मोदींचे उपोषण - डॉ. विनायक सेन आणि पेड न्युज

Submitted by नितीनचंद्र on 18 September, 2011 - 01:29

आजचे रविवारचे वर्तमान पत्र गाजतय ते काल शनिवार दि. १७ सप्टेंबर रोजी अहमदाबाद येथे सुरु झालेले गुजराथचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींच्या तीन दिवसीय आत्मशुध्दी उपोषणाच्या बातमीने तसेच त्यांच्यावर पुण्यात टिका करणारे डॉ. विनायक सेन यांच्या बातमीने.

मोदींचे विकास घडवण्याचे कर्तुत्व हा राजकारणातला वस्तुपाठ झाला आहे. अनेक राज्यातले लोक, अनेक पक्षातले लोक अभ्यास दौरे आयोजीत करुन या विकास प्रक्रियेचे मर्म समजाऊन घेत आहेत.

काल सुरु झालेल्या उपोषणाच्या सुरवातीच्या कार्येक्रमाला भाजपाचे नेते उपस्थित होते याशिवाय पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल, तसेच शिवसेना, तामिळनाडुतील सत्ताधारी अण्णा द्रमुक पक्षाचे मंत्री उपस्थीत होते.

या राजकीय परिस्थीचे वास्तव लक्षात येऊन विरोधी पक्षांना ते झोंबले तर नवल नाही. एके काळी भाजपाचे खासदार व गुजराथचे पक्षाध्यक्ष असलेले शंकरसिंग वाघेलांनी पण साबरमतीला महात्मा गांधींच्या आश्रमाबाहेर प्रती-उपोषण प्रारंभ करुन या मोदींच्या उपोषणाची टिका करण्याच्या प्रयत्न केला तर तो समजण्यासारखा आहे.

दै. मटा ने बातमी देताना १९९० हे दशक हे गुजराथ मध्ये धार्मिक दंगलींचे होते याची आठवण दिली आहे. जन्माला आलेला मुलगा आधी कर्फ़्य़ु हा शब्द शिकायचा आणि मग बाराखडी इतके धार्मीक संबंध विकोपाला गेलेले होते. दै. मटा मधे आलेली वस्तुस्थिती मी मागल्या वर्षी अहमदाबाद मध्ये गेले ३० वर्षे स्थायीक असलेल्या प्राध्यापक आणि डॉक्टरेट पदवीधर असलेल्या माझ्या नातेवाईक जोडप्याकडुन समजाऊन घेतली होती. आजच्या दै. मटा मध्ये लिहल्याप्रमाणे तिथे पतंग, सायकलच्या धक्का लागला यासारखे कोणतेही कारण दंगलीला पुरेसे होते.

प्राध्यापक आणि डॉक्टरेट पदवीधर असलेल्या माझ्या नातेवाईक जोडप्याकडुन याही पेक्शा धक्कादायक व विश्वासनीय बातमी मिळाली ती अशी होती की गुजराथ मधील भाजप सरकारने यासाठी रिबेरो या निवृत्त पोलीस अधिकायाची नियुक्ती किमान तीन वर्ष गुजराथ दंगली पुर्वी केलेली होती. दुर्दैवाने तेही निष्प्रभ ठरले होते. या पार्श्वभुमीवर गुजराथमधल्या विचारी आणि कोणत्याही धार्मिक टोकाचा विचार न करणार्‍या लोकांनी दंगलीतली मोदींनी घेतलेली भुमीका उशिराने का होईना पटलेली असल्याचे दिसते.

मुसलमान समाजाच्या धार्मिक नेते मतांची जुळवाजुळव करण्यासाठी जी प्रक्षोभक भाषणे करतात याचा परिणाम पुढे धार्मिक तेढ निर्माण करण्याकडे होतो हा इतिहास आहे. आज जर भगवा दशहतवाद असा शब्द प्रचलीत होत असेल तर तो प्रतिक्रियात्मक Reactive आहे असे माझे मत आहे. यावर मायबोलीवर प्रतिक्रिया येणे अपेक्षीतच आहे.

भारताबरोबरच ब्रम्हदेशपण स्वतंत्र झाला आणि तिथेही बुध्दाच्या मुर्तीच्या वाजत गाजत मिरवणुका निघु लागल्या. तिथेही या मिरवणुकांवर मशिदीतुन दगड येऊ लागले. तिथल्या सरकारने याबाबत आवाहन करुनही हे जेव्हा थांबले नाही तेव्हा पोलीसांनी मशिदिच्या आत घुसुन अशा समाजकंटकांना चोप दिला. पुढे अनेक काळ येतील मुस्लिम नागरिकांचे मतदानाचे अधिकारही निलंबीत होते हा इतिहास आहे.

