मोदींचे उपोषण - डॉ. विनायक सेन आणि पेड न्युज

Submitted by नितीनचंद्र on 18 September, 2011 - 01:29

आजचे रविवारचे वर्तमान पत्र गाजतय ते काल शनिवार दि. १७ सप्टेंबर रोजी अहमदाबाद येथे सुरु झालेले गुजराथचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींच्या तीन दिवसीय आत्मशुध्दी उपोषणाच्या बातमीने तसेच त्यांच्यावर पुण्यात टिका करणारे डॉ. विनायक सेन यांच्या बातमीने.

मोदींचे विकास घडवण्याचे कर्तुत्व हा राजकारणातला वस्तुपाठ झाला आहे. अनेक राज्यातले लोक, अनेक पक्षातले लोक अभ्यास दौरे आयोजीत करुन या विकास प्रक्रियेचे मर्म समजाऊन घेत आहेत.

काल सुरु झालेल्या उपोषणाच्या सुरवातीच्या कार्येक्रमाला भाजपाचे नेते उपस्थित होते याशिवाय पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल, तसेच शिवसेना, तामिळनाडुतील सत्ताधारी अण्णा द्रमुक पक्षाचे मंत्री उपस्थीत होते.

या राजकीय परिस्थीचे वास्तव लक्षात येऊन विरोधी पक्षांना ते झोंबले तर नवल नाही. एके काळी भाजपाचे खासदार व गुजराथचे पक्षाध्यक्ष असलेले शंकरसिंग वाघेलांनी पण साबरमतीला महात्मा गांधींच्या आश्रमाबाहेर प्रती-उपोषण प्रारंभ करुन या मोदींच्या उपोषणाची टिका करण्याच्या प्रयत्न केला तर तो समजण्यासारखा आहे.

दै. मटा ने बातमी देताना १९९० हे दशक हे गुजराथ मध्ये धार्मिक दंगलींचे होते याची आठवण दिली आहे. जन्माला आलेला मुलगा आधी कर्फ़्य़ु हा शब्द शिकायचा आणि मग बाराखडी इतके धार्मीक संबंध विकोपाला गेलेले होते. दै. मटा मधे आलेली वस्तुस्थिती मी मागल्या वर्षी अहमदाबाद मध्ये गेले ३० वर्षे स्थायीक असलेल्या प्राध्यापक आणि डॉक्टरेट पदवीधर असलेल्या माझ्या नातेवाईक जोडप्याकडुन समजाऊन घेतली होती. आजच्या दै. मटा मध्ये लिहल्याप्रमाणे तिथे पतंग, सायकलच्या धक्का लागला यासारखे कोणतेही कारण दंगलीला पुरेसे होते.

प्राध्यापक आणि डॉक्टरेट पदवीधर असलेल्या माझ्या नातेवाईक जोडप्याकडुन याही पेक्शा धक्कादायक व विश्वासनीय बातमी मिळाली ती अशी होती की गुजराथ मधील भाजप सरकारने यासाठी रिबेरो या निवृत्त पोलीस अधिकायाची नियुक्ती किमान तीन वर्ष गुजराथ दंगली पुर्वी केलेली होती. दुर्दैवाने तेही निष्प्रभ ठरले होते. या पार्श्वभुमीवर गुजराथमधल्या विचारी आणि कोणत्याही धार्मिक टोकाचा विचार न करणार्‍या लोकांनी दंगलीतली मोदींनी घेतलेली भुमीका उशिराने का होईना पटलेली असल्याचे दिसते.

मुसलमान समाजाच्या धार्मिक नेते मतांची जुळवाजुळव करण्यासाठी जी प्रक्षोभक भाषणे करतात याचा परिणाम पुढे धार्मिक तेढ निर्माण करण्याकडे होतो हा इतिहास आहे. आज जर भगवा दशहतवाद असा शब्द प्रचलीत होत असेल तर तो प्रतिक्रियात्मक Reactive आहे असे माझे मत आहे. यावर मायबोलीवर प्रतिक्रिया येणे अपेक्षीतच आहे.

भारताबरोबरच ब्रम्हदेशपण स्वतंत्र झाला आणि तिथेही बुध्दाच्या मुर्तीच्या वाजत गाजत मिरवणुका निघु लागल्या. तिथेही या मिरवणुकांवर मशिदीतुन दगड येऊ लागले. तिथल्या सरकारने याबाबत आवाहन करुनही हे जेव्हा थांबले नाही तेव्हा पोलीसांनी मशिदिच्या आत घुसुन अशा समाजकंटकांना चोप दिला. पुढे अनेक काळ येतील मुस्लिम नागरिकांचे मतदानाचे अधिकारही निलंबीत होते हा इतिहास आहे.

