मतदान आणि परीक्षण : प्रवेशिकांची एकत्रित यादी - मायबोली गणेशोत्सव २०११

Submitted by संयोजक on 8 September, 2011 - 07:46

गणेशोत्सवातील स्पर्धांत आणि कार्यक्रमांत मनापासून भाग घेतल्याबद्दल सर्वांचे आभार. मात्र उत्सव अजून संपला नाहीये. असंच भरघोस मतदान करून योग्य विजेते घोषित करण्यास आम्हाला मदत करणार ना?

मतदानाचा कालावधी : भारतीय वेळेनुसार सोमवारी सकाळी ९:०० (तारीख १२ सप्टेंबर २०११) ते शुक्रवारी सकाळी ९:०० (तारीख १६ सप्टेंबर २०११)

प्रवासवर्णन स्पर्धा : विजेत्याची निवड मतदानाने होईल. मतदानासाठी इथे टिचकी मारा

आपल्या सोईकरता स्पर्धेच्या प्रवेशिकांची यादी देत आहोत :

१. कविता नवरे - http://www.maayboli.com/node/28644
२. स्वप्ना_राज - http://www.maayboli.com/node/28756
३. इंद्रधनुष्य - http://www.maayboli.com/node/28766
४. जाईजुई - http://www.maayboli.com/node/28772
५. सुमेनिष - http://www.maayboli.com/node/28785
६. बेफ़िकीर - http://www.maayboli.com/node/28788
७. जित - http://www.maayboli.com/node/28937
८. अरुंधती कुलकर्णी - http://www.maayboli.com/node/28948
९. बागेश्री - http://www.maayboli.com/node/28969
१०. शाम - http://www.maayboli.com/node/28975

आमंत्रण लेखन स्पर्धा : विजेत्याची निवड मतदानाने होईल. मतदानासाठी इथे टिचकी मारा.

आपल्या सोईकरता स्पर्धेच्या प्रवेशिकांची यादी देत आहोत :

१. आशूडी - http://www.maayboli.com/node/28688
२. स्वप्ना_राज - http://www.maayboli.com/node/28799
३. बेफ़िकीर - http://www.maayboli.com/node/28803
४. कविता नवरे - http://www.maayboli.com/node/28832

मायबोली शीर्षकगीत स्पर्धा : विजेत्यांची निवड परिक्षकांच्या तर्फे होईल.
(सर्व प्रवेशिका परिक्षकांकडे पाठवल्या आहेत.)

१. मुक्तेश्वर कुळकर्णी - सजली अमुची मायबोली : http://www.maayboli.com/node/28664
२. UlhasBhide (उल्हास भिडे) - मायबोली-शीर्षकगीत - http://www.maayboli.com/node/28683
३. हेमंत पुराणिक - मायबोली शीर्षक गीत - http://www.maayboli.com/node/28805
४. जागू - ज्योतीने तेजाची आरती - http://www.maayboli.com/node/28939
५. शाम - ज्योतीने तेजाची आरती - http://www.maayboli.com/node/28951

प्रकाशचित्र स्पर्धा : विजेत्यांची निवड परिक्षकांच्या तर्फे होईल.
(सर्व प्रवेशिका परिक्षकांकडे पाठवल्या आहेत.)
या स्पर्धेअंतर्गत ३ उपविषय होते. त्यांच्याकरता आलेल्या प्रवेशिका आपल्याला खालील दुव्यांवर पाहता येतील.

विषय १ - शब्दांवाचून कळले सारे : http://www.maayboli.com/node/28521
विषय २ - जादू तेरी नजर : http://www.maayboli.com/node/28522
विषय ३ - आकाश तू, आभास तू : http://www.maayboli.com/node/28523

कलाकुसर स्पर्धा : या स्पर्धेकरता एकही प्रवेशिका न आल्यामुळे ही स्पर्धा रद्द झाली आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

"मायबोली शीर्षकगीत स्पर्धा" व "प्रकाशचित्र स्पर्धा" यांना मतदानाने विजेता निवडता का येणार नाही - कृपया कारण कळेल का ?

संयोजक महोदय,

काही महत्वाचे वाटले ते लिहावेसे वाटत आहे.

१. मनःपुर्वक अभिनंदन की आपण हाती घेतलेला हा उपक्रम अचाट लोकप्रिय ठरला. असेच उपक्रम (स्पेशली लहान मुलांनी काढलेली चित्रे) चालू ठेवल्यास खरच प्रोत्साहनपर कार्य होईल.

२. हा उपक्रम अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने राबवण्यात आला याचे वेगळे अभिनंदन!

