मायबोली शिर्षकगीत स्पर्धा - "ज्योतीने तेजाची आरती" - UlhasBhide

Submitted by UlhasBhide on 2 September, 2011 - 15:41

मायबोली-शीर्षकगीत

भाषा मराठमोळी, हर अंतरी फुलावी
घेउनी ध्यास आली उदयास ‘मायबोली’ ║धृ║

मिटवून अंतराला, जोडून अंतरांना
ही स्नेहजाल विणते, विश्वात ‘मायबोली’ ║१║

सदरांच्या पदरांनी, प्रत्यंगी नटलेली
साहित्य वाङ्मयाची, ही खाण ‘मायबोली’ ║२║

सार्‍या कलागुणांना, दे वाव मायबोली
सार्‍या नवोदितांची, ही माय ‘मायबोली’ ║३║

चर्चा, मतांतरांची, अन् वादविवादांची
परिणती सुसंवादी, घडविते ‘मायबोली’ ║४║

सहजीच जीवनाचा, अविभाज्य भाग झाली
अमुच्या मनी विराजे, अभिजात ‘मायबोली’ ║५║

.... उल्हास भिडे (२-९-२०११)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच

छान! Happy

उल्हास , सहज वृत्तबद्ध लिहिण्याच्या तुमच्या उपजत कौशल्याचा हेवा वाटतो.
कविता छान पण गुडी गुडी ,नुसतीच गोड झालीय. थोडी खटास, थोडा स्पाईस पण हवे होता. पण तुम्ही पोलिटिकली करेक्ट तेच लिहिता, नाही का?

Pages