रिबेरोंसारखा मातब्बर पोलीस अधिकारी जेव्हा हतप्रभ होतो तेव्हा राज्यकर्त्यांनी काय हातावर हात देऊन बसायचे होते ? अश्या परिस्थीतीत मोदींनी जर पध्द्तशीर दंगलींची केंद्रे उध्वस्त करण्याचे ठरवुन दंगलीला दिशा ( समजा ) दिली असेल तर कितीही वेदनादायक झाली असली तरी ही राजकिय शस्त्रक्रिया मानायला हवी. मानव अधिकार वाल्यांच्या _ _चे काय जाते गळे काढायला? जबाबदारी शुन्य तथाकथित मानव अधिकार नेते कश्मिरात हिंदुची गळचेपी झालेली आहे त्याबाबत मुग गिळुन का बसले आहेत ?

आपल्या कर्तुत्वावर गुजराथ मधे मागल्या निवडणुकीत २/३ बहुमताने निवडुन आलेल्या आणि सातत्याने प्रगतीपथावर नेणाया नेत्यावर छिंद्रान्वेशी थाटाने पुन्हा पुन्हा हीच टिका करण्याने काय साधणार आहे ? टिका करण्याच्या पध्दतीत काही प्रमुख आक्षेप असे.

१) नरेंद्र मोदी आत्मस्तुती करतात.
२) दंगलीकडे दुर्लक्श केले.
३) त्याचे शासन सुध्दा भ्रष्टाचारी आहे
४) सध्याचे उपोषण " हाय प्रोफ़ईल " आहे.

यावर मला असे वाटते.

१) जे कोणी प्रभावी नेते जांच्या स्वत:चा प्रभाव जेथे जास्त असतो तिथे स्वत:ची भुमीका विषद करताना हा प्रभाव दिसणे अपेक्षीतच आहे. मी स्वत: अहमदाबाद मध्ये फ़िरलो. मला क्वचीत कुठेतरी मोदींचा बॅनर दिसला तोही कोणत्यातरी महत्वाच्या उदघाटन प्रसंगी लावलेला. अन्यथा वाढदिवस किंवा राजकीय स्वागत यासाठी नरेंद्र मोदींचा बॅनर दिसत नाही. सु.श्री. मायवतींच्या कर्तुत्व व पुतळा पार्क यांची तुलना करताना हा मुद्दा केवळ मोदींवर टिका करण्यासाठी पेड न्युज सारखा वाटतो.

२) दंगलीकडे मोदींनी दुर्लक्ष केले हा आरोप अद्याप कोणत्याही न्यायालयात सिध्द झालेला नाही आणि झालाच तर त्याची शिक्षा भोगायला मोदींनी तयार असावे. भारतात ही काय एकमेव दंगल झालेली नाही. कै. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर उद्भवलेल्या दंगलीचे सुत्रधार जेव्हा पुन्हा लोकसभेच्या तिकिटासाठी मागणी करतात तेव्हा तथाकथित धर्मनिरपेक्श कॊंग्रेसने त्यांना तिकीटे दिली होती व टिकेनंतर मागे घेतली यावर हे प्रकरण कोणी लाऊन धरल्याचे दिसत नाही असे का ?

३) भ्रष्टाचाराचे मुल्यमापन करण्याची पध्दत असल्यास जाणकारांनी मुल्यमापन करावे. माझ्या मते गुजराथ मधला शासकीय भ्रष्टाचार न्युनतम पातळीवरचा असावा. माझा अनुभव असा की गुजराथ वीज मंडळाचा एक अधिकारी मी ज्या कंपनीत आधी होतो तिथे बडॊद्याला आधी वीज जोडणीचे काम पुर्ण करुन नंतर फ़ाईलमधल्या अपुर्ण कागदपत्रांची पुर्तता करण्यास आला होता. बडोद्याच्या ऑफ़िसमधल्या माझ्या सहकार्‍याने वीज अधिकायाने एक पैसाही लाच मागितली नाही असे सांगीतले. अन्य राज्यात हे शक्य आहे का ?

४) महात्मा गांधी सोडल्यास त्यांचे शिष्य यांच्या कोटावर काश्मीरी गुलाब आणि कोटाची धुलाई पॅरीसमधे असा थाट आधीच्या पिढीने पाहीला आहे. जास्त कशाला परवाच मायवतींच्या बुटासाठी काय काय घडले हेही छापुन आले. वातानुकुल इमारतीत रहाणे जिथे सामान्य माणसाला आवडते तिथे अत्यंत व्यस्त आणि लोकांनी घेरलेल्या नेत्याने असे स्थळ उपोषणासाठी निवडणे काय गैर आहे ?