रिबेरोंसारखा मातब्बर पोलीस अधिकारी जेव्हा हतप्रभ होतो तेव्हा राज्यकर्त्यांनी काय हातावर हात देऊन बसायचे होते ? अश्या परिस्थीतीत मोदींनी जर पध्द्तशीर दंगलींची केंद्रे उध्वस्त करण्याचे ठरवुन दंगलीला दिशा ( समजा ) दिली असेल तर कितीही वेदनादायक झाली असली तरी ही राजकिय शस्त्रक्रिया मानायला हवी. मानव अधिकार वाल्यांच्या _ _चे काय जाते गळे काढायला? जबाबदारी शुन्य तथाकथित मानव अधिकार नेते कश्मिरात हिंदुची गळचेपी झालेली आहे त्याबाबत मुग गिळुन का बसले आहेत ?

आपल्या कर्तुत्वावर गुजराथ मधे मागल्या निवडणुकीत २/३ बहुमताने निवडुन आलेल्या आणि सातत्याने प्रगतीपथावर नेणाया नेत्यावर छिंद्रान्वेशी थाटाने पुन्हा पुन्हा हीच टिका करण्याने काय साधणार आहे ? टिका करण्याच्या पध्दतीत काही प्रमुख आक्षेप असे.

१) नरेंद्र मोदी आत्मस्तुती करतात.
२) दंगलीकडे दुर्लक्श केले.
३) त्याचे शासन सुध्दा भ्रष्टाचारी आहे
४) सध्याचे उपोषण " हाय प्रोफ़ईल " आहे.

यावर मला असे वाटते.

१) जे कोणी प्रभावी नेते जांच्या स्वत:चा प्रभाव जेथे जास्त असतो तिथे स्वत:ची भुमीका विषद करताना हा प्रभाव दिसणे अपेक्षीतच आहे. मी स्वत: अहमदाबाद मध्ये फ़िरलो. मला क्वचीत कुठेतरी मोदींचा बॅनर दिसला तोही कोणत्यातरी महत्वाच्या उदघाटन प्रसंगी लावलेला. अन्यथा वाढदिवस किंवा राजकीय स्वागत यासाठी नरेंद्र मोदींचा बॅनर दिसत नाही. सु.श्री. मायवतींच्या कर्तुत्व व पुतळा पार्क यांची तुलना करताना हा मुद्दा केवळ मोदींवर टिका करण्यासाठी पेड न्युज सारखा वाटतो.

२) दंगलीकडे मोदींनी दुर्लक्ष केले हा आरोप अद्याप कोणत्याही न्यायालयात सिध्द झालेला नाही आणि झालाच तर त्याची शिक्षा भोगायला मोदींनी तयार असावे. भारतात ही काय एकमेव दंगल झालेली नाही. कै. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर उद्भवलेल्या दंगलीचे सुत्रधार जेव्हा पुन्हा लोकसभेच्या तिकिटासाठी मागणी करतात तेव्हा तथाकथित धर्मनिरपेक्श कॊंग्रेसने त्यांना तिकीटे दिली होती व टिकेनंतर मागे घेतली यावर हे प्रकरण कोणी लाऊन धरल्याचे दिसत नाही असे का ?

३) भ्रष्टाचाराचे मुल्यमापन करण्याची पध्दत असल्यास जाणकारांनी मुल्यमापन करावे. माझ्या मते गुजराथ मधला शासकीय भ्रष्टाचार न्युनतम पातळीवरचा असावा. माझा अनुभव असा की गुजराथ वीज मंडळाचा एक अधिकारी मी ज्या कंपनीत आधी होतो तिथे बडॊद्याला आधी वीज जोडणीचे काम पुर्ण करुन नंतर फ़ाईलमधल्या अपुर्ण कागदपत्रांची पुर्तता करण्यास आला होता. बडोद्याच्या ऑफ़िसमधल्या माझ्या सहकार्‍याने वीज अधिकायाने एक पैसाही लाच मागितली नाही असे सांगीतले. अन्य राज्यात हे शक्य आहे का ?

