मालवणी शिकायचंय? भाग-२

Submitted by नीलू on 27 January, 2009 - 04:31

मालवणी शिकायचंय? थोडं थोडं येतंय पण आठवत नाहीये? इथे विचारा. किंवा तुम्हाला छान बोलता येत असेल तर इतरानाही सांगा.
या अगोदरचं मालवणी भाषेबद्दलचं हितगुज इथे पहा

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

परीक्षा नाय वो, गॄहपाठ...

विनय Wink

बैल विकुचो लागतलो कारण घरात बी नाय हा, आणि मिरग इलो माथ्यार. होते चार तेतलो एक गुदस्ता मेलो. आता तीन बैल ठेवान मी काय करू? चौथो घेवाक पैको नको. यंदा एका जोतार भागवचां लागतलां. अगदीच अडलां तर पकल्याकडे जॉत मागान. पण गिराय्क मात्र गावाक होयां बरासां. मगाशी इल्लो तो गांवकार बरो होतो. पण मेलो इडीकाडी वालोय नाय, आणि पान खानारोय नाय. असल्याक माझो बैल इकलंय तर विरडीची विरड कामाक लावीत. मालक कसो होयो? पान इडीवालो. म्हदी म्हदी ईडी वडूक थांबलो तर बैलाकय जरा विश्रांती मिळता.

(हो गॄहपाठ आसा, हे.मा. नी आदी सोडव नये... विद्यार्थांका सोडवाक वेळ देवचो, तेंका नाय जमलो तर मदत करूची).

विनय Happy

अरे वा शाळा मस्तच चल्ली हा. एक मास्तर नी दोनच विद्यार्थी >>>बाकिचे नुस्तेच टवाळ्यो करतत. मिया हय येवान एकलीच शिकत रवतय गो. Happy

बैल विकावा लागेल कारण घरात बी नाही आहे, आणि मृग माथ्यावर आलाय. होते चार त्यातला एक ***(गुदस्ता) मेला. आता तीन बैल ठेउन मी काय करू? चौथो घ्यायला पैको नको. यंदा एका ज्योत्यावर भागवावं लागेल. अगदीच अडले तर पकल्याकडे(पक्याकडे) ज्योतं मागेन. पण गिर्‍हाईक मात्र मिळायला हवं चांगलंसं. मघाशी आला होता तो गावकरी बरा होता. पण मेला विडीकाडी वाला नाही, आणि पान खाणाराही नाही. अश्या माणसाला माझा बैल विकला तर *** ***(विरडीची विरड) कामाला लावेल. मालक कसा हवा? पान विडीवाला. मध्ये मध्ये विडी ओढायला थांबला तर बैलांना जरा विश्रांती मिळते.

मास्तरानु हय दोनच शब्द नाय इले माका.

गुदस्ता - ह्या वर्षी
ज्योतं - ???
विरडीची विरड - म??
-----------------------------------------
सह्हीच !

जोत म्हणजे नांगरच बहूतेक .. माझा अंदाज .
-----------------------------------------
सह्हीच !

विरडीची विरड = तासंतासभर
जॉत = नांगर

अरे मराठीतही जोतं म्हणतात ना ???? .. नांगरणी करायला वापरतात.. आणि बि बियाणंही पेरतात ना ?

विरडीची विरड म्हणजे तासन् तास Happy वा

गुदस्ता= गेल्या वर्सा.
जोत नायतर जॉत = नांगर आणि २ बैल.
इडीकाडी= इडी आणि बरोबर माचिस.

आता कसां.. पोरांचो अभ्यास झालो काय हे. मां. नी कठिण शब्द सांगल्यानी.. Lol

व्हाळार गेल्लंय कपडे धुवाक. दिसात्सून किती कपडे बदलतत हे लॉक. बायलमाणसां नाय घरात दोन, पण लुगडी पाचपंचवीस धुवाक टाकतत. माझ्यात काय 'घोपाण' रवलां नाय. हाडाची काडां झाली लुगडी पाथरीर आपटुन. पोरांच्या पोटासाठी करूक व्हयां सगळां. तरी बरां आजून व्हाळाक पाणी आसा. उद्या उनाळो इलो आणि बावीचां पाणी काडुचां लागला, तर राटारच जीव जातलो एकाद्या दिवशी.