डॉ. विनायक सेन यांना पुण्यातच नेमका याच दिवशी दौरा काढायचे कसे सुचले याचा विचार नक्की करावा लागेल. डॉ. विनायक सेनांवर नक्शलवाद्यांशी असलेल्या संबंधाचा आरोप आहे. पुण्यातही नक्षलवादाची लागवड झालेली आहे अश्यावेळी पुण्याचा दौरा करुन पुण्यातल्या धरपकडीने निराश झालेल्या नक्षलवादी चळवळीचे मनोधैर्य वाढवायचे आणि भाजप सरकारने घडवलेल्या तुरुंगवासाचा बदला म्हणुन मोदींवर टिका करायची असा दुहेरी डाव डॊ. विनायक सेन यांनी साधला म्हणायला पुरेसा वाव आहे.

जेव्हा सारा भारत मोदींच्या आत्मशुध्दी उपोषणाकडे एका वेगळ्या प्रयोगाच्या दृष्टीने पहात असताना हिंसेची कास धरलेल्या नक्षलवादी विचारांच्या नेत्याने गुजराथ मध्ये गेल्या अनेक वर्षात एकही दंगल घडली नाही याकडे सपशेल दुर्लक्ष करावे आणि यामुळे "दंगलीचा इतिहास " बदलणार नाहीत अशी टिका डॉ.विनायक सेनांनी करावी हे जरा उलटा चोर कोतवाल को डाटे या न्यायाचे वाटले. हा जाहीर आरोप करायला पुण्याची भुमी का सोयीची वाटली असा विचार करताना पुल देशपांडे यांनी पुणेरी जाज्वल्य वृतीचा खास उल्लेख केल्याप्रमाणे पुण्याचे लोक ह्या असल्या फ़ालतु विचाराचे समर्थन करतील असा विश्वास त्यांना वाटला असावा.

महात्मा गांधींनीही फ़ाळणी घडणार नाही असे सांगीतल्यामुळे पाकिस्थानातला हिंदु फ़ाळणी पुर्वी गाफ़िल राहिला. महात्मा गांधींनी याची जबाबदारी स्विकारुन उपवास केल्याचे ऐकीवात नाही याउलट राजकीय हेतुंनी अडवलेली ५५ कोटींची रक्कम पाकिस्थानला देण्यासाठी उपवास केल्याचा इतिहास आहे. त्या महात्मा गांधींच्या वंशजानेही तारे तोडावेत ? यात महात्मा गांधींचा वंशही आता पेड टीकेच्या कार्येक्रमला विकला गेला की काय असा संशय येतो.

राजकीय नेत्याने बदल घडवणे अपेक्षित असते. त्याची जबाबदारी स्विकारणे हे ही अपेक्षीत असते. घडलेल्या चुकांची माफ़ी मागणे अपेक्षीत असते. आणी बाणी लादली म्हणुन एकदा कै. इंदीरा गांधींनी सत्तेवर आल्यावर दिलगीरी व्यक्त केली आणि त्यावरची टीका संपली. ३५०० शिखांच्या नरसंहाराचे कारण झालेल्या पक्षाच्या पंतप्रधानाने लोकसभेत माफ़ी मागीतली हे सुध्दा जनतेला मानवले पण नरेंद्र मोदींनी आत्मशुध्दी करणे हे तथाकथीत मानव अधिकार किंवा तत्सम पुळका आलेल्या पेड लोकांना मानवु नये याचा अर्थ ते सामाजीक कार्यकर्ते नसुन पेड न्युज पसवरणारे पोटार्थी आहेत हे विचार करणाया व्यक्तीला समजल्याशिवाय रहाणार नाही.

Group content visibility: 
Private - accessible only to group members

तुमचे म्हणणे जर असे असेल की गुजरातने प्रगती महाराष्ट्राच्या पोटावर पाय देऊन केली आहे आणि ते कितीही खरे जरी असले तरी त्यात चूक गुजरातची नसुन आपल्याकडच्या अवसानघातकी नेतृत्वाची आहे. ते जर अतिशय खंबीर आणि कार्यक्षम असते तर मग काय प्रश्न होता ?

बाकी काही माहित नाही, पण त्यांनी गुजरातमधल्या सामान्य माणसाचं आयुष्य सोपं/सुखकर केलं आहे - हे माझ्यासारख्या सामान्य नागरिकासाठी महत्त्वाचं असतं. विरोध करणारे शहरातच राहिले असतील..
परिक्षेच्या काळात, उन्हाळ्यात १४ १४ तासाचे लाईट गेलेले त्यांनी अनुभवले नसतील. पाण्यासाठी जीवाचा आटापिटा करावा लागला नसेल.. आणि हे जसं माझ्या लहानपणी माझ्या गावात होतं - तसंच आजही आहे. किंबहुना, जास्तच वाईट आहे.
ह्या बेसिक गोष्टीही महाराष्ट्रात इतक्या वर्षात आल्या नाहियेत आणि मोदींनी करून दाखवल्यात हे तरी मला एक सर्वसाधारण नागरिक म्हणून कळतं.