४) महात्मा गांधी सोडल्यास त्यांचे शिष्य यांच्या कोटावर काश्मीरी गुलाब आणि कोटाची धुलाई पॅरीसमधे असा थाट आधीच्या पिढीने पाहीला आहे. जास्त कशाला परवाच मायवतींच्या बुटासाठी काय काय घडले हेही छापुन आले. वातानुकुल इमारतीत रहाणे जिथे सामान्य माणसाला आवडते तिथे अत्यंत व्यस्त आणि लोकांनी घेरलेल्या नेत्याने असे स्थळ उपोषणासाठी निवडणे काय गैर आहे ?

डॉ. विनायक सेन यांना पुण्यातच नेमका याच दिवशी दौरा काढायचे कसे सुचले याचा विचार नक्की करावा लागेल. डॉ. विनायक सेनांवर नक्शलवाद्यांशी असलेल्या संबंधाचा आरोप आहे. पुण्यातही नक्षलवादाची लागवड झालेली आहे अश्यावेळी पुण्याचा दौरा करुन पुण्यातल्या धरपकडीने निराश झालेल्या नक्षलवादी चळवळीचे मनोधैर्य वाढवायचे आणि भाजप सरकारने घडवलेल्या तुरुंगवासाचा बदला म्हणुन मोदींवर टिका करायची असा दुहेरी डाव डॊ. विनायक सेन यांनी साधला म्हणायला पुरेसा वाव आहे.

जेव्हा सारा भारत मोदींच्या आत्मशुध्दी उपोषणाकडे एका वेगळ्या प्रयोगाच्या दृष्टीने पहात असताना हिंसेची कास धरलेल्या नक्षलवादी विचारांच्या नेत्याने गुजराथ मध्ये गेल्या अनेक वर्षात एकही दंगल घडली नाही याकडे सपशेल दुर्लक्ष करावे आणि यामुळे "दंगलीचा इतिहास " बदलणार नाहीत अशी टिका डॉ.विनायक सेनांनी करावी हे जरा उलटा चोर कोतवाल को डाटे या न्यायाचे वाटले. हा जाहीर आरोप करायला पुण्याची भुमी का सोयीची वाटली असा विचार करताना पुल देशपांडे यांनी पुणेरी जाज्वल्य वृतीचा खास उल्लेख केल्याप्रमाणे पुण्याचे लोक ह्या असल्या फ़ालतु विचाराचे समर्थन करतील असा विश्वास त्यांना वाटला असावा.

महात्मा गांधींनीही फ़ाळणी घडणार नाही असे सांगीतल्यामुळे पाकिस्थानातला हिंदु फ़ाळणी पुर्वी गाफ़िल राहिला. महात्मा गांधींनी याची जबाबदारी स्विकारुन उपवास केल्याचे ऐकीवात नाही याउलट राजकीय हेतुंनी अडवलेली ५५ कोटींची रक्कम पाकिस्थानला देण्यासाठी उपवास केल्याचा इतिहास आहे. त्या महात्मा गांधींच्या वंशजानेही तारे तोडावेत ? यात महात्मा गांधींचा वंशही आता पेड टीकेच्या कार्येक्रमला विकला गेला की काय असा संशय येतो.

राजकीय नेत्याने बदल घडवणे अपेक्षित असते. त्याची जबाबदारी स्विकारणे हे ही अपेक्षीत असते. घडलेल्या चुकांची माफ़ी मागणे अपेक्षीत असते. आणी बाणी लादली म्हणुन एकदा कै. इंदीरा गांधींनी सत्तेवर आल्यावर दिलगीरी व्यक्त केली आणि त्यावरची टीका संपली. ३५०० शिखांच्या नरसंहाराचे कारण झालेल्या पक्षाच्या पंतप्रधानाने लोकसभेत माफ़ी मागीतली हे सुध्दा जनतेला मानवले पण नरेंद्र मोदींनी आत्मशुध्दी करणे हे तथाकथीत मानव अधिकार किंवा तत्सम पुळका आलेल्या पेड लोकांना मानवु नये याचा अर्थ ते सामाजीक कार्यकर्ते नसुन पेड न्युज पसवरणारे पोटार्थी आहेत हे विचार करणाया व्यक्तीला समजल्याशिवाय रहाणार नाही.