विनय Happy

(मी हे उतारे देवान कोकणी गावातलं जीवन थोडां थोडां दाखवचो प्रयत्न करतंय असां माका वाटता).

ओहोळावर गेले कपडे धुवायला . दिवसातून किती कपडे बदलतात हे लोक , बायामाणसं नाहीत दोन घरात पण साड्या पाचपंचवीस टाकतात. माझ्यात काय शक्ती/ताकत राहीला नाही . हाडाची काडं झाली साड्या आपटून,पोराच्या पोटासाठी कराव लागतं सगळं , तरी बर अजून ओहोळाला पाणी आहे ,उद्या उन्हाळा आला तर विहिरीच पाणी काढाव लागतं , तर रहाटावरच जीव जातो एखाद्या दिवशी.

ह्यातले - घोपान अन राटार - रहाट / मोटार का ?
विनयगुर्जी चेक करा Happy

* भावना धन्यवाद ! असे तुझ्यासारखे,विनयसारखे लोक शिकवुक असा म्हणून ही भाषा आवडुक लागते Happy

भावना स्पेशल धन्यवाद गो बाय Proud

-----------------------------------------
सह्हीच !

>>>माझ्यात काय 'घोपाण' रवलां न>>>>>> विनयदादा Lol

अर्थ लावायचा प्रयन्त केला त्यात काय हसण्यासारखं ?? Sad
अश्यानी ज्यांना शिकायचय ते येतील का इथे ?
-----------------------------------------
सह्हीच !

अरे! तुला हसले नाहीये... उगाचच स्वतःवर कशाला ओढून घेतलय, मला काही समजलं नाही. उगाच काहीही..

>>>>रहाट / मोटार का ?<<<<<
मोटार नाही रहाट म्हणजे रहाट ,
ज्याच्यावर दोरी टाकून पाणी काढतात असे लहान लोखंडी चाक(कप्पी).

अरे सुन्या , रटार म्हणजे रहाट का ?
अन घोपाण म्हणजे काय ?
-----------------------------------------
सह्हीच !

विनय, मस्त देतास हा उतारे Happy
दिप, सह्ही Happy प्रयत्न बरो.. अरे गैरसमज करु नकोस.. आयटी विनयांच्या 'घोपाण' लिहिण्याला हसली.
राटार = रहाट बरोबर तुझा
घोपाण = ताकद
पाथरीर = कपडे धुण्यासाठीचा मोठा दगड
व्हाळ = ओहोळ

घोपाण = ताकद ह्या नवीन शिकाक मिळला.

ही रात्र शाळा आहे का ?
रात्री प्रश्नपत्रिका दिली जाते, आणि रात्रीच सोडवीली जाते. माझ्या सारख्या दिवसा शिकायला येणार्‍या विद्यार्थ्यांचा अभ्यास कसा होणार ?
===================
माझ्या तुमच्या जुळता तारा
मधुर सुरांच्या बरसती धारा

ही रात्र शाळा आहे का ?>>>
मास्तरानु हेडमास्तरानू आणि शिक्षिका बायानु ह्या काय बरां नाय हां. तुमका हय्सर दोन दोन शिफ्ट करूचा लागात.

राटार म्हणजे रहाटावर
(डोक्यार ह्याचार त्याचार तसा रहाटार चे एक बोली रूप म्हणजे राटार व्हय ना? )
व्हाळ म्हणजे ओढा, झरा
बावी म्हणजे विहीर, बावडी

मिया आपली सामानार्थी शब्द लिहून काढतंय आब्यास केलंय आजचो. Wink

(डोक्यार ह्याचार त्याचार तसा रहाटार चे एक बोली रूप म्हणजे राटार व्हय ना? )
>> हम्म असा हाय तर Happy
छान आब्यास डॅफो .
-----------------------------------------
सह्हीच !