माणिक मुंढे नावाच्या व्यक्तीने लिहिलेला लेख आहे. इकडे फाईल कशी अपलोड करता येईल ? >>> महेश कुल डाऊन, इथे अपलोड केली तर वाचणारे नाहीत.

झाल्या दंगली, मारले गेले लोक, अगदी घान, काळीमा फासणारे होते ते पर्व, पण पुढे? पुढे गुजरातमधील मुस्लीम समाज किती पुढे जात आहे त्याचे काय? हे ते येथील विचारवंत मुद्दाम वाचत नाहीत? की कळत नाही? अजून येथील लोक त्या दंगलीवरच अडकले आहेत, आणि त्याच वेळात गुजराथ पुढे जात आहे. चष्मा लावून दोन्ही बाजू बघीतल्या तर त्या हिणकस गोध्रा आणि नंतरंच्या हिणकस दंगलींनंतर गुजराथ किती तरी पुढे गेला आहे. पण हे येथील विचारवंतांनी मान्य केले तर मग स्वतःचा अहं दुखावला जातो ना.

आज देशाला प्रगती हवी, कोणी काय केले हे नको. आज मोदी नक्कीच प्रगती देऊ शकतात, राहूल गांधींनी १० वर्षे आणखी एका स्टेट मध्ये असे करून दाखविले तर मी त्याचाही जयजयकार करेन. बाकी ६० वर्षात काय आणि किती भोंगळ कारभार कोण करत आहे हे लिहून आत्तातरी वेळ वाया घालवायचा नाही. उद्याचे बोला. मोदींमध्ये उद्याचा भारत घडवायची इच्छाशक्ती आहे. उत्तर कोण मनमोहन का? की राहूल?

केदार, निदान काही लोक तरी वाचतील ना ? असो जमल्यास एक वेगळा धागा काढून त्यावर पेस्ट करीन.
मोदी किंवा गुजरात बद्दल चांगले बोलले की दंगलींना समर्थन असे होत नाही. दंगली या कोणत्याही भागात आणि कोणत्याही काळी समर्थनीय नाहीतच मुळी. जे झाले त्याबद्दल मोदींना शासन द्यायचे झाले तर बाकी राजकारण्यांना तर तीच शिक्षा लाखो करोडो वेळा द्यावी लागेल.

केदार्,नानबा, महेश.
पुन्हा एकदा.
आपण हे बोलताहात ना?
हे कठिण आहे बोलणे. मी कोण तुम्हाला शिकविणार? फक्त थोडा विचार करा कि आपण काय बोलतो आहोत?
"झाल्या दंगली, मारले गेले लोक, अगदी घान, काळीमा फासणारे होते ते पर्व, पण पुढे?"
पुढे??
पुढे काहीच नाही.
पुढे जे होते, तो विचार करण्यास १३० कोटी असतात. दुर्दैवाने, सर्वांना प्रत्येकी १ च शिक्का असतो. मग इथे प्रश्न विचारावे लागतात की म.टा. ला अमुक लिहिले! असे कसे?
अहो? एक पण पेपर विकत नाही घेता आला का पान पान जाहिराती देऊन? फुकट होत्या का त्या जाहिराती? विअकत असतील तर पेड न्यूज काय असते?
come on! xxx xx अक्खा सकाळ पेपर अन साम वाहिनी विकत घेऊ शकतात, तर मोदीना कठीण आहे?

कसं बोललास. पण इथे लोकांना हे मान्य नसतं. मोदकाचे मो काढले तरी की काही लोकांन गोध्रा अन गुजराथच्या नावाने गळा काढावा वाटतो, कारण मोदीत मो आहे. पण तेच लोक मात्र रोज बॉम्बस्फोट होतात, तिथे त्या त्या सरकारबद्दल मात्र काही बोलत नाहीत. सगळा दांभीकपणा आहे. असो.

प्रगती हेच खरे उत्तर. तुम्ही करत असाल तर करा, नाहीतर पायऊतार व्हा.

मा. केदारजी,
>>> "आज देशाला प्रगती हवी, कोणी काय केले हे नको." >>>

तुमचे इतरत्र लिखाण वाचले. do the ends justify the means?? are u sure when u say this?
कसेही करून अंतास पोहोचले की झाले. मार्ग कोणता ते आपोआप योग्य सिद्ध होईल??
तुम्हास खरेच असे वाटते?
जर असे वाटत असेल, तर आयुष्यात प्रत्येक गोष्टीबद्दल तोच दॄष्टीकोण हवा. नाहीतर 'हिडन अजेंडा' असे ते टिन्पॉट 'बुप्रा/समाजवादी/सोनियाभक्त' इ.इ. म्हणतात.