Group content visibility: 
Private - accessible only to group members

श्री नरेंद्र मोदी पंतप्रधान व राज ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हा एक ऊत्तम दिवस असेल. लवकरच तो दिवस येवो..
रच्याकने: अडवाणींना अखेरीस शहाणपण सुचले आहे त्यांनी पंतप्रधान शर्यतीतून माघार घेतली आहे. आता बिजेपी ने समजूतदार पणा व थोडा राजकीय दूरदृष्टी दाखवून आत्ताच मोदींना आपला पंतप्रधान ऊमेदवार घोषित केले तर काँ ची कोंडी होईल हे निश्चीत. राहुला बाबा चे नाव ते देणार नाहीत कारण त्यांनी ऊधळलेले गुण खेरीज "विंसी" प्रकरण पाठ सोडणार नाही, मनमोहन कुणालाच नको आहेत, चिदंबरम ची कारकीर्द संपल्यात जमा आहे, प्रणव दा २०१४ मध्ये अधिक वयस्कर होतील, बाकी इतर कॉ. कंपूत खुर्ची साठी मारामार्‍या कायमच चालू असल्याने कुणाचेही नाव घोषीत करता येणे अशक्यच वाटते.

तूर्तास एकच गोष्ट काँ च्या बाजूने आहे ती म्हणजे निवडणुका २०१२ मध्ये होत नाहीयेत.

तेव्हा मोदी का राज आनेवाला है Happy
विरोधकांनी आत्ताच गोडवे गायला सुरुवात केली तर अंगवळणी पडेल..

>>> मग मोदींनी दंगलीला दिशा दिली म्हणजे काय केले? पोलिसांच्या गोळ्यांनाही विशिष्ट दिशा दिली का?(मोदींनी दंगलींना दिशा दिली हे वाक्य माझे नाही, हे कृपया लक्षात घ्यावे)

पोलिस गोळीबारात अनेक हिंदूसुध्दा ठार झालेले आहेत.

>>>
ज्या मशिदीच नाव जन्मभुमी मशिद होत हाच पुरावा न मानता कागदोपत्री ती मशिद होती असे गळे काढणारे मान्यवर आजही २/३ जागा हिंदुना द्यावी ह्या हायकोर्टांच्या निकालाकडे डोळे झाक करुन मायबोलीवर अडवाणींनी माफी मागीतली नाही म्हणुन लिहीत आहेत ? धन्य आहे.
>>>
या वादात मशिद कुठून आली? किंवा अडवाणी?
टीवी वर दिसलेले 'एक धक्का और दो' म्हणणारे कोर्टात वेगळे का बोलले नंतर?

<<<मी अवतरणात दिलेल्या याच लेखातल्या एका वाक्यात लेखकानेच मोदींची भूमिका सूचित केली आहे. ती योग्य आहे असं म्हणताच आहात, आणि त्याला नंतरच्या शांत परिस्थितीचा दाखला देताय.>>>

जरा सविस्तर सांगाल का की मी कशाला योग्य म्हणालो ते??

<<मोदींच्या उपोषणादरम्यान नरोडापाटिया मध्ये मोर्चे निघाले (आयोजित केले गेले म्हणा हवे तर).
२००२च्या दंगलींचा उद्देश 'धडा शिकविणे' हा होता म्हणे. लोक धडा शिकलेले दिसतायत.

श्रीलंकेच्या सैन्यानेही अलीकडेच प्रभाकरन आणि एल्टीटीईअचा पूर्ण खातमा केला. त्यादर्म्यान सामान्य तामिळ लोकांवर केलेल्या अत्याचारांच्या चित्रफिती आता दिसू लागल्यात. श्रीलंकेत सगळे काही आलबेल असल्याने जागतिक मानवाधिकारवाल्यांनी त्यावर प्रश्न विचारता कामा नयेत. नाही का?>>>

तो प्रश्न धुमसत असतो तेव्हा सामान्य माणूस त्यात बळी जातोच व तुम्ही म्हणता तसे धडा शिकवताना सुद्धा सामान्य माणूस त्यात बळी जातोय. पण तो तसाच धुमसत ठेवला तर अशा दंगली सुरूच रहातात, गुजरातचा इतिहास पहा...९० सालापासून दंगली होतच आहेत पण २००३ नंतर दंगल झालीच नाही.
कुठला पर्याय योग्य हे तुम्हीच ठरवा.
(सामान्य माणूस बळी जातोय ह्याचे समर्थन करतोय असे समजू नका, त्याला माझा विरोध आहेच.)

महाराष्ट्रात भिवंडी हे शहरही असेच दंगलींसाठी बदनाम होते. तिथे असली कोणत्याही प्रकारची शस्त्रक्रिया न करता शांतता आणि सलोखा प्रस्थापित करण्यात आलेत. हा माझ्या मते योग्य पर्याय.

