शीघ्रकाव्य - चारोळ्यांच्या आरोळ्या : विषय ५ - "खाऊच्या आरोळ्या"

Submitted by संयोजक on 3 September, 2011 - 09:13

आधीच्या चारोळीत आपण आपल्या नावडत्या विषयावर आरोळ्या ठोकल्यात ना?

मग आता इथे संधी आहे ती आपल्या आवडत्या विषयावर आरोळ्या ठोकायला. जेवण हा विषय आपल्या सगळ्यांच्या आवडीचा. पण त्यातल्या त्यातही काही जास्त आवडणारे पदार्थ असतात. कोणाला पावभाजी आवडते, कोणाला श्रीखंड, तर कोणाला मॅगी!!!

कुरकुरीत काकड्या, लालभडक टोमॅटो
ताजे, लुसलुशीत ब्रेडचे स्लाईस
बटर अन चटणी चव वाढवाया
माझं व्हेज सँडविच व्हेरी नाईस!

काही का आवडेना, आपल्या आवडत्या पदार्थांची आठवण काढून आरोळ्या ठोकणार ना???

श्रीबालाजीचीसासू दिसताच
हसू येई चेहर्‍यावर
चारोळीला विषय तोंपासु
तर ताबा राहील का तोंडावर?

चला तर मंडळी, करा सुरूवात भोजनाला ......

******************************************

सर्वसाधारण नियम:

१. ही स्पर्धा नाही. हा एक खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०११' ह्या ग्रुपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा हा खेळ खेळू शकतो/ते, फक्त सलग दोन चारोळ्या देऊ शकत नाही.

******************************************

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक तो योगी साबरमतीचा
त्याने केला सत्याग्रह मीठाचा
एक मी भोगी महिकावतीची
रसनेला माझ्या मोह थालिपीठाचा

(खरंच थालिपीठ खात खात टाईप केलंय Proud )
(रोहनच्या (पक्का भटक्या) महिकावतीची बखरवरुन मुंबईला पर्यायी शब्द घातला आहे.)

मामीच्या हातचा चविष्ट चाखलाय शिरा
साधनाच्या केकचा मना अजुन खमंगपणा
दिनेशदांच्या काजूउसळीचा स्वादच निराळा
अश्विनीच्या थालिपिठाला रिकामी अजुन जागा.

रबडीवरुन आठवली मायावती
हलवायाकडे नासलेली थप्पी माव्याची
आठवून सगळ काल दुधाची आणली पिशवी
आजच केला दुधीहवा शुद्ध शाकाहारी Lol

खवा नको बाई
माला हवा रवा
रव्या सोबत तुप
मग बनवेन तुपातला शिरा

रोशोगुल्लाचे आम्हीही फॅन
फॅन खाली गरम दुधाला मान
मान राखण्यासाठी खावा गुलाबजाम
करावे कसे बरे माश्यांना बॅन ?

पौष्टिक असतो म्हणे लाडू मुगाचा वा डिंकाचा
हलावायाकडून आणावा मोतीचूर वा बुंदीचा
रंग रूप रस गंध अशा सगळ्या गुणांचा
बेसनाचा लाडू माझ्या आवडीचा

गर्र...रम दुध नको मजला
पाणी आणी त्यात फरक कसला
दुधात रसायन आणी रंग घातला
पाणी त्यापरी आवडे मजला

छे छे कमालच केली सगळ्यांनी
रैनाची ती तर्‍हा निराळी
अनुमोदना ही माझी तिनोळी

(सॉरी , अजिबातच जमल नाहीय्ये, पण अनुमोदनाप्रित्यर्थ स्विकारा म्हणे) Lol

दुध आणि नॉनव्हेज कट्टर दुश्मन
बेसनचा लागतो कच्चट खमण
रसायनांच त्यात असत मिश्रण
म्हणुनच मला आवडत मटण .

मयेकर, आणि त्याला पाकही लागत नाही Wink

पाक करू बाई पाक करू
एकतारी करू की दोनतारी करू?
लाडू करू की साखरांबा करू?
अगदीच नाही जमले तर
लिंबू पिळून सुधारस करू!

आवडते आता दाल आणी बाटी
कुस्कुरुन वरणाची वाटी वर वाटी
डोळ्यावर माझ्या झोपेचा दट्ट्या
पोटात झाल्या बाटीच्या बिट्ट्या

दलबाटी नी राजस्थानी केरसांगरी
मला बाई लागते महाराष्ट्रियान थाली
महाराष्ट्रीयन थाळी चवीची भारी
त्याच असावी पापलेटची करी.

परातीत घेतले पोहे
पोह्यांना दाखवलं ऊन
कढीपत्ता, दाणे, खोबरं, डाळं
ठेवलं एकत्र करून
चढवली कढई, केली फोडणी
परतले पोहे झटपट
खमंग चिवड्यासाठी
फार नाही खटपट!

पोह्यांना दाखवायला इथे नाही उन
उनाच्या भरवश्यावर मिटून जाईल भुक
थाळी नी परातीत आता निवडे मोडाचे मुग
बिरड्याची भाजी झाली की खाऊन टाकेन गुपचुप.

पोह्या वर पोहे सात पोहे
मुरमुर्‍यावर मुरमुरे सात मुरमुरे
चिवड्यावर चिवडा सात चिवडा
म्हणा आता हे "आठच"वेळा

वक्के पौर्णिमा. नियम न बघता आधास्यासारख्या मी टाकल्या इथे पोस्टी.

ताटात घेतली कोथिंबीर
त्यावर पेरल बेसन
कांद्याचा होता वांदा
मग आल्-लसूण नी भाजून वाटला धणा
चविला टाकले मिरची आणि मिठ
तळून काढली कोथिंबीरवडी चटपटीत.

घरच्या दुधाचे दही विरजले
शुभ्र मऊसूत लोण्याचे तूप कढत ठेवले
पातेल्याला लागलेली करडी रवाळ बेरी
साखर घालून खाणार कोणी काही म्हटले तरी!

Pages