महेशजी,
माझ्या फोटोबद्दल कुणी तक्रार केली की नाई ठाऊक नाही.
मी तुमची फाईल वाचलेली नाही.
पण अहो अ‍ॅडमिन,
या धाग्यावर बाहेरील लिंक अशी कशी देता येते?
पहा बुवा..
पेड न्यूज वगैरे काही तरी आहे हा धागा.

मी गूगल केले तेव्हा गूगल ने काहीही पैसे मागितले नव्हते. मला नाही वाटत महेशजींना पैसे मागितले असणारेत गूगल ने. मला पण फोटो फ्री मिळाले होते. त्या फाईल सारखे...

ठीक आहे फाईल लिन्क बद्दलचा माझा मेसेज मीच अवघ्या काही मिनिटातच उडवून टाकला आहे. तसाही त्याबद्दल एक वेगळा धागा काढायचा आहे तेव्हा लोक तिकडे वाचू शकतील. आणि शक्यतो लिन्क न देता त्यातील मजकूर लेख स्वरूपात देण्याचा प्रयत्न राहील. बाकी चर्चा चालू द्या.

महेशजी,
मी तुमचा वैयक्तीक दोस्त नाही. दुश्मन ही नाही.
तुमची जर प्रामाणिक इच्छा चर्चा करण्याची असेल तर पुढे बोलतो.

मला लॉजिक च समजत नाही.

अरे??
माझा महाराष्ट्र या देशात सर्वात प्रगत राज्य होता.
होय. 'होता'
मग तो आज का नाही.
इतक्या सगळ्या कंपन्यांचे 'हेड ऑफिस' मुंबई अन प्रॉडक्शन प्लांट मुम-अहमदाबाद हायवे वर का असतो? ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी साठी? कि 'पोलिटिकल अनरेस्ट' मुळे?

मालेगांव तर बदनाम आहेच, धुळ्यापर्यंत जातीय दंगली का उमळतात? कोणती बोगी जाळली जाते तिथे? हे झाले पहिल्या अन दुसर्‍या हायवे बद्दल. खाली जा ना कोल्हापूर सोलापूर कडे? विचार करा. कोण पाय घालतो अन कुठे? कुठे दंगल होते? अन कोणत्या कारणाखातर?

ते ही सोडा,
या राज्यात भाजपा प्रणित सरकार होते. अन मग नंतर गुजराथेत आले., काही दिवसांत. लोकांनी दिला त्यांना(भाजपाला) विश्वास (जनादेश! लाडका शब्द). काँग्रेसवाले किती भिक्कारचोट आहेत हे मी नंतर सांगेन. तो विषयच नाहिये.
मग या काळात, आधीपासून प्रथम क्रमांकावर असलेला महाराष्ट्र 'आपोआप' मागे जाउन दुसरे काही का उगवले पुढे? केंद्राची मर्जी? (कोण होते बरे तेंव्हा केंद्रात? राजीव की राहूल?) कि इथे महाराष्ट्रात कमळाला धनुष्यबाणाचा टेकू घेतल्या शिवाय पर्याय नव्हता म्हणून???

आज या महाराष्ट्रात कोणते मूलभूत व्यवसाय शाबूत आहेत?

त्या पुण्यात त्या 'बोगस' शरद पवारांनी मूलतः उभारलेल्या IT व्यतिरिक्त कोणते मूलभूत उद्योग उरलेत/ आलेत / येणार आहेत?

कुणाच्या 'ताब्यातल्या' कोणत्या महापालिका किती जकात आकारून औद्योगिक विकासाला खीळ घालताहेत?

सहकार चळवळ संपविण्यात आलि महाराष्ट्राची. का? ती काँग्रेसची 'ग्रासरूट स्ट्रेंग्थ' आहे म्हणून??

कुणास ठाऊक...

तो १३० कोटी वाला असतो ना? ती "तो" विचार करतो.

मी बियाणं विकत घेतान्ना मला कोण लुटतो? मला निराधार योजना घेउन कोण येतो अन कोण लाच खातो. असे भरपूर काही. मग 'शिक्का' मारतो.

आपण एसी रूमात बसून टाईप करतो.
असो.

फार झाला संताप.

शांत गदाधारी भिम शांत (जाने भी दो यारों मधला), सबुरीने घ्या
तुम्ही नक्की कोणाच्या बाजुने आणि कोणाच्या विरोधात लिहिले आहे तेच कळेनासे झाले आहे.

do the ends justify the means?? are u sure when u say this? >>> व्हॉट आर द मिन्स? ते सांगाल का? म्हणजे ऐकीव नाही. ठोस आधारावर मग कळेल ती प्रगती खरी की खोटी.