भरत मयेकर | 21 September, 2011 - 13:48 नवीन

महाराष्ट्रात भिवंडी हे शहरही असेच दंगलींसाठी बदनाम होते. तिथे असली कोणत्याही प्रकारची शस्त्रक्रिया न करता शांतता आणि सलोखा प्रस्थापित करण्यात आलेत. हा माझ्या मते योग्य पर्याय.

<<<
अनुमोदन!

<<दंगल आणि गुजरात चा विकास याची सरमिसळ करण्याचे कारण काय् मोदी ने विकास केला आहे म्हणुन दंगली कडे दुर्लक्ष करावे असे आहे काय ? की त्याने दंगलीला प्रोत्साहन दिले म्हणुन विकास कामांकडे दुर्लक्ष करावे...?>>>

मग आणीबाणी विसरून त्या व्यक्तिला भारतरत्न का दिले जाते? मोपल्याचे बंड नंतरची भयंकर प्रतिक्रिया विसरून राष्ट्र्पिता का ठरविले जाते?
ह्याचा विचार करा म्हणजे कोणाची सकारात्मक बाजू व कोणाची नकारात्मक बाजू रंगवून का सांगितली जाते ह्यामागील राजकारण कळेल.

<<<महाराष्ट्रात भिवंडी हे शहरही असेच दंगलींसाठी बदनाम होते. तिथे असली कोणत्याही प्रकारची शस्त्रक्रिया न करता शांतता आणि सलोखा प्रस्थापित करण्यात आलेत. हा माझ्या मते योग्य पर्याय.>>

काही वर्षापूर्वीचे तेथील पोलीसांचे हत्याकांड विसरलात??
शांतता दोन प्रकारची असते: एक भयाण & दुसरी निरव.
भिवंडीत निरव शांतता आहे???

>>> महाराष्ट्रात भिवंडी हे शहरही असेच दंगलींसाठी बदनाम होते. तिथे असली कोणत्याही प्रकारची शस्त्रक्रिया न करता शांतता आणि सलोखा प्रस्थापित करण्यात आलेत.

२-३ वर्षांपूर्वी भिवंडीमध्ये पोलिसचौकी उभारायला विरोध करणार्‍या मुस्लिमांनी आधी मोर्चा काढला व नंतर २ पोलिसांना जिवंत जाळून मारले. आजतगायत तिथल्या एकाही आरोपीला पकडण्यात आले नाही. हे सर्व लक्षात आहे का?

>>> मग आणीबाणी विसरून त्या व्यक्तिला भारतरत्न का दिले जाते?

शिखांचे हत्याकांड विसरून व त्या हत्याकांडातल्या प्रमुख आरोपींना मंत्रिपदाचे बक्षिस देणार्‍याला व इतर अनेक चुका करणार्‍यालाही नंतर भारतरत्न देण्यात आले.

मोदी मुख्यमंत्री असताना गुजरातमध्ये दंगली झाल्या हे कारण मोदींना आरोपी बनविण्यासाठी पुरेसे असेल तर, १९८४ मधल्या दंगलीसाठी राजीव गांधी, १९८९ मधल्या भागलपूर मधल्या दंगलीसाठी जगन्नाथ मिश्रा, १९८३ मधल्या आसाम मधल्या हत्याकांडासाठी तत्कालीन काँग्रेसचे मुख्यमंत्री (अन्वरा तैमूर किंवा हितेश्वर सैकिया) व १९९२-९३ मधल्या दंगलीसाठी सुधाकरराव नाईक हे देखील तितकेच दोषी आहेत.

पुणे आणि परिसरातील ऑटोउद्योगामधील सुमारे साडेपंधरा हजार कोटी रुपयांची प्रस्तावित गुंतवणूक आता 'मोदीलँड'मधील साणंदला गेली आहे. चाकण-तळेगाव येथील 'ऑटो हब'चे चाक राज्यातील लालफितीच्या कारभारामुळे पंक्चर झाले आहे. परिणामी, फोर्ड, प्युजो, ह्युंदाई यांसारख्या बड्या ऑटो कंपन्यांनी महाराष्ट्राकडे पाठ फिरवून गुजरातची वाट धरली आहे.