====================================================

३. ही मतदान पद्धती मात्र (मला तरी) काहीशी अयोग्य वाटत आहे. त्याची कारणे:

== आंतरजालीय लोकप्रियतेचा पडू शकणारा प्रभाव

== पूर्ण सदस्यसंख्येने मतदान न करणे

== न वाचताही मतदान होऊ शकणे

== ज्यांना कमी (किंवा अजिबात मते मिळाली नाहीत) मते मिळाली त्यांचे व्यक्तीमत्व कितीही परिपक्व असले तरी जाहीररीत्या त्यांच्या लेखनाच्या प्रतीवर (प्रतीबाबत) शिक्कामोर्तब होणे

इत्यादी!

संयोजक समितीमध्ये सुजाण सभासद आहेतच. त्या समीतीनेच हे मतदान (गुप्तरीत्या ) केल्यास अधिक योग्य होणार नाही काय?

-'बेफिकीर'!

'आणखीन एक विनंतीपुर्वक नोंद':- Happy

'रिझल्ट्स'मध्ये गेल्यावर टोटल टक्यांची संख्या 'शंभर टक्यांपेक्षा' अधिक होत आहे. त्याला 'टक्केवारी' म्हणता येणार नाही असेही वाटले. चुभुद्याघ्या.

कोणत्या रिझल्ट मध्ये शंभर टक्क्यांच्या वर बेरीज येतेय? ठीक आहेत की दोन्ही.
>>>

येत होती असे मी पाहिले. आता प्रवास वर्णन यात ९९ % बेरीज होत आहे.

Happy

@ पुरंदरे शशांक

स्पर्धा जाहीर होतानाच त्यांचे विजेते कोणत्या पद्धतीनुसार घोषित केले जातील हे सांगितले होते.
या दोन स्पर्धांकरता त्या क्षेत्रातील जाणकार परिक्षण करत आहेत

@ बेफिकीर

स्पर्धा जाहीर होतानाच त्यांचे विजेते कोणत्या पद्धतीनुसार घोषित केले जातील हे सांगितले होते.
आपण म्हणत आहात त्या मुद्द्यांचा आदर आहे. पण त्याचबरोबर, हे मतदान गुप्त रहात असल्यामुळे सदस्य त्यांना जास्तीत जास्त आवडलेल्या लेखांना मत देतात. मतदानाचा हक्क सर्वांनीच आपापली जबाबदारी समजून बजावला पाहिजे. सभासदांवर विश्वास ठेऊन आणि जबाबदारी देऊन ते योग्य विजेता निवडतील अशी आशा आहे.

हा उपक्रम खरच छान होता. काही प्रमाणात मी बेफिकीर यांच्याशी सहमत आहे. अंतिम टक्केवारी जर गुप्त राहिली तर जास्त बर अस मलाही वाटत. फक्त टक्केवारीप्रमाणे क्रमात नावे द्यावीत. दुसर म्हणजे, ह्या लेखनाच्या स्पर्धेतसुद्धा जर परिक्षकांचा काही वाटा असता तर बरे झाले असते असे वाटते. माझ्यासारख्या पहिल्यांदाच लिहीणार्‍याला जर काही प्रतिसाद किंवा परीक्षण मिळाले तर तेवढाच हुरूप येतो.

लेखनस्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व सभासदांनी कृपया आपापले धागे सार्वजनिक केले आहेत का याची पुन्हा एकदा खात्री करून घ्यावी ही विनंती!

आवडत्या कविता, ते लेखन सध्या ग्रूपमधल्या सभासदांपुरते मर्यादित आहे, तुम्ही इथे जाऊन सदस्य झालात तर वाचता येईल - http://www.maayboli.com/node/28637
किंवा धागा सार्वजनिक झाल्यावर वाचता येईल.

मतदानाचा कालावधी : भारतीय वेळेनुसार सोमवारी सकाळी ९:०० (तारीख १२ सप्टेंबर २०११) ते शुक्रवारी सकाळी ९:०० (तारीख १६ सप्टेंबर २०११)

>> मी आता वोटीन्ग केले- होत आहे. नक्की कालावधी काये??

मतदानाचा कालावधी वाढवून भारतीय वेळेनुसार मंगळवारी सकाळी ९.०० (तारीख २० सप्टेंबर) पर्यंत केला आहे.

ज्यांनी अजूनही मतदान केले नाही त्यांनी प्रवेशिका वाचून मतदान करावे ही विनंती.

रॉबिन हुड,

प्रकाशचित्र स्पर्धेच्या विजेत्या प्रवेशिका खालील धाग्यांवर बघायला मिळतील -
http://www.maayboli.com/node/28521 ----शब्दांवाचून कळले सारे...

http://www.maayboli.com/node/28522 ----जादू तेरी नजर

http://www.maayboli.com/node/28523 ----आकाश तू, आभास तू...

तसेच, सर्व स्पर्धांचे निकाल खालील धाग्यावर बघायला मिळतील -
http://www.maayboli.com/node/29013