केदार,
तुमचेच वाक्य कॉपी पेस्ट केले आहे. त्याचे स्पष्टिकरण मी कसे देऊ???
"कुणी काय केले"
तुम्हाला ठाउक.
'एन्ड' गुजराथ ची प्रगती आहे.
आनंद आहे.
आणंद सुद्धा आहे.
उत्तिष्ठ! जाग्रत!! ..उठा. जागे व्हा. ऑफिस ची वेळ झाली Wink

पहिले पाढे परत. गोध्रा, दंगंल, गोध्रा, दंगंल. आणि त्या मुसलमानांच्या बदलत्या प्रतिक्रियांचे काय? प्रगती तर झालीच नाही म्हणता ना. मग नंतरही अशाच दंगली झाल्यात बहुदा. रोजच्या बॉम्बस्फोटासारक्य्या.

दंगली मान्य करून पुढे जाऊ नाही का शकत. असो मी थांबतो.

दंगली मान्य करून पुढे जाऊ नाही का शकत. असो मी थांबतो.>>>

दंगल तुम्ही अन मी मिळून केली तर तिच्या पुढे जाता येईल हो. पण जो राज्यकर्ता आहे, तोच जर 'शस्त्रक्रिया' करीत असेल तर?????

यातली भीषणता समजत नाहीये तुम्हाला?

थोडास्स्सा विचार करायचा प्रयत्न करा.
उदा. हिटलर ने त्या ज्यूंची कत्तल केली - नुसती कत्तल नव्हती. Atrocity शब्दाचे अर्थ पुनःपुन्हा समजावेत ते ते सगळे केले- तेव्हा तो स्वतः राज्यावर होता. अन त्याच्या देशात ज्यू 'मातलेले' आहेत अशी सजमूत सर्वांची झालेली होती / करून देण्यात आलेली होती. सुरुवातीच्या काळात ब्रिटनने सुद्धा हिटलर चे समर्थन केले होते हो... कि ज्यू लोकांना मारलेच पाहिजे. रशिया सुद्धा पग्रोम करीत असे.

एवढे असूनही जर्मनीने प्रगतीच केलेली आहे. युरो चलनाला मजबूती कोण देत आहे? असो. तो माझा प्रांत नाही. इथे बरेच समजूतदार्र लोक आहेत.

तुमचं ते 'मी थांबतो' झालं च आहे. पण हेमाशेपो म्हणजे ब्रह्मवाक्य नव्हे.

म्हणून म्हटलं मी,
उत्तिष्ठ! जाग्रत!!

राजकीय नेत्याने बदल घडवणे अपेक्षित असते. त्याची जबाबदारी स्विकारणे हे ही अपेक्षीत असते. घडलेल्या चुकांची माफ़ी मागणे अपेक्षीत असते. आणी बाणी लादली म्हणुन एकदा कै. इंदीरा गांधींनी सत्तेवर आल्यावर दिलगीरी व्यक्त केली आणि त्यावरची टीका संपली. ३५०० शिखांच्या नरसंहाराचे कारण झालेल्या पक्षाच्या पंतप्रधानाने लोकसभेत माफ़ी मागीतली हे सुध्दा जनतेला मानवले पण नरेंद्र मोदींनी आत्मशुध्दी करणे हे तथाकथीत मानव अधिकार किंवा तत्सम पुळका आलेल्या पेड लोकांना मानवु नये याचा अर्थ ते सामाजीक कार्यकर्ते नसुन पेड न्युज पसवरणारे पोटार्थी आहेत हे विचार करणाया व्यक्तीला समजल्याशिवाय रहाणार नाही.

इंदिरा गांधी आणी मनमोहन सिंग यांनी माफी मागितली आहे. मोदी यांनी माफी तर लांबच दिलगिरीही व्यक्त केलेली नाही. मोदींनी केलेला विकास मी नाकारीत नाही, पण म्हणून त्यांना लोकांनी माफी न मागताच माफ करावे असे आपले म्हणणे आहे का?

मोदी यांचे उपोषण आणी विनायक सेन यांचा काय संबंध ? विनायक सेन यांना ज्या अणी जितक्या पुराव्यावरून अटक झाली ते पहाता नक्षलवादावर पीएच डी करणारे किंवा रिपोर्टिंग करणारे सारेच देशद्रोहाच्या आरोपाखाली जन्मभर आत जातील.

आत्मशुध्दी हा शब्द इथे गैरलागू आहे. आत्मशुद्धी मध्ये अपराधीपणाची भावना अभिप्रेत आहे.