मग असं करा एका विद्यार्थान एक वाक्य सोडवायचां.. चार चौघांचो अभ्यास होयत... Happy

माझ्यात काय 'घोपाण' रवलां नाय. Happy वा वा विनयानु आजेची आठवण ईली मी काय सांगलय की ती माका असाच सांगी. Happy
अरे दिप घोपान म्हट्ल्यार आयटेक लगेच मालवणाक, वाडीक फेरफटको मारुन ईल्यासारख्या वाटला आसात. काय गो आयटे खरा मा.
गुर्जी होये तर अशे!! पोरा रमतत अभ्यासात Happy
भावना आनंद्व्हाळार ईली हा ती कपडे धुवुक Lol

बाजारात 'बाजार' काय नाय दिसता. एकच गाबतीन बसलीहा बांगडे घेवान. काय भाव देता कोणाक ठावक? खिश्यात मेजून बारा अणे रवले. कित्याक भजी खावंक गेलंय कोण जाणा? दिड रुपयाक दोन तरी बांगडे देतली होती. तिकल्याच्या आटवणीन तोंडाक पाणी सुटलां. तिरफाळ घालून तिकलां करतली घरकारीण. आता बारा अण्यात एक बांगडो बसलो, तर कुवळ तरी करीत. भात घरचां आसा म्हणान चार घास गावतत गिळांक. जाताना आंबलेची तोरां चार व्हराक होई. निस्त्याकात पडतीत नायतर चटणेत.

विनय Wink

बाजारात 'बाजार' काही दिसत नाही. एकच कोळीन दिसतेय बांघडे घेवून.काय भाव देतीय कोणास ठाउक? खिशात मोजून बारा आणे राहीले.भजी खायला कुठे गेले कोण जाणे ? दीड रु.मधे दोन तरी बांगडे दिली असती. तिकल्याच्या आठवणीन तोंडाला पाणी सुटलं. तिरफाळ ??

आता पुढचं दुसरा विद्यार्थी सोडवील. Happy

-----------------------------------------
सह्हीच !

बाजारात 'मच्छी' काही दिसत नाही. एकच कोळीन बसली आहे बांगडे घेवुन. किती किमतीला देणार कूणास ठावुक? खिश्यात मोजुन बारा आणे राहीलेत. कश्याला भजी खायला गेलो कूणास ठावुक ? दिड रुपयाला दोन तरी बांगडे दिले असते. माश्याच्या आमटीच्या आठवणीने तोंडाला पाणी सुटले. बायकोने तिरफळे घालून माश्याची आमटी केली असती. आता बारा आण्यात एक बांगडा आला, तर **** तरी करेल. भात घरचाच (शेतातला) आहे म्हणुन चार घास खायला मिळतात. जाताना चार **** कैर्‍या नेल्या पाहीजेत. आमटित टाकेल नाहीतर चटणीत.
===================
माझ्या तुमच्या जुळता तारा
मधुर सुरांच्या बरसती धारा

दिप,
तिरफळा - माश्याच्या आमटीत घालतात वाटणात वाटुन .. सुकलेली छोटी छोटी हिरव्या रंगाची फळं असतात. त्यातील बिया काढुन वाटणात वाटुन घेतात. त्यामुळे माश्याच्या आमटीला वास खुप छान येतो नी आमटीहि छान होते चवीला. माश्यांचा वास जरा कमी होतो त्यामुळे. Happy

सतिश,
कुवळ : मिव आजच वाचलय.. पण लिंकनुसार माका वाटता माश्याची चटणी आसात Happy
आंबलेची तोरा : नुकतीचा झाडाक धरलली छोटी छोटी कैरी..

मित्रांन्नु बरोबर लिवलंय तुम्ही. Happy
तपासलय तुमचो गृहपाठ.

(मिया काय वर्गाचो मॉनिटर असल्यागत लिवतंय हा Happy वायच हलके घ्या :दिवा:)

तिकला म्हणजे माश्याची जाड्सर आमटी
आणि कुवळा म्हणजे माश्याची पातळसर आमटी.
भावनान तिरफळा सांगीतली हतच वर. काळ्या मिरी सारखी दिसणारी सुकलेली.

बाकि ते निस्त्याक काय तां आयकलय आज्जे सासु कडून पण माका काय आठवणा नाय.

निस्त्याक म्हणजेच माश्याची आमटी.
ओह कुवळ म्हणजे पातळ आमटी? म्हणानच विनयांनी लिवल्यानी. Happy
म्हणजे : एक मासा हंडाभर रसा Happy

एक मासा हंडभर रसा Lol

Pages