दंगल, त्यातले दोषी, त्यांना होणारी शिक्षा याच्यापासून फार दूर आहे हो.. अजूनही शिक्षणाचे प्रमाण गुजरातेत फार कमी आहे, आणि दर्जा पण लो..
जाऊदे.. कुठल्या कुठे वहावले. माफ करा हं काही टोचल असलं तर.
>>> मोदींवर दंगलीच्या
>>> मोदींवर दंगलीच्या संदर्भात मीडिया, विरोधी पक्ष, एन्जीओज, इत्यादींनी केलेले दोषारोप धादांत खोटे आहेत असं छातीठोकपणे सांगणार्यांनी प्रस्तुत लेखामधील(च) "अश्या परिस्थीतीत मोदींनी जर पध्द्तशीर दंगलींची केंद्रे उध्वस्त करण्याचे ठरवुन दंगलीला दिशा ( समजा ) दिली असेल तर कितीही वेदनादायक झाली असली तरी ही राजकिय शस्त्रक्रिया मानायला हव" या वाक्याचा अर्थ स्पष्ट करावा अशी मी तिसर्यांदा विनंती करतो. <<<<
समजा अर्थ नै स्पष्ट केला, तर हेच वाक्य तुम्ही कोर्टात मोदिन्विरुद्धचा पुरावा म्हणून सादर करणार की कैय? करु शकालही म्हणा!

>>>भरत मयेकर | 21 September,
>>>भरत मयेकर | 21 September, 2011 - 10:57 नवीन
मोदींवर दंगलीच्या संदर्भात मीडिया, विरोधी पक्ष, एन्जीओज, इत्यादींनी केलेले दोषारोप धादांत खोटे आहेत असं छातीठोकपणे सांगणार्यांनी प्रस्तुत लेखामधील(च) "अश्या परिस्थीतीत मोदींनी जर पध्द्तशीर दंगलींची केंद्रे उध्वस्त करण्याचे ठरवुन दंगलीला दिशा ( समजा ) दिली असेल तर कितीही वेदनादायक झाली असली तरी ही राजकिय शस्त्रक्रिया मानायला हव" या वाक्याचा अर्थ स्पष्ट करावा अशी मी तिसर्यांदा विनंती करतो.
विकास झाला(?!) म्हणजे दंगलींच परिमार्जन झालं, सगळं काही आलबेल आहे या वाक्यातही दंगलीच्या काळातील मोदीभूमिकेचं समर्थनच आहे.
<<<
पूर्ण अनुमोदन!
<<<मोदींवर दंगलीच्या संदर्भात
<<<मोदींवर दंगलीच्या संदर्भात मीडिया, विरोधी पक्ष, एन्जीओज, इत्यादींनी केलेले दोषारोप धादांत खोटे आहेत असं छातीठोकपणे सांगणार्यांनी प्रस्तुत लेखामधील(च) "अश्या परिस्थीतीत मोदींनी जर पध्द्तशीर दंगलींची केंद्रे उध्वस्त करण्याचे ठरवुन दंगलीला दिशा ( समजा ) दिली असेल तर कितीही वेदनादायक झाली असली तरी ही राजकिय शस्त्रक्रिया मानायला हव" या वाक्याचा अर्थ स्पष्ट करावा अशी मी तिसर्यांदा विनंती करतो.>>>
लेख नीट वाचला असेल तर स्पष्टिकरणाची आवश्यकता भासणार नाही.
<<<विकास झाला(?!) म्हणजे दंगलींच परिमार्जन झालं, सगळं काही आलबेल आहे या वाक्यातही दंगलीच्या काळातील मोदीभूमिकेचं समर्थनच आहे.>>>
नाही, अजिबात नाही....पण नंतर तिथे दंगल झाली का? उलट नंतर विकास झाला..मुस्लिम समाजसुद्धा त्यांचे कौतुक करतोय.
आधी दंगलीच्या काळातील मोदीभूमिका सांगा मग त्याचा प्रतिवाद करू.
<<आधी दंगलीच्या काळातील
<<आधी दंगलीच्या काळातील मोदीभूमिका सांगा मग त्याचा प्रतिवाद करू.>>
मी अवतरणात दिलेल्या याच लेखातल्या एका वाक्यात लेखकानेच मोदींची भूमिका सूचित केली आहे. ती योग्य आहे असं म्हणताच आहात, आणि त्याला नंतरच्या शांत परिस्थितीचा दाखला देताय. मोदींच्या उपोषणादरम्यान नरोडापाटिया मध्ये मोर्चे निघाले (आयोजित केले गेले म्हणा हवे तर).