>>>> तुम्ही नक्की कोणाच्या बाजुने आणि कोणाच्या विरोधात लिहिले आहे तेच कळेनासे झाले आहे. <<<<<
अहो या सगळ्याला हिन्दुत्ववादी जबाबदार आहेत असे लिहायचे राहुन गेले असले तरी दरवेळेस वेगळे सागान्वेच का लागावे तुम्हाला? Wink (अन तिकडे काही लोक हिन्दुत्ववाद नको असेल तर "उच्चवर्णीय" जबाबदार असा धोषा लावुन अस्तात ते वेगळेच Proud )

तुमच्या राज्यातून किती धंदे अन जॉब्ज चोरले गुजरातने? नॅनो चा प्रकल्प तिथे का गेला? >>>>>>>> >>>>>>
NRI उद्योजकांना भारतात गुंतवणूक करण्यासाठी सर्व राज्यांच्या मुख्य्मंत्र्यांचे presentation असते. मोदींचा त्यात प्रथम क्रमांक आला होता. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री महोदयांनी त्यात भागही घेतला नव्हता.

<<ह्या एका कृतीमुळे पुढे शिख दशहतवाद अनेक वर्षे खदखदत राहिला. >>
ही एक कृती म्हणजे इंदिरा गांधींच्या हत्येनंतर शीख समुदायावर झालेले अत्याचार.
शीख दहशतवाद इंदिरा गांधींच्या हत्येनंतर सुरू झाला? इतिहासाची पाने अशी गायब करता येतात?

<२००२ च्या दंगलीत काँग्रेस व मित्रपक्ष, तद्दन खोटा अहवाल देणारे बॅनर्जी आयोगाचे न्यायाधीश बॅनर्जी, प्रसारमाध्यमे व मानवी हक्कांचे ढोंग करणारे तथाकथित मानवतावादी निधर्मांध यांची भूमिका सुध्दा पक्षपातीच होती. त्याचे उत्तरदायित्व कोण स्वीकारणार?>

या यादीत दंगलीचे काही खटले गुजरातमधून अन्य राज्यांत हलवण्याचे आदेश देणार्‍या सर्वोच्च न्यायालयाचाही समावेश करा.

<बोलतात ते सर्व गुजराथच्या बाहेरचे, ज्यांनी तत्कालीन परिस्थीतीची झळ सोसली नाही असे लोक> मल्लिका सराभाईंना गुजराथेतून तडीपार करण्यात आले आहे काय?

>>> शीख दहशतवाद इंदिरा गांधींच्या हत्येनंतर सुरू झाला? इतिहासाची पाने अशी गायब करता येतात? <<<
अहो, त्यानन्तर सुरू झाला असे कुठे म्हणले आहे? "सुरु असलेला" हे अध्यार्‍हुत, अजुनच अनेक वर्षे खदखदत राहीला..... यात इतिहासाची पाने कुठे गायब केलीहेत? कैच्याकैच शब्दच्छल हां तुमचा भरतराव! Happy

<<ह्या एका कृतीमुळे पुढे शिख दशहतवाद अनेक वर्षे खदखदत राहिला. >>
ही एक कृती म्हणजे इंदिरा गांधींच्या हत्येनंतर शीख समुदायावर झालेले अत्याचार.
शीख दहशतवाद इंदिरा गांधींच्या हत्येनंतर सुरू झाला? इतिहासाची पाने अशी गायब करता येतात?
------- शीख दहशतवाद कधी सुरु झाला हे माहित नाही.

श्रीमती गांधी १९८४ मधे गेल्यात... पण १९९५ पर्यंत म्हणजे तब्बल १०+ वर्षे दहशतवाद अटोक्यात आलेला नव्हता. रिबेरो यांना पुर्ण अपयश आलेले होते... पंजाब दहशतवादाचा भस्मासुर आटोक्यात आणण्याचे श्रेय तत्कालिन (१९८९ - १९९५) पोलिस महासंचालक के. पि. एस. गिल यांना जाते. गिल हे एक वादग्रस्त व्यक्तीमत्व होते पण दहशतवादाचे कंबरडे मोडण्याचे त्यांचे प्रयत्न वाखणण्याजोगे होते.

इंदिरा गांधी आणी मनमोहन सिंग यांनी माफी मागितली आहे. मोदी यांनी माफी तर लांबच दिलगिरीही व्यक्त केलेली नाही.
----- ३१ ऑक्टोबर १९८४ नंतर निव्वळ दिल्ली येथे ३५०० जास्त शिखांचे शिरकाण झाले. या दंगलीत पुढाकार घेतल्याबद्दल पुढे टायटलर, भगत, सज्जन कुमार यांना बक्षीसे म्हणुन लोकसभेची तिकीटे, मंत्रीपदे मिळाली.

१२ ऑगस्ट २००५, तब्बल २० वर्षांनी, श्री. मनमोहन सिंग यांनी या घटनेला जबाबदार असणार्‍या काँग्रेसच्या वतीने देशाची आणि शिख समाजाची संसदेत माफी मागितली.