या कंपन्यांनी गुंतवणुकीसाठी प्रथम प्राधान्य चाकण- तळेगाव परिसराला दिले होते. मात्र, महाराष्ट्र सरकारच्या 'कार्यतत्परते'मुळे गुजरातने ही लाखमोलाची गुंतवणूक स्वत:कडे आकर्षित करण्यात बाजी मारली आहे. टाटा, महिंदा अँड महिंदा, मसिर्डिज बेंझ, जनरल मोटर्स, फोक्सवॅगन आदी कंपन्यांमुळे चाकण परिसराला अमेरिकेचे अॅटो हब असलेल्या डेट्रॉईटची उपमा देण्यात येत होती. अनेक बड्या कंपन्यांनीही येथे येण्याची इच्छा प्रारंभी व्यक्त केली होती. पुढे मात्र राज्यातील लालफितीच्या कारभाराला वैतागून त्यांनी पाठ फिरवली. परिणामी, चाकण नव्हे तर साणंद आता 'नवे डेट्रॉईट' म्हणून पुढे येऊ लागले आहे.

उद्योगविश्वाला आकर्षित करण्यासाठी मोदी यांनी सुरू केलेली फास्ट ट्रॅक प्रक्रिया प्रभावी ठरते आहे. अगदी राज ठाकरे यांच्यापासून एकनाथ खडसे आदी महाराष्ट्रातील नेत्यांनी गुजरातच्या विकासाच्या झपाट्याची प्रशंसा केली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील नाकतेर्पणा अधिकच ठळकपणे सिद्ध होत आहे.

गेले कोणे?

फोर्ड, प्युजो, ह्युंदाई, टोयोटा- किलोर्स्कर

किती नुकसान?

सुमारे १५,५०० कोटींची गुंतवणूक

रोजगार गमाविला किती?

१.२५ लाख (प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष)

का गमावले?

* लाल फितीचा कारभार

* व्यवसायाला पूरक वातावरणाचा अभाव

* महाराष्ट्राचे मार्केटिंग करण्याचे प्रयत्न कमी

* दिलेल्या सवलती हळूहळू काढून घेतल्या

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/10059795.cms

>>> भिवंडीत निरव शांतता आहे??? <<< अनुमोदन
भिवण्डी मालेगाव सारखी शहरेवस्त्या तर आन्दण म्हणून दिल्यात व्होटब्यान्केसाठी! म्हणे शान्तता. दोन पोलिस एकटे गाठून झुन्डीने ठार केले तरी महाराष्ट्रातले दोन्हीकॉन्गी सरकार आबापाटलासहित शेपुट घालुन बसले त्यामुळे नान्दलेली शान्तता महाराश्ट्रालाच लखलाभ होवो असे कुणी म्हणले तर चूके का? Wink (कायद्याच्या व वृत्तपत्रिय सम्पादकिय भाषेप्रमाणे हे वाक्य लिहीले आहे, म्हणजे वाक्य तर लिहिलय, पण ते मी म्हणत नसुन, असे जर कुणी म्हणले तर बरोबर की चूक अस फक्त विचारतोय Wink हो ना, उगाच याचे स्पष्टीकरण द्या, त्याचे द्या वगैरे भुन्गे नकोत हो! नितिनभौ, प्लिज नोटच धिल प्वॉईण्ट Proud )

...९० सालापासून दंगली होतच आहेत पण २००३ नंतर दंगल झालीच नाही.
कुठला पर्याय योग्य हे तुम्हीच ठरवा.
(सामान्य माणूस बळी जातोय ह्याचे समर्थन करतोय असे समजू नका, त्याला माझा विरोध आहेच.)

यातले लॉजिक कळले नाही. हेच लॉजिक वापरून एखाद ब्रिगेडी माणून गांधी हत्येनंतर महाराष्ट्रात झालेल्या दंगलीचे समर्थन करेल तर? कारण त्या दंगली नंतर एकाही ब्राम्हणाने हिंसक काम केले नाही. किंवा कट्टर मुस्लिम मुंबाईतल्या मोठ्या स्फोटांचे समर्थन करेल तर? कारण त्या स्फोटानंतर मुम्बईत मुस्लिम विरोधी दंगल झाली नाही.

१९८४, १९४८ आणी २००२ या तीनही दंगली एका दुर्दैवी घटनेचा राजकिय लाभ उठविण्यासाठी केल्या गेल्या होत्या. त्यात डावे/उजवे करण्यात अर्थ नाही. उगाचाच आमचा तो बाळ्या..

भरत मयेकर | 21 September, 2011 - 04:18
महाराष्ट्रात भिवंडी हे शहरही असेच दंगलींसाठी बदनाम होते. तिथे असली कोणत्याही प्रकारची शस्त्रक्रिया न करता शांतता आणि सलोखा प्रस्थापित करण्यात आलेत. हा माझ्या मते योग्य पर्याय.