२००२च्या दंगलींचा उद्देश 'धडा शिकविणे' हा होता म्हणे. लोक धडा शिकलेले दिसतायत.
श्रीलंकेच्या सैन्यानेही अलीकडेच प्रभाकरन आणि एल्टीटीईअचा पूर्ण खातमा केला. त्यादर्म्यान सामान्य तामिळ लोकांवर केलेल्या अत्याचारांच्या चित्रफिती आता दिसू लागल्यात. श्रीलंकेत सगळे काही आलबेल असल्याने जागतिक मानवाधिकारवाल्यांनी त्यावर प्रश्न विचारता कामा नयेत. नाही का?
दंगल आणि गुजरात चा विकास याची
दंगल आणि गुजरात चा विकास याची सरमिसळ करण्याचे कारण काय् मोदी ने विकास केला आहे म्हणुन दंगली कडे दुर्लक्ष करावे असे आहे काय ? की त्याने दंगलीला प्रोत्साहन दिले म्हणुन विकास कामांकडे दुर्लक्ष करावे...?
दोन वेगवेगळे मुद्दे आहेत म्हणुन मी माझ्य आधिच्या पोस्टामधे वेगवेगळे मुद्दे घेउनच लिहिले आहे....
सरमिसळ करणारे मुर्ख आहेत.... मुद्दामुन दंगलीचे समर्थन म्हणुन विकासाचा मुद्दा त्यात समाविष्ट करत आहेत...
एक काही तरी लिहा.........आणि तो कोण विनायक सेन आहे त्याचे इथे प्रयोजन आहे काय ते सुध्दा स्पष्ट करावे नक्षलवाद्यांना मदत करणारा बस हे एकच विशेषण आहे त्याला ..त्याचा मुद्दा या मोदी आणि त्यांचे उपोषण यावर का आणला गेला आहे ????????
मी स्वत: अहमदाबाद मध्ये
मी स्वत: अहमदाबाद मध्ये फ़िरलो. मला क्वचीत कुठेतरी मोदींचा बॅनर दिसला तोही कोणत्यातरी महत्वाच्या उदघाटन प्रसंगी लावलेला. अन्यथा वाढदिवस किंवा राजकीय स्वागत यासाठी नरेंद्र मोदींचा बॅनर दिसत नाही. >>>> अगदी बरोबर आहे. पहातेय गेली १० वर्षे.
उपोषणानिमित्त सरकारी खर्चाने
उपोषणानिमित्त सरकारी खर्चाने सगळ्या वृत्तपत्रांत जाहिराती आल्यात पण.
>>> आधी दंगलीच्या काळातील
>>> आधी दंगलीच्या काळातील मोदीभूमिका सांगा मग त्याचा प्रतिवाद करू
दंगलीच्या काळातल्या मोदींच्या भूमिकेबाबत बरेच उलटसुलट लिहिले गेलेले आहे. दंगलीत मारल्या गेलेल्या एकूण मृतांपैकी एक तृतीयांशाहून अधिक पोलिसांच्या गोळीबारात, म्हणजेच, पोलिसांच्या दंगल थोपविण्याच्या प्रयत्नात मारले गेले आहेत. दंगलीच्या काळात पोलिसांनी १६००० हून अधिक गोळीबाराच्या फैरी झाडल्याची अधिकृत नोंद आहे. याचा सरळ अर्थ असा की पोलिस हे नुसते बसून नव्हते तर ते नक्कीच दंगल थोपविण्याचा प्रयत्न करत होते. पोलिस (म्हणजेच पर्यायाने मोदी) दंगलखोरांना सामील होते हा आरोप चुकीचा वाटतो.
मग मोदींनी दंगलीला दिशा दिली
मग मोदींनी दंगलीला दिशा दिली म्हणजे काय केले? पोलिसांच्या गोळ्यांनाही विशिष्ट दिशा दिली का?(मोदींनी दंगलींना दिशा दिली हे वाक्य माझे नाही, हे कृपया लक्षात घ्यावे)
Pages