माफी मागणे आणि खरोखरच मानापासुन पश्चाताप होणे या मधे फरक आहे. माफी मागितली, पश्चाताप झाला तर किती लोकांना आणि काय काय शिक्षा झाल्यात? दहशतवादाच्या विरोधात परवेझ मुशर्रफ पण ओठ हलवायचे. पण ओठ हलवणे आणि प्रत्यक्षात कृती करणे यांचा ताळ-मेळ असायला हवा ना?

२००५ मधे सज्जन(दुर्जन)कुमार यांना तर लोकसभेचे तिकीटे मिळत होते... जनतेच्या दबावामुळे ते टाळावे लागले. १९८४ मधे हा टोळक्याला रस्त्यावर मार्गदर्शनाचे काम करत होता, काम व्यावस्थित होत नाही याबद्द्ल खडसावत होता.

हे सर्व सांगतांना मला कुठेही २००२ च्या दंग्यांचे समर्थन करायचे नाही आहे. सर्व प्रकारची हिंसा वाईटच...

वज्र धन्यवाद,

हिंसेचे समर्थन कोणीच करत नाही. काही वेळा कायद्याच्या चाकोरीबाहेरील उपाय यशस्वी ठरतात.

मराठी पेपरांमध्ये भाषांतर चुकीच झालेले दिसतेय. मोदींचे हे "सद्भावना मिशन" अंतर्गत अनशन्(उपास) होतं. आत्मशुद्धी कसली?
मला राजकारणात कमी रस आणि गती आहे पण मी गुजराती पेपर्स मधली गेल्या २-३ दिवसांतील काही हेडिंग्ज देते तुमच्या माहितीकरिता.
गुजरात समाचार - "उपोषणापायी ५५ कोटीचा चुराडा", "हाय फ्रोफाइल ५ स्टार उपोषण"
"सौ सौ चूहे खाये, बिल्ली चली हज" - इती विरोधी पार्टी
"भगवाधारी रावणथी छेतरायली सीतानी माफक मोदीये जनताने छेतरी"
( भगव्या वेषधारी रावणाने जसे सीताला फसविले तसे मोदीने जनतेला )

दिव्यभास्कर - "सद्भावना मिशनची समाप्ती नाही, ही तर सुरवात आता जिल्ह्या- जिल्हयात हे मिशन चालू राहिल."
"समस देवाणघेवाण - "साबित केले की खात नाही, खाउ देत नाही"
अजून असच काय काय.
आता वरील दोन पेपर्स कोण्त्या पक्षाचे आहेत ते कळेलच. Happy
अजून बरेच लिहीण्यासारखे आहे, पण ऑफिसात बसलेय अन काम आहे १ तास तरी आणि कुणाला इंटरेस्ट असेल तर गुजरात समाचार्/दिव्यभास्कर ऑनलाईन वाचा अन अडलेले गुजराती शब्द विचारा. Happy दुपारी उत्तरे देईन. Happy
(खर तर माझा बॉस राजकारणी जास्त अन उद्योगपती कमी आहे, मोदींशी जवळचा संबंध आहे म्हणून माझ्याजवळ news पुष्कळ आहेत पण i don't want to disclose असो. Happy )

मोदींनी जर पध्द्तशीर दंगलींची केंद्रे उध्वस्त करण्याचे ठरवुन दंगलीला दिशा ( समजा ) दिली असेल ..>> Lol यासारखे हास्यास्पद विधान दुसरे नाही. दंगल घडवली आणि तिला प्रोत्साहन दिलं मोदी-तोगडीयांनी. मग दंगलींची कुठली केंद्र उध्वस्त करण्याचं काम मोदींनी केलं बुवा?? विकासाची कामं मोदींनी केली , गुजरातला प्रगतीपथावर नेलं यात दुमत नाही. पण म्हणुन त्यांनी घडवुन आणलेला नरसंहार योग्य असं म्हणणं योग्य आहे काय?? जर मोदींना विकास घडवुन आणता आला नसता तर मग ईथे त्यांची पूजा करण्यात येतेय ती तशीच केली असती कां??

मला क्वचीत कुठेतरी मोदींचा बॅनर दिसला >> मराठी लोकसत्तामधे जाहीरात देण्याचे काय प्रयोजन?? Uhoh

मायबोली वय केवळ ४९ मिनीटे आणि चांगल टाईप करायला येतेय. गुड.. Happy
पुरावे देऊन काय साध्य करायचय? Uhoh
पण म्हणुन त्यांनी घडवुन आणलेला नरसंहार योग्य असं म्हणणं योग्य आहे काय??>> अगदी बरोबर. ते दोषी असतील तर कारवाई झालीच पाहिजे.

Pages