भिवंडित जाऊन खात्री करा. मुंबईच्या दंगलीच्या वेळी भिवंडी पेटली होती आणि गेल्या तीन चार वर्षांपुर्वीही बंदोबस्तासाठी आलेला पोलीस मारला गेला आहे. दंगलीची कारणे सुध्दा वाचावीत.

भारतरत्न आणीबाणीच्या आधीच दिले गेले होते बांग्लादेशमुक्ती नंतर
------- श्री. राजिव गांधी यांना भारतरत्न कधी मिळाले? १९८४ मधे ३५०० हजार शिखांचे हत्यांकांड योजना बद्ध रितीने करण्यात आले होते. राजीव गांधी नंतरची ५ वर्षे सत्तेत होते. त्यांनी सुरवातीला हिंसेचे जाहीर समर्थन बोट क्लब वरुन केलेल्या भाषणात केले होते, हिंसा घडवणार्‍या काँग्रेसच्या नेत्यांना मंत्रीपदात अढळस्थाने दिलीत.

१९८४ मधेच भोपाळ मधे वायू दुर्घटना घडली.... २५००० जास्त लोकांचे प्राण गेलेत. प्रमुख आरोपीला भारतातुन सुखरुप पळुन जायला सरकारी मदत त्यांच्याच कारकिर्दीत झाली. आरोपीला देशामधे प्रवेश देतानाच अटक न करण्याचे अभयवचन त्यांनी दिले. हा आरोपी भोपळ - दिल्ली प्रवास मुख्य मंत्र्याच्या खास विमाना मधे बसुन करतो, दुसर्‍या दिवशी भारताच्या राष्ट्रपतींशी ३० मिनीट चहा-पान करतो.... पण नंतर तो आजतागत फरार असतो....

दोन्ही लाजिरवाण्या घटनेस जबाबदार असणार्‍या व्यक्तीस १९९१ मधे भारतरत्न मिळतेच कसे? आता ते केवळ दुर्दैवाने मारले गेलेत म्हणुन?

मी सर्व प्रकारच्या हिंसाचाराचा निषेध करतो. झालेला विकास आणि हिंसाचार या दोन्ही भिन्न गोष्टी आहेत आणि तशा त्या पारखता येतात.

महाराष्ट्रात भिवंडी हे शहरही असेच दंगलींसाठी बदनाम होते. तिथे असली कोणत्याही प्रकारची शस्त्रक्रिया न करता शांतता आणि सलोखा प्रस्थापित करण्यात आलेत. हा माझ्या मते योग्य पर्याय.
---- असे म्हणणे म्हणजे त्या मारले गेलेल्या पोलीसांवर अन्याय आहे. भरतजी तुम्ही मुंबईत रहात आहे, मी १२००० किमी दुर आहे... माझे सर्व ज्ञान केवळ वृत्तपत्राच्या आधाराने आहे. पण तुम्ही कृर धट्टा करत आहात. सर्व आलबेल आहे असे म्हणणे म्हणजे आपलीच फसवणुक करणे आहे.

होय प्रॉब्लेम आहे, गंभीर आहेत हे मान्य करा आणि मग ते कसे सोडवता येईल ह्यावर विचार करता येतो... माझ्या मते (अ) भरमसाठ लोकसंख्या, (ब) अशिक्षीत पणा, (क) भ्रष्टाचार चा कर्क हे सोडवता आले तर आपण आज आहोत त्या पेक्षा किती तरी पुढे जाऊ.

जातियता हा पण कर्का सारखाच आहे, आणि आपले नेते (राजकीय पक्ष) पद्धतशीर पणे तो पोसतात वा जोपासतात. आपल्याला चांगले नेते (प्रतिनिधी) मिळावे असे आधी आपल्याला वाटायला हवे. काँग्रेस - भाजपा हे दोन्ही एकच नाणे आहेत... पण त्यांच्या शिवाय आपल्याला आज पर्याय नाही आहे. सामान्य लोकांनी आपला वैचारिक स्तर (आणि अपेक्षा) उंचावल्या की नेत्यांना प्रतिनिधींना तसे आचरण करावेच लागेल. येथील चर्चे करुन जशी प्रजा तसा राजा असे म्हणायचे धाडस करतो...

http://www.indianexpress.com/news/bhiwandi-cop-killers-wont-be-spared/8011/

http://articles.timesofindia.indiatimes.com/2006-07-06/india/27792316_1_...

