मायबोली शिर्षकगीत स्पर्धा - "ज्योतीने तेजाची आरती" - UlhasBhide

Submitted by UlhasBhide on 2 September, 2011 - 15:41

मायबोली-शीर्षकगीत

भाषा मराठमोळी, हर अंतरी फुलावी
घेउनी ध्यास आली उदयास ‘मायबोली’ ║धृ║

मिटवून अंतराला, जोडून अंतरांना
ही स्नेहजाल विणते, विश्वात ‘मायबोली’ ║१║

सदरांच्या पदरांनी, प्रत्यंगी नटलेली
साहित्य वाङ्मयाची, ही खाण ‘मायबोली’ ║२║

सार्‍या कलागुणांना, दे वाव मायबोली
सार्‍या नवोदितांची, ही माय ‘मायबोली’ ║३║

चर्चा, मतांतरांची, अन् वादविवादांची
परिणती सुसंवादी, घडविते ‘मायबोली’ ║४║

सहजीच जीवनाचा, अविभाज्य भाग झाली
अमुच्या मनी विराजे, अभिजात ‘मायबोली’ ║५║

.... उल्हास भिडे (२-९-२०११)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सहजीच जीवनाचा, अविभाज्य भाग झाली
अमुच्या मनी विराजे, अभिजात ‘मायबोली’>>>

अतिशय सुंदर ओळी आणि गीत! खरोखरच मायबोलीचे शीर्षक गीत होईल हे!

आवडेश Happy

स्पर्धा क्रमांक ३ : मायबोली शीर्षकगीत स्पर्धा, परीक्षकांनी विजेत्या प्रवेशिकेची निवड केली आहे.
विजेती प्रवेशिका : Ulhas Bhide (उल्हास भिडे)

हार्दिक अभिनंदन. Happy

उल्हास भिडे आपले मनःपूर्वक अभिनंदन. खरंच फारच सुरेख जमली आहे कविता. आता चाल लागल्यावर तर ऐकायला आणखीनच मजा येईल. Happy

Pages