मी वर टाईम्स तसेच एक्प्रेस ची लिंक देत आहे... या घटना २००६ मधील आहेत. आजतागायत अपराध्यांना शासन झालेले नाही. शेकडो हजारो संतप्त जनता रस्त्यावर येते आणि निरपराध पोलिसांना अत्यंत घृणास्पद रितीने मारतात.... तुम्हाला कुठल्या परिणामात भिवंडीमधे शांतता आणि सलोखा दिसत आहे? आता मॉबने पोलिसांना का मारले.... ? या घटना काश्मीर मधील नाहीत... जे मारले गेले त्यांची काय चुक होती?

पोलिस हे त्यांच्या नियोजीत जागेवर पोलिस चौकीचे बांधकाम करणार होते... ते कुणाच्याही जागेवर बळजबरीने अतिक्रमण करणार नव्हते... पण काहींना तसे होणे नको होते. कारण?

<<यातले लॉजिक कळले नाही. हेच लॉजिक वापरून एखाद ब्रिगेडी माणून गांधी हत्येनंतर महाराष्ट्रात झालेल्या दंगलीचे समर्थन करेल तर? कारण त्या दंगली नंतर एकाही ब्राम्हणाने हिंसक काम केले नाही. किंवा कट्टर मुस्लिम मुंबाईतल्या मोठ्या स्फोटांचे समर्थन करेल तर? कारण त्या स्फोटानंतर मुम्बईत मुस्लिम विरोधी दंगल झाली नाही.
१९८४, १९४८ आणी २००२ या तीनही दंगली एका दुर्दैवी घटनेचा राजकिय लाभ उठविण्यासाठी केल्या गेल्या होत्या. त्यात डावे/उजवे करण्यात अर्थ नाही. उगाचाच आमचा तो बाळ्या..>>>

मी अशाप्रकारच्याच प्रतिक्रियेची वाट पहात होतो.
गांधीहत्येनंतर कशाचा प्रचार केला जातो?--नथुराम ब्राह्मण होता, हिंदुत्ववादी होता वगैरे वगैरे ह्याचा. पण कोणी त्यानंतरच्या ब्राह्मणविरोधी दंगलविषयी बोलतो का? त्यांना शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी करतो का? पण गुजरातबातीत कारसेवककत्तलीकडे दुर्लक्ष करून त्यानंतरच्या दंगलीवर भर दिला जातो.
तुम्हाला आता कळाले असेल माझे लॉजिक, माझे म्हणणे.
नसल्यास सांगा पुन्हा समजावून सांगीन.

>>> मी अशाप्रकारच्याच प्रतिक्रियेची वाट पहात होतो. Lol
[ब्रह्महत्या हे वाईट्/पाप असे शास्त्रात सान्गितले आहे, अन समजुत अशीही आहे की ज्यान्नी ज्यान्नी ४८ मधे गान्धीहत्येचे निमित्त करुन ठरवुन सामुहिकरित्या जाऊन पुढे पन्धरादिवसपर्यन्त ब्राह्मणहत्या केल्या,,ब्राह्मणान्ची सम्पत्ती/घरेदारे जाळली, सोनेनाणे, पैका अडका गुरेढोरे लुटली, त्यान्ना परस्पर दैवानेच शिक्षा दिली Proud त्याकरता सरकारवर अवलम्बुन रहाण्याचे ब्राह्मणान्ना काहीच कारण नव्हते Wink म्हणुन ४८ च्या दन्गलीकरता जबाबदार असलेल्यान्ना शिक्षा करा अशी मागणि ब्राह्मण करीत नाहीत्/केली नाहि! Lol खरेखोटे देव अन ते अपराधी जाणोत! ]

>>> शेकडो हजारो संतप्त जनता रस्त्यावर येते आणि निरपराध पोलिसांना अत्यंत घृणास्पद रितीने मारतात.... तुम्हाला कुठल्या परिणामात भिवंडीमधे शांतता आणि सलोखा दिसत आहे?

भिवंडीतल्या २ पोलिसांना जिवंत जाळून मारल्याबद्दल आजतगायत एकालाही अटक झालेली नाही. नेहमी "मी यँव करीन", "मी तँव करीन", "आसूडाने फोडून काढीन", "कोपरापासून ढोपरापर्यंत सोलून काढीन", "अतिरेक्यांची गय करणार नाही" अशी मुक्ताफळे झोडणार्‍या बोलबच्चन आबांना आजतगायत भिवंडीतला एकही गुन्हेगार सापडला नाही?

अरे लोक्स,
पुढे चला... Happy
थोडी आतषबाजी दिवळी साठी शिल्लक राहू दे ना का अत्ताच सगळे बार ऊडवायचेत ? ~द

Pages